Thursday, November 16, 2023

hanuman chalisa pravachan

प.पू. बापूंनी दिनांक 20/06/2019 रोजी केलेल्या इंग्रजी पितृवचनाचा प.पू. बापूंच्या आशीर्वादाने केलेला मराठी अनुवाद. 

     मित्रांनो आज आपण कशावर बोलणार?

     हनुमान चलिसाबद्दल बोलू.

     हनुमान चलिसा नक्की काय आहे? आम्ही *"श्रीगुरुचरणमासात"* एका दिवसात 108 वेळा म्हणतो.

     हनुमान चलिसा ही संत तुलसीदासजींनी लिहिलेली प्रार्थना आहे. ही व्याख्या मूख॔पणाची आहे.  ही केवळ प्रार्थनाच नाही तर त्याहीपेक्षा बरेच काही आहे.  हा तुलसीदासजींचा दृष्टीकोन आहे का?  अजिबात नाही. 

     हनुमानजींनी दिलेली शक्ती आहे का? हो मान्य.  पण त्याहीपेक्षा बरेच काही जास्त आहे.  हनुमान चलिसा ही निर्मिती आहे.  *ती करणारा दुसरा कुणीही नसून स्वत: रामच आहे*. ही हनुमान स्तुती आहे.  जी स्वत: रामाने केली आहे.   ती दृष्टी तुलसीदासजींना प्राप्त झाली आणि त्यांनी ती लिहून काढली एवढेच.  *राम हनुमन्ताचा विचार कसा करतो तर असा करतो*.

     आपण नेहमीच राम आणि रामेश्वर मध्ये फरक करतो.  पण मला समजले पाहिजे की हनुमन्त रामाची भक्ती करतो तर राम हनुमन्ताची भक्ती करतो.

     भारतीय संस्कृतीच्या बाहेरील लोकांना कदाचित हे समजणे कठीण होईल.  कारण एका बाजूने विचार करता ते दोघे एकच आहेत तर दुस-या बाजूने ते दोघेही वेगळे आहेत. का? *कारण त्यांचे बाह्य रुप व त्यांची कत॔व्ये ही भिन्न आहेत. जी जगदंबेने त्यांना बहाल केली आहेत*. या जगाची एकमेव निर्माती जगदंबा.    

     तर.....तुलसीदासजींनी हनुमान चलिसा लिहिली त्याची गोष्ट आहे. मी दहा-बारा वर्षांपूर्वी सांगितली आहे.  पुन्हा सांगणार नाही.   तुम्ही जुन्या श्रध्दावानांना विचारु शकता. ते तुम्हांला सांगतील.

     आज आपण अभ्यासणार आहोत हनुमान चलिसा म्हणजे काय?  ती मुळात कसे काय॔ करते?  मी नेहमीच म्हणतो, *"आत्म्यासह मानवी शरीर नाही तर आपण मानवी शरीरासह आत्मा आहोत"*.  हे वास्तव आहे.  आपण स्वयंभगवानाचे अंश आहोत.

     भवसागर हा वादळयुक्त मोठा समुद्र आहे.  ज्याला आपण आपले जीवन म्हणतो.  आपले काहीही नाव असो, आपला कोणताही व्यवसाय असो, आपण भिकारी असो की मोठे उद्योगपती असो पण आपण सव॔ मानव आहोत व आपल्या प्रत्येकाला आत्मा आहे.   बापू! प्राण्यांनाही आत्मा असतो. हो मान्य! तुम्ही सुद्धा याआधी प्राणीच होतात. नक्कीच आपण प्रत्येक जण 84 लक्ष योनींचा प्रवास करुन आलो आहोत.  आपल्या मेंदूमध्ये 84 लक्ष योनींची बीजे आहेत.   आपण मानव कसे झालो?  तर या 84 लक्ष योनींच्या चक्रात फिरुन पुरुष किंवा स्त्री झालो.  बॅक्टेरियासारखा लहानात लहान प्राणी ते इतर सव॔ मोठे प्राणी यांची बीजे आपल्या मेंदू आहेत.

     कोणते बीज वाढवायचे हे आपल्यावर अवलंबून आहे.   जर आपल्यातील सशाचे बीज बलवान झाले तर आपण भित्रे होऊ व सतत घाबरत राहू.  जर हरणाचे बीज बलवान झाले तर आपण भितीच्या विचारानेच पळत सुटू.  

     कोणते बीज विकसित करायचे आणि कोणते नाही हे कसे ठरविले जाते? एका बाजूने आपल्या आधीच्या जन्माच्या कर्मानुसार तर दुस-या बाजूने हया जन्माच्या कर्मानुसार.   थोडक्यात काय तर प्रारब्ध व क्रियमाणानुसार.  पण या सा-याच्या पलीकडे हे आपल्या *नाथसंविधावर* अवलंबून आहे. *नाथसंविध् म्हणजे जगदंबा आपल्या जन्माच्या वेळेस आखते ती योजना*. 

     प्रत्येकाचे नाथसंविध् हे वेगळे असते.  मी नेहमीच सांगतो माझ्या आजच्या दिवसाच्या वागण्यावरुन प्रत्येक सूर्योदयाबरोबर माझे नाथसंविध् ही बदलते हे कायम लक्षात ठेवा. आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी ती आपल्याला मदत करण्यास कायम तयार असते.  *नाथसंविध् ही तिची योजना असली तरी माझ्यातील स्वयंभगवानाचा अंश ते नाथसंविध् स्विकारून त्याप्रमाणे वागतो.  तो अंश तर मी त्याचा अंशी आहे असे वेदांत म्हटले आहे.  माझे स्वतःचे म्हणणे नाही*.

     तो पूर्ण आहे तर मी त्याचा एक भाग आहे. सव॔ देणग्या, उदारता, मदत आपल्या आई कडून मिळालेली प्रत्येक शक्ती आपल्याला आपल्या आत्म्याद्वारेच दिली जाते.  *आपल्या आत्म्याला छद्म आत्मा असे म्हणतात*. छद्म आत्मा म्हणजे आपला स्वतःचा अहंकार. मी असा आहे तसा नाही. मला हे पाहिजे हे आवडत नाही.  *आपल्या सर्वांना भावना आहेत.  आपण संत, संन्यासी किंवा भिक्षू नाही*. 

     प्रत्येकाला भावना आहेत पण आपण कोणतेही नियम पाळत नाही.   स्वतःच्या आयुष्यापुरते बोलायचे झाले तर किती जण परीक्षेच्या आधी वेळापत्रक तयार करतात?  आणि ते काटेकोरपणे पाळतात?  कोणी लठ्ठ आहे. सकाळी लवकर उठून फिरायला जाण्याचा विचार करतो.  त्याकरिता 7-8 हजाराचे बूट आणतो.  मी असे बूट कधीच आणले नाहीत.  त्या बूटांत आपले सुंदर पाय घालतो.  आणखी जे जे काही सुंदर हवे असते ते घेतो आणि शिवाजी पार्क, वरळी सी फेस वरील वाॅकींग ट्रॅकवर जातो.  घरी येतो.  वजन काट्यावर उभा राहतो. त्याला अमुलाग्र बदल अपेक्षित असतो.  जसे माझे वजन 105 किलो वरुन 75 किलो व्हावे.  पण हे चुकीचे आहे.  हे घडणे अशक्य आहे. 

     *आपण आपल्या जीवनातही चुकीच्या कल्पना, चुकीच्या अपेक्षा ठेवतो आणि छद्म आत्म्यास जन्म देतो.  आपल्या चुकीच्या कल्पना चुकीच्या अपेक्षा म्हणजेच "छद्म आत्मा "*.

      वजन काट्याचे उदाहरण ही एक मजा होती. तुम्हांला कळावे म्हणून. आपण स्वतः कडून देखील चुकीच्या अपेक्षा ठेवतो. आपला सभोवतालचा परिसर, माणसे, राष्ट्रे यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे *आपले मनच आपले शत्रू होते*. हे मनच माझ्या व माझ्या परमेश्वराच्या आड येते.  त्यामुळेच आत्म्याला जगदंबा व स्वयंभगवानाकडून प्राप्त झालेल्या गोष्टी मला प्राप्त होऊ शकत नाहीत. 

       आपल्याला शरीर आहे हे अमान्य करता येत नाही.  आपल्यात *जनुके* आहेत.  त्यामुळेच पौगंडावस्थेत मुले व मुली एकमेकांकडे आकर्षित होतात.  जनुकांमुळेच मला भूक लागते.  भूक लागणे ही काही वाईट गोष्ट नाही.  कोणाला दोनदा तर कोणाला पाच वेळा भूक लागते. यात विशेष असे काही नाही. 

      *माझे पूण॔ जीवन नक्कीच माझ्या शरीरावर अवलंबून असते.  म्हणूनच मला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  शरीराकडे दुल॔क्ष केल्यास मी आध्यात्मिक ध्यास घेऊ शकत नाही.  म्हणूनच स्वतःच्या शरीराची उत्तम रितीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे*.

      आपण आपल्या शरीराकडून आणि मनाकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो.   खरं तर त्यांची व इतर गोष्टींची सरमिसळ करतो.  *चुकीच्या अपेक्षा म्हणजेच छद्म आत्मा    सर्व गोष्टींच्या आड येतो. छद्म आत्मा सर्वात मोठा अडथळा आहे*.  हनुमन्त मुळात वधस्तंभावर आहे या छद्म आत्म्याला मारण्यासाठी.  कसा? तर थोडा थोडा, हळूहळू आणि सतत.  त्यामुळे आपल्याला दु:ख जाणवत नाही.  दु:खदायक परिस्थितीतून बाहेर न येता जर आपल्याला छद्म आत्म्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर *मंत्रगजर हा एकमेव राजमार्ग आहे*.

     हनुमान चलिसामुळे महाप्राणाकडून येणारी विश्वाची प्राणशक्ती आपल्याला प्राप्त होते.   हिच प्राणशक्ती प्रत्येक ग्रहाला त्याच्या कक्षेत फिरण्याची शक्ती देते.  *तोच महाप्राण तिच प्राणशक्ती आपल्यात सुद्धा आहे.   आपल्या नाथसंविधानुसार महाप्राण व प्राणशक्ती आपल्या आयुष्यात काय॔रत राहतात*.

      मंत्रगजर 1 माळ, 16, 32 किंवा 108 माळा तुम्हांला पाहिजे तेवढया करा.  या माळा पहिल्यांदा आपल्याला तयार करतात.  त्यामुळेच आपण जगदंबा व तिच्या पुत्राला आपले मन व शरीर तयार करण्याकरिता आमंत्रित करतो.

      मंत्रगजर चार पातळयांवर काम करतो.

👉   प्रथम शरीर व मन तयार करणे.

👉   परमेश्वराकडून शक्ती व मदत ग्रहण करण्याची क्षमता वाढवितो.

👉    प्राप्त झालेली क्षमता कधी, कुठे व कशी वापरायची व त्यातून यश कसे प्राप्त करायचे हे शिकवते.

👉   चुकीच्या गोष्टी करण्यास परावृत्त करते.  आपण सिंहावलोकन केल्यावर मी हे करायला नको होते. माझ्याकडून चूक घडली. ही अपराधीपणाची भावना येते.  *नित्य म॓त्रगजर व वर्षातून एकदा एका  दिवसात 108 वेळा म्हटलेली हनुमान चलिसा माझ्या मनातील सर्व अपराध दूर करतात*. हनुमाना चलिसा माझ्यातील महाप्राण जो निष्क्रीय झाला आहे त्याला सक्रीय करते. *म्हणजेच मन, प्राण, प्रज्ञा एकात्मतेने काय॔ करु लागतात*.

      लहान मुलांना मी कमीत कमी तीन वेळा हनुमान चलिसा म्हणायला सांगतो. कारण त्यांचा लहान मेंदू विकसित होत असतो.  छोट्या मुलांना बरेच प्रश्न पडलेले असतात. त्यांची उत्तरे कोणीच देत नाही.   *ती नेहमी गोंधळलेली असली तरी नेहमी आनंदी असतात*. हिच योग्य वेळ आहे जेव्हा त्यांचे मन तयार होते.  म्हणजे छद्म आत्मा तयार होणार नाही व परमेश्वराकडून बक्षीस रुपात प्राप्त होणा-या चांगल्या गोष्टी त्याच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आणतील.  *म्हणूनच माझ्या बाळांनी हनुमान चलिसा रोज तीन वेळा म्हटलीच पाहिजे*.  तुम्ही 70 वर्षाचे असा की 80 तुम्ही माझी बाळेच आहात.

      गुरुचरणमासामध्ये 108 वेळा हनुमान चलिसा म्हणा.  जसे जमेल तसे म्हणा पण म्हणा.

      *माझ्या व माझ्या यशस्वी जीवनाच्या आड ज्या गोष्टी येतात त्या बाजूला होतील. हेच हनुमान चलिसाचे महत्त्व आहे*. 

      हनुमान चलिसात 108 मंत्र आहेत.  किती? 108. 108 मंत्र 108 वेळा म्हटले जातात.  अनेक मंत्र तुम्ही स्वत:च सहजपणे ओळखू शकता.  

नासै रोग हरे सब पीरा  ।
जपत निरंतर हनुमत बीरा ॥

होत न आज्ञा बिनु पैसारे ।

      *पैसारे म्हणजे प्रयास.  अवधी भाषेत पयसा म्हणजे प्रयास.   "असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी" हे होणे नाही.  प्रयास करा पण गधा मजूरी नको*.

       प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू वाईट वागवतात तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागत होता.  हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले, विष दिले तरी देवाने त्याला मरु दिले नाही व खांबात स्वत: प्रगटून हिरण्यकश्यपूचा वध केला. *कारण तो सतत मंत्रगजर करत होता*.

      आपल्या मनाविरुद्ध आई वडील वागले की आपण रागावतो.   *ये मेरा बाप हो नहीं सकता* म्हणतो.  तुम्ही दोघेही माणसेच आहात.  आईवडीलांनी मुलांकडून जास्त अपेक्षा करु नये. 

     *ब-याच वेळा आईवडील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांची ओझी आपल्या मुलांवर लादतात. हा छद्म आत्मा तयार करण्याचा वेगळा माग॔ आहे.  प्रत्येकासाठी हे चूकच आहे*.   

     माझ्या मुलीला व सूनेला  भयावह चित्रपट पाहताना मी समोर बसून राहिले पाहिजे. कोणता चित्रपट? सगळे जोरात म्हणाले - 1920. त्यातील मनुष्य  हनुमान चलिसा पठणामुळे वाचला.  ती मजा असेल मी मान्य करतो. चित्रपट करमणुकीकरिता असला तरी अनुभवाने एक कळते *हनुमान चलिसा म्हटल्याने आपल्याला मदत मिळतेच*.
     
      *राम नाम मदत करतेच.  त्याच्यावर व त्याच्या आईवर ठेवलेला विश्वास आपल्याला मदत करतोच.  तो कधीच आपली उपेक्षा करत नाही. तुम्ही कसेही असलात तरी.  *"मी तुझा आणि तू माझा आहेस"* एवढेच पुरेसे आहे.  सव॔ बाजूंनी तुमची कशी काळजी घ्यायची हे तो जाणतो. *पण त्याने कसे वागावे याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका*. तुमच्याकरिता जे जे उचित आहे ते ते तो करणारच.  *तो तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार पण दुकानदाराप्रमाणे नाही तर बापाप्रमाणे* हे कायम लक्षात ठेवा. 

     हनुमान चलिसाची पहिली ओळ "जय हनुमान ग्यान गुन सागर" हा सर्वात मोठा मंत्र आहे.  ज्ञान आपण समजू शकतो.  पण हल्ली कोणाला ज्ञानाची आवश्यकता नाही. गुगलमुळे सव॔ ज्ञान मिळते.  मला ज्ञानी माणसे आवडत नाहीत.  मी जगातला सर्वात मोठा अज्ञानी आहे. मी सर्वात दुल॔क्षिलेला आहे.   

      पण हा ग्यान गुन सागर आहे नुसता गुन सागर नाही. आपल्यातील चांगले गुण उचित मार्गानी आपली प्रगती घडवून आणतात.  आपण हनुमन्ताचा जयजयकार करतो कारण तो ग्यान गुन सागर आहे.   तो माझंही ज्ञान वाढविणारा आहे.   सव॔ प्रश्नांची उत्तरे या ग्यान गुन सागराकडूनच मिळणार आहेत.  हनुमन्तचा श्लोक:-

*अतुलित बलधामं*....
      (प्रत्येकाला येतोच) 

      हनुमन्तापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि त्याचा रेकाॅड॔ कोणी मोडू शकत नाही.   *सव॔ शास्त्रांमध्ये मग ते भौतिक असो की आध्यात्मिक हनुमन्त एकमेव अद्वितीय आहे*.आपल्याकरिता उचित काय हे आपल्याला कळत नाही हिच आपली फार मोठी समस्या आहे. मग श्रीगुरुचरणमासात एकदा तरी 108 वेळा हनुमान चलिसा म्हणणार ना? *हो डॅड*. पूण॔  विश्वासाने म्हटल्यावर हनुमन्त आपल्याला नापास करणार नाही.

       हनुमन्ताच्या भजनात स्वयंभगवान राम तल्लीन होतो हे लक्षात ठेवा.   आपण जेव्हा हनुमन्ताची स्तुती करतो तेव्हा नकळत रामाचीही स्तुती करतो.  तो स्वयंभगवान  भक्ताधीन आहे.  तो आपल्या भक्तांकरिताच सव॔  काय॔ करतो.   तुम्ही हनुमान चलिसा म्हणणार तेव्हा मी तुमच्या जवळच असणार.  तुम्ही जगातल्या कोणत्याही क्लुप्त्या लढविल्यात, शेंडया लावल्यात 
तरी मी जगातला सर्वात वाईट मुलगा आहे.  कठीण कवच फोडण्यास कठीण असते.  म्हणूनच तुम्ही सतक॔ रहा.  प्रेमाने व विश्वासाने हनुमान चलिसा म्हणा.

डॅडनी "जय हनुमान ग्यान गुन सागर"  हा मंत्र 5 वेळा  म्हणून घेतला.   
    
 *I LOVE YOU MY KIDS LOVE YOU A LOT"*
माझ्या बाळांनो मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.

*लव यू डॅड*

       बापूराया खूप प्रयास करुन  घेतलेस.  अनुवाद करताना काही चुकले असल्यास क्षमस्व!🙏🙏🙏

✍  from  whatsApp group

Thursday, November 9, 2023

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१४.११.२०१३- कामधेनू गोमाता गोपद्म विशेष )

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१४.११.२०१३- कामधेनू गोमाता गोपद्म विशेष )
॥ हरि ॐ ॥

ॐ मंत्राय नम: ॐ रामवरदायिनी बघताना आपल अनेक algorithem बघत चाललो आहेत. हे algorithem म्हणजे विश्वाची रचना आहे. म्हणजेच स्वत:चीच रचना आहे. म्हणून हे algorithem आमच्या नित्याच्या जीवनात व्यवस्थित बसतात, काम करत असतात. हे फक्त ऐकून सोडून चालणार नाही.

