Showing posts with label sadgurupunyashetram. Show all posts
Showing posts with label sadgurupunyashetram. Show all posts

Saturday, January 5, 2019

Sadguru punyashetram 1

।। हरि ओम।।
        @ भाग १ @
  आज आपण सद्गुरु पुण्यक्षेत्रम विषयी थोडक्यात माहिती करुन घेऊ.
17 मार्च 2005 रोजी आपल्या बापूंनी प्रथम प्रवचनापूवी सांगितले प्रवचनातील काही मुद्दे खालील प्रमाणे
१) ही जागा जळगाव (जिल्ह्यातील) अमळनेर पासून २७ कि.मी.अतंरवर  ( नीम ) या गावी आहे. या ठिकाणी आपल्या संस्थेच्यावतीने(४४ एकर ) जागा घेतली आहे.
२) ह्या जागेचा महत्व म्हणजे तापी नदी व पांजरा नदी यांच्या संगमाच्या बरोबर मध्ये ही जागा बसलेली आहे.
३) ह्या जागेमध्ये सतत तीन वषे राहून (रामनवमी १९०६ ते रामनवमी १९०९ )ज्यांना मी माझे मानवी सदगुरू मानतो ते गोपीनाथ शास्त्री पाध्ये माझे पणजोबा यांनी तपश्चर्या केली आहे.
४) या ठिकाणी आपण पाहिल्यांदा  उभारण्यात येणार ते मंदिर त्या मंदीरमध्ये     दत्तगुरुची मूर्ती मध्ये उभी आहे  त्याचा उजव्या बाजूस श्रीपाद श्रीवल्लभ,साई बाबा  तर डाव्या बाजूला स्वामी नित्य सरस्वती  स्वामी समर्थ  या मूर्तीची स्थापना होणार आहे त्याच ठिकाणी माझे मानवी सद्गुरू गोपीनाथ शास्त्री पाध्येचा अस्थी कलश स्थापना करून समाधी बांधण्यात येणार आहे
५) या पंचगुरूंचा स्थापना  गोपीनाथ शास्त्रीची समाधी माझ्या भावनांशी अत्यंत निगडित, माझ्या आदराची, प्रेमाची,वात्सल्याची स्थान स्थापन करतोय पुण्यक्षेत्रम म्हणून ते सदगुरू क्षेत्र असेल की तिथे प्रवेश म्हणजे देव लोकात प्रवेश करण्यासारखी आहे  ते देव लोक नव्हे अत्यंत पवित्र स्थान निर्माण आहे
६) ज्याप्रमाणे गाणगापूर हे भीमा नदीच्या व अंम्बर नदीच्या  संगमावर बसलेले आहे त्याप्रमाणे निम गाव तापी व पांजरा नद्यांच्या संगमावर सदगुरू स्थान निर्माण होणार आहे
जसे हे पंचसद्गुरू व गोपीनाथ शास्त्री  माझे आहे  तेवढेच तुमची आहे हे आम्ही लक्षात घेतले पाहिजेल
७) असे हे पवित्र आगळ - वेगळं असे तिथक्षेत्र आजून घडले नाही ह्याच्या पुढे कधीही घडणार नाही  असे हे तिथेक्षत्र  आहे आणि आम्ही अत्यंत वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार होणार आहे.
संकलन स्टार वृत्त  ( सुहाससिंह तावडे )
        ।।  हरी ओम  ।।
  ।। श्रीराम ,अंबज्ञ, नाथंसाविथ ।।

Sadguru punyashetram 2

।। हरी ओम ।।
           $ भाग 2 $
1 एप्रिल 2005 ते 3 एप्रिल 2005 तीन दिवस श्रीसद्गुरू पुण्यक्षेत्रम् तेथील भेट
१) प्रथम गोपीनाथ शास्त्री यांची तपोस्थळी असलेली तापीनदीकठावरील शिळा व पंझरानदीकठावरील टाकडी हा पवित्र गोष्टी शोधण्यात आला
२) तापीनदी व पांझरानदी काठावरील ही जागा अतिशय पवित्र व पुराण कालपासून इतिहास असलेले  हे पुण्यक्षेत्रम आहे.
३) अनेक ऋषीमुनींनी तपस्या केली आहे ह्यात (संत नामदेव, गौतम बुद्धचाच एक अवतार अमिताभ बद्ध  ,विश्वामित्रांचा मुलगा शक्तीमुनी अशा अनेक ऋषी मुनींच्या तपश्चर्याने ही जागा पवित्र झाली आहे, तसेच टेकडीच्या दक्षिण बाजूस पांझरा नदीच्या काठावर महाभारत कालीन ध्यौम्याऋषीचा आश्रम आजही चतुर्मितीमध्ये आस्तित्वात आहे .
४) तसेच ह्याच ठिकाणी वधमान वृत्ताधीराजचे उगमस्थान आहे
५) तसेच गुरूक्षत्रेम् मधील दत्तगुरूच्या तसबिरीच्या इतिहासपण इथलाच आहे  अशा अनेक प्रवित्र गोष्टीचा इतिहास या क्षेत्र आहे.
६) तसेच बापूंनी अनेक वेळ त्याचा अग्रलेखा मधून  या क्षेत्रचा इतिहास दिला आहे ते आपण पुढे पाहू या.
!!हरी ओम ,श्रीराम ,अंबज्ञ,!!
  

