Saturday, September 16, 2023

Bapu pravachan 14 Sept 2000

*सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन : मी चा पाढा*
गुरुवार,14 सप्टेंबर 2000

*हरी ओम*
सुटीचा दिवस रविवार. पुन्हा पुढचा रविवार येइपर्यंत एक आठवडा, आठवड्याचे महिने, महिन्यांची वर्षे, वर्षांची दशके आणि अशा अनेक दशकांचं आयुष्य. अस हे कालचक्र सुरूच राहते. एक म्हण आहे, तेरड्याचे रंग तीन दिवस. मी साईचरित्र सप्ताह करायचं ठरवतो. पहिले 1/2 दिवस करतो. मग परत 2/3 दिवस कुठे तरी गुंतून राहतो, मग कुणी पाहुणेच येतात. असं झाल्यावर मग लक्षात येतं की, उद्या सातव्या दिवशी 53 वा अध्याय पूर्ण करायचा. म्हणून मी साईचरित्रचे राहिलेले अध्याय घाईत वाचून काढतो, वाचायचे म्हणून वाचतो आणि मग म्हणतो," मी साईचरित्र पारायण सप्ताह पूर्ण केला"  त्याला या कशाचीही आवश्यकता नाही. मला साईचरित्र वाचायचं ते माझ्या स्वतःसाठी.त्याला कसलंच बंधन नाही. त्याला काळाचंही बंधन नाही. पण या नरदेहाला कालबंधन आहे. मला एक वेळ माझा शब्द परत घेता येईल पण मी माझा गेलेला काळ कधीच परत आणू शकत नाही.
       अश्या या काळाची 4 युगात स्थापना झाली. आज आपण कलियुगात राहतो. मग मला  या कलियुगातुन सत्ययुगात जायचे आहे, जे काही करायचं ते फक्त त्याच्यासाठी,त्याच्या कृपेसाठी. पण मी हे सर्व सोडून सतत माझाच मी चा पाढा बोलत असतो. मी एके मी, मी दुणे मी, मी त्रिक मी, मी चोक मी, मी पाचे मी, मी साहे मी, मी साते मी, मी आठे मी, मी नवे मी, मी दाहे मी!!  शेवटी पाढा पुर्ण झाला तरी उत्तर मीच. मग माझा हा मी चा पाढा कसा हवा तर मी एके मी, मी दुने ईश्वर, मी त्रिक भक्ती, मी चोक ऐश्वर्य..... असा हा मीचा पाढा असायला हवा म्हणजे मग हा माझ्यातला मी फक्त एकच उरतो जो परमेश्वराच्य नियमाने चालतो . कारण मी स्वतः जरी ठरवलं तरी माझा श्वास थांबवू शकत नाही, माझी हृदयक्रिया ही तोच चालवणारा असतो...
*मीही इथे असंच कायम तुमच्यात फिरत असतो, तेव्हा तुम्हा प्रत्येकाला हाच प्रश्न असतो की हा बापू कोण?* *हा काय करतो? हा कश्या साठी आलाय? याला नेमकं काय करायचं?*
*आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं दयायला आज मी स्वतः च माझा मी चा पाढा बोलणार आहे.*