असाच एक आदिमातेचा algorithem आहे. कुठलेही शुभकार्य असताना स्वस्तिक सोबत दारात गोपद्म काढतात. चार गोपद्म काढली जातात.

आम्हाला माहीतच आहे गाय पवित्र आहे म्हणून तिची चार पावले काढली जातात. सध्या ३ दिवस तुलसी विवाहाचे दिवस आहेत. पूर्वी तुळशी वृंदावन असायचे तिथे सकाळ संध्याकाळ गोपद्म काढली जायची.
ज्यांच्या घरी गौरी येते त्यांना माहीत असेल दारात गोपद्म काढल्याशिवाय गौरीला आत आणत नाहीत का? म्हणजे  कुठेतरी देवीतत्वांशी ह्याचा संबंध आहे.
तुळशी वृंदावनासोबत अजून एका ठिकाणी गोपद्म काढली जातात? कुठे? गोपद्म काढणे अत्यावश्यक मानले जाते? प्रत्येक स्त्री ती गोष्ट दरवर्षी करतेच ती म्हणजे भाऊबीज.
भाऊबीजेच्या दिवशी जेव्हा पाटावर बसून ओवाळले जायचे तेव्हा गोपद्म काढले जायची भाऊबिजेशी गोपद्मचे नाते काय?
हा गोपद्म जेव्हा algorithem म्हणून समजून घ्यायचा तेव्हा आपल्याला काय जाणून घ्यायचे. आदिमातेची तीन स्वरूपं स्थूल (अनसूयामाता), सूक्ष्म ( माता) व तरल (गायत्रीमाता) पातळीवरची पण ह्या आधीची दत्तगुरूंची ’नि:स्पंद’ जाणीव म्हणजे अदिती.
गोपद्म म्हणजे गोमातेची चार पावले आहेत.
दिवाळीची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते. या दिवशी पूर्वी गाय व तिचा वत्स म्हणजेच वासराचे पूजन केले जायचे.
सप्तपदीच्या वेळी तुम्ही ७ पावले घेता त्या ७ पावलांबरोबर, ७ शपथा, ७ promises, ७ वचने असतात.
इथे गोमातेची ४ पावले आहेत. ह्या पावलांसोबत गोमाता काय घेते हे बघायला हवे. ही गाय आपल्या भारतीयांसाठी पवित्र आहे. म्हणजे नक्की काय? प्रत्येक गाय ही भारतीयांनी कामधेनू मानलेली आहे. कामधेनू नावाची गाय जी ऋषी वसिष्ठांकडे होती ती आधी जमदग्निकडे होती. ही कामधेनू म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाने ज्यांनी तिला माता मानले त्यांना तिने पाहिजे ते पुरवले.पण ज्यांनी मदांध बनून तिला भोग्य मानले त्या प्रत्येकाचा तिने नाश घडवून आणला. ह्या कामधेनूचा अंश प्रत्येक गोमातेत असेल असा वर गोमातेला मिळाला म्हणून आम्ही गाईला पवित्र मानतो. आजही गोमातेला जे नमस्कार करतात ते मला आवडते. कुठलेही पाप चालेल पण गोमांस खाण्याचे पाप कधीही करू नका. एकवेळ ऊपाशी रहा पण गोमांसला स्पर्शदेखील करू नका. 
 गोमाता जेव्हा जगेल तेव्हाच हिंदुस्तान जगेल. गोमांसला कधीही, चुकुनही स्पर्शही करु नका. जेव्हा नॉनव्हेज खायला बाहेर जाल तेव्हा हे कन्फर्म करा. चीझ खातानाही ते चीझ व्हेज आहे ह्याची खात्री कारा. गाय ही आपल्याला अतिशय पुजनीय आहे आणि गोमातेचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे. 
तुम्ही जेव्हा non-veg जेवायला बाहेर जाता तेव्हा एखादे पदार्थाचे नाव कळले नाही तर विनासंकोच विचारा, कुणाचे मांस आहे ते. चुकून खाल्ले तर मी त्यातून बाहेर काढू शकेन, पण मुद्दामहून कधीच गोमांस खाऊ नका. cheese खाताना पण विचारा ते veg आहे की non-veg आहे. काही ठिकाणी cheese गोमातेच्या enzymes पासून बनवले जातात. अभक्ष भक्षण केलं तर त्याचं पाप लागणारच. म्हणून शाकाहारी cheese खाण्यासाठी आग्रह करा. ह्या आधी चुकून खाल्ले गेले असेल तर ते पाप मी धुऊन टाकले. त्याची काळजी करू नका. यापुढे मात्र दक्ष रहा.
गोमांस व गोहत्येचे पाप आपल्याला लागता कामा नये. पॅकेजवर हिरवा dot असतो. तो बघून veg cheese वापरा.
समजा चुकून खाल्ले गेले तर शांतपणे सांगा अनिरुध्दा मी विसरलो. अशावेळी माझ्यासाठी सोपे आहे.
म्हणून गुरुपौर्णिमेला मी सांगतो तुमची पापं मला द्या.
आदिमातेचे नियम तिच्या बाळांसाठी आहेत. तुम्ही तिचे कैदी नाहीत. त्या नियमांचे पालन करुन घेण्याचे काम तिने तिच्या पुत्रांकडे दिलं आहे. प्रत्येक घरी शिस्त बाणणं अत्यंत आवश्यक असते.
कामधेनू ही संकल्पना वैदिक आहे. कामधेनू म्हणजे काय? तर आदिमातेची सर्व मंगल करण्याची इच्छा मनुष्याला ज्या शक्ती नाडीद्वारे प्राप्त होते. त्या शक्ती नाडीसच ऋषीमुनी कामधेनू म्हणतात.
शक्ती नाडी म्हणजे आईच्या गर्भात बाळ नाळेशी जोडलेलं असतं त्याचप्रमाणे तुम्ही सगळेजण त्या आदिमातेशी नाळेद्वारे direct जोडलेले असतात त्यालाच शक्ती नाडी असे म्हणतात तीच कामधेनू.

ही असते कुठे? जे जे म्हणून पृथ्वीच्या, वसुंधरेवर जे जे म्हणून अवकाशातून खाली येते. त्या प्रत्येक गोष्टीत ह्या शक्ती नाडीचे अस्तित्व असते.
पृथ्वीच्या ionic sphere च्या खालून जे येते ते शक्ती नाडी, पावसाचा प्रत्येक थेंब, सूर्याचा प्रत्येक किरण हे शक्ती नाडी स्वरुप आहे.

चंद्रप्रकाश हे शक्तीनाडी स्वरूप आहे. वीज हीसुध्दा शक्तीनाडी स्वरूप आहे.

sunlight (सूर्याचा प्रत्येक किरण)

moonlight (चंद्राचा प्रत्येक किरण)

rain (पावसाचा प्रत्येक थेंब)

electricity (आकाशात कडाडणारी वीज)

ह्या चार गोष्टी पृथ्वीवर आल्यानंतर येत असताना, २४ तासापर्यंत शक्तीनाडीचे काम करत असतात. २४ तासापर्यंत अहोरात्र १ दिवस - १ रात्र त्यांच्यात शक्तीनाडीचे कार्य करण्याची क्षमता असते.

ह्या २४ तासात जे पावसाचे पाणी जी झाडे खेचून घेतील ती झाडे पण शक्तीनाडीचे काम करतात.

तसेच सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश शक्तीनाडीचे काम करत असतात.

वरती चमकणारी वीज आपल्या शरीरात खेळतच असते. विद्युत शक्ती ही प्रत्येक मानवाच्या शरीरात असते. मेंदूत electrical impulse असतात. Heart-beat electricity मुळेच चालू आहेत. ही विद्युत शक्ती म्हणजेच कामधेनू आहे. शक्तीनाडी स्वरूप आहे.
गोविद्यापिठम्‌ मध्ये गाईंची सुंदर जोपासना केली जाते. तिथे गोग्रासची सुविधा आहे.
तुम्ही जेव्हा एका गाईला पवित्र मानून पूज्य मानून तिचे पूजन करता, तिला जगवता, मानता तेव्हा तुमच्या शरीरातील विद्युतशक्ती समर्थ बनते, बलवान होते. म्हणजेच तुमच्या शरीरातील इच्छा शक्ती ही कामधेनू बलवान करते. गाईच्या चार पावलापैकी कामधेनू हे तिचे स्वरूप हे तिचे पहिले पाऊल.

गाईची ४ पावले म्हणजे

१. कामधेनू स्वरूप - पहिले पाऊल

२. गायत्री मंत्र - दुसरे पाऊल

३. विश्वात्मक शक्तीनाडी - तिसरे पाऊल

४. देहस्थ शक्तीनाडी - चौथे पाऊल

गायत्री मंत्रावर मी  ३ १/२ तास बोललो होतो. गायत्री मंत्र म्हणजे काय? आपल्या धृतीला प्रज्ञेला (बुद्धीला) प्रकाशित करण्यासाठी त्या सवितृला (दत्तगुरूंना) केलेले आवाहन आहे.

आम्हाला गायत्री मंत्र म्हणावासा वाटला तर सद्‍गुरु गायत्री मंत्र म्हणावा. कुणाला गायत्री मंत्र सकाळी म्हणायचा असेल तर १२ वेळा म्हणावा. गायत्री मंत्र केवळ ब्राम्हणांनी म्हणावा हा चुकीचा समज आहे.

हे गोपद्म म्हणजे ह्या कामधेनूची ४ पावले आहेत. गोपद्ममध्ये माझ्या लहानपणी जी पध्दत पाहिली ती म्हणजे २ पावले माझी आई कढायची व २ पावले वडील काढायचे.

गोपद्मावर साधी हळद-कुंकू वाहा. ही कामधेनू आमची इच्छाशक्ती वाढवणारी आहे.
मातेची जी इच्छा आहे, जी सर्व पुरुषार्थ देणारी आहे.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंब्यके गौरी नारायणी नमोस्तुते

कामधेनू सूक्त म्हणणे कठीण आहे. कामधेनू सूक्ताचं पठण करून हवन केल्यावर जे यागाचं पुण्य मिळतं तेच पुण्य ही चार गोपद्म घराच्या उंबरठ्यावर किंवा देव्हार्‍यासमोर काढली व त्यावर हळद कुंकू वाहिलं की मिळतं.

कामधेनू - सूक्ष्म रूपात

गायत्री मंत्र - ध्वनी रूपात
 
विश्वात्मक - विद्युत रूपात

देहस्थ शक्ती - देहस्थ विद्युत

जे आदिमातेने तयार केले ते माणसाला सहज पेलता यावे यासाठी ती algorithem तयार करते.

प्रत्येक गाईत हा कामधेनूचा जर अंश असेल तर प्रत्येक गाय पूज्य असलीच पाहिजे. पूर्वी श्रावणी सोमवारी गाईला एक ताट दिले जायचे.
दुष्काळग्रस्त भागात चारा मिळत नाही, त्यामुळे गुरे कसायाच्या हातात जातात. म्हणून आपण चारा लावतो आणि अशा गुरांना देतो.

पूर्वी दारासमोर रोज सारवून गोपद्म काढली जायची. आपण रोज देवासमोर उंबरठ्याबाहेर गोपद्म काढू शकतो.

जेव्हा मंगलयान गेले तेव्हा सगळे scientist प्रथम त्याची प्रतिकृती घेऊन तिरुपतीकडे गेले. परमेश्वराच्या चरणी जायची त्यांना लाज वाटली नाही.

आम्ही उदी लावताना, नमस्कार करताना पण लाजतो.

सणासुदीच्या दिवशी तरी गोपद्म काढा. ३ तासाच्या कामधेनू सुक्ताऐवढेच पुण्य गोपद्म काढल्याने मिळते.

ज्या घरासमोर गोपद्म काढले जाते त्या घरातील प्रत्येकाला त्याचे पुण्य लाभतेच अशा घरात जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या घरी आत येतो तेव्हा त्याची वाईट करण्याची शक्ती नाहीशी होते.

म्हणून गोपद्म उंबरठ्यावर काढले जाते. ज्या घरासमोर गोपद्म असतील त्या घरातून बाहेर जाताना प्रत्येक व्यक्ती शुभ ताकद घेऊन जाणार आहे.

वसुबारसच्या दिवशी गोपद्म अवश्य काढा त्या दिवशी ” ॥ ॐ श्री सुरभ्यै नम: ॥ ” हा मंत्र म्हणा. सुरभी म्हणजे कामधेनू. हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणा. हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र मानला जातो ह्या मंत्राचा जप वसिष्ठांनी केल्यामुळे त्यांना अख्खीच्या अख्खी कामधेनू प्राप्त झाली.

ही गोपद्म अवश्य घरासमोर काढावीत हा कामधेनूचा मंत्र आपण दररोज देखील म्हणू शकतो.
जेव्हा जेव्हा पाडवा, भाऊबीजेला औक्षण कराल तेव्हा नक्की गोपद्म काढा.

॥ हरि ॐ ॥

Friday, October 27, 2023

Kojagiri Poornima

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.१०.२०१२- कोजागिरी पौर्णिमा विशेष)
॥ हरि ॐ ॥
 
आज विजयादशमी सगळ्यांना असे वाटते की आजच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करायचे एवढ्यापुरतेच दस‍र्‍याचे महत्त्व असते. 
 
दसर्‍याचे खरे महत्त्व आहे ते सीमोल्लंघनाचे. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा सोडून बाहेर जायचे. याचा अर्थ चांगल्या सीमा सोडायच्या असे नाही. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागणे चुकीचेच आहे. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे सीमा विस्तारणे. आपल्या क्षमता, capacity, potency वाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. सकाळी सरस्वतीदेवतेची व संध्याकाळी शस्त्रांची पूजा केली जाते. म्हणजेच ज्ञान व विज्ञानाची ह्या दिवशी पूजा होते. हे कशासाठी? तर स्वत:चे कौशल्य, compatibility वाढवण्यासाठी.
 
आज आपण इतकी वर्षे इथे जमतोय त्यामुळे आम्ही पूजा कशी करायची हा प्रश्न आम्हांला पडता कामा नये. मी मागे सांगितले होते, "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा." कधी आठवतेय? नाही ते पण आठवत नाही. ह्या वर्षाच्या सुरुवातीला आता वर्ष संपायला दोनच महिने उरले आहेत. मग ह्या वाक्याच्या आम्ही किती जवळ गेलो हे तुम्ही स्वत:च ठरवा.
 
ह्या विश्वासाच्या जवळपास आम्ही किती पाऊल टाकले ह्याचा विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही वर्ष संपायला २ महिने ७ दिवस बाकी आहेत.
 
हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. "विश्वास असावा म्हणजे काय?" तर हा सगळं जाणतोच. मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याला माहीतच आहे, हा विश्वास आधी मला स्वत:मध्ये निर्माण करायला हवा. ह्याच्यासमोर आम्ही नाटक करत राहतो म्हणून आम्ही फसतो. तुम्हाला नाटक करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे जेवढे तुम्ही खोटेपणाचे नाटक कराल, तेवढी माझी जबाबदारी कमी होते. तुम्ही व तुमचे कर्म इतका सोपा हिशोब इथे आहे. पण हजारो वेळा सांगूनही अजूनही आम्हांला समजत नाही.
बापूंनी तपश्चर्या केली आज उपासनेचाही शेवटचा दिवस आहे. उपनिषदही लिहून झाले. जे दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल. हे सगळं बापू का करतोय? बापूचं घर चालावं, ह्या ग्रंथाची रॉयल्टी मिळावी म्हणून नाही. तो समर्थ आहे त्याचे कार्य करायला.
 
हा (परमपूज्य बापू) कर्मस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असल्यामुळे जोपर्यंत त्याच्यापुढे माझा "मी" open करत नाही, तोपर्यंत काहीच घडू शकत नाही. म्हणून गुरुच्या समोर उभे राहून कधीही नाटक करू नका. एक गोष्ट आज सांगतो. जेव्हा अमृतमंथन झाले, तेव्हा अमृत व हलाहल विष त्यातून निर्माण झाले. ह्यातील हलाहल प्रथम बाहेर आले. मग आपण हलाहल मंथन का म्हणत नाही? विष शिवाने प्राशन केल्यावर मिळालेल्या अमृतामुळे देवगण अमर झाले. त्यांना हव्या असणा‍र्‍या सर्व गोष्टी मिळू लागल्या व मृत्यूचे भयही उरले नाही. त्यामुळे ते पूर्णपणे relax झाले. परमात्म्याचे सेवेकरी म्हणून त्यांना माज चढला. ह्या देवगणांचा माज पहिल्यांदा दिसला तो त्या शेषधारी विष्णूलाच.
 
ह्या विष्णूला भेटायला जेव्हा नारद आला, तेव्हा त्याला न बघताच महाविष्णूने कूस बदलली. देवर्षी नारद म्हणजे सगळ्या भक्तांसाठी एकमेव जवळचा आप्त, ह्याने कुठलाही यज्ञ कधी केला नाही, केवळ नामस्मरणानेच देवर्षी पदाला पोहोचलेला आहे. 
 
लक्ष्मीमाता विष्णूचे लक्ष नाही हे बघून त्यास नारद आल्याचे सांगते. तेव्हा विष्णूने एक आळस देऊन विचारले काय झाले? नारदाचे व विष्णूचे बोलणे म्हणजे जगात चालणार्‍या गोष्टींचे gossip नसून विश्वाच्या कल्याणासाठी चाललेला वार्तालाप असतो.
 
विष्णू नारदाला विचारतो, "विश्वाचा कारभार बघणार्‍या देवगणांचे कसे चालले आहे?" याबद्दल मला एका वाक्यात सांग. त्यावर नारदाने एका वाक्यात उत्तर दिले, "कोण देवगण?" इथे उत्तरातच प्रश्न येतो पण हा प्रश्न नसून खरे उत्तरच होते. कारण नारदासाठी देवगण अस्तित्वातच राहिले नव्हते.
 
जसे श्रद्धावानांच्या गोष्टी चण्डिकेपर्यंत पोहचविणारा महाविष्णू हा चण्डिकेचा कान तसेच नारद म्हणजेच नामस्मरण हा महाविष्णूचा कान म्हणून जेव्हा देवगण त्यांच्या कार्यापासून च्युत झाले तेव्हा ते देवगण राहिलेच नाहीत.
 
नारदाचा प्रश्न ऐकून लक्ष्मीमाता नारदाला सांगते, "देवगण म्हणजे जे देवाची व मानवाची सेवा करतात ते." त्यावर नारदाने उत्तर दिले, "पण मला असे कोणीच दिसले नाही." हा दिवस होता पितृपक्षाचा पहिला दिवस. नारदाचे उत्तर ऐकून लक्ष्मीमाता महाविष्णूला विचारते, "मी शोधू का कुठे आहेत ते देवगण?" महाविष्णू आळस देऊन म्हणतो, "तुला जे करायचे ते कर."
 
