Sunday, September 5, 2021
sunderkhand and gurucharitra 14 adhay
!!हरि ॐ!!
उद्या *श्री हनुमान पौर्णिमा*
आपल्या संस्थेच्या दृष्टिने २ महत्वाच्या घटना:-
(१)
२६ मार्च २०१० रोजी , *हनुमान पौर्णिमेच्या पवित्र दिनी* , श्रीगुरूक्षेत्रम मध्ये ,"गुरूक्षेत्रममंत्राच्या" गजरात ,
*श्रीत्रिविक्रमलिंगाची स्थापना* करण्यात आली.
(२)
मागील वर्षी १९ एप्रिल २०१९ रोजी,
*हनुमान पौर्णिमेच्या पवित्र दिनी* ,
श्रीगोविद्यापिठम् येथे *श्रीदत्तमुर्तीची* स्थापना झाली.
*प.पू. बापूंनी* , हनुमान पौर्णिमेचे महात्म्य सांगितले आहे की,
*#*
जानकी मातेने हनुमंतास आशिर्वाद दिला तो हाच पवित्र दिवस!!-
अजर अमर गुननिधि सुत होहू।
करहुॅं बहुत रघुनायक छोहू।
करहुॅं कृपा प्रभु अस सुनि काना।
निर्भर प्रेम मगन हनुमाना।।
---सुंदरकांड/९९.
*हे पुत्रा!तू अजर -अमर आणि गुणांचा खजिना होशील व रघुकुलनायक श्रीरामप्रभु तुझ्यावर प्रेमछत्र धरतील.* *प्रभु कृपा करतील हे कानाने ऐकून मारूतीराय पूर्ण प्रेमात निमग्न झाले व त्यांचे मन रामाच्या प्रेमाने भरभरून वाहू लागले.*
*#*
पुढे हनुमंताने लंका दहन ही याच दिवशी केले.
*हरि प्रेरित तेहि अवसर चले मरूत उनचास।*
*अट्टहास करि गर्जा कपि बढि लाख अकास।।*
---सुंदरकांड/१४८.
(अर्थ:त्यावेळेस प्रभुंच्या प्रेरणेने ४९ प्रकारचे वारे वाहू लागले.
मारूतीराय हसून गर्जले व वाढता वाढता आकाशाला जाऊं भिडले.)
*#*
या ओवीचा अर्थ समजावून सांगताना *प.पू.बापूंनी , श्रीगुरूचरित्रातील १४ अध्यायाचे महात्म्य तुलसीपत्र अग्रलेखांतून* विशद केले आहे .
*#* *तुलसीपत्र ३०७/३०८/३०९*
*सारांश*-
या ओवीतील घटनेमध्ये संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी म्हणतात की , *" हरिच्या प्रेरणेने ४९ प्रकारचे हे वारे वाहू लागले".*
ह्याचा अर्थ , संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी प्रत्येक श्रध्दावानास अगली ठसठशीतपणे दाखवून देत आहेत की हा हरि श्रध्दावानांचा कसा पक्षपाती आहे, सहाय्यकर्ता आहे व श्रध्दावानांच्या भक्तीने आणि मर्यादापालनाने संतुष्ट होऊन, त्या श्रध्दावानांना हानी करणा-यांच्या जीवनात ह्या मरूत् - गणांना कशा रितीने क्रोधित करतो व त्यांचे देहच काय ,घरच काय , नगरच काय, परंतु अख्खे सुदैवच जाळून टाकतो.
हे ४९ मरूत्-गण श्रध्दावानांस ४९ मार्गांनी सहाय्य अर्थात,तर तेवढ्याच ४९ मार्गांनी श्रध्दावानांच्या शत्रूंची वासलात लावतात.
ह्याचा अर्थ:-
हे ४९ मरूत्-गण श्रध्दावानांच्या आकस्मिक आरिष्टांचे व घोर कष्टांचे निवारण करतात आणि श्रध्दावानांच्या शत्रूंवर घोर आरिष्ट आणतात.
.............आणि ह्या सर्वच्या सर्व ४९ मरूत्-गणांना घेऊन साक्षात श्रीहनुमंत येऊन बसला आहे,तो गुरूचरित्रातील १४व्या अध्यायात आणि म्हणूनच ह्या १४व्या अध्यायात ४९ ओव्या आहेत.
प्रत्येक ओवी म्हणजे एकेक मरूत्-गण व
*संपूर्ण अध्याय म्हणजेच "साक्षात श्रीहनुमंत"*
.......आणि म्हणूनच हर्ता अध्यायाचे वर्णन अगदी रचना काळापासून पुढील शब्दांत केलेले आपण ह्या अध्यायाच्या आरंभी वाचतो,
*" आकस्मिक अरिष्टाचे निरसन करणारा व भक्तिवात्स्ल्याने भरपूर रसरसलेला श्रीगुरूचरित्र अध्यायांतील मेरूमणी श्रीगुरूचरित्र अध्याय १४ वा"*
या अध्यायात ,सायंदेवास जिवंत जाळण्याची इच्छा असणा-या त्या यवनराजाचे ह्रदयच श्रीगुरू जाळतात व त्या अध्यायाच्या शेवटी त्या श्रध्दावान सायंदेवास स्पष्टपणे ग्वाही देतात;
*न करा चिंता असाल सुखें।* *सकळ अरिष्टें गेलीं दु:खें।* *म्हणोनि हसरत ठेविती मस्तकें।*
*भाक देती तये वेळीं।।४४।।*
*#*
माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो, म्हणूनच *मी कळकळून तुम्हाला सर्वांना सांगत असतो की दररोज न चुकता हा श्रीगुरूचरित्रातील १४ वा अध्याय आयुष्यभर वाचत रहा,* *जेवढ्या जास्तीत जास्त वेळा वाचता येईल ,तेवढ्या जास्तीत जास्त वेळा वाचता आणि दर गुरूवारी मी स्वत: ह्या अध्यायाच्या पठणाने सद्गुरू श्रीदत्तात्रेयांचे पूजन करतो,त्यात माझ्या खांद्याला खांदा लावून सहभागी व्हा.*
*कारण हा श्रीहनुमंतच श्रध्दावानशिरोमणि आहे.*
अंबज्ञ,नाथसंविध्.
जय जगदंब जय दुर्गे!!
source: whatsapp
*||ॐ श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम: ||*
Saibaba information of 74 devotees
श्री साईबाबांच्या अवतारीत जीवनामध्ये एकूण ७४ व्यक्ती आल्यात व त्यांना त्यांच्या काळात बाबांचा सहवास व सानिध्य लाभले व बाबांचा कृपाशीर्वाद लाभला.
१) चांद पाटील -बाबांनी याला अलौकिक सामर्थ्याने अग्नि व पाणी निर्माण करून चिलीम पेटवून दिली.हरवलेली घोडी सापडून दिली. त्याच्या घरादाराचा पत्ता नसताही त्याचे घरी वास्तव्य केले व त्याची भरभराट केली.
२) म्हाळसापती यांना बाबांनी खंडोबाचे देवळात प्रथम दर्शन दिले. चावडीत व मशिदीत स्वतःबरोबर झोपायला दिले. साईबाबा हेच गुरु कळल्यावर अंतरीचे गुह्य म्हाळसापतींनाच सांगून बाबांनी विश्वासाने ३ दिवस ब्रह्मांडी प्राण नेऊन ठेवला व आपल्या प्राणाचे म्हाळसापतींकडून रक्षण करवून घेतले व त्यांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग शिकविला. आपल्या भक्तांच्या नवरत्न मालिकेत यांना अग्रस्थान दिले. पूजेचा मान दिला व स्वतःच्या कंठाला गंध लावू दिले.
३) माधवराव देशपांडे हा बाबांचा लाडका श्यामा. सख्य भक्तीचे उत्तम उदाहरण. मास्तरची नोकरी सोडावयास लावून जनसेवेचे व्रत दिले. विष्णूसहस्त्र-नामाची पोथी दिली. भयंकर सर्प विषापासून संरक्षण केले. काशी, प्रयाग यात्रा श्रीमंती थाटात घडवून आणल्या. आत्मज्ञान प्राप्ती करून दिली. यांना भक्त श्रेष्ठ मालिकेत महत्त्वाचे स्थान दिले व फार प्रेम केले.
४) तात्या कोते हे बाबांचे मामाच बनले. छोट्या तात्याला स्वतः बरोबर चावडीत, मशिदीत झोपायची परवानगी दिली. मशिदीचा जीर्णोद्धार करून घेतला. तात्याच्या पाटीलकीच्या अहंकाराचे दहन केले. त्यांच्या जरीचा शिरपेच मस्तकी बांधला. यांचे अत्यंत लाड केले. आईला बायजाबाईला दिलेल्या वचनाप्रमाणे स्वतःचे प्राण देऊन तात्याला दीर्घायुषी केले. दोन वेळा घोर अपघातातून वाचवले.भक्तश्रेष्ठ मालिकेतील हाही एक हिराच होय.
५) काकासाहेब दिक्षित ही एक महत्वपूर्ण व्यक्ती व बाबांनी दीक्षित नाव अमर राहावे म्हणून दीक्षित वाडा बांधून घेतला. बोकडाचा वध करण्याच्या निमित्ताने गुरूभक्ती करण्यास लावली.लक्षाधिशाला भिक्षाधीश बनविले पण पूर्ण मनःशांती देऊन 'तुला विमानातून नेईन' या दिलेल्या वचनाप्रमाणे खरोखरच नेले. भक्तश्रेष्ठ मालिकेत उच्च स्थानाला यांना नेऊन बसविले.
६) संत कवी दासगणू महाराज यांना पोलीसची नोकरी सोडायला लावली. संतचरित्रे लिहवून घेतली.स्वतःच्या अंगुष्ट द्वयातून गंगायमुना निर्माण करून प्रयाग तीर्थाचे स्थान घडविले.विठ्ठलरूपात दर्शन दिले. श्री दासगणू महाराज यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत श्रीरामनवमी उत्सव करवून घेतला. ईशावास्याचे कोडे मोलकरणी करवी उलगडून सर्वांभूती मीच वास करून आहे याचा साक्षात्कार घडवला. या श्रेष्ठ भक्तात उच्च स्थान दिले, व अपरंपार प्रेम केले. बाबा इतरांवर राग धरीत पण गणूंवर उत्कट प्रेम केले. उंची पोषाखाबद्दल कानउघाडणी करून नारदीय कीर्तन पद्धतीने कीर्तने करावयास प्रवृत्त केले.
७) गोविंदराव दाभोलकर यांना 'हेमाडपंत' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.अत्यंत मुत्सद्याची उपमा बाबांनी यांना देऊन स्वतःचा 'श्रीसाईसच्चरित' हा ग्रंथ लिहून घेतला. अनेकवेळा रक्षण केले. आपला अखंड सहवास देऊन सेवा करून घेतली. यांना भक्तश्रेष्ठीत उच्च स्थान
दिले. होळीपौर्णिमेच्या दिवशी छबी रूपाने गृहप्रवेश केला व अनुग्रह केला.
८) काकासाहेब महाजनी-यांना बाबांनी रामनवमी उत्सवाची प्रेरणा दिली.एकनाथी भागवत वाचावयास लावले. आपल्या सेवेची संधी दिली. अखंड सहवास दिला. 'श्रीसाईलीला' मासिकाचे संपादकत्व स्वीकारण्याची प्रेरणा देऊन ते कार्य
करून घेतले. भक्त श्रेष्ठात उच्च स्थानी त्यांना बसविले.
९) नानासाहेब चांदोरकर-यांना बाबांनी निरोपावर निरोप पाठवून शिरडीत खेचून आणले, खूप सेवा करून घेतली. जनसेवेची प्रेरणा दिली. अस्सल रजपूत वेष घेऊन टांगा, घोडा निर्माण करून त्यांच्या कन्येचे बाबांनी रक्षण केले. गीतेचे निरूपण स्वतः करून त्यांना आत्मबोध केला. मन विचलीत होऊ लागताच ते ताळ्यावर आणले. श्रेष्ठ भक्तात उच्च स्थान दिले. शिरडीत लोकांना अन्नपाणी, वाहन मिळण्यासाठी पुतण्याकडून सेवा करण्याची प्रेरणा दिली.
१०) बापूसाहेब बुटी हा कोट्याधीश माणूस असूनही साध्या निरोपासाठी कामे करून घेतली. त्यांचेकडून टोलेजंग वाडा बांधून घेतला. अनेक व्याधी निर्माण झाल्या असता, प्रसंगी सर्परूपाने काळ जवळ आला असता त्यांचे रक्षण केले.
अखंड सहवास दिला. प्रेम केले. उच्च स्थानी भक्त मालिकेत बसविले.
११) मेघा हा पोर वयाचा गुजराथी ब्राह्मण होता त्याची शंकरभक्ती जाणून त्याला आत्मलिंग दिले.त्रिशूल काढायची आज्ञा दिली. शिरडीतील सर्व देवांची पूजा करून घेतली एका पायावर उभा राहून आरती करण्याची इच्छा बाबांनी पुरवली. संक्रांतीचे वेळी सचैल स्नान घालण्यास त्यास अनुमती दिली. भक्तांच्या मालिकेत उच्चस्थानी ठेवले.मेघाचा मृत्यू होताच स्वतः रडलेच पण त्याचे शव फुलांनी शृंगारले. त्याचेवर निस्सीम प्रेम केले.
१२) बायजावाई ही तात्याची आई मानलेली होती व बाबांची मामी. रानोमाळ हिंडून श्रीबाबांना भाकरी भरवी. तिचे हाल चुकवण्यासाठी मशिदीत राहू लागले. तिच्या हातची भाकर खाऊ लागले. इतरांवर रागावणारे बाबा बायजाबाईच्या आज्ञेत वागत. तिच्यावर आईप्रमाणे माया केली. तात्याचे रक्षण करण्याचे दिलेले वचन स्वतःचा प्राण देऊन पूर्ण केले.
१३) राधाकृष्णा आई हिने मीरेसारखी बाबांची भक्ती केली.तिला उत्सव सुरू करण्याची प्रेरणा दिली. अज्ञात राहून सेवा करण्याची इच्छा पूर्ण केली. बाबांचे उष्टे खाण्याची इच्छाही पूर्ण केली. तिने मिरवणुकीचे सर्व साहित्य तयार केले उत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य पण तयार करण्याची तिची इच्छा पूर्ण केली.
१४) लक्ष्मीबाई शिंदे हिने प्रेमाने सेवा करून दिली. रोज २ वेळा तिच्या हातची भाकर खाल्ली. शेवया खाल्ल्या. तिची निरागस भक्ती पाहून तिला चांदीचे ९ रुपये मरणसमयी दिले व नवविधा भक्तीची माळ तिच्या गळ्यात घातली.
१५) बाळासाहेब देव यांना संन्यासाचे वेषाने दोन गृहस्थ बरोबर घेऊन देवांचे घरी भोजन करून त्यांची इच्छा तृप्ती केली. ज्ञानेश्वरी वाचनाचे मार्गदर्शन करून मार्गाला लावले.
श्रीसाईसच्चरिताची अवतरणिका लिहावयाची प्रेरणा दिली. भक्तमालिकेत मानाचे स्थान दिले.
१६) बापूसाहेब जोग यांना बाबांनी रोजची दुपारची आरती करावयाची कामगिरी दिली. चावडी सुधारणा करून घेतली. वैराग्य प्राप्त होण्याची इच्छा पूर्ण करून साकुरीस वास्तव्य करावयास लावले. भक्तमालिकेत उच्च स्थान दिले.
१७) काशीराम शिंपी यांचा भोळा भक्तीभाव पाहून बाबा याचेवर संतुष्ट होते. अहंकाराचा नाश केला. अतीव श्रद्धेचे फळ म्हणून चोरट्यांपासून रक्षण केले व मानाची तलवार मिळवून दिली. बाबांनी काशीरामाने शिवलेले कपडेही काही वेळ घातले.
१८) भागोजी शिंदे हा महाव्याधीग्रस्त असून सुद्धा त्याचे कडूनच बाबानी आपली सेवा करून घेतली. हाताला तेल लावणे, लेंडीबागेपर्यंत बरोबर टमरेल घेऊन जाणे.बाबांवर छत्री धरणे ही सेवा करून घेता घेता त्याची व्याधी बरी केली. भक्त श्रेष्टात उच्च स्थान.
