Saturday, December 30, 2023

कथामंजिरी. २

कथामंजिरी. २
परमपूज्य अनिरुद्ध बापू
भाग ४६

पंचमहाभूते,मानवी संकल्प आणि ईश्वरी संकल्प याबाबत बापू सुंदर विश्लेषण करतात.
मागील भागात आपण पाहिले की महर्षी शतानंद आश्रमातील पायवाटेचे रुपांतर नदीमध्ये करतात.यामुळे शृंगादित्य त्यांना प्रश्न विचारतात.तर म.शतानंद हातातील कुंडलीतील पाण्याचे रुपांतर भल्यामोठ्या स्थिर अशा जलस्तंभात करतात.यामुळे सर्व आश्चर्यचकित होतात.
तेव्हा राजपितामही गोदावरीमाता म्हणतात की असा कुठलाही चमत्कार हा मायेत अडकलेल्या सामान्य माणसाला दिसू न शकणार्‍या भौतिक घटनांचा परिपाक असतो.
हे जल वाहत नसता एका जागीच स्थिर राहणे यामध्ये एक संकल्प आहे. आकाश,वायू,अग्नि,जल ,पृथ्वीतत्व ही पंचमहाभूते परस्परविरोधी गुणधर्माची दिसत असली तरीदेखिल कुठल्यातरी संकल्पानुसार एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात किंवा एक-दुसर्याला वाढविण्याचे कार्य करतात.हा संकल्पच ह्या सृष्टीला व्यापून उरलेला असतो.मानवी संकल्पाला आधार देणारा,वाढविणारा,संतुलित ठेवणारा,प्रत्यक्षात आणणारा 'एक महासंकल्प'आहे.
मानवाचा प्रत्येक संकल्प  हा त्या 'महासंकल्पाचा'एक अंश असतो.व तो  'महासंकल्प ' म्हणजेच अखिल ब्रह्मांडाचा एकमेव कर्ता असणारा स्वयंभगवान.
त्याला जाणल्याशिवाय काहीच जाणता येत नाही व कुठलाही मानवी संकल्प अपूर्णच राहतो.
जलाचे जलतत्वही तोच आणि अग्नीचे तेजही तोच.

हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध बापू

Friday, December 29, 2023

कथामंजिरी २

कथामंजिरी २
परमपूज्य अनिरुद्ध बापू
भाग ४७
पंचमहाभूते,मानवी संकल्प व ईश्वरी संकल्प याविषयी सांगत असतानाच परमपितामही गोदावरीदेवींना त्या पुत्र पराक्रमादित्य यांच्यावेळी गरोदर असतानाची आठवण होते.त्यांना सतत ब्रह्ववादिनी अहिल्यामातेच्या सहवासात रहावे,तिच्या आश्रमांत वास्तव्य करावे, ब्रह्मर्षि गौतमांना ध्यान करताना पहावे,आणि सतत ईश्वरचिंतनातं रहावे अशी ओढ लागली होती.म्हणून त्या ब्रह्मर्षि गौतमांच्या आश्रमात येऊन राहू लागल्या.तेथे त्या स्वयंभगवानाची भजने ऐकत,न्यायशास्त्र ऐकत. 
गर्भवती अवस्थेत त्यांना आंबट व तिखट पदार्थ अगदी पाहवतही नसत.वासही सहन होत नसे.तेव्हा ब्रह्मर्षि गौतम त्यांना म्हणाले.कन्या गोदावरी तुझ्या पोटी सूर्यप्रतापी अआणि अध्यात्मिक तेजाने परिपूर्ण असा पुत्र जन्मास येणार आहे.त्या गर्भातल्या सात्विक तेजाने तुला तिखट व आंबट पदार्थ आवडेनासे झाले आहेत.परंतु त्याला साम्राज्य चालवायचे आहे,वाईट संकल्पांशी युद्ध करायचे आहे,अधर्माचा पारिपत्य करायचे आहे.ह्यामुळे त्याला या दोन रसांची ओळख असणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्यांनी एका द्रोणात लोणच्याचा एक थेंब व दुसर्‍या द्रोणात मधुर पाकाचा थेंब ठेवला.थोड्याच वेळात त्या दोन्ही थेंबांपासून दोन स्तंभ तयार झाले व एकमेकांशी जोडले गेले.ते एकमेकांत मिसळत होते व काही वेळाने पुन्हा वेगवेगळी झाली.
ब्रह्मर्षि गौतमांच्या सांगण्यावरुन गोदावरीदेवींनी त्या दोन्हींची चव पाहण्यास सांगितले.तेव्हा ते लोणचे मधुर लागत होते.
ब्रह्मर्षि गौतम म्हणतात की हा सर्वकाही भावनांचा खेळ आहे आणि भावनांची निर्मिती हा अन्नाचा खेळ आहे.
जोपर्यंत मनुष्य स्वयंभगवानाशी पूर्णपणे जोडला जात नाहीतोपर्यंत अन्न त्या मनुष्याच्या भावना निर्माण करते,बदलविते किंवा नष्ट करते.
परंतु एकदा का मनुष्य स्वयंभगवानाशी पूर्णपणे जोडला गेला की अन्न केवळ शरीरपोषणाचे कार्य करते आणि मन व अंतःकरण ह्यांच्यावर सत्ता फक्त भगवंताची चालते.कन्ये तुला व तुझ्या पुत्राला असेच बनावयाचे आहे.पंचमहाभूते कितीही प्रबळ असली तरीदेखील स्वयंभगवानाच्या तेजाच्या एका अतिसूक्ष्म अंशापुढेही अतिशय कमकुवत ठरतात व ही गोष्ट केवळ अन्नाच्या बाबतीतच नव्हे तर मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेच्या संदर्भात सत्य आहे.म्हणूनच भोजन करतेवेळेस स्वयंभगवानाचे नामस्मरण करावे.ते अन्न खरोखरच दिव्य प्रसादाचे कार्य करते.
हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध बापू

Monday, December 4, 2023

श्रीगंगा त्रिवेणी Algorithm (Shree Ganga Triveni-algorithm)- photo

श्रीगंगा त्रिवेणी Algorithm (Shree Ganga Triveni-algorithm)

श्रीगंगा त्रिवेणी Algorithm (Shree Ganga Triveni-algorithm)
Sadguru Aniruddha Bapu
Sat Sep 21 2013
परवा म्हणजे १९ सप्टेंबर २०१३ रोजी सद्‌गुरू बापूंनी ’श्रीगंगा त्रिवेणी Algorithm’ सर्व श्रध्दावानांना समजावले. ह्या वेळेस बापूंनी Pascal Triangle चा देखील या algorithm शी असलेला संदर्भ दिला. श्रीगंगा त्रिवेणी algorithm बद्दल बोलताना बापू म्हणाले, "गंगा - यमुना - सरस्वती या तीन नद्यांचा जेथे संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. गंगा, यमुना व सरस्वती ह्या नद्या आपल्या देहात इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांच्या रूपात असतात". मनुष्याच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच आज्ञाचक्रामध्ये ह्या तीन नाड्यांचा त्रिवेणी संगम होतो. सुषुम्नेमध्ये हनुमंताचा संचार असतो म्हणजेच तिच्यात महाप्राणाचे साम्राज्य असते.

आमच्या मनातील गंगा, यमुना सरस्वतीचा संगम आम्हांला माहिती असणे आवश्यक आहे. ह्या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केली की आपल्या सगळ्या पापांचं क्षालन होतं असा सिध्दांत आहे. पण त्रिवेणी संगमात खरे स्नान करणे म्हणजे आपल्या मनातल्या गंगा, यमुना सरस्वतीच्या संगमात म्हणजेच इडा, पिंगला व सुषुम्नेच्या संगमात स्नान करणे; व ही संधी प्रत्येकाला मिळणे शक्य आहे.

