Thursday, April 24, 2014

गुरुक्षेत्रम मंत्र हा मला माझ्या सद्‌गुरुंनी दिलेला मंत्र आहे. जेव्हढा वेळ तुम्ही गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणता त्यावेळी तेव्हढा वेळ ते गुरुक्षेत्रम्‌ तुमच्या मनामध्ये तयार होत असते आणि गुरुक्षेत्रम्‌ आले म्हणजे त्यातील चारही गोष्टी व त्रिविक्रमही आलाच ह्यांच्यासोबत त्या धर्मासनावर बसलेला आमचा मित्रही तेव्हढया वेळेसाठी आमच्या मनामध्ये येतो. पण जर मी १० वेळा म्हटले तरी काही फायदा झाला नाही असा विचार करुन मी हा मंत्र म्हटला तर काहीही उपयोग होणार नाही. 

गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताना काम, क्रोध ह्यांची मनातील गर्दी हलवायचा प्रयत्न करा.
समजा १०८ वेळा जर पूर्ण म्हणता येत नसेल तर फक्त अंकुर मंत्र १०८ वेळा म्हटला तरी चालेल. 
माझे मन मला गुरुक्षेत्रम्‌ मंत्रासाठी दिवाण-ए-खास बनवायला हवे 


१.११.२०१२

साईसच्चरित प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितले, जसे प्रवाहात अनेक लाकडे एकत्र येतात व पुढे परत वेगळी होतात. तसेच जीवनात असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे अनेक दूरची नाती पण जवळची वाटायची आता मात्र जवळची नाती पण दूरची वाटतात. नातेवाईक बदलत जातात पण नाती तीच राहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक वेगवेगळी माणसे भेटतात पण ह्या प्रवासाला आधार देणारा एकच सद्‌गुरु असतो.
 
जो ह्याला विन्मुख होतो, त्याला सुख मिळू शकत नाही, त्याचं जीवन कृतार्थ होत नाही. आज आपल्या न नशिबाने मातृवात्सल्यविन्दाम्‌, गुरुक्षेत्रम्‌, रामरसायन आहे. आपण खूप श्रीमंत आहोत. आपल्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही
जे सद्‍गुरुचरणी निष्ठावान आहेत, चण्डिकाकुलाशी प्रामाणिक आहेत तेच प्रेमाने, सुखाने राहू शकतात.

आयुष्यात सगळं करा, पण ते चण्डिकाकुल व त्याचे द्वार असणार सद्‍गुरु ह्यांच्यापासून कधी दूर जाऊ नका.
माझे ह्याआधी अनेक जन्म झाले असतील, पण ह्या जन्मात मला संधी मिळाली आहे ही संधी परत येणे नाही. ह्यापुढे अडीच हजार वर्षांनंतर चार प्रलय झाल्यावर परत नवे युग आल्यावर ही संधी येईल. हा जन्म देवासाठी राखून ठेवा आमची first priority ह्या जन्मात चण्डिकाकुलच असू दे. आज उपासनेचा शेवटचा दिवस असूनही केवळ तुम्हांला हे सर्व सांगण्यासाठी माझ्या आईची permission घेऊन मी इथे आलो आहे. आपण physics शिकलो आहोत. आपण बघतो quanta सतत बदलत असतो. मानवामध्ये तीच अवस्था असते सतत बदल घडत असतो

ज्याचा quanta बदलत नाही असा तोच एकमेव आहे. तो कधीही बदलत नाही, त्याचा शद्बही कधी बदलत नाही. ज्याक्षणी त्याच्या शद्बाचा आदर राखला गेला नाही, की तो त्याचा शद्ब पाळायला बंधनकारक राहत नाही. तो प्रेमळ आहे त्याची आई साक्षात क्षमा आहे. अनंत क्षमा हेच तिचे स्वरुप आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे क्षमा आहे. पण मला तुम्ही क्षमा करण्याची संधी द्या. आपला बाप तो आपला बाप, दुसर्‍या कोणाला दया येणं शक्य नाही, हे साईनाथांनी सांगितल आहे, मी नाही. मी एकदाही साईंना बघितले नाही.