लक्ष्मीमाता पृथ्वीवर सगळीकडे फिरते व बघते की, कावळ्यांसाठी ठेवलेले अन्न देवगण खात आहेत. एवढी ह्यांच्यावर वाईट परिस्थिती का आली? हा प्रश्न तिला पडतो, ती परत विष्णूकडे येते, व विष्णूला ह्याचे उत्तर विचारते. विष्णू तिला म्हणतो, "बाई तूच शोध घे, मला झोपू दे."
लक्ष्मी परत पृथ्वीतलावर जाते व बघते की, सगळे भाविक लोक व्यवस्थित पूजा करत आहेत, देवाला नैवेद्य अर्पण करत आहेत. मग ते ह्या देवगणांपर्यंत का पोहचत नाही? असा प्रश्न तिला पडतो. हे देवगण जर पितरांचे खातात, म्हणजे पितर उपाशी राहतात.
ती महाविष्णूला परत येऊन विचारते, तेव्हा महाविष्णू म्हणतो, "पितरांची तू काळजी करू नको त्यांचं बघायला मी आहे."
 
लक्ष्मी नारदाकडे जाते, तेव्हा नारद म्हणतो विष्णूला जागे कर. लक्ष्मीमाता प्रेमाने विष्णूस जागे करते. विष्णू तिला म्हणतो, "काळजी करू नकोस. लौकिक जगातील अन्न पितरं कसे खाणार? त्यांना चतुर्मितीतून त्रिमितीत येण्याची तू permission देतेस का? नाही नां. काळजी करू नकोस पितरांना अन्न अर्पण करणे लोकांची भावना आहे.
 
लक्ष्मीमाता म्हणते, उद्यापासून मी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पृथ्वीवर संचार करण्यासाठी जाते. विष्णू म्हणतो, "उद्यापासून नवरात्र सुरू होते आहे."
 
लक्ष्मीमाता बघते पृथ्वीवर सगळे भक्तिभावाने नवरात्र साजरी करत आहेत. मग ती देवगणांकडे येते. पण तिथे सगळे आपल्याच विश्वात मग्न असतात. कुणीही नवरात्र साजरी करताना दिसत नाही. लक्ष्मीमाता रूप बदलून त्या देवगणांना विचारते, "तुमचे असे वागणे विष्णूला कळले तर?" देवगण त्यावर तिला उत्तर देतात, "विष्णूला त्या नारदाने सांगितले तरच कळते, नाही तर काही कळत नाही." तेव्हा लक्ष्मीला जाणवते की, ह्या देवगणांची कृतज्ञता, श्रद्धा, विश्वास नाहीसे झाले आहे. ह्यांना अमृतामुळे सर्व मिळाले आहे. ह्यांना मागण्यासाठी काहीही उरले नाही, त्यामुळे कुठलीही गरजही उरली नाही.
 
लक्ष्मीचे मन कळवळते, तिला वाटते, देवगण चांगले आहेत, त्यांनी सुधारावे. ती विष्णूकडे परत जाते व त्याच्याकडे वर मागते, "मी आज पृथ्वीवर संचार करायला जाईन व जो कोणी रात्री जागा असेल, देवाची वाट बघत, देवावर विश्वास ठेवून तर त्याला आशीर्वाद देईन व असे प्रत्येक महिन्यात करण्यासाठी तू परवानगी दे." विष्णू म्हणतो, "दर महिन्याला मी परवानगी देऊ शकत नाही. वर्षातून एकदाच तू हे करू शकतेस. उद्या पौर्णिमा आहे." लक्ष्मीमाता म्हणते, "उद्या जी कोणी "कोऽजागरति"  म्हणत देवाची भक्ती करत जागा असेल त्याची त्याने कधीतरी मागे केलेली भक्ती मी जागृत करेन."
कोजागिरी पौर्णिमा आता पुढच्याच आठवड्यात आहे. गुरुक्षेत्रम्‌मध्ये अनेकजण जागरणाला येतात, रात्रपठणासाठी. पण मी खाली जातो तेव्हा अर्धे अधिक झोपलेले असतात. जागरण जरी गुरुक्षेत्रम्‌मध्ये नाही जमले तरी घरी करा, चालेल पण नीट जागे राहून करा. रात्र पठणानंतर सकाळी ६ वाजले की जायची घाई असते. कधी एकदा ६ वाजतात एवढे सगळ्यांचे घड्याळाकडे लक्ष असते, खाली सगळे झोपलेले असतात, मी वरती जागा असतो. सकाळी ६.०५ ला खाली आलो तर कुणीच दिसत नाही, तिथे सगळे सपाट असते.
 
एक दिवस रात्री झोप नाही झाली तर आमच्यासाठी तो प्रलय असतो. जगबुडी झाल्यासारखी आमची अवस्था होते. दुसर्‍या दिवशी पित्त काय उठते, हात-पाय काय गळतात सगळ खोटं आहे हे.
 
मेडिकल field मधले इथे बरेच आहेत. आम्ही M.D. करताना ३-३ रात्री जागे राहून काढायचो. Doctor ने night duty च्यावेळी alert रहावे अशी अपेक्षा असते मग तुम्ही का एक रात्र जागे राहू शकत नाहीत?
 
आम्ही देवाचे करतो म्हणजे स्वत:चे करतो. तुम्हाला काय वाटते, तुम्ही दिवा नाही लावला तर त्याच्याकडे अंधार असणार का? नाहीच.
 
जेव्हा देवगणांनी त्यांची मर्यादा सोडली तेव्हा त्यांची कशी परिस्थिती झाली हे विसरू नका. मनुष्याचे असेच होत असते. संकट येताना मनुष्याला दिसेलच असे नाही. त्सुनामी येते तेव्हा तुम्ही बघितले असेल दुसर्‍या व चौथ्या मजल्यावरचा मरतो पण तिसर्‍या मजल्यावरचा मात्र जिवंत राहतो. हे कसे घडते, हे समजण्याची तुमची capacity नाही हे लक्षात ठेवा.
 
तुम्हांला काय वाटते तुम्ही प्रसाद देता म्हणून देव तुमच्यासाठी करतो. तो काय तुमचा केटरर आहे. विश्व उत्पन्न करताना त्याच्या इच्छेने झाले तेव्हा त्याला आमच्या पूजेची मदतीची गरज लागली नाही. हे नेहमी ध्यानात ठेवा.
हे जे उपनिषद माझ्या आईने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते खरचं सांगतो, अधाश्यासारखे वाचा. तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हांला बाहेर काढून ते तुम्हांला चांगल्याच मार्गावर घेऊन जाणार.
 
ज्याचा ह्या वर्षी "कर्ता हर्ता गुरू ऐसा" हा संकल्प सिद्ध होईल, तोच पुढच्या काळात तरणार. मी जे काही करतो, ते देवाला कळत नाही, त्यामुळे तो action घेत नाही  हा विश्वास खोटा आहे, हा टाकून द्या. प्रत्येक गोष्ट ह्या चण्डिकाकुलाला नीट कळत असते, जो कुणी त्याच्याशी खोटं बोलतो तो मग नियमांच्या प्रांतात जातो.
पण जेव्हा त्याच्यावर पूर्णपणे श्रद्धा असते, तेव्हा जरी तुमच्याकडे काही कमी पडत असले तरी ते कुठल्या ना कुठल्या चांगल्या मार्गाने तुम्हांला मिळत राहते.
 
पोलिओचे थेंब नाही घेतले तर पोलिओ होईल हे सांगणे म्हणजे doctor ची तुम्हाला धमकी नसून तुमच्याविषयी कळकळ असते.
मी पण डॉक्टरच आहे. आजचे हे सांगणे म्हणजे बापूची धमकी समजू नका. माझी तपश्चर्या, उपासना, तुमच्यासाठी तळमळ हे तुमच्यासाठी vaccine आहे पण हे vaccine टोचताना जर तुम्ही जत्रेत नाचायला गेलात तर कसे होईल?
 
साईसच्चरित प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितले, जसे प्रवाहात अनेक लाकडे एकत्र येतात व पुढे परत वेगळी होतात. तसेच जीवनात असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे अनेक दूरची नाती पण जवळची वाटायची आता मात्र जवळची नाती पण दूरची वाटतात. नातेवाईक बदलत जातात पण नाती तीच राहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक वेगवेगळी माणसे भेटतात पण ह्या प्रवासाला आधार देणारा एकच सद्‌गुरु असतो.
 
जो ह्याला विन्मुख होतो, त्याला सुख मिळू शकत नाही, त्याचं जीवन कृतार्थ होत नाही. आज आपल्या न नशिबाने मातृवात्सल्यविन्दाम्‌, गुरुक्षेत्रम्‌, रामरसायन आहे. आपण खूप श्रीमंत आहोत. आपल्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही. तुम्ही मला गुरू मानू नका मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही कुणालाही गुरू माना, पण पूर्ण विश्वास ठेवा कारण येणारा काळ अतिशय बिकट आहे. आज तरुण वयाच्या मंडळी कामाच्या stress ने दबलेली असतात. Divorce चे प्रमाण तर अगदी चण्या-फुटाण्यासारखे झाले आहे. Divorce फक्त नवरा बायको मध्ये होत नाही, तर मैत्रीत होतो, भावंडांमध्ये होतो. संसार प्रेमाने टिकवायचा असतो. प्रेमाची माणसे मिळत नाहीत. वाईट माणसांना कधीही सुख लाभत नाही हे लक्षात ठेवा जे सद्‍गुरुचरणी निष्ठावान आहेत, चण्डिकाकुलाशी प्रामाणिक आहेत तेच प्रेमाने, सुखाने राहू शकतात.
मी माझ्या अनंत काळाच्या अनुभवाने हे तुम्हांला सांगत आहे. संकट कुणाला येत नाहीत. राम-कृष्णालाही संकटे आलीच ना. प्रत्येक संकटातून तरण्याचा मार्ग असतो तशी संधीही तोच देतो. एक दिवस असं समजा तुम्ही कृष्ण आहात. खरचं सांगतो तुम्हांला पाप लागणार नाही.  तुम्हाला स्वत:च्या आप्तांसोबत हिरे-माणकांनी बनविलेली द्वारका बुडवावी लागली तर विचार करा,  किती दु:ख झाले असेल कृष्णाला.
 
आयुष्यात सगळं करा, पण ते चण्डिकाकुल व त्याचे द्वार असणार सद्‍गुरु ह्यांच्यापासून कधी दूर जाऊ नका. अमृतमंथन खरं तर हलाहल मंथन आहे. समजा तुम्ही लग्नाला उभे राहिलात आणि समोरची स्त्री किंवा पुरुष अतिशय श्रीमंत आहे पण त्याच्या मागे जहरीला साप आहे तर तुम्ही पुढे जाणार का? नाही. हे जहरीले विष म्हणजेच चुकीच्या गोष्टींची मदत घेणे. हे निस्तरण्यासाठी ते विष शिवालाच येऊन प्यावे लागते.
 
माझे ह्याआधी अनेक जन्म झाले असतील, पण ह्या जन्मात मला संधी मिळाली आहे ही संधी परत येणे नाही. ह्यापुढे अडीच हजार वर्षांनंतर चार प्रलय झाल्यावर परत नवे युग आल्यावर ही संधी येईल. हा जन्म देवासाठी राखून ठेवा आमची first priority ह्या जन्मात चण्डिकाकुलच असू दे. आज उपासनेचा शेवटचा दिवस असूनही केवळ तुम्हांला हे सर्व सांगण्यासाठी माझ्या आईची permission घेऊन मी इथे आलो आहे. आपण physics शिकलो आहोत. आपण बघतो quanta सतत बदलत असतो. मानवामध्ये तीच अवस्था असते सतत बदल घडत असतो.
 
ज्याचा quanta बदलत नाही असा तोच एकमेव आहे. तो कधीही बदलत नाही, त्याचा शद्बही कधी बदलत नाही. ज्याक्षणी त्याच्या शद्बाचा आदर राखला गेला नाही, की तो त्याचा शद्ब पाळायला बंधनकारक राहत नाही. तो प्रेमळ आहे त्याची आई साक्षात क्षमा आहे. अनंत क्षमा हेच तिचे स्वरुप आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे क्षमा आहे. पण मला तुम्ही क्षमा करण्याची संधी द्या. आपला बाप तो आपला बाप, दुसर्‍या कोणाला दया येणं शक्य नाही, हे साईनाथांनी सांगितल आहे, मी नाही. मी एकदाही साईंना बघितले नाही.
"तो" रुप घेऊन येवो की न येवो त्याच्या वरचा विश्वास दृढ ठेवा. तिच्या इच्छेने (आई चण्डिकेच्या) घडते ते स्वरुप तो स्विकारतो पण तो कधीही बदलत नाही. म्हणूनच आमच्या शरिरातील सतत बदलणार्‍या quanta ला आधार फक्त त्याचाच असू शकतो. ३१ डिसेंबर पर्यंतच ही संधी आहे मग तुम्ही म्हणाल नंतर जन्म घेणार्‍या बाकीच्यांचे काय? तर ज्यांना "त्याची" जाणिव आहे व जे मनापासून गुरूमंत्र स्वीकारतील त्यांच्या प्रत्येक जन्मात मी कायम पाठीशी उभा राहीन. त्यांना मृत्यु कधीच नसेल. जेव्हा सत्ययुग सुरु होते तेव्हा जन्माला घालतानाच मानवाला गुरुमंत्र कानात सांगितला जातो. त्रेतायुगात जन्माला आल्यावर गुरुमंत्र ऐकवला जातो. द्वापारयुगात वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला जातो. तर कलियुगात तो अर्जन करावा लागतो. तो आज आपण मिळवला आहे. गुरुमंत्र माझ्याकडे आहे म्हणजे सगळे आहे.
 
आज बलचे text book प्रकाशित होते आहे. गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणजेच मोठी बलविद्या. गुरुक्षेत्रम्‌ मंत्राची जी बलविद्या आहे, ती ज्याला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यालाही शक्य आहे.
 
ह्या माझ्या आईच्या हातातील १८ शस्त्रे जो कुणी खरा श्रद्धावान आहे व ज्याला ९ निष्ठा मान्य आहेत. त्याला कायम सहाय्यकारी होतील हा वर मी माझ्या आईकडून मिळवला आहे व हा वर तुम्हांला देण्यासाठी आज मी इथे आलो आहे.
 
खरचं तुम्ही भाग्यवान आहात. मातृवात्सल्यविन्दानम्‌ घेऊन पुढे चला पण आजपासून निश्चय करा -
 
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"
 
आज प्रेमाने आपण जयंती मंगला काली हा गजर करायचा आहे व आज रात्री प्रत्येकाने म्हणा -
 
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"  व प्रेमाने आपल्या गुरुला  म्हणा - "I LOVE YOU"
 
॥ हरि ॐ ॥
जय जगदंब जय दुर्गे
जय श्रीराम
अंबज्ञ
नाथसंविध्
#K10
🙏🏼❤️❤️🙏🏼

Tuesday, October 24, 2023

अहिल्या माता शीळा होण्यामागची कथा. -2

*प्रसंग चौथा*
वर्ष ३७ वे. याज्ञवल्क्य ऋषी निघालेत लेकीला भेटायला. रस्त्यात त्यांना त्रिविक्रम आणि माता जगदंबा एका मायलेकरांच्या नाट्य प्रसंगातून साक्षात्कार, संकेत देतात. 
त्यांना कळते आता अहल्येचा पुत्र शतानंदाना अहल्येच्या भेटीला घेऊन जाण्याची वेळ आली. 
ते शतानंदानकडे जातात. 
त्यांना सांगतात,,, स्वयंभगवानाने मला तुला मातेच्या भेटीला नेण्याचा संकेत दिला.
झाले....... 
दोघेही तिकडे जातात. अहल्या रूपी शीळेतुन अव्याहत महामंत्र गजर ऐकू येत होतात. 
आजुबाजुचा परीसरही मंत्रवत झाला होता. आणि आता अचानक चतुर्भुज स्वयंभगवानाचे दर्शन त्यांना झाले. 

पहिले आनंद झाला. कारण खूप खूप प्रेम होते शतानंदाचे स्वयंभगवानावर. 
पण दुसऱ्याच क्षणाला शतानंद त्रिविक्रमावर रागावून बोलु लागले. 
ते म्हणाले, मला खुप राग येतोय देवा तुझा. 
तु का ताटातुट केली मायलेकरांची.... 
माझे वडील गौतम ऋषी चुकले पण तु हे सगळे होण्यापासून थांबवू शकत होता. 

असे रागावून, चीडून बोलून झाल्यानंतर सगळे शांत होते. 
आणि एकदाचे सगळे मनातले बोलून झाल्यावर शतानंद ही शांत झाले. 
शेवटी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर, जवळच्या वरच आपण चीडतो हक्क दाखवतो तसेच झाले. 

पण लगेच आता देवावर रागावलो ह्याचे त्यांना खुप दुख: झाले. 
ते म्हणतात मी चुकलो देवा.... 
आता माझ्या ह्या चुकीची तु शिक्षा दे..... मला माफ नकोस करू........ 

*प्रसंग  पाचवा*
स्वयंभगवान म्हणतात,  
तु मला जे बोललास तो राग नव्हता..... तो तुझा शोक, दुख:
होते.... .. जे तु आईच्या प्रेमापोटी व्यक्त केले. 
पण तुला शिक्षा होणारच. 
आणि त्रिविक्रम शतानंदाना आई सारखाच शीळा होशील म्हणून शिक्षा दिली. 
माफी मागण्यासाठी त्यांनी स्वयंभगवानांच्या पायावर लोटांगण घातले होते. त्याच अवस्थेत ते शीळा झाले. 
मात्र त्यांना  ऐकु येत होते. 
दिसत होते. समजत होते. 
त्यांना लक्षात येतंय की अरे.... 
आपले डोके तर आपल्या आईच्या अहल्येच्या मांडीवर आहे. 
आई डोक्यावरून प्रेमाने हात फीरवतीये.... 
तीच्या मऊ हाताचा स्पर्श त्यांना जाणवू लागला. 
आणि *तिच्यातला (अहिल्यामातेतला) मंत्रगजर त्यांच्या बुध्दिमत्ता, मनात, देहात पसरू लागला.* समुद्राच्या लाटा जश्या, ज्या वेगाने येतात त्या प्रमाणे त्या मंत्रगजर लहरी त्यांच्यात प्रवाहित होत होत्या. 

जसे एखाद्या पेशंटला सलायन, औषधे दिल्यावर,,,, 
जसजसे ते औषध शरीरात भीणते तसतसे त्या पेशंट मध्ये लगेच सुधारणा दिसते. 

किंवा तहानलेल्या व्यक्तीला पाणी, 
भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळाल्यावर शरीराला तरतरी येते त्याप्रमाणेच ह्या मंत्रगजरामुळे श्रध्दावानाच्या मनाला, बुध्दी ला, देहाला ऊर्जा मिळते. 

ह्यावरून आपल्याला हे लक्षात येते की आपणही जेवढा जसा जमेल तसा,,,,तेवढा मंत्रगजर करत राहिलो तर *आपणही आपल्या मुलांना आशिर्वाद स्वरूप मंत्रगजराचे कवच त्यांच्या पर्यंत पोहोचवु शकतो ना... शेवटी हा वात्सल्य भाव आहे.*
आपल्यात अहल्येइतकी तप साधना नसली तरी आपण भक्ती वाढवली तर हे होऊ शकेल असे मला वाटते,, हो ना बापु..... 

आणि एकीकडे हा मंत्रगजर आणि दुसरीकडे तीने गायलेली अंगाई ऐकु येऊ लागली. 

