परम पूज्य बापूंनी दिलेली ९ मापदंड
१. आन्हिक दररोज दोन वेळा करणे .
२. आन्हिक , रामरक्षा ,सद्गुरुगायत्रीमंत्र , सद्गुरुचलीसा , हनुमानचलीसा , व दत्तबावनी तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे . चार महिन्यांतून कमीत कमी एक रामनाम वही लिहून पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे .
३. बरोबरच्या व हाताखालील सहकार्यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे . सहकार्यांची किव्हा हाताखालील व्यक्तींची चूक झाल्यास त्यांना जरूर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये .
४. उपसनांच्या वेळेस त्या स्थळी असणा-या प्रत्येकाने " आपण उपासनांच्या वर आहोत किव्हा आपल्यास उपासनेची आवश्यकता नाही " असे वर्तन करू नये .
५. बोलण्यापेक्षा , बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो , हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे .
६. ह्या विश्वामध्ये कुणीही मानव " आपण अद्वितीय आहोत व आपली जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करू शकत नाही " , असे म्हणू शकत नाही व असे कुणीही मानु नये .
७. श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत .
८. चूक झाल्यास चूक सुधारण्याची तयारी पाहिजे .
९. परपीडा कधीच करता कामा नये .
माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो , आपल्या समोर श्रीरामचरीताचाच आदर्श असला पाहिजे व त्यामुळे " पावित्र्य हेच प्रमाण " ह्याच मुलभूत सिद्धांतानुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ गोष्टी ज्याच्याकडे नाहीत , तो माझ्या जवळचाच काय , परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही , हा माझा ठाम निश्चय आहे . तुमच्या हातात मी आज " मला काय आवडते व काय आवडत नाही " ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरूनच माझ्याशी निगडीत असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत ...!
Saturday, January 5, 2019
Sadguru: 9 things to do
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment