परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.१०.२०१२- कोजागिरी पौर्णिमा विशेष)
॥ हरि ॐ ॥
आज विजयादशमी सगळ्यांना असे वाटते की आजच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करायचे एवढ्यापुरतेच दसर्याचे महत्त्व असते.
दसर्याचे खरे महत्त्व आहे ते सीमोल्लंघनाचे. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा सोडून बाहेर जायचे. याचा अर्थ चांगल्या सीमा सोडायच्या असे नाही. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागणे चुकीचेच आहे. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे सीमा विस्तारणे. आपल्या क्षमता, capacity, potency वाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. सकाळी सरस्वतीदेवतेची व संध्याकाळी शस्त्रांची पूजा केली जाते. म्हणजेच ज्ञान व विज्ञानाची ह्या दिवशी पूजा होते. हे कशासाठी? तर स्वत:चे कौशल्य, compatibility वाढवण्यासाठी.
आज आपण इतकी वर्षे इथे जमतोय त्यामुळे आम्ही पूजा कशी करायची हा प्रश्न आम्हांला पडता कामा नये. मी मागे सांगितले होते, "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा." कधी आठवतेय? नाही ते पण आठवत नाही. ह्या वर्षाच्या सुरुवातीला आता वर्ष संपायला दोनच महिने उरले आहेत. मग ह्या वाक्याच्या आम्ही किती जवळ गेलो हे तुम्ही स्वत:च ठरवा.
ह्या विश्वासाच्या जवळपास आम्ही किती पाऊल टाकले ह्याचा विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही वर्ष संपायला २ महिने ७ दिवस बाकी आहेत.
हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. "विश्वास असावा म्हणजे काय?" तर हा सगळं जाणतोच. मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याला माहीतच आहे, हा विश्वास आधी मला स्वत:मध्ये निर्माण करायला हवा. ह्याच्यासमोर आम्ही नाटक करत राहतो म्हणून आम्ही फसतो. तुम्हाला नाटक करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे जेवढे तुम्ही खोटेपणाचे नाटक कराल, तेवढी माझी जबाबदारी कमी होते. तुम्ही व तुमचे कर्म इतका सोपा हिशोब इथे आहे. पण हजारो वेळा सांगूनही अजूनही आम्हांला समजत नाही.
बापूंनी तपश्चर्या केली आज उपासनेचाही शेवटचा दिवस आहे. उपनिषदही लिहून झाले. जे दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल. हे सगळं बापू का करतोय? बापूचं घर चालावं, ह्या ग्रंथाची रॉयल्टी मिळावी म्हणून नाही. तो समर्थ आहे त्याचे कार्य करायला.
हा (परमपूज्य बापू) कर्मस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असल्यामुळे जोपर्यंत त्याच्यापुढे माझा "मी" open करत नाही, तोपर्यंत काहीच घडू शकत नाही. म्हणून गुरुच्या समोर उभे राहून कधीही नाटक करू नका. एक गोष्ट आज सांगतो. जेव्हा अमृतमंथन झाले, तेव्हा अमृत व हलाहल विष त्यातून निर्माण झाले. ह्यातील हलाहल प्रथम बाहेर आले. मग आपण हलाहल मंथन का म्हणत नाही? विष शिवाने प्राशन केल्यावर मिळालेल्या अमृतामुळे देवगण अमर झाले. त्यांना हव्या असणार्या सर्व गोष्टी मिळू लागल्या व मृत्यूचे भयही उरले नाही. त्यामुळे ते पूर्णपणे relax झाले. परमात्म्याचे सेवेकरी म्हणून त्यांना माज चढला. ह्या देवगणांचा माज पहिल्यांदा दिसला तो त्या शेषधारी विष्णूलाच.
ह्या विष्णूला भेटायला जेव्हा नारद आला, तेव्हा त्याला न बघताच महाविष्णूने कूस बदलली. देवर्षी नारद म्हणजे सगळ्या भक्तांसाठी एकमेव जवळचा आप्त, ह्याने कुठलाही यज्ञ कधी केला नाही, केवळ नामस्मरणानेच देवर्षी पदाला पोहोचलेला आहे.
लक्ष्मीमाता विष्णूचे लक्ष नाही हे बघून त्यास नारद आल्याचे सांगते. तेव्हा विष्णूने एक आळस देऊन विचारले काय झाले? नारदाचे व विष्णूचे बोलणे म्हणजे जगात चालणार्या गोष्टींचे gossip नसून विश्वाच्या कल्याणासाठी चाललेला वार्तालाप असतो.
विष्णू नारदाला विचारतो, "विश्वाचा कारभार बघणार्या देवगणांचे कसे चालले आहे?" याबद्दल मला एका वाक्यात सांग. त्यावर नारदाने एका वाक्यात उत्तर दिले, "कोण देवगण?" इथे उत्तरातच प्रश्न येतो पण हा प्रश्न नसून खरे उत्तरच होते. कारण नारदासाठी देवगण अस्तित्वातच राहिले नव्हते.
जसे श्रद्धावानांच्या गोष्टी चण्डिकेपर्यंत पोहचविणारा महाविष्णू हा चण्डिकेचा कान तसेच नारद म्हणजेच नामस्मरण हा महाविष्णूचा कान म्हणून जेव्हा देवगण त्यांच्या कार्यापासून च्युत झाले तेव्हा ते देवगण राहिलेच नाहीत.
नारदाचा प्रश्न ऐकून लक्ष्मीमाता नारदाला सांगते, "देवगण म्हणजे जे देवाची व मानवाची सेवा करतात ते." त्यावर नारदाने उत्तर दिले, "पण मला असे कोणीच दिसले नाही." हा दिवस होता पितृपक्षाचा पहिला दिवस. नारदाचे उत्तर ऐकून लक्ष्मीमाता महाविष्णूला विचारते, "मी शोधू का कुठे आहेत ते देवगण?" महाविष्णू आळस देऊन म्हणतो, "तुला जे करायचे ते कर."
लक्ष्मीमाता पृथ्वीवर सगळीकडे फिरते व बघते की, कावळ्यांसाठी ठेवलेले अन्न देवगण खात आहेत. एवढी ह्यांच्यावर वाईट परिस्थिती का आली? हा प्रश्न तिला पडतो, ती परत विष्णूकडे येते, व विष्णूला ह्याचे उत्तर विचारते. विष्णू तिला म्हणतो, "बाई तूच शोध घे, मला झोपू दे."
लक्ष्मी परत पृथ्वीतलावर जाते व बघते की, सगळे भाविक लोक व्यवस्थित पूजा करत आहेत, देवाला नैवेद्य अर्पण करत आहेत. मग ते ह्या देवगणांपर्यंत का पोहचत नाही? असा प्रश्न तिला पडतो. हे देवगण जर पितरांचे खातात, म्हणजे पितर उपाशी राहतात.
ती महाविष्णूला परत येऊन विचारते, तेव्हा महाविष्णू म्हणतो, "पितरांची तू काळजी करू नको त्यांचं बघायला मी आहे."
लक्ष्मी नारदाकडे जाते, तेव्हा नारद म्हणतो विष्णूला जागे कर. लक्ष्मीमाता प्रेमाने विष्णूस जागे करते. विष्णू तिला म्हणतो, "काळजी करू नकोस. लौकिक जगातील अन्न पितरं कसे खाणार? त्यांना चतुर्मितीतून त्रिमितीत येण्याची तू permission देतेस का? नाही नां. काळजी करू नकोस पितरांना अन्न अर्पण करणे लोकांची भावना आहे.
लक्ष्मीमाता म्हणते, उद्यापासून मी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पृथ्वीवर संचार करण्यासाठी जाते. विष्णू म्हणतो, "उद्यापासून नवरात्र सुरू होते आहे."
लक्ष्मीमाता बघते पृथ्वीवर सगळे भक्तिभावाने नवरात्र साजरी करत आहेत. मग ती देवगणांकडे येते. पण तिथे सगळे आपल्याच विश्वात मग्न असतात. कुणीही नवरात्र साजरी करताना दिसत नाही. लक्ष्मीमाता रूप बदलून त्या देवगणांना विचारते, "तुमचे असे वागणे विष्णूला कळले तर?" देवगण त्यावर तिला उत्तर देतात, "विष्णूला त्या नारदाने सांगितले तरच कळते, नाही तर काही कळत नाही." तेव्हा लक्ष्मीला जाणवते की, ह्या देवगणांची कृतज्ञता, श्रद्धा, विश्वास नाहीसे झाले आहे. ह्यांना अमृतामुळे सर्व मिळाले आहे. ह्यांना मागण्यासाठी काहीही उरले नाही, त्यामुळे कुठलीही गरजही उरली नाही.
लक्ष्मीचे मन कळवळते, तिला वाटते, देवगण चांगले आहेत, त्यांनी सुधारावे. ती विष्णूकडे परत जाते व त्याच्याकडे वर मागते, "मी आज पृथ्वीवर संचार करायला जाईन व जो कोणी रात्री जागा असेल, देवाची वाट बघत, देवावर विश्वास ठेवून तर त्याला आशीर्वाद देईन व असे प्रत्येक महिन्यात करण्यासाठी तू परवानगी दे." विष्णू म्हणतो, "दर महिन्याला मी परवानगी देऊ शकत नाही. वर्षातून एकदाच तू हे करू शकतेस. उद्या पौर्णिमा आहे." लक्ष्मीमाता म्हणते, "उद्या जी कोणी "कोऽजागरति" म्हणत देवाची भक्ती करत जागा असेल त्याची त्याने कधीतरी मागे केलेली भक्ती मी जागृत करेन."
कोजागिरी पौर्णिमा आता पुढच्याच आठवड्यात आहे. गुरुक्षेत्रम्मध्ये अनेकजण जागरणाला येतात, रात्रपठणासाठी. पण मी खाली जातो तेव्हा अर्धे अधिक झोपलेले असतात. जागरण जरी गुरुक्षेत्रम्मध्ये नाही जमले तरी घरी करा, चालेल पण नीट जागे राहून करा. रात्र पठणानंतर सकाळी ६ वाजले की जायची घाई असते. कधी एकदा ६ वाजतात एवढे सगळ्यांचे घड्याळाकडे लक्ष असते, खाली सगळे झोपलेले असतात, मी वरती जागा असतो. सकाळी ६.०५ ला खाली आलो तर कुणीच दिसत नाही, तिथे सगळे सपाट असते.
एक दिवस रात्री झोप नाही झाली तर आमच्यासाठी तो प्रलय असतो. जगबुडी झाल्यासारखी आमची अवस्था होते. दुसर्या दिवशी पित्त काय उठते, हात-पाय काय गळतात सगळ खोटं आहे हे.
मेडिकल field मधले इथे बरेच आहेत. आम्ही M.D. करताना ३-३ रात्री जागे राहून काढायचो. Doctor ने night duty च्यावेळी alert रहावे अशी अपेक्षा असते मग तुम्ही का एक रात्र जागे राहू शकत नाहीत?
आम्ही देवाचे करतो म्हणजे स्वत:चे करतो. तुम्हाला काय वाटते, तुम्ही दिवा नाही लावला तर त्याच्याकडे अंधार असणार का? नाहीच.
जेव्हा देवगणांनी त्यांची मर्यादा सोडली तेव्हा त्यांची कशी परिस्थिती झाली हे विसरू नका. मनुष्याचे असेच होत असते. संकट येताना मनुष्याला दिसेलच असे नाही. त्सुनामी येते तेव्हा तुम्ही बघितले असेल दुसर्या व चौथ्या मजल्यावरचा मरतो पण तिसर्या मजल्यावरचा मात्र जिवंत राहतो. हे कसे घडते, हे समजण्याची तुमची capacity नाही हे लक्षात ठेवा.
तुम्हांला काय वाटते तुम्ही प्रसाद देता म्हणून देव तुमच्यासाठी करतो. तो काय तुमचा केटरर आहे. विश्व उत्पन्न करताना त्याच्या इच्छेने झाले तेव्हा त्याला आमच्या पूजेची मदतीची गरज लागली नाही. हे नेहमी ध्यानात ठेवा.
हे जे उपनिषद माझ्या आईने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते खरचं सांगतो, अधाश्यासारखे वाचा. तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हांला बाहेर काढून ते तुम्हांला चांगल्याच मार्गावर घेऊन जाणार.
