Monday, June 26, 2023

बापूंच्या घराण्यातील भक्ती

Message from whatsApp group
*होय परमात्मा प्रगटलाय!!*

*🌼🌸बापूंच्या घराण्यातील भक्ती🌸🌼* 
          (भाग -१)

*१)जगन्नाथ पाध्ये* : 

✨हे व्यवसायाने तहसीलदार होते. मुलकी कामानिमित्त एकदा मंगळवेढ्याला गेले असता त्यांची ओळख चिंतामणी टोळ या त्यांच्या मित्रामुळे स्वामी समर्थांशी झाली. जगन्नाथ पाध्ये यांना स्वामींचा बराच सहवास लाभला. स्वामींचे ते निष्ठावंत भक्त होते. 

✨१८७८ साली आपल्या निर्वाणाच्या एका आठवड्यापूर्वी स्वामींनी जगन्नाथ पाध्यांना मुंबईहून अक्कलकोटला बोलावून घेतले व सांगितले की आता आपण जाणार. त्यावेळेस *जगन्नाथ पाध्यांचा मुलगा गोपीनाथ पाध्ये* (जो जेमतेम १२-१३ वर्षाचा होता *गोपीनाथशास्त्री बापूंचे पणजोबा* ) हा त्यांच्या बरोबर होता. जगन्नाथ पाध्यांनी स्वामींकडे त्यांच्या बरोबर राहण्याची परवानगी मागितली तेव्हा ती न देता त्यांनी त्यांना मुंबईस परत जाण्यास सांगितले व चलनातली दोन नाणी (गोपीनाथ पाध्यांच्या हातात देऊन सांगितले की ही नाणी आपल्या नातवास दे. यावर जगन्नाथ पाध्यांनी स्वामींना विचारले की आपली भेट केव्हा व कुठे होणार? तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितले की *तू मला शिरडीत भेट* (मी तुला शिरडीत भेटेने). त्या काळात शिरडी हे गाव कोणालाही माहीत नव्हते व त्या वेळेस साईबाबा होते, पण प्रसिद्धीस आलेले नव्हते. 

✨या नंतर जगन्नाथ पाध्ये मुंबईस परत आले. त्यानंतर एका आठवड्याने स्वामींनी समाधी घेतली. नंतर प्रयत्न करूनही त्यांना शिरडीचा पत्ता मिळाला नाही. १९०१ साली स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला व त्यांना सांगितले की आता तुझी माझ्याकडे यायची वेळ झाली आहे व दोन नाण्यांची आठवण करून ती नाणी आपल्या नातवास दे म्हणून सांगितले.

*२) गंगाबाई पाध्ये :*

✨ या जगन्नाथ पाध्ये यांच्या  पत्नी. या *विठ्ठलाच्या व स्वामींच्या परमभक्त.* त्यांची स्वामींची भक्ती जास्त बळकट होती. 

✨त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते ८२ व्या वर्षापर्यंत दर  कार्तिकी एकादशीला पायवारी केली. पायवारी म्हणजे  मुंबई ते पंढरपूर हे अंतर मुखाने *'जय जय रामकृष्ण हरी'* हा जप म्हणत पायी चालत जाणे.

✨सर्वसाधारणपणे पुरूष हे अंतर ४५ दिवसात तर स्त्रिया ७५ दिवसात पूर्ण करायच्या. फक्त शेवटच्या वर्षी ही पायवारी त्यांनी सोलापूर ते पंढरपूर केली. 

✨गंगाबाईचा मृत्यू वयाच्या ८२ व्या वर्षी पंढरपुरच्या गोपाळपुऱ्यामध्ये, जी जनाबाईची जागा आहे तेथे अंदाजे १९२१ च्या आसपास झाला. यावेळेस त्यांच्या बरोबर काशिनाथशास्त्री रांजणे हे उपस्थित होते. गंगाबाईवरोबर त्यांनासुद्धा पांडुरंगाचे दर्शन झाले. *गंगाबाई पाध्ये म्हणजे गतजन्मीच्या सखुबाई.*

*३) गोपीनाथाशास्त्री पाध्ये:*

✨ यांचा जन्म १८६६ च्या सुमारास झाला. हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. सर्व वेद व शास्त्रात पारंगत व त्या काळचे विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. त्या काळी त्यांची गणना अत्यंत श्रीमंत लोकांत होत असे. ईस्ट इंडिया कंपनीस ते पैसे व्याजाने देत. यांच्या घरी गव्हर्नेस म्हणून गोरी बाई कामाला असायची. करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी त्यांच्याकडे बऱ्याचवेळेस अर्थ लावण्यास येत. जेव्हा दोन समुहात विवाद उत्पन्न होत तेव्हा गोपीनाथाशास्त्री पाध्यांना लवाद म्हणून नेमले जात असे. 