१९) रा. ब. मोरेश्वर प्रधान ह्यांना बाबांनी स्वतःच्या सहवासात राहू दिले. सेवा करू दिली. लेंडीबागेत आमूलाग्र बदल करून ती सुंदर बनविण्याची प्रेरणा दिली. भक्त श्रेष्ठात उच्च स्थान यांना बाबांनी दिले.
२०) रा. व. साठे यांना बाबांनी लग्न करावयास लावले. पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद गुरुचरित्राचे दोन सप्ताह पूर्ण होताच अनुग्रह केला. लोकांच्या सोयीसाठी आणि साठ्याचे नाव चिरंजीव होण्यासाठी वाडा बांधण्याची प्रेरणा दिली.
२१) दादा केळकर हे एक म्हातारे निःस्सीम मक्त. कट्टे ब्राह्मण पण होते. यांना सागुती आणण्याची आज्ञा करून परीक्षा घेतली. पंडीतांचे निमित्त करून आपण ब्राम्हण च आहोत हे पटवून दिले. पूर्ण मनःशांती देऊन सेवा करून घेतली. श्रेष्ठ भक्तमालिकेत स्थान. गुरुपूजा करण्याची प्रेरणा दिली.
२२) तात्यासाहेब नूलकर ह्यांनी स्वतःची सेवा करून घेता घेता लोकांची सेवा करून घेतली. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी स्वस्वरुप दाखवून साईमय केले. भक्तमालिकेत उच्च स्थानी बसविले. गुरुपूजेचा मान दिला.
२३) नानासाहेब निमोणकर यांनी बाबांची सेवा करून घेता घेता इतरांची सेवा करून घेतली. अखंड सहवास दिला. प्रेम केले. भक्तमालिकेत उच्च स्थानी नेऊन बसवले. निशाणाचा मान अव्याहत चालू आहे.
२४) गोपाळ गुंड यांची बाबांनी यांची पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करून शनिदेवाच्या देवळाचा जीर्णोद्धार करावयाची आज्ञा. उरूस व रामनवमी एकाच वेळी
साजरा करण्याची प्रेरणा यांना दिली.
२५) हरिश्चंद्र पितळे ह्यांच्या अपस्मार व्यथित मुलाला बरे केले. चांदीचे ३ रुपये देऊन श्रीस्वामीसमर्थ अक्कलकोट यांच्या भक्तीचे पुनरुज्जीवन केले.
२६) बाळा पाटील नेवासकर हे दूर राहून भक्ती करीत असताना श्री बाबांचे स्नानाचे पाणी पिऊन राहाणे. सर्व उत्पन्न बाबांच्या चरणी. भक्तीभाव पाहून प्रथम वर्ष श्राद्धदिनी अब्रूचे रक्षण केले. कुटुंबावर माया केली. भुजंग रूपात दर्शन दिले. भक्त मालिकेत उच्च दर्जाचे स्थान.
२७) डॉ. पिल्ले यांना नारू रोगापासून मुक्त केले. अपरंपार माया केली. अखंड सहवास दिला. भक्तश्रेष्टात उच्च स्थान दिले.
२८) डॉ. पंडित यांच्या कडून स्वतःला गंध लाऊन देऊन पूजा करून घेतली. त्यांचे गुरु काका महाराज पुराणिक धोपेश्वरकर यांचे रूपात दर्शन दिले.
२९) रामदासी ह्यांना बाबांनी अध्यात्मरामायणाची दीक्षा दिली. विष्णूसहस्त्रनामाची पोथी पंचरानी गीता दिली.
३०) दादासाहेब खापर्डे यांच्या मुलाच्या ग्रंथी उटल्या होत्या. त्यांची पत्नी रडू लागताच अभय देऊन ते दुखणे आपले अंगावर घेतले. पती-पत्नींचा स्वतःभोवतीचा दृढभाव पाहून त्यांचेवर अनुग्रह केला. पत्नीला 'राजाराम राजाराम' असे नामस्मरण करावयास सांगितले.
३१) लाला लखमीचंद यांना छबी रूपाने दर्शन दिले नंतर शिरडी यात्रा घडवली.प्रत्यक्ष दर्शन दिलेच. सांजा भरपूर खायची इच्छा तृप्त करून पाठ, कंबर पोट यात उठणारा शूल नाहीसा केला.
३२) सखाराम औरंगाबादकरांची पत्नी-सबंध महिनाभर तिष्ठत ठेऊन तिची परीक्षा घेतली. भोळा व दृढ भाव पाहून तिची पुत्रकामना पूर्ण केली.
३३) वकील सपटणेकर यांचेवर बाह्याकारी क्रोध दाखवून अंतर्यामी प्रेम ठेऊन यांना बाबांनी दर्शन दिले. पुत्रकामना पूर्ण केली. संपूर्ण मनःशांती दिली.
३४) अप्पा कुलकर्णी हे सरकारी कामात तोहमत येईल या भीतीने घाबरले असताना पूर्ण अभय देऊन नेवाशास मोहिनी राजाचे दर्शन घ्यावयास लावले व रक्षण केले आणि पूर्ण मनःशांती दिली.
३५) दामूअण्णा कासार यांची पुत्र संततीची आस पूर्ण केली. व्यापारात नुकसान होणार होते. ते वेळीच इशारा देऊन निवारले. निशाणाचा मान दिला.
३६) तेंडुलकर पुत्र हे डॉक्टरी परीक्षेत नापास होणार या भयाने बसत नव्हता,पूर्ण आश्वासन देऊन बसविले व यश प्राप्ती करून दिली.
३७) गरीब चोळकराच्या नवसाला बाबा पावले. नोकरी कायम झाली. बिनसाखरेचा चहा पिणाऱ्या (साखर वर्ज्य करणाऱ्या) चोळकरांचे अंतर्ज्ञानाने मनोगत जाणून पूर्ण करून गोड साखरेचा चहा प्यावयास लावून पूर्ण अनुग्रह केला.
३८) रतनजी पारशी यांची पुत्रकामना पूर्ण केली.नांदेडचे मौल्वीसाहेब व आपण एकच अशी प्रचिती त्यांना आणून दिली
३९) मुळे शास्त्री हे षट्शास्त्रात निपुण असलेल्या शास्त्रीबुवांना हात न दाखवता घोलकर स्वामींच्या रूपात दर्शन देऊन आम्ही दोघे एकच ही प्रचिती दिलीच पण सोवळे ओवळे धर्म जाती यांच्याबद्दलचा भेदभाव नष्ट केला.अहंकार दवडला,
४०) काका वैद्य हे वणी देवीचे उपासक होते. जिकडे तिकडे फिरून मनःशांती लाभेना तेव्हा श्यामाकरवी शिर्डीस आणून आपले सहवासास ठेवून पूर्ण अनुग्रह केला व मनःशांती दिली.
४२) उपासनी महाराज यांना शिर्डीत खंडोबाचे देवळात कडक तपश्चर्या करावयास लावून, अनेक प्रकारे परीक्षा घेऊन आत्मज्ञान दिले. साकुरीस आश्रम उभारण्याची प्रेरणा. स्वतःचे और्वदैहिक त्यांचेकडूनच करून घेतले.
४२) खुशालचंद यांचेवर पुत्रवत प्रेम केले. मनास आले की राहात्यास जाऊन भेट घेत किंवा येण्यासाठी दृष्टांत देत असत.
४३) अण्णा चिंचणीकर हे स्पष्टवक्ता पण अंतर्यामी प्रेमळ, श्रद्धाळू साईपदी अनन्यभाव. त्यामुळे फार प्रेमाचा वर्षाव. चावडीच्या रूपाने अमरपद प्राप्त. भक्त मालिकेत श्रेष्ठ.
४४) धरमसी जेठाभाई ययांची सबीज द्राक्षे निर्बीज करून दाखवली. मनातले सर्व विचार अंतर्ज्ञानाने ओळखून त्यांच्या चंचल चित्ताला स्थिरता आणली.
४५) तुकाराम कोकाटे यांचेकडून श्रीबाबांनी पाणी तापवून घेतले.त्यांना दुसरा कोणी चालत नसे. त्याचेकडून सेवा करून घेतली व त्याचेवर प्रेमाचा वर्षाव केला.
४६) मद्रासीबाई हीची सुंदर भजने गावयाची इच्छा पूर्ण करून रामरूपात दर्शन देऊन धन्य केले.
४७) तिचा पतीचा अहंकार घालवला, लोकापासून परावृत्त केले. दृष्टांत देऊन मुसलमानाच्या दैवताचे पूजन त्याचे घरी होते हे दाखवून दिले व रामदासांचे रूपात दर्शन दिले.
४८) बाबासाहेब तर्खड यांना बाबांनी अखंड सहवास दिला.पत्नीचा व पुत्राचा दृढभाव पाहून कृपादृष्टी केली. बंद दरवाजातून प्रवेश करून कोणतेही रूप घेता येते हे दाखवून दिले.
४९) बेरे यांची चोरटे प्रवासात लुटतील या भीतीने त्यांना अभय देऊन त्यांचे चोरट्यांपासून रक्षण केले व सुखरूप पोचवले.
५०) बाळावुवा सातारकर यांना एका रामनवमीला कीर्तनाला पाचारण करण्याची काकासाहेबांना प्रेरणा देऊन शिर्डीत आणवले. विठ्ठलरूपात दर्शन देऊन ५०० रु बिदागी देऊन अनुग्रह केला.
५१) शेवडे यांना आपले पदीची निष्ठा आठवून त्यांना परीक्षेत पास केले. पूर्ण अनुग्रह केला.
५२) विजयानंद हे मद्रासी संन्यासी होते ते मानस सरोवराला जात असता त्याचा मरणकाळ ओळखून आपले जवळ ठेवून त्याला मुक्ती दिली.
५३) (बापूगीर) रामगीर यांना बाबा बापूगीर या नावाने प्रेमाने हाक मारीत असे. त्यांना नानासाहेबांकडे आरती व अंगारा घेऊन पाठवले. प्रवासाची उत्तम सोय केली. स्वतः टांगेवाला होऊन टांग्यातून प्रवास घडविला.
५४) बाळाराम मानकर यांना मच्छिद्रगडावर जाऊन राहाण्यास आज्ञा दिली.तेथे ध्यानधारणा करून घेतली.प्रत्यक्ष दर्शन देऊन मनःशांती दिली. परतीच्या प्रवासात कुणबी वेषाने तिकीट ही आणून दिले.
५५) भीमाजी पाटील यांचा कपक्षयाचा विकार पूर्ण बरा करून त्याला भक्तीची प्रेरणा दिली.
५६) अब्दुल्ला यांचेकडून दीपोत्सवाची सेवा करून मशिदीत दिवे लावले. त्यांनी बाबांची सेवा केली त्यांच्या मुलाचा विवाह करून दिला. अब्दुल्लावर पुत्रवत प्रेम केले. त्याचा वंशवेल बहरून टाकला.
५७) बडे बाबा हे मनाने चांगले नसताही बाबांनी फार प्रेम केले.स्वतःजवळ बसवून जेवू घातले. रोज ५०-५५ रु. काढून दिले.
५८) रोहिला हा मशिदीत रात्रंदिवस कलमे पढत असे. मोठमोठ्याने ओरडे,लोक कंटाळले पण अल्लाचे नाव घेणाऱ्या रोहिल्यावर बाबांनी प्रेम करून त्याला अभय दिले.
५९) आंग्ल गृहस्थ ह्याला दूर ठेऊन का होईना येशू रूपात दर्शन दिले व अपघातात जबर जखमी झाला असता प्राण वाचवले. हिंदू लोकांविषयी जिव्हाळा व प्रेम निर्माण केले
६०) कॅप्टन हाटे ह्याला स्वप्नात दृष्टांत देऊन वालपापडीच्या शेंगा खाण्याची इच्छा प्रकट केली भक्तीभावाने अर्पण केलेला रुपया परत देऊन भक्ती दृढ केली.
६१) बहाणपूरची स्त्री हिला स्वप्नात दृष्टांत देऊन खिचडीची मागणी केली काही दिवस परीक्षा घेऊन तिची खिचडी सेवन करून तिला कृतार्थ केले.
६२) राधाबाई देशमुख हीने बाबांनी मंत्र द्यावा म्हणून ३ दिवस उपोषण केले तिची समजूत घालून उपाशीपोटी केलेली भक्ती देवाला प्रिय होत नाही असे सांगितले.गुरूने मागितलेले 'श्रद्धा व सबुरी' हे २ पैसे मी गुरूला दिले. माझ्या गुरूनी मला मंत्र दिला नाही. तेव्हा तुला कोठून देऊ अशी समजूत करून तिच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले. पूर्ण अनुग्रह केला.
६३) गोखले बाई हिने होळीच्या सणाला उपाशी राहून बाबा पावावेत म्हणून हट्ट करण्याचा गोखलेबाईना दादा केळकरांकडे पुरणपोळ्या करून सर्वांना वाढून स्वतःला यथेच्छ जेऊ घातले व पूर्ण अनुग्रह केला.
६४) आनंदराव पाखाडे ह्याला स्वप्नात दृष्टांत दिला. दर्शन दिले व श्यामरावाला रेशीमकाठी धोतर द्यावयास लावले.
६५) बाळाराम धुरंधर या विनयशील गृहस्थांना विठ्ठल रूपात दर्शन देऊन चिलीम ओढायची सवय नसता ती ओढावयास लावून त्यांचा दम्याचा विकार घालवला.
६६) अमीर शक्कर ह्याची वातविकारापासून मुक्तता केली.आशाभंग करताच थोडीशी शिक्षा केली. परंतु संपूर्ण रोग घालवून विखारापासून रक्षण केले.
६७) रघुनाथराव तेंडुलकर याला इमानीपणाने नोकरी केल्याचे बक्षीस म्हणून स्वप्नांत दृष्टांत देऊन योग्य ती पेन्शन देवविली व योगक्षेमाची काळजी दूर केली.
६८) आळंदीचे स्वामी हे कर्णरोगाने पिडीत होऊन व्यथित होऊन शिरडीत आले तेव्हा त्यांचा कर्ण रोग बाबांनी बरा केला,
६९) दत्तोपंत यांचा १४ वर्षे जुना पोटशूळ केवळ दृष्टीने बरा करून त्यांना मनःशांती दिली.
७०) मालेगावचे डॉक्टर यांच्या पुतण्याचा हाड्यावर्ण ऑपरेशनने बरा होईना तो उदीने व कृपाशीर्वादाने बरा करून डॉक्टरांना भक्ती मार्गाला लावले.
७१) वांद्रे येथील एका गृहस्थ होता त्याचे मृत पिता रात्री पीडा देऊन झोपू देत नसे.उदी लावून व उशाला घेऊन झोपताच त्या गृहस्थाला निद्रा मिळू लागली. मनःशांती लाभली.
७२) रामचंद्र पाटील हे दुखण्याने बेजार झाले असता स्वतः बिछान्यावर वसून अभय दिले व त्यांना बरे केले. यांचे करारी स्वभावाने श्रीबाबांचे शरीर बुटी
वाड्यात विसावले आहे ही ही साइचीच प्रेरणा.
७३) नांदेडचे पुंडलीकराव यांना श्रीवासुदेवानंद सरस्वतीनी दिलेला नारळ (श्रीबाबांना) चुकुन फोडला. म्हणून दुःखित झाले पण तो माझ्या संकल्पानेच फुटला ही त्याला समजूत दिली.
७४) भक्त पंत हे शिरडीस दर्शनास येण्याची टाळाटाळ करीत होते. त्यांची स्वतःच्या गुरुवर निष्ठा होती. एकदा त्यांना फीट येवून बेशुद्ध होताच केवळ बाबांच्या उदी व तीर्थाने शुद्धीवर येतात. स्वतःच्या पायी भाव ठेवण्याची आज्ञा होते.
chimani ( sparrow)
हरि ॐ श्रीराम नाथसंविध्
चिमणीची कथा
सत्ययुगाच्या अगदी शेवटच्या वर्षांपर्यंतसुद्धा चिमणी हा पक्षी अस्तित्वातच आलेला नव्हता. इतर सर्व पशू, पक्षी, कीटक आदि सर्व योनी होत्याच. प्रत्येक कल्पातील, प्रत्येक महायुगातील, प्रत्येक सत्ययुगाच्या अगदी शेवटी शेवटीच चिमणी तयार केली जाते. अर्थात तिला वसुंधरेवर प्रकट केली जाते.