"तो" रुप घेऊन येवो की न येवो त्याच्या वरचा विश्वास दृढ ठेवा. तिच्या इच्छेने (आई चण्डिकेच्या) घडते ते स्वरुप तो स्विकारतो पण तो कधीही बदलत नाही. म्हणूनच आमच्या शरिरातील सतत बदलणार्‍या quanta ला आधार फक्त त्याचाच असू शकतो. ३१ डिसेंबर पर्यंतच ही संधी आहे मग तुम्ही म्हणाल नंतर जन्म घेणार्‍या बाकीच्यांचे काय? तर ज्यांना "त्याची" जाणिव आहे व जे मनापासून गुरूमंत्र स्वीकारतील त्यांच्या प्रत्येक जन्मात मी कायम पाठीशी उभा राहीन.त्यांना मृत्यु कधीच नसेल. जेव्हा सत्ययुग सुरु होते तेव्हा जन्माला घालतानाच मानवाला गुरुमंत्र कानात सांगितला जातो. त्रेतायुगात जन्माला आल्यावर गुरुमंत्र ऐकवला जातो. द्वापारयुगात वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला जातो. तर कलियुगात तो अर्जन करावा लागतो. तो आज आपण मिळवला आहे. गुरुमंत्र माझ्याकडे आहे म्हणजे सगळे आहे.

गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणजेच मोठी बलविद्या. गुरुक्षेत्रम्‌ मंत्राची जी बलविद्या आहे, ती ज्याला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यालाही शक्य आहे.
 
ह्या माझ्या आईच्या हातातील १८ शस्त्रे जो कुणी खरा श्रद्धावान आहे व ज्याला ९ निष्ठा मान्य आहेत. त्याला कायम सहाय्यकारी होतील हा वर मी माझ्या आईकडून मिळवला आहे व हा वर तुम्हांला देण्यासाठी आज मी इथे आलो आहे.
 
खरचं तुम्ही भाग्यवान आहात. मातृवात्सल्यविन्दानम्‌ घेऊन पुढे चला पण आजपासून निश्चय करा -
 
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"
 
आज प्रेमाने आपण जयंती मंगला काली हा गजर करायचा आहे व आज रात्री प्रत्येकाने म्हणा -
 
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"  व प्रेमाने आपल्या गुरुला  म्हणा - "I LOVE YOU"
 

Monday, March 10, 2014

अभिमंत्रित त्रिविक्रम जल :

त्रातारं इन्द्रं = रक्षण करता
अवितारं इन्द्रं = संरक्षक = तुमच्यावर संकट
येण्याच्या आधीच त्याचा नाश करणारा
हवें हवें सुहवं शुरं इन्द्रम = लढाईची वेल आली असता जो न
डगमगता सगल्यांच्या पुढे जातो तो शूर
शक्र = त्याच्या शक्तीची तुलना कोणाचीही होऊ
शकत नाही
मघवा = ज्याच्याकडे सर्वच्या सर्व ९ प्रकारची ऐश्वर्य
आहेत
पुरहूत = हाक ऐकून जो लागलीच धावत
येतो तो असा जो सतत व जास्तीत जास्त वेला धावून
आला आहे असा
अशा सर्व प्रकारचे गुण असणारा त्रिविक्रमा तु
आमच्या तिनही देहांत प्रवेश कर. जो रक्षण कर्ता व
संरक्षण कर्ता ही आहे
अश्या त्रिविक्रमाला मी आवाहन करतो किं तू
माझ्यात ये माझ्या त्रिविध देहात, त्रिविध
कालात (भूत, भविष्य, वर्तमान) ये व मला दुरुस्त कर
अश्या हे इन्द्र शक्ती धारण
करणार्या त्रिविक्रमा तूला मी आर्ततेने आवाहन
करतो की तू ये आणि तू येणारच आहे
हा माझा विश्वास आहे कारण तो माझ्यावर
तेवढा विश्वास
टाकतो मी कितीही चुका केल्या वा त्याच
चुका परत परत केल्या तरीही तो माझ्यावर विश्वास
ठेवतो
हा मंत्र व हे जल आम्ही रोग प्रतिबंधक शक्ती,
आमचा मनःशक्ती वाढवण्याचे काम हे जल करणार आहे.
आमचे मन, इंद्रिय, व आमचे शरीर पवित्र करणारे हे जल आहे
माझ्या हातून जर एखादी चूक घडली अथवा एखादे
पाप घडले तर ह्या पाण्याने आंघोल करा ती चूक माफ़
झालेली असेल



