अनिरूद्ध बापूंचे प्रवचन
*(२९ जानेवारी २००९)*
जीवात्मा नाही-फक्त ते जीव आहेत. प्रत्येक जीवात्माकडे ह्या परमेश्वराच्या अष्टबीज ऐश्वर्यांची नऊ अंकुर ऐश्वर्यांमध्ये रूपांतर करणारा हा परमात्मा नांदत असतो. आणि तो भगवंताची- -कृपा परमेश्वराची कृपा प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावी म्हणून जी रचना-व्यवस्था स्थूल शरीरामध्ये, सुक्ष्म शरीरामध्ये आणि तरल शरीरामध्ये म्हणजेच भौतिक देहामध्ये, प्राणमय देहामध्ये आणि मनोमय देहामध्ये उत्पन्न करीत असतो; ही व्यवस्था, ती यंत्रणा म्हणजे गणपती आणि त्या व्यवस्थेतील आठ महत्वाची केंद्रं, आठ महत्वाची स्थानं म्हणजेच अष्टविनायक. दत्तगुरूंच्या अष्टबीज ऐश्वर्याचं रूपांतर मनुष्याच्या जीवनामध्ये नऊ अंकुर ऐश्वर्यांमध्ये करण्याचं यंत्र म्हणजे त्याला सगळ्या प्रकारे कृपा मिळविण्यासाठी-क्षमा मिळविण्यासाठी ■ परमात्मा जी यंत्रणा राबवितो त्या यंत्रणेची महत्वाची आठ स्थानं म्हणजे अष्टविनायक आणि म्हणून ह्यांचा संबंध अष्ट भावांशी आहे. परमेश्वराला बघितल्यानंतर ज्या भक्ताचे अष्टभाव जागृत होतात तेव्हाच भगवंताची पूर्ण कृपा होते असं आम्ही मानतो. कारण ह्यातला प्रत्येक भाव ह्या प्रत्येक → एक एका स्थानाशी निगडीत आहे. निसर्ग कसा आहे? तर अष्टधा आहे, आठ प्रकारचा आहे. अष्टधा प्रकृती म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये काय किंवा निसर्गाच्या जीवनामध्ये काय; ही प्रमुख आठ स्थानं आहेत की, जिकडे परमेश्वरांच्या बिजाचं रूपांतर परमात्म्याच्या अंकुरांमध्ये व्हावं लागतं आणि ती घडविणारी यंत्रणा म्हणजे गणपती आणि त्याची आठ स्थानं अशी आठ स्थानं तुमच्या शरीरामध्ये आहेत, देहामध्ये आहेत; तशी सृष्टीमध्ये आहेत आणि त्याच आठ स्थानाला अष्टविनायक म्हटलेलं आहे. तुमच्याकडे, तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणांमध्ये, तुमच्या शरीरामध्ये भक्ती करताना जे अष्टभाव जागृत होन कंप सुटणं, डोळ्यातून अश्रू येणं, गळा भरून येणं, घाम येणं हे जे सगळे. रोमांच उभं राहणं, हे जे अष्टभाव आहेत त्या प्रत्येक भावाचं स्थान म्हणजे अष्टविनायकातलं एक एक स्थान. म्हणजे आम्हाला कळेल अष्टविनायकाचं स्थान म्हणजे काय? अष्टविनायकाची स्थानं तुमच्या शरीरात आहेत, तुमच्या देहात आहेत प्रत्येकाच्या आणि ती स्थानं ऋषींनी तपश्चार्येने स्थूल रूपात सिद्ध केलेल्या जागा आहेत तुमच्या शरीरात. अष्टविनायककाची जी स्थानं की ती स्थानं सामान्य मनुष्याचं अज्ञान जाणून ऋषींनी स्वतःच्या तपश्चार्याने स्थूल रूपाने सिद्ध केली. तिचं पौ स्थानं म्हणजे अष्टविनायकाची तिर्थक्षेत्रे. ज्या अष्टविनायकाला मयुरेश्वर गणपती, रांजणगावचा गणपती, महडचा गणपती वगैरे; आम्ही जातो ती सगळी अष्टविनायकाची स्थानं. म्हणजे ऋषींनी प्रत्येकाच्या देहामध्ये असणाऱ्या