सत्ययुगाच्या अंतिम चरणामध्ये माता अनसूयेच्या आश्रमामध्ये देशविदेशीच्या संतांची, महामंडलेश्वरांची व ऋषिवरांची सभा भरली होती आणि चिमणीची निर्मिती करणे आवश्यक आहे असा विचार प्रत्येकजण मांडत होता.
ब्रम्हर्षि वसिष्ठांनी विचारले, हे माते अनसूये! आम्हा कोणालाही वसुंधरेच्या पाठीवर एकही अशी व्यक्ती आढळली नाही की जी पहिली चिमणी बनू शकेल.
माता अनसूया म्हणाली, हे ऋषिवरहो! अशी व्यक्ती तुम्हाला सापडली नाही तर चिमणी बनणारच नाही. मग त्रेतायुगाच्या ऐवजी कलियुगच सुरु होईल. त्यामुळे तुम्हाला अजून शोध घ्यायलाच हवा. माझा शब्द आहे - अशी व्यक्ती आहे. तुम्ही फक्त नीट शोध घ्यायला हवा.
माता अनसूयेच्या या आश्वासनामुळे उत्साहित होऊन त्याच रात्री ते सर्वजण आपापसांत चर्चा करु लागले. परंतु कुणालाही अशी व्यक्ती कुठेच दिसेना. अगदी अतिंद्रिय शक्ती व तपोबल वापरुनही ही व्यक्ती सापडत नाही हे लक्षात आल्यावर ब्रम्हवादिनी मैत्रेयी म्हणाली की ती व्यक्ती ज्ञानबल व तपोबल ह्यांच्या पलीकडे आहे.
ब्रम्हर्षि याज्ञवल्क्य म्हणाले, जेव्हा पवित्र व्यक्तीला ज्ञानबलाने व तपोबलाने शोधता येत नाही तेव्हा ती व्यक्ती ज्ञान व तप यांना बाजूला सारुन केवळ भक्तीमार्गाने पुढे गेली असली पाहिजे. तुम्ही सर्वजण धर्म नीट जाणणारे आहात. गुरुकुलांशी संबंधित असणा-या यज्ञशालांशी व मंदिरांशी निगडित असणाऱ्या व्यक्तींमध्येच शोध घेत आहात. तुम्ही अशा समाजाकडून उपेक्षित असणा-या सर्वसामान्य मानवाकडे वळा.
ब्रम्हर्षि याज्ञवल्क्यांच्या सल्ल्यानुसार सर्वजण विविध दिशांना विखुरले व नव्याने शोध घेऊ लागले.
ब्रम्हवादिनी मैत्रेयी शोध घेता घेता नर्मदा नदीच्या तीरावर येऊन पोहोचली. तेथे तिला एक आदिवासींचा जत्था प्रवास करताना दिसला. त्या जत्थ्याच्या मधोमध एक अत्यंत जख्ख वृद्ध स्त्री चालत होती. त्या जत्थ्यातील सर्वजण तिच्याशी अत्यंत प्रेमाने व विनयाने वागत होते. रात्र होताच त्या जत्थ्याने विश्रांती घेण्यासाठी स्थान निवडले. त्या जत्थ्यातील काहीजणांनी ही कुणीतरी ऋषि स्त्री आहे व एकटी आहे असे जाणून त्यांच्याबरोबर येण्याचे आमंत्रण दिले.
ब्रम्हवादिनी मैत्रेयी सहजपणे त्यांच्या जत्थ्यात सामील झाली. रात्रीचे भोजन चालू असताना तिला कळून आले की हा संपूर्ण जत्थ्या म्हणजे या प्रमुख वृद्ध स्त्री चे कुटुंबच आहे. पुत्र, कन्या, जामात, स्नुषा, नातू, पणतू, खापरपणतूही जत्थ्यात सामील आहेत आणि त्या वृद्ध स्त्रीचे प्रत्येकावर समानपणे प्रेम आहे. कुणाचीही आपापसांत भांडणे झाली तर ही वृद्ध स्त्री अशा रीतीने न्याय करत होती की कुणाचीही हानी होऊ नये.
रात्री इतर सर्वजण झोपी गेल्यावर मैत्रेयी त्या वृद्ध स्त्रीजवळ गेली व म्हणाली, तू ह्या प्रत्येकामधील भांडणे कशी चांगल्या रितीने सोडवतेस? हे कसे जमते?
ती वृद्ध स्त्री म्हणाली, मला काय कळते. मनात येईल ते बोलते. बस्स.
मैत्रेयीने विचारले, ह्या सर्वांचे तुझ्यावर एवढे अपरंपार प्रेम कसे? त्यांच्याकडे एवढी आज्ञाधारकता कशी?
ती म्हणाली त्यांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते माझं ऐकतात. त्यात माझं काय?
मैत्रेयीने विचारले, तुमचा जत्थ्या कुठे चालला आहे? तुझ्या सांगण्यावरूनच ते दिशा बदलतात हे मी दिवसभर पाहिले आहे.
ती वृद्ध स्त्री म्हणाली, नक्की कुठे जायचे आहे हे मलाही माहित नाही. पण आमच्या जुन्या जागी खोटे बोलणा-या लोकांची संख्या वाढू लागली म्हणून आम्ही तो प्रदेश सोडून निघालो आहोत. जेथे सुपीक प्रदेश असेल तेथे आम्ही नवीन वस्ती वसवू. मात्र जवळपासचे लोक प्रेम करणारे असावेत.
माझ्या आधीच्या सहा पिढ्या आणि माझ्यासकटच्या पुढच्या सात पिढ्या मी नीट पाहिल्या आहेत. त्यातून मी एकच शिकले - जेथे खरे प्रेम असते तेथे खोटेपणा येत नाही आणि काही खोटे असलेच तरी प्रेमाने ते धुतले जाते.
ह्या गोष्टीसाठी मला एकही अपवाद सापडला नाही आणि म्हणून मी प्रेमच करीत राहते. बाकी मला काही माहितच नाही आणि जमतही नाही.
ब्रम्हवादिनी मैत्रेयीने अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने विचारले, तू सर्वांत जास्त प्रेम कोणावर करतेस? तुला प्रेम कुणी शिकवलं?
त्या वृद्ध स्त्रीने दोन्ही हात जोडून व डोळे बंद करून उत्तर दिले, माझ्या आधीच्या सहा पिढ्यांनी मला सांगितले होते की सगळ्यात मोठा देव आकाशात राहतो आणि तोच आकाश असतो आणि तोच आपल्यावर खरेखुरे प्रेम करतो आणि हे प्रेम मी अनुभवले आहे आणि अनुभवत आहे.
हे आकाश ना, आपल्यावर खूप प्रेम करते. इतर सर्व गोष्टी कधी असतात, कधी नसतात. पण आकाश मात्र आपल्या डोक्यावर आणि आपल्याबरोबर सदैव असतेच. अर्थात तो देवाधिदेव माझ्या डोक्यावर आणि माझ्या बरोबर असतोच आणि तेसुद्धा कसे? तर आपल्याला जाणीव सुद्धा न देता. इतका तो चांगला आहे गं!
त्याच क्षणाला आकाशातून स्वयंभगवान पुरुष रुपाने प्रकटला आणि त्याने त्या वृद्ध स्त्रीला आपल्या तळहातावर घेतले आणि या महायुगातील पहिली चिमणी तयार झाली.
आणि तो जत्थाच क्रमाक्रमाने चिमणी वंशाचा विस्तार झाला.
विस्तारित माहितीसाठी तुलसीपत्र १६२४ वाचावे
अंबज्ञ
agralekh
दैनिक प्रत्यक्ष
११ फेब्रुवारी २०२०
अग्रलेख
कथामंजिरी-९५(१)
कार्यकारी संपादक
डॉ अनिरुद्ध धैर्यधर जोशी
रणकेदाररूद्रचा प्रश्न " मामाश्री! याचा अर्थ, *रावण आता कायमचा बंदिस्त झाला?*"
पराक्रमदित्यांचे उत्तर "नाही, तसे नाही. *जेव्हा परत स्वयंभगवान वरील प्रेम, विश्वास व आदर कमी होऊन कलियुग वाढत जाईल तेव्हा आपोआप रावणाचा लिंगदेह बंधनमुक्त होईल व मग भयाच राज्य पसरेल."*
विजयरुद्रांनी यावर उत्तर दिले
*" श्रध्दावानांची काळजी घेण्याचा कार्य स्वयंभगवानाने प्रेमाने स्वीकारलेले आहे आणि जगदंबे कडून त्याला तसा वरही मिळालेला आहे.*"
त्यामुळे *स्वयंभगवान, थोडीफार श्रद्धा शिल्लक उरलेल्या भक्तांना सतत सहाय्य करीत राहणार व उचित वेळेस प्रगट होऊन, जगदंबेचे महात्म्य व स्वयंभगवान मंत्रगजर, अशा श्रद्धाळू भक्तांपर्यंत स्वतः पोहोचविणार. कारण स्वयंभगवानाचा मंत्रगजर हया सर्वच्या सर्व 108 पवित्र वस्तूंची स्पंदने, मंत्रगजर श्रद्धेने करणाऱ्याला अनेक पटींनी पुरवीत राहतो* व
*चौथ्या मितीतील बिल्वमंगल स्थानावरील एक-एक बिल्व वृक्ष स्वयंभगवान स्वतः ह्या त्रिमितीतील अनेक ठिकाणी लावत राहिली व ह्यांची बिल्वपत्रे ज्या-ज्या श्रद्धावानांच्या हातून ईश्वरचरणी वाहीली जातील त्यांचे कल्याण होईल*
*मंत्रगजराचे घोष जेंव्हा कोटीगुणे वाढतील, तेव्हा स्वयंभगवान स्वतः रावणाचा लिंगदेह परत एकदा शिवबंधनाच्या कैदेत ठेवेल व श्रद्धावानांच्या जीवनात रामराज्य अवतरेल हे श्रद्धावानांचे नाथसंविध् आहे तसंच हे वैदिक धर्माचे हि नाथसंविध् आहे*
आजची आपली महिकावती नगरी कलियुगाच्या त्या काळात *मुंबापुरी म्हणून ओळखली जाईल व तेथे तेव्हादेखील आई मुंबईचे अर्थात शिवगंगागौरी चे अर्थात माता वल्गेचे स्थान कायम असेल."*
आता मला समजले की सद्गुरू श्री अनिरुद्ध बापु आपल्याला १६ माळी त्रिविक्रम गजर करायला का सांगतात. गजर महत्वाचा - स्थान, वेळ, ठिकाण कसलेही बंधन नाही, *बंधन आहे ते फक्त प्रेमाने , विश्वासाने म्हणने*
शब्दांकन प्रयास
शिरीषसिंह बडवे
औरंगाबाद
*स्वयंभगवान व माझ्यातील नाळ जोडण्याचा एकमेव मार्ग आहे = दैनिक प्रत्यक्ष*
Sadguru Punyashetram
Source:whatsapp
*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -२८🌟*
*🔆तीर्थक्षेत्रे भाग -२🔆*
*🛕🌺श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रं🌺🛕*
🔅 आज आपण सद्गुरु पुण्यक्षेत्रम विषयी थोडक्यात माहिती करुन घेऊ.
🔅17 मार्च 2005 रोजी आपल्या बापूंनी प्रथम प्रवचनापूवी सांगितले प्रवचनातील काही मुद्दे खालील प्रमाणे
१) ही जागा जळगाव (जिल्ह्यातील) अमळनेर पासून २७ कि.मी.अतंरवर ( नीम ) या गावी आहे. या ठिकाणी आपल्या संस्थेच्यावतीने(४४ एकर ) जागा घेतली आहे.
२) ह्या जागेचा महत्व म्हणजे तापी नदी व पांजरा नदी यांच्या संगमाच्या बरोबर मध्ये ही जागा बसलेली आहे.
३) ह्या जागेमध्ये सतत तीन वषे राहून (रामनवमी १९०६ ते रामनवमी १९०९ )ज्यांना मी माझे मानवी सदगुरू मानतो ते गोपीनाथ शास्त्री पाध्ये माझे पणजोबा यांनी तपश्चर्या केली आहे.
४) या ठिकाणी आपण पाहिल्यांदा उभारण्यात येणार ते मंदिर त्या मंदीरमध्ये दत्तगुरुची मूर्ती मध्ये उभी आहे त्याचा उजव्या बाजूस श्रीपाद श्रीवल्लभ,साई बाबा तर डाव्या बाजूला स्वामी नित्य सरस्वती स्वामी समर्थ या मूर्तीची स्थापना होणार आहे त्याच ठिकाणी माझे मानवी सद्गुरू गोपीनाथ शास्त्री पाध्येचा अस्थी कलश स्थापना करून समाधी बांधण्यात येणार आहे
५) पुण्यक्षेत्रम म्हणून ते सदगुरू क्षेत्र असेल की तिथे प्रवेश म्हणजे देव लोकात प्रवेश करण्यासारखी आहे ते देव लोक नव्हे अत्यंत पवित्र स्थान निर्माण आहे
६) ज्याप्रमाणे गाणगापूर हे भीमा नदीच्या व अंम्बर नदीच्या संगमावर बसलेले आहे त्याप्रमाणे निम गाव तापी व पांजरा नद्यांच्या संगमावर सदगुरू स्थान निर्माण होणार आहे
जसे हे पंचसद्गुरू व गोपीनाथ शास्त्री माझे आहे तेवढेच तुमची आहे हे आम्ही लक्षात घेतले पाहिजेल
७) असे हे पवित्र आगळ - वेगळं असे तीर्थक्षेत्र अजून घडले नाही आणि ह्याच्या पुढे कधीही घडणार नाही असे हे तिर्थक्षेत्र आहे आणि आम्ही अत्यंत वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार होणार आहे.
संकलन स्टार वृत्त
🔅1 एप्रिल 2005 ते 3 एप्रिल 2005 तीन दिवस प. पू. बापूंची श्रीसद्गुरू पुण्यक्षेत्रम् येथील भेट
१) प्रथम गोपीनाथ शास्त्री यांची तपोस्थळी असलेली तापीनदी कठावरील शिळा व पंझरानदी काठावरील टेकडी ह्या पवित्र गोष्टी शोधण्यात आला
२) तापीनदी व पांझरानदी काठावरील ही जागा अतिशय पवित्र व पुराण कालपासून इतिहास असलेले हे पुण्यक्षेत्रम आहे.
३) अनेक ऋषीमुनींनी तपस्या केली आहे ह्यात (संत नामदेव, गौतम बुद्धचाच एक अवतार अमिताभ बद्ध ,विश्वामित्रांचा मुलगा शक्तीमुनी अशा अनेक ऋषी मुनींच्या तपश्चर्याने ही जागा पवित्र झाली आहे, तसेच टेकडीच्या दक्षिण बाजूस पांझरा नदीच्या काठावर महाभारत कालीन ध्यौम्याऋषीचा आश्रम आजही चतुर्मितीमध्ये आस्तित्वात आहे .
४)वर्धमान व्रताधिराजाचा उगमही ह्याच जागेत झालाय म्हणून वर्धमान व्रताच्या काळात एकदा तरी ह्या जागेत येऊन व्रतपुष्प अर्पण कराव
५) तसेच गुरूक्षत्रेम् मधील दत्तगुरूच्या तसबिरीच्या इतिहासपण इथलाच आहे अशा अनेक प्रवित्र गोष्टीचा इतिहास या क्षेत्र आहे.
अग्रलेख क्र.९०७
१) जेव्हा हिमालय पवर्त वितळू लागले सगळे कडे हहा:कार माजू लागले अशा वेळेस कलियुगाच्या अंतिम चरणात हा शिव स्व:त वसुधरेवर येऊन हिमालयातील सप्त ज्ञानक्षेत्र व कैलासस्थान त्याचा दिव्य भाव ( श्रीपुण्यक्षेत्रम् )नामक स्थानी तपस्या नदीच्या तीरावर स्थापन करेल व मग महाप्रलयापर्यत तुम्ही आठजण ( हिमवान राजा व सप्त पत्नी ) श्रीगुरुची सेवा करीत व
श्रद्धावानांन मार्गदर्शन करत तेथेच निवास कराल.
२) आदिमाता अनसूया उवाच : - हे पवित्र कन्यांनो मी तुम्हाला वरदान देते की पार्वतीच्या दोन्ही पुत्रांच्या उपनयनांनंतर तेआपल्या आजोळी येतील व तुमची कन्या तुम्हा सर्वाना दरोराज सुर्योदयासमयी संपुर्ण परिवारासह ( श्रीसद्गुरूपुण्यक्षेत्रम् ) या स्थानवर भेटत जातील.