✨त्यांच्या पत्नीचे नाव *रमाबाई पाध्ये.* आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर स्वामींच्या *'मला शिरडीत भेट'* या बोलांनी त्यांना बेचैन केले व ते शिरडीचा शोध घेऊ लागले. याच सुमारात त्यांची भेट भगवानराव कुलकर्णी नावाच्या स्वामीभक्त सद्गृहस्थांशी झाली व त्यांनी गोपीनाथशास्त्रांना शिरडीचा पत्ता सांगितला आणि म्हणाले 'शिरडीस मुसलमानाच्या वेषातील असे एक अवलिया आहेत नाव आपण त्यांना मानतो.' बघू या तर खरे काय आहे? असे म्हणून गोपीनाथशास्त्री शिरडीस आले. 

✨तिथे येऊन त्यांना बाबा मशिदीत भिकाऱ्यांसमवेत बसलेले दिसले. तरीही स्वामींच्या वचनाची व  आज्ञेची आठवण ठेऊन ते पुढे आले व बाबांना त्यांनी नमस्कार केला नमस्कार करून उठताना नी बाबांनी आपल्या झोळीतून दोन नाणी काढून त्यांच्या आता हातात ठेवली व विचारले *"आता तरी खूण पटली दोन ना."* हे शब्द कानावर पडताच त्यांची खात्री झाली की स्वामीच बाबांच्या रूपाने परत आले आहेत व त्यांचे पहिले शब्द *'आता तरी खूण पटली ना' यालाच  गुरूमंत्र मानून रोज १००८ वेळा त्याचा जप करण्यास ची सुरूवात केली.* 

✨यानंतर त्यांचे नित्यनियमाने शिरडीत  जाणेयेणे सुरू झाले. १९१० साली विजयादशमीच्या दर दिवशी त्यांना *मालती नावाची मुलगी* झाली. मुलीच्या जन्मानंतर वर्षभरातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले व गोपीनाथ पाध्यांना पूर्ण विरक्ती येऊन आपल्या  मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. 

✨ज्या दिवशी ते संन्यास घेणार होते. त्याच्या आदल्या दिवशी रात्री स्वामींनी स्वप्रात येऊन त्यांना खूप ठोक दिला व सांगितले की, संन्यास घेणे हा तुझा प्रांत नाही तेव्हा ते तू करू नकोस. तू आजपासून एकनाथी भागवत व पंचदशी यावर व्याख्याने देत जा. असा आदेश त्यांना दिला. 

✨स्वामींच्या आदेशाप्रमाणे शेवटपर्यंत श्री गोपीनाथास्त्री पाध्ये एकनाथी भागवत व पंचदशी यावर व्याख्यान करीत राहिले. १९३८ साली त्यांना देवाज्ञा झाली.

*मालती पाध्ये / शकुंतला पंडीत :(बापूंच्या आज्जी)*

✨ या गोपीनाथ व रमाबाई पाध्ये यांच्या सुकन्या.

✨ १९३० साली यांचा विवाह अनंत वामन पंडीत यांचे सुपुत्र श्री. नरेंद्र अनंत पंडीत यांच्याशी झाला. हे पंडीत घराणे श्रीकृष्णाचे नितांत भक्त पण ते इतर कोणालाही - मानीत नसत. साईबाबा व स्वामींच्या ते विरूद्ध होते. 

✨श्री अनंत वामन पंडीत यांचे एक सद्गुरू पाठक गुरूजी म्हणून अवलीया होते. त्यांनी 'ॐ नमो नारायण' हा मंत्र त्यांना दिला होता व त्याचा जप सतत करीत ते नेहमी द्वारकेला जात. 

✨१९२५ साली अनंत वामन पंडितांना आषाढी प्रतिपदेच्या दिवशी *• श्रीकृष्णाने स्वतः दर्शन दिले व सांगितले की, तू आता माझ्या बरोबर रहा व पुढे सांगितले की तुझ्या नातीच्या पोटी एक दिव्य तेज जन्माला येणार आहे.* या आनंदातच त्यांना बालोन्माद अवस्था प्राप्त झाली - व शेवटपर्यंत ते याच दशेत राहिले.

✨मालती पाध्ये/शकुंतला पंडीत यांचे पती नरेंद्र अनंत पंडीत यांची कृष्णभक्ती श्रेष्ठ होती. लग्नानंतर वामन पंडीत यांनी त्यांना (शकुंतलाबाईंना) - रामरक्षेची संथा देऊन ती सतत म्हणण्यास सांगितले. त्यांना जे जे काही श्रीकृष्णाने सांगितले ते सर्व शकुंतलाबाईंना सांगून टाकले. शकुंतलाबाईंनी आपल्या सासऱ्यांनाच गुरू मानले. नरेंद्र अनंत पंडीत हे नित्य नियमाने श्रीकृष्णाचा त्रिस्थळी जप १००८ वेळा करीत

ॐ नमो भगवते वासुदेवाय । 
ॐ वासुदेवाय नमो भगवते । 
ॐ भगवते वासुदेवाय नमः l

प्रत्येक जप १००८ वेळा करणे म्हणजे त्रिस्थळी - जप. 

✨या दोघांचे एकच अपत्य. कन्यारत्न - *अरुंधती*.(प.पू.श्री बापूंच्या मातोश्री. ) 

✨१९३४ साली - नरेंद्र अनंत पंडीत यांना पंढरपूरला चंद्रभागेत स्नान करताना विठ्ठल रखुमाईचे दर्शन झाले व रखुमाईने त्यांना सांगितले की *आज संपूर्ण दिवस तू स्वामी समर्थाचे नामस्मरण जपत रहा.* 

त्याप्रमाणे स्वामीभक्ती नसतानाही त्यांनी स्वामींचे नामस्मरण केले. त्याच  रात्री स्वामींनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले, की *त्रिपुरारी पौर्णिमेला तुझ्या मुलीच्या पोटी दिव्य निळा प्रकाश जन्माला येणार आहे.*  

.....हे ऐकून भक्ताची देवाच्या सानिध्यात रहायची लालसा वाढून त्याने स्वामींना विनंती केली की, मला आता घेऊन जा व देवाचा जन्म बघण्यासाठी त्या काळात जन्माला घाला. 

✨स्वामींनी सांगितले की, तू गृहस्थाश्रमी असल्यामुळे मला तुझ्या पत्नीच्या परवानगीशिवाय असे काही करता येणार नाही. तरी तू आपल्या पत्नीची परवानगी घेऊन ये....

(पुढे चालू....)
-२१ एप्रिल २००२ 'निर्भिड लेख'
(शब्दांकन प्रयास: ओमसिंह नवलाखे)

🙏हरि ओम l  श्रीराम l अंबज्ञ🙏

Wednesday, June 14, 2023

kathamanjiri 2-55

कथा मंजिरी 2- 55.
शृंगादित्यने अत्यंत नम्रतेने विचारले, परंतु ते तर आमची परीक्षा घेणार आहेत".
ब्रह्म वादिनी अहल्या मनःपूर्वक हसली, वत्सहो ! स्वयंभगवान स्वतः व त्याच्या चरणाशी सदैव अनुरक्त असणारे ऋषी परीक्षा घेतात म्हणजेच शिकवतात.
स्वयं भगवान व असे त्याचे श्रेष्ठ भक्त तुम्हाला जीवनाची परीक्षा करायला शिकवतात.
*तो अत्यंत प्रेमळ स्वयं भगवान कधीच कुणाची परीक्षा बघत नाही. जो न विचारताही ज्ञान देणारा व प्रेम करणारा आहे, तो कधी परीक्षा घेईल काय*. म्हणूनच देव परीक्षा घेत आहे असे कधीही म्हणू नका. खरं तर आपणच त्या भगवंताची परीक्षा घेत असतो आणि त्याला अनुत्तीर्ण ठरवत असतो.

कथा मंजिरी २-५८
ब्रह्मर्शी गौतम यांनी उत्तर दिले," प्रत्येक घटना सुखाची व दुःखाची, सोपी वा कठीण, मोठी अथवा लहान, ही परीक्षाच असते-- त्या घटनेची संबंधित असणाऱ्या प्रत्येकाचीच.
कारण या विश्वातील कुठलीही घटना ही परीक्षा नसतेच. ती एक तर स्वयं भगवानाची लीला असते किंवा त्याच्या मातेने रचलेले नाथसमविध

Jagannath utsav mumbai

# ७ अनिरुध्द बापु 
पुरीचे देव गायब, जगन्नाथ मुंबई मध्ये

२००३ सालची ही घटना आहे. जगन्नाथ पुरी चे पुजारी मंदिरात पुजा करत होते. पुजाअर्चना करताना पाण्यात देवाचे प्रतिबिंब पाहायची प्रथा आहे. जर प्रतिबिंब पाण्यात दिसले नाही की समजतात देव मंदिरात नाही. देवाचे प्रतिबिंब पाण्यात दिसत नाही हे पाहून पुजारी घाबरले. त्यांनी लागलीच एक अनुष्ठान सुरू केले. त्यावेळी एकाला दृष्टांत झाला की देव जगन्नाथ मुंबईला आहेत. रातोरात विमान पकडून पंडे लोक मुंबईला आले. मुंबईला देव शोधत भटकत होते .

त्याचवेळी सदगुरू श्रीअनिरूद्धांनी श्री जगन्नाथ अष्टतीर्थ उत्सव सायन , मुंबई येथे आयोजित केला होता..

.. इथे पंडे मुंबईत भटकून कुठे जगन्नाथांना राहिले पाहू लागले , त्यांना समजलं की सायन ला देवाचा उत्सव चालु आहे , पंडे उत्सवस्थळी आले आणि जगन्नाथा समोर गडबडा लोळू लागले ...देवांसमोर लोळून लोळून विनंती करीत होते .." देवा सोबत चला, देवा सोबत चला".. 
त्यांनी हे कुणी आयोजित केलेय ह्याची चौकशी केली , आणि श्री अनिरूद्ध बापू आयोजक आहेत कळल्यावर पंडे बापूंना भेटायची विनंती करू लागले , बापूंना ते म्हणाले की आम्ही देवाला नेतोय , तुम्ही परवानगी द्या , बापूंनी तेव्हा सांगितलं , सुभद्रे सहित बलदाऊ आणि जगन्नाथ माझ्या संकल्पाने आलेत, माझा संकल्प पूर्ण झाला की हे तिघेही पुन्हा पुरीच्या देवळात येतील ...

पूरीला या १० दिवसात देवांचे प्रतिबिंब पाण्यात दिसत नव्हते. तीर्थी देव नव्हते... पुरीचे जगन्नाथ मुंबापुरी राहिले होते... 
म्हणूनच सांगावे वाटते ओस पडली स्वर्ग नागरी देव धावत आले इथे
अंबज्ञ
नाथसविध

vithalacha plan

हरि ॐ‌ 

*|| श्रीगुरुचरण मास ||*

  *बाबांकडे पहात पहात |*
  *म्हणावें यांनीं होऊनि विनत |*
  *हाचि तो मूर्त पंढरीनाथ |*
  *अनाथनाथ दयाळ ||*
(श्रीसाईसच्चरित अ.४,ओ.७८ )

*प.पू.बापूंचे पितृवचन*
( १४ फेब्रुवारी २०१३ )
                "बघा आपण विठ्ठलाचं गाणं ऐकलं -
          *विठ्ठला तू वेडा कुंभार |*
          *फिरत्या चाकावरती देसी ,*   
          *मातीला आकार |*
          *विठ्ठला तू वेडा कुंभार ||*
                  मला सांगा कुंभार कुठल्या *मातीला आकार* देतो ? - *ओल्या मातीला!* म्हणजेच *ज्यात ओलावा आहे, अशा मातीला.*
               आपल्या *जीवनाला  आकार* देण्यासाठी *विठ्ठलाचा Plan* तयार असतोच.पण आपण *आधी हे मान्य केले पाहिजे की, आपण मातीचे गोळे आहोत.* आणि मग ह्या मातीच्या गोळ्याला *विठ्ठल त्याच्या Plan नुसार आकार* कधी देऊ शकेल ? तर ,तो *मातीचा गोळा भिजलेला* असेल,त्यात ओलावा असेल तेव्हाच .
                त्याचा Plan तयार असतोच.आपली जबाबदारी एवढीच की,*"आम्ही मातीचे गोळे आहोत, तू आम्हाला आकार दे " हा भाव* .तर  *मातीच्या गोळ्याचं काम* आहे ,*पाणी घट्ट धरून ठेवायचं*. म्हणजेच काय तर *'तो'* *माझ्यावर खूप खूप प्रेम करतो,* हे मनात घट्ट पकडून ठेवायचं.
                 एक एवढी महत्त्वाची गोष्ट आजपासून करायला लागा. जगामध्ये काहीही घडो,मी कितीही चुकलेला असो,मी कसाही असो ,रंग-रूप,जात-धर्म, शिक्षण-पैसा यापैकी कशाचाच फरक पडत नाही. कारण काहीही असले तरी *'तो' आणि 'त्याची आई' माझ्यावर खूप खूप प्रेम करतात.* *त्यांचे माझ्यावरचे अकारण प्रेम कधीही, जराही कमी होत नाही आणि होणार नाही.*
               बाळांनो हे मनात एकदा घट्ट पकडून ठेवलत ना की ,
 *तुमचं जीवन सुंदर व्हावं,*
 *तुमचं जीवन सुखमय व्हावं,*
 *तुमच्या जीवनात दुःख उरू नयेत,*
 म्हणून *तुमच्या देवाने तुमच्यासाठी जो प्लॅन* केलेला असतो, तो पण मग *ह्या भावनेच्या ओलाव्याने  आकार घेत सुरळीतपणे, सहजपणे घडतो.*
                   त्यामुळे विश्वास ठेवा, *'त्याचे' माझ्यावर प्रेम आहेच आणि 'त्याला' मी आवडतो.* *'त्याचा' माझ्यासाठीचा प्लॅनच बेस्ट आहे.* आणि मग असा भाव असणाऱ्या *माझ्या बाळाला , मी कधीही नावडता होऊ देणार नाही, हे माझं प्रॉमिस आहे !!"*

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Mahapran connection

हरि ॐ‌ 

*|| श्रीगुरुचरण मास ||*

*पुरेल अपूर्व इच्छित काम |*
*व्हाल अंतीं पूर्ण निष्काम |*
*पावाल दुर्लभ सायुज्यधाम |*
*अखंड राम लाधाल ||*
(श्रीसाईसच्चरित अ.११,ओ.१५२)

*प.पू.बापूंचे पितृवचन*
  ( २८ मार्च २०१३ )
     *"कुमति निवार सुमति के संगी  |*

*कुमति दूर करून,सुमति आपल्याला फक्त हनुमंतच देऊ शकतो.* ही *सुमति* कशासाठी आवश्यक असते, तर *आपले निर्णय बरोबर होण्यासाठी.* त्यासाठी आम्हाला *हनुमंताची कृपा मिळवायलाच पाहिजे.*
               हा *'Choice' सगळ्यात महत्त्वाची गोष्ट* असते.अनेक वेळा ग्राह्य काय आणि त्याज्य काय ? हे माहित असूनसुद्धा हट्टीपणाने आम्ही जीवनामध्ये पुढे जात असतो. कारण त्यावेळी आपल्याला ह्या हनुमंताचा विसर पडलेला असतो, सद्गुरुतत्त्वाचा विसर पडलेला असतो.पण घाबरण्याचे कारण नाही. *जर आम्ही चंडिकाकुलाचे आहोत,तर आम्हाला योग्य मार्ग मिळतोच.*   
                इथे मात्र लक्षात घ्या की,*प्रत्येकाचे हे मार्ग वेगळे असतात.कारण महाप्राणामुळे, हनुमंतामुळे!* 
 हा *हनुमंत* कोण आहे - तर *रामप्राण* !
 *राम म्हणजे निष्कलंक आनंद!*
 *निष्कलंक आनंद म्हणजे राम !*
ह्या 'निष्कलंक आनंदाचा प्राण' आहे -  *'उचित निवड'*- *शब्दांची ,माणसांची भक्तीची !* आणि *हे सगळं उचित त्या चंडिकाकुलाकडूनच येते.* आणि *राजांनो ही संपूर्ण ताकद हनुमानचलिसात आहे.*
                असा निष्कलंक आनंद तुम्हाला मिळवायचा असेल तर, निवड उचित असली पाहिजे.प्रत्येक गोष्टीची निवड उचित करायची ,तर ते *फक्त हनुमंतच करू शकतो*, हे लक्षात ठेवा.कारण *प्रत्येक पातळीवर निवडीचं Connection फक्त हा महाप्राणच करतो ! आणि हनुमंत आहे म्हणजे त्यांच्या हृदयात राम सदैव आहेच !"*


*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

swasthik symbol

हरि ॐ‌ 

*|| श्रीगुरुचरण मास ||*

 *देणें एक माझ्या सरकारचें |*
 *तयासी तुळे काय तें इतरांचें |*
 *अमर्यादास मर्यादेचें |*
 *भूषण कैंचें असावें ||*
 (श्रीसाईसच्चरित अ.३२,ओ.१६०)

*प.पू.बापूंचे पितृवचन*
  (६ जून २०१३)
                  " *परमात्म्याचे अवतारित होणारे प्रत्येक रूप म्हणजे 'स्वस्तिक' !* स्वस्तिक हे *सर्वोच्च पवित्र चिन्ह* मानलं जातं. *स्वस्तिकाची ही आकृती कुठेही बंदिस्त नाही* ; म्हणजेच *मानवाला काटेकोर नियमाने परमेश्वराने कधीही जखडून ठेवलेले नाही.*
                *स्वस्तिकाच्या सहा रेघा म्हणजेच प्रत्येक मनुष्यासाठी असणारे  सहा Plans !* प्रत्येकाचे *जीवन अधिक चांगलं* कसं करता येईल, ह्यासाठी *'त्याने'* *प्लॅन तयार केलेला असतो*. आणि प्रत्येक मनुष्यासाठी असे सहा प्लॅन्स असतात. 
                  कधीही वाटलं की आता सगळे मार्ग संपले, तरी प्रत्येक वेळी सहा मार्ग असतातच, प्रत्येक क्षणाला प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येकासाठीच .
आणि *अवतारीत रूपाची भक्ती जेव्हा श्रद्धावान करतात तेव्हा श्रद्धावानांना ६ नाही तर ३६ संधी प्राप्त होतात.*
                हा परमात्मा अवतरतो तो *भक्तांची प्रेम वृद्धी व्हावी म्हणून.* त्याच्या मूर्तीशी जेवढं नातं साधता येत नाही, तेवढं नातं तो अवतरीत असताना आपल्याला साधता येतं,बांधता येतं,विकसित करता येतं. 
                 बत्तीसावा अध्यायात *साईबाबा* आपल्याला काय सांगतात,- 
     *उतून चालिला आहे खजिना |*
हा खजिना कोणता ? तर हाच !
*हाच खजिना* कारण -
*जो रामाबरोबर आहे वानरसैनिक म्हणून*, *जो कृष्णाबरोबर आहे गोप म्हणून*,
*जो साईबरोबर आहे भक्त म्हणून* त्यासाठी या *३६ संधी* उपलब्ध आहेतच. 
               पुढे साई काय सांगतात,-        
       *माझें सरकार जैं देऊं सरतें |*
       *न सरतें तें कल्पांतीं ||*
आमच्याकडे ३६ मार्ग प्रत्येक क्षणाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उपलब्ध असणारच आहेत. आणि *एकदा का आम्ही त्याच्याशी जोडले गेलो, की मग आमच्या प्रत्येक जन्मामध्ये ३६ संधी 'तो' देतच राहतो, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक परिस्थितीत!*
                 मग ह्यापुढे हे *'स्वस्तिक'* बघताना ह्या साध्या सहा रेषा हा भाव ठेवू नका. तर *माझे कल्याण करणारे, माझ्या लाडक्या साईंचं हे रूप आहे*, हे कधीही विसरायचं नका.बिनधास्त जगा. बाबा सदैव तुमच्याबरोबर आहेतच !"


*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Aniruddha Bapu's Sadguru

From whatsApp message in group 

हरि ओम 
आज १४ जून , सदगुरु डॉक्टर अनिरुध्दसिंह धैर्यधर जोशी म्हणजेच आपले  सर्वांचे अत्यंत लाडके परमपूज्य बापू  ह्यांचे मानवी सदगुरु श्री गोपीनाथशास्त्री पाध्ये ह्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म  १४ जून १८६४ ह्या दिवशी झाला होता. 