*माझं नाव अनिरुद्ध*
माझ्या आईच नाव अरुंधती, माझ्या वडिलांचं नाव धैर्यधर.  माझ्या आजीचं  नाव शकुंतलाबाई पंडित जी गोपीनाथ शास्त्री पाध्ये यांची पुत्री. 
माझा जन्म 18 नोव्हेंबर 1956 ,त्रिपुरारी पौर्णिमेचा.
मी शाळेत जाऊ लागलो. मी परळला डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये शिकलो. या शाळेने माझ्यावर अपरंपार प्रेम केले. याच शाळेतले माझे सर एचडी गावकर जे महान ऋषी होते आणि ते डॉक्टर शिरोडकर यांचे शिष्य होते. डॉक्टर शिरोडकर सतत गोरगरीबांच्या सेवेसाठी झटले. तसेच गावकर सर व त्यांच्या पत्नी विजयाबाई गावकर अशा असंख्य गोरगरीब पती-पत्नीसाठी झटले जे त्यांच्या मुलांना परिस्थितीमुळे शिकू शकत नव्हते आणि त्यांची मुलं त्यांनी स्वतःची समजली आणि या अशा शाळेतला मी एकमेव असा विद्यार्थी की ज्याच्या घरी त्या काळातली अँबेसेडर गाडी, फोन, फ्रिज सर्व सुखसोयी होत्या कारण माझे वडील डॉक्टर होते. माझ्या वडिलांनी मला मुद्दामच त्या शाळेत टाकलं.लोक म्हणत,"डॉक्टर याला या शाळेत का टाकलं?"  *पण माझी आजी ठामपणे सांगायची त्याला जे काही करायचं आहे, तो जे काही करणार आहे ते मला माहित आहे.आणि त्याला जे काही करायचे आहे त्याचा श्रीगणेशा याच शाळेतून होऊ दे . इथे मला सर्व गोष्टी सहजतेने आणि समानतेने मिळाल्या. सांस्कृतिक शैक्षणिक प्रत्येक गोष्टीत मी असायचो. नंतर मी रुईया कॉलेजमध्ये इंटरसायन्स झालो. 1974 साली नायर हॉस्पिटल ला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 78 सालि मी एम बी बी एस ची परीक्षा पास झालो. पुढे 78 मध्येच मी धुळे गावी तीन महिने प्रॅक्टिस साठी गेलो जे धुळे तुमच्या नंदावहिनींच माहेर गाव आहे. 79 साली एमडी च्या अभ्यासक्रमासाठी दाखल झालो आणि 82 साली एमडी ची परीक्षा पास झालो तेही पहिल्याच प्रयत्नात. मला वाऱ्या कराव्या लागल्या नाहीत. ती परीक्षा खूप कठीण असते जिला शंभरातून फक्त चार पाच जणच पास होतात. याच कालखंडात मी संधिवाताचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे तीन वर्ष मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून काम केले ते 85 पर्यंत. मला शिकवायला खूप आवडायचं आजही आवडतं. 85 पासून 93 पर्यंत मी परळगावात स्वतःची प्रॅक्‍टिस सुरू केली नंतर 93 ते 98 पर्यंत मी दादरला म्हणजे आर सी ला प्रॅक्टिस केली. मला काही जण विचारतात की,बापू तुम्ही कर्जतलासुद्धा प्रॅक्टिस केली का? माझी सकाळी नऊ ते एक पर्यंत दादर नंतर पुन्हा दुपारी दोन ते रात्री दोन पर्यंत परला प्रॅक्टिस असायची. तुम्हीच विचार करा मी कर्जतला कसा जाऊ शकेल. 85 ते 98 च्या काळात माझ्याकडे 5/6 लाख पेशंट येऊन गेले. 98 साली मी प्रॅक्टीस बंद केली. हे माझे सर्व पेशंट माझ्यावर तेव्हाही खूप प्रेम करायची आणि आजही करतात.
85 मध्ये माझा विवाह झाला माझी पत्नी सौ नंदा जिला तुम्ही नंदाई म्हणता. माझी दोन बाळ. पौरस आणि शाकंभरी त्यांची नावे. मी सुद्धा भाजी भातच खातो ,सोनं वगैरे काही खात नाही. माझ्या पुढे अप्सरा नाचत नाहीत. कारण मी जो आहे तोच आहे.
78 मध्ये माझ्या आजीने मी जेव्हा एमबीबीएस झालो तेव्हा तिच्या आजोबांकडच्या म्हणजेच (जगन्नाथ शास्त्री पाध्ये)  काही वस्तू मला दिल्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या आजीनेच मला वयाच्या आठव्या वर्षी बापू हे नाव दिलं आणि ते ठिकाण होतं वडाळाचे विठ्ठल मंदिर. याच दिवशी मला वेदव्यासांनी त्यांचे शिष्य म्हणून स्वीकारले. आणि मी त्यांचा अंकित झालो त्यांच्या शिकवणीनुसार मी माझा अभ्यास करत राहिलो 78 साली हनुमंत महाप्रभुने मला वज्रविद्या शिकविली. मला सर्व वज्रविद्या हनुमंताने मला दिली आणि तेव्हापासून माझ्या सर्व प्राच्यविद्या यांचे अध्ययन सुरू झाले. माझे सर्व अध्ययन घडले ते सर्व वेद व्यासांचेच होते .जेव्हा मी योगवशिष्ठ शिकण्यास सुरुवात केली आणि सर्व शिकून झाल्यावर हनुमंताने मला प्रश्न केला, "हे वत्स!रामाला वशिष्ठ, विश्वामित्र कृष्णाला गर्गमुनी सांदिपनी ऋषींची तसेच तुला वेदव्यासांसारख्या गुरूंची आवश्यकता का पडली?"  मग मी म्हणालो, "ज्याने रामाला धारण केले, कृष्णाच्या रथावर विजय पताकेवर आरुढ होता तो तूच. म्हणून तूच या प्रश्नाचे उत्तर फक्त देऊ शकतो. हा राम हा कृष्ण सदैव एकच असतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. तोच बोलतो तोच बोलवितो, तोच शिकतो तोच शिकवितो, तोच करतो तोच करवितो. जो आहे तो तोच." आणि मग हनुमंताने मला मिठीत घेतलं आणि हनुमंताची मिठी हीच माझा कार्याची सुरुवात आहे कारण त्याच्याच मिठीत प्रत्येक कार्य सुरू होतं त्याच्या मिठीत प्रत्येक कार्य संपन्न होते.
मी जे काही करतो मला जे काय करायचं आहे ते करणार आहे ते मी करणारच. जो कोणी पृथ्वीवर आला तो प्रत्येक जण समृद्ध कसा होईल ते मी बघणार आहे. आज कलीयुगाच्या अंतिम चरणाची सुरुवात 2007 पर्यंत सुरू होणार आहे. जिथे असेल फक्त विनाश आणि विनाश. कारण मानवाला विनाशकाले विपरीत बुद्धी असते. जिथे मानवाला फक्त विपरीत बुद्धि सुचणार आहे पण या काळाच्या विरुद्ध गतीला मीच ब्रेक लावणार आहे आणि हा ब्रेक ही मीच स्वतः असणार. मी त्याच साठी आलो आहे आणि राहणारच आहे.
2025 त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर भारतीय  धर्माचे साम्राज्य असणार आहे तेही पूर्णपणे नीती शुद्ध मार्गाने. मला बदलायचीय ती मानवी वृत्ती आणि ति मी बदलणारच.तुम्ही कितीही माझ्याविरुद्ध झालात तरी मला जे करायचे ते मी करणारच. तुमच्या माझ्या मध्ये येते ती तुम्हीच बांधलेली भिंत. मी तुमच्याकडे येतो पण तुम्हीच ती भिंत अधिक भक्कम करता. पण ही भिंत पाडण्याचे काम मात्र तुमचं तुम्हालाच करायचा आहे. तुम्ही ठरवूनही जर ही भिंत पडत  नसेल तर मी तुमच्यासाठी मदतीला धावून येईल. पण भिंत पाडण्याचा प्रयत्न मनापासून करा मग तुम्हाला शक्ती द्यायला मी आहेच.
