Thursday, May 12, 2022

vaishakh poornima

ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्रणाय महाबलाय नमो नमः
!! वैशाख पौर्णिमेच्या !!
सर्व श्रद्धावानांना अनिरुद्ध शुभेच्छा

विशेष अध्यात्मिक माहिती
ब्राह्मवादिनी अरुंधती :
“ प्रत्येक मानवास त्याच्या प्रत्येक श्वासागणिक दोन देवदूतांची आवश्यकता असते व ही संख्या फार मोठी आहे आणि म्हणूनच      '#पंचमुखमुखहनुमत्कवच_पठण' व '#सद्गुरूस्मरण' ह्या दोन्हींचा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उत्कृष्टपणे उपयोग करून घेतल्यास , श्रद्धावानाकडील देवदूतांची संख्या, ज्याच्या त्याच्या भावानुसार अनेकपटीने वाढू शकते.

(संदर्भ: तुलसीपत्र-१३२७)

*वैशाख पौर्णिमा पूजन*

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी 
सत्य, प्रेम व आनंद 👈🏻 ह्या पवित्र त्रिसुत्रीशी एकरूप झालेले महासिद्ध पुरुष (सदगुरू तत्व) विशाल मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येतात
 आणि
 त्यावेळी ते सत् वृत्तीच्या उत्थापनाची योजना आखतात. 

या दिवशी 
सदगुरू आपल्या लाभेवीण प्रीतीची जास्तीत जास्त उधळण करतात 
आणि 
सर्व सजीव व निर्जीव सृष्टीसाठी काय उत्तम द्यायचे हे ठरवतात.
 
या दिवशी 
आपण सदगुरू कडून जास्तीत जास्त स्पंदने मिळवू शकतो.

वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहेत.

१) वैशाख पौर्णिमा हि प्रबौद्धपौर्णिमा आहे.

२) वैशाख पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती विनायकाचा जन्मदिवस मानला जातो.

३) वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चोवीस तासात पूर्ण करतात असे मानले जाते... 

कारण 
भगवान वेदव्यास त्यादिवशी सूर्याच्याच रथात बसून असतात.....

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना एक उपासना दिली आहे. 
त्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांना प्रार्थना करूया की हे सद्गुरुराया श्रीअनिरुद्धा, 
तुझी प्रत्येक आज्ञा हाच आम्ही धर्म समजतो. 

म्हणून 
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भक्त कल्याणार्थ तू सांगितलेली उपासना आम्ही श्रद्धावान करू.....

यंदाची वैशाख पौर्णिमा 
सोमवार
दिनांक *१६/५/२०२२* रोजी आहे. 

सदगुरू बापूंनी ह्या दिवशी पुढीलप्रमाणे उपासना करण्यास सांगितले आहे. 

वैशाख पौर्णिमा उपासना

१) प्रथम चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल किंवा तलम वस्र घालावे. नंतर त्यावर आपल्या सदगुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा.

२) श्री सदगुरुंच्या फोटो प्रतिमेस सुंगधीत किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा तर श्री हनुमंताच्या फोटो प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.

३) दीप व अगरबत्ती लावून हात जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंतांचे ध्यान करावे. 

(सदगुरू तारक मंत्र 👉🏻
*ॐ मनः सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नम:*)

४) त्यानंतर 
    श्रीअनिरुद्ध कवच 
    श्रीहनुमान चालीसा 
    श्रीहनुमान स्तोत्र 
    श्रीसाईनाथांची ९ वचने 
    श्री अनिरुद्धांची ९ वचने 
    श्री आदिमाता शुभंकर स्तवन

             व 

श्रीआदिमाता अशुभनाशिनी
            स्तवन

यापैकी कोणतेही एक स्तोत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावे.

५) त्यानंतर
    (१) आंब्याचे पन्ह
    (२) कच्चा आंबा व भिजलेली
           चण्याची डाळ वाटून त्याचा
            प्रसाद अर्पण करावा. 
  
त्यानंतर लोटांगण घालावे.

हे दोन्ही पदार्थ मानवाला पिडणा-या षडरिपुंच्या गुणांपासून मुक्त आहेत.
 म्हणून 
त्यादिवशी तरी आपल्याला त्रासणारे काम, क्रोध, मोह, मद, मस्तर, लोभ या षडरिपुंपासून दूर राहण्यासाठी ही साधी व सोपी उपासना आपण आपल्या घरी बसून दिवसभरात कधीही करू शकतो.

जो कोणी प्रेमाने 
वैशाख पौर्णिमेला ही उपासना करील त्याच्या घरी ह्या दिवशी आपला सदगुरू हनुमंता बरोबर येऊन जातोच अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धांनी दिली आहे.....

*नाथसंविध्*
*हरि ॐ*
*श्रीराम*
 *अंबज्ञ*
*जय जगदंब जय दुर्गे*

tulsipatra

।।हरि ॐ।।

*पिपीलिकापांथस्थ प.पू.आद्यपिपा दादा*

*आज - १९ एप्रिल;*

*प.पू.श्री आद्यपिपादादा यांच्या समाधिस्थानम् चा स्थापना दिवस आहे.*

त्या अनुषंगाने *प.पू.बापूंचा* एक सुंदर तुलसीपत्र अग्रलेख (१९८) संग्रही आहे .,त्याचे स्मरण करूयात.

