*दैनिक प्रत्यक्ष अग्रलेख*
कथामंजिरी २- ३१ व २-३२
अहिल्या माता शीळा होण्यामागची कथा.
कथामंजिरीचे वाचन, अभ्यास म्हणजे खरंच आता असं वाटतं = बापु आपल्याला ब्रम्हांड भ्रमण करवून आणतात आणि ज्ञानामृताचे शुध्द प्रेम प्रत्येक थेंबातुन पाजत असतात.
एक विलक्षण अनुभव आहे, कथामंजिरी समजून घेण्यातला.
*बापु आम्ही खरंच खुप खुप बापुज्ञ आहोत, तुमच्या ह्या प्रेमासागरासाठी .*
२-३१ व २-३२ ह्या कथामंजिरीतला आपल्याला बोध करणारा भाग.
आत्तापर्यंत आपण गौतम ऋषी, अहल्यामाता ह्यांच्या विषयीच्या आख्यायिका ऐकलेल्या आहेत.
पण ह्यात *सदगुरु बापुंनी प्रत्येकाच्या अंतर्मनाचा विचार करून सखोल माहिती आपल्याला दिली आहे.*
इंन्द्राच्या अहिल्येबाबतीतला मोह, त्याच्या शक्ती सामर्थ्यामुळे त्याची कपट नीती यशस्वी होते.
खरंतर बापु अग्रलेखात स्पष्ट म्हणतात, *अहल्या महामती आहे*. महामती म्हणजे मनाची शक्ती पूर्णपणे शुध्द झालेली आहे आणि त्यामुळे कुणाचेही अंतरंग ओळखण्याची क्षमता जिच्याकडे आहे अशी.- मग इंन्र्दाला का नाही ओळखले अहल्या मातेने......
खरंतर हे सगळे आपल्याला समजवण्यासाठीच. इंन्र्दाचे सामर्थ्य वरचढ ठरले आणि अहल्या माता त्याला ओळखु शकली नाही.
*प्रसंग पहिला*
गौतम ऋषी हे तत्वनीष्ठ, न्यायप्रिय, नियमाने चालणारे आहेत. ब्रम्हर्षी आहेत.
त्यांचा नातु वत्सलनीधी (शतानंदाचे पुत्र) अवघे १२ वर्षापासून त्यांच्या गुरुकुलात शिकायला होते. पण त्यांनी तेव्हाही अहल्यामातेला सांगितले होते, की आपण कुठेही वत्सलनीधींशी नातु म्हणून वागायचे नाही तर बाकीच्या शिष्या सोबत जसे वागतो तसेच एक शिष्य म्हणून वागायचे.
एक दिवस वत्सलनीधींना पडल्यामुळे लागते, रक्तस्राव होत असतो.....
अहल्यामाता, आज्जी लगेच वात्सल्य भावाने मंत्रोच्चार करून वेदना, रक्तस्राव थांबवते. अर्थातच गौतम ऋषींना हे आवडत नाही.
ते म्हणतात, असे आपण वागलो तर आपला नातू ही असेच भेदभाव करायचे शिकेल.
तेवढ्यात स्वयंभगवान येतात आणि त्यांना *# नियम हे भक्ती, प्रेम वाढवण्यासाठी असतात*,*# भक्ती प्रेम ,,,,,,नियमांमुळे कमी होता कामा नये*#......हे समजाऊन सांगतात.
मंत्रगजर,,,, रामा रामा.... आत्मारामा त्रिविक्रमा, सदगुरू समर्था, सदगुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा
ह्याचा फायदा असाही आहे बरं..........
एकमेकांपर्यंत एकमेकांच्या भावना पोहोचवणे.......
सेतुचे कामही हा मंत्र करतो.
इथे नातवात आणि आज्जी आजोबांमधे त्रिविक्रमाने मध्यस्थी केली...... सेतुचे काम केले....
इथेच बापु आपल्याला सांगताएत की गौतम ऋषी कसे तत्वनीष्ठ आहेत ते.
*प्रसंग दुसरा*
अहल्येकडून नकळत अपराध घडलाय. पण तरीही गौतम ऋषींना माहिती आहे की अहल्या पवित्र आहे, प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे, तीचे त्यांच्यावर खुप प्रेमही आहे. पण तरीही ते तुला शीळा होशील म्हणून शाप देतात.
आपल्या ऐकीव आख्यायिकेनुसार आपल्याला वाटते गौतम ऋषी तापट, क्रोधी आहेत- म्हणून शाप दिला.
पण तसे नाही. शाप देतांना.... नव्हे शिक्षा देतांना त्यांनाही त्रास झाला. खुप जड अंत करणाने त्यांनी ही शिक्षा दिली.