आता अहल्या माता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देते. 

बाळा, मी शीळा झाले त्यात माझीच चुक होती. 
मी महामती होते. 
मी अतिशय ज्ञानी होते. 
(लावण्य, सौंदर्यवती तर होतीच माता) 
आणि ह्या सगळ्या प्रवासात माझी भक्ती कमी पडली. 
माझ्या ज्ञानाचा मला अहंकार झाला. 
आणि *जेव्हा भक्ती कमी पडुन अहंकार वाढतो तेव्हा बुध्दी ही पाशाणच झालेली असते.*

आणि कदाचित म्हणूनच माझ्याकडून भक्ती करून घेण्यासाठीच मला हा तपस्येसाठी चा वेळ स्वयंभगवानाने मला दिला,,,, आणि मी शीळा झाले. 

इथे जरी लौकिक दृष्टी जरी आपल्याला ही शिक्षा वाटली तरी, 
अहल्येमातेसाठी तीच्या भक्तीवृध्दिसाठी हे एकप्रकारे वरदानच होते. 
आणि नंतर परत अहल्या माता अचेतन होते आणि शतानंद सचेतन. 
पण आता स्वयंभगवान अंतर्धान पावतात. 
*याज्ञवल्क्य ऋषी, शतानंदाना म्हणतात, बघ किती वात्सल्य आहे स्वयंभगवानामधे....त्यांनी तुझी आणि तुझ्या मातेची भेट घडवून आणली.*
तुझे कुतर्क दुर केले. आणि ह्या अनुशंगाने अहल्या मातेला ही पुत्र भेटीचा आनंद दिला. 

हे सगळे इतके सुंदर आहे की आपल्याही मनाचे रूपांतर बापुंनी  चीत्तात करायला सुरुवात केली. मन तृप्त होते. 
*बापु आम्ही खरंच बापुज्ञ,अंबज्ञ आहोत.*

🙏🏻जय जगदंब जय दुर्गे🙌🏻

WhatsApp message
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

हरि ॐश्रीरामअंबज्ञ
नाथसंविध्

( वर उल्लेखित केलेला प्रसंग दैनिक प्रत्यक्ष मधील तुलसी पत्राच्या संदर्भात आहे. दैनिक प्रत्यक्ष : तुमच्या उपासना केंद्रावर विकत घेण्यासाठी संपर्क करा)

Monday, October 23, 2023

अहिल्या माता शीळा होण्यामागची कथा.

*दैनिक प्रत्यक्ष अग्रलेख*
कथामंजिरी २- ३१ व २-३२
अहिल्या माता शीळा होण्यामागची  कथा. 

कथामंजिरीचे वाचन, अभ्यास म्हणजे खरंच आता असं वाटतं = बापु आपल्याला ब्रम्हांड भ्रमण करवून आणतात आणि ज्ञानामृताचे शुध्द प्रेम प्रत्येक थेंबातुन पाजत असतात. 

एक विलक्षण अनुभव आहे, कथामंजिरी समजून घेण्यातला. 

*बापु आम्ही खरंच खुप खुप बापुज्ञ आहोत, तुमच्या ह्या प्रेमासागरासाठी .*

२-३१ व २-३२ ह्या कथामंजिरीतला आपल्याला बोध करणारा भाग. 

आत्तापर्यंत आपण गौतम ऋषी, अहल्यामाता ह्यांच्या विषयीच्या आख्यायिका ऐकलेल्या आहेत. 
पण ह्यात *सदगुरु बापुंनी प्रत्येकाच्या अंतर्मनाचा विचार करून सखोल माहिती आपल्याला दिली आहे.*

इंन्द्राच्या अहिल्येबाबतीतला मोह, त्याच्या शक्ती सामर्थ्यामुळे त्याची कपट नीती यशस्वी होते. 

खरंतर बापु अग्रलेखात स्पष्ट म्हणतात, *अहल्या महामती आहे*. महामती म्हणजे मनाची शक्ती पूर्णपणे शुध्द झालेली आहे आणि त्यामुळे कुणाचेही अंतरंग ओळखण्याची क्षमता जिच्याकडे आहे अशी.-  मग इंन्र्दाला का नाही ओळखले अहल्या मातेने...... 

खरंतर हे सगळे आपल्याला समजवण्यासाठीच. इंन्र्दाचे सामर्थ्य वरचढ ठरले आणि अहल्या माता  त्याला ओळखु शकली नाही. 

*प्रसंग पहिला*
गौतम ऋषी हे तत्वनीष्ठ, न्यायप्रिय, नियमाने चालणारे आहेत. ब्रम्हर्षी आहेत. 

त्यांचा नातु वत्सलनीधी (शतानंदाचे पुत्र) अवघे १२ वर्षापासून त्यांच्या गुरुकुलात शिकायला होते. पण त्यांनी तेव्हाही अहल्यामातेला सांगितले होते, की आपण कुठेही वत्सलनीधींशी नातु म्हणून वागायचे नाही तर बाकीच्या शिष्या सोबत जसे वागतो तसेच एक शिष्य म्हणून वागायचे. 

एक दिवस वत्सलनीधींना पडल्यामुळे लागते, रक्तस्राव होत असतो..... 
अहल्यामाता, आज्जी लगेच वात्सल्य भावाने मंत्रोच्चार करून वेदना, रक्तस्राव थांबवते. अर्थातच गौतम ऋषींना हे आवडत नाही. 

ते म्हणतात, असे आपण वागलो तर आपला नातू ही असेच भेदभाव करायचे शिकेल. 

तेवढ्यात स्वयंभगवान येतात आणि त्यांना *# नियम हे भक्ती, प्रेम वाढवण्यासाठी असतात*,*# भक्ती प्रेम ,,,,,,नियमांमुळे कमी होता कामा नये*#......हे समजाऊन सांगतात. 

मंत्रगजर,,,, रामा रामा.... आत्मारामा त्रिविक्रमा, सदगुरू समर्था, सदगुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा
ह्याचा फायदा असाही आहे बरं.......... 
एकमेकांपर्यंत एकमेकांच्या भावना पोहोचवणे....... 
सेतुचे कामही हा मंत्र करतो. 

इथे नातवात आणि आज्जी आजोबांमधे त्रिविक्रमाने मध्यस्थी केली...... सेतुचे काम केले.... 

इथेच बापु आपल्याला सांगताएत की गौतम ऋषी कसे तत्वनीष्ठ आहेत ते. 

*प्रसंग दुसरा*
अहल्येकडून नकळत अपराध घडलाय. पण तरीही गौतम ऋषींना माहिती आहे की अहल्या पवित्र आहे, प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे, तीचे त्यांच्यावर खुप प्रेमही आहे. पण तरीही ते तुला शीळा होशील म्हणून शाप देतात. 

आपल्या ऐकीव आख्यायिकेनुसार आपल्याला वाटते गौतम ऋषी तापट, क्रोधी आहेत- म्हणून शाप दिला. 
पण तसे नाही. शाप देतांना.... नव्हे शिक्षा देतांना त्यांनाही त्रास झाला. खुप जड अंत करणाने त्यांनी ही शिक्षा दिली. 
कारण त्यांच्या तत्वानुसार  अहल्या माता आता ब्रम्हर्षी, महामती पदापर्यंत पोहोचली होती. ह्या ब्रम्हर्षी पदाची विशेष जबाबदारी, कर्तव्य असतात. 
सगळे बाकी  भक्त, श्रध्दावान ह्या श्रध्दा स्थानाकडे आदराने, आस्थेने बघतात. 
मग अशा आदरस्थानी असणाऱ्या व्यक्तीला चुकूनही चुका करण्याची परवानगी नाही. 
*कारण त्यांचेच अनुकरण सगळे करतात.* 

म्हणून ह्या चुकीला माफी देऊन चालणार नव्हते. नाही तर इतरही अशा चुका करायला धजावतील.. 

ह्या कारणास्तव अहल्येला शीळारूप स्वीकारावे लागले. 
*ह्यात फक्त तीचे चीत्त जागृत होते*. बाकी सगळे कर्मेन्द्रीय, ज्ञानेन्द्रिय निष्क्रिय झाले होते. 


*प्रसंग तीसरा*
 याज्ञवल्क्य ऋषी अहल्येमातेला मानसकन्या मानायचे. दरवर्षी एकदिवस ते आपल्या कन्येसाठी तिकडे यायचे. दिवसभर शीळेसमोर म्हणजे अहल्येसमोर बसून महामंत्र गजर, त्रिविक्रमाचे गुणसंकीर्तन, महिमा गायचे. तीच्या मस्तकावर हात ठेवून आशिर्वाद द्यायचे. 
भलेही अहल्येला, ऐकु येत नव्हते, दिसत नव्हते, स्पर्श जाणवत नव्हता. पण  तरीही *महामंत्रगजर*

*रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सदगुरू समर्था| सदगुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा ||*

*हा त्रिविक्रमाचा मंत्र गजर, इतका प्रभावी आहे की, त्यात इतके सामर्थ्य आहे की सगळ्या अडथळ्यांना दूर करून याज्ञवल्क्य ऋषींकडून अहल्येच्या चीत्तात तो प्रवाहित होत होता.....*

३६ वर्षे सरली. आता माता अहल्या तर ह्या मंत्रगजरात  अखंड न्हाऊन निघाली होती. बाकीच्या परिसरातल्या शीळांमधुनही आता मंत्रगजराचा ध्वनी येऊ लागला. 

*आपणही जेव्हा हा मंत्रगजर करतो तेव्हा आपल्या आसपासचा परिसरही असाच मंतरलेला होऊन जातो.....*
मग कधी कधी  जे भक्तीत जास्त वेळ घालवत नाहीत असे आपल्या घरातल्या इतर सदस्यही ह्यात सुरक्षीत होतात. 

*प्रसंग चौथा*
वर्ष ३७ वे. याज्ञवल्क्य ऋषी निघालेत लेकीला भेटायला. रस्त्यात त्यांना त्रिविक्रम आणि माता जगदंबा एका मायलेकरांच्या नाट्य प्रसंगातून साक्षात्कार, संकेत देतात. 
त्यांना कळते आता अहल्येचा पुत्र शतानंदाना अहल्येच्या भेटीला घेऊन जाण्याची वेळ आली. 
ते शतानंदानकडे जातात. 
त्यांना सांगतात,,, स्वयंभगवानाने मला तुला मातेच्या भेटीला नेण्याचा संकेत दिला.
झाले....... 
दोघेही तिकडे जातात. अहल्या रूपी शीळेतुन अव्याहत महामंत्र गजर ऐकू येत होतात. 
आजुबाजुचा परीसरही मंत्रवत झाला होता. आणि आता अचानक चतुर्भुज स्वयंभगवानाचे दर्शन त्यांना झाले. 

पहिले आनंद झाला. कारण खूप खूप प्रेम होते शतानंदाचे स्वयंभगवानावर. 
पण दुसऱ्याच क्षणाला शतानंद त्रिविक्रमावर रागावून बोलु लागले. 
ते म्हणाले, मला खुप राग येतोय देवा तुझा. 
तु का ताटातुट केली मायलेकरांची.... 
माझे वडील गौतम ऋषी चुकले पण तु हे सगळे होण्यापासून थांबवू शकत होता. 

असे रागावून, चीडून बोलून झाल्यानंतर सगळे शांत होते. 
आणि एकदाचे सगळे मनातले बोलून झाल्यावर शतानंद ही शांत झाले. 
शेवटी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर, जवळच्या वरच आपण चीडतो हक्क दाखवतो तसेच झाले. 

पण लगेच आता देवावर रागावलो ह्याचे त्यांना खुप दुख: झाले. 
ते म्हणतात मी चुकलो देवा.... 
आता माझ्या ह्या चुकीची तु शिक्षा दे..... मला माफ नकोस करू........ 

*प्रसंग  पाचवा*
स्वयंभगवान म्हणतात,  
तु मला जे बोललास तो राग नव्हता..... तो तुझा शोक, दुख:
होते.... .. जे तु आईच्या प्रेमापोटी व्यक्त केले. 
पण तुला शिक्षा होणारच. 
आणि त्रिविक्रम शतानंदाना आई सारखाच शीळा होशील म्हणून शिक्षा दिली. 
माफी मागण्यासाठी त्यांनी स्वयंभगवानांच्या पायावर लोटांगण घातले होते. त्याच अवस्थेत ते शीळा झाले. 
मात्र त्यांना  ऐकु येत होते. 
दिसत होते. समजत होते. 
त्यांना लक्षात येतंय की अरे.... 
आपले डोके तर आपल्या आईच्या अहल्येच्या मांडीवर आहे. 
आई डोक्यावरून प्रेमाने हात फीरवतीये.... 
तीच्या मऊ हाताचा स्पर्श त्यांना जाणवू लागला. 
आणि *तिच्यातला (अहिल्यामातेतला) मंत्रगजर त्यांच्या बुध्दिमत्ता, मनात, देहात पसरू लागला.* समुद्राच्या लाटा जश्या, ज्या वेगाने येतात त्या प्रमाणे त्या मंत्रगजर लहरी त्यांच्यात प्रवाहित होत होत्या. 

जसे एखाद्या पेशंटला सलायन, औषधे दिल्यावर,,,, 
जसजसे ते औषध शरीरात भीणते तसतसे त्या पेशंट मध्ये लगेच सुधारणा दिसते. 

किंवा तहानलेल्या व्यक्तीला पाणी, 
भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळाल्यावर शरीराला तरतरी येते त्याप्रमाणेच ह्या मंत्रगजरामुळे श्रध्दावानाच्या मनाला, बुध्दी ला, देहाला ऊर्जा मिळते. 

ह्यावरून आपल्याला हे लक्षात येते की आपणही जेवढा जसा जमेल तसा,,,,तेवढा मंत्रगजर करत राहिलो तर *आपणही आपल्या मुलांना आशिर्वाद स्वरूप मंत्रगजराचे कवच त्यांच्या पर्यंत पोहोचवु शकतो ना... शेवटी हा वात्सल्य भाव आहे.*
आपल्यात अहल्येइतकी तप साधना नसली तरी आपण भक्ती वाढवली तर हे होऊ शकेल असे मला वाटते,, हो ना बापु..... 

आणि एकीकडे हा मंत्रगजर आणि दुसरीकडे तीने गायलेली अंगाई ऐकु येऊ लागली. 

आता अहल्या माता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देते. 

बाळा, मी शीळा झाले त्यात माझीच चुक होती. 
मी महामती होते. 
मी अतिशय ज्ञानी होते. 
(लावण्य, सौंदर्यवती तर होतीच माता) 
आणि ह्या सगळ्या प्रवासात माझी भक्ती कमी पडली. 
माझ्या ज्ञानाचा मला अहंकार झाला. 
आणि *जेव्हा भक्ती कमी पडुन अहंकार वाढतो तेव्हा बुध्दी ही पाशाणच झालेली असते.*

आणि कदाचित म्हणूनच माझ्याकडून भक्ती करून घेण्यासाठीच मला हा तपस्येसाठी चा वेळ स्वयंभगवानाने मला दिला,,,, आणि मी शीळा झाले. 

इथे जरी लौकिक दृष्टी जरी आपल्याला ही शिक्षा वाटली तरी, 
अहल्येमातेसाठी तीच्या भक्तीवृध्दिसाठी हे एकप्रकारे वरदानच होते. 
आणि नंतर परत अहल्या माता अचेतन होते आणि शतानंद सचेतन. 
पण आता स्वयंभगवान अंतर्धान पावतात. 
*याज्ञवल्क्य ऋषी, शतानंदाना म्हणतात, बघ किती वात्सल्य आहे स्वयंभगवानामधे....त्यांनी तुझी आणि तुझ्या मातेची भेट घडवून आणली.*
तुझे कुतर्क दुर केले. आणि ह्या अनुशंगाने अहल्या मातेला ही पुत्र भेटीचा आनंद दिला. 

हे सगळे इतके सुंदर आहे की आपल्याही मनाचे रूपांतर बापुंनी  चीत्तात करायला सुरुवात केली. मन तृप्त होते. 
*बापु आम्ही खरंच बापुज्ञ,अंबज्ञ आहोत.*

🙏🏻जय जगदंब जय दुर्गे🙌🏻

From whatsApp group. 
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

||हरि ॐ||श्रीराम||अंबज्ञ||
नाथसंविध्

Saturday, September 16, 2023

Bapu pravachan 14 Sept 2000

*सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन : मी चा पाढा*
गुरुवार,14 सप्टेंबर 2000

*हरी ओम*
सुटीचा दिवस रविवार. पुन्हा पुढचा रविवार येइपर्यंत एक आठवडा, आठवड्याचे महिने, महिन्यांची वर्षे, वर्षांची दशके आणि अशा अनेक दशकांचं आयुष्य. अस हे कालचक्र सुरूच राहते. एक म्हण आहे, तेरड्याचे रंग तीन दिवस. मी साईचरित्र सप्ताह करायचं ठरवतो. पहिले 1/2 दिवस करतो. मग परत 2/3 दिवस कुठे तरी गुंतून राहतो, मग कुणी पाहुणेच येतात. असं झाल्यावर मग लक्षात येतं की, उद्या सातव्या दिवशी 53 वा अध्याय पूर्ण करायचा. म्हणून मी साईचरित्रचे राहिलेले अध्याय घाईत वाचून काढतो, वाचायचे म्हणून वाचतो आणि मग म्हणतो," मी साईचरित्र पारायण सप्ताह पूर्ण केला"  त्याला या कशाचीही आवश्यकता नाही. मला साईचरित्र वाचायचं ते माझ्या स्वतःसाठी.त्याला कसलंच बंधन नाही. त्याला काळाचंही बंधन नाही. पण या नरदेहाला कालबंधन आहे. मला एक वेळ माझा शब्द परत घेता येईल पण मी माझा गेलेला काळ कधीच परत आणू शकत नाही.
       अश्या या काळाची 4 युगात स्थापना झाली. आज आपण कलियुगात राहतो. मग मला  या कलियुगातुन सत्ययुगात जायचे आहे, जे काही करायचं ते फक्त त्याच्यासाठी,त्याच्या कृपेसाठी. पण मी हे सर्व सोडून सतत माझाच मी चा पाढा बोलत असतो. मी एके मी, मी दुणे मी, मी त्रिक मी, मी चोक मी, मी पाचे मी, मी साहे मी, मी साते मी, मी आठे मी, मी नवे मी, मी दाहे मी!!  शेवटी पाढा पुर्ण झाला तरी उत्तर मीच. मग माझा हा मी चा पाढा कसा हवा तर मी एके मी, मी दुने ईश्वर, मी त्रिक भक्ती, मी चोक ऐश्वर्य..... असा हा मीचा पाढा असायला हवा म्हणजे मग हा माझ्यातला मी फक्त एकच उरतो जो परमेश्वराच्य नियमाने चालतो . कारण मी स्वतः जरी ठरवलं तरी माझा श्वास थांबवू शकत नाही, माझी हृदयक्रिया ही तोच चालवणारा असतो...
*मीही इथे असंच कायम तुमच्यात फिरत असतो, तेव्हा तुम्हा प्रत्येकाला हाच प्रश्न असतो की हा बापू कोण?* *हा काय करतो? हा कश्या साठी आलाय? याला नेमकं काय करायचं?*
*आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं दयायला आज मी स्वतः च माझा मी चा पाढा बोलणार आहे.*