अग्रलेख क्र.११९२,१२२४
३) प्रथम दिव्य स्वतिक श्री सदगुरु पुण्यक्षेत्रम मध्ये आजही गोलाकार गती ने भूगर्भात फिरत आहे.
४) या वसुंधरेवर महादुर्गचा ऊर्जेचा रसस्तोत्रचा उगमस्थान या पुण्यक्षेत्रम मध्येचा आहे.
५) हेफँस्टने अँफोडाईटच्या सूचनेनुसार हक्युलीसला त्याच्या एकमेव शिष्य म्हणून स्वीकारले ते ही श्रीदत्तपर्ण पुण्यक्षेत्रम मध्येच (श्रीसदगुरु पुण्यक्षेत्रम)
६)@स्फटिकमहामस्तिष्क@
स्फटिक महामस्तिष्क म्हणजे त्या काळातील सर्वश्रेष्ठ विज्ञान व सर्वश्रेष्ठ अध्यात्म ह्याच्या सहाकार्याने बनलेले एक महायंत्र होते.
अ) या महायंत्राचे तीन अवतार(भाग) एकमेकांपासून वेगळे केले गेले.
ब) पाहिला अवतार :-- हा तैवान बेटाजवळ ठेवण्यात आला.
क)दुसराअवतार :--वसुंधरेच्या दक्षिण ध्रवावरील हिमाच्छादित भागात ठेवण्यात आला.
ड) तिसरा अवतार :--हा अवतार ठेवण्यासाठी महाराजा इंद्रवधन ,महाराणी शरावती आणि राजा कौंडिण्य,यांच्या मदतीने दत्तपर्ण प्रदेशा मधील पुण्यक्षेत्रं (श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रं) मध्ये ठेवण्यात आला आणि (१२स्थानाशी जोडण्यात आले 12 स्थान म्हणून12 ज्योतिलिगांची निवड करण्यात आली.
व ह्या तिसरा रचनेची वैज्ञानिक व आध्यात्मिक ताकद अफाट आहे त्यामुळे ह्याचा रक्षणासाठी राफेन,इदंवधन,मिकुला बाँग, ओरिआँन हे ( देवदूत ) बनून कार्यरत आहेत व राणी शरावती ही एका वृद्ध ऋषी स्त्रीच्या रुपात बसुन तपश्चर्या करीत आहे. रोज रात्री १२:०० ते सुर्योदयपर्यंत त्या सदगुरु पुण्यक्षेम् मध्ये फिरत त्याच रक्षण करत असते.
अग्रलेख क्र.१४४०
🔅 माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो अगदी त्या वेळेपासून ते आजपर्यत प्रत्येक अधमीँ पंथाला म्हणून भारतावर आक्रमक करावसे वाटते कारण त्यांना आकर्षण असते ते.......
१)साक्षात आदिनाथांचे स्थान असाणाऱ्या ( काशीक्षेत्राचे) ज्या भूमीच्या आत सहजशिवाचा प्रकाश अजूनही जसाच्या तसाच आहे.....
२)पुण्यक्षेत्रम अर्थात(दत्तपर्ण प्रदेश, जेथे मुळ स्वस्तिक चिन्ह जमिनीत अगदी खोल भुगर्भात सातत्याने चक्राकार फिरत आहे.....
३) श्री जगदंबा क्षेत्र ह्याचे वर्णन व कथा पुढे लेखांमधून येईलच ......
४)त्रिनाथक्षेत्र अर्थात :-- प्रथम पुरुषार्थधाम ( अलंकापुरी ) जेथे साक्षात संपूर्ण माणिब्दीप अठराच्या अठरा प्रभावक्रेंदाच्यासह वर अंतराळात व खाली भुमीत गेली चार युगे भुमीवर उतरण्यासाठी वाट बघत आहे......
आणि ही क्षेत्रे ताब्यात आल्याशिवाय कुमागियांचे वर्चस्व स्थापन होऊ शकत नाही...
🔅श्री श्वासम उत्सवात पुण्यक्षेत्रम विषयी माहिती दिली..
१)श्री श्वासम मध्ये बापूंनी पाच कलश समीर दादाच्या हातात देऊन पुण्यक्षत्रेम् स्थापना साठीची पूर्ण जबाबदारी समिरदादा यांच्या वर दिली.
२) राज्यांनो मी तुम्हाला आज पर्यंत दोन अत्युच्च भेट दिल्या एक म्हणजे स्वस्तिक्षेम संवाद आणि दुसरं म्हणजे हे श्रीस्वासम आणि आता मी तुम्हाला माझ्या अवतार कार्यातल तिसरं आणि अत्युच्च भेट देणार आहे ते म्हणजे श्री सदगुरु पुण्यक्षेत्रं.त्या ठिकाणी infrastructure वैगरे अस काहीच नसेल पण जेही काही असेल ते सगळं नैसर्गिक असेल तुम्ही पिकनिकला जायचं विसराल याल तर फक्त श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रंलाच.
३)जो कोणी पुण्यक्षेत्रमला जाईल मग तो कितीही पापी असो तो पुण्यक्षेत्रम् मधून पुण्य आणि फक्त पुण्यचं घेऊन जाणार. कारण ते पुण्याचं अपरंपार साठा असलेलं महंत क्षेत्र आहे.
.
🔅महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी यांनी अमळनेर येथे श्रीदत्त जयंती उत्सव (२०१७) दरम्यान सांगितलेली श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् (दत्तपर्ण प्रदेश) विषयीची विशेष माहिती...
१) दत्तपर्ण प्रदेश म्हणजे :
*◆ दत्त : दत्तगुरु, दत्तात्रेय.*
*◆ पर्ण : पुण्य*
*◆ प्रदेश : जागा, निवासस्थान, क्षेत्र.*
म्हणून दत्तगुरुंचा पुण्याचा अपरंपार साठा असलेला प्रदेश. तसेच, सद्गुरुंचा पुण्याचा साठा असलेले क्षेत्र म्हणून *श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्.*
२) तापी आणि पांझरा नदी :
अ) तापी : "ताप हरणी" माणसाला जे काही प्रॉब्लेम्स् आहेत. त्यांचे हरण करणारी *तापी नदी.* तापी नदी *सुर्य कन्या* म्हणून ओळखली जाते.
ब) पांझरा : "पाण झरा"* हे तिचे खरे नाव आहे. पांझरा नदी *चंद्र कन्या* असल्याने शीतलता देणारी आहे. विशेषतः पांझरा नदी *पुरातन नदी* (Old River) आहे.
क) तापी चे उलट केले असता तर *पिता* शब्द तयार होतो. म्हणजे या परमात्मा पित्याकडून येणार प्रेमाचा झरा म्हणून ही *पांझरा.*
ड) या दोन्ही नद्या पुढे संगमावर *(कपिलेश्वर येथे)* एकमेकांना भेटुन एकरुप होऊन, उत्तर दिशेकडे वाहत जातात. आणि उत्तर दिशा ही महाप्राण हनुमंताची दिशा असल्याने, त्यामुळे या ठिकाणी केलेली उपासना सहज फळद्रुप होते.
३) श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् बद्दल *प. पु. बापू* सांगतात की; जर या जागे विषयी सांगतांना *१००* पानांचे पुस्तक घेतले, तर मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेली माहिती फक्त *एकच* पानांची असुन. बाकीचे *९९* पाने अजून सांगायचे बाकी आहेत. (आणखीन भरपूर काही गोष्टींचा उलगडा या तिर्थक्षेत्रासंबंधी आपल्याला पुढे हळूहळू होणारच आहे.)
४) योगिंद्रसिंह सांगतात की, म्हणून *गोपीनाथ शास्त्री पाध्ये* यांनी हि जागा विशेषतः निवडली आहे.
*🛕🐄गोविद्यपीठम_तीर्थक्षेत्र🐄🛕*
🔅गोविद्येपीठम हे सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे विचारमंथन आहे.
कर्जतच्या कोथिंबे येथे 16 एकर जागेवर ‘गोविद्येपीठम’ बांधण्यात आले आहे. हे रेल्वे स्टेशनपासून सुमारे 16 कि.मी. अंतरावर आहे.
*🔅तीर्थक्षेत्र म्हणून गोविध्यापीठमचे महत्त्व:*
१. गोविध्या अभ्यास केंद्र किंवा श्रीकृष्ण मंदिर.
आपण मंदिरात प्रवेश करताच लगेचच आपल्या सुरक्षिततेची ग्वाही देऊन गोविंद गिरधारी (श्रीकृष्ण) यांनी आपल्या डाव्या हाताच्या छोट्या बोटावर गोवर्धन पर्वत धारण केल्याच्या मूर्तीकडे लगेच आकर्षित केले जाते.
मंदिराचे खांब गाय-कळप, गोप आणि गोपी यांचे स्मरण करून देतात. श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण करण्याचे ब्रीद घेतलें आहे डावीकडून 'प्रदक्षिणा' (मंदिरात) जाताना तुम्हाला दहा गुरुंच्या फोटो फ्रेम्सची झलक मिळेल, ती म्हणजेः श्री अत्रिंद्रन दत्तात्रेय, महाप्राण वज्रंग हनुमंत, भगवान श्री ऋषभ देवजी, श्रीगुरू गोबिंदसिंहजी महाराज , संत रामदास स्वामी, श्री वाल्मीकि ऋषी ,श्री वेद व्यास, श्री याज्ञवल्क्य श्री वशिष्ठ ऋषी श्री विद्या मकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्ये.
श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस तुमच्या प्रदक्षिणेत तुम्ही अर्ध्या मार्गावर असता, तुम्हाला तुकाराम, मीराबाई, नरसी मेहता, पुरंदरदास, सूरदास, देवी अंदल, या दहा प्रमुख संतांच्या छायाचित्रांचे दर्शन मिळेल. एकनाथ महाराज, गौरांग चैतन्य प्रभु, संत त्यागराज आणि संत तुलसीदास.
२. पुष्करणी तीर्थकुंडः
पुष्कर्णी तीर्थकुंड म्हणून ओळखल्या जाणारा तलाव बांधला गेला आहे. मुकुंद आणि कदंब ही झाडे या तलावाच्या सीमेवर आहेत. श्रीकृष्णा गोविंद गिरधारीपर्यंत विधी स्नान करून पाण्यात तलाव टाकला जातो.
3. गरुड स्तंभ किंवा स्तंभ जो पापांपासून मुक्त होतो:
पुष्करणी तीर्थकुंड आणि गोविध्या स्टडी सेंटर दरम्यान, एक स्क्वेअरिश प्लॅटफॉर्म आहे ज्यावर स्तंभ आहे ज्यावर , गरुड स्थापित केले गेले आहे. गरुड मुकुंदच्या झाडाकडे आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे हात जोडून उभे आहेत. स्तंभातील गरुड आणि हनुमंता भक्तीचे प्रतीक आहेत.
4. ध्यान कुटीर (ध्यानधारणा)
ध्यान करण्यासाठी पाच ध्यान कुटीर येथे बांधले आहेत. येथे ध्यान केल्याने भक्ताचे मन शुद्ध होते आणि अखेरीस त्याच्या ताणतणावापासून मुक्त होते आणि रोगमुक्त होतात. ध्यानधारणा करण्यासाठी पाच ध्यान कुटीर पवित्र मानले गेले.
5.धुणी माता:
8 एप्रिल 2002 रोजी सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी मंदिरात गोवर्धनधारी श्री कृष्णाची मूर्ती स्थापित केली. त्यानंतर धुणी मातेचा पाया घालण्यात आला. बापूंच्या निर्देशानुसार सुचितदादांनी धुणीत आग पेटविली. धुनी सर्व वेळी पेटविली जाते. या आगीतील पवित्र राख किंवा उदी खार येथील गुरुक्षेत्रम येथे सर्वांसाठी उपलब्ध आहे.
6. तुळशी वृंदावनः
तुम्ही गोविध्यापीठात प्रवेश करताच डाव्या बाजूला नारळाच्या खोबणीत तुळशी-वृंदावन स्थापित केले आहे. हे तुळशी-वृंदावन पवित्रता, शुभ, भक्ती आणि सामर्थ्याचा स्रोत आहे.
7. वड वृक्ष (वट वृक्ष):
या झाडाच्या खाली जाम ‘ओम आदिगुरु गोपालक दत्तात्रेय पाहि मम’ जप केला जाऊ शकतो. सकाळी गोशाला येथील गायी गवत चरण्यासाठी येथे सोडल्या जातात.
8. द्वारकामाई:
बापूंनी येथे द्वारकामाईची प्रतिकृती येथे स्थापन केली आहे. इथे आपल्याला दिवे लावता येतात.
*🛕🌺गुरुकुल जुई नगर🌺🛕*
🔅जुईनगर गुरुकुल निवास मंदिर माहिती, पंच-पुरुषार्थ देवता स्थानं,गर्भ गृह मध्ये मंगेशी- शांतादुर्गा,महाकाली ,महालक्ष्मी,महासरस्वती ह्यांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत, सकाळी ११:३० च्या सुमारास गर्भ-गृह बंद करतात आणि नैवेद्य ,तांबुल अर्पण करतात तर पहाटे ५ वाजता देवतांचे नित्योपचार सुरु होतात .
🔅देवीन च्या समोर असलेल्या खांबा मध्ये कलश आहे, त्या कलश मध्ये
३३ पवित्र तीर्थाक्षेत्रान ची माती आहे, जेव्हा आपण ह्या कलशांना नमस्कार करतो तेव्हा आपला नमस्कार ह्या पवित्र क्षेत्रांना पोचतो, ह्या देवतांची ओटी भरली जाते, आणि मंगेशी ला श्रीफळ अर्पण केले जाते. ह्या देवता अत्यंत जागृत देवता आहेत,जिवंत आहेत, हे गर्भ गृह गोमुखा च्या आकाराचे आहे, देवतां कडे मुख केल्यावर उजवी कडे आत्ता फोटो gallery बनवली आहे, आधी त्या भागाला "गोपीनाथ शास्त्री अध्ययन कक्ष" असे म्हंटले जायचे तिथे शास्त्रीन चा फोटो आणि त्या खाली आपल्या लाडक्या बापू,नंदाई आणि दादान चा फोटो आणि बापूंच्या पादुका दर्शन साठी असायच्या, आत्ता ह्या ठिकाणी देवता प्रतिशठापणे चे फोटो लाव्लेलेल आहेत,
gallery च्या समोरच वर जाण्या साठी पायऱ्या आहेत, पहिल्या मजल्या वर पंचापुरुशार्थ उपासने ची recharching आणि उपासना शिकवली जाते.
खाली डावी कडे प.पू. आध्य-पिपा समाधी स्थानं आहे, आपण प.पू. आध्य-पिपान च्या समाधी ला अत्तर अर्पण करू शकतो, , समाधी ला नमस्कार करून प्रदक्षिणा घालून,
🔅समोर असलेल्या रंग-शिळे वर उभे राहून साई बाबांच्या फोटो कडे बघत आपले कान पकडून ३ वेळा उड्या मारून माफी मागायची, ह्या ठिकाणी सत्य-साई पूजन दुपारी आणि संध्याकाळी होते, आपण बापूंना सुदीप अर्पण करू शकतो , आत्ता याग हि इथेच होतात, मागे धुनी आहे ,
🔅मंगळवार,गुरुवार,शुक्रवार,आणि रविवार ह्या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी आरती होई परंत धुनी चालू असते, इथे मन्नत धूप अर्पण करू शकतो आपण, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी / संकटे दूर होण्यासाठी इथे मन्नत धूप अर्पण करतात. तिथेच धर्म-चक्राची स्थापना केली आहे, हे धर्म चक्र आपल्या विश्वातील सगळ्या magnetic waves चे केंद्र बिंदू आहे म्हणजे centre of point आहे तिथे स्थापित आहे .(धर्म-चक्रा बद्दल तिथे लिहलेली माहिती नक्की वाचा, आणि समाधी स्थानं मध्ये माहिती लिहलेली आहे ती पण नक्की वाचा ) ,
🔅मंदिरातच 2nd floor वर ग्रंथालय आहे, आणि श्रीविश्वलोचन यंत्र आहे. हे यंत्र म्हणजे महाप्राण हनुमंताचे विश्वाकडे बघण्याचे नेत्रच आहे , ह्या यंत्र समोर बसून ४३ मिनिटे अध्ययन केल्याने आपले concentration वाढते.