ह्या अभिमंत्रित जलापासून कोणीही वंचित राहणार नाही. आपण प्रथम ह्याचे नियम जाणून घेऊ या. नियम म्हणजे त्रिविक्रमाचे प्रेम आणि आदिमातेची कृपा, प्रेम व क्षमा.

हे अभिमंत्रित त्रिविक्रम जल स्नान करण्यासाठी आहे. स्नान करतान दोन थेंब पाण्यात (बादलीत) टाकायचेत की मग सगळ पाणी चार्ज होणार. जे कोणी शॉवरने आंघोळ घेत असतील त्यांनी, स्टील/पितळ ह्यापैकी कुठल्याही धातूच्या तांब्या घ्यायचा त्याच्यात पाणी घेऊन दोन थेंब ह्या जलाचे टाकायचेत मग टाळू, चेहरा, कंठकूपचक्र (विशुद्धचक्र), मस्तक (आज्ञाचक्र) कपाळावर मध्यभागी ह्या भागांना ते पाणी लावायचं.

हे पाणी मंगळवारपासून वापरायला सुरुवात करायची आहे. जेव्हा हे जल वापरणार त्यादिवशी त्या बाटलीतले सगळे पाणी संपवायचे, दुसर्‍या दिवशीसाठी पुन्हा त्यात पिण्याचे पाणी बाटलीत (३०ml ची बाटली) भरायचे. बादलीत दोनपेक्षा जास्त थेंबही टाकू शकता.

तुम्हाला इतर कोणाला हे जल द्यायचे असेल तर, त्यांच्या बादलीत दोन थेंब टाका आणि बाटली परत घेऊन या. कारण ती बाटली अभिमंत्रित गुहा तयार होणार आहे. ही गुहा रोज भरायची, रोज संपवायची. ही बाटली फक्त एका वर्षापर्यंतच चार्ज राहील.

एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्‌मध्ये बाटली चार्ज करून घेण्यासाठी आणायची. गुरुक्षेत्रम्‌मध्ये येऊन एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा .मग अकरा वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रंम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ हा मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा.

जे इथे नाहीत त्यांच्यासाठी मी इथे एक बाटली चार्ज करून ती गुरुक्षेत्रम्‌मध्ये ठेवणार आहे. समजा तुम्ही चार्ज केलेली बाटली चुकून फुटली तर, नवीन बाटली घ्यायची एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा की ती बाटली आपोआप चार्ज होईल.

जल विकायचा प्रयत्न केला तर त्याची power जाणार. पाण्यात कसलाही व्यवहार चालणार नाही. त्रिविक्रमने तुम्हाला जल विकलेलं नाहिए. जल विकलंत तर, जल विकणारा आणि विकत घेणारा दोघांसाठी ही ह्या पवित्र जलाचा उपयोग ह्या जन्मासाठी संपलेला असेल. ज्यांची इच्छा नाही त्यांना हे जल देऊ नका. ज्यांचा भाव आहे त्यांनाच द्या.

समजा एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्‌ला यायला नाही मिळाले तर, एक महिना उशीर झाला तर ११ ऐवजी २२ वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ मंत्र म्हणायचा.

कुठलीही गोष्ट ह्या बाटलीला बाधित करू शकणार नाही. स्त्रियांना मासिक पाळी असतानाही ह्या जलाने आंघोळ केली तरी चालेल. सुतक आहे, सोयर आहे काहीही problem नाही.

समजा उंदीर मुतला बाटलीवर. शांतपणे बाटली धुवायची सद्गुरूंचं नाव घ्यायचं पाणी पुन्हा अभिमंत्रीत होणार. त्याच्यासाठी सगळी बाळचं आहेत. चुकून कितीही मोठी चूक केली तर सांभाळायला मी समर्थ आहे तो बाप आहे, सख्खा बाप आहे.

