Thursday, November 16, 2023

hanuman chalisa pravachan

प.पू. बापूंनी दिनांक 20/06/2019 रोजी केलेल्या इंग्रजी पितृवचनाचा प.पू. बापूंच्या आशीर्वादाने केलेला मराठी अनुवाद. 

     मित्रांनो आज आपण कशावर बोलणार?

     हनुमान चलिसाबद्दल बोलू.

     हनुमान चलिसा नक्की काय आहे? आम्ही *"श्रीगुरुचरणमासात"* एका दिवसात 108 वेळा म्हणतो.

     हनुमान चलिसा ही संत तुलसीदासजींनी लिहिलेली प्रार्थना आहे. ही व्याख्या मूख॔पणाची आहे.  ही केवळ प्रार्थनाच नाही तर त्याहीपेक्षा बरेच काही आहे.  हा तुलसीदासजींचा दृष्टीकोन आहे का?  अजिबात नाही. 

     हनुमानजींनी दिलेली शक्ती आहे का? हो मान्य.  पण त्याहीपेक्षा बरेच काही जास्त आहे.  हनुमान चलिसा ही निर्मिती आहे.  *ती करणारा दुसरा कुणीही नसून स्वत: रामच आहे*. ही हनुमान स्तुती आहे.  जी स्वत: रामाने केली आहे.   ती दृष्टी तुलसीदासजींना प्राप्त झाली आणि त्यांनी ती लिहून काढली एवढेच.  *राम हनुमन्ताचा विचार कसा करतो तर असा करतो*.

     आपण नेहमीच राम आणि रामेश्वर मध्ये फरक करतो.  पण मला समजले पाहिजे की हनुमन्त रामाची भक्ती करतो तर राम हनुमन्ताची भक्ती करतो.

     भारतीय संस्कृतीच्या बाहेरील लोकांना कदाचित हे समजणे कठीण होईल.  कारण एका बाजूने विचार करता ते दोघे एकच आहेत तर दुस-या बाजूने ते दोघेही वेगळे आहेत. का? *कारण त्यांचे बाह्य रुप व त्यांची कत॔व्ये ही भिन्न आहेत. जी जगदंबेने त्यांना बहाल केली आहेत*. या जगाची एकमेव निर्माती जगदंबा.    

     तर.....तुलसीदासजींनी हनुमान चलिसा लिहिली त्याची गोष्ट आहे. मी दहा-बारा वर्षांपूर्वी सांगितली आहे.  पुन्हा सांगणार नाही.   तुम्ही जुन्या श्रध्दावानांना विचारु शकता. ते तुम्हांला सांगतील.

     आज आपण अभ्यासणार आहोत हनुमान चलिसा म्हणजे काय?  ती मुळात कसे काय॔ करते?  मी नेहमीच म्हणतो, *"आत्म्यासह मानवी शरीर नाही तर आपण मानवी शरीरासह आत्मा आहोत"*.  हे वास्तव आहे.  आपण स्वयंभगवानाचे अंश आहोत.

     भवसागर हा वादळयुक्त मोठा समुद्र आहे.  ज्याला आपण आपले जीवन म्हणतो.  आपले काहीही नाव असो, आपला कोणताही व्यवसाय असो, आपण भिकारी असो की मोठे उद्योगपती असो पण आपण सव॔ मानव आहोत व आपल्या प्रत्येकाला आत्मा आहे.   बापू! प्राण्यांनाही आत्मा असतो. हो मान्य! तुम्ही सुद्धा याआधी प्राणीच होतात. नक्कीच आपण प्रत्येक जण 84 लक्ष योनींचा प्रवास करुन आलो आहोत.  आपल्या मेंदूमध्ये 84 लक्ष योनींची बीजे आहेत.   आपण मानव कसे झालो?  तर या 84 लक्ष योनींच्या चक्रात फिरुन पुरुष किंवा स्त्री झालो.  बॅक्टेरियासारखा लहानात लहान प्राणी ते इतर सव॔ मोठे प्राणी यांची बीजे आपल्या मेंदू आहेत.