🔅खाली तीर्थ म्हणून देवतांना अभिषेक केलेले जल भक्तांना देतात, आणि नैवेद्य चाच प्रसाद दिला जातो,
चैत्र नवरात्र, आणि अश्विन नवरात्र इथे साजरी केली जाते, अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमी ला, आपल्या नंदाई चा उत्सव साजरा केला जातो,
श्रावणी शनिवारी इथे अश्वथ्य मारुती पूजन केले जाते, आणि मार्गशीर्ष शुक्रवारी वैभव-लक्ष्मी पूजन होते, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वर्धापन दिन असतो.
*🛕🌺श्री हरिगुरुग्राम 🌺🛕*
🔅सद्गुरू अनिरुद्ध बापू ज्या ठिकाणी पितृवाचन आहेत त्याचे उपदेश “श्री हरिगुरुग्राम” म्हणून ओळखले जातात. श्री हरिगुरुग्राम असे स्थान आहे जिथे भक्तांना सद्गुरू अनिरुद्ध बापूंचा विपुल आशीर्वाद प्राप्त होतो
*श्री हरिगुरुग्राम येथे कार्यक्रम -*
🔅दर गुरुवारी हजारो श्रद्धावान श्री हरीगुरुग्राम येथे उपासना (सामुदायिक प्रार्थना) मध्ये भाग घेण्यासाठी आणि सद्गुरु अनिरूद्धांचे दर्शन घेण्यासाठी येतात. साईनिवासमधील विष्णुपादच्या आगमनाने आणि श्रीमद् पुरुषार्थ ग्रंथराज यांनाही दिंडी मिरवणुकीत पालखी (पालखी) येथे स्टेजवर नेले जाते. नंतर, सद्गुरू बापूंच्या निवासस्थानी असलेल्या श्री दत्तात्रेयांची मूर्ती येते. दत्तात्रेय आणि ग्रंथराज यांच्या मूर्तीवर श्रद्धावानांना फुलांची वर्षाव करण्याची संधी मिळते. श्री दत्तगुरूंच्या पूजेनंतर उपासना सुरू होते.
*🛕🌺अतुलितबलधाम🌺🛕*
🔅सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी रत्नागिरी येथील ‘अतुलितबलधाम’ येथे पंचमुखी हनुमंताची मूर्ती स्थापन केली आहे.
🔅 हनुमान पौर्णिमेचा भक्तिमय उत्सव तेथे दरवर्षी साजरा करण्यात येतो. हनुमंत हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे ‘रक्षकगुरु’ आहेत.
🔅‘ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:।’ हा जप गुरुवारच्या उपासनेत सामूहिकरित्या म्हटला जातो. हाच जप हनुमान पौर्णिमेच्या दिवशी अखंडपणे श्री अतुलितबलधाम येथे केला जातो. असंख्य श्रद्धवान या उत्सवात सहभागी होतात.
(माहितीत काही त्रुटी असल्यास क्षमस्व 🙏)
माहिती संकलन - ओमसिंह नवलाखे
*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌नाथसंविध्🙌*
Gurushetram mantra
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८.०३.२०१३)
॥ हरि ॐ॥
ॐ रामप्राण श्रीहनुमंताय नम:। हनुमन्त म्हटला की अनेक गोष्टी आठवतात. अगदी लहान मुलांनासुद्धा हनुमंताच्या, गणपती बाप्पाच्या गोष्टी आवडतात. आपण म्हणतो की हा एकदा बोलायला लागला की बोलतच राहतो, हनुमंताच्या शेपटीसारखा. हनुमंताची शेपटी वाढतच राहते म्हणून आपण वाढणार्या गोष्टींना हनुमंताची शेपटी म्हणतो. रामदास स्वामी म्हणतात की, ‘ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्र पुच्छे करू शके।’ ह्याच्या शेपटीचे शेवटचे टोक वज्र आहे. त्या शेवटच्या टोकानेसुद्धा तो अख्ख्या ब्रह्माण्डाभोवती वेढे घालू शकतो.
प्रत्येक गावोगावी, सीमेवर, झाडाखाली स्थापन केलेला आपण बघतो, त्याची स्तोत्रं आहेत, रामायणात एवढे हनुमंताला महत्त्व असूनही आपण कधीही त्याला प्रमुख देवता मानला नाही. लक्ष्मी पाहिजे असते कारण सुबत्ता हवी असते, गणपती पाहिजे कारण तो विघ्ननाशक आहे, सत्यनारायण केला की संकट टळतं पण हनुमन्ताविषयी अशी कुठलीच कथा नाही मिळत. प्रत्येक देवाच्या चरित्रात त्याचे भक्त असतात साईनाथांचे भक्त आहेत, रामाचे भक्त आहेत पण हनुमंताच्या चरित्रात त्याचा भक्त दिसत नाही. साडेसाती आली की आम्हाला हनुमंत आठवतो. मग प्रत्येक ठिकाणी देवळे बांधावीत एवढे ह्याचे काय महात्म्य आहे? हनुमंताचे भक्त कोण आहेत? - राम, सीता, लक्ष्मण, सुग्रीव, अंगद, बिभीषण हा हनुमंताचा भक्तही आहे आणि शिष्यही आहे, बेसिकली सगळे वानरसैनिक हनुमंताच्या सांगण्यावरून येतात.
आम्ही नेहमी झडपा लावून बघत असतो. फोडणीचा भात हा शिळ्या भाताचाच का करायचा? आम्हाला परंपरेने माहीत असतं, आम्ही त्यातून बाहेर पडतच नाही. आम्ही स्वत:च्या मनामध्ये इमेज तयार करून ठेवतो त्याच्या पलीकडे कधी जात नाही. हनुमंता रामाचा दास आहे आणि तो जे काही करतो ते रामासाठी करतो हे एवढंच आम्हाला माहीत असतं.
‘कुमति निवार सुमति के संगी।’ ‘नासै रोग हरै सब पीरा।’ ‘संकट तें हनुमान छुडावै ।’ ‘राम रसायन तुम्हरे पासा।’ ‘दुर्गम काज जगत के जेते।’ - ह्याचे दोन अर्थ होतात - १) जग जिंकण्यासाठी जे दुर्गम आहे ते तुझ्यामुळे पार पडते. २) तू स्वत:च सर्व विश्वात जे जे दुर्गम आहे त्यावर विजय मिळवून ठेवला आहेस, त्यामुळे तुझा अनुग्रह सगळं काही सुगम करतो. एवढी वाक्यं बोलतो पण लक्षात कोण घेतो. हनुमानचलिसामुळे हनुमान आपल्याला समजतो, जवळचा वाटतो.
हनुमंत म्हणजे महाप्राण. अजीवांची जसं आहे तसं ठेवण्याची शक्ती आणि सजीवांमधली विकास करण्याची शक्ती हा महाप्राण करतो. तो अतिशय विराट आहे.
केळीच्या फुलातून एकदा केळ प्रसवली की परत तिला त्यातून फळ येत नाही. काही झाडांचे परागकण वार्यावर उडतात आणि त्यांची झाडे तयार होतात. आंबा, फणस ह्यांना फळं किती वर्षांनी लागतात. आपण उत्क्रांतीवाद शिकतो एक पेशीय प्राणी ते माणूस ह्याला उत्क्रांतीवाद म्हणतात. आधीसुद्धा वेगवेगळ्या वनस्पती अस्तित्वात होत्या आणि आजही वेगवेगळ्या वनस्पती अस्तित्वात आहेत.
समजा तुमच्यासमोर २० वेगवेगळी दिसणारी माणसं उभी केलीत, ज्यांना तुम्ही पहिल्यांदा बघताय, त्यांना तुम्ही वेगवेगळे ओळखू शकाल का? हो, आता समजा २० म्हशी समोर उभ्या केल्या तर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ओळखू शकाल काय? नाही, का नाही त्यांच्यामध्येही फरक असतो. माणसं आणि म्हशी पहिल्यांदा बघता पण माणसं ओळखू शकता आणि म्हशी ओळखू शकत नाही असं का? पण म्हशीच्या मालकाला प्रत्येक म्हैस वेगळी दिसते. माणसाला माणसांचे वेगळेपण कळते पण म्हशींचे कळू शकत नाही. पण म्हशी पाळणार्याला कळते. त्या कळपात बाहेरून घुसलेली म्हैस त्याच्या लक्षात येते त्याचप्रमाणे त्याच्या म्हशींमधली चोरीला गेलेली म्हैस त्याच्या बरोबर लक्षात येते.
प्रत्येक मनुष्याला स्थूल पातळीवर दोन गोष्टींमधली तुलना व फरक आपोआप कळत असतो. ती शक्ती प्रत्येक मनुष्याला जन्मत:च प्राप्त असते. मनुष्याच्या मनात निरीक्षण होते तशीच तुलना आपोआप होते. दोन वस्तू बघितल्यावर त्यामध्ये फरक काय? ही शक्ती महाप्राणामुळे असते. power of selection म्हणजे निवडण्याची शक्ती आणि power of dinstinguish म्हणजे भेद ओळखण्याची शक्ती मनुष्याकडे महाप्राणाकडून येते. ही प्रत्येकाला समानतेने मिळालेली असते व ती शक्ती मनुष्याने वाढवत न्यायची असते. प्रत्येकजण ज्या ज्या विषयात गती करतो त्या त्या विषयात त्याच्या ह्या दोन गोष्टी अधिक प्रगल्भ होत जातात. प्रत्येक माणसात ह्या दोन शक्ती आहेत. दोन वस्तूंमधला, प्राण्यांमधला फरक ओळखणं आणि त्यातून निवडणं हे महाप्राणाकडून मिळत असतं.
वनस्पतीची पानं दिवसा कार्बनडायऑक्साइड आत आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. रात्री ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकतात. त्यापासून पाने अन्न तयार करतात. आपल्या शरीरातले रक्त ऑक्सिजन खेचून घेतो आणि कार्बनडायऑक्साइड फेकले जाते हा choice आहे. आपण अवधूत चिंतन उत्सवात ग्राह्य काय आणि त्याज्य काय हे शिकलोत. ग्राह्य काय आणि त्याज्य काय ह्यासाठी दत्तात्रेय आपल्याला मदत करतो. हनुमन्त म्हणजेच दत्तात्रेय जेष्ठ चण्डिकापुत्र आणि दत्तात्रेय म्हणजेच हनुमन्त.
ग्राह्य काय आणि ग्राह्य हे तो एकच जेष्ठ चण्डिकापुत्र दत्तात्रेयरूपाने शिकवतो, देतो, देत राहतो. ग्राह्य म्हणजे घ्यायचं काय? त्याज्य म्हणजे टाकायचं काय आहे? हे शिकवतो.
हनुमंताच्या रूपाने choice करायला मनुष्याला शिकवतो. पण मनुष्य नेमकं नको ते ठेवतो आणि पाहिजे ते त्याज्य करतो. म्हणून हनुमंत आवश्यक आहे. ‘कुमति निवार सुमति के संगी।’ choice करणं ह्यातच माणसाचे problem होतात त्यासाठी आवश्यकता असते सुमतीची. आमचा choice correct यायचा असेल तर आमच्याकडे सुमती असायला हवी.
आमच्याकडे हनुमंताची कृपा असावी लागते. आम्हाला ग्राह्य काय? त्याज्य काय? माहीत असतं तरी आपण हट्टीपणाने पुढे जात असतो. कारण आम्ही हनुमंताला विसरतो. म्हणून आमच्याकडे चण्डिकाकुल आहे तर आमचे पाय जमिनीवर राहतात.
मुलांना ४० टक्के मिळाले तरी आईवडिलांचा आग्रह असतो दादांकडे की मुलांना engineer बनवायचे का? ज्या विषयात प्राविण्य आहे त्या विषयात पुढे जायला द्या. मुलांना engineer, doctor, मेडिकलमध्ये अॅडमिशन मिळाली की ग्रेट हे आईवडिलांच थोतांड आहे. प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे, हे प्रत्येकाचं सगळं वेगळं महाप्राणामुळे आहे. काही वेळा एकाच बिजाचे दोन भाग होऊन जुळी मुलं तयार होतात, दिसायला ती सारखी असतात पण त्यांची प्रत्येक गोष्ट वेगळी असते. हा भेद maintain करतो तो हनुमन्त. मुलांनी commerce घेतलं की त्याने CA झालंच पाहिजे. नापास झाले की आईवडिल मुलांना, देवाला शिव्या घालतात आणि मुलं आईवडिलांना शिव्या घालतात. कुठलंही क्षेत्र कमी नाही. सगळे civil engg., electronics engg., computer engg., झालेत, अमेरिकेला मुलांना पाठवलेच पाहिजे. अशा लाटा येतात नि जातात. कुठलंही क्षेत्र कमी महत्त्वाचं आहे आणि जास्त महत्त्वाचं आहे लोक म्हणतात म्हणून ठरवू नका.
भलेभले लोकसुद्धा नको त्या scheme मध्ये पैसे गुंतवतात नि आपटतात. बापूला काय कळते? असं बोलणारे आज इथे बसले आहेत ग्राऊंडमध्येच. एकाने पैसे गुंतवले पहिल्यांदा फायदा झाला. मनात बापूला काय कळते म्हणून बापूंचा उद्धार केला. पुढे VRS घेतल्यावर ४५ लाखांचे नुकसान झाले. आज एक-दीड वर्ष झाले, तरीही पैसे परत नाही. ते सदगृहस्थ मग आत्महत्या करायला निघालेत, पण तो जोपर्यंत तुमच्या चेकवर सही करत नाही तोपर्यंत तुम्ही चौथ्या मजल्यावरून जरी उडी मारलीत तरी तुम्हाला काय होणार नाही आणि त्याने सही केली की तुम्ही घरात कितीही safety करून बसलात तरी तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
हनुमन्त काय आहे ‘कुमति निवार सुमति के संगी’ म्हणजे दुर्बुद्धी नको. आम्हाला माहीत पाहिजे choice म्हणजे selection करण्याची शक्ती हनुमंत देतो. काही जणांना सवय असते दिवसभर प्रत्येक देवाला नमस्कार करायची. का? तर देव कोपेल म्हणून घाबरून ही मंडळी देवाला सारखा नमस्कार करत असतात. देवाला काय दुसरी कामे नाहीत? जी हे विश्व निर्माण करते तिचे तिन्ही पुत्र तिच्या आज्ञेतच असतात. तुमच्यावर कोप करण्यासाठी तुम्ही एवढे काय वाईट आहात? देवाला काय तुमच्यावर कोपल्याशिवाय धंदाच नाही काय? मध्यंतरी संतोषीमाता फेमस झाली होती पिक्चरमुळे. पिक्चर निघायच्या आधी तिचं नावं तरी माहीत होतं का कोणाला? हे सगळे देवांचे स्तोम वाढवणे, कमी करणे हे ढोंगी लोक करत असतात. कोणीतरी चत्मकार करतं म्हणून त्याच्यामागे सगळे धावतात. मोठमोठे मॅजिशियन अनेक जादू करतात गोष्टी निर्माण करतात, आयफेल टॉवर नाहीसा करून दाखवतात. ते मान्य करतात की ही त्यांची हातचलाखी आहे आणि काही जण अंगाला राख फासून, अंगरखा घालून बुवा बनतात आणि ह्याचा बाजार मांडतात.
अशा गोष्टी चण्डिकाकुल करत नाही. ते तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणतात पण त्याचं प्रदर्शन मांडत नाही, त्याचं कधीही स्तोम माजवत नाहीत. निवडीचं स्वातंत्र्य आमच्याकडे आहे. देवळात बसलेला हनुमंत आम्हाला आमचा वाटला पाहिजे.जे चण्डिकेकडे आहे तेच तिच्या पुत्रांकडे असतं, आडात असेल तेच पोहर्यात येणार. विहिरीत पाणी आहे तर तुमच्या मडक्यात पाणीच येणार, विहिरीत मध आहे तर तुमच्या मडक्यात विष येणार नाही.