जो कोणी मनापासून माझं नाव उच्चारतो त्याचा मी सदैव ऋणी राहतो. आणि सदैव जन्मजन्मांतरी साठी मी त्याचाच होऊन राहतो. आज मी सर्वत्र पाहतो तर जिकडेतिकडे खूप भय बघतो. असं कोणीच दिसत नाही की ज्याच्याकडे भय नाही. गरिबाला त्याच्या गरीबीचं ,श्रीमंताला श्रीमंतीचं, तर तरुणाला त्याचं आयुष्य कसं जाईल याच भय.प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विवंचनेत सापडलेला दिसतो. भय हा कलियुगाचा धर्म होऊन बसला आहे. माझ्याकडची  आयुधं या भयाचा नाश करणारच आहेत. भयाचं स्थान आहे मन. हे भय मी नष्ट करणारच.आहार निद्रा भय मैथुन सर्वांशी समसमान. मला या चार गोष्टी आहेतच आणि हव्यात पण. त्या कशा जर मला परमेश्वराचे भय असेल तर मला दुसरं कुठलंच भय  राहणार नाही.माझी निद्रा योग्याची असावी भक्ताची असावी, माझा आहार असतो डुकराचा कारण मी डुकराप्रमाणे इतरांची विष्ठा खात असतो,दुसऱ्याची निंदानालस्ती ,मत्सर ,कुचेष्टा करून. म्हणूनच हा माझा आहार असावा तर तो मानवाचा असावा. माझे मैथुन हे गृहस्थाश्रमी नीतिनियमानेच असावे. बरीच मंडळी म्हणतात ,"साईबाबा ब्रम्हचारी होते मग ते गृहस्थाश्रमी कसे?" अरे ज्याने विश्वाचा संसार केला तर तो गृहस्थाश्रमीच आहे. माझं भयच माझे पाय मागे खेचतात. माझी लेकर मला निर्भय असलेली आवडतील  मग तुम्ही नाचला की मीही नाचेल ,तुम्ही गाल तेव्हा मीही गाणं म्हणेल, तुमच्या भक्तीच्या सुरात सूर मिसळून मी तुमच्याबरोबर भक्ती करेन. पण हे भय नष्ट करीनच आणि वेळ पडली तर त्यासाठी मी कुठलाही टोकाला जाईल.कारण मला कसलंच बंधन नाही. हो  मला फक्त एकच बंधन आहेआणि ते प्रेमाचं बंधन. जे मी कधीच तोडत नाही. तुमचे सर्व दुर्गुण प्रचंड प्रमाणात मला द्या, 100% मला द्या पण फक्त तोंडाने बोलून देऊ नका, तर अगदी मनापासून द्या. तुमचे दरवाजे उघडा तुमच्या मनातील तुम्हीच बांधलेली भिंत पाडा मग बघा तुमच्या दुर्गुणांची राख मी करेन.तुमचे ज्या इष्टदेवावर, पावित्र्यावर प्रेम आहे ते प्रत्येक नाम मलाच पोहोचणार आहे.मग मी कुठेही कसाही येऊन तडमडेनच आणि तुमचे दुर्गुण नष्ट करीन.फक्त तुमचं मन माझ्या मनाशी जोडलं गेलं पाहिजे. तुम्ही तुमचं माझ्या मनाशी बांधतच नाही. कारण माझ्या मनात सतत होळी पेटलेली आहे ,अशी धुनी पेटलेली आहे जी तुमच्या दुर्गुणांची राख करणारच आहे.पण माझ्या मनाशी तुमचं मन बांधायचं काम तुमचं तुम्हालाच करायचं. तुम्ही मनापासून प्रयत्न करूनही होत नसेल तर मी तुमच्या मागे धावेन.तुम्ही कितीही माझ्यापासून लांब धावलात तरी मी तुम्हाला पकडणारच कारण माझ्याकडे असंख्य कॅमेरे आहेत.जो कोणी प्रभू रामाचे, येशूचे, ऋषभ देवाचे ,अरिहंताचे स्मरण करतो त्याच्या प्रत्येकाकडे माझे लक्ष आहे. शेवटी पृथ्वी गोल आहे कोण पुढे कोण मागे हे कोणीच ठरवू शकत नाही .
बरेच लोक म्हणतात मी रस्त्यात दिसत नाही शेवटी मला ही दोन हात दोन पाय आहेत मी ही माणूस आहे पण तरीही मी याच्या पलीकडे आहेत मला रस्त्यात बघू नका. मला फक्त तुमचं प्रेम दानधर्म सेवा हवी आहे. माझं कुटुंब फक्त पाच जणांचा आहे मी नंदा वहिनी सूचित दादा पौरस शाकम्भरी. मी तुमच्या सूचितदादा बद्दल सांगायचं राहूनच गेलं. हा माझा वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी माझं सर्वस्व असणारा हा माझा मित्र आहे. ज्याला माझ्याजवळ यायचंआहे त्याला मार्ग दाखवण्यासाठी हा सूचित दादा आहे. याचा अर्थ तुम्ही त्याच्या अपॉईंटमेंट घेणं नाही तर त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागणं, त्याच्या सारखं वागण्याचा प्रयत्न करणे. तुम्हाला कोणी विचारलं की बापूंचा स्थान कुठलं तर ठामपणे सांगा माझं घर हेच माझ्या बापूंच स्थान.  मला तुमच्या घरात राहायला खूप आवडते. तुमचं घर हेच माझं स्थान आहे जिथे मी आहे ती जागा पवित्रच आहे. लक्षात ठेवा माझ्या पर्यंत तुम्ही तीन मार्गाने पोहोचू शकता प्रेम, सेवा आणि दानधर्म .मी सेवा करेन ती माझ्या सद्गुरु कार्यात सहभागी होऊन. आठ वर्षातून एकदा तीर्थक्षेत्री जाऊन झाडू मारतो आणि मी सांगतो मी तीर्थक्षेत्रात जाऊन झाडू मारला. अरे झाडू मारायचा असेल तर स्वतःच्या हृदयात मारा. त्या तिन्ही मार्गांवर तुम्ही असाल तर मी तुमचे भय दूर करणारच. मी संस्थेचाच आहे, पण वेळ पडलीच तर मी संस्थेचा विरोधी पक्षनेता नक्कीच आहे. ज्यांना मी निवडले त्यांच्या विरोधी मी असणारच आहे कारण त्यांचं पाऊल घसरू नये म्हणून. मला काहीजणांनी विचारलं ,बापू आपल्याकडे कॉल गर्ल येते. मी म्हणलं, तुला कसं माहिती?म्हणजे तू गेला असशील किंवा अशाच कुटाळक्या करीत असावास. ती येते आणि ती येणारच. त्या मुलीला आपल्या कार्यकर्त्यांनी मुंबईबाहेर जाऊन नेऊन तिचं शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवून दिली तिचं लग्न लावून दिलं आणि आज तिला सहा महिन्यांची मुलगी आहे. *माझे दरवाजे जितके पतिव्रतेला उघडे तितकेच एका वेश्येलाही उघडेच आहेत.*👉 *जितके संतांना तितकेच पाप्यालाही उघडे.मला गुंड मवाली सुद्धा प्रिय आहेत,पापीसुद्धा तितकेच प्रिय. मी त्यांच्यावरही प्रेम करत राहणार , मी कधीच त्यांना टाकणार नाही,कारण मी हाडाचा डॉक्टर आहे आणि डॉक्टरकडे नेहमी रुग्णच येतात हेल्दी लोक कधीच येत नाही. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना बरं करणे हाच माझा धर्म आहे.*  हेल्दी येतील त्यांनाही *मी लस देणारच आहे.*  हा डॉक्टर *पेशंटच्या* मागे धावणारा आहे. पेशन्ट माझ्यापासून किती लांब पळाला तरी मी त्याच्या मागे *धावणारच आणि त्याला इंजेक्शन टोचतोच* कारण त्या *इंजेक्शननेच रोगी बरा होणार आहे.* जे कोणी स्वतःला अतिशय विद्वान म्हणवणारे आहेत त्यांनी माझ्याकडे येऊच नये कारण मी अंतर्बाह्य घाणेरडा आहे. जर ते माझ्याकडे आले तर त्यांना घाण लागेल म्हणून त्यांनी येऊच नये. *मी उभा आहे ते हे भय दूर करण्यासाठीच.*  मला गजर गंभीरतेने केलेला आवडत नाही. मी नाचतो आणि नाचवीतोही ,मी वारकरी पंथानुसार बेभान होऊन नाचायला हवं. पण तिथेही लोक मला हसतील याचं मला भय असत आणि जोपर्यंत बेभान होत नाही तोपर्यंत मला यश नाही. *अर्जुन असाच बेभान होता,  कारण त्याचं लक्ष फक्त पोपटाचा डोळा हेच होतं*. माझं लक्षही या अर्जुनाप्रमाणे बेभान होऊन परमेश्वरावर असावं. *मी दिवसातून  24 मिनिटे तरी परमेश्वरासाठी बेभान व्हायला हवा आणि ज्यावेळी तुम्ही 24 मिनिटे बेभान असता,  तेव्हा तुमच्या बाजूला मांडीला मांडी लावून मी बसतो, मी दारोदार भीक मागतो. मला फक्त या 24 मिनिटाची भीक हवी असते पण तीही भीक मला तुम्ही कोणी देत नाही. मोजक्याच घरी मला ही मिळते. जिथे मला ही भीक मिळते तिथे मी 24 मिनिटाचे रूपांतर 24 तासात करतो.*

