॥हरि ॐ॥
*॥ श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् ॥*
*भाग - ६*
*महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी* यांनी *अमळनेर* येथे *श्रीदत्त जयंती उत्सव (२०१७)* दरम्यान सांगितलेली *श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् (दत्तपर्ण प्रदेश)* विषयीची विशेष माहिती...
*१) दत्तपर्ण प्रदेश म्हणजे :*
*◆ दत्त : दत्तगुरु, दत्तात्रेय.*
*◆ पर्ण : पुण्य*
*◆ प्रदेश : जागा, निवासस्थान, क्षेत्र.*
म्हणून दत्तगुरुंचा पुण्याचा अपरंपार साठा असलेला प्रदेश. तसेच, सद्गुरुंचा पुण्याचा साठा असलेले क्षेत्र म्हणून *श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्.*
*२) तापी आणि पांझरा नदी :*
*अ) तापी : "ताप हरणी"* माणसाला जे काही प्रॉब्लेम्स् आहेत. त्यांचे हरण करणारी *तापी नदी.* तापी नदी *सुर्य कन्या* म्हणून ओळखली जाते.
*ब) पांझरा : "पाण झरा"* हे तिचे खरे नाव आहे. पांझरा नदी *चंद्र कन्या* असल्याने शीतलता देणारी आहे. विशेषतः पांझरा नदी *पुरातन नदी* (Old River) आहे.
*क)* तापी चे उलट केले असता तर *पिता* शब्द तयार होतो. म्हणजे या परमात्मा पित्याकडून येणार प्रेमाचा झरा म्हणून ही *पांझरा.*
*ड)* या दोन्ही नद्या पुढे संगमावर *(कपिलेश्वर येथे)* एकमेकांना भेटुन एकरुप होऊन, उत्तर दिशेकडे वाहत जातात. आणि उत्तर दिशा ही महाप्राण हनुमंताची दिशा असल्याने, त्यामुळे या ठिकाणी केलेली उपासना सहज फळद्रुप होते.
*टाळ मुदूंग दक्षिणेकडे ।*
*आम्ही जातो उत्तरकडे ॥*
वरील पंक्ती *संत नामदेव महाराज* यांच्या अभंगातील असुन, या ध्रुवपदाचा अर्थ सांगितला आहे.
३) श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् बद्दल *प. पु. बापू* सांगतात की; जर या जागे विषयी सांगतांना *१००* पानांचे पुस्तक घेतले, तर मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेली माहिती फक्त *एकच* पानांची असुन. बाकीचे *९९* पाने अजून सांगायचे बाकी आहेत. (आणखिन भरपूर काही गोष्टींचा उलगडा या तिर्थक्षेत्रासंबंधी आपल्याला पुढे हळूहळू होणारच आहे.)
४) योगिंद्रसिंह सांगतात की, म्हणून *गोपीनाथ शास्त्री पाध्ये* यांनी हि जागा विशेषतः निवडली आहे.
*त्वं चरणांचा मी दास प्रसन्न केले ।*
*या जन्मात, जन्मोजन्मी हा श्वास निज कार्य साधून घे रे ॥*
*॥ अनिरुध्द एवं बुध्दी स्मरणं दाता ॥*
विशेष माहिती :
*महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी.* (मुंबई)
लेख संकल्पना :
चेतनसिंह भंडारी. (अमळनेर)
॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥
॥नाथसंविध्॥
No comments:
Post a Comment