     कोणते बीज वाढवायचे हे आपल्यावर अवलंबून आहे.   जर आपल्यातील सशाचे बीज बलवान झाले तर आपण भित्रे होऊ व सतत घाबरत राहू.  जर हरणाचे बीज बलवान झाले तर आपण भितीच्या विचारानेच पळत सुटू.  

     कोणते बीज विकसित करायचे आणि कोणते नाही हे कसे ठरविले जाते? एका बाजूने आपल्या आधीच्या जन्माच्या कर्मानुसार तर दुस-या बाजूने हया जन्माच्या कर्मानुसार.   थोडक्यात काय तर प्रारब्ध व क्रियमाणानुसार.  पण या सा-याच्या पलीकडे हे आपल्या *नाथसंविधावर* अवलंबून आहे. *नाथसंविध् म्हणजे जगदंबा आपल्या जन्माच्या वेळेस आखते ती योजना*. 

     प्रत्येकाचे नाथसंविध् हे वेगळे असते.  मी नेहमीच सांगतो माझ्या आजच्या दिवसाच्या वागण्यावरुन प्रत्येक सूर्योदयाबरोबर माझे नाथसंविध् ही बदलते हे कायम लक्षात ठेवा. आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी ती आपल्याला मदत करण्यास कायम तयार असते.  *नाथसंविध् ही तिची योजना असली तरी माझ्यातील स्वयंभगवानाचा अंश ते नाथसंविध् स्विकारून त्याप्रमाणे वागतो.  तो अंश तर मी त्याचा अंशी आहे असे वेदांत म्हटले आहे.  माझे स्वतःचे म्हणणे नाही*.

     तो पूर्ण आहे तर मी त्याचा एक भाग आहे. सव॔ देणग्या, उदारता, मदत आपल्या आई कडून मिळालेली प्रत्येक शक्ती आपल्याला आपल्या आत्म्याद्वारेच दिली जाते.  *आपल्या आत्म्याला छद्म आत्मा असे म्हणतात*. छद्म आत्मा म्हणजे आपला स्वतःचा अहंकार. मी असा आहे तसा नाही. मला हे पाहिजे हे आवडत नाही.  *आपल्या सर्वांना भावना आहेत.  आपण संत, संन्यासी किंवा भिक्षू नाही*. 

     प्रत्येकाला भावना आहेत पण आपण कोणतेही नियम पाळत नाही.   स्वतःच्या आयुष्यापुरते बोलायचे झाले तर किती जण परीक्षेच्या आधी वेळापत्रक तयार करतात?  आणि ते काटेकोरपणे पाळतात?  कोणी लठ्ठ आहे. सकाळी लवकर उठून फिरायला जाण्याचा विचार करतो.  त्याकरिता 7-8 हजाराचे बूट आणतो.  मी असे बूट कधीच आणले नाहीत.  त्या बूटांत आपले सुंदर पाय घालतो.  आणखी जे जे काही सुंदर हवे असते ते घेतो आणि शिवाजी पार्क, वरळी सी फेस वरील वाॅकींग ट्रॅकवर जातो.  घरी येतो.  वजन काट्यावर उभा राहतो. त्याला अमुलाग्र बदल अपेक्षित असतो.  जसे माझे वजन 105 किलो वरुन 75 किलो व्हावे.  पण हे चुकीचे आहे.  हे घडणे अशक्य आहे. 

     *आपण आपल्या जीवनातही चुकीच्या कल्पना, चुकीच्या अपेक्षा ठेवतो आणि छद्म आत्म्यास जन्म देतो.  आपल्या चुकीच्या कल्पना चुकीच्या अपेक्षा म्हणजेच "छद्म आत्मा "*.

      वजन काट्याचे उदाहरण ही एक मजा होती. तुम्हांला कळावे म्हणून. आपण स्वतः कडून देखील चुकीच्या अपेक्षा ठेवतो. आपला सभोवतालचा परिसर, माणसे, राष्ट्रे यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे *आपले मनच आपले शत्रू होते*. हे मनच माझ्या व माझ्या परमेश्वराच्या आड येते.  त्यामुळेच आत्म्याला जगदंबा व स्वयंभगवानाकडून प्राप्त झालेल्या गोष्टी मला प्राप्त होऊ शकत नाहीत. 

