11/01/2019
।। हरि ॐ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध् ।।
रामा रामा आत्मारामा
त्रिविक्रमा सद्गुरुसमर्था।।
सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा
आत्मारामा रामा रामा।।
स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्र गजरामध्ये श्रद्धावान समरस होत असताना सद्गुरु कृपेने भक्तिभाव चैतन्यात रमण्याचा आणखी एक मार्ग श्रीहरिगुरुग्रामला प्रकट झाला. तो मार्ग म्हणजे स्वंभगवान त्रिविक्रमाचे भजन!
जय त्रिविक्रम मंगलधाम।
श्रीत्रिविक्रम पाहि माम् ।।ध्रृ।।
शुद्ध ब्रह्म परात्मर राम।
श्रीमद् दशरथ नन्दन राम।
कौसल्यासुखवर्धन राम।
श्रीमद् अयोध्या पालक राम ।।१।।
त्र्यम्बककार्मुक भंजक राम।
दंडकवनजन पावन राम।
विनष्टसीतान्वेषक राम।
शबरीदत्तफलाशन राम।।२।।
हनुमत्सेवित निजपद राम।
वानरदूत प्रेषक राम।
हितकरलक्ष्मण संयुत राम।
दृष्टदशाननदुषित राम।।३।।
साकेतपुरीभूषण राम।
सकलस्वीय समानत राम।
समस्तलोकाधारक राम।
सर्वभवामयवारक राम।।४।।
भक्तिभाव चैतन्य भजन मालिकेतील हे पहिले भजन.
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीत श्री. पौरससिंहानी जमलेल्या सर्व श्रद्धावानांना वरील भजन करण्यास शिकविले आणि प्रत्येक श्रद्धावानाने परमात्म्यास समर्पित होऊन भजन केलं.
भजन करताना श्रद्धावानाच्या मनाचा प्रवाह नम:कडे सुरू झाला होता.
भजन करताना प्रत्येकाचा भाव स्वयंभगवान त्रिविक्रम असणाऱ्या श्रीरामाच्या आणि श्री अनिरुद्धाच्या चरणांशी अर्पण होत होता आणि त्या चरणांशी घट्ट बांधून घेण्याची प्रेरणा सहजपणे प्राप्त होत होती.
सर्वसमर्थ असणारा स्वयंभगवान त्रिविक्रम म्हणजे साक्षात श्रीअनिरुद्धाचे सामर्थ्य श्रद्धावानांच्या सहजपणे लक्षात येत होते. त्या सामर्थ्याचा प्रवाह प्रत्येक श्रद्धावानाच्या मनाकडे जाऊ लागला.
जीवनातील अंतिम सत्य, जीवनातील खराखुरा आनंद आणि जीवनाचे परमेश्वरी मुल्य; हे सर्व काही स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या भक्तिभाव चैतन्यातील भजनातून श्रद्धावानांना मिळत होते.
‘भजन’ शब्दाचा खरा अर्थ, ‘त्या’ परमात्म्याची सेवा. त्या सेवेचा पाठ पुन्हा एकदा कधीही न विसरण्यासाठी गिरविला गेला.
त्याच्या साक्षात दर्शनाची भूक क्षमविण्यासाठी हे भजन पुढील हजारो वर्षे चिरकाल श्रद्धावानांच्या जीवनात अधिराज्य करणार आहे.
भजनाचे शब्द त्यानेच प्रकट केले, भजनाचे शब्द त्यानेच उच्चारले, भजनाचे शब्द त्यानेच आमच्या कानात ओतले, भजनाचे शब्द त्यानेच आमच्या मनात-चित्तात स्थिर केले आणि त्याच भजनाचे शब्द आमच्या मूखातून-वाणीतून ऐकण्यासाठी ‘तो’च व्याकुळ झाला होेता.
आम्हाला काय मिळालं? सर्वांगसुंदर असणारं सर्व काही. पण स्वयंभगवानाचे भजन आमच्या वाणीतून ऐकताना ‘तो’ खूष झाला. आम्ही भक्तिभाव चैतन्याच्या सागरात आनंदाने बागडत असताना आमच्या वाणीतून निघालेल्या भजनाला ‘तो’ प्रतिसाद देत होता; नव्हे त्याने टाळ्या वाजवून आमचं कौतुक केलं.
गुरुवार दि. १० जानेवारी २०१९ ह्या दिवशी खऱ्या अर्थाने भक्तिभाव चैत्यन्याच्या भजनाचा शुभारंभ झाला असून पुढील अडिच हजार वर्षे हेच भजन आम्हाला तारणार आहे. आम्हाला स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या अनिरुद्ध रूपाशी-अनिरुद्धाच्या कार्याशी जोडणार आहे.
खऱ्याअर्थाने रामराज्याच्या प्रवासामधील हा आणखी एक टप्पा; पण आम्हाला वाटतं की, हा रामराज्याचा जल्लोष!
`जय’ आणि `श्री’ ह्यातील फरक आम्हा श्रद्धावानांच्या लक्षात आला आणि ‘जय’ आणि ‘श्री’ असणाऱ्यांची कृपा आमच्या जीवनात सदैव आणण्याची ताकद भक्तिभाव चैतन्यातील ह्या भजनात आहे.
रामाची कृपा, रामाचे सामर्थ्य, रामाचे यश, रामाची भक्ती आमच्या जीवनात येण्यासाठी हे भजनच आम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे.
अध्यात्म्यातील उचित ते सर्वकाही आम्हाला देण्याची क्षमता ह्या भजनात आहे म्हणून हे भजन परमात्म्याचं आवडतं आहे. कारण ‘त्या’ला माहित आहे की हे ‘भजन’ आपल्या श्रद्धावान बाळांनी मन:पुर्वक स्वीकारलं की त्यांच्यासाठी नव्व्याण्णव पावलं चालणं सोप्पं जातं; त्यांच्यावर कृपा करणं सहज शक्य होतं.
काल स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या `राम’रूपातील भजनात तो स्वत: सहभागी झाला आणि आम्हालाही सहभागी करून घेतले. त्यामुळे काल आनंदाचा, भक्तीचा, प्रेमाचा जल्लोष होता म्हणूनच तो रामराज्याचा जल्लोष होता असं म्हणावसं वाटतं…
।। जय जगदंब जय दुर्गे ।।
।। हरि ॐ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध् ।।
No comments:
Post a Comment