*माझं नाव अनिरुद्ध*
माझ्या आईच नाव अरुंधती, माझ्या वडिलांचं नाव धैर्यधर.  माझ्या आजीचं  नाव शकुंतलाबाई पंडित जी गोपीनाथ शास्त्री पाध्ये यांची पुत्री. 
माझा जन्म 18 नोव्हेंबर 1956 ,त्रिपुरारी पौर्णिमेचा.
मी शाळेत जाऊ लागलो. मी परळला डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये शिकलो. या शाळेने माझ्यावर अपरंपार प्रेम केले. याच शाळेतले माझे सर एचडी गावकर जे महान ऋषी होते आणि ते डॉक्टर शिरोडकर यांचे शिष्य होते. डॉक्टर शिरोडकर सतत गोरगरीबांच्या सेवेसाठी झटले. तसेच गावकर सर व त्यांच्या पत्नी विजयाबाई गावकर अशा असंख्य गोरगरीब पती-पत्नीसाठी झटले जे त्यांच्या मुलांना परिस्थितीमुळे शिकू शकत नव्हते आणि त्यांची मुलं त्यांनी स्वतःची समजली आणि या अशा शाळेतला मी एकमेव असा विद्यार्थी की ज्याच्या घरी त्या काळातली अँबेसेडर गाडी, फोन, फ्रिज सर्व सुखसोयी होत्या कारण माझे वडील डॉक्टर होते. माझ्या वडिलांनी मला मुद्दामच त्या शाळेत टाकलं.लोक म्हणत,"डॉक्टर याला या शाळेत का टाकलं?"  *पण माझी आजी ठामपणे सांगायची त्याला जे काही करायचं आहे, तो जे काही करणार आहे ते मला माहित आहे.आणि त्याला जे काही करायचे आहे त्याचा श्रीगणेशा याच शाळेतून होऊ दे . इथे मला सर्व गोष्टी सहजतेने आणि समानतेने मिळाल्या. सांस्कृतिक शैक्षणिक प्रत्येक गोष्टीत मी असायचो. नंतर मी रुईया कॉलेजमध्ये इंटरसायन्स झालो. 1974 साली नायर हॉस्पिटल ला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 78 सालि मी एम बी बी एस ची परीक्षा पास झालो. पुढे 78 मध्येच मी धुळे गावी तीन महिने प्रॅक्टिस साठी गेलो जे धुळे तुमच्या नंदावहिनींच माहेर गाव आहे. 79 साली एमडी च्या अभ्यासक्रमासाठी दाखल झालो आणि 82 साली एमडी ची परीक्षा पास झालो तेही पहिल्याच प्रयत्नात. मला वाऱ्या कराव्या लागल्या नाहीत. ती परीक्षा खूप कठीण असते जिला शंभरातून फक्त चार पाच जणच पास होतात. याच कालखंडात मी संधिवाताचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे तीन वर्ष मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून काम केले ते 85 पर्यंत. मला शिकवायला खूप आवडायचं आजही आवडतं. 85 पासून 93 पर्यंत मी परळगावात स्वतःची प्रॅक्‍टिस सुरू केली नंतर 93 ते 98 पर्यंत मी दादरला म्हणजे आर सी ला प्रॅक्टिस केली. मला काही जण विचारतात की,बापू तुम्ही कर्जतलासुद्धा प्रॅक्टिस केली का? माझी सकाळी नऊ ते एक पर्यंत दादर नंतर पुन्हा दुपारी दोन ते रात्री दोन पर्यंत परला प्रॅक्टिस असायची. तुम्हीच विचार करा मी कर्जतला कसा जाऊ शकेल. 85 ते 98 च्या काळात माझ्याकडे 5/6 लाख पेशंट येऊन गेले. 98 साली मी प्रॅक्टीस बंद केली. हे माझे सर्व पेशंट माझ्यावर तेव्हाही खूप प्रेम करायची आणि आजही करतात.
85 मध्ये माझा विवाह झाला माझी पत्नी सौ नंदा जिला तुम्ही नंदाई म्हणता. माझी दोन बाळ. पौरस आणि शाकंभरी त्यांची नावे. मी सुद्धा भाजी भातच खातो ,सोनं वगैरे काही खात नाही. माझ्या पुढे अप्सरा नाचत नाहीत. कारण मी जो आहे तोच आहे.
78 मध्ये माझ्या आजीने मी जेव्हा एमबीबीएस झालो तेव्हा तिच्या आजोबांकडच्या म्हणजेच (जगन्नाथ शास्त्री पाध्ये)  काही वस्तू मला दिल्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या आजीनेच मला वयाच्या आठव्या वर्षी बापू हे नाव दिलं आणि ते ठिकाण होतं वडाळाचे विठ्ठल मंदिर. याच दिवशी मला वेदव्यासांनी त्यांचे शिष्य म्हणून स्वीकारले. आणि मी त्यांचा अंकित झालो त्यांच्या शिकवणीनुसार मी माझा अभ्यास करत राहिलो 78 साली हनुमंत महाप्रभुने मला वज्रविद्या शिकविली. मला सर्व वज्रविद्या हनुमंताने मला दिली आणि तेव्हापासून माझ्या सर्व प्राच्यविद्या यांचे अध्ययन सुरू झाले. माझे सर्व अध्ययन घडले ते सर्व वेद व्यासांचेच होते .जेव्हा मी योगवशिष्ठ शिकण्यास सुरुवात केली आणि सर्व शिकून झाल्यावर हनुमंताने मला प्रश्न केला, "हे वत्स!रामाला वशिष्ठ, विश्वामित्र कृष्णाला गर्गमुनी सांदिपनी ऋषींची तसेच तुला वेदव्यासांसारख्या गुरूंची आवश्यकता का पडली?"  मग मी म्हणालो, "ज्याने रामाला धारण केले, कृष्णाच्या रथावर विजय पताकेवर आरुढ होता तो तूच. म्हणून तूच या प्रश्नाचे उत्तर फक्त देऊ शकतो. हा राम हा कृष्ण सदैव एकच असतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. तोच बोलतो तोच बोलवितो, तोच शिकतो तोच शिकवितो, तोच करतो तोच करवितो. जो आहे तो तोच." आणि मग हनुमंताने मला मिठीत घेतलं आणि हनुमंताची मिठी हीच माझा कार्याची सुरुवात आहे कारण त्याच्याच मिठीत प्रत्येक कार्य सुरू होतं त्याच्या मिठीत प्रत्येक कार्य संपन्न होते.
मी जे काही करतो मला जे काय करायचं आहे ते करणार आहे ते मी करणारच. जो कोणी पृथ्वीवर आला तो प्रत्येक जण समृद्ध कसा होईल ते मी बघणार आहे. आज कलीयुगाच्या अंतिम चरणाची सुरुवात 2007 पर्यंत सुरू होणार आहे. जिथे असेल फक्त विनाश आणि विनाश. कारण मानवाला विनाशकाले विपरीत बुद्धी असते. जिथे मानवाला फक्त विपरीत बुद्धि सुचणार आहे पण या काळाच्या विरुद्ध गतीला मीच ब्रेक लावणार आहे आणि हा ब्रेक ही मीच स्वतः असणार. मी त्याच साठी आलो आहे आणि राहणारच आहे.
2025 त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर भारतीय  धर्माचे साम्राज्य असणार आहे तेही पूर्णपणे नीती शुद्ध मार्गाने. मला बदलायचीय ती मानवी वृत्ती आणि ति मी बदलणारच.तुम्ही कितीही माझ्याविरुद्ध झालात तरी मला जे करायचे ते मी करणारच. तुमच्या माझ्या मध्ये येते ती तुम्हीच बांधलेली भिंत. मी तुमच्याकडे येतो पण तुम्हीच ती भिंत अधिक भक्कम करता. पण ही भिंत पाडण्याचे काम मात्र तुमचं तुम्हालाच करायचा आहे. तुम्ही ठरवूनही जर ही भिंत पडत  नसेल तर मी तुमच्यासाठी मदतीला धावून येईल. पण भिंत पाडण्याचा प्रयत्न मनापासून करा मग तुम्हाला शक्ती द्यायला मी आहेच.
जो कोणी मनापासून माझं नाव उच्चारतो त्याचा मी सदैव ऋणी राहतो. आणि सदैव जन्मजन्मांतरी साठी मी त्याचाच होऊन राहतो. आज मी सर्वत्र पाहतो तर जिकडेतिकडे खूप भय बघतो. असं कोणीच दिसत नाही की ज्याच्याकडे भय नाही. गरिबाला त्याच्या गरीबीचं ,श्रीमंताला श्रीमंतीचं, तर तरुणाला त्याचं आयुष्य कसं जाईल याच भय.प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विवंचनेत सापडलेला दिसतो. भय हा कलियुगाचा धर्म होऊन बसला आहे. माझ्याकडची  आयुधं या भयाचा नाश करणारच आहेत. भयाचं स्थान आहे मन. हे भय मी नष्ट करणारच.आहार निद्रा भय मैथुन सर्वांशी समसमान. मला या चार गोष्टी आहेतच आणि हव्यात पण. त्या कशा जर मला परमेश्वराचे भय असेल तर मला दुसरं कुठलंच भय  राहणार नाही.माझी निद्रा योग्याची असावी भक्ताची असावी, माझा आहार असतो डुकराचा कारण मी डुकराप्रमाणे इतरांची विष्ठा खात असतो,दुसऱ्याची निंदानालस्ती ,मत्सर ,कुचेष्टा करून. म्हणूनच हा माझा आहार असावा तर तो मानवाचा असावा. माझे मैथुन हे गृहस्थाश्रमी नीतिनियमानेच असावे. बरीच मंडळी म्हणतात ,"साईबाबा ब्रम्हचारी होते मग ते गृहस्थाश्रमी कसे?" अरे ज्याने विश्वाचा संसार केला तर तो गृहस्थाश्रमीच आहे. माझं भयच माझे पाय मागे खेचतात. माझी लेकर मला निर्भय असलेली आवडतील  मग तुम्ही नाचला की मीही नाचेल ,तुम्ही गाल तेव्हा मीही गाणं म्हणेल, तुमच्या भक्तीच्या सुरात सूर मिसळून मी तुमच्याबरोबर भक्ती करेन. पण हे भय नष्ट करीनच आणि वेळ पडली तर त्यासाठी मी कुठलाही टोकाला जाईल.कारण मला कसलंच बंधन नाही. हो  मला फक्त एकच बंधन आहेआणि ते प्रेमाचं बंधन. जे मी कधीच तोडत नाही. तुमचे सर्व दुर्गुण प्रचंड प्रमाणात मला द्या, 100% मला द्या पण फक्त तोंडाने बोलून देऊ नका, तर अगदी मनापासून द्या. तुमचे दरवाजे उघडा तुमच्या मनातील तुम्हीच बांधलेली भिंत पाडा मग बघा तुमच्या दुर्गुणांची राख मी करेन.तुमचे ज्या इष्टदेवावर, पावित्र्यावर प्रेम आहे ते प्रत्येक नाम मलाच पोहोचणार आहे.मग मी कुठेही कसाही येऊन तडमडेनच आणि तुमचे दुर्गुण नष्ट करीन.फक्त तुमचं मन माझ्या मनाशी जोडलं गेलं पाहिजे. तुम्ही तुमचं माझ्या मनाशी बांधतच नाही. कारण माझ्या मनात सतत होळी पेटलेली आहे ,अशी धुनी पेटलेली आहे जी तुमच्या दुर्गुणांची राख करणारच आहे.पण माझ्या मनाशी तुमचं मन बांधायचं काम तुमचं तुम्हालाच करायचं. तुम्ही मनापासून प्रयत्न करूनही होत नसेल तर मी तुमच्या मागे धावेन.तुम्ही कितीही माझ्यापासून लांब धावलात तरी मी तुम्हाला पकडणारच कारण माझ्याकडे असंख्य कॅमेरे आहेत.जो कोणी प्रभू रामाचे, येशूचे, ऋषभ देवाचे ,अरिहंताचे स्मरण करतो त्याच्या प्रत्येकाकडे माझे लक्ष आहे. शेवटी पृथ्वी गोल आहे कोण पुढे कोण मागे हे कोणीच ठरवू शकत नाही .
बरेच लोक म्हणतात मी रस्त्यात दिसत नाही शेवटी मला ही दोन हात दोन पाय आहेत मी ही माणूस आहे पण तरीही मी याच्या पलीकडे आहेत मला रस्त्यात बघू नका. मला फक्त तुमचं प्रेम दानधर्म सेवा हवी आहे. माझं कुटुंब फक्त पाच जणांचा आहे मी नंदा वहिनी सूचित दादा पौरस शाकम्भरी. मी तुमच्या सूचितदादा बद्दल सांगायचं राहूनच गेलं. हा माझा वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी माझं सर्वस्व असणारा हा माझा मित्र आहे. ज्याला माझ्याजवळ यायचंआहे त्याला मार्ग दाखवण्यासाठी हा सूचित दादा आहे. याचा अर्थ तुम्ही त्याच्या अपॉईंटमेंट घेणं नाही तर त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागणं, त्याच्या सारखं वागण्याचा प्रयत्न करणे. तुम्हाला कोणी विचारलं की बापूंचा स्थान कुठलं तर ठामपणे सांगा माझं घर हेच माझ्या बापूंच स्थान.  मला तुमच्या घरात राहायला खूप आवडते. तुमचं घर हेच माझं स्थान आहे जिथे मी आहे ती जागा पवित्रच आहे. लक्षात ठेवा माझ्या पर्यंत तुम्ही तीन मार्गाने पोहोचू शकता प्रेम, सेवा आणि दानधर्म .मी सेवा करेन ती माझ्या सद्गुरु कार्यात सहभागी होऊन. आठ वर्षातून एकदा तीर्थक्षेत्री जाऊन झाडू मारतो आणि मी सांगतो मी तीर्थक्षेत्रात जाऊन झाडू मारला. अरे झाडू मारायचा असेल तर स्वतःच्या हृदयात मारा. त्या तिन्ही मार्गांवर तुम्ही असाल तर मी तुमचे भय दूर करणारच. मी संस्थेचाच आहे, पण वेळ पडलीच तर मी संस्थेचा विरोधी पक्षनेता नक्कीच आहे. ज्यांना मी निवडले त्यांच्या विरोधी मी असणारच आहे कारण त्यांचं पाऊल घसरू नये म्हणून. मला काहीजणांनी विचारलं ,बापू आपल्याकडे कॉल गर्ल येते. मी म्हणलं, तुला कसं माहिती?म्हणजे तू गेला असशील किंवा अशाच कुटाळक्या करीत असावास. ती येते आणि ती येणारच. त्या मुलीला आपल्या कार्यकर्त्यांनी मुंबईबाहेर जाऊन नेऊन तिचं शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवून दिली तिचं लग्न लावून दिलं आणि आज तिला सहा महिन्यांची मुलगी आहे. *माझे दरवाजे जितके पतिव्रतेला उघडे तितकेच एका वेश्येलाही उघडेच आहेत.*👉 *जितके संतांना तितकेच पाप्यालाही उघडे.मला गुंड मवाली सुद्धा प्रिय आहेत,पापीसुद्धा तितकेच प्रिय. मी त्यांच्यावरही प्रेम करत राहणार , मी कधीच त्यांना टाकणार नाही,कारण मी हाडाचा डॉक्टर आहे आणि डॉक्टरकडे नेहमी रुग्णच येतात हेल्दी लोक कधीच येत नाही. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना बरं करणे हाच माझा धर्म आहे.*  हेल्दी येतील त्यांनाही *मी लस देणारच आहे.*  हा डॉक्टर *पेशंटच्या* मागे धावणारा आहे. पेशन्ट माझ्यापासून किती लांब पळाला तरी मी त्याच्या मागे *धावणारच आणि त्याला इंजेक्शन टोचतोच* कारण त्या *इंजेक्शननेच रोगी बरा होणार आहे.* जे कोणी स्वतःला अतिशय विद्वान म्हणवणारे आहेत त्यांनी माझ्याकडे येऊच नये कारण मी अंतर्बाह्य घाणेरडा आहे. जर ते माझ्याकडे आले तर त्यांना घाण लागेल म्हणून त्यांनी येऊच नये. *मी उभा आहे ते हे भय दूर करण्यासाठीच.*  मला गजर गंभीरतेने केलेला आवडत नाही. मी नाचतो आणि नाचवीतोही ,मी वारकरी पंथानुसार बेभान होऊन नाचायला हवं. पण तिथेही लोक मला हसतील याचं मला भय असत आणि जोपर्यंत बेभान होत नाही तोपर्यंत मला यश नाही. *अर्जुन असाच बेभान होता,  कारण त्याचं लक्ष फक्त पोपटाचा डोळा हेच होतं*. माझं लक्षही या अर्जुनाप्रमाणे बेभान होऊन परमेश्वरावर असावं. *मी दिवसातून  24 मिनिटे तरी परमेश्वरासाठी बेभान व्हायला हवा आणि ज्यावेळी तुम्ही 24 मिनिटे बेभान असता,  तेव्हा तुमच्या बाजूला मांडीला मांडी लावून मी बसतो, मी दारोदार भीक मागतो. मला फक्त या 24 मिनिटाची भीक हवी असते पण तीही भीक मला तुम्ही कोणी देत नाही. मोजक्याच घरी मला ही मिळते. जिथे मला ही भीक मिळते तिथे मी 24 मिनिटाचे रूपांतर 24 तासात करतो.*