ह्या मंत्रात जे दिलयं ते सगळं जल करणार.

बेसिकली आमची १) रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणार, २) मन:शक्ती वाढवणार ३) जीवन उत्सहाने जगण्यासाठी प्राण आवश्यक आहे. प्राणाला कार्य करण्याची प्रेरणा देणार. प्राणाला, मनाला रोगप्रतिबंधक शक्ती पुरवणार आहे.

आंघोळ करताना ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ ह्या मंत्राबरोबर ‘ॐ ग्लौं सद्‌गुरुनाथाय नम:’ म्हटलं तर अधिक चांगलं.
हातून कधी चूक घडली तर, शांतपणे पाण्यात दोन थेंब हे जल घाला, आणि सद्‌गुरुचं नाव घेत आंघोळ करा, तिथल्या तिथे सगळं नाहीस होईल.

हे जल नीट जतन केले तर पिढ्यान्‌पिढ्या तुम्ही हे जल पुढे देणार आहात.

माझ्या सध्याच्या उपासनेची प्रथम निष्पत्ती हे जल आहे. आज अभिमंत्रित केलेली ही बाटली अडीच हजार वर्षे गुरुक्षेत्रम्‌मध्ये असणार आहे.
संदर्भ : परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०६.०३.२०१४)

Friday, January 17, 2014

उपनिषदात ते तिघंजण (उत्तम, मध्यम, विगत) विचारतात, ‘सगळं विश्वासावर अवलंबून आहे का?’ त्यावर तो सांगतो, ‘होय, तुमचे मंत्र, उपासना, साधना ही सगळी साधने आहेत तुमचा विश्वास दृढ करण्यासाठी.”ह्या मंत्रातूनच नवार्णव मंत्र तयार झाला - ‘ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे’
‘विच्चे’ हे अव्यय आहे. आणि, परंतु, पण हे सुद्धा अव्यय आहे. अव्यय म्हणजे ज्यात कर्ताच्या, कर्माच्या, क्रियापदाच्यानुसार बदल होत नाही. ‘विच्चे’ म्हणजे साध्या दर्शनापासून ते तपश्चर्येपर्यंत जे जे म्हणून आपण करतो. ‘विच्चेयति तृतीय नेत्रम्‌’ हा algorithm आहे. हा विच्चेकारच तृतीय नेत्र आहे. जिच्यात सगळं, सर्व मंगल करण्याची ताकद आहे ती तुमचं मंगल करणार नाही का? मला किती मोठी जखम झाली हे महत्वाचं नाही. पण तिची परीक्षा पाहण्यासाठी मुद्दाम जखम करून घेऊ नका. ती जखम कशी भरून काढायची हे बघायचं तुमचं काम नाही. जिने केवळ संकल्पातून जग उत्पन्न केलं, ती काय करू शकते ते तुम्हाला माहीत पडणार का? ती काहीही करू शकते, तिचे मार्ग आम्हाला माहीत नाहीत. तिचा पुत्र काहीही करू शकतो, त्याचे मार्ग आम्हाला माहीत नाहीत. आम्हाला वाटत, आम्हाला पाहिजे त्या मार्गावरूनच त्याने यावं आणि आमची जखम आम्हाला हवी तशी भरून काढावी. आम्हाला तिचा तृतीय नेत्र माहीत पाहिजे. तो रोग बरा करणारा आहे. रोग म्हणजे - injury प्राण, मन, शरीर, बुद्धी, आमच्या अर्थकारणाला झालेला रोग. ‘सर्व मंगल मांगल्ये’ म्हणताना तिचा तृतीय नेत्र बघता आला पाहिजे.
गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताना मी मंत्र म्हणत नव्हतो, तुम्हीच म्हणत होता पण फरक पडला का? नाही. जर आपण ह्या गुरुक्षेत्रम्‌‍च्या आश्रयाला असलोत तर कितीही वेगळ्या-वेगळ्या गोष्टी घडल्या तरी आपल्या कार्यात काहीही फरक पडत नाही.