कारण त्यांच्या तत्वानुसार अहल्या माता आता ब्रम्हर्षी, महामती पदापर्यंत पोहोचली होती. ह्या ब्रम्हर्षी पदाची विशेष जबाबदारी, कर्तव्य असतात.
सगळे बाकी भक्त, श्रध्दावान ह्या श्रध्दा स्थानाकडे आदराने, आस्थेने बघतात.
मग अशा आदरस्थानी असणाऱ्या व्यक्तीला चुकूनही चुका करण्याची परवानगी नाही.
*कारण त्यांचेच अनुकरण सगळे करतात.*
म्हणून ह्या चुकीला माफी देऊन चालणार नव्हते. नाही तर इतरही अशा चुका करायला धजावतील..
ह्या कारणास्तव अहल्येला शीळारूप स्वीकारावे लागले.
*ह्यात फक्त तीचे चीत्त जागृत होते*. बाकी सगळे कर्मेन्द्रीय, ज्ञानेन्द्रिय निष्क्रिय झाले होते.
*प्रसंग तीसरा*
याज्ञवल्क्य ऋषी अहल्येमातेला मानसकन्या मानायचे. दरवर्षी एकदिवस ते आपल्या कन्येसाठी तिकडे यायचे. दिवसभर शीळेसमोर म्हणजे अहल्येसमोर बसून महामंत्र गजर, त्रिविक्रमाचे गुणसंकीर्तन, महिमा गायचे. तीच्या मस्तकावर हात ठेवून आशिर्वाद द्यायचे.
भलेही अहल्येला, ऐकु येत नव्हते, दिसत नव्हते, स्पर्श जाणवत नव्हता. पण तरीही *महामंत्रगजर*
*रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सदगुरू समर्था| सदगुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा ||*
*हा त्रिविक्रमाचा मंत्र गजर, इतका प्रभावी आहे की, त्यात इतके सामर्थ्य आहे की सगळ्या अडथळ्यांना दूर करून याज्ञवल्क्य ऋषींकडून अहल्येच्या चीत्तात तो प्रवाहित होत होता.....*
३६ वर्षे सरली. आता माता अहल्या तर ह्या मंत्रगजरात अखंड न्हाऊन निघाली होती. बाकीच्या परिसरातल्या शीळांमधुनही आता मंत्रगजराचा ध्वनी येऊ लागला.
*आपणही जेव्हा हा मंत्रगजर करतो तेव्हा आपल्या आसपासचा परिसरही असाच मंतरलेला होऊन जातो.....*
मग कधी कधी जे भक्तीत जास्त वेळ घालवत नाहीत असे आपल्या घरातल्या इतर सदस्यही ह्यात सुरक्षीत होतात.
*प्रसंग चौथा*
वर्ष ३७ वे. याज्ञवल्क्य ऋषी निघालेत लेकीला भेटायला. रस्त्यात त्यांना त्रिविक्रम आणि माता जगदंबा एका मायलेकरांच्या नाट्य प्रसंगातून साक्षात्कार, संकेत देतात.
त्यांना कळते आता अहल्येचा पुत्र शतानंदाना अहल्येच्या भेटीला घेऊन जाण्याची वेळ आली.
ते शतानंदानकडे जातात.
त्यांना सांगतात,,, स्वयंभगवानाने मला तुला मातेच्या भेटीला नेण्याचा संकेत दिला.
झाले.......
दोघेही तिकडे जातात. अहल्या रूपी शीळेतुन अव्याहत महामंत्र गजर ऐकू येत होतात.
आजुबाजुचा परीसरही मंत्रवत झाला होता. आणि आता अचानक चतुर्भुज स्वयंभगवानाचे दर्शन त्यांना झाले.
पहिले आनंद झाला. कारण खूप खूप प्रेम होते शतानंदाचे स्वयंभगवानावर.
पण दुसऱ्याच क्षणाला शतानंद त्रिविक्रमावर रागावून बोलु लागले.
ते म्हणाले, मला खुप राग येतोय देवा तुझा.
तु का ताटातुट केली मायलेकरांची....
माझे वडील गौतम ऋषी चुकले पण तु हे सगळे होण्यापासून थांबवू शकत होता.
असे रागावून, चीडून बोलून झाल्यानंतर सगळे शांत होते.
आणि एकदाचे सगळे मनातले बोलून झाल्यावर शतानंद ही शांत झाले.
शेवटी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर, जवळच्या वरच आपण चीडतो हक्क दाखवतो तसेच झाले.
पण लगेच आता देवावर रागावलो ह्याचे त्यांना खुप दुख: झाले.
ते म्हणतात मी चुकलो देवा....