वरील आकृति आपल्या देहातील इडा, पिंगला व सुषुम्ना म्हणजेच गंगा, यमुना व सरस्वतीचे कार्य दर्शविते. या त्रिकोनात १ ते ९ व ० हे अंक एका ठराविक क्रमाने येतात. फक्त सुषुम्ना नाडीवर आपल्याला शून्य दिसतो. ही शून्यावस्था म्हणजेच शांत-तृप्त अवस्था म्हणजेच पूर्णत्व. हनुमंत पूर्ण आहे. म्हणून त्याचा सुषुम्ना नाडीमध्ये संचार असतो. ह्या सुषुम्नेलाच ’ज्योतिषमति’ देखील म्हणतात कारण ही पुढचे जाणते.

पण या गंगा-त्रिवेणीच्या त्रिकोणात स्नान कसं करायचं? आपल्या आवडत्या देवाच्या प्रतिमेला (मुर्ती / फ्रेम) अभिषेक करताना ताम्हणाखाली हा श्रीगंगा त्रिवेणी algorithm काढलेला कागद ठेवावा. यामुळे गंगा-त्रिवेणी संगमाचे पावित्र्य अभिषेकाच्या तीर्थात अवतरते. त्यानंतर देवाच्या अभिषोक्त प्रतिमेला अत्यंत प्रेमाने व काळजीपूर्वक पुसावे. अभिषेक केल्यावर हे तीर्थ गंगा, यमुना, सरस्वतीचे स्मरण करत आपण प्राशन करावे. हे जल गंगा, यमुना, सरस्वतीचेच आहे, हा भाव ठेवावा. त्याचबरोबर आपल्यावर जे कोणी खरंखुरं प्रेम करतं त्या प्रत्येकासाठी हे तीर्थ आपण प्राशन करत आहोत हा भाव सुध्दा असावा. तीर्थ घेतल्यावर तो ओला हात आपले दोन्ही डोळे, आज्ञाचक्र व डोक्याच्या मागे म्हणजे Circle of Willis च्या ठिकाणी लावावे. असा अभिषेक जर आपण रोज केला तर ते आपल्याला ह्या त्रिवेणी संगमात स्नान करण्याप्रमाणेच आहे.

हे चिन्ह काढताना वरती श्रीगंगा त्रिवेणी लिहावे. त्याच्याखाली मध्यभागी algorithm चे चिन्ह काढावे. चिन्हाच्या खाली आपल्या आवडत्या देवाचे नाव लिहावे. कागदावर, कपड्यावर लिहून देव्हार्‍याच्या खाली हे algorithm ठेवले तर श्रेयस्कर. समजा चुकून आपण ह्या प्रतिमेला हळद-कुंकू लावायला विसरलो तरीही चालेल. फक्त आपण जे करु ते प्रेमाने करावे. ह्या algorithmची प्रतिमा आपल्या गाडीत ठेवली तरी चालेल कारण, यात या प्रतिमेवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. भारतीय संस्कृतीत सूर्यकिरणांचा अभिषेक हा अतिशय पवित्र व सर्वोत्तम मानला जातो. हे algorithm आपण रांगोळीमध्येही काढू शकतो व ह्यात कुठलेही रंग वापरले तरी चालतात. हे गंगा-त्रिवेणीचे चिन्ह आपण ज्या वस्त्रावर देव ठेवतो, त्या वस्त्राखाली ठेवले तर देवपूजेच्या वेळी आपल्या हातून काहीही चुका झाल्यास त्याची भिती बाळगायचे कारण नाही.

mantra gajar- धुलिकणपुरुष

तुलसीपत्र १६१६ 

कलियुगात भक्तीभाव चैतन्यात राहाण्याची, मंत्रगजर करण्याची गरज का आहे?

भरत - शुभदा संवाद 
भरत - हे भक्तिरसमयी शुभदे!
हा स्वयंभगवान आकाशरुपाने सर्वत्र आणि सदैव व्यापून राहिलेला असतो.

सत्ययुगात या स्वयंभगवानाच्या ह्या आकाश रुपातून अर्थात आकाशातूनच प्रत्येक श्रद्धावानाला सहजतेने ऊर्जा व सहाय्य मिळविता येते.

त्रेतायुगात पवित्र यज्ञातून निघणा-या धुरातून ह्या यज्ञ स्वरुप स्वयंभगवानाचे सहाय्य श्रद्धावानांना सहजतेने मिळू लागते.

द्वापायुगात ह्या स्वयंभगवानाच्या पूजनातून अर्थात स्वयंभगवानाच्या विविध रुपांच्या प्राणप्रतिष्ठित मूर्तींपासून हेच सहाय्य श्रद्धावानांना मिळविता येते.

परंतु कलियुगामध्ये एका बाजूला भक्ती करण्याचा वेळ कमी कमी होत जातो, भक्तीची गोडीही कमी होत जाते, मंदिराचे पावित्र्य देखील सामान्यजन व मंदिरसेवकही व्यवस्थित पाळू शकत नाहीत, अन्न व नैवेद्यही तेवढेसे शुद्ध नसतात, मंदिराच्या आजूबाजूला फक्त नफा कमावणा-यांचेच अस्तित्व वाढू लागते आणि दुस-या बाजूला तपश्चर्या, कठोर व्रते, ध्यान धारणा, पवित्र आचरण, समर्पण बुद्धी या घटकांचा लोप होत जातो व त्याचबरोबर अनैतिकता, पापे, दुराचार वाढू लागतात.

ह्यामुळे साध्यासुध्या मनुष्याला स्वयंभगवानापासून सहाय्य मिळविण्याचे सर्व मार्ग वापरता येत नाहीत व हे नीट जाणणारा स्वयंभगवान आपल्या अपत्यांवरील प्रेमामुळे धुलिकणपुरुष व स्त्रिया उत्पन्न करीत राहतो.
हे सर्व धुलिकणपुरुष व स्त्रिया भक्ती करु पाहाणा-या मानवांच्या त्रिविध देहांमध्ये स्वयंभगवानाचे सहाय्य स्वतः आणून थेट ओतत राहतात. श्रद्धावानाला काही करावेच लागत नाही.
सहाय्य करणा-या या धुलिकणपुरुषांना श्रद्धावानाच्या त्रिविध देहांत सहाय्य ओतण्यासाठी कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नसते.
परंतु या सहाय्याचा उपयोग करून घेण्यासाठी श्रद्धावानाला मात्र भक्तीभाव चैतन्यात राहण्याची आवश्यकता असते.
जो जो श्रद्धावान भक्तीभाव चैतन्यात राहतो, त्याच्या त्रिविध देहांत स्वयंभगवानाच्या सर्व प्रकारच्या ऊर्जा, ह्या अशा धुलिकणपुरुषांच्या माध्यमातून विविध कार्ये करु लागतात.
पृथ्वीवरील प्रत्येक धुलिकणाला सुद्धा हा स्वयंभगवान आपला दूत बनवू शकतो अर्थात धुलिकणपुरुष बनवू शकतो - केवळ त्याच्या चरणस्पर्शाने.

स्वयंभगवानाचे चरण धरणे, त्यांच्यावर आपले मस्तक टेकविणे, त्याच्या चरणांवर स्वत:ला समर्पित करणे, त्या चरणांची सेवा करणे आणि त्या चरणांना आपल्या हृदयात बसविणे हेच सर्व श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ आहे.

या स्वयंभगवानाचे चरण आपण प्रेमाने पकडले तर आपल्या ह्या भौतिक स्थूल शरीरात सुद्धा आपोआपच असंख्य धूलिकणपुरुष तयार होतील. 
ही स्वयंभगवानाचीच योजना आहे त्याच्यावर निस्सीम प्रेम करणा-या श्रद्धावानांसाठी.