आम्ही गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणतो म्हणून आम्हाला खात्री आहे की ‘सर्वकोपप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्’ चण्डिकाकुल कधीही मानवांवर कोपत नाही, तर असुरांवर कोपते. हे आम्हाला केव्हा कळेल जेव्हा आम्ही हनुमंताचा हात धरू तेव्हाच. हनुमंत म्हणजेच ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ सगळे बुद्धिवान एकत्र केलेत तरी त्याहून तो वरिष्ठ आहे. हनुमंताची उपासना आयुष्यात नित्य असणे आवश्यक आहे. हनुमंताचे अस्तित्व तुमच्या जीवनात असणं, तुम्ही त्याला जीवनात आणणं आवश्यक आहे. तुमची निवड चुकू नये म्हणून हनुमंत ताकद देत असतो. ती मजबूत करण्याची तयारी हवी.
Business करणं म्हणजे खायाची गोष्ट नाहीय. मित्राचा business चांगला चाललाय म्हणून त्याच्याशी गप्पा मारून business येत नाही. मोठमोठे businessman आपल्या मुलांना आधी दुसर्या businessman कडे कामाला ठेवतात. उद्योगपतीसुद्धा त्यांच्या मुलांना लहानपणापासून दुसर्यांच्या दुकानावर काम करायला शिकवतात, त्यांना नोकर म्हणून ठेवतात आणि नोकर मंडळींपेक्षा ही माणसं जास्त धावपळ करत असतात. मग ते businessman बनतात. Choice करताना कुठल्याही क्षेत्राला दुय्यम लेखू नका. प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे. शिक्षण व व्यवसायाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला नीट choice करता येण्यासाठी हनुमंताची कृपा आमच्या आयुष्यात हवी. Choice नीट करता यावा म्हणून हनुमंताची नितांत आवश्यकता आहे.
आधी माहिती करण्याचे श्रम घेतले पाहिजेत मग बदल करावे लागतात. Choice करण्याची क्षमता आमच्यात असते. पौरससिंहने बारावीला maths च्या ऐवजी psychology विषय घेतला. त्यामुळे त्याला तीन मुख्य विषयांकडे लक्ष देणे सोपे झाले.
मुले जेव्हा हनुमानचलीसा म्हणतात तेव्हा तुम्ही टीव्ही बघत बसता. मुलांनी आईवडिलांच ऐकणं आवश्यक आहे तसंच आईवडिलांनीही मुलांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. मुलं हनुमानचलीसा म्हणतात आणि आईवडील सिरिअल्स बघत असतात म्हणजे मुलांना वाटतं की हनुमानचलीसा दुय्यम महत्त्वाची आहे आणि टीव्हीच्या सिरिअल्स महत्त्वाच्या आहेत.
संस्कार करणं म्हणजे हनुमानचलीसा म्हण असं सांगणं नाही तर हनुमानचलीसाचा आदर स्वत:आईवडीलांनी राखला पाहिजे.
‘जय हनुमान महाप्रभु । सखा बंधु स्वामी ।’ ह्या आरतीत आपण बघतो तो सखा आहे, बंधु आहे आणि स्वामीपण आहे. ‘नूतन पथ अधिनायक’ प्रत्येक नवीन दरवाजे तो उघडून देतो. नसतील तर नवीन दरवाजे चण्डिकाकुल तयार करून देतात, जेव्हा तुम्हाला वाटतं काही मार्ग उरलेला नाही तेव्हा मनमोकळेपणाने त्याला हाक मारा पण ती वेळ येईपर्यंत थांबता का? जोपर्यंत चांगलं आहे तेव्हाच त्याला हाक मारायची. मुलगा दहावीत जाईपर्यंत आम्ही थांबू मग हनुमानचलीसा म्हणू असे करू नका. पुढे होणार्या सासवांनी हनुमानचलीसा म्हणा सून चांगली मिळावी म्हणून आणि मुलींनी ज्या सुना होणार आहेत त्यांनी चांगली सासू मिळावी म्हणून हनुमानचलीसा म्हणा. हनुमंत Choice करण्याचं सामर्थ्य देतो. शब्द निवडण्याचा सुद्धा आपला Choice चुकतो. भांडतानासुद्धा आपण चुकीचा शब्द निवडतो आणि समोरच्या माणसाच्या काळजावर तो वार करतो. हा चॉईससुद्धा चण्डिकाकुल बदलतो.
राम म्हणजे निष्कलंक आनंद. निष्कलंक आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा चॉईस परफेक्ट असतो तेव्हाच भक्ती, शेजार, मित्र यांची उचित निवड होते.
‘ॐ रामप्राण श्रीहनुमन्ताय नम:।’ ह्या मंत्रात, अश्वत्थ मारुती पूजनात ही ताकद आहे. आज आम्ही आठ वर्षाचे असू, ऐंशी वर्षाचे असू आजपासून ज्यांना असं वाटतं आमचं जीवन right असावं, wrong असू नये, त्यांनी आपआपल्या परीने हनुमंताची उपासना करा, त्याचं भजन करा. प्रत्येक पातळीवर निवडच, correction हा महाप्राण हनुमंत करत असतो. म्हणून आपण म्हणतो - ‘ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम:’ आणि ‘ॐ रामप्राण श्रीहनुमन्ताय नम:’
॥ हरि ॐ॥
अंबज्ञ
🙏🏼❤️❤️🙏🏼
Source: aniruddhabapu.in
panchamukh hanuman kavach
whatsapp post
हरि ॐ नाथसंविध्
बापूंनी पितृवचनातून किंवा अग्रलेखातून दिलेली एखादी माहिती कित्येकांना माहित असेलही पण कित्येकांना माहित नसेलही. ज्यांना माहित नसेल त्यांनी ती नक्कीच अभ्यासू वृत्तीने वाचावी.
मंगळवारच्या उपासनेत आपण श्रीपंचमुखहनुमत्कवच म्हणतो.
बापूंनी अर्थासहित सांगितलेलं श्रीपंचमुखहनुमत्कवच.
एकदा गरुडाला खूप गर्व झाला होता की अमृताचा कुंभ मी आणलाय. महाविष्णू गरुडावर स्वार होऊन फिरायला निघतात. गरुड उडायला सुरुवात करतो पण उडूच शकत नाही. खूप प्रयत्न केले. शेवटी महाविष्णूची प्रार्थना केली. देवा आज असं का झालं?
महाविष्णू म्हणाले, उड.
आणि गरुड उडायला लागला. त्याला वाटलं, महाविष्णू माझी प्रत्येक गोष्ट मानतात. परत तो खाली यायला लागला आणि उडणं बंद झालं. तेव्हा त्याने महाविष्णूची प्रार्थना केली की देवा माझ्याजवळ जी घमेंड आहे ती कशी काढू?
महाविष्णू म्हणाले, हे मी नाही करु शकत. त्यासाठी तुला त्रिविक्रमाबरोबर जावे लागेल.
त्रिविक्रम म्हणाला, मी तुझी घमेंड जरुर काढेन पण मला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. मला दक्षिणा पाहिजे.
गरुड म्हणाला, काय दक्षिणा आहे?
तेव्हा त्रिविक्रम म्हणाला, पंचमुख हनुमान मेरु पर्वतावर सदैव ध्यान करत बसतात. त्यांचं ध्यान बघून ये आणि त्यांच वर्णन मला सांग.
तेव्हा गरुड जातो आणि सर्व बघून परत येतो आणि त्रिविक्रमाशी संवाद होतो. या संवादात हे हनुमत्कवच येतं.
*अथ ध्यानं प्रवक्ष्यामि शृणु सर्वांगसुंदर*
सर्वांगसुंदर हे त्रिविक्रमाच नांव आहे. त्रिविक्रम बाल स्वरुपात बसलाय आणि गरुड त्यांना सांगतोय.
*पंचवक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम्! बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदम्!*
पाच मुखांसह प्रचंड विशाल असणारा, पंधरा नयन असणारा.
आणि सर्व प्रकारचे पुरुषार्थ सिद्ध करणारा.
हनुमंताला आदिमाता चण्डिका प्रमाणे तीन डोळे आहेत जसे शिवाला तीन नयन आहेत. म्हणून त्याला महारुद्र म्हणतात.
तिस-या नयनाची जागा आज्ञाचक्राच्या ठिकाणी असते.
*पूर्व तू वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् !* *दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम् !!*
याचं पूर्वदिशेचं जे मुख आहे ते वानरमुख आहे. त्याची प्रभा म्हणजे तेज कोटी सूर्यांइतकी आहे. त्यांचं हे मुख कराल म्हणजे भयकारक आहे. भ्रुकुटी म्हणजे भुवई आणि कुटिल म्हणजे वाकडी. भुवई वाकडी करुन बघणारे हे मुख आहे.
*अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंह महाद्भुतम् !*
*अत्युग्रतेजोवपुषं भीषणं भयनाशनम् !!*
वक्त्र म्हणजे चेहरा, मुख. याचं दक्षिण दिशेला जे मुख आहे ते नारसिंहमुख आहे आणि अत्यंत अद्भुत असं आहे. अत्यंत उग्र असं तेज असलेलं वपु (वपु म्हणजे शरीर) ज्याचं आहे असा हा हनुमंत, त्याचे हे मुख भय उत्पन्न करणारे (वाईट माणसांसाठी) आणि भय नष्ट करणारे (भक्तांसाठी) आहे.
*पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम् !*
*सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम् !!*
पश्चिम दिशेला बघणारे जे मुख आहे ते गरुडमुख वक्रतुण्डं आहे त्याचप्रमाणे ते महाबल म्हणजे अत्यंत सामर्थ्यवान आहे, सर्व नागांचे प्रशमन करणारे, विष आणि भूत यांच कृंतन करणारे (नायनाट करणारे) गरुडानन आहे.
*उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दीप्तं नभोपमम् !*
*पातालसिंहवेतालज्वररोगादि कृन्तनम् !!*
उत्तर दिशेला पाहणारे मुख हे वराहमुख आहे. ते कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचे आहे, तेजस्वी आहे. पाताळात राहणा-यांचा प्रमुख वेताळ आणि भूलोकी त्रास देणा-या व्याधिंचा प्रमुख ज्वर यांना नष्ट करणारं असं हे वराहमुख आहे.
*ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम् ! येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यं महासुरम् !!*
*जघान शरणं तत्स्यात्सर्वशत्रुहरं परम् !*
*ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम् !!*
ऊर्ध्व दिशेला म्हणजे वर बघणारे जे मुख आहे ते अश्वमुख आहे. हय म्हणजे घोडा. हे दानवांचा नाश करणारे असे श्रेष्ठ मुख आहे.
हे विप्रेंद्रा (श्रेष्ठ गायत्री उपासना), तारकाख्य नावाच्या प्रचंड असुराला ज्याने नष्ट केले असं हे अश्वमुख आहे. सर्व शत्रुंचे हरण करणा-या अशा श्रेष्ठ पंचमुख हनुमंताच्या चरणी तू शरण रहा. रुद्र आणि दयानिधी अशा दोन्ही रुपांतर असणा-या हनुमंताचं ध्यान करावं.
*खड्गं त्रिशूलं खट्वांगं पाशमंकुशपर्वतम् ! मुष्टिं कौमौदकीं वृक्षं धारयंतं कमण्डलुम् !!*
*भिन्दिपालं ज्ञानमुद्रां दशभिर्मुनिपुंगवम् !*
*एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम् !!*
हनुमंताच्या हातामध्ये तलवार, त्रिशुल, खट्वांग, पाश, अंकुश, पर्वत आहे. त्याचप्रमाणे मुष्टी नावाचं आयुध, कौमोदकी गदा (हनुमंताच्या गदेचे नांव कौमोदकी आहे), एका हातात वृक्ष धारण केलेला आहे. तसेच एका हातात कमंडलु आहे. हनुमंताने भिंदिपाल धारण केलं आहे. भिंदिपाल हे लोहाने बनविलेले विलक्षण अस्त्र आहे. हे फेकून मारलं जातं तसेच यातून बाणही मारता येतात. दहावं आयुध आहे ज्ञानमुद्रा. अशा या मुनिपुंगव (मुनिश्रेष्ठ) पंचमुख हनुमंताची मी (गरुड) स्वत: भक्ती करतो.
*प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरणभूषितम् !*
*दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् !!*
उपविष्ट म्हणजे बसलेला. हा प्रेतासनावर बसलेला आहे. हा सर्व आभरणांनी भूषित आहे. (आभारण म्हणजे अलंकार, दागिने). दिव्य माला आणि दिव्य वस्त्र त्याने धारण केले आहे तसेच दिव्य गंधाचा लेप अंगाला लावलेला आहे.
*सर्वाश्चर्यमयं देवं हनुमद्विश्वतो मुखम् ! पंचस्यमच्युतमनेकविचित्र वर्णवक्त्रं शशांकशिखरं कपिराजवर्यंम् !!*
*पीताम्बरादिमुकुटैरुपशोभितांगम्! पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि !!*
सर्व आश्चर्यांनी भरलेला असा हा आमचा देव आहे. विश्वात सर्वत्र ज्याने मुख केले असा हा पंचमुख, अच्युत आणि अनेक अद्भुत वर्णमुखे असणारा आहे. शश म्हणजे ससा. अशा या सशाला अंकावर म्हणजेच मांडीवर धारण करणारा शशांक म्हणजे चंद्र आणि अशा चंद्राला ज्याने माथ्यावर धारण केला आहे असा तो हनुमंत आहे. कपिंमध्ये सर्वात श्रेष्ठ असा हा आहे. पीतांबर, मुकुट अशा गोष्टींनी सुशोभित ज्याचे अंग आहे असा हा आहे. गुलाबी आभायुक्त पीत वर्णाचे डोळे असलेला, आद्य म्हणजे पहिला, अनिश म्हणजे शाश्वत आहे. अशा या हनुमंताचे आम्ही मन:पूर्वक स्मरण करतो.
*मर्कटेशं महोत्साहं सर्वशत्रुहरं परम् ! शत्रु संहर मां रक्ष श्रीमन्नापदमुद्धर !!*
वानरश्रेष्ठ असा हा प्रचंड उत्साही हनुमंत सर्व शत्रुंचा नि:पात करणारा आहे. हे पंचमुख हनुमंता, माझ्या शत्रुंचा संहार कर, माझं रक्षण कर. संकटामधून माझा उद्धार कर.
*ॐ हरिमर्कट मर्कट मन्त्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले ! यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुन्चति मुन्चति वामलता !!*
*ॐ हरिमर्कटाय स्वाहा !*
महाप्राण हनुमंताच्या डाव्या पायाच्या तळव्याखाली *ॐ हरिमर्कटाय स्वाहा* हे जो लिहिल, त्याच्या फक्त शत्रुचाच नाही तर शत्रुकुळाचाही नाश होईल. वाईट मार्गावर जाण्याची वृत्ती म्हणजे वामलता. या वामलतेला म्हणजे या वृत्तीला हनुमंत समूळ नष्ट करुन टाकतो.
आता प्रत्येक वदनाला स्वाहा म्हणून नमस्कार केला आहे.
*ॐ नमो भगवते पंचवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा !*
सर्व शत्रुंचा संहार करणा-या पूर्वकपिमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.
*ॐ नमो भगवते पंचवदनाय दक्षिणमुखाय करालवदनय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाहा !*
दुष्प्रवृत्तींसाठी भयंकर मुख असणा-या, सर्व भूतांचा उच्छेद करणा-या दक्षिणमुखास, नरसिंहमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.
*ॐ नमो भगवते पंचवदनाय पश्चिममुखाय गरुडाननाय*
*सकलविषहराय स्वाहा !*
सर्व विषांचे हरण करणा-या पश्चिममुखास, गरुडमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.
*ॐ नमो भगवते पंचवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा !*
सर्व संपदा देणा-या उत्तरमुखास, आदिवराहमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.
*ॐ नमो भगवते पंचवदनाय उर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा !*
सर्व जनांना वश करणा-या उर्ध्वमुखास, अश्वमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.
शिरीषसिंह दिघे, कर्जत
अंबज्ञ
Gurushetram mantra
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१७.०५.२०१२)
॥ हरी ॐ॥
ॐ मंत्राय नम:... श्री गुरुक्षेत्रम् मंत्र आपण बघत आहोत. ॐ ऎं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे त्रिविक्रमनिलयं श्री गुरुक्षेत्रम् ह्यानंतर पद येते... ॐ ऎं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं श्री गुरुक्षेत्रम्.
त्रिविक्रमनिलयं संपलेले नाही आहे पण ते समजण्याआधी ५ व्या पदाला जाणॆ आवश्यक आहे. पहिल्यांदा आपल्याला गुरुक्षेत्रम् समजून घ्यायला हवे.
