Showing posts with label swayambhagwan trivikram. Show all posts
Showing posts with label swayambhagwan trivikram. Show all posts

Saturday, January 5, 2019

Pitruvachan: 27Dec 2018

आजचे पितृवचन 27/12/2018

हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध

* आपल्या मनाला दुसऱ्याचे दोष लवकर दिसतात .....दुसऱ्याच्या चुका काढणे किंवा फक्त स्वतःला कोसत राहतो.... सर्व जीवन असेच निघून जाते... तुमचे नुकसान दुसरा कोणीही करू शकत नाही, तुम्हीच करता... *उद्धरेत आत्मना आत्मानं*
* लीला असतें कृष्णाची... रामाने फक्त एकच काम केले... Harmony बॅलन्स... भरताला सांगतो..." शपथ घेतलेयस तर आईशी बोलू नकोस पण सेवा कर...बॅलन्स  "
* सर्वांना कर्माची फळे देणारा, शबरीला मात्र शोधत स्वतः जातो
* *जीवनात काहीही करा, पण भगवंताशी खोटे बोलू नका*... त्यामुळे आपण त्याच्या प्रेमाच्या प्रांतातून नियमाच्या प्रांतात जातो..फोटो समोर पण नाही... त्याला फसवू नका... मग त्या परमात्म्याच्या हातून सगळे निघून जाते.. मग जगदंबेच्या नियमानुसार फळ द्यावे लागते
* याला समजत नाही असे काहीच नाही
* लोक दाऊनां बोलतात माझ्या मुलाची बुद्धी बदलू दे ...प्रत्यक्ष हनुमंतासमोर रावण बदलला नाही ... कोणीही कोणाचीही बुद्धी बदलू शकत नाही...
* वाल्या कोळ्याच्या पापाची ownership कोणीही घेत नाही...
आपल्या पापांना आपणच जबाबदार
* रावण कंस महिषासुराने हेच केले
* चुकीचे बोललो तर माफी मागा पण खोटे कधीच बोलू नका
* अर्थाच्या पलीकडे भाव असतो... अर्थ जाणणे चांगले आहे पण भाव जाणणे imp आहे
* 'खाली हात आये है, खाली हात जायेंगे'.... हे खोटे आहे...दोन जन्मानचे पाप पुण्य घेऊन आलोय आपण... जेवढे पाप आहे ते याच जन्मात नष्ट करून पुढे चालत राहूया... पुन्हा फक्त त्याच्यासाठी त्याच्या ichchhenech येऊया
* रावणाला भेटायलाही स्वतः हनुमान गेलेला मग आपल्यासाठी का नाही येणार?
* बिभीषण ची कथा... दिवाळावर
'राम राम' लिहितो...लंकेत याला बंदी असतें. ..रावण रागावून येतो... बिभीषण  घाबरून बोलतो 'हे राम ' ... बिभीषणाचा एक सेवक बोलतो त्यांनी ' *रा* वण - *मं* दोदरी' असे लिहिलंय... रावण खुश होऊन सगळीकडे लिहायला सांगतो...बिभीषण सेवक शोधायला जातो तर सेवक  गायब... तो सेवक *रामच* असतो...
* अग्रलेखात सांगितल्याप्रमाणे त्रिविक्रम गजराच्या 108*16 माला करायच्यात...जमतील तशा...अग्रलेख आला त्याच दिवशी 3792 लोकांनी केल्या...विशुद्ध चक्र शुद्ध होईल
* नवीन वर्षासाठी काही विशेष बोलायचे नाही मला... सर्व वर्षांसाठी.... अगदी दररोज भक्ती भाव चैतन्य मिळतंच जाणार आहे...ते घ्या
* तुमच्या भक्तीचा स्वीकार करणार कोण?...  जो हा गजर करणार तो स्वीकारनार कोण?  *मी मी आणि मीच* ऐकणार... No exception to this rule...
माझा अभिमान जगात सर्वात मोठा आहे

हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध

* समर्थ म्हणजे कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत जो आपल्या अनलिमिटेड ताकतीने control मध्ये आणतो तो *समर्थ*
* त्रिविक्रम माझ्या ताकतीला अनुसरून लहान होतो... Locket एवढा,  उदिच्या कणात  समावतो,  ही त्याची समर्थता
* गटारातही तुमच्या आधी येतो... *जिस जिस पथ पर भक्त साईका वहा खडा है साई*
* *he is* या एका प्रकारे त्याला वर्णन करता येते
* लॉकेट मध्ये त्याचा फोटो नाही, तोच आहे....त्याच्याशी बोला
* तर मोठा इतका कि अनंत कोटी ब्रह्माण्ड त्याच्या अंगठाच्या नखाएवढी आहेत
* किती लहान / किती मोठा आमच्यासाठी तसा !
* *he is the most ideal, perfect father*...बाळाला झेपेल असाच बॉल टाकतो
* जो पर्यंत अमुक गोष्ट  मला येत नाही हे मान्य करत नाही तोपर्यंत आपण शिक्षणार कसे?
* तो तुमच्या आजू बाजूला असेल, तुम्हाला समजणार पण नाही आणि तुम्हाला एनर्जी देऊन जाईल,  बोलून जाईल...
* आज *समर्थ* चा अर्थ जाणला  तर तो हृदयाच्या खोलीपर्यंत ठेवा
* ही खोली हीच प्रत्येकाची प्रेम करण्याची क्षमता... ही अनंत आहे....ही एकच गोष्ट माणसाकडे अनंत आहे...त्याच्यावरचे मापू नका
* मोजू नका, प्रेम करत राहा
* dad sings song... *जो वादा किया वो निभाना पडेगा! रोके जमाना  चाहे   रोके खुदाइ तुमको आना पडेगा*... ये उसका प्यार हे
* love u my child... a  lot... Lot lot lot.....

3 Jan 2019- pravachan

Thursday 03/01/2019

* happy new year to all my children
* *happiness is there only when v believe in him. Else there is no happiness*
* आनंद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा आपला त्याच्यावर *खूप* विश्वास असतो. खूप म्हणजे किती?... कालच्यापेक्षा आज जास्त !
* प्रॉब्लेम येत असतात... *जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मनात तूच शोधून पाहे*... Dont compare what u have with others
* आपण त्याचा अंश, त्याच्याशी connected आहोत. आपण त्रिविक्रम material पासून बनलोय
* समयाची सुरुवात झाली त्याच्या आधीपासून तो आहेच.
* तो सर्व करायला समर्थ आहे... हा विश्वास हवा !
* जे काही होतोय त्यावर त्याची सत्ता आहे.  प्रॉब्लेम येतील आणि जातील. तो आपल्यासाठी सर्व करत असतो,  फक्त आपण खूप घाईत असतो.
* कितीही अंधार सूर्याला रोखू शकत नाही... एक किरण तो अंधार दूर करतो... मग अनेक सूर्य त्याच्या पायाच्या एका नखासमोर नगण्य आहेत तो काय नाही करू शकत?
* तो जे करेल माझ्या भल्याचेच करेल
* 108% विश्वास फक्त संतच ठेवू शकतात...तुम्ही विश्वास  मिळवण्यासाठी 16 माला जप करा
* "एकाग्र मनाने तुम्ही जप करा" असे मी तुम्हाला म्हटलो का?...मी म्हटले.... "16 माला करा, तुमचे मन कुठेही असेल, त्याचा विचार तुम्हाला नको"
* "तुम्ही म्हणाल देवाला दुःख होते का?... होय! जो माझ्यावर प्रेम करतो, तो (माझ्या कृपेवर  संशय घ्यायची) चूक करतो तेव्हा मला दुःख होते"
* त्याच्या कृपेवर विश्वास ठेवा
* स्वप्नांच्या मागे धावताना आयुष्य निघून जाते. सपनो पेक्षा अपने महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात आपला 'तो' एक आहे
* आम्ही छोटे आहोत पण फालतू/नकावा (good for nothing) नाहीत ...
* तुमचं लक्ष किती जपात होते याची काळजी तुम्हाला नको.
*प्रार्थनेची ताकत ही ती प्रार्थना किंवा प्रार्थना करणाऱ्यामध्येही नसते, ती असतें प्रार्थना ऐकणाऱ्यामध्ये! आणि तो खूप powerful आहे!*
* जप करत रहा,  माला करत राहा. बाकी मी बघीन.
* तुमचे लक्ष असेल /नसेल... पण 'मी बापूला अर्पण केले, आता तो बघून घेईल'.. हा विश्वास ठेवा बस्स..
* he doesn't do things for popularity.
* आनंद वाटायला शिका
* आजपासून *सर्व सोपे* झाले आहे.
* रामाची शबरी,  कृष्णाची बासरी आणि तीच पुढे वैखरी वाणी बनली. शबरी रामाकडे नाही, तर राम शबरीकडे आला,  हे लक्षात ठेवा.
* तुम्ही कोणालाही हा जप करायला प्रेमाने सांगाल, त्यात आता माझ्या वणीची ताकत असेल
* त्या साठी प्रयास करावे लागणार
* काहीही प्रयास न करता पण मिळेल पण सोबत एक 👋🏼 पण मिळेल. त्यापेक्षा जादूकि झप्पी सोबत घ्या
* आपण सगळे भक्ती भाव चैतन्य मिळवूया
* पुढच्या गुरुवारी सगळे गाऊया
* I love you All
(यानंतर बापूरायाने सर्वांकडून एक प्रार्थना म्हणवून घेतली)
* पुढच्या गुरुवारी गायला शिकायचं. ओठ हालवायचे,नाहीत जोरात गायचे ... आपला आवाज कसा आहे याचा विचार करायचा नाही
* सर्व सुरात गाणार.  कारण सूर त्याच्या हातात आहेत