श्रद्धावानाला, हा स्वयंभगवान कधी आपल्यासाठी, आपल्याला सहाय्य करण्यासाठी असे तेजस्वी धूलिकणपुरुष उत्पन्न करील ह्याची वाट पाहण्याची  गरज उरणार नाही. आपणच जर त्याचे चरण पकडले  की मग वाट पाहणे थांबते.

भरत - श्रद्धावानहो! तो स्वयंभगवान कधी तुमच्या जीवनात पाय ठेवील याची वाट पाहत बसू नका, उठा! आणि त्याचे चरण आपल्या मस्तकावर, हातात आणि प्रेमाने हृदयात धारण करा. त्याचे कार्य तो करतच असतो आपण आपले कार्य करुया.

आणि आपले प्रमुख कार्य आहे त्याच्या दोन चरणांत राहण्याचे.

आणि त्याच्या दोन चरणांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्तीभाव चैतन्य.
आणि त्याच्या भक्तीभाव चैतन्यात राहाण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे मंत्रगजर.
रामनाम, रामकथा हे भक्तीभाव चैतन्याचे महाद्वार आहे.

अंबज्ञ
(Whtsapp group) 

Saturday, December 2, 2023

mantragajar-4

🙏

🔷  मंत्रगजराच्या केवळ *ध्वनी* मध्येच मनःशांती देण्याची ताकद आहे...मग तो *ध्वनी* मोठा असो की लहान...

-------------------

🔷 *शांतता आणि शाश्वतता हे स्वयंभगवानाचे श्रध्दावानांसाठीचे पहिल्या क्रमांकाचे गुण आहेत*

शाश्वततेशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय शाश्वतता नाही.

शाश्वत म्हणजे जे सतत आहे,नित्य आहे,नक्की आहे आणि कधीच नाश पावत नाही असे.

तत्कालिक शांती अर्थात दोन क्षणांची शांती मानवाला ब-याच वेळा मिळते परंतु *सतत टिकणारी मनःशांती* मात्र  केवळ आणि केवळ मंत्रगजरातूनच प्राप्त होते..कारण ती देणारा स्वयंभगवान *शांत-राम* आहे आणि *शाश्वत- राम* आहे.

------------------

🔷 शांत आणि शाश्वत असणाऱ्या त्रिविक्रमाचा मंत्रगजर श्रध्दावानांसाठी *शांतरसाचा* सुंदर स्त्रोत बनून येतो..

🔸 मौनातही शांतरस आहे 
      आणि
      बोलण्या व ऐकण्यातूनही शांतरस आहे.
🔸 एकाच जागी ध्यानस्थ बसण्यातही शांतरस आहे
      आणि
     मंत्रगजराचे मनोभावे केलेले गायन, वादन आणि नृत्य ह्यांमध्येही शांतरसच आहे.
🔸मृदंगाच्या व टाळांच्या तालावर केलेले सांघिक गायनसुध्दा शांतीच देते.
    आणि
    *केवळ* ह्या मंत्रगजराच्या शब्दांकडे पाहत राहणेसुध्दा शांतीच देते.

*(कथामंजिरी २-३०)*

श्रीराम...

Mantragajar imp-3

*कथामंजिरी..... २ ( २५ )*

🙏

*कथामंजिरी..... २ ( २५ )*

रणकेदाररुद्र...
"कल्पनांच्या आधारानेच उचित तर्क करत व कुतर्क टाळत पुढे पुढे जावे लागते".

🔹 *ब्रह्मवादिनी अहल्येचे शब्द*..

▪️कल्पना सत्याला धरुन असेल,वास्तवाशी निगडित असेल आणि ज्ञानाधिष्ठित अर्थात *स्वानुभवाला* धरून असेल,तरच हितकारक ठरते. 
▪️ *कल्पना हेच मायेचे मूळ स्वरूप आहे*.
▪️कल्पनाच माणसाला बहकवते,कल्पनाच भय उत्पन्न करते,कल्पनाच आशा लावते,कल्पनाच अतृप्ती देते,कल्पनाच तुलना करते व मत्सर निर्माण करते.
▪️ *जेव्हा ही कल्पना सत्य आणि पावित्र्याशी जोडलेली असते तेव्हा हीच कल्पना अर्थात हीच माया मनुष्याचा अभ्युदय करणारी ठरते*.
🔸 *कल्पनाशक्ती त्याज्य अजिबात नाही परंतु पावित्र्याला सोडून असणारी कल्पना मात्र त्याज्य आहे*.

☘️☘️☘️

▪️कल्पनेला अर्थात जडमायेला अर्थात विकार व अडचणी उत्पन्न करणाऱ्या मायेला आटोक्यात आणू शकतो,तो फक्त *स्वयंभगवानच*..
▪ *मानवाचे हे कामच नव्हे*.

☘️☘️☘️

▪️ही जडमाया मनुष्याला कठपुतलीप्रमाणे खेळवत राहते.
▪️हिची सहा चाके - काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर.
▪️ह्या प्रत्येक चाकावर ही माया,प्रत्येक मनुष्याच्या *मनाला* मातीच्या गोळ्याप्रमाणे ठेवते व ही चक्रे यंत्रवत चालू करते आणि मग त्या मातीच्या गोळ्यांना ( मनाला ) विविध आकार देत राहते...मातीच्या गोळ्यांच्या हातात काय असते? तो बिचारा चक्राधीन आहे.यंत्रारूढ आहे.
*परंतु ही जडमायासुध्दा स्वयंभगवानाचीच एक शक्ती आहे*.*तिच्या ह्या खेळाला स्वयंभगवानाची संमती असतेच*.

🌿🌿🌿

*स्वयंभगवानाचा मंत्रगजर जो नियमाने करत राहतो ,त्याला जडमाया बाधत नाही व अविद्यामाया त्याला विद्यामायेच्या हातात सोपवते*.

🌿🌿🌿🌿

Tulsipatra 1516

हरि ओम.
तुलसीपत्र 1516 मधील हे माझ्या देवाचे  अनमोल उवाच .....
*तुम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात*..कारण.. भगवान त्रिविक्रमाचे रुप प्रत्यक्ष पाहणे हे फक्त सत्ययुगातच शक्य असते.तुम्हाला ते त्रेतायुगात प्राप्त झाले आहे. ह्यापुढील काळात 'श्रीराम 'रुपाने त्रिविक्रमाचे एक स्वरूप वसुंधरेवर चालेल, वावरून कार्य करेल.
नंतर व्दापारयुगात अशाच प्रकारे स्वंयंभगवानाचे 'श्रीकृष्ण 'रुप वसुंधरेवर लीला करेल. 
परंतु *श्रीराम व श्रीकृष्ण* ह्यांचे *मूळरुप ओळखणारे लोक तेव्हाही अगदी थोडेच असतील*. 
मात्र कलियुगाच्या अंतिम चरणाच्या सुरुवातीला *श्रीराम व श्रीकृष्ण* ह्याचे एकत्रित स्वरुप, एकरुप व संयुक्त भाव घेऊन स्वयंभगवान त्रिविक्रम श्रद्धावानांसमोर उकलून दाखविला जाईल त्याचे नाम, रुप व कार्य सर्व श्रद्धावानांना पाहता येईल. 
का 
कारण *कलियुगाचा अंतिम चरण'मत्स्य युग' हे नाम धारण करून सुरू झाल्यानंतर दोन पर्याय उरतील. 