श्री गोपीनाथ पाध्ये ह्यांच्या घराण्यात भक्तीची बीजे रोवली गेलीच होती. ह्यांचे वडील श्री जगन्नाथ पाध्ये हे अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या चरणी भक्तीत तल्लीन झाले होते. गोपीनाथ पाध्ये अगदी लहानपणापासून आपल्या वडीलांसोबत स्वामींच्या दर्शनाला जात असत. स्वामींच्या निर्याणाआधी असेच एका भेटीत जगन्नाथ पाध्येंनी आता आपली भेट व दर्शन पुन्हा कधी होणार असे सहज विचारले असताना स्वामींनी आता आपण ह्यापुढे शिरडीला भेटू असे उद्गार काढले होते. त्यानंतर जगन्नाथ पाध्येंनी स्वामींच्या महानिर्याणानंतर ह्या अनंताला सगुण साकार रूपात शोधण्याच बराच प्रयत्न केला होता. पुढे आपल्या वडीलांच्य्य निधनानंतर श्री गोपीनाथ पाध्ये ह्यांनी बराच काळ शोध घेतला होता. त्यावेळी शिरडी हे गाव प्रसिध्दीस आले नव्हते . त्यामुळे पाध्येंना शिरडीचा आणि स्वामींचा शोध लागत नव्हता. तेव्हा एकदा त्यांचे नातेवाईक श्री भगवानराव कुलकर्णी ह्याच्यांकडून त्यांना शिरडीला साईबाबा म्हणून एक महान अवलिया वास्तव्य करून असल्याची बातमी कळली. अर्थातच श्री गोपीनाथ पाध्येंनी तातडीने शिरडीला धांव घेतली. पण तेथे गेल्यावर लक्षांत आले की साईबाबा तर मशिदीत राहतात , कोणी त्यांना मुसलमान म्हणे, तर कोणी भिक्षा मागणारा वेडा फकीर ! स्वामी भेटीची आर्त मनी दाटली होती आणि मन  कासावीस झाले होते , पण दुसरीकडे पाय़ मागे खेचले जात होते. शेवटी सदगुरुंच्या भेटीच्या ओढीने आणि स्वामींच्या शब्दांचे स्मरण ठेवून मनाचा हिय्या करून गोपीनाथजी मशीदीत गेले आणि साईबाबांच्या चरणीं मस्तक ठेवतांच स्वामींच्या शब्दांची खूण पटली ती साईबाबांच्या मुखातील पहिल्या बोलानेच " आता तरी खूण  पटली ना ! " त्या क्षणी माझा सदगुरु ( स्वामी समर्थ ) मला भेटला ही मनाची गांठ दृढ बांधली गेली ती कायमचीच. पुढे अनेक वेळा समाजात त्यांना अनेक व्यक्तींनी , त्यांच्या नातेवाईकांनी साईबाबा मुसलमान आहेत, ते कफनी घालतात, मशीदीत राहतात, भिक्षा मागतात , दक्षिणा घेतात म्हणून त्रास दिला आणि साईबाबांपासून दूर करायचा प्रयत्न केला. पण गोपीनाथजी अढळ होते "शेंडी तुटो वा पारंबी " "तो" माझा गुरु आहे, माझा सदगुरु आहे ह्या मतावर ते अढळ होते.                 