       आपल्याला शरीर आहे हे अमान्य करता येत नाही.  आपल्यात *जनुके* आहेत.  त्यामुळेच पौगंडावस्थेत मुले व मुली एकमेकांकडे आकर्षित होतात.  जनुकांमुळेच मला भूक लागते.  भूक लागणे ही काही वाईट गोष्ट नाही.  कोणाला दोनदा तर कोणाला पाच वेळा भूक लागते. यात विशेष असे काही नाही. 

      *माझे पूण॔ जीवन नक्कीच माझ्या शरीरावर अवलंबून असते.  म्हणूनच मला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  शरीराकडे दुल॔क्ष केल्यास मी आध्यात्मिक ध्यास घेऊ शकत नाही.  म्हणूनच स्वतःच्या शरीराची उत्तम रितीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे*.

      आपण आपल्या शरीराकडून आणि मनाकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो.   खरं तर त्यांची व इतर गोष्टींची सरमिसळ करतो.  *चुकीच्या अपेक्षा म्हणजेच छद्म आत्मा    सर्व गोष्टींच्या आड येतो. छद्म आत्मा सर्वात मोठा अडथळा आहे*.  हनुमन्त मुळात वधस्तंभावर आहे या छद्म आत्म्याला मारण्यासाठी.  कसा? तर थोडा थोडा, हळूहळू आणि सतत.  त्यामुळे आपल्याला दु:ख जाणवत नाही.  दु:खदायक परिस्थितीतून बाहेर न येता जर आपल्याला छद्म आत्म्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर *मंत्रगजर हा एकमेव राजमार्ग आहे*.

     हनुमान चलिसामुळे महाप्राणाकडून येणारी विश्वाची प्राणशक्ती आपल्याला प्राप्त होते.   हिच प्राणशक्ती प्रत्येक ग्रहाला त्याच्या कक्षेत फिरण्याची शक्ती देते.  *तोच महाप्राण तिच प्राणशक्ती आपल्यात सुद्धा आहे.   आपल्या नाथसंविधानुसार महाप्राण व प्राणशक्ती आपल्या आयुष्यात काय॔रत राहतात*.

      मंत्रगजर 1 माळ, 16, 32 किंवा 108 माळा तुम्हांला पाहिजे तेवढया करा.  या माळा पहिल्यांदा आपल्याला तयार करतात.  त्यामुळेच आपण जगदंबा व तिच्या पुत्राला आपले मन व शरीर तयार करण्याकरिता आमंत्रित करतो.

      मंत्रगजर चार पातळयांवर काम करतो.

👉   प्रथम शरीर व मन तयार करणे.

👉   परमेश्वराकडून शक्ती व मदत ग्रहण करण्याची क्षमता वाढवितो.

👉    प्राप्त झालेली क्षमता कधी, कुठे व कशी वापरायची व त्यातून यश कसे प्राप्त करायचे हे शिकवते.

👉   चुकीच्या गोष्टी करण्यास परावृत्त करते.  आपण सिंहावलोकन केल्यावर मी हे करायला नको होते. माझ्याकडून चूक घडली. ही अपराधीपणाची भावना येते.  *नित्य म॓त्रगजर व वर्षातून एकदा एका  दिवसात 108 वेळा म्हटलेली हनुमान चलिसा माझ्या मनातील सर्व अपराध दूर करतात*. हनुमाना चलिसा माझ्यातील महाप्राण जो निष्क्रीय झाला आहे त्याला सक्रीय करते. *म्हणजेच मन, प्राण, प्रज्ञा एकात्मतेने काय॔ करु लागतात*.

      लहान मुलांना मी कमीत कमी तीन वेळा हनुमान चलिसा म्हणायला सांगतो. कारण त्यांचा लहान मेंदू विकसित होत असतो.  छोट्या मुलांना बरेच प्रश्न पडलेले असतात. त्यांची उत्तरे कोणीच देत नाही.   *ती नेहमी गोंधळलेली असली तरी नेहमी आनंदी असतात*. हिच योग्य वेळ आहे जेव्हा त्यांचे मन तयार होते.  म्हणजे छद्म आत्मा तयार होणार नाही व परमेश्वराकडून बक्षीस रुपात प्राप्त होणा-या चांगल्या गोष्टी त्याच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आणतील.  *म्हणूनच माझ्या बाळांनी हनुमान चलिसा रोज तीन वेळा म्हटलीच पाहिजे*.  तुम्ही 70 वर्षाचे असा की 80 तुम्ही माझी बाळेच आहात.

      गुरुचरणमासामध्ये 108 वेळा हनुमान चलिसा म्हणा.  जसे जमेल तसे म्हणा पण म्हणा.

      *माझ्या व माझ्या यशस्वी जीवनाच्या आड ज्या गोष्टी येतात त्या बाजूला होतील. हेच हनुमान चलिसाचे महत्त्व आहे*. 

      हनुमान चलिसात 108 मंत्र आहेत.  किती? 108. 108 मंत्र 108 वेळा म्हटले जातात.  अनेक मंत्र तुम्ही स्वत:च सहजपणे ओळखू शकता.  

नासै रोग हरे सब पीरा  ।
जपत निरंतर हनुमत बीरा ॥

होत न आज्ञा बिनु पैसारे ।

      *पैसारे म्हणजे प्रयास.  अवधी भाषेत पयसा म्हणजे प्रयास.   "असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी" हे होणे नाही.  प्रयास करा पण गधा मजूरी नको*.

       प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू वाईट वागवतात तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागत होता.  हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले, विष दिले तरी देवाने त्याला मरु दिले नाही व खांबात स्वत: प्रगटून हिरण्यकश्यपूचा वध केला. *कारण तो सतत मंत्रगजर करत होता*.

      आपल्या मनाविरुद्ध आई वडील वागले की आपण रागावतो.   *ये मेरा बाप हो नहीं सकता* म्हणतो.  तुम्ही दोघेही माणसेच आहात.  आईवडीलांनी मुलांकडून जास्त अपेक्षा करु नये. 

     *ब-याच वेळा आईवडील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांची ओझी आपल्या मुलांवर लादतात. हा छद्म आत्मा तयार करण्याचा वेगळा माग॔ आहे.  प्रत्येकासाठी हे चूकच आहे*.   

     माझ्या मुलीला व सूनेला  भयावह चित्रपट पाहताना मी समोर बसून राहिले पाहिजे. कोणता चित्रपट? सगळे जोरात म्हणाले - 1920. त्यातील मनुष्य  हनुमान चलिसा पठणामुळे वाचला.  ती मजा असेल मी मान्य करतो. चित्रपट करमणुकीकरिता असला तरी अनुभवाने एक कळते *हनुमान चलिसा म्हटल्याने आपल्याला मदत मिळतेच*.
     
      *राम नाम मदत करतेच.  त्याच्यावर व त्याच्या आईवर ठेवलेला विश्वास आपल्याला मदत करतोच.  तो कधीच आपली उपेक्षा करत नाही. तुम्ही कसेही असलात तरी.  *"मी तुझा आणि तू माझा आहेस"* एवढेच पुरेसे आहे.  सव॔ बाजूंनी तुमची कशी काळजी घ्यायची हे तो जाणतो. *पण त्याने कसे वागावे याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका*. तुमच्याकरिता जे जे उचित आहे ते ते तो करणारच.  *तो तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार पण दुकानदाराप्रमाणे नाही तर बापाप्रमाणे* हे कायम लक्षात ठेवा. 

     हनुमान चलिसाची पहिली ओळ "जय हनुमान ग्यान गुन सागर" हा सर्वात मोठा मंत्र आहे.  ज्ञान आपण समजू शकतो.  पण हल्ली कोणाला ज्ञानाची आवश्यकता नाही. गुगलमुळे सव॔ ज्ञान मिळते.  मला ज्ञानी माणसे आवडत नाहीत.  मी जगातला सर्वात मोठा अज्ञानी आहे. मी सर्वात दुल॔क्षिलेला आहे.   

      पण हा ग्यान गुन सागर आहे नुसता गुन सागर नाही. आपल्यातील चांगले गुण उचित मार्गानी आपली प्रगती घडवून आणतात.  आपण हनुमन्ताचा जयजयकार करतो कारण तो ग्यान गुन सागर आहे.   तो माझंही ज्ञान वाढविणारा आहे.   सव॔ प्रश्नांची उत्तरे या ग्यान गुन सागराकडूनच मिळणार आहेत.  हनुमन्तचा श्लोक:-

*अतुलित बलधामं*....
      (प्रत्येकाला येतोच) 

      हनुमन्तापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि त्याचा रेकाॅड॔ कोणी मोडू शकत नाही.   *सव॔ शास्त्रांमध्ये मग ते भौतिक असो की आध्यात्मिक हनुमन्त एकमेव अद्वितीय आहे*.आपल्याकरिता उचित काय हे आपल्याला कळत नाही हिच आपली फार मोठी समस्या आहे. मग श्रीगुरुचरणमासात एकदा तरी 108 वेळा हनुमान चलिसा म्हणणार ना? *हो डॅड*. पूण॔  विश्वासाने म्हटल्यावर हनुमन्त आपल्याला नापास करणार नाही.

       हनुमन्ताच्या भजनात स्वयंभगवान राम तल्लीन होतो हे लक्षात ठेवा.   आपण जेव्हा हनुमन्ताची स्तुती करतो तेव्हा नकळत रामाचीही स्तुती करतो.  तो स्वयंभगवान  भक्ताधीन आहे.  तो आपल्या भक्तांकरिताच सव॔  काय॔ करतो.   तुम्ही हनुमान चलिसा म्हणणार तेव्हा मी तुमच्या जवळच असणार.  तुम्ही जगातल्या कोणत्याही क्लुप्त्या लढविल्यात, शेंडया लावल्यात 
तरी मी जगातला सर्वात वाईट मुलगा आहे.  कठीण कवच फोडण्यास कठीण असते.  म्हणूनच तुम्ही सतक॔ रहा.  प्रेमाने व विश्वासाने हनुमान चलिसा म्हणा.

डॅडनी "जय हनुमान ग्यान गुन सागर"  हा मंत्र 5 वेळा  म्हणून घेतला.   
    
 *I LOVE YOU MY KIDS LOVE YOU A LOT"*
माझ्या बाळांनो मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.

*लव यू डॅड*

       बापूराया खूप प्रयास करुन  घेतलेस.  अनुवाद करताना काही चुकले असल्यास क्षमस्व!🙏🙏🙏

✍  from  whatsApp group

Thursday, November 9, 2023

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१४.११.२०१३- कामधेनू गोमाता गोपद्म विशेष )

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१४.११.२०१३- कामधेनू गोमाता गोपद्म विशेष )
॥ हरि ॐ ॥

ॐ मंत्राय नम: ॐ रामवरदायिनी बघताना आपल अनेक algorithem बघत चाललो आहेत. हे algorithem म्हणजे विश्वाची रचना आहे. म्हणजेच स्वत:चीच रचना आहे. म्हणून हे algorithem आमच्या नित्याच्या जीवनात व्यवस्थित बसतात, काम करत असतात. हे फक्त ऐकून सोडून चालणार नाही.

असाच एक आदिमातेचा algorithem आहे. कुठलेही शुभकार्य असताना स्वस्तिक सोबत दारात गोपद्म काढतात. चार गोपद्म काढली जातात.

