Thursday, May 12, 2022

vaishakh poornima

ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्रणाय महाबलाय नमो नमः
!! वैशाख पौर्णिमेच्या !!
सर्व श्रद्धावानांना अनिरुद्ध शुभेच्छा

विशेष अध्यात्मिक माहिती
ब्राह्मवादिनी अरुंधती :
“ प्रत्येक मानवास त्याच्या प्रत्येक श्वासागणिक दोन देवदूतांची आवश्यकता असते व ही संख्या फार मोठी आहे आणि म्हणूनच      '#पंचमुखमुखहनुमत्कवच_पठण' व '#सद्गुरूस्मरण' ह्या दोन्हींचा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उत्कृष्टपणे उपयोग करून घेतल्यास , श्रद्धावानाकडील देवदूतांची संख्या, ज्याच्या त्याच्या भावानुसार अनेकपटीने वाढू शकते.

(संदर्भ: तुलसीपत्र-१३२७)

*वैशाख पौर्णिमा पूजन*

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी 
सत्य, प्रेम व आनंद 👈🏻 ह्या पवित्र त्रिसुत्रीशी एकरूप झालेले महासिद्ध पुरुष (सदगुरू तत्व) विशाल मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येतात
 आणि
 त्यावेळी ते सत् वृत्तीच्या उत्थापनाची योजना आखतात. 

या दिवशी 
सदगुरू आपल्या लाभेवीण प्रीतीची जास्तीत जास्त उधळण करतात 
आणि 
सर्व सजीव व निर्जीव सृष्टीसाठी काय उत्तम द्यायचे हे ठरवतात.
 
या दिवशी 
आपण सदगुरू कडून जास्तीत जास्त स्पंदने मिळवू शकतो.

वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहेत.

१) वैशाख पौर्णिमा हि प्रबौद्धपौर्णिमा आहे.

२) वैशाख पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती विनायकाचा जन्मदिवस मानला जातो.

३) वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चोवीस तासात पूर्ण करतात असे मानले जाते... 

कारण 
भगवान वेदव्यास त्यादिवशी सूर्याच्याच रथात बसून असतात.....

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना एक उपासना दिली आहे. 
त्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांना प्रार्थना करूया की हे सद्गुरुराया श्रीअनिरुद्धा, 
तुझी प्रत्येक आज्ञा हाच आम्ही धर्म समजतो. 

म्हणून 
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भक्त कल्याणार्थ तू सांगितलेली उपासना आम्ही श्रद्धावान करू.....

यंदाची वैशाख पौर्णिमा 
सोमवार
दिनांक *१६/५/२०२२* रोजी आहे. 

सदगुरू बापूंनी ह्या दिवशी पुढीलप्रमाणे उपासना करण्यास सांगितले आहे. 

वैशाख पौर्णिमा उपासना

१) प्रथम चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल किंवा तलम वस्र घालावे. नंतर त्यावर आपल्या सदगुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा.

२) श्री सदगुरुंच्या फोटो प्रतिमेस सुंगधीत किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा तर श्री हनुमंताच्या फोटो प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.

३) दीप व अगरबत्ती लावून हात जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंतांचे ध्यान करावे. 

(सदगुरू तारक मंत्र 👉🏻
*ॐ मनः सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नम:*)

४) त्यानंतर 
    श्रीअनिरुद्ध कवच 
    श्रीहनुमान चालीसा 
    श्रीहनुमान स्तोत्र 
    श्रीसाईनाथांची ९ वचने 
    श्री अनिरुद्धांची ९ वचने 
    श्री आदिमाता शुभंकर स्तवन

             व 

श्रीआदिमाता अशुभनाशिनी
            स्तवन

यापैकी कोणतेही एक स्तोत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावे.

५) त्यानंतर
    (१) आंब्याचे पन्ह
    (२) कच्चा आंबा व भिजलेली
           चण्याची डाळ वाटून त्याचा
            प्रसाद अर्पण करावा. 
  
त्यानंतर लोटांगण घालावे.

हे दोन्ही पदार्थ मानवाला पिडणा-या षडरिपुंच्या गुणांपासून मुक्त आहेत.
 म्हणून 
त्यादिवशी तरी आपल्याला त्रासणारे काम, क्रोध, मोह, मद, मस्तर, लोभ या षडरिपुंपासून दूर राहण्यासाठी ही साधी व सोपी उपासना आपण आपल्या घरी बसून दिवसभरात कधीही करू शकतो.

जो कोणी प्रेमाने 
वैशाख पौर्णिमेला ही उपासना करील त्याच्या घरी ह्या दिवशी आपला सदगुरू हनुमंता बरोबर येऊन जातोच अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धांनी दिली आहे.....

*नाथसंविध्*
*हरि ॐ*
*श्रीराम*
 *अंबज्ञ*
*जय जगदंब जय दुर्गे*

No comments:

Post a Comment