पुंडलिक म्हणजे भक्तीमार्गाचा अग्रणीच ! पंढरपूरच्या विठू माऊलीच्या भक्तीची गोडी ज्याने केवळ वारकरी संप्रदायातच नव्हे तर अवघ्या जनमानसांत रूजविली तो पुंडलिक म्हणजे विठोबाचा अनन्य भक्तच !सावळे परब्रम्ह  बालरूपात धावून आल्यावर  पंढरीच्या चंद्रभागेच्या तटी भक्तीच्या वीटेवर  विसावयाला ज्याने आपल्या भक्तीची मेख मारून अठ्ठावीस युगे  अढळ केले तो हा महान भक्त ! 
आपण सारे ही कथा जाणतो की पुंडलिकाला भेटायला पूर्णावतार योगेश्वर जगद्गुरु श्रीकृष्ण आठ वर्षाच्या बाळरुपात धावत धावत पंढरपूरला आले आणि त्याने फेकलेल्या विटेवर, कमरेवर हात धरुन वाट पहात उभे राहिले. पंढरीत विटेवर हा स्थिर झालेला पुतळा अठ्ठावीस युगे झाली तरी तसाच उभा होता. कालांतराने ह्याच भक्तीच्या मार्गावर पुन्हा एक तसाच जबरदस्त ताकतीचा भक्त निर्माण झाला तो म्हणजे गोपीनाथशास्त्री पाध्ये ! 
कालपरत्वे कलीयुगाच्या सरक्त्या पाऊलां गणिक समाजातून भक्तीचा हळू हळू लोप होऊ लागला होता आणि मानव पुन्हा  षडरिपूंच्या विळख्यात सापडून, अंहकार , स्वार्थ ह्याच्या दलदलीत गंटागळ्या खाऊ लागला होता.  मानवाचा हा अधोगतीकडे जाणारा प्रवास एक अन एक दिवस नक्कीच त्याला विनाशाच्या खोल गर्तेत , खाईत ढकलून देईल ह्या जाणीवेने ह्या भक्तश्रेष्ठाचा  जीव कळवळला. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचा कळवळा दाटून आला. अनेक खडतर उपासना, तपे आणि व्रते करुन त्याने विठ्ठलास ‘हारी’ आणलेच व एकच मागणे मागितले, ‘‘तू आता बाळरुप घेऊन ये.’’ तसाच वर देऊन मग ‘तो’ पुतळेपण सोडून गोपीनाथशास्त्रींच्याच नातीच्या पोटी त्रिपुरारी पौर्णिमा १९५६ला सदगुरु रूपाने  जन्म घेता झाला असे वाचनात आले.  
ह्याचे हृद्य वर्णन  हाचि नववा नववा आगळा |, सजीव बनला पंढरीचा पुतळा | ह्या  आद्यपिपा म्हणून गौरविल्या जाणार्‍या श्री सुरेशचंद्र दत्तोपाध्ये  ह्यांच्या  अभंगात येतं. शृंखलाधर सद्गुरु श्री अनिरुद्धांवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाला अत्यंत आवडणारं असं हे गुणवर्णनच आहे. 
आपल्या भारतीय संस्कृतीत आपण सदगुरुंना ब्रम्हा, विष्णू , महेश म्हणून आळवितो - गुरुर्ब्र्म्हा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर: गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: |  
आपण खूपदा वाचतो की हा पंढरीचा विठू वारंवार आपल्या भक्तांसाठी उठून धावतच होता. संतांसाठी सर्व कामे करतच होता. एकनाथाघरी श्रीखंड्या बनून, सखु, जनाबाई ह्यांना त्यांच्या अगदी सर्व प्रकारच्या घरकामांत मदत करतच होता (जनाबाईसाठी गोवर्‍या वेचायला जाई, जात्यावर बसून दळण दळायला हातभार लावी इत्यादी)   दामाजीसाठी तर हा डोईला मुंडासे बांधून  ‘महार’ बनून गेला होता. आपल्या भक्तांवर लाभेवीण प्रेम करणारे सदगुरुही असेच त्यांच्या कल्याणासाठी सदैव धावतच असतात त्यांच्या पाठीमागे कधी अभयदाता अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ बनून "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी  उभा आहे " अशी ग्वाही देत तर कधी शिरडीनिवासी कृपासिंधु साईबाबा बनून ! तसेच  पूर्ण जीवन मानवांसाठी, मानवासारखं, त्यांच्यात  जन्म घेऊन, खेळून, शाळा-कॉलेज शिकून, व्यवसाय करुन....वगैरे वगैरे सगळं करण्यासाठी हा सावळा सदगुरुरूपाने  जन्म घेता झाला त्रिपुरारी पौर्णिमा १९५६ साली-  डॉ अनिरूध्द जोशी बनून ! 
आणि म्हणूनच  असे वाटते की येणार्‍या सर्व काळासाठी आम्हा सर्व श्रद्धावानांचे हात व मस्तक, गोपीनाथशास्त्रींच्या चरणांशी जुळले पाहिजेत. त्यांच्या चरणांवर आम्हां श्रद्धावानांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रूंचा, कृतज्ञतेचा अभिषेक सदैव व्हायला पाहिजे कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी  की आज त्यांच्या पुण्याईने आम्हाला आज सदगुरु लाभला  
१. ललिता सहस्त्रनाम ह्यांनीच विरचित करून श्री साईनाथांच्या चरणी अर्पिले असता त्यांना "श्री विद्यामकरंद " म्हणून साईनाथांनी स्वत: गौरविले होते. 
२. "श्रीवर्धमान व्रताधिराज व्रत " हे आपल्याला ह्यांनीच त्यांच्या तपश्चर्येने प्राप्त करवून दिले ज्याची सविस्तर माहिती श्रीमद् पुरुषार्थ ग्रंथराज तृतीय खंड आनंदसाधना मध्ये आपण वाचू शकतो.    

आजच्या दिवशी आपण त्यांचे स्मरण "ओम श्री विद्यामकरंद गोपीनाथाय नम: " हा मंत्र १०८ वेळा म्हणून करू शकतो. 

हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्