आम्हाला माहीतच आहे गाय पवित्र आहे म्हणून तिची चार पावले काढली जातात. सध्या ३ दिवस तुलसी विवाहाचे दिवस आहेत. पूर्वी तुळशी वृंदावन असायचे तिथे सकाळ संध्याकाळ गोपद्म काढली जायची.
ज्यांच्या घरी गौरी येते त्यांना माहीत असेल दारात गोपद्म काढल्याशिवाय गौरीला आत आणत नाहीत का? म्हणजे  कुठेतरी देवीतत्वांशी ह्याचा संबंध आहे.
तुळशी वृंदावनासोबत अजून एका ठिकाणी गोपद्म काढली जातात? कुठे? गोपद्म काढणे अत्यावश्यक मानले जाते? प्रत्येक स्त्री ती गोष्ट दरवर्षी करतेच ती म्हणजे भाऊबीज.
भाऊबीजेच्या दिवशी जेव्हा पाटावर बसून ओवाळले जायचे तेव्हा गोपद्म काढले जायची भाऊबिजेशी गोपद्मचे नाते काय?
हा गोपद्म जेव्हा algorithem म्हणून समजून घ्यायचा तेव्हा आपल्याला काय जाणून घ्यायचे. आदिमातेची तीन स्वरूपं स्थूल (अनसूयामाता), सूक्ष्म ( माता) व तरल (गायत्रीमाता) पातळीवरची पण ह्या आधीची दत्तगुरूंची ’नि:स्पंद’ जाणीव म्हणजे अदिती.
गोपद्म म्हणजे गोमातेची चार पावले आहेत.
दिवाळीची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते. या दिवशी पूर्वी गाय व तिचा वत्स म्हणजेच वासराचे पूजन केले जायचे.
सप्तपदीच्या वेळी तुम्ही ७ पावले घेता त्या ७ पावलांबरोबर, ७ शपथा, ७ promises, ७ वचने असतात.
इथे गोमातेची ४ पावले आहेत. ह्या पावलांसोबत गोमाता काय घेते हे बघायला हवे. ही गाय आपल्या भारतीयांसाठी पवित्र आहे. म्हणजे नक्की काय? प्रत्येक गाय ही भारतीयांनी कामधेनू मानलेली आहे. कामधेनू नावाची गाय जी ऋषी वसिष्ठांकडे होती ती आधी जमदग्निकडे होती. ही कामधेनू म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाने ज्यांनी तिला माता मानले त्यांना तिने पाहिजे ते पुरवले.पण ज्यांनी मदांध बनून तिला भोग्य मानले त्या प्रत्येकाचा तिने नाश घडवून आणला. ह्या कामधेनूचा अंश प्रत्येक गोमातेत असेल असा वर गोमातेला मिळाला म्हणून आम्ही गाईला पवित्र मानतो. आजही गोमातेला जे नमस्कार करतात ते मला आवडते. कुठलेही पाप चालेल पण गोमांस खाण्याचे पाप कधीही करू नका. एकवेळ ऊपाशी रहा पण गोमांसला स्पर्शदेखील करू नका. 
 गोमाता जेव्हा जगेल तेव्हाच हिंदुस्तान जगेल. गोमांसला कधीही, चुकुनही स्पर्शही करु नका. जेव्हा नॉनव्हेज खायला बाहेर जाल तेव्हा हे कन्फर्म करा. चीझ खातानाही ते चीझ व्हेज आहे ह्याची खात्री कारा. गाय ही आपल्याला अतिशय पुजनीय आहे आणि गोमातेचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे. 
तुम्ही जेव्हा non-veg जेवायला बाहेर जाता तेव्हा एखादे पदार्थाचे नाव कळले नाही तर विनासंकोच विचारा, कुणाचे मांस आहे ते. चुकून खाल्ले तर मी त्यातून बाहेर काढू शकेन, पण मुद्दामहून कधीच गोमांस खाऊ नका. cheese खाताना पण विचारा ते veg आहे की non-veg आहे. काही ठिकाणी cheese गोमातेच्या enzymes पासून बनवले जातात. अभक्ष भक्षण केलं तर त्याचं पाप लागणारच. म्हणून शाकाहारी cheese खाण्यासाठी आग्रह करा. ह्या आधी चुकून खाल्ले गेले असेल तर ते पाप मी धुऊन टाकले. त्याची काळजी करू नका. यापुढे मात्र दक्ष रहा.
गोमांस व गोहत्येचे पाप आपल्याला लागता कामा नये. पॅकेजवर हिरवा dot असतो. तो बघून veg cheese वापरा.
समजा चुकून खाल्ले गेले तर शांतपणे सांगा अनिरुध्दा मी विसरलो. अशावेळी माझ्यासाठी सोपे आहे.
म्हणून गुरुपौर्णिमेला मी सांगतो तुमची पापं मला द्या.
आदिमातेचे नियम तिच्या बाळांसाठी आहेत. तुम्ही तिचे कैदी नाहीत. त्या नियमांचे पालन करुन घेण्याचे काम तिने तिच्या पुत्रांकडे दिलं आहे. प्रत्येक घरी शिस्त बाणणं अत्यंत आवश्यक असते.
कामधेनू ही संकल्पना वैदिक आहे. कामधेनू म्हणजे काय? तर आदिमातेची सर्व मंगल करण्याची इच्छा मनुष्याला ज्या शक्ती नाडीद्वारे प्राप्त होते. त्या शक्ती नाडीसच ऋषीमुनी कामधेनू म्हणतात.
शक्ती नाडी म्हणजे आईच्या गर्भात बाळ नाळेशी जोडलेलं असतं त्याचप्रमाणे तुम्ही सगळेजण त्या आदिमातेशी नाळेद्वारे direct जोडलेले असतात त्यालाच शक्ती नाडी असे म्हणतात तीच कामधेनू.