ज्याचा ह्या वर्षी "कर्ता हर्ता गुरू ऐसा" हा संकल्प सिद्ध होईल, तोच पुढच्या काळात तरणार. मी जे काही करतो, ते देवाला कळत नाही, त्यामुळे तो action घेत नाही हा विश्वास खोटा आहे, हा टाकून द्या. प्रत्येक गोष्ट ह्या चण्डिकाकुलाला नीट कळत असते, जो कुणी त्याच्याशी खोटं बोलतो तो मग नियमांच्या प्रांतात जातो.
पण जेव्हा त्याच्यावर पूर्णपणे श्रद्धा असते, तेव्हा जरी तुमच्याकडे काही कमी पडत असले तरी ते कुठल्या ना कुठल्या चांगल्या मार्गाने तुम्हांला मिळत राहते.
पोलिओचे थेंब नाही घेतले तर पोलिओ होईल हे सांगणे म्हणजे doctor ची तुम्हाला धमकी नसून तुमच्याविषयी कळकळ असते.
मी पण डॉक्टरच आहे. आजचे हे सांगणे म्हणजे बापूची धमकी समजू नका. माझी तपश्चर्या, उपासना, तुमच्यासाठी तळमळ हे तुमच्यासाठी vaccine आहे पण हे vaccine टोचताना जर तुम्ही जत्रेत नाचायला गेलात तर कसे होईल?
साईसच्चरित प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितले, जसे प्रवाहात अनेक लाकडे एकत्र येतात व पुढे परत वेगळी होतात. तसेच जीवनात असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे अनेक दूरची नाती पण जवळची वाटायची आता मात्र जवळची नाती पण दूरची वाटतात. नातेवाईक बदलत जातात पण नाती तीच राहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक वेगवेगळी माणसे भेटतात पण ह्या प्रवासाला आधार देणारा एकच सद्गुरु असतो.
जो ह्याला विन्मुख होतो, त्याला सुख मिळू शकत नाही, त्याचं जीवन कृतार्थ होत नाही. आज आपल्या न नशिबाने मातृवात्सल्यविन्दाम्, गुरुक्षेत्रम्, रामरसायन आहे. आपण खूप श्रीमंत आहोत. आपल्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही. तुम्ही मला गुरू मानू नका मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही कुणालाही गुरू माना, पण पूर्ण विश्वास ठेवा कारण येणारा काळ अतिशय बिकट आहे. आज तरुण वयाच्या मंडळी कामाच्या stress ने दबलेली असतात. Divorce चे प्रमाण तर अगदी चण्या-फुटाण्यासारखे झाले आहे. Divorce फक्त नवरा बायको मध्ये होत नाही, तर मैत्रीत होतो, भावंडांमध्ये होतो. संसार प्रेमाने टिकवायचा असतो. प्रेमाची माणसे मिळत नाहीत. वाईट माणसांना कधीही सुख लाभत नाही हे लक्षात ठेवा जे सद्गुरुचरणी निष्ठावान आहेत, चण्डिकाकुलाशी प्रामाणिक आहेत तेच प्रेमाने, सुखाने राहू शकतात.
मी माझ्या अनंत काळाच्या अनुभवाने हे तुम्हांला सांगत आहे. संकट कुणाला येत नाहीत. राम-कृष्णालाही संकटे आलीच ना. प्रत्येक संकटातून तरण्याचा मार्ग असतो तशी संधीही तोच देतो. एक दिवस असं समजा तुम्ही कृष्ण आहात. खरचं सांगतो तुम्हांला पाप लागणार नाही. तुम्हाला स्वत:च्या आप्तांसोबत हिरे-माणकांनी बनविलेली द्वारका बुडवावी लागली तर विचार करा, किती दु:ख झाले असेल कृष्णाला.
आयुष्यात सगळं करा, पण ते चण्डिकाकुल व त्याचे द्वार असणार सद्गुरु ह्यांच्यापासून कधी दूर जाऊ नका. अमृतमंथन खरं तर हलाहल मंथन आहे. समजा तुम्ही लग्नाला उभे राहिलात आणि समोरची स्त्री किंवा पुरुष अतिशय श्रीमंत आहे पण त्याच्या मागे जहरीला साप आहे तर तुम्ही पुढे जाणार का? नाही. हे जहरीले विष म्हणजेच चुकीच्या गोष्टींची मदत घेणे. हे निस्तरण्यासाठी ते विष शिवालाच येऊन प्यावे लागते.