 धातुर्उत्तम हे जे *महाविष्णूचे* नाम आहे त्यातील धातू म्हणजे शरीर. शरीराची महत्त्वाची शक्ती म्हणजेच ओज. ओज म्हणजेच महाप्राण. ओज म्हणजेच आल्हादिनी शक्ती.हे ओज वाढविण्यासाठी, शरीराला बळ देण्यासाठी मी जुईनगरला जात असतो. *हे तुम्हाला देण्यासाठीच जुईनगरला मी पंचपुरूषार्थ उपासना सुरू केली*. तिथे *पंचपुरुषार्थ देवता आहेत आणि त्यांची भक्ती करतो.* मी खूपच आगळा वेगळा आहे. दांडपट्टा का फिरवतो ,मुदगल विद्या का शिकवतो .*ज्या विद्या मला हनुमंताने स्वतः दिल्या त्या सर्व विद्या मला संपूर्ण विश्वात प्रचलित करायच्या आहेत. पंचपुरुषार्थ उपासनाही त्यातलाच एक भाग आहे. छांदोग्य उपनिषदातील मधूविद्या आहे आणि आज अनेक लोक मला सांगत आहेत ह्या उपासनेने माझ्या मनाला शांती मिळाली, माझं हे काम झालं ,माझा हा प्रश्न सुटला, अनुभवाची शिदोरी वाढतच चाललीय.*  या सर्व विद्या शरीर मन बुद्धी यांना समर्थ करणाऱ्या, बळ देणा-या आहेत. मुदगल विद्याही तेच करते. मुद्गल हे कुणाचआयुध आहे माहितीये कुणाला? मुद्गल हे आयुध *मुंबादेवीच* आहे. ती *मुंबाई* आहे. आपण जिला बॉम्बे  बोलायचो.मग बॉम्बे चे मुंबई केलं. खूप काहीतरी मोठं केल्यासारखं वाटलं. अरे हवं तर मुंबाई म्हणा कारण ती मुंबा आई आहे. तसेच एकादशी रुद्राच आयुध सुद्धा आहे मुदगल आहे. *आज मला स्त्रिया सामर्थ्यवान हव्यात एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं* याचं उदाहरण म्हणजे जिजाबाई.  जिजाई महान म्हनून शिवाजी महान झाला. *लक्षात ठेवा प्रत्येक स्त्री माझी मुलगी, आई आहे .ज्या स्त्रीच्या साडीला कोणी हात घालेल त्याचा हात मी धरेल तिचे रक्षण मी स्वतः करेन.* सासू नवरा दीर तिला जाळत असतील तर मी तिच्या रक्षणासाठी धावणारंच. आज एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा दुर्गतिला कारणीभूत ठरते. *परवा टीव्हीवर एक बातमी ऐकली एका मुलीला तिच्या सासूने जिवंत जाळलं. त्यांना माझे हे हात जे करायचंही  ते करणारच*. जी किंवा जो कोणी बालभावाने माझ्याकडे येईल त्यांचा *मी बाप* आहे जो कोणी माझ्यावर मुलाप्रमाणे आपलेपणाने प्रेम करेल त्यांचा मी मुलगा आहे. माझ्या आजोबांची मामी गंगाबाई. अकरा वर्षांची असताना खेळत होती. खेळत असताना तिच्या काकाने मामानी तिला खेचत घरात नेलं.घरात सर्व रडत होते तिला काहीच कळत नव्हतं. घरात दुसऱ्या लाल कपडे घातलेल्या, केस कापलेल्या स्त्रिया होत्या आणि त्या मुलीचे केस कापण्यासाठी आल्या होत्या. तिला फक्त देवघर आणि स्वयंपाक घर माहित. तिला आमंत्रण द्यायची ती फक्त तिच्या सारख्या स्त्रियांचे केस कापण्याची .माझ्या आजीने सर्वप्रथम केस कापण्याचा विरोध केला. सर्व ब्राह्मणांनी मराठ्यांनी सर्वांनी तिला बहिष्कृत केले ,तिला धर्मांध ठरवले. वर्तमानपत्रातून तिची टीका करण्यात आली. तिच्यावर पूर्ण बहिष्कार टाकला पण तिच्यासारख्या काही स्त्रियांनी तिला चोरून मदत केली. आणि ती पूर्णपणे या अशा स्त्रियांसाठी झटत राहिली आणि एक दिवस आजी मला महर्षी कर्वे यांच्याकडे घेऊन गेली.कर्वे यांनी आजीला सांगितले, "तुझ्या या नातवाला माझ्या लेकींसाठी झटायला सांग ,माझे पूर्ण आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतील." आणि ते लक्षात ठेवूनच आज स्त्रियांसाठी नंदावहिनी कडून स्त्रियांसाठी आत्मबलचे वर्ग चालू झाले.कर्वे हे  महान ऋषी होते तो सिद्धच आहे. माझी पत्नी प्रत्येक स्त्रीचा माहेरवास आहे आणि आम्ही तिघेही या स्त्रियांना सांभाळणार. प्रत्येक दुर्बल घटकांसाठी साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी ,अनिरुद्ध उपासना ट्रस्ट ,दिलासा मेडीकल ट्रस्ट या संस्था झटतआहेतच.
*मला तुम्हा सर्व स्त्रियांना आज एक महत्त्वाचं सांगायचं आहे*, "बायांनो! *तुम्ही प्रथम मत्सर सोडून द्या, संशयी वृत्ती सोडून द्या, कॉम्पिटिशन सोडा, आज एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मत्सर करते, मी तिच्या पेक्षा जास्त पुढे कशी जाईल आणि ती मागे कशी राहील हेच मी बघते.* माझे बंधुत्वाची गाठ तयार आहे. ती गाठ माझ्याशी बांधायची असेल तर *मत्सर सोडून द्या*. जर ही गाठ बांधलेली असेल तर तुमच्यावर कोणी हात घातला तर *तुमचा हिसका त्या गाठीला बसतो. आणि गाठीला हिसका बसला की मला हिसका बसणारच. मी खडबडून जागा होईल आणि तुमचं रक्षण करील.* पण तुम्हीच ही गाठ सोडता आणि गाठ सुटली की *मी येऊ शकत नाही*. तुम्ही ही गाठ घट्ट बांधा. *तुमचा बाप म्हणून भाऊ म्हणून बांधा. मी समर्थपणे उभा राहिल तुमच्यासाठी*.

