॥ हरि: ॐ॥
*मन्त्रगजर महत्त्व*
दैनिक प्रत्यक्ष अग्रलेख *तुलसीपत्र क्र. १५७७* मध्ये स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाच्या भक्तिभाव चैतन्याचे सविस्तर विवेचन *सद्गुरु श्री अनिरुद्धांनी* केले आहे. या अग्रलेखात बापू सांगतात-
*‘भक्तिभाव चैतन्यामध्ये स्वयंभगवानाचा मंत्रगजर हा सर्वोच्च मंत्र मानला जातो* कारण हा दत्तभगिनी शुभात्रेयीने केला आहे.
ह्या मंत्रगजरातून भक्तिभाव चैतन्याच्या लहरी उसळत राहतात आणि *ज्याला ज्याला म्हणून स्वतःचे जीवन चांगले घडवायचे आहे, त्याला सर्व काही पुरविले जाते*.
मला प्रत्यक्ष माता शुभात्रेयीने सांगितले आहे की जो श्रद्धावान ह्या मंत्रगजराच्या 16 माळा दररोज, ह्याप्रमाणे कमीतकमी 3 वर्षे करतो, त्या श्रद्धावानाच्या विशुद्ध चक्राच्या (कंठकूप चक्राच्या) सोळाच्या सोळा पाकळ्या शुद्ध होतात अर्थात त्याचे विशुद्ध चक्र हनुमत्-चक्र बनते. मग कुठल्याही जन्मात तो सुखाने येतो, आनंदात राहतो आणि आनंदातच विलीन होतो.
स्वयंभगवानाचा स्पर्श ज्याला झाला, ती वस्तू, पदार्थ, व्यक्ती आपोआप पवित्र होते व ह्याला अपवाद नाही.
हा *स्वयंभगवान प्रेमळ व कृपाळू आहे, हा ठाम विश्वास बाळगूनच जप करा, ह्याच्या प्रतिमेचे पूजन करा, ह्याच्या पादुकांचे अर्चन करा, ह्याच्या चरणांकडे पाहत रहा, ह्याच्या मुखाकडे पाहत ह्याचे सौंदर्य पीत रहा, ह्याच्या मूर्तीला अर्थात अर्चनविग्रहाला ‘जिवंत देव’ जाणून सर्व प्रकारे सेवा करा आणि केवळ ह्याला आवडते म्हणून खर्याखुर्या गरजू श्रद्धावानांना सहाय्य करा, हेही भक्तिभाव चैतन्यच*.’
त्याचप्रमाणे *तुलसीपत्र 1588* या अग्रलेखात बापू आम्हाला सांगतात - *‘स्वतःच्या जीवनशेतीचा मी फक्त शेतकरी आहे आणि हा स्वयंभगवानच मालक आहे’ हे मनावर नीट बिंबवून मंत्रगजराच्या माळा करीत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य*.
No comments:
Post a Comment