 चलेऊ नाइ सिरू पैठेऊ बागा।
फल खाएसि तरू तोरैं लागा।
रहे तहॉं बहु भट रखवारे।
कछु मारेसि कछु जाइ पुकारे।।
*सुंदरकांड ओवी १०४*

 संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी अगदी नि:संदिग्धपणे हे दाखवून देतात की जानकीमातेने आशीर्वाद दिला म्हणून हनुमंताने आदराने ,कृतज्ञतेने ,
उपकृत्यभावाने व प्रेमनिर्भर होऊन परमात्मत्रयीस प्रणाम केला व त्यानंतर तिच्याकडून अ-शोकवनातील फळे खाण्याविषयीची आज्ञा मागितली.
तिच्याकडून ती आज्ञा मिळताच *परत एकदा कार्याला सुरूवात करताना हनुमंत नतमस्तक झाला.*

हा *दुसरा नमस्कार* आता कुठल्याही आशीर्वादाच्या वा वराच्या मागणीविषयी ,वर मिळाल्याच्या आनंदासाठी किंवा फळे खाण्याची परवानगी दिली ,म्हणूनही नाही.

हा *दुसरा प्रणाम* वरील कुठल्याही कारणासाठी नसून,
*फक्त प्रत्येक श्रध्दावानाचे कुठल्याही कार्यातील "पहिले पाऊल" कसे असायला हवे,ते "स्व-आचरणाने" आपल्या वानरसैनिकांना अर्थात "श्रध्दावानांना" दाखविण्यासाठी आहे.*

 *ह्या दुस-या नमस्काराचा एक सुंदर आविष्कार "मी" वारंवार अनेक वर्षे शिरडीतील द्वारकामाईत पाहिलेला आहे.*

*आद्यपिपा* जेव्हा जेव्हा शिरडीत येत ,तेव्हा तेव्हा अगदी कितीही दिवस राहिले ,तरी त्यांचे *मन* भरत नसे.
शिरडीतून बाहेर निघण्याअगोदर *ते* आपल्या दोन्ही मुलांना - *सुचितदादा* व *समीरदादा* आणि *स्वत:च्या पत्नीस* बरोबर घेऊन द्वारकामाईतील त्या सुंदर प्रतिमेसमोर हात जोडून उभे राहत असत.
*काकांच्या हातात एक श्रीफळ असायचे व डोळ्यांत विरहाचे अश्रू!*
त्यानंतर तो नारळ सुचित वा समीरकडे दिला जायचा , द्वारकामाईबाहेरच्या कुठल्याही दगडावर आपटून फोडण्यासाठी व मग ही दोन्ही मुले नारळ फोडून लगबगीने परत येत.
त्या नारळातील पाण्याचे काही थेंब तेथील *पादुकांवर* सिंचन केले जावायचे व काही जल द्वारकामाईच्या सभामंडपातील *बाबांच्या बसावयाच्या शिळेवर* अर्पण केले जायचे.

 अर्धा नारळ फोटोसमोरच ठेवला जायचा व अर्धा नारळ नारळाच्या पाण्याने नव्हे तर *अश्रूंनी चिंब* होऊन *प्रसाद* बनून काकांबरोबर परतायचा.
काका ह्या नमस्कारास *परतण्याची आज्ञा घेणे* असे म्हणत असत आणि म्हणूनच शिरडीतील राहत्या जागेपासून सर्व सामानसुमान घेऊन हा आद्यपिपा आपल्या कुटुंबीयांसमवेत निरोप घ्यायला येत असे व मग तेथूनच मधे कुठेही न थांबता थेट एस.टी.बसकडेच कूच करायचे.

९६ च्या आपल्या पहिल्या रसयात्रेमध्ये साईस्तवनमंजिरी वाचून झाल्यानंतर आद्यपिपांनी नमस्कार केलेलाच होता., त्यांचे सर्व सामान समीरदादांनी तिथे आणलेलेच होते.
पण आता इथूनच बसमध्ये बसावयाचे म्हटल्यावर त्यांनी स्वत: जाऊन नारळ आणलाच व पतिपत्नींनी तशीच आज्ञा घेतली. त्यांचे दोन्ही पुत्र त्यांच्या मागे तसेच उभे होते.
समीरदादांनी तसाच नारळ फोडला.
*फक्त ह्यावेळेस एकच गोष्ट वेगळी होती आणि ती म्हणजे ;  विरहाचे अश्रू नव्हते.*

माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो;
*श्रीहनुमंताचे अधिष्ठान असणा-या "पिपीलिकापांथस्थ" पदावर आरूढ होण्याचा आद्य मान (पहिला मान) मिळविलेला हा पिपीलिकापांथस्थ म्हणूनच कधीही उथळ बनलाच नाही,* 
*त्याचे पाय जमिनीवरून कधी सुटलेच नाहीत आणि म्हणून त्याच श्रीहनुमंताचा संदेश श्रध्दावानांना देऊ शकला.* 

श्रीराम!
अंबज्ञ!!
नाथसंविध्!!!