Sunday, December 4, 2022

pitruvachanam

हरि ॐ‌

*|| श्रीगुरुचरण मास ||*

*"पहा मी माझिया वचनाकारणें |*
  *मरोनि जाईन जीवें प्राणें |*
  *परी माझिया मुखींचीं वचनें |*
  *अन्यथा होणें नाहीं कदा "||*
    (श्रीसाईसच्चरित अ.४०,ओ.९१)

*प.पू.बापूंचे पितृवचन*
( ४ डिसेंबर २०१४ ) -
                  *"साईबाबांचे हे वाक्य तुमच्या हृदयाला पाझर फोडणारं असलं पाहिजे !* अरे काय हमी देतात बाबा. एक लक्षात घ्या कोणीही एवढी हमी देणार नाही .पण आम्ही मात्र विश्वास ठेवत नाही. *'तोच विश्वास'* ठेवायला लागा.
                 जर साईबाबा आमचा सद्गुरु असेल , देव असेल ,तर *'त्याचा शब्द'* , *'त्याचे वचन'* आम्हाला मान्य असलेच पाहिजे. देवाच्या शब्दांवर १%, ९९% , वा  ९९.९९% विश्वास असून चालत नाही. तर *पूर्ण १००% म्हणजेच १०८% विश्वास असावा लागतो.*
                *'मी तुला कधीच टाकणार नाही'*, असं म्हटलय ना ? मग कोणत्याही परिस्थितीत ही खात्री हवीच !
                 देवाने आमच्या डोक्यावर हात ठेवला, ह्याचा अर्थ आमचे कल्याण होणारच आहे, हा विश्वास पाहिजे. एवढेच नाही तर देवाने कंबरड्यात लाथ घातली, तरी ती माझ्या कल्याणासाठीच आहे, हा *दृढ विश्वास हवा देवाच्या शब्दांवर!*  
                असा *दृढ विश्वास* ठेवणे, म्हणजे *'देवाशी जोडून घेणे !'*  इथे खरं म्हणजे प्रयासाची आवश्यकता नाही. फक्त *भाव पाहिजे.* कारण *'भाव तोचि देव !'*
                अशाप्रकारे देवाच्या वचनांवर विश्वास ठेवल्यास आपण देवाशी जोडले जातो.आणि म्हणूनच *देवाच्या वचनांवर विश्वास ही एकमेव प्राथमिक गरज आहे आमची !*
*बाकी 'त्याचे वचन' तो पाळतोच ! "*

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

No comments:

Post a Comment