चण्डिकाकुलाची जिथे एकत्रित प्रार्थना मिळते ती जागा म्हणजे गुरुक्षेत्रम्. बापूंनी सांगितले तिथे धर्मासन, माता अनसुयेची तसबीर, महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे... अमुक अमुक आहे ते म्हणजे गुरुक्षेत्रम्.
आज प्रथम गुरुक्षेत्रम्विषयी जाणून घेऊया. गुरुक्षेत्रम् हे गुरु आणि क्षेत्रम् ह्या दोन शब्दांनी बनले आहे.
गुरु म्हणजे काय? शाळेत आपल्याला शिक्षक शिकवतो. त्यांना आपण गुरुच म्हणतो. वेगवेगळे बुवा, महाराज असतात, जे प्रवचन देतात, चमत्कार करुन दाखवतात त्यांनाही आपण महागुरु, सद्गुरु म्हणतो.
गुरुब्रम्हा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुरेव परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नम:
गुरु नक्की काय प्रकार आहे?
जगातील सर्वात श्रेष्ठ मंत्र काय तर गुरु हा शब्द.
आपल्याला इथे analysis नाही करायचे आहे तर आपल्या नित्याच्या जीवनात दु:ख कमी करण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी, आनंद देण्यासाठी, पुढील जन्माची चांगली सोय करण्यासाठी आपल्याला गुरू हे आवश्यक तेवढे तत्त्वज्ञान जाणून घ्यायचे आहे .
इथे एवढ्या स्त्रिया बसल्या आहेत. त्या सर्वांना भात बनवता येतो... येतो ना? हो तरी म्हणा.. येतो बरोबर पण समजा मी इथे तुम्हांला तांदूळ दिले आणि सांगितले भात बनवा तर बनवता येईल का ?
त्यासाठी काय लागेल? ... समजा भात बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य शेगडी, तांदूळ, माचिस, पाणी सगळे दिले मग भात बनवता येईल का? ( सगळे हो म्हणतात ).. हो! उत्तर चूक आहे. तांदूळ कशापासून बनतो? भातशेतीमधून, जेव्हा तांदूळ हा त्या टरफलासहीत असतो तेव्हा त्यालाही भात म्हणतात... मग त्यापासून वरील सर्व साहित्य दिल्यावर भात बनवता येईल का? नाही म्हणजे एकच शब्द पण दोन अर्थ ह्यासाठी त्यामागील अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे .
शीव शब्द आहे ह्याचा एक अर्थ परमशिव तर दुसरा अर्थ शिव म्हणजे स्पर्श, ह्याच्या र्हस्व दीर्घात फरक केला की शिव म्हणजे सीमा. हे आपल्या रोजच्या वापरातील शब्द आहेत म्हणजेच एकाच शब्दाचे ४ -५ अर्थ असतात असे असूनही एखादा शब्द उच्चारल्यावर समोरच्या व्यक्तीला त्यातील तिथे जो योग्य अर्थ तो आपोआप कळतो ना!!
तुम्हांला शाळेत असे शिकवले जाते का? की शिवाचा इथे अर्थ हा तर इथे असा... नाही. मग हे आपण कुठुन शिकतो तर अनुभवातून.
समजा लहान मुलाला "मी" म्हणायला शिकवायचे आहे तर ते कसे शिकवावे लागणार... तू म्हणजे मी बरोबर असे शिकवता येते का? पण तेच आई जे त्या बाळाला सोन्या, बाब्या करत बोलते ते लहान मूल आपोआप शिकते.
प्रत्येक गोष्ट कशी असते हे जरी पुस्तकात, ग्रंथात दिले असले तरी ते केवळ अनुभवातूनच शिकता येते.
पुस्तकात आपण शिकलेलो असतो डांबराच्या रस्त्यावरून भरउन्हात चप्पल न घालता चालले तर पायाला चटके बसतात... हे परीक्षेत लिहून तुम्ही चांगल्या मार्काने पास पण झालात पण जर कधी असे खरोखर उन्हात भर दुपारी डांबराच्या रस्त्यावरुन चप्पल न घालता चालायची वेळ आली तर त्या पुस्तकात शिकलेल्या गोष्टीचा खरा अनुभव येतो.
अरे संसार..संसार.. आधी हाताला चटके मग मिळते भाकर..
ह्याचा अर्थ हा का? भाकर देण्याआधी हाताला चटका द्यायचा... नाही म्हणजेच एकाच वाक्याचे विरुद्ध अर्थ लावून विनोद किंवा संशय निर्माण होतो. मग ह्यातले खरं काय हे कसे ओळखायचे?
चित्रामध्ये आपण बघतो साप किती सुंदर दिसतात.. त्यांचा स्पर्शदेखील थंड असतो हे आपल्याला वाचून माहीत असते. पण भर उन्हात तुम्हांला उकडते आहे... पायाला चटके बसत आहेत आणि त्याच रस्त्यात १००- २०० साप आहेत तर त्यांचा स्पर्श थंड असतो म्हणून त्यांच्यावरून तुम्ही चालत जाणार का?
साप चित्रात कितीही सुंदर दिसत असला तरी तो विषारी की बिनविषारी हे आम्हांला ओळखता कुठे येते आणि ते ऒळखायच्या खुणा माहीत जरी असल्या तरी त्या आठवेपर्यंत साप चावायचा तसाच थांबणार आहे का ?
म्हणजेच एखादी गोष्ट आपण पुस्तकात शिकतो पण ती आपल्याला अनुभवातूनच खरी समजत असते.
इथे किती दहावी पास आहेत? अरे हात तरी वर करा... मला सांगा दहावीच्या अभ्यासाला किती महत्त्व असते. पण हाच दहावी झालेला विद्यार्थी जीवनात वेगवेगळ्या प्रंसंगी नंतर किती समर्थ असतो .
किती जण इथे Bsc, Msc असतील; त्यांनी physics chemistry वाचलच ना पण आमच्या लक्षात राहते का?
आपण सोने विकत घेताना त्यात किती molecules आहेत ते बघून घेतो का? नाही तिथे आपण खिशाचे वजन किती आहे ते बघतो.
सर्वसामान्य जीवनात भानावर असणे व जाणणे हे अतिशय महत्त्वाचे आहे .
भानावर असल्याशिवाय जाणून घेता येत नाही व जाणून घेतल्याशिवाय भानावर रहता येत नाही. उदा. तुम्ही रस्त्यावरुन जात आहात व तुम्हाला माहीत आहे तिथे साप आहे तेव्हा तुम्ही भानावर असता जर तिथे साप आहे ह्याची जाणीव नसेल तर तुम्ही भानावर राहू शकणार नाही .
इथे परत कोंबडी आधी की अंडं आधी हा प्रश्न येतो आणि हा प्रश्न माणसाच्या जीवनात कधीच सुटत नाही.
भानावरही असणे व जाणतेही राहणे ही कसरत मनुष्य आयुष्यभर करत राहतो...
बर्याच स्त्रिया नेहमी म्हणतात आम्ही उरलं-सुरलं खाऊ... पण हे उरलं सुरलं म्हणजे किती ह्याचा हिशोब नसतो .
हल्ली जेवताना आम्ही काय करतो आपल्याला जे हवे असेल ते ताटात वाढून घेतो आणि सासू-सुनेच्या भांडण्याच्या व हाणामारीच्या मालिका बघत T.V समोर बसतो .
त्याऎवजी जर घरात सर्व स्त्रिया एकत्र बसल्या... एकमेकींशी गप्पा मारल्या तर किती चांगले होईल पण असं होत नाही कारण आंम्हाला त्याची गरज वाटत नाही.
आणि ह्या गोष्टीला अपवाद नाही.
मनुष्य नेहमी जशी गरज वाटते त्याप्रमाणे वागत असतो. गरज पडली की तुम्ही कृती करणार म्हणजे काय?
तर अशी गरज येऊ शकते ह्याची मला जाणीव नसणे ... अशी गरज मला निर्माण होईल ह्याचे मला भान नसणे.
आपण आज हे इथे नीट समजून घ्यायचे आहे कारण माणसाच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा हा विषय चालू आहे.
माणसाची ही गरजच प्रत्येक गोष्ट ठरवत असते. ह्या गरजेशिवाय कुठलीही गोष्ट घडत नसते.
प्रत्येक मनुष्याला जशी गरज असते तशी त्याच्याकडून क्रिया घडत असते.
ही गोष्ट लहानातल्या लहान व मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत माणसाने लक्षात ठेवली पाहीजे .
एखादी व्यक्ती तुमच्याशी चांगले का वागते? कारण तिची ती गरज आहे म्हणून जेव्हा त्या व्यक्तीची गरज संपते तेव्हा त्या व्यक्तीची तुमच्याशी चांगले वागण्याची जबाबदारी संपते.
तसेच एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट का वागते कारण ती तिची गरज संपली म्हणून.
प्रत्येक माणसाला मी काहीतरी चांगले वागतो असे मनाला वाटणे ही त्याची गरज असते. मोठे गुंड देवळे धर्मशाळा का बांधतात? कारण मी काही तरी चांगले करतोय असे वाटण्याची त्यांच्या मनाची गरज असते.
मनुष्याच्या गरजेमधूनच सगळ्या क्रिया उत्पन्न होत असतात. तुम्ही ज्या घरात राहता त्या घराची पण एक गरज असते.
म्हणजे काय? तुम्हांला काय वाटते फक्त माणसालाच मन असते का? हे चूक आहे. प्रत्येक निर्जीव वस्तुलाही मन असते कारण तिथे प्रोटॉन्स असतात... म्हणजेच महाप्राणाचे अस्तित्व असते,
जेव्हा घर बांधले जाते तेव्हा ते घर कोण बांधतो आहे? त्याच्या मनानुसार, ती बांधताना असणार्या कामगारांच्या मनानुसार, त्या घरात राहणार्या माणसांच्या मनानुसार त्या त्या घराचे मन बनत असते.
तीस वर्षे एक व्यक्ती एखाद्या घरात राहिली आहे आणि ते घर त्या व्यक्तीने सोडून तिथे जर नवीन व्यक्ती रहायला आली तर आपण म्हणतो घर मानवल नाही अस काही नसते.. कारण एकच असते की त्या घराला जे मन आहे जे त्या आधीच्या ३० वर्षे राहिलेल्या व्यक्ति नुसार घडलेले असते, त्याला पुन्हा नवीन व्यक्तीनुसार घडायला थोडा वेळ लागतो.
कारण त्या घरालाही मन असते. ह्याचा अर्थ हा नाही की समोर साप आहे मग त्यालासुद्धा मन आहे म्हणून त्याला गोंजारायचे येऊन चाव म्हणायचे... हे मंदबुद्धीचे लक्षण आहे .
असं का? आपण घराचे उदाहरण बघितले... जोपर्यंत घर उभे असते तोपर्यंतच त्या घराला मन असते .
जर तेच घर पाडले गेले तर त्या घराचे मनही नष्ट होते. लय पावते.
सर्व निर्जीव वस्तूंमध्ये मन असते अगदी मॅचबॉक्सच्या काडीलाही. पण जेव्हा ती काडी जळून जाते तेव्हा तिचे अस्तित्व संपते, तिचे मन ही लय पावते. अशा वेळी ती काडी जपून न ठेवता फेकलीच पाहीजे .
पण ही गोष्ट देवाच्या फोटोबाबत लागू होत नाही. घरात अनेक देवांचे फोटो आहेत मग त्यांना मन आहे का? असा देवाच्या गोष्टीत विचार करण्याची गरज नाही. तिथे मन आहे की नाही हे फक्त तो जाणतो
मी (प.पू.बापू) जो हा चष्मा वापरतो त्याला नेहमी प्रेमाने वापरतो, म्हणून त्या चष्म्याचे माझ्यावर प्रेम बसते. त्यामुळे तो मला कधीच injury करत नाही. जेव्हा स्त्री तिच्या घरातील सर्व व्यक्तींवर प्रेम करत असते तेव्हा तिला स्वयंपाक घरात कधीही सुरी लागत नाही, तिला injury होत नाही. पण तेच जेव्हा त्या स्त्रीचे तिच्या घरातील व्यक्तींवर प्रेम नसते तेव्हा तिला तीच सुरी बोचते, लागत असते.
मागे मी सांगितले होते accident म्हणजे काय? तुमच्या मनातल्या प्रत्येक विचारांचं एक मन असते
हा शर्ट जोपर्यंत मी अंगावर घातला आहे तोपर्यंत त्याला मन आहे. तो धुवायला टाकला की त्याचे मन लय पावते. प्रत्येक गोष्टीला मन आहे. मी लेखणीने लिहितो तिलाही मन आहे .
बर्याच जणांचे अक्षर घाणेरडे का असते? कारण त्यांचे त्यांच्या लिहिण्यावर प्रेम नसते म्हणून .
विद्यार्थीदशेत लिहिणं शिकत असताना जर घरून किंवा शाळेतून त्यास प्रेम मिळाले नसेल तर त्या विद्यार्थ्यास लिहिणे ही गोष्ट तिरस्काराची वाटते.
आज समजा अशी एखादी व्यक्ती ६० वर्षाची असेल आणि त्या व्यक्तीने ठरवले की आज बापूंनी सांगितले आहे त्याप्रमाणे वागून लिखाणावरही प्रेम करायचे तर त्या व्यक्तीला ह्या वयात तिचे अक्षर सुधारता येईल का? नक्कीच येईल.
अशा व्यक्तीने रोज महिनाभर देश भक्तीपर गीते, भावगीते लिहिली तर नक्कीच त्याच्या मनात लिहिताना प्रेम निर्माण होऊन त्याचे अक्षरही सुधारेल.
प्रत्येक ठिकाणी action-reaction घडत असतात ज्या ठिकाणी हे दिसत नाही तिथे मन नाही.
मनुष्य मरतो म्हणजे काय? मरताना प्राण जातो, प्राण गेला की त्यासोबत मनही जाते.
मानवाचे मन हे अतिशय विशाल असते. आमचे मन म्हणजे एक मोठा चुंबक आहे... जे जे काही आमच्या मनाच्या कक्षेत असते ते ते सर्व आकर्षित करते, खेचून घेते.
लोहचुंबक लोखंडाला खेचून घेतो ही़ ताकद त्या लोखंडाची असते का? नाही तर त्या चुंबकाची असते. तसेच मनाचे असते.
मनाचे हे चुंबक कसे आहे? तर ते विविध मनाला आपल्याकडे खेचून घेत असते. म्हणजे नक्की काय? तर..
आमच्या मनात जेवढे चांगले तेवढया प्रमाणात आमचे मन त्याच्या क्षेत्रातील चांगल्या गोष्टींना खेचून घेणार.
आमच्या मनात जेवढे वाईट तेवढया प्रमाणात आमचे मन त्याच्या क्षेत्रातील वाईट गोष्टींना खेचून घेणार.
आमच्या मनात जेवढे दु;ख, pain तेवढया प्रमाणात आमचे मन त्याच्या क्षेत्रातील दु;ख, pain गोष्टींना खेचून घेणार.
मग बापू आमच्या जीवनात अनेक दु:खे आहेत मग आमचे मनदेखील दु:खेच खेचून घेणार.
त्यामुळे आमचे जीवन अधिक वाईट होणार का? हे सत्य आहे. चांगली माणसे अधिक suffer का होत असतात त्याचे हे कारण आपण आज बघतोय.
मला सांगा परमेश्वराने जीवन उत्पन्न का केले? त्या सच्चिदानंद परमात्म्याने जे काही उत्पन्न केले आहे ते तुम्ही दु:खी राहावे, क्लेश भोगावे म्हणून का? नाही... त्याने जग उत्पन्न केले मनुष्याला आनंद मिळावा म्हणून.
चण्डिकाकुल आज आमच्या जीवनात येऊन आम्हांला वाढवते आहे आमचे पोषण करते आहे ते आम्ही आनंदी रहावे म्हणून.
आम्ही दु:खी का असतो? नवरा बायको रस्त्याने चालत जात असताना नवरा दुसर्या बाईकडे वळून वळून बघत असतो तेव्हा जर त्या बायकोने त्या बाईला बोलावून सांगितले अग बाई ग बघ हा तुझ्याकडॆ बघतो आहे तर काय होईल मला सांगा? नवर्यानी तिथेच समजायचे आता संपले सगळे!! पण असे ती बायको नाही करत का? कारण भीती...
