हरि ॐ
*|| श्रीगुरुचरण मास ||*
*बाबांकडे पहात पहात |*
*म्हणावें यांनीं होऊनि विनत |*
*हाचि तो मूर्त पंढरीनाथ |*
*अनाथनाथ दयाळ ||*
(श्रीसाईसच्चरित अ.४,ओ.७८ )
*प.पू.बापूंचे पितृवचन*
( १४ फेब्रुवारी २०१३ )
"बघा आपण विठ्ठलाचं गाणं ऐकलं -
*विठ्ठला तू वेडा कुंभार |*
*फिरत्या चाकावरती देसी ,*
*मातीला आकार |*
*विठ्ठला तू वेडा कुंभार ||*
मला सांगा कुंभार कुठल्या *मातीला आकार* देतो ? - *ओल्या मातीला!* म्हणजेच *ज्यात ओलावा आहे, अशा मातीला.*
आपल्या *जीवनाला आकार* देण्यासाठी *विठ्ठलाचा Plan* तयार असतोच.पण आपण *आधी हे मान्य केले पाहिजे की, आपण मातीचे गोळे आहोत.* आणि मग ह्या मातीच्या गोळ्याला *विठ्ठल त्याच्या Plan नुसार आकार* कधी देऊ शकेल ? तर ,तो *मातीचा गोळा भिजलेला* असेल,त्यात ओलावा असेल तेव्हाच .
त्याचा Plan तयार असतोच.आपली जबाबदारी एवढीच की,*"आम्ही मातीचे गोळे आहोत, तू आम्हाला आकार दे " हा भाव* .तर *मातीच्या गोळ्याचं काम* आहे ,*पाणी घट्ट धरून ठेवायचं*. म्हणजेच काय तर *'तो'* *माझ्यावर खूप खूप प्रेम करतो,* हे मनात घट्ट पकडून ठेवायचं.
एक एवढी महत्त्वाची गोष्ट आजपासून करायला लागा. जगामध्ये काहीही घडो,मी कितीही चुकलेला असो,मी कसाही असो ,रंग-रूप,जात-धर्म, शिक्षण-पैसा यापैकी कशाचाच फरक पडत नाही. कारण काहीही असले तरी *'तो' आणि 'त्याची आई' माझ्यावर खूप खूप प्रेम करतात.* *त्यांचे माझ्यावरचे अकारण प्रेम कधीही, जराही कमी होत नाही आणि होणार नाही.*
बाळांनो हे मनात एकदा घट्ट पकडून ठेवलत ना की ,
*तुमचं जीवन सुंदर व्हावं,*
*तुमचं जीवन सुखमय व्हावं,*
*तुमच्या जीवनात दुःख उरू नयेत,*
म्हणून *तुमच्या देवाने तुमच्यासाठी जो प्लॅन* केलेला असतो, तो पण मग *ह्या भावनेच्या ओलाव्याने आकार घेत सुरळीतपणे, सहजपणे घडतो.*
त्यामुळे विश्वास ठेवा, *'त्याचे' माझ्यावर प्रेम आहेच आणि 'त्याला' मी आवडतो.* *'त्याचा' माझ्यासाठीचा प्लॅनच बेस्ट आहे.* आणि मग असा भाव असणाऱ्या *माझ्या बाळाला , मी कधीही नावडता होऊ देणार नाही, हे माझं प्रॉमिस आहे !!"*
*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*
No comments:
Post a Comment