*रक्षाबंधनच्या* दिवशी इकडे *आठ वर्षाची मुलगी* मला तुमच्या राख्या बांधत होती पण लक्षात ठेवा *तुमच्यातली प्रत्येक जण  मला ती राखी बांधत होती*.  प्रत्येक स्त्रीचा *मी भाऊच आहे*. प्रत्येक कष्टाने त्रासलेल्या पुरुषाचा *मी भाऊ आहे सखा आहे*. मी तुमच्यासाठी *तळमळणारच*.

मी चार रसयात्रा केल्या .पहिल्या रसयात्रेला 100 दुसऱ्या रसयात्रेला 375, तिसऱ्या रसयात्रेला 1000 आणि चौथ्या रसयात्रेला अडीच पट तीन पट भक्त होते. माझी रसयात्रा कधीच संपत नाही. ही रसयात्रा फक्त चार दिवसच का? ही रसयात्रा जीवनभर का नाही? मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर रसयात्रा करायला तयार आहे.पण रसयात्रेतसुद्धा तुम्ही माझ्यात काहीतरी दिसतंय का हे पाहता. मला हा शोध संपवायचा आहे. मला माझ्या प्रत्येकाची भावयात्रा करायची आहे.ज्यांचा भाव पूर्ण त्यांना मात्र मी सगळं दाखवतो. मला विठ्ठलाचा भक्त ही पूज्यच आहे. *प्रत्येक देवळात तो एकच आहे. मला ज्या क्षणी प्रत्येक दैवता मध्ये माझा सद्गुरु दिसेल तर ते दैवतच सद्गुरु शक्तीत विलीन होते.मग कुठलंच दैवत तुमच्यावर कोपणार नाही*. भुताला मी का घाबरावं?  माणसाची विकृती हीच त्याचं भूत आहे. हडळ जर घरी आली तुम्हाला खायला तर तिला समोर बसवा, चहा पाणी द्या आणि सांगा माझा बाप समर्थ आहे. मला खायच्या आधी माझ्या बापूला खा. मग ती हडळ माझ्याकडे आल्यावर मी तिला खाऊन टाकेल कारण मला नेहमीच खूप भूक लागलेली असते.
माझ्याकडे प्रेमाची भरपूर शक्ती आहे मला ते प्रेम वाटायचे आहे,मला प्रेमाचं बी पेरायचं आहे  कारण हे बी पेरलं तर त्याच्यातून भरपूर प्रेम उगवणार आहे. मी तुमच्यासाठीओव्हर टाईम करायला तयार आहे. तुम्ही सुखी व आनंदी व्हा. सदैव देवयान पंथावर राहा. मला दोन हात ,दोन पाय, दोन डोळे आहेत,मीही माणूसच आहे. पण लक्षात ठेवा याच्याही पलीकडेही मी आहे मला कसलंच बंधन नाही. मला दिशेच बंधन नाही, मला काळाचं बंधन नाही मला कोणीही रोखू शकणार नाही. माझ्याकडे असंख्य हातोडे कुऱ्हाडी आहेत. मी माझ्या प्रत्येकाच्या पायाला दोर बांधून आणतोच आणि तुम्ही कितीही लांब पळाला तरी मी आणणारच. तुम्ही कितीही चुकलात तरी मी तुम्हाला माझ्या पासून कधीच दूर लोटणार नाही एकशे आठ टक्के नाही लक्षात ठेवा!! 