ही असते कुठे? जे जे म्हणून पृथ्वीच्या, वसुंधरेवर जे जे म्हणून अवकाशातून खाली येते. त्या प्रत्येक गोष्टीत ह्या शक्ती नाडीचे अस्तित्व असते.
पृथ्वीच्या ionic sphere च्या खालून जे येते ते शक्ती नाडी, पावसाचा प्रत्येक थेंब, सूर्याचा प्रत्येक किरण हे शक्ती नाडी स्वरुप आहे.

चंद्रप्रकाश हे शक्तीनाडी स्वरूप आहे. वीज हीसुध्दा शक्तीनाडी स्वरूप आहे.

sunlight (सूर्याचा प्रत्येक किरण)

moonlight (चंद्राचा प्रत्येक किरण)

rain (पावसाचा प्रत्येक थेंब)

electricity (आकाशात कडाडणारी वीज)

ह्या चार गोष्टी पृथ्वीवर आल्यानंतर येत असताना, २४ तासापर्यंत शक्तीनाडीचे काम करत असतात. २४ तासापर्यंत अहोरात्र १ दिवस - १ रात्र त्यांच्यात शक्तीनाडीचे कार्य करण्याची क्षमता असते.

ह्या २४ तासात जे पावसाचे पाणी जी झाडे खेचून घेतील ती झाडे पण शक्तीनाडीचे काम करतात.

तसेच सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश शक्तीनाडीचे काम करत असतात.

वरती चमकणारी वीज आपल्या शरीरात खेळतच असते. विद्युत शक्ती ही प्रत्येक मानवाच्या शरीरात असते. मेंदूत electrical impulse असतात. Heart-beat electricity मुळेच चालू आहेत. ही विद्युत शक्ती म्हणजेच कामधेनू आहे. शक्तीनाडी स्वरूप आहे.
गोविद्यापिठम्‌ मध्ये गाईंची सुंदर जोपासना केली जाते. तिथे गोग्रासची सुविधा आहे.
तुम्ही जेव्हा एका गाईला पवित्र मानून पूज्य मानून तिचे पूजन करता, तिला जगवता, मानता तेव्हा तुमच्या शरीरातील विद्युतशक्ती समर्थ बनते, बलवान होते. म्हणजेच तुमच्या शरीरातील इच्छा शक्ती ही कामधेनू बलवान करते. गाईच्या चार पावलापैकी कामधेनू हे तिचे स्वरूप हे तिचे पहिले पाऊल.

गाईची ४ पावले म्हणजे

१. कामधेनू स्वरूप - पहिले पाऊल

२. गायत्री मंत्र - दुसरे पाऊल

३. विश्वात्मक शक्तीनाडी - तिसरे पाऊल

४. देहस्थ शक्तीनाडी - चौथे पाऊल

गायत्री मंत्रावर मी  ३ १/२ तास बोललो होतो. गायत्री मंत्र म्हणजे काय? आपल्या धृतीला प्रज्ञेला (बुद्धीला) प्रकाशित करण्यासाठी त्या सवितृला (दत्तगुरूंना) केलेले आवाहन आहे.

