#List of #Gifts received by all Shraddhavans from our beloved #DAD...😇(2018)
ह्या वर्षाच्या अगदी अंतिम टप्प्यावर येऊन आपण पोहोचलो आहोत. हे वर्ष आपण श्रद्धावानांसाठी खरच खूप सुंदर, महत्वाचे आणि खास होते असे नक्कीच म्हणता येईल. खास का ते आपण पाहूयात :-
1. आपल्याला बापूंनी देवाधिदेव स्वयंभगवानाचे आणि '#भक्तिभाव #चैतन्य'ह्याची ओळख अग्रलेखांतून करून दिले.
2. सर्वोच्च व भक्तिभाव चैतन्यात चिंब भिजवणारा असा '#मंत्रगजर' प्रदान केला.
3. '#शरणागती' हा भाव कसा व्यक्त करायचा हे बापूंनी शिकवले.
4. #त्रिविक्रमाची18वचने बापूंनी स्वतः आपल्याला दिली.
5. #त्रिविक्रम #मठ स्थापन होणार, त्याचे महत्व व तो #Trivikram #spiritual #club असेल हे ही सांगितले.
6. श्रद्धावान ज्याची मनापासून वाट बघत होते त्या #नाहू #तुझीया #प्रेमे2 होणार व ह्याची तारीख आपल्या सर्वांना बापूंनी सांगितली.
7. आजची गरज लक्षात घेता बापूंनी #डिजिटल #रामनाम #वही आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिली.
8 . #पिपासा3 ह्या मधील #पिपादादांचे आणि #समीरदादांचे सुंदर अभंग आपल्या समोर कलाकारांनी सादर केले तेही बापूंच्या उपस्थितीत.
9. भक्तिभाव चैतन्य वाढवण्यासाठी मदत करणारे असे #अनिरुद्ध #भजन #म्युझिक अॅप आपल्या सर्वांना बापूंनी दिले.
ह्या सर्व आपल्या श्रद्धावानांसाठी तर त्या सद्गुरू माऊली कडून मिळालेल्या भेटी आहेत अस आपण नक्की म्हणु शकतो.
प्रत्येक श्रद्धावानाचा हा अनुभव आहे की प्रत्येक क्षणी कसा तो बापू हाक मारण्या आधीच आपल्याला सहाय्य पुरवत असतो. आपली भक्ति वाढावीत ह्यासाठी तो बापू प्रयास करत असतो व श्रम घेत असतो.
*"तुझ्यासाठी बापू करीतो प्रयास"*
उद्या पासून सगळ्यांसाठीच एक सुंदर व नवीन सुरुवात असेल. *बापू कृपेने* प्रत्येक श्रद्धावान *भक्तिभाव चैतन्यात* चिंब भिजत आहे. प्रेमळ भगवंता मुळे आयुष्यात येणार्या अडथळ्यांची व संकटांची तीव्रता खूप प्रमाणात कमी होऊनच ते आपल्यापर्यंत येतात. त्यांना सामोरी जाण्याचे सामर्थ्य ही तो #महापराक्रमी व #सामर्थ्यसिंधू असणारा आपला #देव, आपला #सद्गुरू पुरवत असतो. ह्यामूळे आपले आयुष्य खूप सोप्पे व सहज होऊन जाते.
*पिपासा* मधली ही ओळ आठवते,
"अनंतश्रमे न मिळे ते, बापू कृपे जवळी आले"*
खरच *बापूराया* असच आमच्यावर प्रेम करत रहा व आमचं तुझ्यावर असणारं प्रेम प्रत्येक क्षणाला वाढवत रहा.
येणारं वर्ष तुझ्या प्रेमामुळे व कृपेमूळे तुझ्या चरणांच्या आणखीन समीप येण्यासाठी तूच माझ्याकडून प्रयास करून घे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे रे माझ्या बापू, माझ्या प्रेमळ DAD.
*Love you my DAD FOREVER🌸🙏
No comments:
Post a Comment