माझे ह्याआधी अनेक जन्म झाले असतील, पण ह्या जन्मात मला संधी मिळाली आहे ही संधी परत येणे नाही. ह्यापुढे अडीच हजार वर्षांनंतर चार प्रलय झाल्यावर परत नवे युग आल्यावर ही संधी येईल. हा जन्म देवासाठी राखून ठेवा आमची first priority ह्या जन्मात चण्डिकाकुलच असू दे. आज उपासनेचा शेवटचा दिवस असूनही केवळ तुम्हांला हे सर्व सांगण्यासाठी माझ्या आईची permission घेऊन मी इथे आलो आहे. आपण physics शिकलो आहोत. आपण बघतो quanta सतत बदलत असतो. मानवामध्ये तीच अवस्था असते सतत बदल घडत असतो.
ज्याचा quanta बदलत नाही असा तोच एकमेव आहे. तो कधीही बदलत नाही, त्याचा शद्बही कधी बदलत नाही. ज्याक्षणी त्याच्या शद्बाचा आदर राखला गेला नाही, की तो त्याचा शद्ब पाळायला बंधनकारक राहत नाही. तो प्रेमळ आहे त्याची आई साक्षात क्षमा आहे. अनंत क्षमा हेच तिचे स्वरुप आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे क्षमा आहे. पण मला तुम्ही क्षमा करण्याची संधी द्या. आपला बाप तो आपला बाप, दुसर्या कोणाला दया येणं शक्य नाही, हे साईनाथांनी सांगितल आहे, मी नाही. मी एकदाही साईंना बघितले नाही.
"तो" रुप घेऊन येवो की न येवो त्याच्या वरचा विश्वास दृढ ठेवा. तिच्या इच्छेने (आई चण्डिकेच्या) घडते ते स्वरुप तो स्विकारतो पण तो कधीही बदलत नाही. म्हणूनच आमच्या शरिरातील सतत बदलणार्या quanta ला आधार फक्त त्याचाच असू शकतो. ३१ डिसेंबर पर्यंतच ही संधी आहे मग तुम्ही म्हणाल नंतर जन्म घेणार्या बाकीच्यांचे काय? तर ज्यांना "त्याची" जाणिव आहे व जे मनापासून गुरूमंत्र स्वीकारतील त्यांच्या प्रत्येक जन्मात मी कायम पाठीशी उभा राहीन. त्यांना मृत्यु कधीच नसेल. जेव्हा सत्ययुग सुरु होते तेव्हा जन्माला घालतानाच मानवाला गुरुमंत्र कानात सांगितला जातो. त्रेतायुगात जन्माला आल्यावर गुरुमंत्र ऐकवला जातो. द्वापारयुगात वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला जातो. तर कलियुगात तो अर्जन करावा लागतो. तो आज आपण मिळवला आहे. गुरुमंत्र माझ्याकडे आहे म्हणजे सगळे आहे.
आज बलचे text book प्रकाशित होते आहे. गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणजेच मोठी बलविद्या. गुरुक्षेत्रम् मंत्राची जी बलविद्या आहे, ती ज्याला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यालाही शक्य आहे.
ह्या माझ्या आईच्या हातातील १८ शस्त्रे जो कुणी खरा श्रद्धावान आहे व ज्याला ९ निष्ठा मान्य आहेत. त्याला कायम सहाय्यकारी होतील हा वर मी माझ्या आईकडून मिळवला आहे व हा वर तुम्हांला देण्यासाठी आज मी इथे आलो आहे.
खरचं तुम्ही भाग्यवान आहात. मातृवात्सल्यविन्दानम् घेऊन पुढे चला पण आजपासून निश्चय करा -
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"
आज प्रेमाने आपण जयंती मंगला काली हा गजर करायचा आहे व आज रात्री प्रत्येकाने म्हणा -
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा" व प्रेमाने आपल्या गुरुला म्हणा - "I LOVE YOU"
॥ हरि ॐ ॥
जय जगदंब जय दुर्गे
जय श्रीराम
अंबज्ञ
नाथसंविध्
#K10
🙏🏼❤️❤️🙏🏼
No comments:
Post a Comment