Monday, July 18, 2022

*भक्तीच्या नऊ पायऱ्या* important agralekh

*भक्तीच्या नऊ पायऱ्या*
. हा भगवंत आहे ह्याची जाणीव असणे ही पहिली पायरी, त्याला सर्व कळते आणि समजते ही दुसरी पायरी, तो अत्यंत प्रेमळ आणि दयाळू आहे हे जाणणे ही तिसरी पायरी, तो अत्यंत न्यायी आहे आणि तरीही त्याचा न्याय आंधळा नाही हे जाणणे ही चौथी पायरी, अशा ह्या न्यायी आणि दयाळू भगवंताला नुसता जगाचा न्यायाधीश व मालक न मानता स्वतःचा मायबाप मानणे ही पाचवी पायरी, तो माझा मायबाप आहे म्हणून तो सदैव माझ्या हिताचाच विचार करतो व माझ्याकडून फक्त भक्ती आणि सेवेच्या प्रयासांचीच अपेक्षा ठेवतो, असा दृढविश्वास ठेवणे ही सहावी पायरी, ह्या विश्वासामुळे आश्वस्त होऊन त्याचे नामस्मरण, भजन व कीर्तन करणे आणि आपापल्या क्षमतेनुसार भगवंताच्या पीडित लेकरांची सेवा करणे ही सातवी पायरी, परमेश्वराच्या सत्य आणि प्रेमाच्या मार्गावरून चालून मी आनंदच मिळविणार हा निश्चय करून त्यानुसार चालत राहणे ही आठवी पायरी ,आणि स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे माझ्या प्रगतीचेच सूत्र भगवंताने लपविलेले आहे हे जाणून स्वतःचे जीवन अधिकाधिक परमेश्वराला आवडेल,असे करत राहून खराखुरा भक्त बनणे ही नववी पायरी. 
ह्या नवव्या पायरीवरच संपूर्ण यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठेवलेली असते.ह्या नऊ पायऱ्या जराही कठीण नाहीत. अगदी साध्यासुध्या माणसासही सहजतेने क्रमता येणाऱ्या आहेत.ह्या नऊ पायऱ्यांची वाटचाल म्हणजे प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय. चौऱ्याऐंशी लक्ष योनी क्रमल्यानंतर ह्या नऊ पायऱ्यांचे मार्गक्रमण मानवास कठीण वाटावयास नको.
----------
दैनिक प्रत्यक्ष: अग्रलेख 
मुंबई, दि. ५ जुलै, २०२२
सदगुरू श्री अनिरुद्ध
(हा लेख पुनर्मुद्रित करण्यात आला आहे.)

No comments:

Post a Comment