 धातुर्उत्तम हे जे *महाविष्णूचे* नाम आहे त्यातील धातू म्हणजे शरीर. शरीराची महत्त्वाची शक्ती म्हणजेच ओज. ओज म्हणजेच महाप्राण. ओज म्हणजेच आल्हादिनी शक्ती.हे ओज वाढविण्यासाठी, शरीराला बळ देण्यासाठी मी जुईनगरला जात असतो. *हे तुम्हाला देण्यासाठीच जुईनगरला मी पंचपुरूषार्थ उपासना सुरू केली*. तिथे *पंचपुरुषार्थ देवता आहेत आणि त्यांची भक्ती करतो.* मी खूपच आगळा वेगळा आहे. दांडपट्टा का फिरवतो ,मुदगल विद्या का शिकवतो .*ज्या विद्या मला हनुमंताने स्वतः दिल्या त्या सर्व विद्या मला संपूर्ण विश्वात प्रचलित करायच्या आहेत. पंचपुरुषार्थ उपासनाही त्यातलाच एक भाग आहे. छांदोग्य उपनिषदातील मधूविद्या आहे आणि आज अनेक लोक मला सांगत आहेत ह्या उपासनेने माझ्या मनाला शांती मिळाली, माझं हे काम झालं ,माझा हा प्रश्न सुटला, अनुभवाची शिदोरी वाढतच चाललीय.*  या सर्व विद्या शरीर मन बुद्धी यांना समर्थ करणाऱ्या, बळ देणा-या आहेत. मुदगल विद्याही तेच करते. मुद्गल हे कुणाचआयुध आहे माहितीये कुणाला? मुद्गल हे आयुध *मुंबादेवीच* आहे. ती *मुंबाई* आहे. आपण जिला बॉम्बे  बोलायचो.मग बॉम्बे चे मुंबई केलं. खूप काहीतरी मोठं केल्यासारखं वाटलं. अरे हवं तर मुंबाई म्हणा कारण ती मुंबा आई आहे. तसेच एकादशी रुद्राच आयुध सुद्धा आहे मुदगल आहे. *आज मला स्त्रिया सामर्थ्यवान हव्यात एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं* याचं उदाहरण म्हणजे जिजाबाई.  जिजाई महान म्हनून शिवाजी महान झाला. *लक्षात ठेवा प्रत्येक स्त्री माझी मुलगी, आई आहे .ज्या स्त्रीच्या साडीला कोणी हात घालेल त्याचा हात मी धरेल तिचे रक्षण मी स्वतः करेन.* सासू नवरा दीर तिला जाळत असतील तर मी तिच्या रक्षणासाठी धावणारंच. आज एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा दुर्गतिला कारणीभूत ठरते. *परवा टीव्हीवर एक बातमी ऐकली एका मुलीला तिच्या सासूने जिवंत जाळलं. त्यांना माझे हे हात जे करायचंही  ते करणारच*. जी किंवा जो कोणी बालभावाने माझ्याकडे येईल त्यांचा *मी बाप* आहे जो कोणी माझ्यावर मुलाप्रमाणे आपलेपणाने प्रेम करेल त्यांचा मी मुलगा आहे. माझ्या आजोबांची मामी गंगाबाई. अकरा वर्षांची असताना खेळत होती. खेळत असताना तिच्या काकाने मामानी तिला खेचत घरात नेलं.घरात सर्व रडत होते तिला काहीच कळत नव्हतं. घरात दुसऱ्या लाल कपडे घातलेल्या, केस कापलेल्या स्त्रिया होत्या आणि त्या मुलीचे केस कापण्यासाठी आल्या होत्या. तिला फक्त देवघर आणि स्वयंपाक घर माहित. तिला आमंत्रण द्यायची ती फक्त तिच्या सारख्या स्त्रियांचे केस कापण्याची .माझ्या आजीने सर्वप्रथम केस कापण्याचा विरोध केला. सर्व ब्राह्मणांनी मराठ्यांनी सर्वांनी तिला बहिष्कृत केले ,तिला धर्मांध ठरवले. वर्तमानपत्रातून तिची टीका करण्यात आली. तिच्यावर पूर्ण बहिष्कार टाकला पण तिच्यासारख्या काही स्त्रियांनी तिला चोरून मदत केली. आणि ती पूर्णपणे या अशा स्त्रियांसाठी झटत राहिली आणि एक दिवस आजी मला महर्षी कर्वे यांच्याकडे घेऊन गेली.कर्वे यांनी आजीला सांगितले, "तुझ्या या नातवाला माझ्या लेकींसाठी झटायला सांग ,माझे पूर्ण आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतील." आणि ते लक्षात ठेवूनच आज स्त्रियांसाठी नंदावहिनी कडून स्त्रियांसाठी आत्मबलचे वर्ग चालू झाले.कर्वे हे  महान ऋषी होते तो सिद्धच आहे. माझी पत्नी प्रत्येक स्त्रीचा माहेरवास आहे आणि आम्ही तिघेही या स्त्रियांना सांभाळणार. प्रत्येक दुर्बल घटकांसाठी साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी ,अनिरुद्ध उपासना ट्रस्ट ,दिलासा मेडीकल ट्रस्ट या संस्था झटतआहेतच.
*मला तुम्हा सर्व स्त्रियांना आज एक महत्त्वाचं सांगायचं आहे*, "बायांनो! *तुम्ही प्रथम मत्सर सोडून द्या, संशयी वृत्ती सोडून द्या, कॉम्पिटिशन सोडा, आज एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मत्सर करते, मी तिच्या पेक्षा जास्त पुढे कशी जाईल आणि ती मागे कशी राहील हेच मी बघते.* माझे बंधुत्वाची गाठ तयार आहे. ती गाठ माझ्याशी बांधायची असेल तर *मत्सर सोडून द्या*. जर ही गाठ बांधलेली असेल तर तुमच्यावर कोणी हात घातला तर *तुमचा हिसका त्या गाठीला बसतो. आणि गाठीला हिसका बसला की मला हिसका बसणारच. मी खडबडून जागा होईल आणि तुमचं रक्षण करील.* पण तुम्हीच ही गाठ सोडता आणि गाठ सुटली की *मी येऊ शकत नाही*. तुम्ही ही गाठ घट्ट बांधा. *तुमचा बाप म्हणून भाऊ म्हणून बांधा. मी समर्थपणे उभा राहिल तुमच्यासाठी*.

*रक्षाबंधनच्या* दिवशी इकडे *आठ वर्षाची मुलगी* मला तुमच्या राख्या बांधत होती पण लक्षात ठेवा *तुमच्यातली प्रत्येक जण  मला ती राखी बांधत होती*.  प्रत्येक स्त्रीचा *मी भाऊच आहे*. प्रत्येक कष्टाने त्रासलेल्या पुरुषाचा *मी भाऊ आहे सखा आहे*. मी तुमच्यासाठी *तळमळणारच*.

मी चार रसयात्रा केल्या .पहिल्या रसयात्रेला 100 दुसऱ्या रसयात्रेला 375, तिसऱ्या रसयात्रेला 1000 आणि चौथ्या रसयात्रेला अडीच पट तीन पट भक्त होते. माझी रसयात्रा कधीच संपत नाही. ही रसयात्रा फक्त चार दिवसच का? ही रसयात्रा जीवनभर का नाही? मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर रसयात्रा करायला तयार आहे.पण रसयात्रेतसुद्धा तुम्ही माझ्यात काहीतरी दिसतंय का हे पाहता. मला हा शोध संपवायचा आहे. मला माझ्या प्रत्येकाची भावयात्रा करायची आहे.ज्यांचा भाव पूर्ण त्यांना मात्र मी सगळं दाखवतो. मला विठ्ठलाचा भक्त ही पूज्यच आहे. *प्रत्येक देवळात तो एकच आहे. मला ज्या क्षणी प्रत्येक दैवता मध्ये माझा सद्गुरु दिसेल तर ते दैवतच सद्गुरु शक्तीत विलीन होते.मग कुठलंच दैवत तुमच्यावर कोपणार नाही*. भुताला मी का घाबरावं?  माणसाची विकृती हीच त्याचं भूत आहे. हडळ जर घरी आली तुम्हाला खायला तर तिला समोर बसवा, चहा पाणी द्या आणि सांगा माझा बाप समर्थ आहे. मला खायच्या आधी माझ्या बापूला खा. मग ती हडळ माझ्याकडे आल्यावर मी तिला खाऊन टाकेल कारण मला नेहमीच खूप भूक लागलेली असते.
माझ्याकडे प्रेमाची भरपूर शक्ती आहे मला ते प्रेम वाटायचे आहे,मला प्रेमाचं बी पेरायचं आहे  कारण हे बी पेरलं तर त्याच्यातून भरपूर प्रेम उगवणार आहे. मी तुमच्यासाठीओव्हर टाईम करायला तयार आहे. तुम्ही सुखी व आनंदी व्हा. सदैव देवयान पंथावर राहा. मला दोन हात ,दोन पाय, दोन डोळे आहेत,मीही माणूसच आहे. पण लक्षात ठेवा याच्याही पलीकडेही मी आहे मला कसलंच बंधन नाही. मला दिशेच बंधन नाही, मला काळाचं बंधन नाही मला कोणीही रोखू शकणार नाही. माझ्याकडे असंख्य हातोडे कुऱ्हाडी आहेत. मी माझ्या प्रत्येकाच्या पायाला दोर बांधून आणतोच आणि तुम्ही कितीही लांब पळाला तरी मी आणणारच. तुम्ही कितीही चुकलात तरी मी तुम्हाला माझ्या पासून कधीच दूर लोटणार नाही एकशे आठ टक्के नाही लक्षात ठेवा!! 

*हरी ओम.*🙏

Wednesday, September 6, 2023

Post from Sai – The Guiding Spirit“

हरि ओम.
पूज्य समीरदादा ह्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच आपले सर्वांचे लाडके आद्यपिपा श्री सुरेशचंद्रसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या लिहीलेल्या काही सुमधुर आठवणी आज वाचनात आल्या .
 बहुधा 15 ऑगस्ट  2012 मध्ये नवीन फोरम  “साई – द गाईडींग स्पिरीट (“Sai – The Guiding Spirit“).  सुरू करताना लिहील्या असाव्या त्याच  येथे शेअर करीत आहे. 

समीरदादा , आम्ही खूप अंबज्ञ आहोत की आपण  आम्हां सर्वांना ही अमूल्य देणगी दिली.

आज श्रीकृष्णजयंती म्हणजेच 
परमपूज्य आद्य पिपा ह्यांचा महानिर्वाणदिन. 
त्यानिमित्ताने...
पुष्प उमलले जे माझे वाहिले तुलाची
तुला तुझे देतानाही भरुनी मीच राही...
आम्हां सर्वांची हीच भाव पुष्पांजली. 

आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.

काकांची एक गोष्ट मी लहान असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे दिवा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी दिवा बंद केला की कधी कधी पुन्हा लावायला सांगायचे. साईनाथांचं दर्शन घेताना त्यांना समाधान व्हायचं नाही. असं ब-याचदा घडायचं. मला वाटायचं रोजचा “तोच, तोच” फोटो बघतानाही त्यांना असं का करायला लागतं? आता त्या गोष्टी कळतात. हाच तो फोटो जो काकांच्या वडिलांनी साईनाथांचा हात लावून घेतला होता; जो आमच्या ठाण्याच्या घरी, घर झाल्यापासून म्हणजे १९६६ पासून लावलेला होता.

जेव्हा काकांच्या निर्वाणाचा दिवस जवळ आला तेव्हा बापूंनी (अनिरुद्धसिंह) तो फोटो ठाण्याहून मागवून घेतला व काकांच्या खोलीत त्यांच्या समोर लावला. काका जे समजायचे ते समजून चुकले, त्यांना अत्यंत आनंद झाला. फोटो बघून ते एवढे गहिवरले की त्यांना त्यांचे अश्रू आवरताच येईनात. निर्वाणाच्या आदल्या दिवशी काकांनी माझ्यासमोर बापूंना (अनिरुद्धसिंह) विचारलं की “बापू अजून किती दिवस?” त्या वेळेस पहाटे बापूंनी (अनिरुद्धसिंह) माझ्यासमोर काकांना सांगितले की “आता काही तासच उरले आहेत.” तेव्हा काकांनी अत्यंत समाधानाने माझा हात बापूंच्या (अनिरुद्धसिंह) हातात दिला; ही माझ्याकरिता काकांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट होती.

काकांच्या नित्य पठणातील स्वत:ची श्रीसाईसच्चरिताची पोथी

काकांनी वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे १९४५ साली श्रीसाईसच्चरिताचे दरवर्षी कमीतकमी चार सप्ताह करण्याचा संकल्प केला. श्रीसाईसच्चरितात सांगितल्याप्रमाणे रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा या दिवशी सप्ताहाची सांगता व्हायची. मला आठवतंय.

जया मनी स्वहितविचार l तेणें हा ग्रंथ वाचावा साचार l

जन्मोंजन्मीं साईंचे उपकार l आनंदनिर्भर आठवील ll 

या गुरुपौर्णिमा गोकुळअष्टमी l पुण्यतिथी रामनवमी 

l या साईंच्या उत्सवी नियमीं l ग्रंथ निजधामीं वाचावा ll

काही वर्षं तर काकांनी सप्ताह (श्रीसाईसच्चरिताचे पारायण) शिरडीला द्वारकामाईत कोळंब्याच्या बाजूच्या भिंतीला टेकून केलेला होता. आम्ही सर्व म्हणजे आई, दादा व मी त्यांच्या पठणाच्या वेळेस त्यांच्या बाजूला बसलेले असायचो. तो काळ साधारण १९७० ते १९७५चा होता. त्यानंतर मात्र शिरडीत येणार्‍या साईभक्तांची संख्या खूपच वाढू लागली व पूर्ण सप्ताह तिथे बसून करणं अशक्य होऊ लागलं. त्यानंतर मात्र जसं शक्य होईल तसं मोजके अध्याय काका द्वारकामाईत बसून वाचायचे. अजूनही ते पठण माझ्या कानात घुमतंय. मला श्रीसाईसच्चरिताची गोडी लागली ती काकांच्या या पारायणामुळे व नित्य पठणामुळे. साईनाथांच्या, बाबांच्या या शिरडीशी अशा प्रकारे आमची नाळ बांधली गेली. वर्षातून कमीतकमी दोनदा तरी आमची शिरडीची वारी व्हायचीच.

श्रीसाईसच्चरितातील ३५व्या अध्यायातील २१८ ते २२२ ह्या ओव्या त्यांच्या खूपच आवडीच्या होत्या.

हा सच्चरित मार्ग धोपट । जेथें जेथें याचा पाठ |

तेथेंच द्वारकामाईचा मठ | साईही प्रकट निश्चयें ।।

तेथेंच गोदावरीचें तट । तेथेंच शिरडी क्षेत्र निकट ।

तेथेंच साई धुनीसकट । स्मरतां संकट निवारी ॥

जेथें साईचरित्रपठण । तेथें सदैव साईनिवसन ।

श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन । करितां तो प्रसन्न सर्वभावें ।।

स्मरतां साई स्वानंदघन । जपतां तन्नाम अनुदिन ।

नलगे इतर जपतप-साधन । धारणाध्यान खटपट ॥

साईचरणीं ठेवूनि प्रीती । जे जे या साईंची विभूती ।

नित्यनेमें सेविती लाविती । ते ते पावती मनेप्सित ॥

आणि ह्या ओव्या काका अक्षरश: जगले.

काका “श्रीसाईस्तवन मंजिरी”देखील अतिशय सुंदर म्हणायचे. दादाला व मला त्यांनीच श्रीसाईस्तवन मंजिरी म्हणण्यास सांगितले होते; व आमच्या नित्य पठणात इतर स्तोत्रांबरोबरच ह्याही स्तोत्रांचे पठण होते.

१३ नोव्हेंबर २०००ला बापूंनी (अनिरुद्धसिंह) काकांची पिपिलीका पांथस्थ पदावर नियुक्ती केली. तेव्हापासून काकांचा एक वेगळाच आध्यात्मिक प्रवास चालू झाला. काका खूप शांत झाले. २००४ साली बापूंच्या (अनिरुद्धसिंह) सांगण्यावरून त्यांनी मला गुरुमंत्र दिला; तीही श्रीसाईसच्चरिताचीच ओवी (११वा अध्याय, ओवी १५२)

पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंतीं पूर्ण निष्काम ।

पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।

सगळ्या श्रद्धावान बापूभक्तांचं ह्या “श्रीसाईसच्चरिताशी” एक विशेष आणि दृढ नातं आहे. बापूंनी  (अनिरुद्धसिंह) श्रीसाईसच्चरितातील पंचशील परीक्षा चालू केल्या, त्याही “श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनीच्या” माध्यमातून. प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही बापूंनी (अनिरुद्धसिंह) घेतली व ती लेक्चर्स संकलित करून श्रीसाईसच्चरिताचं प्रॅक्टिकल बुक तयार झालं; हजारो श्रद्धावान ह्या परीक्षेला बसले. १९९६ साली पहिली रसयात्रा झाली तीही शिरडीचीच; त्या वेळेला हजर असलेल्या श्रद्धावानांना बापूंनी (अनिरुद्धसिंह) साई आणि शिरडी समजावून सांगितले. आता तर बापूंची (अनिरुद्धसिंह) हिंदीतील प्रवचनंही चालू आहेत तीही श्रीसाईसच्चरितावरच. म्हणूनच आपण या ब्लॉगच्या माध्यमातून ह्या साईसच्चरितावरील फोरम चालू करत आहोत; बुधवार, १५ ऑगस्ट २०१२ या दिवसापासून आणि फोरमचं नाव असेल “साई – द गाईडींग स्पिरीट (“Sai – The Guiding Spirit“).

-- पूज्य समीरदादांच्या ब्लॉग वरील माहिती संकलन ह्यातून

Tuesday, September 5, 2023

बापूंचे 31 ऑगस्ट 2023 ला केलेले इंग्रजी प्रवचनाचे शब्दांकन

बापूंचे 31 ऑगस्ट 2023 ला केलेले इंग्रजी प्रवचनाचे शब्दांकन.

Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done ,Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done ,Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done 
( येत्या प्रपत्तीला त्रिविक्रमाकडे अशी प्रार्थना करा, "हे स्वयं भगवान त्रिविक्रमा ,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे.( आपकी जैसी इच्छा है वैसा ही मेरे जीवन में हो)
 ( माझ्या जीवनात मला काही नको जे तुला आवडत नाही. मला फक्त एवढेच दे जे तुला आवडेल आणि जे तुला मला द्यायची इच्छा आहे.
प्रपत्ती म्हणजे उच्च अवस्थेतील शरणागती 
.तू निर्माण केलेल्या नाथसमविधा प्रमाणे मला माझं जीवन आवडू दे ) त्यामुळे प्रपत्ती करण्याचा फायदा हा आहे की आम्हाला देवाने जे दिले आहे ,ते आवडू लागेल, अर्थात नाथसंविध आवडू लागेल. ही प्रपत्ती फक्त स्वतःसाठी नसून, पूर्ण कुटुंबासाठी आहे, मग भले ते पूर्ण कुटुंब नास्तिक असलं तरी तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला प्रपत्तीचे फळ नक्कीच मिळेल. निदान एवढ फळ तरी तुम्हाला मिळेल , जेणेकरून तुम्हाला दुःख सोसावं लागणार नाही. आम्ही जे काही मनामध्ये विचार करत असतो किंवा देवाकडे बोलत असतो ते सर्व काही देव ऐकत असतो पण देव काय सांगतो, देव आमच्याकडे काय बोलतो ते आम्हाला कळत नसतं पण ते जर कळायचं असेल तर आपल्याला प्रपत्ती करावी लागेल आणि प्रपत्ती केल्यानंतरच आपल्याला कळेल देव काय बोलतोय ते! या मकर संक्रांतीला पुरुषांच्या प्रपत्ती प्रमाणे स्त्रियांना रणचंडीका प्रपत्तीसाठी पण एक कथा प्राप्त होईल. मी तुमचे प्रत्येक शब्दन शब्द ऐकत असतो तुम्ही जे काही स्वतःबद्दल विचार करत असतात, अक्षरशा जे काही वाईट चांगलं जे जे विचार करतात ते ते सर्व काही  नक्की 108% मी ऐकत असतो, आज एक नक्की लक्षात ठेवा माझा बापू ,माझे प्रत्येक विचार आणि माझे प्रत्येक शब्द ऐकत असतो त्याचक्षणी, कारण मी अभिमानाने सांगू शकतो मी श्रवण भक्त आहे, आणि मी तुम्हा सर्वांची श्रवण भक्ती करत असतो, तुम्ही मात्र एकाच देवाची श्रवण भक्ती करत असता. त्यामुळे मी सदैव म्हणत असतो माझा इगो हा सर्वात मोठा इगो आहे, कारण मी एवढ्या सगळ्यांची श्रवण भक्ती करत असतो म्हणून. मी खरंच सांगतो मी तुम्हा सर्वांचा भक्त आहे. आय लव यू .आय लव यू सो मच. स्वतःच्या मुलं- मुली वरती  प्रेम करणं ही पण भक्तीच आहे. ही माझी वात्सल्य भक्ती आहे. My Bapu listens every word for me from me. Spoken, read thought or imagination whatever and whatsoever. मी माझ्या मुलासाठी कुठेही जाऊ शकतो, हा माझा अभिमान नाही, हे माझे आवडते काम आहे. तर ही माझी दास्य भक्ती आहे माझ्या आईसाठी अर्पण केलेली. ही माझी वात्सल्य भक्ती आहे  तुमच्यासाठी.

