Sunday, September 5, 2021

agralekh

दैनिक प्रत्यक्ष
११ फेब्रुवारी २०२०

अग्रलेख 
कथामंजिरी-९५(१)
कार्यकारी संपादक
डॉ अनिरुद्ध धैर्यधर जोशी

रणकेदाररूद्रचा प्रश्न " मामाश्री! याचा अर्थ, *रावण आता कायमचा बंदिस्त झाला?*"

पराक्रमदित्यांचे उत्तर "नाही, तसे नाही. *जेव्हा परत स्वयंभगवान वरील प्रेम, विश्वास व आदर कमी होऊन कलियुग वाढत जाईल तेव्हा आपोआप रावणाचा लिंगदेह बंधनमुक्त होईल व मग भयाच राज्य पसरेल."*

विजयरुद्रांनी यावर उत्तर दिले
*" श्रध्दावानांची काळजी घेण्याचा कार्य स्वयंभगवानाने प्रेमाने स्वीकारलेले आहे आणि जगदंबे कडून त्याला तसा वरही मिळालेला आहे.*"

 त्यामुळे *स्वयंभगवान, थोडीफार श्रद्धा शिल्लक उरलेल्या भक्तांना सतत सहाय्य करीत राहणार व उचित वेळेस प्रगट होऊन, जगदंबेचे महात्म्य व स्वयंभगवान मंत्रगजर, अशा श्रद्धाळू भक्तांपर्यंत स्वतः पोहोचविणार. कारण स्वयंभगवानाचा मंत्रगजर हया सर्वच्या सर्व 108 पवित्र वस्तूंची स्पंदने, मंत्रगजर श्रद्धेने करणाऱ्याला अनेक पटींनी पुरवीत राहतो* व

 *चौथ्या मितीतील बिल्वमंगल स्थानावरील एक-एक बिल्व वृक्ष स्वयंभगवान स्वतः ह्या त्रिमितीतील अनेक ठिकाणी लावत राहिली व ह्यांची बिल्वपत्रे ज्या-ज्या श्रद्धावानांच्या हातून ईश्वरचरणी वाहीली जातील त्यांचे कल्याण होईल*

*मंत्रगजराचे घोष जेंव्हा कोटीगुणे वाढतील, तेव्हा स्वयंभगवान स्वतः रावणाचा लिंगदेह परत एकदा शिवबंधनाच्या कैदेत ठेवेल व श्रद्धावानांच्या जीवनात रामराज्य अवतरेल हे श्रद्धावानांचे नाथसंविध्  आहे तसंच हे वैदिक धर्माचे हि नाथसंविध् आहे*

आजची आपली महिकावती नगरी कलियुगाच्या त्या काळात *मुंबापुरी म्हणून ओळखली जाईल व तेथे तेव्हादेखील आई मुंबईचे अर्थात शिवगंगागौरी चे अर्थात माता वल्गेचे स्थान कायम असेल."*

आता मला समजले की सद्गुरू श्री अनिरुद्ध बापु आपल्याला १६ माळी त्रिविक्रम गजर करायला का सांगतात. गजर महत्वाचा - स्थान, वेळ, ठिकाण कसलेही बंधन नाही, *बंधन आहे ते फक्त प्रेमाने , विश्वासाने म्हणने*

शब्दांकन प्रयास
शिरीषसिंह बडवे
औरंगाबाद

*स्वयंभगवान व माझ्यातील नाळ जोडण्याचा एकमेव मार्ग आहे = दैनिक प्रत्यक्ष*

No comments:

Post a Comment