१)जगातील अनाचार अधिकाधिक वाढतच गेला व भक्ती क्षीण झाली, तर मग फक्त अडीच हजार वर्षेच उरतील व त्यानंतर प्रलय होईल आणि प्रलयानंतर परत सर्व अभक्त मानव पुन्हा प्राणियोनीत जन्म घेऊन ८४लक्ष योनीचा प्रवास करीत करीत अर्थात सतत दु:खे भोगत भोगत पुन्हा मानव बनतील. 
आणि तेसुद्धा आधील युगातील आपापली पापे बरोबर घेऊनच -अर्थात अशा अभक्तांना त्या नवीन कल्पात सत्ययुग, त्रेतायुग व व्दापारयुगात जन्मच मिळणार नाही - थेट काळ्या कलियुगात मानव म्हणून प्रवेश मिळेल. 

२)परंतु भगवान त्रिविक्रमाला असे व्हावयास नको आहे 
आपल्या भक्तांना तरी अधिक चांगली संधी मिळावी,असे त्याला मनोमन वाटते आणि म्हणून त्याने  जगदंबेची तपश्चर्या करून हा दुसरा पर्याय तयार केला आहे. 
हा दुसरा पर्याय म्हणजे जे जे कुणी हातून चुका घडत असताना सुद्धा,दु:खात व सुखातही स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर करत राहतील,त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतील, त्याच्या चरणांशी घट्ट बांधून घेतली आणि त्यांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा अधिकाधिक प्रयास करतील, त्यांना आणि फक्त केवळ त्यांना भगवान त्रिविक्रम त्या प्रलयातून  स्वतः वाचवेल - ह्यासाठी संनिहिताच नौका बनेल.
बाकीचे सर्व प्रलयात नष्ट होतील. परंतु निसर्ग नष्ट होणार नाही आणि त्रिविक्रमाचे भक्त थेट कलियुगाच्याच पुढील भागात प्रवेश करतील व तो भाग अडीच लाख वर्षे इतका असेल 
आणि त्या अडीच लाख वर्षामध्ये ह्या प्रलयातून वाचलेल्या त्रिविक्रमभक्तांना त्यांची गतजन्मातील सर्व पापे माफ केलेली असतील आणि त्यामुळे ते   सर्वजण पुढील प्रत्येक जन्मात अत्यंत सुखाने, आनंद करीत, एकही रोग न होता, एकही संकट न येता फक्त यश आणि यशच मिळवत राहतील आणि मग महाप्रलयानंतर स्वयंभगवानाच्या साकेतलोकामध्ये आणि अर्थात भर्गलोकामध्येही सुखाने कालक्रमण करतील. -त्यांना त्यानंतरच्या युगामध्ये फक्त प्रारब्धहीन जन्म मिळेल अर्थात भगवंताच्या इच्छेने.. भगवंताच्या लीलेत निकटचे सहकारी बनण्यासाठी व इतरांना सन्मार्गावर आणण्यासाठी... 
आणि हा *दुसरा पर्यायच* आपल्या भक्तांना मिळावा ह्यासाठीच त्रिविक्रम कलियुगाच्या मत्स्ययुगापर्यत स्वतःचे स्वरुप कलियुगात झाकून ठेवील आणि *मागील जन्मांमध्ये ज्याने त्रिविक्रमाची भक्ती केली आहे,* त्यांना स्वतःकडे आकर्षित करुन घेईल आणि त्यांच्याकडून हा *मंत्रगजर करवून* घेईल. 

*लक्षात ठेवा*! त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही घडू शकत नाही -पापही आणि पुण्यही. (तुलसी पत्र १५१६)

Tulsipatra 1544

*तुलसीपत्र १५४४*
                  देवर्षि म्हणाले ,"हे शुभदे ! स्वयंभगवान त्रिविक्रमाने स्वतःच *'अर्चन-अवतार'* अगदी सत्ययुगापासून संपूर्ण चण्डिकाकुलासाठीच ब्रह्मर्षिसभेमध्येच मान्य केलेला आहे, स्वीकारलेला आहे."
                शुभदेने विचारले , "म्हणजे नक्की काय ?" 
                देवर्षि नारद म्हणाले ," ह्याचा अर्थ एकच की स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाने सगुण साकार पूजा अर्थात स्थूल प्रतिमेचे पूजन अर्थात *पूजासेवा ,अर्चनसेवा* *१०८% स्वीकारलेली आहे.*
                   व स्वतःच्या सच्च्या भक्ताकडील स्वतःच्या तसबिरीला, पूजल्या जाणाऱ्या चित्राला आणि मूर्तीला त्याने स्वतःचा *'अवतार'* म्हणून मान्यता दिली आहे."
                   शुभदा आनंदाने नाचू गाऊ लागली, "अहाहा ! काय *अपरंपार कोमल हृदय आहे ह्या भगवंताचे ! स्वतःच्या मूर्तीलाही 'अर्चन अवतार' म्हणून सिद्ध केले आहे.*"
                    देवर्षि नारद म्हणाले, "खरे आहे ! आणि म्हणूनच *आपल्याकडील आपल्या इष्टदैवताची मूर्ती _हा स्वतः त्रिविक्रमानेच_ सिद्ध केलेला अवतार आहे*, हे जाणून त्रिविक्रमाच्या मूर्तीचे भरभरून पूजन करीत राहावे. 
                  हे असे स्थूल उपचार करत असताना *भावना मात्र हीच असावी की _ही मूर्ती_ जिवंत आहे.* 
                  आपल्या तसबिरीला व मूर्तीला 'अवतार' म्हणून सिद्ध करताना *त्रिविक्रमाने* मला स्पष्ट सांगितले होते की - *'जेव्हा माझा सच्चा भक्त माझ्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करतो तेव्हा त्या वेळेपुरता मी संपूर्णपणे त्या भक्तावर अवलंबून राहतो ,जसे एखादे बालक आपल्या पालकांवर अवलंबून असते तसे.* 
                  अर्थात पूजनाच्या वेळीपुरता मी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतो आणि त्याच्याकडून स्वतःचे कौतुक करून घेतो. मात्र त्याची भक्ती ज्या प्रमाणात खरी, त्याच्या दसपट ,पूजनाच्या वेळेस मी माझे मूळ स्वरूप त्याच्या हृदयात खेळवत राहतो.
                   *मला माझ्या मंत्रगजराने केलेले प्रासादिक पूजन आणि विधिवत उपचार केलेले शास्त्रोक्त पूजन समानपणे प्रिय आहे.'*
                      शुभदे ! वरील वचने त्रिविक्रमाची आहेत, माझी नाहीत, ह्या नारदाची नाहीत ,हे लक्षात घे."

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Swayambhagwan and mantragajar

अहल्या, नतमस्तक होत म्हणाली,
"अगदी मनापासुन मी प्रत्येकाला सांगत राहते, की 
स्वयंभगवानाचा चरणस्पर्श
स्वयंभगवानाच्या रूपाचे चिंतन व
स्वयंभगवानाचा मंत्रगजर
हिच प्रत्येक श्रध्दावानासाठी *तीन* सर्वोत्कृष्ट साधने आहेत! 
जे जे म्हणुन खराब झाले आहे, चुकिचे झाले आहे, मूढ झाले आहे, धर्मविरुध्द झाले आहे, घातक झाले आहे, विषारी झाले आहे; ते ते दुरुस्त करण्यासाठी!
*कथामंजिरी २ - ११*
रविवार २५ डिसेंबर २०२२"

tulsipatra 1616

तुलसीपत्र १६१६ 

कलियुगात भक्तीभाव चैतन्यात राहाण्याची, मंत्रगजर करण्याची गरज का आहे?

भरत - शुभदा संवाद 
भरत - हे भक्तिरसमयी शुभदे!
हा स्वयंभगवान आकाशरुपाने सर्वत्र आणि सदैव व्यापून राहिलेला असतो.