आता माझ्या ह्या चुकीची तु शिक्षा दे..... मला माफ नकोस करू........
*प्रसंग पाचवा*
स्वयंभगवान म्हणतात,
तु मला जे बोललास तो राग नव्हता..... तो तुझा शोक, दुख:
होते.... .. जे तु आईच्या प्रेमापोटी व्यक्त केले.
पण तुला शिक्षा होणारच.
आणि त्रिविक्रम शतानंदाना आई सारखाच शीळा होशील म्हणून शिक्षा दिली.
माफी मागण्यासाठी त्यांनी स्वयंभगवानांच्या पायावर लोटांगण घातले होते. त्याच अवस्थेत ते शीळा झाले.
मात्र त्यांना ऐकु येत होते.
दिसत होते. समजत होते.
त्यांना लक्षात येतंय की अरे....
आपले डोके तर आपल्या आईच्या अहल्येच्या मांडीवर आहे.
आई डोक्यावरून प्रेमाने हात फीरवतीये....
तीच्या मऊ हाताचा स्पर्श त्यांना जाणवू लागला.
आणि *तिच्यातला (अहिल्यामातेतला) मंत्रगजर त्यांच्या बुध्दिमत्ता, मनात, देहात पसरू लागला.* समुद्राच्या लाटा जश्या, ज्या वेगाने येतात त्या प्रमाणे त्या मंत्रगजर लहरी त्यांच्यात प्रवाहित होत होत्या.
जसे एखाद्या पेशंटला सलायन, औषधे दिल्यावर,,,,
जसजसे ते औषध शरीरात भीणते तसतसे त्या पेशंट मध्ये लगेच सुधारणा दिसते.
किंवा तहानलेल्या व्यक्तीला पाणी,
भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळाल्यावर शरीराला तरतरी येते त्याप्रमाणेच ह्या मंत्रगजरामुळे श्रध्दावानाच्या मनाला, बुध्दी ला, देहाला ऊर्जा मिळते.
ह्यावरून आपल्याला हे लक्षात येते की आपणही जेवढा जसा जमेल तसा,,,,तेवढा मंत्रगजर करत राहिलो तर *आपणही आपल्या मुलांना आशिर्वाद स्वरूप मंत्रगजराचे कवच त्यांच्या पर्यंत पोहोचवु शकतो ना... शेवटी हा वात्सल्य भाव आहे.*
आपल्यात अहल्येइतकी तप साधना नसली तरी आपण भक्ती वाढवली तर हे होऊ शकेल असे मला वाटते,, हो ना बापु.....
आणि एकीकडे हा मंत्रगजर आणि दुसरीकडे तीने गायलेली अंगाई ऐकु येऊ लागली.
आता अहल्या माता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देते.
बाळा, मी शीळा झाले त्यात माझीच चुक होती.
मी महामती होते.
मी अतिशय ज्ञानी होते.
(लावण्य, सौंदर्यवती तर होतीच माता)
आणि ह्या सगळ्या प्रवासात माझी भक्ती कमी पडली.
माझ्या ज्ञानाचा मला अहंकार झाला.
आणि *जेव्हा भक्ती कमी पडुन अहंकार वाढतो तेव्हा बुध्दी ही पाशाणच झालेली असते.*
आणि कदाचित म्हणूनच माझ्याकडून भक्ती करून घेण्यासाठीच मला हा तपस्येसाठी चा वेळ स्वयंभगवानाने मला दिला,,,, आणि मी शीळा झाले.
इथे जरी लौकिक दृष्टी जरी आपल्याला ही शिक्षा वाटली तरी,
अहल्येमातेसाठी तीच्या भक्तीवृध्दिसाठी हे एकप्रकारे वरदानच होते.
आणि नंतर परत अहल्या माता अचेतन होते आणि शतानंद सचेतन.
पण आता स्वयंभगवान अंतर्धान पावतात.
*याज्ञवल्क्य ऋषी, शतानंदाना म्हणतात, बघ किती वात्सल्य आहे स्वयंभगवानामधे....त्यांनी तुझी आणि तुझ्या मातेची भेट घडवून आणली.*
तुझे कुतर्क दुर केले. आणि ह्या अनुशंगाने अहल्या मातेला ही पुत्र भेटीचा आनंद दिला.
हे सगळे इतके सुंदर आहे की आपल्याही मनाचे रूपांतर बापुंनी चीत्तात करायला सुरुवात केली. मन तृप्त होते.
*बापु आम्ही खरंच बापुज्ञ,अंबज्ञ आहोत.*
🙏🏻जय जगदंब जय दुर्गे🙌🏻
From whatsApp group.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
||हरि ॐ||श्रीराम||अंबज्ञ||
नाथसंविध्
No comments:
Post a Comment