अष्टविनायकाच्या स्थानांना स्वतःच्या तपश्चर्येच्या जोरावर बाहेर प्रकट केलं की जेणेकरून मनुष्य अंतर्मुख नसतो, आतमध्ये बघू शकत नाही. त्याला बाहेरच्या अष्टविनायकाचं दर्शन घेता यावं आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरातर्गंत, त्याच्या देहांतर्गत अष्टविनायक जागृत व्हावेत, प्रत्येक मनुष्याच्या देहातील जा अष्टविनायक जागृत व्हावेत ह्याचसाठी ऋषींनी आ तपश्चर्यांनी अष्टविनायकांची स्थानं उत्पन्न तुम् केलीत. आता आम्हाला कळेल की, हो अष्टविनायकाची स्थानं म्हणजे नक्की काय? मात्र अंग सुरूवातीला सांगितलेल्या फोनचं लक्षात ठेवा.अष्टविनायकाची आठ स्थान आहेत. तो मोबाईल चार्ज आहे. पण आमच्या मनातील विनायक जर चार्ज नसेल तर ते दोघे एकमेकाला जोडले गेले नाहीत. तर मधल्या स्पेसचा आम्हाला उपयोग काय? म्हणजे केवळ दुर्वा फेकण्यासाठी आणि पन्नास रूपये , फेकण्यासाठी आम्ही जाणार असू अष्टविनायकाला तर त्याचा उपयोग काहीही नाही. *उलट आम्ही घरी ना बसून अत्यंत प्रेमाने-श्रद्धेने अष्टविनायकाची नुसतीनावं घेऊन सुद्धा; *नावं येत नसतील तर आठ वेळा 'विनायक' असं म्हणून नमस्कार केला तर आमच्या मनातले अष्टविनायक जागृत होऊन त्या त्या प्रमाणात अधिक कार्यरत होतील व आम्हाला संपन्न करतील.* तर आम्हाला कळलं पाहिजे, अष्टविनायक म्हणजे नक्की काय? अष्टविनायक म्हणजे केवळ गणपतीची आठ पवित्र स्थानं नव्हेत. अष्टविनायक म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या देहात जी महत्वाची आठ स्थानं आहेत की, ज्यांच्यामधून परमेश्वराची अष्ट बीज ऐश्वर्य म्हणजे परमेश्वराची कृपा, परमात्मा म्हणजेच त्या परमेश्वराचा पौत्र- तो राम आमच्या जीवनांमध्ये नऊ अंकुर ऐश्वर्यांमध्ये रूपांतरीत करतो म्हणजे आम्हाला क्षमा मिळवून देतो, आम्हाला कृपा मिळवून देतो; ती स्थान म्हणजे *अष्टविनायकाची स्थानं आणि म्हणून ती तिर्थक्षेत्र पवित्र आहेतच. पण त्यापेक्षा आम्हाला माहित पाहिजे आम्ही जी भक्ती करतो त्याच्यामध्ये जेव्हा आमचे अष्टभाव जागृत होतात तेव्हा आम्हाला खरीखुरी अष्टविनायकाची यात्रा घडते. मग ते आमच्या घरी बसून जर आमचे अष्टभाव जागृत झाले तरी अष्टविनायकाची यात्रा घडली आणि अष्टविनायकाच्या आठवेळा यात्रा केल्या, आठशेवेळा केल्या आणि भाव जागृत झाला नाही तर त्या यात्रेला फळ फक्त तेवढंच; आलं लक्षामध्ये. महत्वाचं काय? भगवंताच्या भक्तीमध्ये तुमचे अष्टभाव जागृत होणं, तुम्हाला एवढा आनंद होणं की, तुमच्या तोंडातून शब्द निघायला पाहिजे, अंगाला घाम फुटला पाहिजे, अंगावर रोमांचं उभे राहिले पाहिजेत. असे हे सगळे अष्टभाव. गळा भरून आला पाहिजे, हृदय भरून आलं पाहिजे, डोळ्यातून अश्रू - वाहिले पाहिजेत. अशी स्थिती जेव्हा तुमची होते तेव्हा समजायचं की मला अष्टविनायकाची यात्रा घडली....*
No comments:
Post a Comment