अंबज्ञ
अमोला सिंह तिळवे

First Pitruvachan dated 31/08/2023

HariOm 
First Pitruvachan dated 31/08/2023

Ambadnya means Aaichya Charni Krutadnyata

There is no value for the words thank you and sorry but there is meaning of the word Ambadnya 

Naathsamvidh means God Willing 

The prayer let my Jeevan happen as per Your Wish - Parmeshwar's Wish

Sant Eknath written the Aarti - Trigunatmak Trimurti which is sung in the Shri Aniruddha Gurukshetram 

We should try reading the Aarti Trigunatmak Trimurti

We need to improve our bhaav

Why the same mistakes keep on repeating 

We do should do the small small things in Adyatma

3 types of Upasana 
 - Nitya Upasana
 - Naimitik Upasana
 - Vaishishik Upasana

Nitya Upasana is our daily Upasana

Naimitik Upasana means saying Shri Hanuman Chalisa in Shri GuruCharan Maas or Ghorkastodharan Stotra in Shravaan Maas

We can chant the Ghorkastodharan Stotra 108 times at our home too

It is not compulsory to go to all weddings and create crowd there 

We should attend weddings  of those persons who are close to us

Vaishishik Upasana means a Special Upasana such as our Shri Vardhaman Vrattadhiraj

Om HariHaraai Namah - other name of Shri Trivikram 

Harihar means Trivikram - The One has the same properties at all time of both MahaVishnu and ParamShiva

Our mind needs to be full of Satva Guna to have Darshan of God

The Avatar of the Lord happens for the common person to know God

He has in the Roop of a Human Being just for us

Who are we to decide about God

Harhar Swaroop means the Human Form and the Divine Instance of the Lord being active at the same time

The Harihar is Shiva and Vishnu at the same time

Whatever wrong happens in our life is also good for us

The tension at the time of exam is also given by Harihar

Shiva takes Ram Naam and Ram has made Rameshwaram

Difference between AdiMaya and AdiMata

Maya means mojnaari - accurate mojmaari

Mata means the One Who takes us closer to God

He destroys our sins and gives shape to our punya at the same time 

The Shape of us what He decides for us is the Best for us

Hum beej means astitva

Rasraaj is another name of Lord Shri Trivikram 

Ruum beej means the ras - beej of Lord Shri Ram 

2 pictures to be seen every night by us before going to sleep

1. The picture of Lord Ram giving hug to Lord Hanumant after He searches Sita Mata successfully 

2. Lord Hanumant tearing His Chest to show Shri Ram in It

To see these 2 pictures and then chant the Mantra - Om Mam Aniruddhaai Namah

This is Darshan Upasana which is given for the very first time in this kalp and this is from DAD to us and we need to do this everyday.

Wednesday, July 26, 2023

अधिकमासाचं महत्व

(अधिकमासाचं महत्व)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२३.०८.२०१२)

॥ हरि ॐ ॥

गेले दोन गुरुवार आपण भेटू शकलो नाही. का? हा प्रश्न अनेकांना पडला असेल . "का?" ह्या प्रश्नाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर त्यातूनच विज्ञान निर्माण झाले. "का?" ह्या प्रश्नातूनच अध्यात्म निर्माण झाले. "का?" हा प्रश्न जर पडला नाही तर मनुष्य प्रगतीच करू शकत नाही. पण हा "का?" प्रश्न कुठे व कधी विचारायचा हे अतिशय महत्त्वाचे असते.

आई लहान बाळाला सांगते. "भांडयाला हात लावू नको." इथे जर बाळाने "का?" प्रश्न विचारला आणि भांडयाला हात लावला तर काय होईल? भांडे गरम असल्याने हात भाजेल. जर आई बाळाचे संगोपन करताना बाळाच्या प्रत्येक "का?" ह्या प्रश्नाचे उत्तर देत राहिली तर ती त्याला वाढवू शकेल "का?" नाही.

लहान मुलांनी पण शाळेत जायला लागल्यावर १+१=२ असेच का? असा प्रश्न विचारला, तर चालणार आहे का? ह्यामागचे गणितशास्त्र जरी शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितले तरी ते ह्या लहान मुलास समजू शकणार "का?" नाही. जर एखाद्या मुलाने समजा प्रश्न केला की २ ला २ च का म्हणतात? तर त्यावर शिक्षक काय म्हणतील, "आम्ही असेच म्हणतो तुला पाहिजे तसे तू म्हण." पण इथे आम्हांला कळलं पाहिजे की आम्ही एखादी गोष्ट ठरवल्याने त्यानुसार नियम बनतात का? नाही. शाळेत जर आम्ही प्रश्न केला की, शिक्षिका ही शिक्षिका का आहे? तर त्याचे उत्तर मिळेल तिच्याकडे शिकवण्याची degree आहे म्हणून. ह्यावर जर कोणी विचारले, "तिला degree कोणी दिली? तर काय सांगणार? ती शिक्षिका त्या विषयाच्या कॉलेजमधील शिक्षकांकडून शिकली म्हणून. ह्यावर जर विचारले, "त्या शिक्षकांना कुणी degree दिली? तर परत तेच उत्तर मिळणार. असं आपण सतत "का? का?" हा प्रश्न विचारत गेलो तरी तेच उत्तर मिळणार बरोबर मग हे अनादी अनंत आहे का? नाही. ह्याचा अर्थ सुरुवातीला ज्या कुणी ह्या शिक्षकांना degree दिली, त्यांच्याकडे ही degree नसली पाहिजे.

आमच्या मेडिकलमधले उदाहरण बघूया. आधी cardiology हे deparment नव्हते. पूर्वी जे कोणी MBBS शिकले होते, त्यांनी ह्या क्षेत्रात आधी अनुभव घेतला. मग ह्या विषयाचे वेगळे department सुरू करावे असे ठरले. त्या department मध्ये काम करण्यासाठी विद्यार्थी पाहिजे, म्हणून त्यासाठी विशेष अभ्यासक्रम आला. म्हणजेच जेव्हा पहिल्यांदा MD Cardiology ची परीक्षा घेतली गेली तेव्हा ही परीक्षा घेणार्‍याकडे ही degree नव्हती तर ते ह्या विषयातील अनुभवी होते.

इथे आपल्या लक्षात येईल की, "का?" हा प्रश्न विचारण्यामागे योग्य संतुलन असायला हवे. ह्यासाठी मोठी विद्वत्ता नको. सोपे उदाहरण बघूया. रोजच्या जीवनात आपल्याला भूक लागते. मग ती भूक "का?" लागते, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी शरीररचनेचा अभ्यास केला. पण समजा आम्ही १० वर्षे रोज दुपारी १.०० वाजताच व रात्री १०.०० वाजताच जेवायचे ठरवले आणि त्याप्रमाणे वागलो तरी ११ व्या वर्षी आम्हांला त्याच वेळेला भूक लागते का? नाही.

नेहमी सूर्योदय होतो, पण तो बघण्यासाठी आम्हांला सूर्यावर जावे लागते का? नाही. पृथ्वीवरून आम्ही सूर्याची वेळ ठरवत असतो बरोबर. जर आम्ही इथे प्रश्न केला, ही सूर्याची वेळ बदलता नाही का येणार? तर ह्याचे उत्तर काय मिळेल, "असे केले तर पृथ्वीचा axis बदलेल. मग problem होईल. ह्यावर कोणी जर विचारले, प्रयत्न करुन नाही "का" बघता येणार? ह्याचे उत्तर शास्त्रज्ञ देऊ शकतील मी (परमपूज्य बापू) काही शास्त्रज्ञ नाही.

पावसाळ्यात आम्हांला नेहमी वाटते पाऊस रात्री १२.०० ते सकाळी ६.०० पर्यंतच पडावा व आवश्यक तेवढे पाणी मिळावे. दिवसा पाऊस पडू नये. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींवर आम्ही विचार करत असतो. पण जे आमच्या आवाक्यात नाही अशा गोष्टींवर आम्ही विचार का करावा? जे विचार करण्याची तुमची capacity नाही अशा गोष्टींवर तुम्ही "का" विचार करता मला (परमपूज्य बापू)कळत नाही.

समजा आई-वडील रस्त्यातून जात आहेत आणि त्यांनी एखाद्या तरुण मुलाचा accident बघितला, तर ते काय करतात घरी येऊन मुलाला बाईक नीट चालवली पाहिजे, त्यावर उपदेशाचे डोस देतात पण तेव्हाच हाही विचार येतो, "एवढा लहान मुलगा "का" गेला? काय प्रारब्ध असेल त्याचे?

रस्त्यात भिकारी बघून मनात प्रश्न येतो- "हा भीक "का" मागतो? शेजारच्या व्यक्तीने त्याच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले असे कळल्यावर "का?" ठेवले असेल असा प्रश्न मनात येतो. मला सांगा काय करणार तुम्ही? असा विचार करून, तुम्ही त्याच्या आई-वडिलांना जास्तीत जास्त काय करणार? त्याचेच अनुकरण करून तुमच्याही आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवाल बरोबर.

एक मनुष्य Mr.X आहे ह्याच्या घरी येतोय आणि त्याला त्याच्या घराला आग लागलेली दिसतेय मग त्याने काय करायला हवे? आग "का" लागली? ह्याचे संशोधन करत बसायला पाहिजे का? नाही. त्याने तेव्हा पाणी ओतून आग विझवायला हवी.

म्हणजेच आम्हांला "का?" ह्या प्रश्नाला मर्यादा घालता आली पाहिजे. आमच्या जीवनात "का" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. कारण आम्ही "का?" प्रश्नाला मर्यादा घालत नाही. सतत का? का? ही काव काव आमच्या मनात चालू असते. कावळ्यांना श्राद्ध घालण्यापेक्षा ह्या मनातल्या काव काव करणार्‍या कावळ्यांना श्राद्ध घाला. म्हणजे काय? तर सतत का? का? न म्हणत बसता, कामाला लागायचे.

समजा तुम्ही तरुण आहात आणि एक अतिशय सुंदर मुलगी जवळून चालली आहे. तर ही मुलगी इथे का? असा प्रश्न कोणी विचारून त्यावर संशोधन करत बसला तर काय होईल? त्याला मग त्या मुलीची लग्नाची वरात बघायची पाळी येईल. हेच जर का? प्रश्न न करता तिची व तिच्या आई-वडिलांची माहिती काढली, योग्य विचारणा केली तर त्या तुमच्या आवडत्या मुलीशी तुमचे लग्न जुळेल. ह्यावरून लक्षात येते की, "का?" ह्याचे प्रमाण प्रत्येक माणसासाठी प्रत्येक क्षणाला वेगळे आहे. कुठल्या "का?" ची सोबत धरायची व कुठल्या "का?" ला बाजूला सारायचे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक क्षण हा कुठल्या ना कुठल्या "का?" सोबत निगडित असतो. कारण मनुष्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे "मी ह्या मृत्युलोकात "का?" आलो. कोणी विचारत का - "मी "का" मेलेलो नाही?" "देवा मी "का" जिवंत आहे?" जोपर्यंत तुम्ही ह्या मृत्युलोकात आहात तोपर्यंत हा "का?" प्रश्न तुमची साथ सोडत नाही

आपण जन्माला येतो त्याला आपण मृत्युलोक म्हणतो आणि ह्या मृत्युलोकातून बाहेर पडण्याला मृत्यू म्हणतो. पण एक कायम लक्षात ठेवा, श्रद्धावानासाठी नेहमी जन्म म्हणजे परमात्म्याच्या जगातून मृत्युलोकात जन्म असतो व मृत्यू म्हणजे त्याचा परमात्म्याच्या जगात जन्म असतो. त्यामुळे मृत्यूचे भय ठेवण्याची आवश्यकताच नाही. सोप्या भाषेत समजून घेऊया समजा माझी दोन घरे आहेत. एक मद्रासमध्ये आहे तर एक मुंबईत आहे. मी जेव्हा मद्रासमध्ये असणार तेव्हा मुंबईत नसणार बरोबर पण दोन्ही घरे ही भारतातच आहेत. त्याचप्रमाणे परमात्म लोक व मृत्युलोकाचे असते. म्हणजे मी कुठेही असलो तरी आई चण्डिकेच्या भर्गलोकातच असतो.

"सच्च्या श्रद्धावानाला मृत्यू नसतो, तो एक तर मृत्युलोकात जन्म घेतो नाही तर परमात्मा लोकात जन्म घेतो."

प्रत्येक श्रद्धावानाने नीट लक्षात घेतले पाहिजे की त्याला मृत्यू नाही. जो कोणी म्हणून "तो" आहे, त्याला आपले मानून त्याच्यावर विश्वास ठेवतो, श्रद्धावानाच्या नऊ निष्ठा आत्मसात करण्याचा प्रयास करतो, ह्या अनिरुद्धाला आपला मित्र मानतो त्याला मृत्यूचे भय नाही. अशा श्रद्धावानाच्या प्रत्येक जन्माच्या वेळेस "तो" जो कोणी आहे "तो" त्या श्रद्धावानाच्या हाताला धरून मृत्युलोकात पृथ्वीच्या शाळेत घेऊन येईल. आई जशी बाळाला हात धरून घरून शाळेत आणते व परत घरी घेऊन जाते. तसेच श्रद्धावानाच्या हाताला धरून पृथ्वीच्या शाळेत आणणारा तोच व परत पृथ्वीच्या शाळेतून आपल्या घरी परमात्म लोकात नेणाराही तोच. इथे सोबत ना पाटी ना पेन्सिल. इथे पाटी म्हणजे आमचे प्रारब्ध, नशीब. तो पृथ्वीवर श्रद्धावानाला घेऊन येतो ते त्याची पाटी कोरी करण्यासाठी, जे काही त्यावर लिहिले आहे, ते पुसून स्वच्छ करण्यासाठी.
असे जे कोणी श्रद्धावान त्याच्या मार्गावरुन चालण्याचा थोडासा जरी प्रयास करत असतील अशा सर्वांना "तो" जेव्हा येतो तेव्हा त्यांना स्वत:कडे खेचून घेतो. बाकिच्यांना नाही. शाळेत आल्यावर शिकावेच लागते, अभ्यास करावा लागतो, मारही खावा लागतो, पण हे सगळे करण्यासाठी आमचे भले व्हावे म्हणूनच -

"काय गोड गुरुची शाळा"

गेल्या आठवड्यात अधिक मास सुरू झाला. ह्या मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. ह्या अधिक मासात नेहमी अधिक गोष्ट करायची असते. ह्या अधिक महिन्यात एकदा तरी त्या आदिमातेसमोर व तिच्या पुत्रासमोर उभे राहून बोला, "मी कधीच मरणार नाही. मला दोन्हीकडे जन्मच आहे."

मी(परमपूज्य बापू) जो कोणी आहे, राक्षस म्हणा, शत्रू म्हणा, मित्र म्हणा, काहीही म्हणा, जो कोणी "माझा" झाला त्याची पाटी कोरी करण्यासाठी मी आलो आहे. ह्या जन्मात जो कोणी माझा (परमपूज्य बापू) झाला व माझा बनून राहिला त्याची सगळी पापे मी वरतीच धुऊन टाकणार आहे. त्यामुळे मनापासून एकदा तरी ह्या अधिक मासात त्या आदिमातेसमोर व तिच्या पुत्रांसमोर उभे राहून म्हणा, कुठल्याही भाषेत म्हणा. जो कोणी माझा होऊन माझ्यावर विश्वास ठेवून हे वाक्य बोलणार असेल तर त्याचे चुकीचे शब्द सुधारण्याची जबाबदारी माझी.

आज मला इथे प्रत्येकाला माहिती पाहिजे की, "मी जो कोणी आहे तो कधीच मरणार नाही आणि प्रत्येक वेळी ह्यापुढे जन्म घेताना आमच्यासोबत पापाचा अंश बिलकुल नसणार. म्हणजे ह्यापुढे आम्ही फक्त सुख भोगण्यासाठीच येणार. तुम्ही(परमपूज्य बापू) सुरू केलेलं व्रत पूर्ण होण्याआधीच एवढी gurantee कशी काय देता बापू? परत "का"? आला.

तर एवढेच सांगतो, की हे तुमचे क्षेत्र नाही. पृथ्वी उत्पत्तीपासून जर आतापर्यंतचे सगळे मानव जरी एकत्र आले व सगळ्यांनी हातात मोठ-मोठी शस्त्रे, मिसाईल्स घेतली आणि माझ्या हातात काहीच नाही, कुठलेही शस्त्र नाही, तरी माझे challenge आहे. अशा अख्ख्या संघाने समोर येऊन दाखवावे. हवं तर येताना भूतांना, पिशाश्चांना, राक्षसांना घेऊन या, तरीदेखील एकच सांगतो - "मी(परमपूज्य बापू) लई भारी आहे". मी (परमपूज्य बापू) आज पहिल्याच गुरुवारी अधिक मासात व्रत सुरू केले आणि त्याचक्षणी माझ्या(परमपूज्य बापू) आईने त्याचे उद्यापन पण करून घेतले व आशीर्वादही दिला आहे. कारण फक्त तिचे प्रेम.

ह्या प्रवचनाची CD Centre ला पण येईल. तुम्ही तुमच्या नातलगांना आतासुद्धा सांगू शकता. प्रत्येक व्यक्तीला (श्रध्दावानाला) ज्या क्षणी ही माहिती मिळेल. त्या व्यक्तीसाठी आताचा क्षण हा त्या क्षणापासून सुरू होईल. आपण नेहमी गुरुक्षेत्रम मंत्र इथे घेतो. पण आज आपण माझ्या आईचा गजर करायचा आहे. सगळ्यांनी मिळून उभे राहून आज जल्लोष करायचा आहे.

आज जे काही तिने माझ्या (परमपूज्य बापू) मित्रांना दिले आहे, त्याचा आनंद मला जोरदारपणे साजरा करायचा आहे.

॥ हरि ॐ ॥

Monday, July 3, 2023

श्रद्धावानांचे पथदीप - भाग १ important

From Bapu's whatsApp group

*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -३०🌟*
 
    *🔆 श्रद्धावानांचे पथदीप - भाग १🔆*

*१. आद्यपिपा :*



*आद्यपिपा = एक भक्तिपूर्ण प्रवास*
- समीर दत्तोपाध्ये

जन्म आषाढी एकादशी १९३३ आईचे नाव -लक्ष्मी
वडिलांचे नाव -पांडुरंग

वडिल पांडुरंगरावांची संतती जगत नसल्यामुळे १९१५ साली ते शिरडीस साईनाथांच्या दर्शनासाठी गेले व त्यानंतर सर्व अपत्ये सुखरुप राहिली.

