हरि ॐ
*|| श्रीगुरुचरण मास ||*
*देणें एक माझ्या सरकारचें |*
*तयासी तुळे काय तें इतरांचें |*
*अमर्यादास मर्यादेचें |*
*भूषण कैंचें असावें ||*
(श्रीसाईसच्चरित अ.३२,ओ.१६०)
*प.पू.बापूंचे पितृवचन*
(६ जून २०१३)
" *परमात्म्याचे अवतारित होणारे प्रत्येक रूप म्हणजे 'स्वस्तिक' !* स्वस्तिक हे *सर्वोच्च पवित्र चिन्ह* मानलं जातं. *स्वस्तिकाची ही आकृती कुठेही बंदिस्त नाही* ; म्हणजेच *मानवाला काटेकोर नियमाने परमेश्वराने कधीही जखडून ठेवलेले नाही.*
*स्वस्तिकाच्या सहा रेघा म्हणजेच प्रत्येक मनुष्यासाठी असणारे सहा Plans !* प्रत्येकाचे *जीवन अधिक चांगलं* कसं करता येईल, ह्यासाठी *'त्याने'* *प्लॅन तयार केलेला असतो*. आणि प्रत्येक मनुष्यासाठी असे सहा प्लॅन्स असतात.
कधीही वाटलं की आता सगळे मार्ग संपले, तरी प्रत्येक वेळी सहा मार्ग असतातच, प्रत्येक क्षणाला प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येकासाठीच .
आणि *अवतारीत रूपाची भक्ती जेव्हा श्रद्धावान करतात तेव्हा श्रद्धावानांना ६ नाही तर ३६ संधी प्राप्त होतात.*
हा परमात्मा अवतरतो तो *भक्तांची प्रेम वृद्धी व्हावी म्हणून.* त्याच्या मूर्तीशी जेवढं नातं साधता येत नाही, तेवढं नातं तो अवतरीत असताना आपल्याला साधता येतं,बांधता येतं,विकसित करता येतं.
बत्तीसावा अध्यायात *साईबाबा* आपल्याला काय सांगतात,-
*उतून चालिला आहे खजिना |*
हा खजिना कोणता ? तर हाच !
*हाच खजिना* कारण -
*जो रामाबरोबर आहे वानरसैनिक म्हणून*, *जो कृष्णाबरोबर आहे गोप म्हणून*,
*जो साईबरोबर आहे भक्त म्हणून* त्यासाठी या *३६ संधी* उपलब्ध आहेतच.
पुढे साई काय सांगतात,-
*माझें सरकार जैं देऊं सरतें |*
*न सरतें तें कल्पांतीं ||*
आमच्याकडे ३६ मार्ग प्रत्येक क्षणाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उपलब्ध असणारच आहेत. आणि *एकदा का आम्ही त्याच्याशी जोडले गेलो, की मग आमच्या प्रत्येक जन्मामध्ये ३६ संधी 'तो' देतच राहतो, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक परिस्थितीत!*
मग ह्यापुढे हे *'स्वस्तिक'* बघताना ह्या साध्या सहा रेषा हा भाव ठेवू नका. तर *माझे कल्याण करणारे, माझ्या लाडक्या साईंचं हे रूप आहे*, हे कधीही विसरायचं नका.बिनधास्त जगा. बाबा सदैव तुमच्याबरोबर आहेतच !"
*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*
No comments:
Post a Comment