*हरी ओम.*🙏

Wednesday, September 6, 2023

Post from Sai – The Guiding Spirit“

हरि ओम.
पूज्य समीरदादा ह्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच आपले सर्वांचे लाडके आद्यपिपा श्री सुरेशचंद्रसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या लिहीलेल्या काही सुमधुर आठवणी आज वाचनात आल्या .
 बहुधा 15 ऑगस्ट  2012 मध्ये नवीन फोरम  “साई – द गाईडींग स्पिरीट (“Sai – The Guiding Spirit“).  सुरू करताना लिहील्या असाव्या त्याच  येथे शेअर करीत आहे. 

समीरदादा , आम्ही खूप अंबज्ञ आहोत की आपण  आम्हां सर्वांना ही अमूल्य देणगी दिली.

आज श्रीकृष्णजयंती म्हणजेच 
परमपूज्य आद्य पिपा ह्यांचा महानिर्वाणदिन. 
त्यानिमित्ताने...
पुष्प उमलले जे माझे वाहिले तुलाची
तुला तुझे देतानाही भरुनी मीच राही...
आम्हां सर्वांची हीच भाव पुष्पांजली. 

आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.

काकांची एक गोष्ट मी लहान असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे दिवा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी दिवा बंद केला की कधी कधी पुन्हा लावायला सांगायचे. साईनाथांचं दर्शन घेताना त्यांना समाधान व्हायचं नाही. असं ब-याचदा घडायचं. मला वाटायचं रोजचा “तोच, तोच” फोटो बघतानाही त्यांना असं का करायला लागतं? आता त्या गोष्टी कळतात. हाच तो फोटो जो काकांच्या वडिलांनी साईनाथांचा हात लावून घेतला होता; जो आमच्या ठाण्याच्या घरी, घर झाल्यापासून म्हणजे १९६६ पासून लावलेला होता.

जेव्हा काकांच्या निर्वाणाचा दिवस जवळ आला तेव्हा बापूंनी (अनिरुद्धसिंह) तो फोटो ठाण्याहून मागवून घेतला व काकांच्या खोलीत त्यांच्या समोर लावला. काका जे समजायचे ते समजून चुकले, त्यांना अत्यंत आनंद झाला. फोटो बघून ते एवढे गहिवरले की त्यांना त्यांचे अश्रू आवरताच येईनात. निर्वाणाच्या आदल्या दिवशी काकांनी माझ्यासमोर बापूंना (अनिरुद्धसिंह) विचारलं की “बापू अजून किती दिवस?” त्या वेळेस पहाटे बापूंनी (अनिरुद्धसिंह) माझ्यासमोर काकांना सांगितले की “आता काही तासच उरले आहेत.” तेव्हा काकांनी अत्यंत समाधानाने माझा हात बापूंच्या (अनिरुद्धसिंह) हातात दिला; ही माझ्याकरिता काकांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट होती.

काकांच्या नित्य पठणातील स्वत:ची श्रीसाईसच्चरिताची पोथी

काकांनी वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे १९४५ साली श्रीसाईसच्चरिताचे दरवर्षी कमीतकमी चार सप्ताह करण्याचा संकल्प केला. श्रीसाईसच्चरितात सांगितल्याप्रमाणे रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा या दिवशी सप्ताहाची सांगता व्हायची. मला आठवतंय.