काकांच्या जन्मानंतर त्यांच्या आठवणीतील पहिले शिरडी दर्शन १९४० साली झाले. त्याच रात्री द्वारकामाईत बसून काकांच्या वडिलांनी त्यांना उदीचे महत्व समजावून सांगितले. त्या दिवसापासून काकांची साईभक्ती अत्यंत दृढ झाली.

१९४५ साली शिरडीस गेले असताना द्वारकामाईमध्येच काकांची माधवराव देशपांड्यांचे पुत्र उद्धवराव व म्हाळसापतींचे पुत्र मार्तंडबाबा ह्यांच्याशी भेट झाली व त्या वर्षापासून काकांनी श्री साई सच्चरिताचे दरवर्षी कमीतकमी चार सप्ताह करण्याचा निश्चय केला; रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा. ह्यात कधीही खंड पडला नाही.

विवाह - ७ मे १९६० रोजी प. पू. सुचितदादा व समीरदादांच्या मातोश्रींशी (सुनंदा) काकांचा विवाह झाला व स्वप्नदृष्टांतानुसार साईंच्या आज्ञेने त्यांचे नाव शुभदा ठेवले.

विवाहानंतर पत्नीच्या संपूर्ण सहकार्यामुळे काकांच्या भक्तिप्रवाहाची जोरदार वाटचाल सुरु झाली. काका सदैव आपल्या सहधर्मचारिणीच्या सहकार्याचे तोंड भरून कौतुक करत असत.

काकांच्या जन्मदात्या आईचे निधन १८ नोव्हेंबर १९४१ साली झाले होते. आईच्या वियोगाचे दुःख हळुहळु साईभक्तित रुपांतरीत होऊ लागले. काका शाळेतील काही मित्रांबरोबर अनेकवेळा शंकराच्या मंदिरात संध्याकाळी भजनासाठी जात असत. एकदा एस.एस.सी. (मॅट्रीक) पास झाल्यानंतर काका शंकराच्या देवळात गेले असताना तेथे साईस्तवनमंजिरी वाचत बसले होते. वाचून पूर्ण होताच एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्या समोर येऊन उभा राहिला व त्यांनी विचारले, "बाळ, तुला काय हवे आहे ?" काकांनी उत्तर दिले, "मला देहधारी साई हवा आहे." तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, "मग तू गृहस्थाश्रमी झाल्यानंतर तिर्थक्षेत्रांच्या १०८ यात्रा व संतस्थानांची १०८ दर्शने पूर्ण कर." एवढे बोलून तो | वृद्ध ब्राह्मण हसू लागला. काकांनी विचारले, "पण मी सामान्य माणूस आहे. देहधारी साईचे रुप वेगळे असेल तर ओळखणार कसे?" तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, "त्यावेळेस मीच तुला साक्ष पटवून देईन." काका त्या ब्राह्मण गृहस्थांच्या व्यक्तिमत्वाने खूपच भारावून गेले होते. त्या ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार त्यांनी सर्वकाही करण्याचे ठरविले. विवाहानंतर त्यांनी नोकरी व प्रपंच ह्यातून वेळ काढून सतत संतस्थानदर्शन व तिर्थक्षेत्र यात्रा ह्यांचा झपाटा लावला. शिरडी, पंढरपूर, गोकर्ण, महाबळेश्वर, तिरुपती, गिरनार, परळीवैद्यनाथ, घृष्णेश्वर, रामेश्वरम्, प्रयाग, कन्याकुमारी, इत्यादि तिर्थक्षेत्रांच्या व आळंदी, देहू, गणेशपुरी, हुमणाबाद, गगनबावडा, सासवड, पंतबाळेकुंद्री स्थान, कलावती आईंचे हरिमंदिर, सिद्धरुढ स्वामींचा मठ, पावस, शेगाव अशा संतस्थानांच्या त्यांनी अनेकवार यात्रा केल्या.

इ.स. १९९६च्या पहिल्या रसयात्रेमध्ये सर्व मंडळींना घेऊन बापू शिरडीतील द्वारकामाईत गेले होते. तिथून मग बापू सर्वांना घेऊन शिरडीतील म्हाळसापतींची समाधी, कनीफनाथ मंदिर, इ. स्थळे दाखविण्यासाठी निघाले. काका मात्र द्वारकामाईतच बसून राहिले. त्यावेळेस प. पू. सुचितदादांनी काकांना साईस्तवनमंजिरी पोथी✨️ दिली व तुमच्याकडे ठेवा म्हणून सांगितले. काका श्री साईसच्चरिताचा एक अध्याय वाचून उभे राहिले व द्वारकामाईतील बाबांच्या तसबीरीसमोर लोटांगण घालण्यासाठी गेले. तिथे धुनीजवळ एकाएकी काकांच्या खिशातून दादांनी दिलेली साईस्तवनमंजिरीची पुस्तिका खाली पडली. ती उचलताना "अरे, ही वाचण्यासाठीच तुला मी इथे थांबवले आहे." असा आवाज काकांना ऐकू आला. त्यासरशी काकांना शंकराच्या मंदिरातील ती जुनी गोष्ट आठवली व ते खाली उतरून स्तवनमंजिरी पठणास बसले. काकांचा तो पूर्ण दिवस व रात्र बेचैनीत गेली. सुचित आपणास काहीच सांगत नाही. मीनावनी, चौबळ आजोबा वगैरे मंडळीतर निःसंदिग्धपणे बापूंविषयी सांगत आहेत व आपल्याला अजून काहीच प्रचिती येत नाही ह्या विचारांनी काका खंतावले होते.

असाच काही काळ द्विधा मनःस्थितीत गेल्यानंतर १९९७च्या गुरुपौर्णिमेला नेहमीप्रमाणे श्रीसाईसच्चरिताचा सप्ताह केल्यानंतर रात्री झोपताना काकांनी साईनाथांना स्पष्ट मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना केली. झोपेत त्यांना स्वप्नामध्ये तो शंकराच्या देवळातील प्रसंग परत तसाच्या तसा दिसला. काकांनी सकाळी उठताच शांतपणे निश्चय केला की आता लवकरात लवकर १०८ संख्या पूर्ण करायचीच. त्यानंतर पहिल्या अश्वत्थ मारुती उत्सवाच्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीस शेंदूर लावून बापू आपल्या आसनावर बसताक्षणीच काका एका पूर्ण वेगळ्याच भानरहित अवस्थेमध्ये गेले. त्यांना शंखचक्रबाणधारी स्वरूप दिसत होते. काकांना हाताला धरून चौबळ आजोबा स्टेजकडे गेले. हनुमंताच्या मूर्तीसमोर येताच काका पूर्ण भानावर आले होते. काकांच्या मनाची परत एकदा द्विधा मनःस्थिती सुरु झाली. परंतु गुरुपौर्णिमेच्या रात्री झालेला जुन्या घटनेचा स्वप्नदृष्टांत आठवून काकांनी निर्णय घेतला की | अगदी काहीही अनुभव आला वा काहीही दिसले तरीही जोपर्यंत म्हातारा ब्राह्मण खूण पटवणार नाही तोपर्यंत आपण धीर धरायचा.

पहिल्या अश्वत्थ मारुतीचा तो दिवस.

१९९९ साली त्यांची ही संख्या पूर्ण झाली. प.पू. अनिरुद्ध बापूंशी प. पू. सुचितदादांचे मित्र म्हणून १९८५ साली त्यांची ओळख झालेली होती व १९९५ पासून बापूंच्या भक्तिमार्गातही काका आलेले होते. पण सर्वात महत्वाचा निर्णायक क्षण ठरला तो इ.स. १९९९च्या धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी. त्या दिवशी जुईनगर येथे अरुंधती मातेने श्री विद्यामकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्ये ह्यांच्या तसबीरीचे अनावरण केले. त्यांचा चेहरा बघताच काकांना शंकराच्या देवळातील वृद्ध ब्राह्मण तो हाच ह्याची पूर्णपणे खात्री पटली व काका पूर्णपणे निश्चिंत झाले. त्यानंतर लवकरच व्यंकटेश महोत्सवामध्ये काकांना जप चालू असतानांच पूर्णपणे साईरुपाचे दर्शन झाले व काकांनी अनेक वर्षांचा 'ॐ साईनाथाय नमः' हा चालू असलेला जप ९ मे २००० पासून 'ॐ साईनाथाय अनिरुद्धाय नमः' असा सुरु केला.

१३ नोव्हेंबर २०००ची रात्र काकांसाठी व सर्व बापूभक्तांसाठी अत्यंत भाग्याची ठरली. त्याच दिवशी संध्याकाळी बापूंनी काकांची पिपिलीका पांथस्थ पदावर नियुक्ति करून कार्य सुरु करण्याची आज्ञा दिली होती. त्याच रात्री मध्यरात्री झोपेतून काका एकाएकी उठून बसले व त्यांना दुसरा अभंग स्फुरला. हा अभंग म्हणजे काकांची बापूंच्या चरणधुळीमध्ये लोळण्याची आत्यंतिक इच्छा.

त्यानंतर मात्र काकांचा आध्यात्मिक प्रवास एका वेगळ्याच उंचीवरून अत्यंत जोरदारपणे सुरु झाला. २००४च्या रामनवमीच्या दिवशी रात्री उत्सव संपवून प. पू. बापू हॅपी होममध्ये रात्री दीड वाजता परत आले. जेवणानंतर बापू, सुचितदादा, काका व मी गप्पा मारीत बसलो होतो. बरोबर सोडे तीन वाजता बापू झोपाळ्यावरून उठून उभे राहिले व काकांना म्हणाले, "आज आताच्या आता तुम्ही समीरला गुरुमंत्र द्या." काका म्हणाले, "तुमची आज्ञा आहेच, पण समीरला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार आहे असे वाटत नाही." तेव्हा बापू हसून म्हणाले, "अरे, जेव्हा हजारो मंडळी आमच्या तिघांच्या जयजयकारानंतर समीरच्या आधी तुझा जयजयकार करतात तेव्हा का ऑब्जेक्शन घेत नाहीस ?" काका म्हणाले, "देवा तुझ्याशी वादात कोण जिंकणार ? तू सांगशील ते करतो.' बापूंनी काकांना डोळे बंद करून श्रीसाईसच्चरित उघडण्यास सांगितले व एक बोट पानावर कुठेही ठेवण्यास सांगितले. ती ११व्या अध्यायातील १५२वी ओवी होती. तीच ओवी बापूंनी काकांकरवी मला गुरुमंत्र म्हणून दिली.

पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंती पूर्ण निष्काम ।। पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।।

बापूंचा खेळ पाहून मी स्तिमीतच झालो. माझा दादा हा बापूंचा शिष्य, माझे वडिल सुचितदादांचे शिष्य आणि मी काकांचा शिष्य (माझ्या वडिलांचा). त्यानंतर काकांनी बापूंची पाय धरून विनवणी केली, "एक पुत्र माझा गुरु झाला व दुसरा पुत्र माझा शिष्य झाला. पण आता मात्र पुढे कुणाचेही गुरुत्व मला देऊ नका. व्यंकटेश जपाच्या दिवशी मी तुमच्याकडे एकच मागितले होते की मला मानसन्मान, प्रसिद्धी व मोठेपणा नको. आजही मी परत तेच मागतो आहे. माझी अंतयात्रासुद्धा कुणा थोर भक्ताची म्हणून नाही तर फक्त 'सुचितचा बाप' म्हणूनच निघू दे कारण तीच माझी सुखद गोष्ट आहे." बापू म्हणाले, "आतापर्यंत सगळं तुझ्या मनासारखं झालं ना !” तेव्हा काका पटकन उद्गारले, "हो, पण ९६ पासून ९९ पर्यंत मला का रखडवलेस ?" बापू म्हणाले, "मी रखडवले नाही. तूच तुझ्या चुकीच्या गणितांमुळे रखडलास. तुझी १०८ स्थानांची बेरीज ९७ रामनवमीलाच पूर्ण झाली होती. पण गुरुवारच्या प्रवचनस्थळाला तू तुझ्या बेरजेत न मोजल्यामुळे तुझ्या मनातील १०८ ही संख्या मात्र पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच त्या स्वप्नातील म्हाताऱ्याचा म्हणजेच गोपीनाथ शास्त्री पाध्यांचा फोटो ९७च्या रामनवमीला पाहूनही तू ओळखू शकला नाहीस, तुला खूण पटू शकली नाही, कारण रामनवमीच्या वेळेचा फोटो कोट पगडीतला होता व तुझ्या अनुभवातील म्हातारा शेंडी व शालधारी होता." काका एकदम बापूंच्या चरणांवर जाऊन पडले व त्याच दिवसापासून काकांनी अखंड जपास सुरुवात केली.

काकांच्या आध्यात्मिक प्रवासातील बऱ्याच घटनांचा साक्षीदार बनण्याचे मला मिळाले पण काकांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, बापूंनी ज्या वेळेस माझ्यासमोर काकांना सांगितले की आता काही तासच उरले आहेत तेव्हा काकांनी बापूंच्या हातात दिलेला माझा हात.

॥ हरि ॐ ।।

( कृपासिंधू मॅगझिन - सप्टेंबर २००७)

*🔅महायात्रिक (२२ व्या अध्यायाची कथा) -🔅*

धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी झालेला हा अत्यंत सुंदर संवाद चौबळ आजोबा: अरे सुरेश (म्हणजे आद्यपिपा सुरेशचंद्र दत्तोपाध्ये- परमपूज्य श्री सुचितदादा आणि समीरदादांचे वडिल),हा श्रीविद्यामकरंदाचा (श्री गोपिनाथशास्त्री पाध्ये ) फोटो बघितल्यावर तुला काय वाटतं रे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं सांगू का? माझी नजर त्यांच्या डोळ्यांवरुन हलतच नाही. किती तेजस्वी,करारी, परंतु तरीहीकिती पवित्र आणि प्रेमळ भाव आहेत नाही?
चौबळ आजोबा: खरंआहे, पूर्णपणे खरं आहे. त्यांचे डोळे म्हणजेच संपूर्ण श्रीविद्यामकरंदत्व .आद्यपिपा (सुरेशचंद्र) :म्हणजे काय हो? मला काही जड शब्द कळत नाहीत व मला मोठया तत्वांची वगैरे खरं म्हणजेआवडच नाही.
चौबळ आजोबा: अगदी बरोबर बोललास , कसली आली आहेत मोठी तत्व आणि त्यांचे गूढार्थ? तो सदगुरुच एक खराव मोठा .तो समजायला मोठयामोठया बातांचा काही उपयोग होत नाही.
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :माझ्या मनातलं बोललांत बापूंच प्रवचन म्हणूनच मला खूप भावतं कारण सर्व उलगडून सांगतानासुद्धा बापू कधीच त्याच्यामध्ये क्लिष्टपणा आणत नाहीत व सहजपणे आपला मार्ग सापडतोच.
चौबळ आजोबा: तू काय बापूंना प्रवचनकार समजतोस ?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :मुळीच नाही.चौबळ आजोबा:मग ते कोण आहेत?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं म्हणजे वयाने, अनुभवाने ,भक्तीने व नात्याने तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात.त्यामुळे तुम्हीच"बापू कोण आहेत ? हे मला सांगायला हवं.चौबळ आजोबा: अरे,"दुसर्‍याने दिलेलं कितीसं पुरणार? ह्या अर्थाचं साईबाबांचं वचन हेमाडपंतानी लिहून ठेवलं आहे नाहीका? ते आठव व स्वत: त्यांचा मागोवा घेत राहा.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : मागोवा घ्यावासा वाटतो पण ती ३२व्या अध्यायातील शोध घेणार्‍या ४ जणांची व वणजार्‍याचीकथा आठवली की वाटतं आपण उगीच वेडयासारखं वागता कामा नये. माझा साई त्याअध्यायाप्रमाणेच मला नक्की येऊन भेटेल पण माझा १ हट्ट आहे .साईने एकदा तरी मलात्यांच विद्यमान रूप बाजूला सारुन त्या साईरुपातच ओळख पटवून दयावी.
चौबळ आजोबा: हा हट्ट कशासाठी? तुला अजून पटलं नाही काय ? तुला काय त्याची परीक्षा बघायची आहे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : नाही , नाही तसं मुळीच नाही. पण ’आपल्याला समजलं ते आपल्या प्रयत्नामुळे ’ असं झाल्यास नसतां अंहकार डोक्यात चढेल ह्याची सदैव भीती वाटते. लहानपणापासून अनेकवार शिरडीसगेलो, साईसच्चरिताची पारायणे केली ,पण का कोणास ठाऊक ,कायम आपल्याला अंहकार होईल, आपण साईंपासून दूर जाऊ अशी भीती मनांत घर करून राहते.
चौबळ आजोबा: मगं आजच्या आज ही भीती बापूंच्या हातांत सोपविली असं म्हण ,आत्ताच्या आत्ता म्हणं.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : त्यांना किती त्रास द्यायचा , जीभ वळत नाही.
(तेवढयात जिन्यावरून उतरणार्‍या बापूंना चौबळ आजोबांनी हाक मारली.)
चौबळ आजोबा: बापू , हा वेडा बघा. आता ह्याला जास्त वेळ तळमळत ठेवू नका .
बापू : काका, २२व्या अध्यायाचा अभ्यास करा.त्याचंच चिंतन करीत राहा. आतापर्यंत माणसाच्या वेगाने वाचत होतातआता मुंगीच्या वेगाने वाचत जा. हा पिपीलिका (मुंगी) मार्गच तुमचा आहे.
चौबळ आजोबा: अरे सुरेश, बघतोस काय? ताबडतोब पायावर डोकं ठेव. अरे, अनुग्रह झाला, आञा मिळाली .आता मुंगीहो आणि साखर खा.

- समीरदादा


*२. चौबळ आजोबा :*

🔅ज्यांना वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे सन् १९१७ साली सद्गुरु श्रीसाईनाथांच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभले ते श्रेष्ठ भक्त म्हणजे श्री. शंकर हरिभाऊ चौबळ अर्थात चौबळ आजोबा.

🔅 १९९६ साली त्यांना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या रूपात पुन्हा देहधारी सद्गुरुची प्राप्ती झाली आणि त्यांचे जीवन सुखाने व आनंदाने मोहरून गेले.

🔅श्री. चौबळ आजोबा रोज १६००० वेळा साईनामाचा जप करीत असत. त्यांच्या मृत्युसमयी सद्गुरु श्रीअनिरुद्ध त्यांच्या शेजारी बसून होते. मृत्युसमयी चौबळ आजोबांच्या मुखात अखंड साईनामाचे आवर्तन सुरू होते.

🔅सद्गुरु श्रीसाईनाथांना व सद्गुरु श्रीअनिरुद्धांना एकाच जन्मात प्रत्यक्ष बघणारे एकमेव साक्षिदार, चौबळ आजोबा म्हणजे सद्गुरु भक्तीतील एक श्रेष्ठ रत्न.

( माहिती संकलन :ओमसिंह नवलाखे )

*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
      *🙌नाथसंविध्🙌*