सत्ययुगात या स्वयंभगवानाच्या ह्या आकाश रुपातून अर्थात आकाशातूनच प्रत्येक श्रद्धावानाला सहजतेने ऊर्जा व सहाय्य मिळविता येते.

त्रेतायुगात पवित्र यज्ञातून निघणा-या धुरातून ह्या यज्ञ स्वरुप स्वयंभगवानाचे सहाय्य श्रद्धावानांना सहजतेने मिळू लागते.

द्वापायुगात ह्या स्वयंभगवानाच्या पूजनातून अर्थात स्वयंभगवानाच्या विविध रुपांच्या प्राणप्रतिष्ठित मूर्तींपासून हेच सहाय्य श्रद्धावानांना मिळविता येते.

परंतु कलियुगामध्ये एका बाजूला भक्ती करण्याचा वेळ कमी कमी होत जातो, भक्तीची गोडीही कमी होत जाते, मंदिराचे पावित्र्य देखील सामान्यजन व मंदिरसेवकही व्यवस्थित पाळू शकत नाहीत, अन्न व नैवेद्यही तेवढेसे शुद्ध नसतात, मंदिराच्या आजूबाजूला फक्त नफा कमावणा-यांचेच अस्तित्व वाढू लागते आणि दुस-या बाजूला तपश्चर्या, कठोर व्रते, ध्यान धारणा, पवित्र आचरण, समर्पण बुद्धी या घटकांचा लोप होत जातो व त्याचबरोबर अनैतिकता, पापे, दुराचार वाढू लागतात.

ह्यामुळे साध्यासुध्या मनुष्याला स्वयंभगवानापासून सहाय्य मिळविण्याचे सर्व मार्ग वापरता येत नाहीत व हे नीट जाणणारा स्वयंभगवान आपल्या अपत्यांवरील प्रेमामुळे धुलिकणपुरुष व स्त्रिया उत्पन्न करीत राहतो.
हे सर्व धुलिकणपुरुष व स्त्रिया भक्ती करु पाहाणा-या मानवांच्या त्रिविध देहांमध्ये स्वयंभगवानाचे सहाय्य स्वतः आणून थेट ओतत राहतात. श्रद्धावानाला काही करावेच लागत नाही.
सहाय्य करणा-या या धुलिकणपुरुषांना श्रद्धावानाच्या त्रिविध देहांत सहाय्य ओतण्यासाठी कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नसते.
परंतु या सहाय्याचा उपयोग करून घेण्यासाठी श्रद्धावानाला मात्र भक्तीभाव चैतन्यात राहण्याची आवश्यकता असते.
जो जो श्रद्धावान भक्तीभाव चैतन्यात राहतो, त्याच्या त्रिविध देहांत स्वयंभगवानाच्या सर्व प्रकारच्या ऊर्जा, ह्या अशा धुलिकणपुरुषांच्या माध्यमातून विविध कार्ये करु लागतात.
पृथ्वीवरील प्रत्येक धुलिकणाला सुद्धा हा स्वयंभगवान आपला दूत बनवू शकतो अर्थात धुलिकणपुरुष बनवू शकतो - केवळ त्याच्या चरणस्पर्शाने.

स्वयंभगवानाचे चरण धरणे, त्यांच्यावर आपले मस्तक टेकविणे, त्याच्या चरणांवर स्वत:ला समर्पित करणे, त्या चरणांची सेवा करणे आणि त्या चरणांना आपल्या हृदयात बसविणे हेच सर्व श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ आहे.

या स्वयंभगवानाचे चरण आपण प्रेमाने पकडले तर आपल्या ह्या भौतिक स्थूल शरीरात सुद्धा आपोआपच असंख्य धूलिकणपुरुष तयार होतील. 
ही स्वयंभगवानाचीच योजना आहे त्याच्यावर निस्सीम प्रेम करणा-या श्रद्धावानांसाठी.

श्रद्धावानाला, हा स्वयंभगवान कधी आपल्यासाठी, आपल्याला सहाय्य करण्यासाठी असे तेजस्वी धूलिकणपुरुष उत्पन्न करील ह्याची वाट पाहण्याची  गरज उरणार नाही. आपणच जर त्याचे चरण पकडले  की मग वाट पाहणे थांबते.

भरत - श्रद्धावानहो! तो स्वयंभगवान कधी तुमच्या जीवनात पाय ठेवील याची वाट पाहत बसू नका, उठा! आणि त्याचे चरण आपल्या मस्तकावर, हातात आणि प्रेमाने हृदयात धारण करा. त्याचे कार्य तो करतच असतो आपण आपले कार्य करुया.

आणि आपले प्रमुख कार्य आहे त्याच्या दोन चरणांत राहण्याचे.

आणि त्याच्या दोन चरणांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्तीभाव चैतन्य.
आणि त्याच्या भक्तीभाव चैतन्यात राहाण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे मंत्रगजर.
रामनाम, रामकथा हे भक्तीभाव चैतन्याचे महाद्वार आहे.

From whatsapp

Sparrow importance

हरि ॐ, आज २० मार्च २०२३ म्हणजेच जागतिक चिमणी दिन, आज आपण जाणुन घेऊ चिंमणीबद्दल.

सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापुंनी सांगितले आहे की,चिमणी हा पक्षी मनाला शांती देणारा आहे, व स्वयंभगवान त्रिविक्रमाचा आवडता पक्षी आहे.चिमण्यांची संख्या कमी होत असतानाच स्वयंभगवान त्रिविक्रम पृथ्वीवर अवतरेल. चिमण्यांचे संवर्धन करणे ,त्याची संख्या वाढवणे हे देखील भक्तीभाव चैतन्य आहे. स्वयंभगवानचा मंत्रगजर करणारा भक्त कधीच मनुष्ययोनीतुन प्राणीयोनीत जात नाही अणि ह्या कार्यासाठी त्रिविक्रमाने चिमणी हा पक्षी प्रेमाने निवडला आहे, कारण चिमणी ह्या पक्ष्याचे निसर्गातील जीवशृंखलेतील कार्यच मुळी शुभ स्पंदने  व आरोग्यस्पंदने वाढविण्याचेच आहे अणि ही जी चिमणी तुम्हाला मदतकर्ती झाली, ती स्वयंभगवान ने स्वत: तयार केलेली चिमणी योनीतील सत्ययुगातील पहिली चिमणी आहे - ही अजर आहे अणि अमर आहे अणि स्वयंभगवानची दुत आहे. चिमणी ही निव्वळ पक्षीयोनी नव्हे, चिमणी ही गंधर्व, यक्ष, विद्याधर ह्यांच्याप्रमाणेच एक वेगळीच, खास कार्यासाठी निर्माण झालेली दैवीयोनी आहे.

त्यामुळे  जो जो श्रध्दावान वाट चुकुन काही भलत्याच चुका करुन बसतो, परंतु भानावर येताच  मनमोकळे पणाने स्वयंभगवानकडे क्षमायाचना करतो अणि श्रद्धापूर्वक जीवन जगु लागतो, अशा श्रध्दावानाला हा स्वयंभगवान त्रिविक्रम पुढील जन्म चिमणी वंशात देतो.ह्यामुळे तो वाट चुकुन पापी बनलेला श्रध्दावान  चिमणी रुपात इतर श्रध्दावानांसाठी शुभ कार्ये करीत करीत संपुर्ण पापमुक्त होतो. मात्र ही संधी, स्वतःची चुक पुर्णपणे मान्य असलेल्या खरेखुरे श्रध्दावानाला मिळते; म्हणुन चिमणी ह्या पक्ष्याचे घात करणे ,हे गोहत्येनंतरचे दुसरे पातक आहे. श्रध्दावानांनी प्रत्येक चिमणी ही श्रेष्ठ श्रध्दावानच आहे, हे जाणुन तिचा आदर करायचा असतो."