जया मनी स्वहितविचार l तेणें हा ग्रंथ वाचावा साचार l

जन्मोंजन्मीं साईंचे उपकार l आनंदनिर्भर आठवील ll 

या गुरुपौर्णिमा गोकुळअष्टमी l पुण्यतिथी रामनवमी 

l या साईंच्या उत्सवी नियमीं l ग्रंथ निजधामीं वाचावा ll

काही वर्षं तर काकांनी सप्ताह (श्रीसाईसच्चरिताचे पारायण) शिरडीला द्वारकामाईत कोळंब्याच्या बाजूच्या भिंतीला टेकून केलेला होता. आम्ही सर्व म्हणजे आई, दादा व मी त्यांच्या पठणाच्या वेळेस त्यांच्या बाजूला बसलेले असायचो. तो काळ साधारण १९७० ते १९७५चा होता. त्यानंतर मात्र शिरडीत येणार्‍या साईभक्तांची संख्या खूपच वाढू लागली व पूर्ण सप्ताह तिथे बसून करणं अशक्य होऊ लागलं. त्यानंतर मात्र जसं शक्य होईल तसं मोजके अध्याय काका द्वारकामाईत बसून वाचायचे. अजूनही ते पठण माझ्या कानात घुमतंय. मला श्रीसाईसच्चरिताची गोडी लागली ती काकांच्या या पारायणामुळे व नित्य पठणामुळे. साईनाथांच्या, बाबांच्या या शिरडीशी अशा प्रकारे आमची नाळ बांधली गेली. वर्षातून कमीतकमी दोनदा तरी आमची शिरडीची वारी व्हायचीच.

श्रीसाईसच्चरितातील ३५व्या अध्यायातील २१८ ते २२२ ह्या ओव्या त्यांच्या खूपच आवडीच्या होत्या.

हा सच्चरित मार्ग धोपट । जेथें जेथें याचा पाठ |

तेथेंच द्वारकामाईचा मठ | साईही प्रकट निश्चयें ।।

तेथेंच गोदावरीचें तट । तेथेंच शिरडी क्षेत्र निकट ।

तेथेंच साई धुनीसकट । स्मरतां संकट निवारी ॥

जेथें साईचरित्रपठण । तेथें सदैव साईनिवसन ।

श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन । करितां तो प्रसन्न सर्वभावें ।।

स्मरतां साई स्वानंदघन । जपतां तन्नाम अनुदिन ।

नलगे इतर जपतप-साधन । धारणाध्यान खटपट ॥

साईचरणीं ठेवूनि प्रीती । जे जे या साईंची विभूती ।

नित्यनेमें सेविती लाविती । ते ते पावती मनेप्सित ॥

आणि ह्या ओव्या काका अक्षरश: जगले.

काका “श्रीसाईस्तवन मंजिरी”देखील अतिशय सुंदर म्हणायचे. दादाला व मला त्यांनीच श्रीसाईस्तवन मंजिरी म्हणण्यास सांगितले होते; व आमच्या नित्य पठणात इतर स्तोत्रांबरोबरच ह्याही स्तोत्रांचे पठण होते.

१३ नोव्हेंबर २०००ला बापूंनी (अनिरुद्धसिंह) काकांची पिपिलीका पांथस्थ पदावर नियुक्ती केली. तेव्हापासून काकांचा एक वेगळाच आध्यात्मिक प्रवास चालू झाला. काका खूप शांत झाले. २००४ साली बापूंच्या (अनिरुद्धसिंह) सांगण्यावरून त्यांनी मला गुरुमंत्र दिला; तीही श्रीसाईसच्चरिताचीच ओवी (११वा अध्याय, ओवी १५२)

पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंतीं पूर्ण निष्काम ।

पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।

सगळ्या श्रद्धावान बापूभक्तांचं ह्या “श्रीसाईसच्चरिताशी” एक विशेष आणि दृढ नातं आहे. बापूंनी  (अनिरुद्धसिंह) श्रीसाईसच्चरितातील पंचशील परीक्षा चालू केल्या, त्याही “श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनीच्या” माध्यमातून. प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही बापूंनी (अनिरुद्धसिंह) घेतली व ती लेक्चर्स संकलित करून श्रीसाईसच्चरिताचं प्रॅक्टिकल बुक तयार झालं; हजारो श्रद्धावान ह्या परीक्षेला बसले. १९९६ साली पहिली रसयात्रा झाली तीही शिरडीचीच; त्या वेळेला हजर असलेल्या श्रद्धावानांना बापूंनी (अनिरुद्धसिंह) साई आणि शिरडी समजावून सांगितले. आता तर बापूंची (अनिरुद्धसिंह) हिंदीतील प्रवचनंही चालू आहेत तीही श्रीसाईसच्चरितावरच. म्हणूनच आपण या ब्लॉगच्या माध्यमातून ह्या साईसच्चरितावरील फोरम चालू करत आहोत; बुधवार, १५ ऑगस्ट २०१२ या दिवसापासून आणि फोरमचं नाव असेल “साई – द गाईडींग स्पिरीट (“Sai – The Guiding Spirit“).

-- पूज्य समीरदादांच्या ब्लॉग वरील माहिती संकलन ह्यातून

Tuesday, September 5, 2023

बापूंचे 31 ऑगस्ट 2023 ला केलेले इंग्रजी प्रवचनाचे शब्दांकन

बापूंचे 31 ऑगस्ट 2023 ला केलेले इंग्रजी प्रवचनाचे शब्दांकन.

Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done ,Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done ,Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done 
( येत्या प्रपत्तीला त्रिविक्रमाकडे अशी प्रार्थना करा, "हे स्वयं भगवान त्रिविक्रमा ,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे.( आपकी जैसी इच्छा है वैसा ही मेरे जीवन में हो)
 ( माझ्या जीवनात मला काही नको जे तुला आवडत नाही. मला फक्त एवढेच दे जे तुला आवडेल आणि जे तुला मला द्यायची इच्छा आहे.
प्रपत्ती म्हणजे उच्च अवस्थेतील शरणागती 
.तू निर्माण केलेल्या नाथसमविधा प्रमाणे मला माझं जीवन आवडू दे ) त्यामुळे प्रपत्ती करण्याचा फायदा हा आहे की आम्हाला देवाने जे दिले आहे ,ते आवडू लागेल, अर्थात नाथसंविध आवडू लागेल. ही प्रपत्ती फक्त स्वतःसाठी नसून, पूर्ण कुटुंबासाठी आहे, मग भले ते पूर्ण कुटुंब नास्तिक असलं तरी तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला प्रपत्तीचे फळ नक्कीच मिळेल. निदान एवढ फळ तरी तुम्हाला मिळेल , जेणेकरून तुम्हाला दुःख सोसावं लागणार नाही. आम्ही जे काही मनामध्ये विचार करत असतो किंवा देवाकडे बोलत असतो ते सर्व काही देव ऐकत असतो पण देव काय सांगतो, देव आमच्याकडे काय बोलतो ते आम्हाला कळत नसतं पण ते जर कळायचं असेल तर आपल्याला प्रपत्ती करावी लागेल आणि प्रपत्ती केल्यानंतरच आपल्याला कळेल देव काय बोलतोय ते! या मकर संक्रांतीला पुरुषांच्या प्रपत्ती प्रमाणे स्त्रियांना रणचंडीका प्रपत्तीसाठी पण एक कथा प्राप्त होईल. मी तुमचे प्रत्येक शब्दन शब्द ऐकत असतो तुम्ही जे काही स्वतःबद्दल विचार करत असतात, अक्षरशा जे काही वाईट चांगलं जे जे विचार करतात ते ते सर्व काही  नक्की 108% मी ऐकत असतो, आज एक नक्की लक्षात ठेवा माझा बापू ,माझे प्रत्येक विचार आणि माझे प्रत्येक शब्द ऐकत असतो त्याचक्षणी, कारण मी अभिमानाने सांगू शकतो मी श्रवण भक्त आहे, आणि मी तुम्हा सर्वांची श्रवण भक्ती करत असतो, तुम्ही मात्र एकाच देवाची श्रवण भक्ती करत असता. त्यामुळे मी सदैव म्हणत असतो माझा इगो हा सर्वात मोठा इगो आहे, कारण मी एवढ्या सगळ्यांची श्रवण भक्ती करत असतो म्हणून. मी खरंच सांगतो मी तुम्हा सर्वांचा भक्त आहे. आय लव यू .आय लव यू सो मच. स्वतःच्या मुलं- मुली वरती  प्रेम करणं ही पण भक्तीच आहे. ही माझी वात्सल्य भक्ती आहे. My Bapu listens every word for me from me. Spoken, read thought or imagination whatever and whatsoever. मी माझ्या मुलासाठी कुठेही जाऊ शकतो, हा माझा अभिमान नाही, हे माझे आवडते काम आहे. तर ही माझी दास्य भक्ती आहे माझ्या आईसाठी अर्पण केलेली. ही माझी वात्सल्य भक्ती आहे  तुमच्यासाठी.

अंबज्ञ
अमोला सिंह तिळवे

First Pitruvachan dated 31/08/2023

HariOm 
First Pitruvachan dated 31/08/2023

Ambadnya means Aaichya Charni Krutadnyata

There is no value for the words thank you and sorry but there is meaning of the word Ambadnya 

Naathsamvidh means God Willing 

The prayer let my Jeevan happen as per Your Wish - Parmeshwar's Wish

Sant Eknath written the Aarti - Trigunatmak Trimurti which is sung in the Shri Aniruddha Gurukshetram 

We should try reading the Aarti Trigunatmak Trimurti

We need to improve our bhaav

Why the same mistakes keep on repeating 

We do should do the small small things in Adyatma

3 types of Upasana 
 - Nitya Upasana
 - Naimitik Upasana
 - Vaishishik Upasana

Nitya Upasana is our daily Upasana

Naimitik Upasana means saying Shri Hanuman Chalisa in Shri GuruCharan Maas or Ghorkastodharan Stotra in Shravaan Maas

We can chant the Ghorkastodharan Stotra 108 times at our home too

It is not compulsory to go to all weddings and create crowd there 

We should attend weddings  of those persons who are close to us

Vaishishik Upasana means a Special Upasana such as our Shri Vardhaman Vrattadhiraj

Om HariHaraai Namah - other name of Shri Trivikram 

Harihar means Trivikram - The One has the same properties at all time of both MahaVishnu and ParamShiva

Our mind needs to be full of Satva Guna to have Darshan of God

The Avatar of the Lord happens for the common person to know God

He has in the Roop of a Human Being just for us

Who are we to decide about God

Harhar Swaroop means the Human Form and the Divine Instance of the Lord being active at the same time

The Harihar is Shiva and Vishnu at the same time

Whatever wrong happens in our life is also good for us

The tension at the time of exam is also given by Harihar

Shiva takes Ram Naam and Ram has made Rameshwaram

Difference between AdiMaya and AdiMata

Maya means mojnaari - accurate mojmaari

Mata means the One Who takes us closer to God

He destroys our sins and gives shape to our punya at the same time 

The Shape of us what He decides for us is the Best for us

Hum beej means astitva

Rasraaj is another name of Lord Shri Trivikram 

Ruum beej means the ras - beej of Lord Shri Ram 

2 pictures to be seen every night by us before going to sleep

1. The picture of Lord Ram giving hug to Lord Hanumant after He searches Sita Mata successfully 

2. Lord Hanumant tearing His Chest to show Shri Ram in It

To see these 2 pictures and then chant the Mantra - Om Mam Aniruddhaai Namah

This is Darshan Upasana which is given for the very first time in this kalp and this is from DAD to us and we need to do this everyday.