Saturday, January 22, 2022

Tulsipatra 1527

*तुलसीपत्र १५२७* 
                देवर्षि नारद स्वयंभगवान त्रिविक्रमाचे स्वभावगुण सांगताना म्हणाले, 
 " *४)सानुक्रोशः*  - आर्ये शुभदे ! खरंच अगदी मनापासून सांगतो ,संपूर्ण दैवतविज्ञानामध्ये हा *भगवान त्रिविक्रम एकच एक खरा _'सानुक्रोश'_* आहे.
                शुभदे ह्याच्या भक्ताच्या डोळ्यातून प्रत्यक्ष वाहणारे अश्रू पाहून ह्याच्या एकट्याच्याच डोळ्याला पाणी येते.
                खरं सांगू ! श्रद्धावानांचा  आक्रोश ह्याच्याच्याने पहावत नाही. ह्याला भक्तांचे दुःख सहन होत नाही. आणि म्हणूनच हा सदैव *सानुक्रोश* अवस्थेतच असतो - श्रद्धावानांच्या जीवनात येणारी प्रारब्धनिर्मित संकटे हा आधीच जाणत असतो आणि आपल्या भक्तांना दुःखे येऊच नयेत, दुःख आलेच तर कमी करता यावे, दुःख न कमी होणे प्रारब्धानुसार अटळ असेल ,तर भक्ताला दुःख सहन करण्याची ताकद पुरविणे, श्रद्धावानाला आलेल्या प्रत्येक आपत्तीत त्याच्याबरोबर राहणे ह्यासाठी स्वयंभगवान त्रिविक्रम सदैव सजग आणि तत्पर असतो.
                *भक्त प्रल्हादाला* जेव्हा त्याच्या मुखातील हरिनाम बंद व्हावे म्हणून हिरण्यकश्यपूने चुलीवरील उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तेव्हा सतत *हरिनाम* घेणाऱ्या प्रल्हादाला जराही वेदना व क्लेश  होऊ नयेत ,म्हणून हा *त्रिविक्रम स्वतःच ती कढई* बनला ,त्या कढईतील तेलही बनला आणि अशा रितीने त्या धगधगत्या विस्तवाची *झळ ह्याने स्वतः सोसली*.परंतु *प्रल्हादाला जराही पीडा होऊ दिली नाही .*
                एवढेच नव्हे ,तर ज्या स्तंभाला हिरण्यकश्यपूने लाथ मारली, त्या *स्तंभाचे रुपही त्रिविक्रमानेच घेतले होते* आणि अशा ह्या दिव्य स्तंभातूनच *भगवान नृसिंह* प्रकटले.
               
*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

No comments:

Post a Comment