Friday, December 29, 2023

कथामंजिरी २

कथामंजिरी २
परमपूज्य अनिरुद्ध बापू
भाग ४७
पंचमहाभूते,मानवी संकल्प व ईश्वरी संकल्प याविषयी सांगत असतानाच परमपितामही गोदावरीदेवींना त्या पुत्र पराक्रमादित्य यांच्यावेळी गरोदर असतानाची आठवण होते.त्यांना सतत ब्रह्ववादिनी अहिल्यामातेच्या सहवासात रहावे,तिच्या आश्रमांत वास्तव्य करावे, ब्रह्मर्षि गौतमांना ध्यान करताना पहावे,आणि सतत ईश्वरचिंतनातं रहावे अशी ओढ लागली होती.म्हणून त्या ब्रह्मर्षि गौतमांच्या आश्रमात येऊन राहू लागल्या.तेथे त्या स्वयंभगवानाची भजने ऐकत,न्यायशास्त्र ऐकत. 
गर्भवती अवस्थेत त्यांना आंबट व तिखट पदार्थ अगदी पाहवतही नसत.वासही सहन होत नसे.तेव्हा ब्रह्मर्षि गौतम त्यांना म्हणाले.कन्या गोदावरी तुझ्या पोटी सूर्यप्रतापी अआणि अध्यात्मिक तेजाने परिपूर्ण असा पुत्र जन्मास येणार आहे.त्या गर्भातल्या सात्विक तेजाने तुला तिखट व आंबट पदार्थ आवडेनासे झाले आहेत.परंतु त्याला साम्राज्य चालवायचे आहे,वाईट संकल्पांशी युद्ध करायचे आहे,अधर्माचा पारिपत्य करायचे आहे.ह्यामुळे त्याला या दोन रसांची ओळख असणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्यांनी एका द्रोणात लोणच्याचा एक थेंब व दुसर्‍या द्रोणात मधुर पाकाचा थेंब ठेवला.थोड्याच वेळात त्या दोन्ही थेंबांपासून दोन स्तंभ तयार झाले व एकमेकांशी जोडले गेले.ते एकमेकांत मिसळत होते व काही वेळाने पुन्हा वेगवेगळी झाली.
ब्रह्मर्षि गौतमांच्या सांगण्यावरुन गोदावरीदेवींनी त्या दोन्हींची चव पाहण्यास सांगितले.तेव्हा ते लोणचे मधुर लागत होते.
ब्रह्मर्षि गौतम म्हणतात की हा सर्वकाही भावनांचा खेळ आहे आणि भावनांची निर्मिती हा अन्नाचा खेळ आहे.
जोपर्यंत मनुष्य स्वयंभगवानाशी पूर्णपणे जोडला जात नाहीतोपर्यंत अन्न त्या मनुष्याच्या भावना निर्माण करते,बदलविते किंवा नष्ट करते.
परंतु एकदा का मनुष्य स्वयंभगवानाशी पूर्णपणे जोडला गेला की अन्न केवळ शरीरपोषणाचे कार्य करते आणि मन व अंतःकरण ह्यांच्यावर सत्ता फक्त भगवंताची चालते.कन्ये तुला व तुझ्या पुत्राला असेच बनावयाचे आहे.पंचमहाभूते कितीही प्रबळ असली तरीदेखील स्वयंभगवानाच्या तेजाच्या एका अतिसूक्ष्म अंशापुढेही अतिशय कमकुवत ठरतात व ही गोष्ट केवळ अन्नाच्या बाबतीतच नव्हे तर मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेच्या संदर्भात सत्य आहे.म्हणूनच भोजन करतेवेळेस स्वयंभगवानाचे नामस्मरण करावे.ते अन्न खरोखरच दिव्य प्रसादाचे कार्य करते.
हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध बापू

No comments:

Post a Comment