आम्हाला गायत्री मंत्र म्हणावासा वाटला तर सद्‍गुरु गायत्री मंत्र म्हणावा. कुणाला गायत्री मंत्र सकाळी म्हणायचा असेल तर १२ वेळा म्हणावा. गायत्री मंत्र केवळ ब्राम्हणांनी म्हणावा हा चुकीचा समज आहे.

हे गोपद्म म्हणजे ह्या कामधेनूची ४ पावले आहेत. गोपद्ममध्ये माझ्या लहानपणी जी पध्दत पाहिली ती म्हणजे २ पावले माझी आई कढायची व २ पावले वडील काढायचे.

गोपद्मावर साधी हळद-कुंकू वाहा. ही कामधेनू आमची इच्छाशक्ती वाढवणारी आहे.
मातेची जी इच्छा आहे, जी सर्व पुरुषार्थ देणारी आहे.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंब्यके गौरी नारायणी नमोस्तुते

कामधेनू सूक्त म्हणणे कठीण आहे. कामधेनू सूक्ताचं पठण करून हवन केल्यावर जे यागाचं पुण्य मिळतं तेच पुण्य ही चार गोपद्म घराच्या उंबरठ्यावर किंवा देव्हार्‍यासमोर काढली व त्यावर हळद कुंकू वाहिलं की मिळतं.

कामधेनू - सूक्ष्म रूपात

गायत्री मंत्र - ध्वनी रूपात
 
विश्वात्मक - विद्युत रूपात

देहस्थ शक्ती - देहस्थ विद्युत

जे आदिमातेने तयार केले ते माणसाला सहज पेलता यावे यासाठी ती algorithem तयार करते.

प्रत्येक गाईत हा कामधेनूचा जर अंश असेल तर प्रत्येक गाय पूज्य असलीच पाहिजे. पूर्वी श्रावणी सोमवारी गाईला एक ताट दिले जायचे.
दुष्काळग्रस्त भागात चारा मिळत नाही, त्यामुळे गुरे कसायाच्या हातात जातात. म्हणून आपण चारा लावतो आणि अशा गुरांना देतो.

पूर्वी दारासमोर रोज सारवून गोपद्म काढली जायची. आपण रोज देवासमोर उंबरठ्याबाहेर गोपद्म काढू शकतो.

जेव्हा मंगलयान गेले तेव्हा सगळे scientist प्रथम त्याची प्रतिकृती घेऊन तिरुपतीकडे गेले. परमेश्वराच्या चरणी जायची त्यांना लाज वाटली नाही.

आम्ही उदी लावताना, नमस्कार करताना पण लाजतो.

सणासुदीच्या दिवशी तरी गोपद्म काढा. ३ तासाच्या कामधेनू सुक्ताऐवढेच पुण्य गोपद्म काढल्याने मिळते.

ज्या घरासमोर गोपद्म काढले जाते त्या घरातील प्रत्येकाला त्याचे पुण्य लाभतेच अशा घरात जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या घरी आत येतो तेव्हा त्याची वाईट करण्याची शक्ती नाहीशी होते.

म्हणून गोपद्म उंबरठ्यावर काढले जाते. ज्या घरासमोर गोपद्म असतील त्या घरातून बाहेर जाताना प्रत्येक व्यक्ती शुभ ताकद घेऊन जाणार आहे.

वसुबारसच्या दिवशी गोपद्म अवश्य काढा त्या दिवशी ” ॥ ॐ श्री सुरभ्यै नम: ॥ ” हा मंत्र म्हणा. सुरभी म्हणजे कामधेनू. हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणा. हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र मानला जातो ह्या मंत्राचा जप वसिष्ठांनी केल्यामुळे त्यांना अख्खीच्या अख्खी कामधेनू प्राप्त झाली.

ही गोपद्म अवश्य घरासमोर काढावीत हा कामधेनूचा मंत्र आपण दररोज देखील म्हणू शकतो.
जेव्हा जेव्हा पाडवा, भाऊबीजेला औक्षण कराल तेव्हा नक्की गोपद्म काढा.

॥ हरि ॐ ॥