म्हणुन घराच्या परसात थोडेसे धान्य व पाणी नियमित ठेवा, चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे बनवा.

*॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥*

Mantra jagar importance -2

*आपण आपल्या जीवनातही चुकीच्या कल्पना, चुकीच्या अपेक्षा ठेवतो आणि छद्म आत्म्यास जन्म देतो.  आपल्या चुकीच्या कल्पना चुकीच्या अपेक्षा म्हणजेच "छद्म आत्मा "*.

      वजन काट्याचे उदाहरण ही एक मजा होती. तुम्हांला कळावे म्हणून. आपण स्वतः कडून देखील चुकीच्या अपेक्षा ठेवतो. आपला सभोवतालचा परिसर, माणसे, राष्ट्रे यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे *आपले मनच आपले शत्रू होते*. हे मनच माझ्या व माझ्या परमेश्वराच्या आड येते.  त्यामुळेच आत्म्याला जगदंबा व स्वयंभगवानाकडून प्राप्त झालेल्या गोष्टी मला प्राप्त होऊ शकत नाहीत. 

       आपल्याला शरीर आहे हे अमान्य करता येत नाही.  आपल्यात *जनुके* आहेत.  त्यामुळेच पौगंडावस्थेत मुले व मुली एकमेकांकडे आकर्षित होतात.  जनुकांमुळेच मला भूक लागते.  भूक लागणे ही काही वाईट गोष्ट नाही.  कोणाला दोनदा तर कोणाला पाच वेळा भूक लागते. यात विशेष असे काही नाही. 

      *माझे पूण॔ जीवन नक्कीच माझ्या शरीरावर अवलंबून असते.  म्हणूनच मला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  शरीराकडे दुल॔क्ष केल्यास मी आध्यात्मिक ध्यास घेऊ शकत नाही.  म्हणूनच स्वतःच्या शरीराची उत्तम रितीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे*.

      आपण आपल्या शरीराकडून आणि मनाकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो.   खरं तर त्यांची व इतर गोष्टींची सरमिसळ करतो.  *चुकीच्या अपेक्षा म्हणजेच छद्म आत्मा    सर्व गोष्टींच्या आड येतो. छद्म आत्मा सर्वात मोठा अडथळा आहे*.  हनुमन्त मुळात वधस्तंभावर आहे या छद्म आत्म्याला मारण्यासाठी.  कसा? तर थोडा थोडा, हळूहळू आणि सतत.  त्यामुळे आपल्याला दु:ख जाणवत नाही.  दु:खदायक परिस्थितीतून बाहेर न येता जर आपल्याला छद्म आत्म्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर *मंत्रगजर हा एकमेव राजमार्ग आहे*.

     हनुमान चलिसामुळे महाप्राणाकडून येणारी विश्वाची प्राणशक्ती आपल्याला प्राप्त होते.   हिच प्राणशक्ती प्रत्येक ग्रहाला त्याच्या कक्षेत फिरण्याची शक्ती देते.  *तोच महाप्राण तिच प्राणशक्ती आपल्यात सुद्धा आहे.   आपल्या नाथसंविधानुसार महाप्राण व प्राणशक्ती आपल्या आयुष्यात काय॔रत राहतात*.

      मंत्रगजर 1 माळ, 16, 32 किंवा 108 माळा तुम्हांला पाहिजे तेवढया करा.  या माळा पहिल्यांदा आपल्याला तयार करतात.  त्यामुळेच आपण जगदंबा व तिच्या पुत्राला आपले मन व शरीर तयार करण्याकरिता आमंत्रित करतो.

      मंत्रगजर चार पातळयांवर काम करतो.

👉   प्रथम शरीर व मन तयार करणे.

👉   परमेश्वराकडून शक्ती व मदत ग्रहण करण्याची क्षमता वाढवितो.

👉    प्राप्त झालेली क्षमता कधी, कुठे व कशी वापरायची व त्यातून यश कसे प्राप्त करायचे हे शिकवते.

👉   चुकीच्या गोष्टी करण्यास परावृत्त करते.  आपण सिंहावलोकन केल्यावर मी हे करायला नको होते. माझ्याकडून चूक घडली. ही अपराधीपणाची भावना येते.  *नित्य म॓त्रगजर व वर्षातून एकदा एका  दिवसात 108 वेळा म्हटलेली हनुमान चलिसा माझ्या मनातील सर्व अपराध दूर करतात*. हनुमाना चलिसा माझ्यातील महाप्राण जो निष्क्रीय झाला आहे त्याला सक्रीय करते. *म्हणजेच मन, प्राण, प्रज्ञा एकात्मतेने काय॔ करु लागतात*.

      लहान मुलांना मी कमीत कमी तीन वेळा हनुमान चलिसा म्हणायला सांगतो. कारण त्यांचा लहान मेंदू विकसित होत असतो.  छोट्या मुलांना बरेच प्रश्न पडलेले असतात. त्यांची उत्तरे कोणीच देत नाही.   *ती नेहमी गोंधळलेली असली तरी नेहमी आनंदी असतात*. हिच योग्य वेळ आहे जेव्हा त्यांचे मन तयार होते.  म्हणजे छद्म आत्मा तयार होणार नाही व परमेश्वराकडून बक्षीस रुपात प्राप्त होणा-या चांगल्या गोष्टी त्याच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आणतील.  *म्हणूनच माझ्या बाळांनी हनुमान चलिसा रोज तीन वेळा म्हटलीच पाहिजे*.  तुम्ही 70 वर्षाचे असा की 80 तुम्ही माझी बाळेच आहात.

      गुरुचरणमासामध्ये 108 वेळा हनुमान चलिसा म्हणा.  जसे जमेल तसे म्हणा पण म्हणा.

      *माझ्या व माझ्या यशस्वी जीवनाच्या आड ज्या गोष्टी येतात त्या बाजूला होतील. हेच हनुमान चलिसाचे महत्त्व आहे*. 

      हनुमान चलिसात 108 मंत्र आहेत.  किती? 108. 108 मंत्र 108 वेळा म्हटले जातात.  अनेक मंत्र तुम्ही स्वत:च सहजपणे ओळखू शकता.  

नासै रोग हरे सब पीरा  ।
जपत निरंतर हनुमत बीरा ॥

होत न आज्ञा बिनु पैसारे ।

      *पैसारे म्हणजे प्रयास.  अवधी भाषेत पयसा म्हणजे प्रयास.   "असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी" हे होणे नाही.  प्रयास करा पण गधा मजूरी नको*.

       प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू वाईट वागवतात तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागत होता.  हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले, विष दिले तरी देवाने त्याला मरु दिले नाही व खांबात स्वत: प्रगटून हिरण्यकश्यपूचा वध केला. *कारण तो सतत मंत्रगजर करत होता*.

दै.प्रत्यक्ष अग्रलेख,Geopolitics व महाभारत.

हरि ओम

दै.प्रत्यक्ष अग्रलेख,Geopolitics व महाभारत.

खरो खरचं ह्या गुरुवारचे दिं .17/8/2023 रोजीचे पितृवचन खुपचं सुंदर होते.बापूंनी मनातले बोलुन दाखवले.आपण  सर्व बापू आहेत सांगून मोकळे होतो ,सर्व कार्य,जबाबदाऱ्या फक्त बापूंची, असे म्हणत निष्क्रिय होत चाललो ,तसेच सोयीनुसार comfort zone मध्ये जात चाललो .विश्वास जरूर असावा पण खाली दिलेले अग्रलेख जेव्हा आपण वाचतो तेव्हा प्रामुख्याने  जाणवेल की राज घरान्यातील  संपूर्ण परिवार,प्रधान,सेवक.... ई स्वयंभवान्याच्या कार्यात रात्रं दिवस एककरून मंत्रगजर करत पुढे जातात.
 
आपण जर दैनिक प्रत्यक्ष मधील अग्रलेख *वासुंधरेचा इतिहास* पासून सुरुवात केली तर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवेल की सर्व मंडळी confort  zone  मधून बाहेर येऊन अचूक आखणी करून कार्य करतात.
*वेदामध्ये भक्ती हा शब्द नाही , पण उपनिषधामध्ये आहे* मग मधल्या काळात असे काय घडले की देवाने भक्ती दिली..मग ही कथा आहे सत्य युगाच्या 50,000 वर्षा नंतरची.

महामाता सतोरिया ही राणी,पतीचा घात झाला .सोन्याच्या शोधात निबुरा ग्रहा वरून हयवांनियस यानातून राजा zeus , पत्नी बिजोयमाला असे अनेक जण आफ्रिकेच्या जंगलात उतरून कार्य करू लागले.यात राज परिवार आई दुर्गा v पुत्र त्रिविकमाचे उपासक.मात्र साटाडोरीना(सर्की )सारखे अनेक राजघराण्यातील व्यक्ती शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली असुरी पंथाचे उपासक होते.यात *शुक्राचार्य यांच्या कन्या दनु,कद्रू, nysx, व  सुंदर अशी लीलिथ (जी उलट्या विश्वात पंडोर v पांडोरा म्हणून आज देखील जिवंत आहे v कल्युगाच्या मध्यात त्रिविक्राच्या हातून वध निश्चित आहे)* active participants होत्या. कद्रू ही reptile म्हणजे मगरीचे रुप घेत असे कधी ती चीन मध्ये dragon च्या रुपात कार्य करताना दिसते.या मंडळींनी  grey aliens ची फौज ही निर्माण केली.नॅक्स हीनी युध्दासाठी dinosours ची निर्मिती केली.pyramids ची निर्मिती सोने द्रव्य रूपाने त्या मध्ये रासायनिक प्रयोग शाळेतून हैवांनियस यान मार्फत निबुरा ग्रहावर पाठवीत असे.तसेच barmuda triangle 📐 येथे समुद्रात प्रचंड आकाराचे स्पटिकाच्या pyramid ची निर्मिती करून त्यात अनु शक्ती रासायनिक प्रयोग शाळेचे अस्तित्व,.ह्या pyramid साह्याने ही मंडळी 3rd dimension द्वारे काही घटकात थेट ड्रॅगन ग्रहावर जात असे.nile ह्या नदीची उलट्या प्रहावाने निर्मिती केली.व *महंत्त्वाचे म्हणजे त्या वेळेस महिषासुराने सॉलोमनच्य* देहात प्रवेश करून कार्य करू लागला.मात्र त्रिविकमाची बहीण *Aphrodite* (aphra.जे पवित्र नाव आपल्या milk products चे आहे)
या मंडळी विरुद्ध महा माता सतोरियाने युद्ध छेडले.यात Hercules,demater असे अनेक जण रात्र दिवस वेगवेगळे कार्य करत होते.कधी योगायोगाने एकत्र आले की आप्तांना भेटून क्षणभर अश्रू गाळून पण दिलेल्या कार्यचे गांभीर्य ओळून पुन्हा आखणी करून पुढील कार्य करायचे.
मात्र विस्मरणीय क्षण म्हणजे जी माता सतोरीया पडद्या मागून कार्य करत होती ,ती शर रूपाने (वाळू)असलेले सेरा जिने शुक्रचाऱ्याचा सहायाने माता सतोरियाच्या पतीचा वध केला होता .ती सेराचा वध करण्यासाी स्वतः deryanku गुफेत जाण्यासाठी निघाली.वृद्ध डमेटर  यान चालक होता.विशिष्ट पद्धतीने विमान वर्तुळ आकाराने घिरट्या घालून माता सातोरिया deryanku गुफे समोर उतरली.या गुफेत फक्त अपवित्र  कुविद्या धारक जाऊ शकत होते.तिने स्वतःचे मास काळचे रक्त केस मोकळे सोडून सर्वांगाला लावले व कुमंत्र म्हणत गुफेत शिरली. सेर v तिचे युद्ध झाले .सेर चा वध करून ती कोसळणार प्रत्यक्ष त्रिविक्रमाने तीला आपल्या दोन्ही हातात घेऊन गूफेतून बाहेर आणले.
पुढे Hercules v Aphrodite एकत्र कार्य करून या कुविद्या धारक v Solomon चा वध केला.तसेच महामस्तिष ह्या सुपर computer चे तुकडे करून विविध ठिकाणी जमिनीत पुरले.आज देखील ही मंडळी त्याचे रक्षण करीत आहे.

या पासून आपल्या एक निश्चित लक्षात येते की या मंडळींनी जर रात्र दिवस  एक करून कार्य केले नसते तर काय परिसथिती निर्माण झाली असती.
स्वतःला fit राखा.,तसेच आपल्या देशात व विश्व काय चालले याचाही दै.प्रत्यक्ष वाचून update राहू या.आता सुरू असलेली कथामंजेरीही अद्भुत आहे.गोदावरी देवी,वत्सला मावशी,ही सर्व मंडळी कुठल्या न कुठल्या शास्त्रात एक्स्पर्ट आहेत.science चे भरपूर knowledge आहे.तसेच शुर देखील आहेत.देशमुखच्या वाड्यात असो की बाहेर असो मंत्र्गजर  म्हणत ब्रह्ममुहतला सभा सुरू होत असत.कितीही संकट येवो मंत्रगजर म्हणत पुढे जायचे. जीवाची पर्वा न करता तहान,भूक विसरून अचूक नियोजन करून रात्र दिवस फक्त भगवान त्रिक्रमाचे कार्य करने हेच ध्येय..

mantargajar importance

॥ हरि: ॐ॥

*मन्त्रगजर महत्त्व*
दैनिक प्रत्यक्ष अग्रलेख *तुलसीपत्र क्र. १५७७* मध्ये स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाच्या भक्तिभाव चैतन्याचे सविस्तर विवेचन *सद्गुरु श्री अनिरुद्धांनी* केले आहे. या अग्रलेखात बापू सांगतात-
*‘भक्तिभाव चैतन्यामध्ये स्वयंभगवानाचा मंत्रगजर हा सर्वोच्च मंत्र मानला जातो* कारण हा दत्तभगिनी शुभात्रेयीने केला आहे.
ह्या मंत्रगजरातून भक्तिभाव चैतन्याच्या लहरी उसळत राहतात आणि *ज्याला ज्याला म्हणून स्वतःचे जीवन चांगले घडवायचे आहे, त्याला सर्व काही पुरविले जाते*.
मला प्रत्यक्ष माता शुभात्रेयीने सांगितले आहे की जो श्रद्धावान ह्या मंत्रगजराच्या 16 माळा दररोज, ह्याप्रमाणे कमीतकमी 3 वर्षे करतो, त्या श्रद्धावानाच्या विशुद्ध चक्राच्या (कंठकूप चक्राच्या) सोळाच्या सोळा पाकळ्या शुद्ध होतात अर्थात त्याचे विशुद्ध चक्र हनुमत्-चक्र बनते. मग कुठल्याही जन्मात तो सुखाने येतो, आनंदात राहतो आणि आनंदातच विलीन होतो.
स्वयंभगवानाचा स्पर्श ज्याला झाला, ती वस्तू, पदार्थ, व्यक्ती आपोआप पवित्र होते व ह्याला अपवाद नाही.
हा *स्वयंभगवान प्रेमळ व कृपाळू आहे, हा ठाम विश्‍वास बाळगूनच जप करा, ह्याच्या प्रतिमेचे पूजन करा, ह्याच्या पादुकांचे अर्चन करा, ह्याच्या चरणांकडे पाहत रहा, ह्याच्या मुखाकडे पाहत ह्याचे सौंदर्य पीत रहा, ह्याच्या मूर्तीला अर्थात अर्चनविग्रहाला ‘जिवंत देव’ जाणून सर्व प्रकारे सेवा करा आणि केवळ ह्याला आवडते म्हणून खर्‍याखुर्‍या गरजू श्रद्धावानांना सहाय्य करा, हेही भक्तिभाव चैतन्यच*.’
त्याचप्रमाणे *तुलसीपत्र 1588* या अग्रलेखात बापू आम्हाला सांगतात - *‘स्वतःच्या जीवनशेतीचा मी फक्त शेतकरी आहे आणि हा स्वयंभगवानच मालक आहे’ हे मनावर नीट बिंबवून मंत्रगजराच्या माळा करीत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य*.  

bhagvati sannihita: agralekh 1514 and 1515

👆👆👆

*भगवती सन्निहिता*...

अग्रलेख  १५१४ / १५१५ मधे बापुंनी जे विस्तृतपणे दिले आहे ते खालीलप्रमाणे....👇

*हा संवाद  'देवर्षि नारद व शुभदा' ह्यांच्यातील आहे*...

🌺 सन्निहिता म्हणजे प्रत्येक श्रध्दावानाच्या सर्वात निकट असणारी, त्याच्याबरोबर सदैव असणारी, 'भक्ताच्या जीवनात ती त्याच्यासाठी उपलब्ध नाही' असे कधीच नसणारी अशी,,,,,, स्वयंभगवान त्रिविक्रमानेच आपल्या भक्तांच्या *अभ्युदयासाठी* त्याच्या चहुबाजूंना ठेवलेली *स्वतःकडील प्रेमभक्ती*.
आणि 
ही स्वयंभगवान त्रिविक्रमाची *त्रि-नाथांवरील भक्ती*
आणि
त्याचे त्याच्या *भक्तांवरील प्रेम*
ह्याचे *एकरूप* स्वरूप असणारी, अशी ही सन्निहिता म्हणजेच,,,,
*स्वयंभगवान त्रिविक्रमाची  निजशक्ती,निजमाया,आत्ममाया,प्रेममाया,प्रसादमाया ( वात्सल्यमाया ) अर्थात त्याच्याशी अभेदाने राहणारी त्याची भक्तियोगमाया*.

🌺 ही स्वयंभगवानाची भक्तियोगमाया सन्निहिता हीच त्याची वामांगिनी.*हिला भौतिक  स्वरूप नाही*

🌺 सामान्य मनुष्याला छळणा-या मायेला ही सन्निहिताच ख-या भक्ताच्या जीवनातून दूर पळवते.

🌺 ह्या सन्निहितेचे दुरुन दर्शन झाले तरी *सर्वांची त्रेधातिरपीट उडवणारी मोहमाया,जीव घेऊन पळत सुटते*.

🌺 *श्रेष्ठ भक्ताच्या नसेनसेतून,रक्ताच्या प्रत्येक थेंबातून,शरीरातील प्रत्येक पेशीतून,मनाच्या प्रत्येक अवस्थेतून आणि प्राणाच्या प्रत्येक स्पंदनातून....शुध्द भक्ती निरंतर वाहत ठेवणे....हेच सन्निहितेचे कार्य आहे*.

🌺🌺 

*भगवती सन्निहितेची प्रत्येक ख-या भक्तासाठी ' ५ ' स्वरूपे आहेत*.

🔹 स्वयंभगवानाचे नामस्मरण सतत करीत राहणे -- *नामभक्ती*.

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या रूपाकडे अत्यंत प्रेमाने पाहत पाहत ,त्याच्या चरणांवर दृष्टी खिळवून ठेवणे -- *दर्शनभक्ती*

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंदिराची प्रत्येक सेवा आणि कुठलीही सेवा अत्यंत प्रेमाने,मनापासून,वारंवार करीत राहणे -- *सेवाभक्ती*

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या गुणांचे,अनुभवांचे आणि कथांचे प्रेमपूर्वक श्रवण आणि कीर्तन करणे -- *आचरणभक्ती*

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाचा 'मंत्रगजर' ...दिवसा-रात्री ,सुखात-दुःखात ,काम करत असताना-आराम करीत असताना ,प्रफुल्लित-उदास असताना ,त्रिविक्रमाची तसबीर समोर असताना-नसताना ,यश-अपयश ह्यांना सामोरे जाताना ,त्रिविक्रमावर खूष असताना - त्रिविक्रमावर रुसलेले असताना.........अशा कुठल्याही अवस्थेमध्ये आत्यंतिक भावाने करीत राहणे -- *आनंदभक्ती*

🌺🌺

🔹ही सन्निहिता *भावरूपिणी* आहे--अर्थात तिची मूर्ती नाही,आकृतीही नाही,चित्रही नाही आणि *नसावे*....
*कारण एकच*
👇
*ती त्रिविक्रमापासून अभिन्न आहे म्हणून....*

एकदा का मूर्ती तयार झाली किंवा चित्र रेखाटले गेले की सामान्य भक्ताच्या मनात 'भेद' उत्पन्न  होतोच आणि मग तो त्रिविक्रमाची भक्ती पूर्णभावाने करू शकत नाही आणि 'हे नाथसंविध् नाही'...

🔹 किंबहुना स्वयंभगवान त्रिविक्रम कार्यासाठी स्वतःच 'सन्निहिता' बनतो...तोही पूर्ण आणि तीही पूर्ण...आणि कार्य संपन्न होताच परत आपले 'सन्निहिता' स्वरूप आपल्या मूळ रूपात खेचून घेतो.

🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाचे 'सन्निहिता'  स्वरूप त्याच्यावर अवलंबून असूनसुध्दा सर्वदृष्ट्या स्वतंत्रही असते.कारण *ही भावरूपा असल्यामुळे ,हिच्यात कुठलाच अभाव असूच शकत नाही*.

🔹 *प्रत्येक  सच्चा भक्त त्रिविक्रमाशी सन्निहित व्हावा म्हणूनच ''''' त्रिविक्रमाची मूर्ती हिच सन्निहितेची मूर्ती'''''*.

🔹 ज्ञानी व योगी  भगवती सन्निहितेला *स्वामिनी* ह्या नावाने साद घालत असतात.

🌺🌺🌺🌺🌺

*भगवान त्रिविक्रम 'सन्निहिता' बनतो ,ते केवळ आपल्या भक्तांना भ्रममायेच्या जाळ्यातून सोडवण्यासाठीच*.....

ही भ्रममाया अर्थात मोहमायासुध्दा भगवंताचीच एक शक्ती आहे ---
१) अभक्तांना नियमांच्या प्रांतात अर्थात कर्मफळाच्या तुरुंगात बंदिस्त करण्यासाठी.
🌺

*जो सच्चा भक्त , 'कर्ता-करविता एकमेव स्वयंभगवान त्रिविक्रम आहे'  असा दृढविश्वास धरून त्याच्यावर प्रेम करतो , त्याच्यासाठी त्रिविक्रम 'सन्निहिता' बनून ....*

🔹 त्या भक्ताच्या पापांना भस्म करुन टाकतो व केवळ *चुका* म्हणून समजतो.
🔹चुका सुधारण्याची संधी देतो....त्यांची भक्ती अधिक वाढवून.

🙏

श्रीराम.
अंबज्ञ.
नाथसंविध्.