पुरुष जास्त लफडी का करतात? कारण भीतीच. मी एवढा strong आहे हे त्यांना prove करून दाखवायचे असते. स्त्रियांना पण मीच सगळ्यात सुंदर व attractive हे सांगायचे असते.
तुमच्या मनात हे भय तुलनेतून निर्माण होत असते. मानवाचे मन हे चुंबक आहे. जसं आमचे मन असते ते तशाच प्रकारच्या गोष्टी आकर्षित करून घेत असते.
जर मनात आनंद असेल तर ते बाहेरूनही आनंदच खेचून घेणार जर मनात दु;ख असेल तर ते दु:खच खेचून घेणार.
बायको जास्त सुंदर असली की पुरुषांच्या मनात भय निर्माण होते. स्त्रियांच्या बाबतीतही तीच गोष्ट असते.
संशय हा नेहमी भीतीतूनच उत्पन्न होत असतो. अर्धे संसार ह्यामुळेच बिघडत असतात.
आमचे मन त्यात जे गुणधर्म आहेत त्यांनाच ते बाहेरुन आकर्षित करत असते. म्हणजेच जर आम्हांला सुख हवे असेल, आनंद हवा असेल तर आमचे मन हे सुखी व आनंदी असले पाहिजे.
पण आम्ही सामान्य माणसे आहोत. आमच्या जीवनात अनेक दु:खे असतात. सासू छळत असते, मुलं शिकत नसतात, नवरा त्रास देत असतो अशा अनेक गोष्टींना वेगवेगळ्या पातळीवर आम्हांला सामोरे जावे लागते... मग आम्ही नेहमी दु:खीच रहायचे का?
नाही... तर अशा वेळी तुमची जी काही सांसारिक परिस्थिती असेल त्यावर मात करुन तुंम्हाला आनंदी राहिले पाहिजे.
दुसर्याला चांगले देण्याने माणसाचा अहंकार पण तो चांगला अहंकार, आत्मविश्वास खूप strong होतो.
भले तुम्हांला सांसारिक दु:ख असले तरी त्याही परिस्थितीत तुम्हांला जेवढे चांगले वागता येईल तेवढे वागा. त्यातून तुमच्या मनात जो आनंद निर्माण होईल तो मग ह्या विश्वातला आनंद तुमच्याकडे खेचून घेईल.
जर हे असे करणे जमत नसेल आपण सामान्य माणसे आहोत दु:खामध्येही सुखी राहणे कठीण वाटू शकते तर मग अशा वेळी तो जो एक आहे, जो आंम्हाला फक्त आनंद द्यायला बसला आहे, त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या कार्यात, सेवेत सहभागी होण्याचा प्रयत्न करा.
असे जेव्हा तुम्ही करता तेव्हा समजा तुमचे मन ४x४ आहे आणि त्यात खचाखच दु:ख भरले आहे तरीही तुम्ही त्याही परिस्थितीत त्या भगवंताचे स्मरण आनंदाने करत असाल, हा माझा भगवंत मला ह्या दु:खातून बाहेर काढणारच ह्या विश्वासाने कराल तर तुमचे दु:ख ४००० पट असेल तरी हा भगवंत तुमच्या मनाच्या ताकदीची उपेक्षा करून त्यात आनंद मिसळतो. म्हणजे जरी तुमच्या मनात दु:ख काठोकाठ भरले आहे अगदी बिलकुल जागा नाही आहे तरी तो त्यात हळूहळू आनंद मिसळतो आणि मग अशी स्थिती येते की दु:खाची भावनाच उरत नाही.
हे तो कसे करतो हे तुम्हांला कधीच कळू शकणार नाही. मग तुमच्या ज्या गोष्टी तुमच्या दु:खाचे कारण होत्या त्याच गोष्टी सुखाचे कारण बनतात. सासू प्रेम करू लागते, मुलं नीट अभ्यास करू लागतात, नवरा नीट वागतो.
सुंदरकांण्डात एक ऒवी आपण वाचतो...
प्रबिसि नगर कीजे सब काजा, ह्रुदय राखि कोसलपुर राजा
गरल सुधा रिपु करहिं मिताई, गोपद सिंधु अनल सितलाई,
लंकिनी महाबली हनुमंतास सांगते, तुझ्या अंत:करणात प्रभू रामचंद्रांना ठेवून काहीही काम कर मग विषच अमृताचे काम करेल.
सद्गुरुतत्त्व काय करते तर विषचाचेच अमृत बनवते. जो शत्रू असतो तोच मित्र बनतो. जे काही कोणी तुमच्यासाठी वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल तेच तुमच्या फायद्याचे ठरते.
तो तुमच्यासाठी जे जे काही अहितकारक आहे ते ते हितकारक बनवतो. पण कधी? प्रबिसि नगर कीजे सब काजा... हा जो राम आहे त्याला हृदयात धारण केले तरच.
श्री साईसच्चरीतात हेमाडपंत सांगतात.. "राम कृष्ण साई, तिघांमाजी अंतर नाही"
हा तो एकच आहे व ह्याचे एकत्व माणसासाठी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. तो एकच होता, एकच आहे आणि एकच असणार म्हणजे नक्की काय?
चण्डिकाकुलात आदिमाता, दत्तात्रेय, हनुमंत, किरातरुद्र, माता शिवगंगागौरी व हा परमात्मा आहे. ह्यांची नाती आज बापूंनी आम्हांला सांगितली म्हणून माहिती आहेत बरोबर. पण इथे एक लक्षात घ्या ह्या चण्डिकाकुलामधील एक परमात्मा सोडून कुणीही कधीही मानव बनून येत नाही.
मानव बनतो तो हा एकच... तोच राम तोच कृष्ण तोच साई बनून येतो... भले मग त्याला कितीही त्रास होवो आपल्या लेकरांवर असलेल्या अनन्य प्रेमापोटी हा १०८% पूर्णपणे माणूसच बनून आलेला असतो. ही गोष्ट सोपी नाही आहे लक्षात ठेवा.
समजा तुम्ही बंगल्यात राहता तुमच्याकडे सगळी ऎश्वर्ये आहेत आणि तुम्हांला १ महिना चाळीत रहायला सांगितले तर तुम्हांला शक्य होईल का? नाही.
समजा तुम्हांला सांगितले तुम्ही पहिलीपासून आजपर्यंत जे काही शिकलात त्या ज्ञानाचा एक पूर्ण दिवस जराही वापर करायचा नाही... शक्य होईल का? नाही.
फक्त तो एकच सर्व क्षमता असूनही पूर्णपणे मानव बनून येतो आमच्यासाठी.
आमच्यावरील प्रेमापोटी तो जन्ममृत्यूचा अटळ सिध्दांत त्यालाही जराही लागू होत नसताना तो स्वीकारतो .
हा एकच असा आहे जर हा मानव बनला नाही तर हा कर्माचा अटळ सिद्धांत त्याला लागू होणार नाही. पण आपल्या लेकरांच्या प्रेमापोटी, मी त्यांच्यापासून दूर राहू शकणार नाही ह्या त्याच्या इच्छेपोटी तो परत परत मानव म्हणून जन्म घेतो.
पतीपत्नी आहेत समजा त्यातील एकाला दु:ख झाले तर तेव्हा दुसर्याने त्याला लांब उभे राहून मोठे प्रवचन दिले तर त्याला बरे वाटणार आहे का? नाही तेच जर त्याने जवळ जाऊन पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला तर नक्कीच त्याला आधार वाटणार .
हीच आपुलकी ही जवळीक आपल्या लेकरांना देण्यासाठी तो हे सर्व स्वीकारतो. आपल्या लेकरांप्रमाणेच एक बनून तो येतो त्यांच्यासोबत हसतो-बोलतो, काम करतो. असा सर्वसमर्थ असूनही कर्माचा अटळ सिध्दांत स्वीकारणारा तो एकच .
गुरु म्हणजे काय? तर ज्याला काही गरज नसताना, स्वत:चे सामर्थ्य न वापरता, जे त्याला जराही लागू होत नाहीत ते सर्व नियम तो स्वीकारतो... तोच एकच गुरु.
गुरुक्षेत्रम् म्हणजे काय? तर माझे माझ्या गुरुशी असणारे नाते. क्षेत्र म्हणजे शेत व शेत कोणाला पिकवावे लागते तर स्वत:लाच.
तो एकच जो आहे तो का अवतरीत होतो? हे जे क्षेत्र जे माणसाला स्वत:ला पिकवावे लागते ते तो म्हणतो मला द्या, तुमचे क्लेश तुम्ही मला दिले तर त्यात नांगरणीही तोच करतो व पिकवतोही तोच. तो एकच हे करु शकतो कोणासाठी? तुमच्यासाठी.
स्थूलरूपाने जेव्हा आम्ही गुरुक्षेत्रम्मध्ये जातो तेव्हा तिथे आल्यावर आमचे मन जरी दु:खाने भरले असले तरी तिथे दु:खाला attract करण्याच्या आड येतो तो गुरु. सच्चिदानंद असणारा हा परमात्मा तुमच्यावर सत आणि चित ह्याची जबाबदारी टाकत नाही तर direct तुम्हाला आनंद देतो .
आई व गुरु ह्या शब्दांमध्ये किती प्रेम आहे माझ्याएवढे कुणीही अनुभवलेले नाही. ते अनुभवणारा कुणीतरी दुसराही असावा असे मला मनापासून वाटते पण अजूनपर्यंत कोणी असा मायेचा पूत निघाला नाही.
हे गुरु आणि आईचे प्रेम तुम्ही प्रत्येकाने अनुभवावे अशी माझी मनापासून इच्छा आहे,
माझ्या गुरुंची एक गोष्ट तुम्हांला सांगतो.
माझे नित्यगुरु श्री मकरंद स्वामी ह्यांनी त्यांच्या निर्वाणाच्या वेळी सर्वांना जे जे काही त्यांच्याकडे होते ते वाटले. पण त्यांच्या लाडक्या अनिरुद्धासाठी त्यांनी काय ठेवले? तर शेवट्च्या क्षणी त्यांनी वापरलेलेल शूज. गुरुने जग सोडण्याआधी आपल्या पायातल्या वहाणा काढून देणे ह्यासारखी मोठी गोष्ट दुसरी काय असू शकेल/काहीच नाही. आजही ते शूज बघून माझ्या गुरुचे प्रेम आठवून मला रोंमांच उठतात.
तो एकच असतो म्हणून त्याचा नित्यगुरुही एकच असतो हे लक्षात ठेवा.
गुरु व गुरुचे प्रेम हे तुमच्या कल्पनांमध्ये कधीच बसू शकणार नाही. गुरुची ताकद किती आहे हे तुम्ही कधीच जाणू शकणार नाही.
"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऎसा..."
एवढा strong विश्वास आमचा असला पाहिजे. असे जेव्हा असेल तेव्हा आमच्या सर्व गरजा कुठेही भीक न मागावी लागता पूर्ण होतील
"सर्व सुखाचे साधन बाप रखुमादेवीवरु"
नेहमी ह्या दोघांमध्ये एकाचा रंग गोरा असतो तर एकाचा काळा पण विठ्ठल रखुमाबाई हे एकच असे जोडपे आहे की ज्यात ह्या दोघांचाही रंग काळाच आहे... व त्या पुंडलिकाचा रंगही काळाच आहे... हे कुणासाठी तर आमच्यासाठी.
परत एकदा सगळ्यांनी मोठ्याने म्हणा हे कुणासाठी तर आमच्यासाठी.
कुणासाठी तर आमच्यासाठी...
॥ हरी ॐ॥
#K10
अंबज्ञ..
जय श्रीराम
जय जगदंब जय दुर्गे..
नाथसंविध्..
Source: aniruddhabapu.in
janmasthami
हरि ओम. आज जन्माष्टमी. आद्यपिपा महानिर्वाण दिन.
त्यांच्या चरणी भाव पुष्पांजली.
हरि ओम .
महायात्रिक (२२ व्या अध्यायाची कथा) -
धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी झालेला हा अत्यंत सुंदर संवाद चौबळ आजोबा: अरे सुरेश (म्हणजे आद्यपिपा सुरेशचंद्र दत्तोपाध्ये- परमपूज्य श्री सुचितदादा आणि समीरदादांचे वडिल),हा श्रीविद्यामकरंदाचा (श्री गोपिनाथशास्त्री पाध्ये ) फोटो बघितल्यावर तुला काय वाटतं रे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं सांगू का? माझी नजर त्यांच्या डोळ्यांवरुन हलतच नाही. किती तेजस्वी,करारी, परंतु तरीहीकिती पवित्र आणि प्रेमळ भाव आहेत नाही?
चौबळ आजोबा: खरंआहे, पूर्णपणे खरं आहे. त्यांचे डोळे म्हणजेच संपूर्ण श्रीविद्यामकरंदत्व .आद्यपिपा (सुरेशचंद्र) :म्हणजे काय हो? मला काही जड शब्द कळत नाहीत व मला मोठया तत्वांची वगैरे खरं म्हणजेआवडच नाही.
चौबळ आजोबा: अगदी बरोबर बोललास , कसली आली आहेत मोठी तत्व आणि त्यांचे गूढार्थ? तो सदगुरुच एक खराव मोठा .तो समजायला मोठयामोठया बातांचा काही उपयोग होत नाही.
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :माझ्या मनातलं बोललांत बापूंच प्रवचन म्हणूनच मला खूप भावतं कारण सर्व उलगडून सांगतानासुद्धा बापू कधीच त्याच्यामध्ये क्लिष्टपणा आणत नाहीत व सहजपणे आपला मार्ग सापडतोच.
चौबळ आजोबा: तू काय बापूंना प्रवचनकार समजतोस ?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :मुळीच नाही.चौबळ आजोबा:मग ते कोण आहेत?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं म्हणजे वयाने, अनुभवाने ,भक्तीने व नात्याने तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात.त्यामुळे तुम्हीच"बापू कोण आहेत ? हे मला सांगायला हवं.चौबळ आजोबा: अरे,"दुसर्याने दिलेलं कितीसं पुरणार? ह्या अर्थाचं साईबाबांचं वचन हेमाडपंतानी लिहून ठेवलं आहे नाहीका? ते आठव व स्वत: त्यांचा मागोवा घेत राहा.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : मागोवा घ्यावासा वाटतो पण ती ३२व्या अध्यायातील शोध घेणार्या ४ जणांची व वणजार्याचीकथा आठवली की वाटतं आपण उगीच वेडयासारखं वागता कामा नये. माझा साई त्याअध्यायाप्रमाणेच मला नक्की येऊन भेटेल पण माझा १ हट्ट आहे .साईने एकदा तरी मलात्यांच विद्यमान रूप बाजूला सारुन त्या साईरुपातच ओळख पटवून दयावी.
चौबळ आजोबा: हा हट्ट कशासाठी? तुला अजून पटलं नाही काय ? तुला काय त्याची परीक्षा बघायची आहे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : नाही , नाही तसं मुळीच नाही. पण ’आपल्याला समजलं ते आपल्या प्रयत्नामुळे ’ असं झाल्यास नसतां अंहकार डोक्यात चढेल ह्याची सदैव भीती वाटते. लहानपणापासून अनेकवार शिरडीसगेलो, साईसच्चरिताची पारायणे केली ,पण का कोणास ठाऊक ,कायम आपल्याला अंहकार होईल, आपण साईंपासून दूर जाऊ अशी भीती मनांत घर करून राहते.
चौबळ आजोबा: मगं आजच्या आज ही भीती बापूंच्या हातांत सोपविली असं म्हण ,आत्ताच्या आत्ता म्हणं.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : त्यांना किती त्रास द्यायचा , जीभ वळत नाही.
(तेवढयात जिन्यावरून उतरणार्या बापूंना चौबळ आजोबांनी हाक मारली.)
चौबळ आजोबा: बापू , हा वेडा बघा. आता ह्याला जास्त वेळ तळमळत ठेवू नका .
बापू : काका, २२व्या अध्यायाचा अभ्यास करा.त्याचंच चिंतन करीत राहा. आतापर्यंत माणसाच्या वेगाने वाचत होतातआता मुंगीच्या वेगाने वाचत जा. हा पिपीलिका (मुंगी) मार्गच तुमचा आहे.
चौबळ आजोबा: अरे सुरेश, बघतोस काय? ताबडतोब पायावर डोकं ठेव. अरे, अनुग्रह झाला, आञा मिळाली .आता मुंगीहो आणि साखर खा.
Subscribe to:
Posts (Atom)