Sadguru punyashetram 3

!!  हरी ओम  !!
        @  भाग 3 @
       अग्रलेख क्र.९०७
१) जेव्हा हिमालय पवर्त वितळू लागले सगळे कडे हहा:कार माजू लागले अशा वेळेस कलियुगाच्या अंतिम चरणात हा शिव स्व:त वसुधरेवर येऊन हिमालयातील सप्त ज्ञानक्षेत्र व कैलासस्थान त्याचा दिव्य भाव ( क्षीपुण्यक्षेत्रम् )नामक स्थानी तपस्या नदीच्या तीरावर स्थापन करेल व मग महाप्रलयापर्यत  तुम्ही आठजण ( हिमवान राजा व सप्त पत्नी ) श्रीगुरुची सेवा करीत व
श्रद्धावानांन मार्गदर्शन तेथेच निवास कराल.
२) आदिमाता अनसूया उवाच : - हे पवित्र कन्यांनो  मी तुम्हाला वरदान देते की पावतीच्या दोन्ही पुत्रांच्या उपनयनांनंतर तेआपल्या आजोळी येतील व तुमची कन्या तुम्हा सवाना दरोराज सुर्यादयासमयी संपुर्ण परिवारासह ( श्रीपुण्यक्षेत्रम्  ) या स्थानवर भेटतात जातील.
३)ब्राह्मडतील प्रथम स्वतिक यांच्या सदगुरु पुण्यक्षेत्रम मध्येच व आजही गोलाकार गती ने फिरत आहे. आज तागायत
४) या वसुंधरेवर महादुर्गचा ऊर्जेचा रसस्तोत्रचा उगमस्थान या पुण्यक्षेत्रम मध्येचा आहे.
५) हेफँस्टने अँफोडाईटच्या सूचनेनुसार हक्युलीसला त्याच्या एकमेव शिष्य म्हणून स्वीकारले ते ही श्रीदत्तपर्णक्षेत्राच (सदगुरु पुण्यक्षेत्रम मध्ये )
६)@स्फटिकमहामस्तिष्क@
स्फटिक महामस्तिष्क म्हणजे त्या काळातील सर्वक्षेष्ट विज्ञान व सदैव सर्वक्षेष्ट असणारे भारतीय अध्यात्म ह्याच्या सहाकार्याने बनलेले एक महायंत्र होते.
अ) या महायंत्राचे तीन अवतार एकमेकांपासून वेगळे केले  गेले.
ब) पाहिला अवतार  :-- हा  देवानी (तैवान) बेटाजवळ ठेवण्यात आला.
क)दुसराअवतार  :--वसुंधरच्या दक्षिण धुवावरील हिमाच्छादित भागात ठेवण्यात आला.
ड) तिसरा अवतार :--हा अवतार ठेवण्यासाठी मात्र समाट झियस, हक्युलीस हमिस, साँरेथ ,एरिस,यांनी तीन वर्षे तपश्चर्या केली.
महाराजा इंद्रवधन ,महाराणी शरावती, आणि राजा कौंडिण्य,यांच्या मदतीने दत्तपर्ण प्रदेशात ठेवण्यात आला.आणि (१२स्थानाशी जोडण्यात आले 12 स्थान म्हणून12 ज्योतिलिगांची निवड करण्यात आली.
   व  ह्या तिसरा रचनेची वैज्ञानिक व आध्यात्मिक ताकद अफाट आहे त्यामुळे ह्याचा रक्षणासाठी राफेन,इदंवधन,मिकुला बाँग, ओरिआँन हे ( देवदूत ) बनून कार्यरित आहेत व महाराणी ( शरावती ) ही एका वृद्ध ऋषी स्त्रीच्या रुपात बसुन तपश्चर्या करीत आहे. रोज रात्री १२:०० ते सुर्योदयपर्यंत त्या सदगुरु पुण्यक्षेम् मध्ये.
७) @ अग्रलेख १४४०@
माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो अगदी त्या वेळेपासून   ते आजपर्यत प्रत्येक अधमीँ पंथाला म्हणून भारतावर आक्रमक करावसे वाटते कारण त्यांना आकर्षण असते ते.......
१)साक्षात आदिनाथांचे स्थान  असाणाऱ्या ( काशीक्षेत्राचे) ज्या भूमीच्या आत सहजशिवाचा  प्रकाश अजूनही जसाच्या तसाच आहे.....
२)पुण्यक्षेत्रम अर्थात(दत्तपर्ण   प्रदेश, जेथे मुळ स्वस्तिक चिन्ह जमिनीत अगदी खोल भुगर्भात सातत्याने चक्राकार फिरत आहे.....
३) श्री जगदंबा क्षेत्र ह्याचे वर्णन  व कथा पुढे लेखांमधून  येईलच ......
४)त्रिनाथक्षेत्र अर्थात :-- प्रथम पुरुषार्थधाम ( अलंकापुरी ) जेथे साक्षात संपूर्ण माणिब्दीप अठराच्या अठरा प्रभावक्रेंदाच्यासह वर अंतराळात व खाली भुमीत गेली चार युगे भुमीवर उतरण्यासाठी वाट बघत आहे......
आणि ही क्षेत्रे ताब्यात आल्याशिवाय  कुमागियांचे वर्चस्व स्थापन होऊ शकत नाही...
!! हरी ओम ,श्री राम अंबज्ञ

Sadguru Punyashetram 4

॥हरि ॐ॥

            *॥ श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् ॥*
                          *भाग - ४*

         *प. पु. बापूंनी श्रीश्वासम् उत्सवाचा अखेरीस (१०/०५/२०१६) श्री पुण्यक्षेत्रम् विषयी दिलेली माहिती...*

१) गोपीनाथ शास्त्री पाध्ये यांचा *अस्थी कलश श्री पुण्यक्षेत्रम्* येथे स्थापन करणार आहे.

२) श्रीश्वासम् मध्ये बापूंनी संपूर्ण विश्वाला अपर्ण केलेला कलश *प. पु. समीरदादा* आणि *महाधर्मवर्मन योगिन्द्रसिंह जोशी* यांच्या हातात देऊन *श्री पुण्यक्षत्रेम्* स्थापनासाठीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

४) जो कोणी *श्री पुण्यक्षेत्रम्* येथे जाईल मग तो कितीही पापी असो, तो *श्री पुण्यक्षेत्रम्* मधून पुण्य आणि फक्त पुण्यचं घेऊन जाणार. कारण, ते पुण्याच अपरंपार साठा असलेले *महंत तिर्थक्षेत्र* आहे.

५) जो कोणी *श्री पुण्यक्षेत्रम्* येथे जाऊन येईल, तो पिकनिकला जाणे विसरेल असे हे *अव्दितिय तिर्थक्षेत्र* (या आधी कधीच निर्माण झाले नाही आणि यापुढेही कधीच निर्माण होणार नाही) निर्माण होणार आहे...

            तसेच गेल्या वर्षी *श्री दत्त जयंती* उत्सवाच्या दरम्यान (३० नोव्हेंबर २०१७ ते ०३ डिसेंबर २०१७) प. पु बापूंनी *मातृवात्सल्यविंदानम्* मधील *अध्याय ३० व ३१* अध्यायातील काही बदल करण्याविषयी सांगितले.

॥हरि ॐ॥             ॥श्रीराम॥             ॥अंबज्ञ॥
                         ॥नाथसंविध्॥

Sadguru Punyashetram 5

!! हरि ओम !!
         @ भाग ५@
🕉 बापूं बरोबर दत्तजयंती विषयी मार्गदर्शन ( १३ | १० | २०१७ )
  १)सदगुरु पुण्यक्षेत्रम् हे क्षेत्र अनेकयुगातून ,  व अनेककल्पातून कधीतरी एकदा होत असत.
  २)दत्तजयंती विषयी माहिती दिली.
  ३)राजांनो गुरुक्षेत्रम् मधील दत्तबाप्पा पहिल्यांदा गुरुक्षेत्रमचा बाहेर येतो आहे. ( बापुंच्या मागे दत्तबाप्पा असलेला फोटो )
४)मातृवात्सल्य विंदानम मधील अध्याय ३०/३१ मधील आई दतमंगलचण्डिका अवतार कसा झाला काही क्षणात तिने आसुरांचा नाश कश्या रीतीने केला हे सांगितले.
५)पुण्यक्षेत्रम मधील टेकडीच्या नामकरण (दत्तपंचायतन टेकडी असे केले .(पांझरा नदीकडील भाग ) तर तापी नदीकडील भागाचे नामकरण ( दत्तमंगलचाण्डिक क्षेत्र) असे केले.)
🕉स्वतिक्षेम् उपासना🕉
६) जेव्हा माझी स्वतिक्षेम् उपासना चालू होती तेंव्हा मी
सकाळी गुरूक्षेत्रम् मध्ये असे तर रात्री पुण्यक्षेत्रम मध्ये.
किंवा जेंव्हा मी सकाळी पुण्यक्षेत्रम मध्ये असे तेंव्हा रात्री गुरूक्षेत्रम् मध्ये असे.
७)मग बापूंनी सांगितले की🙏श्रीदत्तमंगलचाण्डिका     पुण्यक्षेत्रम मध्ये प्रगटणार .🙏
त्याला आपण श्रीदत्तमंगलचाण्डिका  कुटी असे म्हणू .व मग आईचा रूपा बद्दल सांगितले.
८)येणाऱ्या काळात हे क्षेत्र कसे कार्य करेल ( तिसरा महायुद्धाचा काळात ) या विषयी माहिती दिली.
(१) हे श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् अध्यात्मिक उपासनेचे, साधनेचे, ध्यानाचे, शांती व संतोष प्राप्तीचे महद्क्षेत्र असेल.
!! हरी ओम ,श्री राम,अंबज्ञ !!

Sadguru punyashetram 6

॥हरि ॐ॥

            *॥ श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् ॥*
                         *भाग - ६*

         *महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी* यांनी *अमळनेर* येथे *श्रीदत्त जयंती उत्सव (२०१७)* दरम्यान सांगितलेली *श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् (दत्तपर्ण प्रदेश)* विषयीची विशेष माहिती...

*१) दत्तपर्ण प्रदेश म्हणजे :*

*◆ दत्त : दत्तगुरु, दत्तात्रेय.*
*◆ पर्ण : पुण्य*
*◆ प्रदेश : जागा, निवासस्थान, क्षेत्र.*

         म्हणून दत्तगुरुंचा पुण्याचा अपरंपार साठा असलेला प्रदेश. तसेच, सद्गुरुंचा पुण्याचा साठा असलेले क्षेत्र म्हणून *श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्.*

*२) तापी आणि पांझरा नदी :*

*अ) तापी : "ताप हरणी"* माणसाला जे काही प्रॉब्लेम्स् आहेत. त्यांचे हरण करणारी  *तापी नदी.* तापी नदी *सुर्य कन्या* म्हणून ओळखली जाते.

*ब) पांझरा : "पाण झरा"* हे तिचे खरे नाव आहे. पांझरा नदी *चंद्र कन्या* असल्याने शीतलता देणारी आहे. विशेषतः पांझरा नदी *पुरातन नदी* (Old River) आहे.

*क)* तापी चे उलट केले असता तर *पिता* शब्द तयार होतो. म्हणजे या परमात्मा पित्याकडून येणार प्रेमाचा झरा म्हणून ही *पांझरा.*

*ड)* या दोन्ही नद्या पुढे संगमावर *(कपिलेश्वर येथे)* एकमेकांना भेटुन एकरुप होऊन, उत्तर दिशेकडे वाहत जातात. आणि उत्तर दिशा ही महाप्राण हनुमंताची दिशा असल्याने, त्यामुळे या ठिकाणी केलेली उपासना सहज फळद्रुप होते.

         *टाळ मुदूंग दक्षिणेकडे ।*
         *आम्ही जातो उत्तरकडे ॥*

         वरील पंक्ती *संत नामदेव महाराज* यांच्या अभंगातील असुन, या ध्रुवपदाचा अर्थ सांगितला आहे.

३) श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् बद्दल *प. पु. बापू* सांगतात की; जर या जागे विषयी सांगतांना *१००* पानांचे पुस्तक घेतले, तर मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेली माहिती फक्त *एकच* पानांची असुन. बाकीचे *९९* पाने अजून सांगायचे बाकी आहेत. (आणखिन भरपूर काही गोष्टींचा उलगडा या तिर्थक्षेत्रासंबंधी आपल्याला पुढे हळूहळू होणारच आहे.)

४) योगिंद्रसिंह सांगतात की, म्हणून *गोपीनाथ शास्त्री पाध्ये* यांनी हि जागा विशेषतः निवडली आहे.

*त्वं चरणांचा मी दास प्रसन्न केले ।*
*या जन्मात, जन्मोजन्मी हा श्वास निज कार्य साधून घे रे ॥*

*॥ अनिरुध्द एवं बुध्दी स्मरणं दाता ॥*

विशेष माहिती :
*महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी.* (मुंबई)

लेख संकल्पना :
चेतनसिंह भंडारी. (अमळनेर)

॥हरि ॐ॥             ॥श्रीराम॥             ॥अंबज्ञ॥
                        ॥नाथसंविध्॥