Wednesday, June 8, 2022

anubhav kathan- related to swami samarth

अनुभव कथन

अनुभव 1
हरी ओम, आयुष्याच्या ज्या क्षणाला बापू आयुष्यात आले हे जीवन सर्वार्थाने फुलून गेले. तेव्हाच ठरवलं की आता पुढे कधी इतर देवदर्शनाला जायचे नाही कारण माझं सर्वकाही आता बापूमय झालं आहे. पण त्याच्या इच्छेपुढे माझं थोडं काही चालणार आहे ! 
आम्हा पती पत्नीला 3 दिवस सुट्टी मिळाली आणि दिनांक 5 जून 2022 रोजी रात्री आम्ही कुटुंबीय अचानक श्रीक्षेत्र अक्कलकोट, गांडगापूर, तुळजापूरला जाण्यासाठी निघालो. हे इतके अचानक अवघ्या 1 तासात ठरले आणि आम्ही निघालोही. मनात बापूला म्हटलंसुद्धा की बापुराया मी कधीच अक्कलकोटला गेलो नाही. नंदाईच्या हातात एकदा स्वामींची बखर हे पुस्तक पाहिले आणि त्यातील 81 नंबरची कथा ही जगन्नाथशास्त्री पाद्धे म्हणजे बापूंचे खापर पणजोबा ह्यांची आहे हे कळले तेव्हापासून मी सुद्धा ती बखर विकत घेऊन वाचली होती, त्यातील स्वामींच्या कथा वाचून मन तृप्त झाले होते, बापूंनी प्रवचनातून सांगितलेल्या स्वामींच्या कथा मनात साठविलेल्या होत्याच. प्रवासात बापूंना म्हटलं की स्वामी तुम्हीसुद्धा ह्या तीन दिवसात माझ्यासोबत चला. तेव्हाच रात्री साडेबारा वाजता पूज्य समीरदादांचा संस्थेच्या ग्रुपवर मेसेज पहिला की आपले क्लिनिक 6, 7 आणि 8 जून रोजी बंद राहील. मला पूर्ण खात्री होती की आई, बापू  आणि दादा माझ्या बरोबर माझ्या सोबत ह्या तीन दिवस आहेतच.

अनुभव 2
उपासना करत आम्ही अक्कलकोट येथे पोहचलो, खरच मन अतिशय शांत झालं होतं. जस आम्ही प्रथम मठात प्रवेश केला तेव्हढ्यात माझा 9 वर्षाचा मुलगा म्हणाला, बाबा आपण इथे आलो होतो, मीसुद्धा म्हटलं हो रे आपले मागील जन्म मला आठवत नाहीत पण बापूंना ते माहीत आहेत. दर्शन करून आम्ही मठातच बसलो, आपल्या नित्य उपासना केल्या, मंत्रगजर, गुरुक्षेत्रम मंत्र,श्रीपंचमुखहनुमतकवच इत्यादी. तिथे असणारे सर्व देवाचे फोटो मी मुलाना सांगत होतो की परमेश्वराची रूपे अनेक आहेत पण तो मात्र एकच आहे, आपल्यासाठी आपला "बापू". 
असे मठात मी त्यांना ती 81 नंबरची कथा सांगितली की स्वामी इथेच रहात होते, बापू आणि स्वामींचा संबंध काय, स्वामींनी दिलेली ती दोन नाणी मग साईबाबांनी आठवण करून दिलेली "आतातरी खूण पटली ना" हे सर्व मी माझ्या मुलांना सांगत सांगत बाहेर जात असताना तिथे अचानक बापूंचा फोटो पहिला. एका वही वर स्वामी आणि एकावर बापू. समोर स्वामी आणि समोर बापू. खरच डोळ्यात नकळत पाणी आले, अंगावर शहारे आले. तो क्षण शब्दात वर्णू शकत नाही, मुलांना म्हटलं बघ इथे पण आपला बापू आपल्यासोबत आहे. तो आपल्याला कधीच टाकत नाही. हा अनुभव आम्ही कुटुंबीयांनी घेतला आणि कृतकृत्य झालो. विशेष म्हणजे स्वामींच्या मठातच हा अनुभव स्वामींनी माझ्याकडून लिहून घेतला, काही वर्षांपूर्वी असाच अनुभव मला कोठिंबेला आला होता, तेव्हा माझा साई माझा बापू झाला होता आणि आज हा अनुभव देऊन माझा स्वामीपण माझा बापू झाला. 
श्रीराम.अंबज्ञ. नाथसंविध.

जैसा स्वामी अमुचा बाप, तैसी साई हि ची आई I
साईस्वामी एक होता,दिसले बापूच्या ह्या रुपी II १ II

जन्म जन्मांतरीची  पापे, आमुच्या प्रारब्धे लागली I
त्यांना घालवी सतवरी, हि करुणेची माउली II २ II

गुण काय मी त्याचे गाऊ, शब्द येईना  ह्या मुखी I
कर्ता करविता तोची, अपुले हाते करवुनी  घेई II ३ II

सूचित शेषरूपी दाऊ, नंदा आल्हादिनी  रुपी I
दोहा वंदनीय "बापू", सदा ठेवी तुझ्या मुखी II ४ II

जन्म मरणाते सोडवी, तोची नेई भर्गलोकी I
हाती हाताते घालोनी, बैसवी पुष्पकी विमानी II ५ II

संत सज्जन ज्याले भजती, तोची प्रगटिला  धरेवरी I
युगे अठ्ठावीस  उभा, त्या एका विटेवरी  II ६ II

काय करू आता नाथा, तूची सांग तुझ्या ह्या लेका I
मी काही जाणत नाही, काही नको तुझ्या विना II ७ II

माझ्या ध्यानी मनी बापू, जवळी क्षणोक्षणी बापू  I
मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II ८ II

मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II
मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II

देवेंद्रसिंह

No comments:

Post a Comment