*Bapuraya talk after Darshan*

*"Happy new year" (3 times)
*प्रत्येक वर्ष आयुष्यात काहीच न काही नवीन गोष्ट आणत असतें
* आपल्या जीवनात जे होत त्याला विसरू नका.  माझ्या आयुष्यात त्या त्या वर्षी कोणती सुंदर गोष्ट  आली, ज्याने आयुष्य सुंदर बनले , ते आठवा
* कोणाचेही आयुष्य भगवंत असे बनवत नाही कि फक्त दुःखच आहे 
* बंद दरवाजावर डोके आपटत  बसू नका.  पुढचे 100 दरवाजे शोधा
*  Marriage and divorce...use and throw नको. माझे जीवन picture नको बनायला
* माझे connection त्याच्या बरोबर आहे, हे जाणणे म्हणजे भक्ती भाव चैतन्य
* प्रत्येकाची भक्ती भाव चैतन्य definition वेगळी, कारण प्रत्येकाची रांग वेगळी
* त्याला बघणे /ऐकणे /पूजणे / आठवणे /बोलणे हे सगळे भक्ती भाव चैतन्य
* ही एकच गोष्ट आपल्याला कधीच सोडून जात नाही... जे शाश्वत आहे
* काही विकत घ्यायला जर card नसेल तर bank मध्ये पैसे असूनही विकत घेऊ शकत नाही.  आपल्याकडे जे आहे त्याचा पूर्ण फायदा आपण घेत नाही... पण उशीर झालेला नाही
* भक्ती भाव चैतन्य तुमच्या सोबत आहेच
* *आपल्या सोबत फक्त असतें... तो, त्याचे नाव आणि भक्ती भाव चैतन्य*
* भक्ती भाव चैतन्यच्या आधाराने सर्व आयुष्य काढायचे
* movie आया था : गीत गाया पत्थरोने ..पत्थर गातात मग आपण का नाही
* *तुम्ही बोलता.. Yes dad... हे पण भक्ती भाव चैतन्य*

* हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध