Monday, December 12, 2022

Second pitruvachan(08 Dec 2022)

Tried to recall today's second pitruvachan (which was in English)
These are best efforts in having exact words as much as possible. Apologies in advance if something is missed/incorrect

Today's second pitruvachan(08 Dec 2022)
Dad announced 
- Promotion of Leeladharsinh from Deputy CEO to CEO
- Promotion of Harishsinh Mahajan to Deputy CEO
-Dad asked how are you buddies. All said fine. DAD said not fine say great.
-Dad asked did you watch movies recently, web series
So many people watch just crime patrol back to back. I don't know how they sleep and how their brain works. So much crime - just rape and murder.
You should definitely see sometimes to stay updated on what types of crime are happening around us.
- Trash is everywhere similarly trash is also there in this world of web series
- We should be able choose wisely
- Not all that is shown is fake or wrong, some parts are also real.
-20 years ago we used to read books
Now these web series are nothing books converted to audio video form
- In one's lifetime one cannot learn about everyone's experience so these forms help us
-Dad asked what did we learn from Covid times, responses from shraddhavans - Trivikram is the only support, he can turnaround anything, we were taking so many things for granted
-Dad said yes definitely all this is true.In addition we also learnt to save money. And secondly, importance of Raamnaam currency
- Covid taught us that anything can happen anytime so we must spend money wisely. You can definitely travel, shop but do it wisely 
- We must remember in Shriram avtaar he came, he earned and spent wisely
But opposite to that as Shri Krishna he had to drown Dwarka. But he gave gita to the world and shreemad bhagvat
I know it is difficult but we must try to read it at least once
-Rama Rama is maha mantra. It is continuous. It starts where it ends..it is the only closed circuit 
-We should try to chant 16 mala if not try 8 else try 4 at least try 1 and keep chanting as much as you can throughout the day
- we must remember I am his, He is mine is ok but I am his is important.
- we love him we miss him but do we try to remember him? Why is it important to remember him?
- close your eyes and try to remember his face. Try to envision him. More than how he looks how you imagine him or try to create his face, remember his charan is important 
- We should remember that if this world is being ruled by Mother Chandika and her son, the world can never be completely bad, there will be good things also.
- Even if 10 bad things happen we must remember 100 million good things will also happen
- Because of 1 bad thing don't think that the world is bad.No it can never be. With conviction remember that if 10 doors close for me 10lakh new doors will open. Because you focus on 1 bad thing headsdown you are missing 10 other good things coming your way.
- In coming weeks, Dad said we will start second pitruvachan where he will talk about Narad Bhakti Sutras, that is Nav-vidha Bhakti and in 1st pitruvachan he will talk about Trivikram anantnamavali, not sahastra, anant.
Hari Om Shriram Ambadnya

Sunday, December 4, 2022

pitruvachanam

हरि ॐ‌

*|| श्रीगुरुचरण मास ||*

*"पहा मी माझिया वचनाकारणें |*
  *मरोनि जाईन जीवें प्राणें |*
  *परी माझिया मुखींचीं वचनें |*
  *अन्यथा होणें नाहीं कदा "||*
    (श्रीसाईसच्चरित अ.४०,ओ.९१)

*प.पू.बापूंचे पितृवचन*
( ४ डिसेंबर २०१४ ) -
                  *"साईबाबांचे हे वाक्य तुमच्या हृदयाला पाझर फोडणारं असलं पाहिजे !* अरे काय हमी देतात बाबा. एक लक्षात घ्या कोणीही एवढी हमी देणार नाही .पण आम्ही मात्र विश्वास ठेवत नाही. *'तोच विश्वास'* ठेवायला लागा.
                 जर साईबाबा आमचा सद्गुरु असेल , देव असेल ,तर *'त्याचा शब्द'* , *'त्याचे वचन'* आम्हाला मान्य असलेच पाहिजे. देवाच्या शब्दांवर १%, ९९% , वा  ९९.९९% विश्वास असून चालत नाही. तर *पूर्ण १००% म्हणजेच १०८% विश्वास असावा लागतो.*
                *'मी तुला कधीच टाकणार नाही'*, असं म्हटलय ना ? मग कोणत्याही परिस्थितीत ही खात्री हवीच !
                 देवाने आमच्या डोक्यावर हात ठेवला, ह्याचा अर्थ आमचे कल्याण होणारच आहे, हा विश्वास पाहिजे. एवढेच नाही तर देवाने कंबरड्यात लाथ घातली, तरी ती माझ्या कल्याणासाठीच आहे, हा *दृढ विश्वास हवा देवाच्या शब्दांवर!*  
                असा *दृढ विश्वास* ठेवणे, म्हणजे *'देवाशी जोडून घेणे !'*  इथे खरं म्हणजे प्रयासाची आवश्यकता नाही. फक्त *भाव पाहिजे.* कारण *'भाव तोचि देव !'*
                अशाप्रकारे देवाच्या वचनांवर विश्वास ठेवल्यास आपण देवाशी जोडले जातो.आणि म्हणूनच *देवाच्या वचनांवर विश्वास ही एकमेव प्राथमिक गरज आहे आमची !*
*बाकी 'त्याचे वचन' तो पाळतोच ! "*

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Sunday, October 9, 2022

kojagiri importance

*सदगुरु अनिरूद्धांनी सांगितलेले कोजागिरी पौर्णिमेचे महत्व...*

*कोजागिरी पौर्णिमेचे महत्व :-*

एक गोष्ट आज सांगतो. जेव्हा अमृतमंथन झाले, तेव्हा अमृत व हलाहल विष त्यातून निर्माण झाले. ह्यातील हलाहल प्रथम बाहेर आले. मग आपण हलाहल मंथन का म्हणत नाही? विष शिवाने प्राशन केल्यावर मिळालेल्या अमृतामुळे देवगण अमर झाले. त्यांना हव्या असणार्या सर्व गोष्टी मिळू लागल्याव मृत्यूचे भयही उरले नाही. त्यामुळे ते पूर्णपणे relax झाले. परमात्म्याचे सेवेकरी म्हणून त्यांना माज चढला. ह्या देवगणांचा माज पहिल्यांदा दिसला तो त्या शेषधारी विष्णूलाच.ह्या विष्णूला भेटायला जेव्हा नारद आला, तेव्हा त्याला न बघताच महाविष्णूने कूस बदलली. देवर्षी नारद म्हणजे सगळ्या भक्तांसाठी एकमेव जवळचा आप्त, ह्याने कुठलाही यज्ञ कधी केला नाही, केवळ नामस्मरणानेच देवर्षी पदाला पोहोचलेला आहे.लक्ष्मीमाता विष्णूचे लक्ष नाही हे बघून त्यास नारद आल्याचे सांगते. तेव्हा विष्णूने एक आळस देऊनविचारले काय झाले? नारदाचे व विष्णूचे बोलणे म्हणजे जगात चालणार्या गोष्टींचे gossip नसून विश्वाच्या कल्याणासाठी चाललेला वार्तालाप असतो.विष्णू नारदाला विचारतो, "विश्वाचा कारभार बघणार्या देवगणांचे कसे चालले आहे?" याबद्दल मला एका वाक्यात सांग. त्यावर नारदाने एका वाक्यात उत्तर दिले, "कोण देवगण?" इथे उत्तरातच प्रश्न येतो पण हा प्रश्न नसून खरे उत्तरच होते. कारण नारदासाठी देवगण अस्तित्वातच राहिले नव्हते.जसे श्रद्धावानांच्या गोष्टी चण्डिकेपर्यंत पोहचविणारा महाविष्णू हा चण्डिकेचा कान तसेच नारद म्हणजेच नामस्मरण हा महाविष्णूचा कान म्हणून जेव्हा देवगण त्यांच्या कार्यापासून च्युत झाले तेव्हा ते देवगण राहिलेच नाहीत.नारदाचा प्रश्न ऐकून लक्ष्मीमाता नारदाला सांगते, "देवगण म्हणजे जे देवाची व मानवाची सेवा करतात ते." त्यावर नारदाने उत्तर दिले, "पण मला असे कोणीच दिसले नाही." हा दिवस होता पितृपक्षाचा पहिलादिवस. नारदाचे उत्तर ऐकून लक्ष्मीमाता महाविष्णूला विचारते, "मी शोधू का कुठे आहेत ते देवगण?" महाविष्णू आळस देऊन म्हणतो, "तुला जे करायचे ते कर."लक्ष्मीमाता पृथ्वीवर सगळीकडे फिरते व बघते की, कावळ्यांसाठी ठेवलेले अन्न देवगण खात आहेत. एवढी ह्यांच्यावर वाईट परिस्थिती का आली? हा प्रश्न तिला पडतो, ती परत विष्णूकडे येते, व विष्णूला ह्याचे उत्तर विचारते.विष्णू तिला म्हणतो, "बाई तूच शोध घे, मला झोपू दे."लक्ष्मी परत पृथ्वीतलावर जाते व बघते की, सगळे भाविक लोक व्यवस्थित पूजा करत आहेत, देवाला नैवेद्य अर्पण करत आहेत. मग ते ह्या देवगणांपर्यंत का पोहचत नाही? असा प्रश्न तिला पडतो. हे देवगण जर पितरांचे खातात, म्हणजे पितर उपाशी राहतात.ती महाविष्णूला परत येऊन विचारते, तेव्हा महाविष्णू म्हणतो, "पितरांची तू काळजी करू नको त्यांचं बघायला मी आहे."लक्ष्मी नारदाकडे जाते, तेव्हा नारद म्हणतो विष्णूला जागे कर. लक्ष्मीमाता प्रेमाने विष्णूस जागेकरते. विष्णू तिला म्हणतो, "काळजी करू नकोस. लौकिक जगातील अन्न पितरं कसे खाणार? त्यांना चतुर्मितीतून त्रिमितीत येण्याची तू permission देतेस का? नाही नां. काळजी करू नकोस पितरांना अन्न अर्पण करणे लोकांची भावना आहे.

लक्ष्मीमाता म्हणते, उद्यापासून मी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पृथ्वीवर संचार करण्यासाठी जाते. विष्णू म्हणतो, "उद्यापासून नवरात्र सुरू होते आहे."लक्ष्मीमाता बघते पृथ्वीवर सगळे भक्तिभावाने नवरात्र साजरी करत आहेत. मग ती देवगणांकडे येते. पण तिथे सगळे आपल्याच विश्वात मग्न असतात. कुणीही नवरात्र साजरी करताना दिसत नाही. लक्ष्मीमाता रूप बदलून त्या देवगणांना विचारते, "तुमचे असे वागणे विष्णूला कळले तर?" देवगण त्यावर तिला उत्तर देतात, "विष्णूला त्या नारदाने सांगितले तरच कळते, नाही तर काही कळत नाही." तेव्हा लक्ष्मीला जाणवते की, ह्या देवगणांची कृतज्ञता, श्रद्धा, विश्वास नाहीसे झाले आहे. ह्यांना अमृतामुळे सर्व मिळाले आहे. ह्यांना मागण्यासाठी काहीही उरले नाही, त्यामुळे कुठलीही गरजही उरली नाही.लक्ष्मीचे मन कळवळते, तिला वाटते, देवगण चांगले आहेत, त्यांनी सुधारावे. ती विष्णूकडे परत जाते व त्याच्याकडे वर मागते, *"मी आज पृथ्वीवर संचार करायला जाईन व जो कोणी रात्री जागा असेल, देवाची वाट बघत, देवावर विश्वास ठेवून तर त्याला आशीर्वाद देईन व असे प्रत्येक महिन्यात करण्यासाठी तू परवानगी दे." विष्णू म्हणतो, "दर महिन्याला मी परवानगी देऊ शकत नाही. वर्षातून एकदाच तू हे करू शकतेस. उद्या पौर्णिमा आहे." लक्ष्मीमाता म्हणते, "उद्या जी कोणी "कोऽजागरति" म्हणत देवाची भक्ती करत जागा असेल त्याची त्याने कधीतरी मागे केलेली भक्ती मी जागृत करेन.* "कोजागिरी पौर्णिमा आता पुढच्याच आठवड्यात आहे. गुरुक्षेत्रम्‌मध्ये अनेकजण जागरणाला येतात, रात्रपठणासाठी. पण मी खाली जातो तेव्हा अर्धे अधिक झोपलेले असतात. जागरण जरी गुरुक्षेत्रम्‌मध्ये नाही जमले तरी घरी करा, चालेल पण नीट जागे राहून करा. रात्र पठणानंतर सकाळी ६ वाजले की जायची घाई असते. कधी एकदा ६ वाजतात एवढे सगळ्यांचे घड्याळाकडे लक्ष असते, खाली सगळे झोपलेले असतात, मी वरती जागा असतो. सकाळी ६.०५ ला खाली आलो तर कुणीच दिसत नाही, तिथे सगळे सपाट असते.एक दिवस रात्री झोप नाही झाली तर आमच्यासाठी तो प्रलय असतो. जगबुडी झाल्यासारखी आमची अवस्था होते. दुसर्या दिवशी पित्त काय उठते, हात-पाय काय गळतात सगळ खोटं आहे हे.मेडिकल field मधले इथे बरेच आहेत. आम्ही M.D. करताना ३-३ रात्री जागे राहून काढायचो. Doctor ने night duty च्यावेळी alert रहावे अशी अपेक्षा असते मग तुम्ही का एक रात्र जागे राहू शकत नाहीत?आम्ही देवाचे करतो म्हणजे स्वत:चे करतो. तुम्हाला काय वाटते, तुम्ही दिवा नाही लावला तर त्याच्याकडे अंधार असणार का? नाहीच.जेव्हा देवगणांनी त्यांची मर्यादा सोडली तेव्हा त्यांची कशी परिस्थिती झाली हे विसरू नका. मनुष्याचे असेच होत असते. संकट येताना मनुष्याला दिसेलच असे नाही. त्सुनामी येते तेव्हा तुम्ही बघितले असेल दुसर्या व चौथ्या मजल्यावरचा मरतो पण तिसर्या मजल्यावरचा मात्र जिवंत राहतो. हे कसे घडते, हे समजण्याची तुमची capacity नाही हे लक्षात ठेवा.तुम्हांला काय वाटते तुम्ही प्रसाद देता म्हणून देव तुमच्यासाठी करतो. तो काय तुमचा केटरर आहे. विश्व उत्पन्न करताना त्याच्या इच्छेने झाले तेव्हा त्याला आमच्या पूजेची मदतीची गरज लागली नाही.हे नेहमी ध्यानात ठेवा.हे जे उपनिषद माझ्या आईने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते खरचं सांगतो, अधाश्यासारखे वाचा. 

तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हांला बाहेर काढून ते तुम्हांला चांगल्याच मार्गावर घेऊन जाणार.ज्याचा ह्या वर्षी "कर्ता हर्ता गुरू ऐसा" हा संकल्प सिद्ध होईल, तोच पुढच्या काळात तरणार. मी जेकाही करतो, ते देवाला कळत नाही, त्यामुळे तो action घेत नाही हा विश्वास खोटा आहे, हा टाकून द्या. प्रत्येक गोष्ट ह्या चण्डिकाकुलाला नीट कळत असते, जो कुणी त्याच्याशी खोटं बोलतो तो मग नियमांच्या प्रांतात जातो.पण जेव्हा त्याच्यावर पूर्णपणे श्रद्धा असते, तेव्हा जरी तुमच्याकडे काही कमी पडत असले तरी ते कुठल्या ना कुठल्या चांगल्या मार्गाने तुम्हांला मिळत राहते.पोलिओचे थेंब नाही घेतले तर पोलिओ होईल हे सांगणे म्हणजे doctor ची तुम्हाला धमकी नसून तुमच्याविषयी कळकळ असते.मी पण डॉक्टरच आहे. आजचे हे सांगणे म्हणजे बापूची धमकी समजू नका. माझी तपश्चर्या, उपासना, तुमच्यासाठी तळमळ हे तुमच्यासाठी vaccine आहे पण हे vaccine टोचताना जर तुम्ही जत्रेत नाचायला गेलात तर कसे होईल?साईसच्चरित प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितले, जसे प्रवाहात अनेक लाकडे एकत्र येतात व पुढे परत वेगळी होतात. तसेच जीवनात असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे अनेक दूरची नाती पण जवळची वाटायची आतामात्र जवळची नाती पण दूरची वाटतात. नातेवाईक बदलत जातात पण नाती तीच राहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक वेगवेगळी माणसे भेटतात पण ह्या प्रवासाला आधार देणारा एकच सद्‌गुरु असतो.जो ह्याला विन्मुख होतो, त्याला सुख मिळू शकत नाही, त्याचं जीवन कृतार्थ होत नाही. *आज आपल्या नशिबाने मातृवात्सल्यविन्दाम्‌, गुरुक्षेत्रम्‌,रामरसायन आहे. आपण खूप श्रीमंत आहोत.* 


आपल्यालाकुठल्याही कुबड्यांची गरज नाही. तुम्ही मला गुरू मानू नका मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही कुणालाही गुरू माना, पण पूर्ण विश्वास ठेवा कारण येणारा काळ अतिशय बिकट आहे. आज तरुण वयाच्या मंडळी कामाच्या stress ने दबलेली असतात. Divorce चे प्रमाण तर अगदी चण्या-फुटाण्यासारखे झाले आहे. Divorce फक्त नवरा बायको मध्ये होत नाही, तर मैत्रीत होतो, भावंडांमध्ये होतो. संसार प्रेमाने टिकवायचा असतो. प्रेमाची माणसे मिळत नाहीत. वाईट माणसांना कधीही सुख लाभत नाही हे लक्षात ठेवा जे सद्गुरुचरणी निष्ठावान आहेत, चण्डिकाकुलाशी प्रामाणिक आहेत तेच प्रेमाने,सुखाने राहू शकतात.मी माझ्या अनंत काळाच्या अनुभवाने हे तुम्हांला सांगत आहे. संकट कुणाला येत नाहीत. राम-कृष्णालाही संकटे आलीच ना. प्रत्येक संकटातून तरण्याचा मार्ग असतो तशी संधीही तोच देतो. एक दिवस असं समजा तुम्ही कृष्ण आहात. खरचं सांगतो तुम्हांला पाप लागणार नाही. तुम्हाला स्वत:च्या आप्तांसोबत हिरे-माणकांनी बनविलेली द्वारका बुडवावी लागली तर विचार करा, किती दु:ख झाले असेल कृष्णाला.

*आयुष्यात सगळं करा, पण ते चण्डिकाकुल व त्याचे द्वार असणार सद्गुरु ह्यांच्यापासून कधी दूर जाऊ नका.* अमृतमंथन खरं तर हलाहल मंथन आहे. समजा तुम्ही लग्नाला उभे राहिलात आणि समोरची स्त्री किंवा पुरुष अतिशय श्रीमंत आहे पण त्याच्या मागे जहरीला साप आहे तर तुम्ही पुढे जाणार का? नाही. हे जहरीले विष म्हणजेच चुकीच्या गोष्टींची मदत घेणे. हे निस्तरण्यासाठी ते विष शिवालाच येऊन प्यावे लागते.

माझे ह्याआधी अनेक जन्म झाले असतील, पण ह्या जन्मात मला संधी मिळाली आहे ही संधी परत येणे नाही. ह्यापुढे अडीच हजार वर्षांनंतर चार प्रलय झाल्यावर परत नवे युग आल्यावर ही संधी येईल. *हा जन्म देवासाठी राखून ठेवा आमची first priority ह्या जन्मात चण्डिकाकुलच असू दे.* आज उपासनेचा शेवटचा दिवस असूनही केवळ तुम्हांला हे सर्व सांगण्यासाठी माझ्या आईची permission घेऊन मी इथे आलो आहे. आपण physics शिकलो आहोत. आपण बघतो quanta सतत बदलत असतो. मानवामध्ये तीच अवस्था असते सतत बदल घडत असतो.ज्याचा quanta बदलत नाही असा तोच एकमेव आहे. तो कधीही बदलत नाही, त्याचा शद्बही कधी बदलत नाही. ज्याक्षणी त्याच्या शद्बाचा आदर राखला गेला नाही, की तो त्याचा शद्ब पाळायला बंधनकारक राहतनाही. तो प्रेमळ आहे त्याची आई साक्षात क्षमा आहे. अनंत क्षमा हेच तिचे स्वरुप आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे क्षमा आहे. पण मला तुम्ही क्षमा करण्याची संधी द्या. आपला बाप तो आपला बाप, दुसर्या कोणाला दया येणं शक्य नाही, हे साईनाथांनी सांगितल आहे, मी नाही. मी एकदाही साईंना बघितले नाही."तो" रुप घेऊन येवो की न येवो त्याच्या वरचा विश्वास दृढ ठेवा. तिच्या इच्छेने (आई चण्डिकेच्या)घडते ते स्वरुप तो स्विकारतो पण तो कधीही बदलत नाही. म्हणूनच आमच्या शरिरातील सतत बदलणार्या quanta ला आधार फक्त त्याचाच असू शकतो. 

३१ डिसेंबर पर्यंतच ही संधी आहे मग तुम्ही म्हणाल नंतर जन्म घेणार्या बाकीच्यांचे काय? तर ज्यांना "त्याची" जाणिव आहे व जे मनापासून गुरूमंत्र स्वीकारतील त्यांच्या प्रत्येक जन्मात मी कायम पाठीशी उभा राहीन. त्यांना मृत्यु कधीच नसेल. जेव्हा सत्ययुग सुरु होते तेव्हा जन्माला घालतानाच मानवाला गुरुमंत्र कानात सांगितला जातो. त्रेतायुगात जन्माला आल्यावर गुरुमंत्र ऐकवला जातो. द्वापारयुगात वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला जातो. तर कलियुगात तो अर्जन करावा लागतो. तो आज आपण मिळवला आहे. गुरुमंत्र माझ्याकडे आहे म्हणजे सगळे आहे.आज बलचे text book प्रकाशित होते आहे. *गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणजेच मोठी बलविद्या.* गुरुक्षेत्रम्‌ मंत्राची जी बलविद्या आहे, ती ज्याला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यालाही शक्य आहे.

*ह्या माझ्या आईच्या हातातील १८ शस्त्रे जो कुणी खरा श्रद्धावान आहे व ज्याला ९ निष्ठा मान्य आहेत. त्याला कायम सहाय्यकारी होतील हा वर मी माझ्या आईकडून मिळवला आहे* व हा वर तुम्हांला देण्यासाठी आज मी इथे आलो आहे.खरचं तुम्ही भाग्यवान आहात. मातृवात्सल्यविन्दानम्‌ घेऊन पुढे चला पण आजपासून निश्चय करा -"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"आज प्रेमाने आपण जयंती मंगला काली हा गजर करायचा आहे व 

आज रात्री प्रत्येकाने म्हणा -"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा" व प्रेमाने आपल्या गुरुला म्हणा - "I LOVE YOU"॥ हरि ॐ ॥

 
- प.पू. अनिरुध्द बापू.

Monday, July 18, 2022

*भक्तीच्या नऊ पायऱ्या* important agralekh

*भक्तीच्या नऊ पायऱ्या*
. हा भगवंत आहे ह्याची जाणीव असणे ही पहिली पायरी, त्याला सर्व कळते आणि समजते ही दुसरी पायरी, तो अत्यंत प्रेमळ आणि दयाळू आहे हे जाणणे ही तिसरी पायरी, तो अत्यंत न्यायी आहे आणि तरीही त्याचा न्याय आंधळा नाही हे जाणणे ही चौथी पायरी, अशा ह्या न्यायी आणि दयाळू भगवंताला नुसता जगाचा न्यायाधीश व मालक न मानता स्वतःचा मायबाप मानणे ही पाचवी पायरी, तो माझा मायबाप आहे म्हणून तो सदैव माझ्या हिताचाच विचार करतो व माझ्याकडून फक्त भक्ती आणि सेवेच्या प्रयासांचीच अपेक्षा ठेवतो, असा दृढविश्वास ठेवणे ही सहावी पायरी, ह्या विश्वासामुळे आश्वस्त होऊन त्याचे नामस्मरण, भजन व कीर्तन करणे आणि आपापल्या क्षमतेनुसार भगवंताच्या पीडित लेकरांची सेवा करणे ही सातवी पायरी, परमेश्वराच्या सत्य आणि प्रेमाच्या मार्गावरून चालून मी आनंदच मिळविणार हा निश्चय करून त्यानुसार चालत राहणे ही आठवी पायरी ,आणि स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे माझ्या प्रगतीचेच सूत्र भगवंताने लपविलेले आहे हे जाणून स्वतःचे जीवन अधिकाधिक परमेश्वराला आवडेल,असे करत राहून खराखुरा भक्त बनणे ही नववी पायरी. 
ह्या नवव्या पायरीवरच संपूर्ण यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठेवलेली असते.ह्या नऊ पायऱ्या जराही कठीण नाहीत. अगदी साध्यासुध्या माणसासही सहजतेने क्रमता येणाऱ्या आहेत.ह्या नऊ पायऱ्यांची वाटचाल म्हणजे प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय. चौऱ्याऐंशी लक्ष योनी क्रमल्यानंतर ह्या नऊ पायऱ्यांचे मार्गक्रमण मानवास कठीण वाटावयास नको.
----------
दैनिक प्रत्यक्ष: अग्रलेख 
मुंबई, दि. ५ जुलै, २०२२
सदगुरू श्री अनिरुद्ध
(हा लेख पुनर्मुद्रित करण्यात आला आहे.)

Wednesday, June 8, 2022

anubhav kathan- related to swami samarth

अनुभव कथन

अनुभव 1
हरी ओम, आयुष्याच्या ज्या क्षणाला बापू आयुष्यात आले हे जीवन सर्वार्थाने फुलून गेले. तेव्हाच ठरवलं की आता पुढे कधी इतर देवदर्शनाला जायचे नाही कारण माझं सर्वकाही आता बापूमय झालं आहे. पण त्याच्या इच्छेपुढे माझं थोडं काही चालणार आहे ! 
आम्हा पती पत्नीला 3 दिवस सुट्टी मिळाली आणि दिनांक 5 जून 2022 रोजी रात्री आम्ही कुटुंबीय अचानक श्रीक्षेत्र अक्कलकोट, गांडगापूर, तुळजापूरला जाण्यासाठी निघालो. हे इतके अचानक अवघ्या 1 तासात ठरले आणि आम्ही निघालोही. मनात बापूला म्हटलंसुद्धा की बापुराया मी कधीच अक्कलकोटला गेलो नाही. नंदाईच्या हातात एकदा स्वामींची बखर हे पुस्तक पाहिले आणि त्यातील 81 नंबरची कथा ही जगन्नाथशास्त्री पाद्धे म्हणजे बापूंचे खापर पणजोबा ह्यांची आहे हे कळले तेव्हापासून मी सुद्धा ती बखर विकत घेऊन वाचली होती, त्यातील स्वामींच्या कथा वाचून मन तृप्त झाले होते, बापूंनी प्रवचनातून सांगितलेल्या स्वामींच्या कथा मनात साठविलेल्या होत्याच. प्रवासात बापूंना म्हटलं की स्वामी तुम्हीसुद्धा ह्या तीन दिवसात माझ्यासोबत चला. तेव्हाच रात्री साडेबारा वाजता पूज्य समीरदादांचा संस्थेच्या ग्रुपवर मेसेज पहिला की आपले क्लिनिक 6, 7 आणि 8 जून रोजी बंद राहील. मला पूर्ण खात्री होती की आई, बापू  आणि दादा माझ्या बरोबर माझ्या सोबत ह्या तीन दिवस आहेतच.

अनुभव 2
उपासना करत आम्ही अक्कलकोट येथे पोहचलो, खरच मन अतिशय शांत झालं होतं. जस आम्ही प्रथम मठात प्रवेश केला तेव्हढ्यात माझा 9 वर्षाचा मुलगा म्हणाला, बाबा आपण इथे आलो होतो, मीसुद्धा म्हटलं हो रे आपले मागील जन्म मला आठवत नाहीत पण बापूंना ते माहीत आहेत. दर्शन करून आम्ही मठातच बसलो, आपल्या नित्य उपासना केल्या, मंत्रगजर, गुरुक्षेत्रम मंत्र,श्रीपंचमुखहनुमतकवच इत्यादी. तिथे असणारे सर्व देवाचे फोटो मी मुलाना सांगत होतो की परमेश्वराची रूपे अनेक आहेत पण तो मात्र एकच आहे, आपल्यासाठी आपला "बापू". 
असे मठात मी त्यांना ती 81 नंबरची कथा सांगितली की स्वामी इथेच रहात होते, बापू आणि स्वामींचा संबंध काय, स्वामींनी दिलेली ती दोन नाणी मग साईबाबांनी आठवण करून दिलेली "आतातरी खूण पटली ना" हे सर्व मी माझ्या मुलांना सांगत सांगत बाहेर जात असताना तिथे अचानक बापूंचा फोटो पहिला. एका वही वर स्वामी आणि एकावर बापू. समोर स्वामी आणि समोर बापू. खरच डोळ्यात नकळत पाणी आले, अंगावर शहारे आले. तो क्षण शब्दात वर्णू शकत नाही, मुलांना म्हटलं बघ इथे पण आपला बापू आपल्यासोबत आहे. तो आपल्याला कधीच टाकत नाही. हा अनुभव आम्ही कुटुंबीयांनी घेतला आणि कृतकृत्य झालो. विशेष म्हणजे स्वामींच्या मठातच हा अनुभव स्वामींनी माझ्याकडून लिहून घेतला, काही वर्षांपूर्वी असाच अनुभव मला कोठिंबेला आला होता, तेव्हा माझा साई माझा बापू झाला होता आणि आज हा अनुभव देऊन माझा स्वामीपण माझा बापू झाला. 
श्रीराम.अंबज्ञ. नाथसंविध.

जैसा स्वामी अमुचा बाप, तैसी साई हि ची आई I
साईस्वामी एक होता,दिसले बापूच्या ह्या रुपी II १ II

जन्म जन्मांतरीची  पापे, आमुच्या प्रारब्धे लागली I
त्यांना घालवी सतवरी, हि करुणेची माउली II २ II

गुण काय मी त्याचे गाऊ, शब्द येईना  ह्या मुखी I
कर्ता करविता तोची, अपुले हाते करवुनी  घेई II ३ II

सूचित शेषरूपी दाऊ, नंदा आल्हादिनी  रुपी I
दोहा वंदनीय "बापू", सदा ठेवी तुझ्या मुखी II ४ II

जन्म मरणाते सोडवी, तोची नेई भर्गलोकी I
हाती हाताते घालोनी, बैसवी पुष्पकी विमानी II ५ II

संत सज्जन ज्याले भजती, तोची प्रगटिला  धरेवरी I
युगे अठ्ठावीस  उभा, त्या एका विटेवरी  II ६ II

काय करू आता नाथा, तूची सांग तुझ्या ह्या लेका I
मी काही जाणत नाही, काही नको तुझ्या विना II ७ II

माझ्या ध्यानी मनी बापू, जवळी क्षणोक्षणी बापू  I
मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II ८ II

मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II
मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II

देवेंद्रसिंह

Thursday, May 12, 2022

vaishakh poornima

ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्रणाय महाबलाय नमो नमः
!! वैशाख पौर्णिमेच्या !!
सर्व श्रद्धावानांना अनिरुद्ध शुभेच्छा

विशेष अध्यात्मिक माहिती
ब्राह्मवादिनी अरुंधती :
“ प्रत्येक मानवास त्याच्या प्रत्येक श्वासागणिक दोन देवदूतांची आवश्यकता असते व ही संख्या फार मोठी आहे आणि म्हणूनच      '#पंचमुखमुखहनुमत्कवच_पठण' व '#सद्गुरूस्मरण' ह्या दोन्हींचा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उत्कृष्टपणे उपयोग करून घेतल्यास , श्रद्धावानाकडील देवदूतांची संख्या, ज्याच्या त्याच्या भावानुसार अनेकपटीने वाढू शकते.

(संदर्भ: तुलसीपत्र-१३२७)

*वैशाख पौर्णिमा पूजन*

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी 
सत्य, प्रेम व आनंद 👈🏻 ह्या पवित्र त्रिसुत्रीशी एकरूप झालेले महासिद्ध पुरुष (सदगुरू तत्व) विशाल मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येतात
 आणि
 त्यावेळी ते सत् वृत्तीच्या उत्थापनाची योजना आखतात. 

या दिवशी 
सदगुरू आपल्या लाभेवीण प्रीतीची जास्तीत जास्त उधळण करतात 
आणि 
सर्व सजीव व निर्जीव सृष्टीसाठी काय उत्तम द्यायचे हे ठरवतात.
 
या दिवशी 
आपण सदगुरू कडून जास्तीत जास्त स्पंदने मिळवू शकतो.

वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहेत.

१) वैशाख पौर्णिमा हि प्रबौद्धपौर्णिमा आहे.

२) वैशाख पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती विनायकाचा जन्मदिवस मानला जातो.

३) वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चोवीस तासात पूर्ण करतात असे मानले जाते... 

कारण 
भगवान वेदव्यास त्यादिवशी सूर्याच्याच रथात बसून असतात.....

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना एक उपासना दिली आहे. 
त्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांना प्रार्थना करूया की हे सद्गुरुराया श्रीअनिरुद्धा, 
तुझी प्रत्येक आज्ञा हाच आम्ही धर्म समजतो. 

म्हणून 
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भक्त कल्याणार्थ तू सांगितलेली उपासना आम्ही श्रद्धावान करू.....

यंदाची वैशाख पौर्णिमा 
सोमवार
दिनांक *१६/५/२०२२* रोजी आहे. 

सदगुरू बापूंनी ह्या दिवशी पुढीलप्रमाणे उपासना करण्यास सांगितले आहे. 

वैशाख पौर्णिमा उपासना

१) प्रथम चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल किंवा तलम वस्र घालावे. नंतर त्यावर आपल्या सदगुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा.

२) श्री सदगुरुंच्या फोटो प्रतिमेस सुंगधीत किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा तर श्री हनुमंताच्या फोटो प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.

३) दीप व अगरबत्ती लावून हात जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंतांचे ध्यान करावे. 

(सदगुरू तारक मंत्र 👉🏻
*ॐ मनः सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नम:*)

४) त्यानंतर 
    श्रीअनिरुद्ध कवच 
    श्रीहनुमान चालीसा 
    श्रीहनुमान स्तोत्र 
    श्रीसाईनाथांची ९ वचने 
    श्री अनिरुद्धांची ९ वचने 
    श्री आदिमाता शुभंकर स्तवन

             व 

श्रीआदिमाता अशुभनाशिनी
            स्तवन

यापैकी कोणतेही एक स्तोत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावे.

५) त्यानंतर
    (१) आंब्याचे पन्ह
    (२) कच्चा आंबा व भिजलेली
           चण्याची डाळ वाटून त्याचा
            प्रसाद अर्पण करावा. 
  
त्यानंतर लोटांगण घालावे.

हे दोन्ही पदार्थ मानवाला पिडणा-या षडरिपुंच्या गुणांपासून मुक्त आहेत.
 म्हणून 
त्यादिवशी तरी आपल्याला त्रासणारे काम, क्रोध, मोह, मद, मस्तर, लोभ या षडरिपुंपासून दूर राहण्यासाठी ही साधी व सोपी उपासना आपण आपल्या घरी बसून दिवसभरात कधीही करू शकतो.

जो कोणी प्रेमाने 
वैशाख पौर्णिमेला ही उपासना करील त्याच्या घरी ह्या दिवशी आपला सदगुरू हनुमंता बरोबर येऊन जातोच अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धांनी दिली आहे.....

*नाथसंविध्*
*हरि ॐ*
*श्रीराम*
 *अंबज्ञ*
*जय जगदंब जय दुर्गे*

tulsipatra

।।हरि ॐ।।

*पिपीलिकापांथस्थ प.पू.आद्यपिपा दादा*

*आज - १९ एप्रिल;*

*प.पू.श्री आद्यपिपादादा यांच्या समाधिस्थानम् चा स्थापना दिवस आहे.*

त्या अनुषंगाने *प.पू.बापूंचा* एक सुंदर तुलसीपत्र अग्रलेख (१९८) संग्रही आहे .,त्याचे स्मरण करूयात.

 चलेऊ नाइ सिरू पैठेऊ बागा।
फल खाएसि तरू तोरैं लागा।
रहे तहॉं बहु भट रखवारे।
कछु मारेसि कछु जाइ पुकारे।।
*सुंदरकांड ओवी १०४*

 संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी अगदी नि:संदिग्धपणे हे दाखवून देतात की जानकीमातेने आशीर्वाद दिला म्हणून हनुमंताने आदराने ,कृतज्ञतेने ,
उपकृत्यभावाने व प्रेमनिर्भर होऊन परमात्मत्रयीस प्रणाम केला व त्यानंतर तिच्याकडून अ-शोकवनातील फळे खाण्याविषयीची आज्ञा मागितली.
तिच्याकडून ती आज्ञा मिळताच *परत एकदा कार्याला सुरूवात करताना हनुमंत नतमस्तक झाला.*

हा *दुसरा नमस्कार* आता कुठल्याही आशीर्वादाच्या वा वराच्या मागणीविषयी ,वर मिळाल्याच्या आनंदासाठी किंवा फळे खाण्याची परवानगी दिली ,म्हणूनही नाही.

हा *दुसरा प्रणाम* वरील कुठल्याही कारणासाठी नसून,
*फक्त प्रत्येक श्रध्दावानाचे कुठल्याही कार्यातील "पहिले पाऊल" कसे असायला हवे,ते "स्व-आचरणाने" आपल्या वानरसैनिकांना अर्थात "श्रध्दावानांना" दाखविण्यासाठी आहे.*

 *ह्या दुस-या नमस्काराचा एक सुंदर आविष्कार "मी" वारंवार अनेक वर्षे शिरडीतील द्वारकामाईत पाहिलेला आहे.*

*आद्यपिपा* जेव्हा जेव्हा शिरडीत येत ,तेव्हा तेव्हा अगदी कितीही दिवस राहिले ,तरी त्यांचे *मन* भरत नसे.
शिरडीतून बाहेर निघण्याअगोदर *ते* आपल्या दोन्ही मुलांना - *सुचितदादा* व *समीरदादा* आणि *स्वत:च्या पत्नीस* बरोबर घेऊन द्वारकामाईतील त्या सुंदर प्रतिमेसमोर हात जोडून उभे राहत असत.
*काकांच्या हातात एक श्रीफळ असायचे व डोळ्यांत विरहाचे अश्रू!*
त्यानंतर तो नारळ सुचित वा समीरकडे दिला जायचा , द्वारकामाईबाहेरच्या कुठल्याही दगडावर आपटून फोडण्यासाठी व मग ही दोन्ही मुले नारळ फोडून लगबगीने परत येत.
त्या नारळातील पाण्याचे काही थेंब तेथील *पादुकांवर* सिंचन केले जावायचे व काही जल द्वारकामाईच्या सभामंडपातील *बाबांच्या बसावयाच्या शिळेवर* अर्पण केले जायचे.

 अर्धा नारळ फोटोसमोरच ठेवला जायचा व अर्धा नारळ नारळाच्या पाण्याने नव्हे तर *अश्रूंनी चिंब* होऊन *प्रसाद* बनून काकांबरोबर परतायचा.
काका ह्या नमस्कारास *परतण्याची आज्ञा घेणे* असे म्हणत असत आणि म्हणूनच शिरडीतील राहत्या जागेपासून सर्व सामानसुमान घेऊन हा आद्यपिपा आपल्या कुटुंबीयांसमवेत निरोप घ्यायला येत असे व मग तेथूनच मधे कुठेही न थांबता थेट एस.टी.बसकडेच कूच करायचे.

९६ च्या आपल्या पहिल्या रसयात्रेमध्ये साईस्तवनमंजिरी वाचून झाल्यानंतर आद्यपिपांनी नमस्कार केलेलाच होता., त्यांचे सर्व सामान समीरदादांनी तिथे आणलेलेच होते.
पण आता इथूनच बसमध्ये बसावयाचे म्हटल्यावर त्यांनी स्वत: जाऊन नारळ आणलाच व पतिपत्नींनी तशीच आज्ञा घेतली. त्यांचे दोन्ही पुत्र त्यांच्या मागे तसेच उभे होते.
समीरदादांनी तसाच नारळ फोडला.
*फक्त ह्यावेळेस एकच गोष्ट वेगळी होती आणि ती म्हणजे ;  विरहाचे अश्रू नव्हते.*

माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो;
*श्रीहनुमंताचे अधिष्ठान असणा-या "पिपीलिकापांथस्थ" पदावर आरूढ होण्याचा आद्य मान (पहिला मान) मिळविलेला हा पिपीलिकापांथस्थ म्हणूनच कधीही उथळ बनलाच नाही,* 
*त्याचे पाय जमिनीवरून कधी सुटलेच नाहीत आणि म्हणून त्याच श्रीहनुमंताचा संदेश श्रध्दावानांना देऊ शकला.* 

श्रीराम!
अंबज्ञ!!
नाथसंविध्!!!

Sunday, April 3, 2022

mantra gajar

Bapu experience-imp

हा अनुभव वाचा खूपच सुंदर आहे. अंबज्ञ आहे. 

हा बापू कोण आहे, एखाद्या गुंडासारखा दिसतो, तरीसुद्धा का एव्हढी माणसे त्यांना follow करतात. मी बापूला मानणारच नाही असे मनाशी पक्के ठरविले पण असे काय घडले कि हा बापू आता नुसता बापू नाही तर "देव" झाला. सद्गुरू कृपेने आलेला हा अनुभव....... हरी ओम, सर्वप्रथम मी बापूंचा फोटो माझ्या (बोऱ्हाडे) काकांच्या घरी साधारण २००१-२००२ साली पहिला. माझे काका बापूभक्त आहेत. तेव्हा फोटोकडे बघून असे वाटायचे कि हा माणूस नक्की कोण आहे ? अगदी एखाद्या बेवड्या सारखा दिसतो मग हि सर्व माणसे का ह्याची एवढी पूजा करतात. नंतर सूचित दादा, नंदाई आणि बापू ह्याचा फोटो काही गाड्यांवर बघितला. पण बापूंबद्दल माहिती अजिबात नव्हती. थोडे कुतूहल मनात होते पण त्याने काही विशेष फरक पडला नाही. साधारण २००५ साली माझ्या आईला डॉक्टर सामंत ह्यांनी बापूंबद्दल सांगितले, तेव्हा ती बापूंच्या प्रवचनाला गेली आणि तेथून आई, बापू आणि दादा ह्यांचा एक छोटा फोटो घरी घेऊन आली. मी ऑफिस मधून आलो आणि फोटो पाहिल्यावर तिला म्हणालो कि हा बाबा आपल्या घरात पण आला का ? तू कशाला ह्या बाबा लोकांच्या नादी लागतेस. आई म्हणाली कि तुला काय करायचे आहे, तुला पटत नसेल तर गप्प बस. ती पूजा वगैरे करायला लागली तेव्हा मी म्हणायचो कि ह्या सर्वांना वेड लागले आहे. याच दरम्यान ठाणे स्टेशन (पूर्व) जवळ बापूंचे उपासना केंद्र चालू झाले. आई तिथे जायला लागली, आता मी पण तिला घेऊन तिथे बाईक वर सोडत होतो, उपासना साधारण दीड तासाची होती आणि परत घरी या आणि परत तिला आणायला जा असे करण्यापेक्षा मीसुद्धा उपासनेला बसू लागलो. तेथे साधारण ५० लोक येत होते सगळेच बापूंच्या फोटोकडे पाहून पाया पडत होते, डोके ठेवत होते, त्यांची आरती करीत होते सगळेच नवल. मी हे पाहून मनात म्हणायचो कि ह्या सगळ्यांना वेड लागले आहे. सगळ्यांनीच कशी त्यांची बुद्धी गहाण ठेवली आहे. नंतर एकदा आम्ही काकांबरोबर बांद्राला प्रवचन स्थळी गेलो. तिथे गेट नंबर १ च्या समोर बसून राहिलो. बापू आले, त्यांचे ते हात हलवून सगळ्यांना प्रेमाने बघणे मनाला खूप भावले. बापूसमोर प्रदक्षिणा घातली, गर्दी खूप होती. मन आता एकदम कोरे झाले होते आणि शांतता लाभली. बापूंचे प्रवचन ऐकले, बापू एकदा म्हणाले होते कि लोक म्हणतात कि कृष्णाला सोळा सहस्र बायका होत्या इत्यादी इत्यादी. पण कृष्ण जेव्हा कंसाला मारायला गेला तेव्हा तो अवघा १४ वर्षाचा पण नव्हता. मग तो एवढ्या बायकांशी लग्न कसे बरे करेल. साधारण वैदिक पद्धतीने एक लग्न करायला किती वेळ लागतो गुणिले एव्हढी लग्न करायला किती वेळ लागेल, बापूंनी अगदी सर्वांना calculate करून दाखविले आणि करायला हि लावले. मग बापूंनी ह्या मागचे खरे कारण सांगितले. खरंच सांगतो माझ्या मनाला बापूंचे बोलणे खूप पटले कारण ते वास्तव होते. बापू कधीच मोठ्या मोठ्या गोष्टी करत नाहीत, अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात समजून सांगतात. तेव्हा माझ्या मनात बापूंबद्दल आदर वाढला. पण प्रेम उत्पन्न नाही झाले. त्या दरम्यान बापुंची रामनाम बँक ची CD लावली होती. बापू म्हणाले कि मी एक बँक काढणार आहे. मी हळूच आईला म्हणालो कि आता हि सगळी लोक ह्याच्या बँकेत पैसे टाकतील आणि हा करोडो रुपये घेऊन भारतातून पळून जाईल. नंतर बापू म्हणाले कि हि जगातील एकमेव बँक आहे कि जिथे  पैशाचा व्यवहार नसेल आणि बापूंनी सर्व काही explain केले. मला तेव्हा माझी स्वतःचीच लाज वाटली आणि मी जसा हा बापू समजतो आहे तसा हा बिलकुल नाही. हा इतर बाबा बुवांसारखा नक्कीच नाही. एक दिवस आई बांद्राला जायला निघाली मी पण तिच्या बरोबर गेलो आणि त्या दिवशी रामनाम वह्यांचे वाटप झाले, मी पण एवढ्या गर्दीत एक वही घेतली आणि ती घरी येऊन लिहायला चालू केली. चार दिवसात वही लिहून पूर्ण झाली पण ती कधी submit झाली नाही. पुढे २००६ साली माझे लग्न झाले, पत्नीचे Nursing चे शिक्षण पण नायर हॉस्पिटल मधून झालेले होते आणि बापूंचे MBBS, MD पण नायर हॉस्पिटल मधूनच झालेले. ती पण बापूंना ओळखत होती. तेव्हा तिचे सहकारी तिला बोलायचे कि बापू खूप चांगले डॉक्टर आहेत, त्यांची मेहनत, त्यांच्या बद्दल असलेला आदर इत्यादी हॉस्पिटल मधील गोष्टी तिने मला सांगितल्या होत्या. एकदा म्हणाली कि त्यांच्या senior staff वगैरे म्हणायच्या कि बापू देव आहे, ते मनातले पण सर्व जाणतात. मी म्हणालो या सर्वावर तुझे काय मत आहे तिने स्पष्ट शब्दात मला सांगितले कि ह्या सर्वांवर माझा अजिबात विश्वास नाही. मी सुद्धा तेच म्हणालो कि माझाही विश्वास नाही आणि विषय तिथेच संपला. 

      पुढे मी कधीच बापूंकडे प्रवचनाला गेलो नाही आणि कधी उपासना केंद्रातही गेलो नाही. साधारण दोन वर्षाचा काळ लोटला २००८ साल सरत होते. एकदा अचानक पहाटे एक तीन तोंड असलेला देव, पितांबर नेसलेले, एक हातात चक्र फिरत होते, एक हातात त्रिशूळ, एक हातात शंख, एक हातात कमळ, कमंडलू आणि एक हातात सोन्याची गदा आणि तीही किती लकलक करीत होती. तो एवढा मोठा आकाशा एवढा आणि मी एकदम छोटा. मी फक्त मान वर करून त्याच्याकडे नुसते पाहत होतो आणि तो हि स्मित हास्य करीत माझ्याकडे एकटक पाहत होता असे बऱ्याच वेळ चालले. कोणीच कोणाशी बोलत नाही फक्त एकमेकांकडे पाहणे. काही वेळाने मला खाली छोटी छोटी झाडे दिसली, एक मंदिर दिसले, त्या मंदिरात तीन देवी, समोर तुळशी वृन्दावन सारे काही मी पाहत उभा होतो. अचानक सगळं क्षणार्धात गायब झाले आणि बापू प्रत्यक्षपणे समोर आले आणि म्हणाले," बाळा बरेच दिवस झाले रे, तू माझ्या दर्शनाला नाही आलास लवकरात लवकर एकदा येऊन जा" आणि मी हो बापू म्हणत जागा झालो. सगळं डोळ्यासमोरून जात नव्हते, मी हिला झोपेतून उठवले आणि जे काही घडले, जे काही पहिले ते सर्व सांगितले. त्यावर ती म्हणाली कि तुम्हाला स्वप्न पडले असेल आपण कुठे बापूंना follow करतो. मी लगेच म्हणालो अग आपण follow करत असताना असे घडले असते तर गोष्ट वेगळी असती पण आपण बापूंना काहीच मानत नसताना हे सगळे कसे काय दिसू शकते. मी ऑफिसला आलो आणि लगेच माझा एक मित्र जो बापूंच्या प्रवचनस्थळी कार्यकर्ता होता (स्वप्नील चाळके) त्याला घडलेले सर्व काही सांगितले. तो म्हणाला कि बापूंनी तुला साक्षात दृष्टांत दिलेला आहे. मी म्हणालो मला ते काही सर्व कळत नाही पण मला आता तुझ्या बापूकडे घेऊन चल. मला त्यांना बघायची खूप ओढ लागली आहे. त्यावर तो म्हणाला कि बापू आता गुरुवारीच दिसतील आज तर सोमवार आहे. मी तुला येत्या गुरुवारी माझ्याबरोबर घेऊन जातो. त्याच दिवशी मला ५ वाजता आईचा फोन आला आणि ती मला म्हणाली कि तिचे काही काम आहे एक ठिकाणी, तू पण येतोस का माझ्याबरोबर. मी हो म्हटले आणि address लिहून घेत होतो. तितक्यात माझा दुसरा मित्र (सतीश गुरव) मला म्हणाला कि आरे हे ठिकाण तर माझ्या घराच्या जवळच आहे आणि आपल्या कंपनीची पनवेल बस तेथूनच जाते. मग आम्ही दोघे पनवेल बसमद्धे बसलो. मी नोकरी करत असलेली कंपनी रबाळे नवी मुंबई येथे आहे, त्याच दिवशी मी ठाण्याला राहत्या घरी यायच्या ऐवजी ऑफिस सुटल्यावर विरुद्ध दिशेने निघालो ! साधारण सायंकाळी सात वाजता आम्ही दोघे एका ठिकाणी उतरलो आणि गप्पा मारत चाललो. इतक्यात कशाचा काही संदर्भ नाही आणि माझा मित्र मला अचानक म्हणाला कि आकाशात बघ असे वाटते कि बापू तुझ्याकडे पाहून हसतात. मी वर पहिले आणि त्या दिवशी आकाशात चंद्रकोर आणि त्यावर बुध आणि शुक्र असे दोन ग्रह एक हसरा चेहरा होता हीसुद्धा एक ऐतिहासिक घटना होती. मी लगेच त्याला म्हणालो कि तू बापूंचे नाव का घेतलेस ? तू पण जास्त विश्वास ठेवत नाहीस आणि मी पण. मग असे का ? तो म्हणाला आरे असेच घेतले. मी म्हणालो असेच नाही यामागे नक्कीच काहीतरी आहे. त्यावर मी त्याला जे जे मी पहाटे पहिले होते ते ते सर्व काही सांगायला लागलो. आरे बापूंचे मंदिर आहे कुठेतरी, तेथे तुळशी वृन्दावन आहे, तीन देवी आहेत इत्यादी. ते सर्व त्याने ऐकले आणि तो म्हणाला कि तू खरंच सांगतोस ना ! मी लगेच म्हणालो कि माझ्यावर विश्वास नसेल तर तू स्वप्नीलला  फोन लाव आणि विचार. त्याने चालता चालता मला थांबविले आणि म्हणाला तू मागे वळून बघ. मी म्हणालो," काय आहे मागे ?" त्यावर तो परत म्हणाला कि तू फक्त मागे फिरून बघ. मी मागे वळून पहिले तर माझा माझ्या डोळयांवर विश्वासच बसेना. समोर जुईनगरचे गुरुकुल, तेच तुळशी वृन्दावन, समोर तीन देवी, बाजूला छोटी छोटी झाडे, जे जे मी सकाळी स्वप्नात पाहिले ते सगळं संद्याकाळी माझ्या समोर जसेच्या तसे होते किंबहुना मी त्या ठिकाणी आपोआप जाऊन पोहचलो होतो. मी सतीशला सांगत होतो कि इथे एवढा मोठा देव आहे, बापू आहे सर्वकाही. त्याने लगेच स्वप्नीलला फोन लावला, स्वप्नील मला म्हणाला कि आरे तू तर ठाण्याला राहतोस ना मग आजच बापूंच्या जुईनगर येथील गुरुकुलला कसा काय जाऊन पोहचलास ! मला जुईनगरला बापूंचे असे काही गुरुकुल आहे ह्याची तिळमात्रही माहिती नव्हती. मी अगदी शांतपणे आत गेलो, बापूंच्या फोटोसमोर बसलो, कान पकडले आणि म्हणालो कि हे परमेश्वरा एवढे वर्ष तू मला बोलवत होतास पण मीच कधी ऐकले नाही, पण आज तू स्वतः मला कोण आहेस हे प्रत्यक्षपणे दाखविलेस आणि ह्या ठिकाणी घेऊनही आलास. आज ह्या क्षणापासून मी पूर्णपणे तुझा झालोय. माझ्यासाठी सगळं जग एका बाजूला आणि तू एका बाजूला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या काकांकडे गेलो आणि रामनाम वही मागितली. त्यांच्याकडे ती नव्हती, पण त्यांच्या ऑफिसच्या लॉकर मद्धे २ वह्या होत्या. मी त्यांच्याबरोबर त्यांच्या ऑफिस मद्धे गेलो आणि एक वही घेतली आणि लिहायला सुरुवात केली...... पुढे काही दिवसांनी बापूंचे घर शोधत खाररोड स्टेशन वरून चालत पुढे आलो, दुपारी आरती चालू होती. मी जसा जसा पुढे चालू लागलो तेव्हा पहिला फोटो पहिला तो दत्तात्रेय - दत्तगुरूंचा. तो बघताचक्षणी डोळ्यात पहिल्यांदा पाणी आले कारण जो देव मी माझ्या दृष्टांतात पहिला होता तो हाच होता. त्या क्षणापासून माझा बापूच माझ्यासाठी सर्व काही झाला होता. बापूला शिव्या घालणारा मी कधी बापू बापू करायला लागलो हे माझे मलाच कळले नाही. पुढे एक वर्षानंतर एकदा भारताबाहेर गेलो असताना माझ्या पत्नीने माझ्या नावाने एक साईसत्चरित्र ग्रंथ बापूंच्या सहीसाठी दिला होता. मी परत आल्यावर तिने मला हि गोष्ट सांगितली मी लगेच पुढील गुरुवारी त्या counter ला गेलो आणि ग्रंथ सही होऊन आला होता. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते, मी तो ग्रंथ माझ्या हृदयाशी घट्ट कवटाळला आणि बापूंनी कुठे सही केली ते शोधू लागलो. ते पण सापडले अध्याय १२ मधील ओवी १५३ ते १६६. एक डॉक्टर शिर्डीत जातात, ते म्हणतात साईबाबा मुसलमानाच्या पायी मी नमन करणार नाही. पण मला नमस्कार कर असे बाबा पण कधी बोलणार नाही असा विश्वास मामलतदार त्यांना देतात, मी साईबाबांना मानणारच नाही असे मनात शंका ठेवलेले डॉक्टर पुढे सर्वाबरोबर द्वारकामाईत येतात आणि काय नवल घडते कि नाही नाही म्हणणारे डॉक्टरच सर्वप्रथम बाबांच्या पुढे लोळण घालतात. हे पाहून सर्वांना नवल वाटते तेव्हा ते डॉक्टर म्हणतात कि रामरूप म्या देखील शामल, त्यांनी राम रूप पहिले आणि सगळा भ्रम मोडून काढला. जसा हा साई त्या रामरूपाने त्यांच्यासाठी त्यांचा देव झाला अगदी तसाच हा बापू माझ्यासाठी ह्या दत्त रूपाने माझ्यासाठी माझं सर्वस्व झाला !!!

 अंबज्ञ. देवेंद्रसिंह डोंगरे. उपासना केंद्र - ठाणे

Sunday, January 30, 2022

Bapu pravachan on ashtavinayak.. some notes..

अनिरूद्ध बापूंचे प्रवचन 
*(२९ जानेवारी २००९)*

जीवात्मा नाही-फक्त ते जीव आहेत. प्रत्येक जीवात्माकडे ह्या परमेश्वराच्या अष्टबीज ऐश्वर्यांची नऊ अंकुर ऐश्वर्यांमध्ये रूपांतर करणारा हा परमात्मा नांदत असतो. आणि तो भगवंताची- -कृपा परमेश्वराची कृपा प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावी म्हणून जी रचना-व्यवस्था स्थूल शरीरामध्ये, सुक्ष्म शरीरामध्ये आणि तरल शरीरामध्ये म्हणजेच भौतिक देहामध्ये, प्राणमय देहामध्ये आणि मनोमय देहामध्ये उत्पन्न करीत असतो; ही व्यवस्था, ती यंत्रणा म्हणजे गणपती आणि त्या व्यवस्थेतील आठ महत्वाची केंद्रं, आठ महत्वाची स्थानं म्हणजेच अष्टविनायक. दत्तगुरूंच्या अष्टबीज ऐश्वर्याचं रूपांतर मनुष्याच्या जीवनामध्ये नऊ अंकुर ऐश्वर्यांमध्ये करण्याचं यंत्र म्हणजे त्याला सगळ्या प्रकारे कृपा मिळविण्यासाठी-क्षमा मिळविण्यासाठी ■ परमात्मा जी यंत्रणा राबवितो त्या यंत्रणेची महत्वाची आठ स्थानं म्हणजे अष्टविनायक आणि म्हणून ह्यांचा संबंध अष्ट भावांशी आहे. परमेश्वराला बघितल्यानंतर ज्या भक्ताचे अष्टभाव  जागृत होतात तेव्हाच भगवंताची पूर्ण कृपा होते असं आम्ही मानतो. कारण ह्यातला प्रत्येक भाव ह्या प्रत्येक → एक एका स्थानाशी निगडीत आहे. निसर्ग कसा आहे? तर अष्टधा आहे, आठ प्रकारचा आहे. अष्टधा प्रकृती म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये काय किंवा निसर्गाच्या जीवनामध्ये काय; ही प्रमुख आठ स्थानं आहेत की, जिकडे परमेश्वरांच्या बिजाचं रूपांतर परमात्म्याच्या अंकुरांमध्ये व्हावं लागतं आणि ती घडविणारी यंत्रणा म्हणजे गणपती आणि त्याची आठ स्थानं अशी आठ स्थानं तुमच्या शरीरामध्ये आहेत, देहामध्ये आहेत; तशी सृष्टीमध्ये आहेत आणि त्याच आठ स्थानाला अष्टविनायक म्हटलेलं आहे. तुमच्याकडे, तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणांमध्ये, तुमच्या शरीरामध्ये भक्ती करताना जे अष्टभाव जागृत होन कंप सुटणं, डोळ्यातून अश्रू येणं, गळा भरून येणं, घाम येणं हे जे सगळे. रोमांच उभं राहणं, हे जे अष्टभाव आहेत त्या प्रत्येक भावाचं स्थान म्हणजे अष्टविनायकातलं एक एक स्थान. म्हणजे आम्हाला  कळेल अष्टविनायकाचं स्थान म्हणजे काय? अष्टविनायकाची स्थानं तुमच्या शरीरात आहेत, तुमच्या देहात आहेत प्रत्येकाच्या आणि ती स्थानं ऋषींनी तपश्चार्येने स्थूल रूपात सिद्ध केलेल्या जागा आहेत तुमच्या शरीरात. अष्टविनायककाची जी स्थानं की ती स्थानं सामान्य मनुष्याचं अज्ञान जाणून ऋषींनी स्वतःच्या तपश्चार्याने स्थूल रूपाने सिद्ध केली. तिचं पौ स्थानं म्हणजे अष्टविनायकाची तिर्थक्षेत्रे. ज्या अष्टविनायकाला मयुरेश्वर गणपती, रांजणगावचा  गणपती, महडचा गणपती वगैरे; आम्ही जातो ती सगळी अष्टविनायकाची स्थानं. म्हणजे ऋषींनी प्रत्येकाच्या देहामध्ये असणाऱ्या अष्टविनायकाच्या स्थानांना स्वतःच्या तपश्चर्येच्या जोरावर बाहेर प्रकट  केलं की जेणेकरून मनुष्य अंतर्मुख नसतो, आतमध्ये  बघू शकत नाही. त्याला बाहेरच्या अष्टविनायकाचं दर्शन घेता यावं आणि त्याच्यामुळे त्याच्या  शरीरातर्गंत, त्याच्या देहांतर्गत अष्टविनायक जागृत  व्हावेत, प्रत्येक मनुष्याच्या देहातील जा अष्टविनायक जागृत व्हावेत ह्याचसाठी ऋषींनी आ तपश्चर्यांनी अष्टविनायकांची स्थानं उत्पन्न तुम् केलीत. आता आम्हाला कळेल की, हो अष्टविनायकाची स्थानं म्हणजे नक्की काय? मात्र अंग  सुरूवातीला सांगितलेल्या फोनचं लक्षात ठेवा.अष्टविनायकाची आठ स्थान आहेत. तो मोबाईल  चार्ज आहे. पण आमच्या मनातील विनायक जर  चार्ज नसेल तर ते दोघे एकमेकाला जोडले गेले  नाहीत. तर मधल्या स्पेसचा आम्हाला उपयोग काय? म्हणजे केवळ दुर्वा फेकण्यासाठी आणि पन्नास रूपये , फेकण्यासाठी आम्ही जाणार असू अष्टविनायकाला तर त्याचा उपयोग काहीही नाही. *उलट आम्ही घरी ना बसून अत्यंत प्रेमाने-श्रद्धेने अष्टविनायकाची नुसतीनावं घेऊन सुद्धा; *नावं येत नसतील तर आठ वेळा 'विनायक' असं म्हणून नमस्कार केला तर आमच्या मनातले अष्टविनायक जागृत होऊन त्या त्या प्रमाणात अधिक कार्यरत होतील व आम्हाला संपन्न करतील.* तर आम्हाला कळलं पाहिजे, अष्टविनायक म्हणजे नक्की काय? अष्टविनायक म्हणजे केवळ गणपतीची आठ पवित्र स्थानं नव्हेत. अष्टविनायक म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या देहात जी महत्वाची आठ स्थानं आहेत की, ज्यांच्यामधून परमेश्वराची अष्ट बीज ऐश्वर्य म्हणजे परमेश्वराची कृपा, परमात्मा म्हणजेच त्या परमेश्वराचा पौत्र- तो राम आमच्या जीवनांमध्ये नऊ अंकुर ऐश्वर्यांमध्ये रूपांतरीत करतो म्हणजे आम्हाला क्षमा मिळवून देतो, आम्हाला कृपा मिळवून देतो; ती स्थान म्हणजे *अष्टविनायकाची स्थानं आणि म्हणून ती तिर्थक्षेत्र पवित्र आहेतच. पण त्यापेक्षा आम्हाला माहित पाहिजे आम्ही जी भक्ती करतो त्याच्यामध्ये जेव्हा आमचे अष्टभाव जागृत होतात तेव्हा आम्हाला खरीखुरी अष्टविनायकाची यात्रा घडते. मग ते आमच्या घरी बसून जर आमचे अष्टभाव जागृत झाले तरी अष्टविनायकाची यात्रा घडली आणि अष्टविनायकाच्या आठवेळा यात्रा केल्या, आठशेवेळा केल्या आणि भाव जागृत झाला नाही तर त्या यात्रेला फळ फक्त तेवढंच; आलं लक्षामध्ये. महत्वाचं काय? भगवंताच्या भक्तीमध्ये तुमचे अष्टभाव जागृत होणं, तुम्हाला एवढा आनंद होणं की, तुमच्या तोंडातून शब्द निघायला पाहिजे, अंगाला घाम फुटला पाहिजे, अंगावर रोमांचं उभे राहिले पाहिजेत. असे हे सगळे अष्टभाव. गळा भरून आला पाहिजे, हृदय भरून आलं पाहिजे, डोळ्यातून अश्रू - वाहिले पाहिजेत. अशी स्थिती जेव्हा तुमची होते तेव्हा समजायचं की मला अष्टविनायकाची यात्रा घडली....*


Saturday, January 29, 2022

important pravachan...( he cures..)

श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०७.२०१४)

MarathiHindi

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०७.२०१४)

॥ हरि ॐ ॥

खूप दिवसांनी भेटलोत, डेफिनेटली खूप छान वाटतं. तुम्ही लहान असताना, बाबा तुम्हाला उचलून घेतात, पण बाबांना ऑफिसला पण जायचं असतं. बाळासाठीच ते ऑफिसला जात असतात, बाळाचं भविष्य चांगलं होण्यासाठी आई-बाबांना ऑफिसला जावं लागतं. बाळांच्या भविष्याची तरतूद करायची असते. मी ही असाच माझ्या बाळांसाठी ऑफिसला गेलो होतो. पण माझं ऑफिस वेगळं आहे. बाळांसाठी जे जे आवश्यक आहे ते घडविण्यासाठी आई - बाबांना मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी आई-बापाला बाळाचा आणि बाळाला आई-बापाचा विरह सहन करावा लागतो. माझं जे काही चाललं होत तपश्चर्या, उपासना, व्रत हा बिझनेस होता, मी त्याला व्यापार म्हणणार नाही. बिझी- नेस होता हाच राईट वर्ड आहे. For one simple reason, माझ्या बाळांसाठी. 

बापू मागच्या वेळी तपश्चर्या केली, आता उपासना का करताय? एकच कारण! माझ्या बाळांसाठी. माझी बाळं साधी आहेत. ती एकमेकांशी भांडतात तरी ती भोळी आहेत. काही स्वत:ला स्मार्ट समजतात. त्यांना वाटतं मी फसवलं, मी असं उत्तर दिलं, ही बाकीची लोकं भोळी आहेत. पण खरं तर माझी ९९.९९% बाळं अतिशय साधी-भोळी आहेत. ते इतरांपेक्षा स्वत:ला स्मार्ट, उगीचच पापी समजतात व इतरांना भोळं समजतात. हा एवढा मोठा माझ्या लेकरांचा समाज खरंच खूप साधा आहे आणि बाहेरचं जग खूप वेगळं आहे, विचित्र आहे, वाईट आहे. बाहेरच जे जग आहे ते अतिशय कठोर, लबाड आहे. अतिशय गोड चेहरा ठेवून जगाला फसवताहेत. मला साधी-भोळी माणसं आवडतात. साधंसुधं असणं ही अतिशय क्रेडिटेबल गोष्ट आहे, ही good quality आहे.

आज मी माझं ध्येय पूर्ण करून आलोय. आजपासून Chandika Spiritual Currency सुरू होत आहे. चण्डिका करन्सी हा मापदंड, परीक्षा समजू नका. गाठी मारण्याचा हा प्रकार आहे. Chandika Spiritual Currency ही रामनाम बँकेसारखीच खूप सुंदर गोष्ट आहे. समीरदादा आणि त्यांच्या आय.टी. टीमने ह्यावर प्रचंड मेहनत घेतली आहे. Chandika Spiritual Currency प्रत्येकासाठी प्रगती करण्यासाठी नक्कीच आहे. पण मी जे व्रत केले त्याचा संबंध ह्याच्याशी नाही. माझ्या व्रताचा संबंध फक्त तुमच्या faith शी आहे. 

तुम्ही जिथे जिथे जाता, फिरता, खाता-पिता, तुमची भांडणं बघितलीत, तुमचा राग, तुमचं डिप्रेशन बघितलं. कोणीही एवढं पापी-वाईट नाही. मी बघत गेलो, प्रत्येकाला चांगलं करण्याची, चांगलं होण्याची इच्छा आहे. आपलं आणि इतरांच चांगलं व्हावं असंच वाटत होते. येणारा काळ बघा. आताचा काळ बघा. सायन्स प्रचंड speed ने प्रगती करत चाललं आहे. ही प्रगती चांगल्या प्रकारे उपयोगात आणली तर चांगलं आहे आणि वाईट प्रकारे उपयोगात आणली तर वाईट आहे. मुलांच्या शाळेच्या फी पाहून मी थक्क झालो. पगार वाढलेत पण proportion same नाहीए. संपूर्ण जीवन नोकरी करूनसुद्धा हाती काही उरत नाही. दुसर्‍या बाजूला पैशाची किंमत उरलेली नाही. आज कमावला उद्या गेला. अज्ञानामुळे मुलं चुकीच्या मार्गावर जाताहेत. बाहेर लांडगे, वाघ टपले आहेत. आईवडिलांना माहीत नाहीए मुलं काय करताहेत. मुलं चांगली आहेत पण तरीही चुकीचं वागताहेत. माझी बाळं चांगली आहेत पण त्यांच्या घरीही हे सगळं आहे. आधी नोकरी नव्हती म्हणून रडतो, आता नोकरी मिळाली म्हणून रडतोय का तर, नोकरीत एवढा त्रास आहे की काहीही करू शकत नाही. जायचा time fix आहे, पण येण्याचा नाही. नसेल झेपत तर सोडून द्या, कारण प्रचंड लोक available आहेत कामासाठी अशी परिस्थिती आहे. कोणाच्या मागण्या कोण ऐकणार? दहा बाय दहाचं घर घेतानाही फरफट होतेय. कुठेतरी पैसे भरतो. Provident Fund वरून कर्ज काढतो, कर्ज फेडायचं असतं म्हणून पहिली दहा वर्ष मूल होऊ देत नाही, नंतर मूल होत नाही. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाही अशी परिस्थिती आहे. वर्तमानपत्र उघडलं तर घात-पात आणि अपघातच असतात. ह्याचा अर्थ आम्ही घाबरूनच जगायचं का? नाही! मला हे अजिबात मान्य नाही. आयुष्यभर टेन्शन घेऊन जगायचं? का?  आज प्रत्येक पालक चिंतेत आहे. त्यासाठीच मी हे व्रत, उपासना केली होती. 

बापू, आम्ही (faith) विश्वास ठेवायचा म्हणजे काय? आम्ही साधी माणसं आहोत आमचा विश्वास डळमळतो. तुमचा विश्वास डळमळतोय, तुमच धैर्य खचतंय म्हणूनच हा विश्वास वाढवायला हवा. ‘आईला सांगा, ‘आमची श्रद्धा वाढव, विश्वास वाढव, सबूरी वाढव.’ तिच्याकडे  अधिक श्रद्धा मागा, अधिक विश्वास मागा, अधिक सबूरी मागा. जे कमी पडतंय ते ती वाढवायला बसलीय. जेवढं जमतं त्याप्रकारे करत रहा, पण काही तरी करा. खंड पडला तरी काहीही बिघडत नाही.

लाख वर्षापूर्वी पृथ्वीची रचना वेगळी होती. नंतर बेटं उत्पन्न झाली. ही सगळी गॅप तिनेच भरून काढली. जग बनवताना त्यावर लाकूड, संगमरवर काहीही नव्हतं तरी त्याने जग निर्माण केलं. त्याला आमच्या जीवनात काहीही करण्यासाठी कुठल्याही instrument ची गरज नाहीए.

माझ्या घरात खायला काही नाही, नोकरी नाही, धंदा पण बंद पडलाय. काहीही हरकत नाही. विश्वास ठेवा - तुम्ही विश्वास ठेवलात की तो सगळं करू शकतो. तो कुठल्या मार्गाने करेल ते तुम्हाला माहीत नाही.

तुम्ही वादळात सापडला- तुम्हाला पोहता येत नाही. विश्वास ठेवा - समुद्र कितीही मोठा असला तरी सगळे समुद्र आईच्या शंखात मावले होते. ती काहीही करू शकते ह्याचा विचार करा.

ह्या उपासनेतून मला दोन महत्त्वाची वाक्य सांगायची आहेत. भक्ती करताना आणि व्यवहार करताना थोडं वेगळं वागा. मी योद्धा आहे, संत नाही. मी योद्धयाच्या मार्गानेच जाणार.

भक्ती करताना, परमेश्वराचं स्मरण करा आणि प्रार्थना करा -“मी कोणीच नाहीय, तूच मला घडवणार आहेस, हे देवा सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे. तू करशील तसंच होणार, अगदी माझा व्यवहारसुद्धा.”

काम करताना, आईला सांगायचं - “आई मी आता कामाला लागतोय” आणि मग विचार करा हे काम पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे. आणि कामाला लागा.

आणि मग बघा, काम करताना लक्षात ठेवा सगळं माझ्यावर depend आहे. मग बघा, तुमच्या कामाने तुमची अक्कल, तुमची गती, तुमची क्षमता अधिक वाढेल.

व्यवहार आणि अध्यात्म एकत्र कसं आणायचं हे आपल्याला कळत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, तुमच्या घरी एक मुलगी लपण्यासाठी मदत मागतेय आणि तिच्या मागे गुंड लागले आहेत तिच्यावर बलात्कार करण्यासाठी. आणि तुम्ही जर त्या गुंडांना सत्य सांगायला गेलात की मुलगी इथेच आहे म्हणून तर ते वास्तव असेल पण सत्य असणार नाही. ज्यामधून अपवित्रता निर्माण होते ते वास्तव असू शकेल पण सत्य असू शकणार नाही.

‘त्या’चं काम तो चोख करतच असतो. प्रार्थना करताना हे सांगायचं की - ‘सर्व तुझ्यावर अवलंबून आहे, सगळं तूच बघणार आहेस आणि अशी प्रार्थना करून काम करताना म्हणायचे - ‘हे काम माझ्यावर अवलंबून आहे. माझं सगळं जग तुझ्यावरच अवलंबून आहे.’

 जग ‘ॐ’कारा मधून म्हणजेच शब्दामधून प्रगटलं. तशीच आमच्या जीवनसृष्टीची जी ताकद आहे ती त्या भगवंताच्या शब्दातून प्रगटते. भगवंत आत्म्याल्या सांगतो, त्या शब्दाची ताकद संपूर्ण शरीराला मिळते. पण आमच्यापर्यंत ती पोहचत नाही कारण आम्ही सतत विचार करत असतो, आमच्या मनात विचारांचा गोंगाट सुरू असतो म्हणून तो शब्द जीवात्म्यापर्यंत पोहचत नाही. उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत मनात सतत विचार चाललेले असतात. रस्त्यावरून चालताना आपण बघतो काही माणसं मोठमोठ्याने एकटेच बोलत जातात. तसेच तुम्ही मनातल्या मनात बोलता. विचार बंद करायचे म्हटले तर आणखी विचार वाढतात. विचारांमुळे मनात कल्लोळ, गोंगाट तयार होतो त्यात आईचा शब्द विरून जातो. आमच्यात सगळं आहे. आपण ग्रंथात बघतो परमात्मा, परमात्मत्रयी सगळं आमच्यात आहे. आमच्याच शरीरात आहेत.

दररोज रात्री-संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसं - ‘ध्यान’ करा. उपनिषदामध्ये सांगितलं आहे त्या त्रिविक्रमाने त्या परशुरामाने ‘ध्यान’ कसं करायचं ते. आईच्या चेहर्‍याकडे पाच मिनिटं बघायचं, डोळे बंद करायचेत, तिचं रूप आठवायचं. डोक्याला ताप न देता एवढं जरी केलं तरी जीवात्म्याला तिचा शब्द ऐकता येईल. त्या शब्दामुळे जीवात्म्याला ताकद मिळेल. ती ताकद तुमच्या मनात, शरीरात, प्राणात पसरते. उपासना करताना लक्ष लागत नसतं. पाच मिनिट फोटोकडे बघताना कुठलाही विचार मनात येऊ देऊ नका.  दिवसातून पाच मिनिटे तरी मी आणि माझा देव एवढाच विचार करा. प्रार्थनेनंतर सांगायचे, ‘हे सद्‌गुरुराया मला श्रद्धा, भक्ती दे, विश्वास दे. माझा विश्वास वाढू दे, माझी श्रद्धा वाढू दे, माझ धैर्य वाढू दे.’

‘मला श्रद्धा द्या, मला धैर्य द्या, मला विश्वास द्या, मला पैसा द्या’ असं म्हणायचं नाही. तुम्ही जर त्या परमात्म्याला मानत असाल तर तुमच्याकडे ते असणारच आहे. ह्या मागण्यात नकारात्मकता आहे. आईला आणि तिच्या पुत्राला भीक मागितलेली आवडत नाही. तिला म्हणायचं - ‘अधिक दे’. काय मागायचं - ‘हे मोठी आई मला अधिक सुख दे, अधिक धैर्य दे, अधिक आरोग्य दे’ उच्चार करायचा असा की, माझ्याकडे आहेच पण आणखी दे, अधिक दे. - ‘थोडा है.......... थोडे की जरूरत है!’

हे सगळं ती कशी वाढवणार ह्याचा विचार करू नका. तुम्हाला जे मोठं वाटतं ते त्यांच्यासाठी खूपच छोटं असतं. ही माऊली माझं कसं करणार? हा तुमचा problem नाहीये. जन्मलेल्या बाळाला आई दूध पाजते इतकं ते सोपं असतं.

पण माझ्या बाळांनी दीनवाणीपणे मागितलेलं मला चालणार नाही. मला माझी बाळं हताश, दीनवाणी झालेली आवडत नाहीत. संकटं येतात पण संकटातून बाहेर काढण्यासाठी आई व तिचे पुत्र आहेत. तिचा प्रथम पुत्र दत्तात्रेय-हनुमन्त, द्वितीय पुत्र किरातरुद्र, तिसरा परमात्मा - तो देवीसिंह तयार आहेत. सिंह आला की त्याच्या गुरगुरण्यानेच कशी तरसं पळून जातात. तुमच्या जीवनातल्या अडचणी पण तरसासारख्या आहेत. त्याची entry झाली की तरसांची पळापळ होते.

पैसा अजिबात नसेल, घरात जेवायला काहीही नसेल तरीही मागा - 
‘आई , आतापर्यंत जेवढे पैसे होते त्यापेक्षा अधिक दे.’
‘आई, आतापर्यंत जेवढं अन्न घरात आलं त्यापेक्षा अधिक दे.’
जाड आहात तर मागा, ‘आई, मला अधिक बारीक कर, अधिक चपळ कर.’ 
ह्या सकारात्मक मागण्यामुळे ही जी सिस्टम आईने उभी केली आहे ती सहजतेने तुम्ही वापरू शकाल. ह्याची किल्ली कुणाकडेही दिलेली नाहीए. ती तुम्हालाच दिली गेलीय. या योजनेत ‘श्रीश्वासम्‌’ पूर्णत्त्वाला पोहचलेला आहे. ‘श्रीश्वासम्‌’ ही एक आगळीवेगळी गोष्ट आहे. ही प्रत्येक गोष्टीवर काम करणारी आहे. ही सगळ्याच्या पलीकडे नेणारी गोष्ट आहे.

समजा तुम्ही गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताहेत पण अभ्यास करत नाहीत. तो गुरुक्षेत्रम्‌ मंत्र तुम्हाला अभ्यास करायला भाग पाडेल. बाबांकडून तुम्हाला धपाटे घालून तुमच्याकडून अभ्यास करवून घेईल. 

जिथे तुमचा हात पोहचू शकत नाही. तिथे तो स्टूल आणि स्टूल पकडायचे घट्ट हात देईल. तरीही तुमचा हात तिथपर्यंत पोहचत नसला तर तो अगदी सावकाशपणे ती वस्तू काढून तुम्हाला देईल. अधिकाची अपेक्षा ठेवा ह्यात काहीही चूक नाही.

तुमच्या जीवनात दु:खच असेल, असू शकतं. मग ह्या सिस्टमकडे काय मागायचं? ‘मला अधिक दु:ख दे’ नाही. दु:खाने जीवन भरलेलं असेल. तुमच्या जीवनात दु:खाचा महापूर आलाय, तेव्हा काय मागायचं -‘आई मला माहितीय आहे. तू माझं दु:ख कमी करतेस, तू माझं दु:ख कमी करत राहणार आहेस आणि दु:ख शून्य करणार आहेत.’ ह्यासाठी विश्वास लागतो. विश्वास मागा तिच्याकडे.

तुमचं जीवन समुद्राच्या तळावरून एव्हरेस्ट शिखर होईल - ही भविष्यवाणी नाहीए. ही fact आहे. मी एम.डी. डॉक्टर आहे आणि माझ्या आईच्या कृपेने माझे diagnosis कधीही चुकत नाही. 

आजपासून एक विश्वास ठेवायचा माझ्या डोक्यावरचा हात हा माझ्या सख्ख्या बापाचा आहे. He is My Real Father. हा माझा सख्खा बाप आहे - हा भाव असला पाहिजे. माझ्याकडे अमूक गोष्ट नाही असं म्हणायचं नाही. ‘आई अधिक दे’ असं म्हणायचं. ‘आई माझं दु:ख कमी करतेय’ असं म्हणा. ‘दु:ख कमी करायला सुरुवात कर’ असं म्हणू नका कारण त्याने सुरुवात केलेली आहेच. विश्वासामुळेच ‘ॐ’चा ध्वनी शरीरात प्रवाहित करता येतो आणि मनाच्या, शरीराच्या रोगांवर उपचार करता येतो. डॉक्टर नेहमी म्हणतात - ‘I Treat, He Cures’ ‘आम्ही उपचार देतो, भगवंत ठीक करतो.’ उपचाराबरोबर प्रेमाचे शब्द, उदी, प्रार्थना औषधाचं काम करते. औषध मिळेपर्यंत उपचार करतात. 

आम्ही कायमचे श्रीमंत झालोत कारण आमचा बाप अब्जाधीश असताना मूलं भिकारी असणारच नाहीत. 
आणखी एक promise आधीच दिलेलं आहे - 
‘मी तुला कधीच टाकणार नाही.’

॥ हरि ॐ॥

Sunday, January 23, 2022

Remain connected to God (Important video)

https://youtu.be/Gc2kqMKui1w

Sharan (Surrender) Important video

https://youtu.be/Nu-cmh5DKMA

importance of trivikram

The following write up is the extract from the speech of Maha-dharma-varman Dr. Yogindrasinh Joshi's Aniruddha Poornima speech where he has clearly described the origin and importance of TRIVIKRAM.

Trivikram is Anirruddha Himself, the Omkar, the Paramshiv, the Mahavishnu. It is the Gun Pratik (symbol) of Lord Harihar. Tri means three and Vikram means victory or to win over. Trivikram wins the entire universe in just three steps. Trivikram further means One who accomplishes various victories. Aniruddha bears the form of Trivikram. Lord Parmatma as Aniruddha has taken form of TRIVIKRAM to throw open His Nav-Ankur-Aishwaryas (Nine Forms of divine virtues) to His children i.e. Shraddhavans.

Why does Aniruddha have to take this form?
It is because we as humans have been steadily blocking His way of entering our lives because of various Pradnya Aparadhs (breach of guidelines laid down by Lord Parmeshwar i.e. Lord Dattaguru of Satya, Prem and Anand). So to widen this road, Aniruddha has to take this form.

Trivikram is the support for all the Shraddhavans. It enhances the principle of 'Pavitrya Hech Praman' (Purity is the only Reference). Trivikram kills evil, propagates and enhances the righteousness and establishes Maryada. Trivikram makes life beautiful and mannered. Trivikram is Prem-agni i.e. pure form of love. One can worhship TRIVIKRAM however he wants with pure bhav.

Physical Description of TRIVIKRAM:
(Please refer the photograph of Trivikram attached above)
>>> Trivikram has a grey base called Dharmasan. Dharmasan represents purity.
>>> Above it there are two pink flowers of lotus supported by strings. These flowers have 9 petals.
The right string represents Pingala nadi (central cerebral cord) in the human body which stands for Sun and His warmth and also represents river Yamuna. This cord also represents love of Goddess Mahishasurmardini.
The left string represents the Ida Nadi which stands for the moon and his calmness and also represents Goddess (river) Ganga or Ganges. (Both these cerebral cords originate from Cerebellum i.e. the lower part of the brain and end at the coccygeal area i.e. the bottom-most part of spinal cord. This cord also represents love of Goddess Anusaya.
There is also the third cord which stays invisible called Sushumna which represents love of Goddess Gayatri.

>>> Enclosed between these strings of lotuses is the black colored, pole-shaped structure called Vajradand. Vajradand represents love. This is the support of the Universe, support of all the Shraddhavans.

>>> Above this Vajradand is placed another flower of lotus called Vajrakamal which again has 9 petals. This Navdal Kamal represents Goddess Jagdamba who is completely filled with divine brightness. The 9 petals represent Navvidh Nirdhar (9 fundamentals) and 9 Saman Nishthas (Equal Considerations) of all the Shraddhavans as given by P. P. Bapu in Shreemad Purushartha Grantharaj.

>>> Between these strings of lotuses and the Vajradand but immediately above the Dharmasan there are two circular discs. Right one of Blood Red color and left with Turmeric Yellow color which represent Sun and Moon respectively. Sun represents Truth, it represents Jathar-agni (energy in stomach) in the human body and Moon represents happiness, it represents Dyanan-agni (zeal to learn).

>>> The three colors found in TRIVIKRAM i.e. Red, Yellow and Black represent Kumkum, Turmeric and Abir or bukka which are considered extremely pure elements.
>>> This Trivikram is a figure complete in itself.
The blossoming of the petals of this Navdal lotus of TRIVIKRAM in our body would be proportional to the blossoming of our Bhav (thinking and considerations of our mind about love and faith towards the Lord).
As described above the 3 steps which TRIVIKRAM takes in our life are:
1) Akaran Karunya i.e. Unconditional and unreasoned love
2) Kshama i.e. forgiveness
3)Acceptance of Sharanya (complete surrender at Lord's feet)

Accordingly the three steps that we need to take to reciprocate Trivikram are:
1) Dhyan i.e. Devotion towards Trivikram
2) Chintan / Abhyass i.e. study and practice of what is proposed by Lord
3) Dhyas i.e. only one wish that I want Him (Lord)


These 3 steps can also be defined as:
1) I am Your's
2) I am only Your's

3) Forever I am only Your's .
(Here I represents worshipper and You his Lord)


What is the Need of TRIVIKRAM ?
>>> Lord Paramshiv's symbol is Pindi, likewise Aniruddha is symbolically represented by this TRIVIKRAM.

>>> Any divine idol of Lord always needs periodic charging but TRIVIKRAM is the charge in itself. There is no need to do its Pratishthapana or establish it. He is self established.

>>> TRIVIKRAM endows upon us pure bhav and also increases it.

>>> One who worships this TRIVIKRAM with love gets automatically connected to it.

>>> Through this TRIVIKRAM Aniruddha demands our under-developed lotus and endows us with His fully developed lotus.
>>> TRIVIKRAM would end the worshippers' punishments i.e. his dush-prarabhda.
>>> TRIVIKRAM is the gini (divine power) who grants all your righteous wishes at the earliest.

This TRIVIKRAM is standing for us in Shri Aniruddha Gurushetram. This TRIVIKRAM is available to everyone to be worshipped at their homes in form of replicas, as lockets to be wore in neck, etc. But worshipping this TRIVIKRAM in its original form is the best. TRIVIKRAM is worshipped on every Thursday at Hari Guru Gram in between the Marathi and Hindi discourse given by Bapu. The worship is called Sukhasavarni.







Portrait of Ek Mukhi (one faced) Lord Dattatrey is kept behind Trivikram during Sukh Savarni. One can demand fulfillment of his/ her wish (which is pure in its form and concept), one can confess, one can decide on any particular topic or action he has to take during this ritual.



This Trivikram is Guna-pratik (Symbol of Character), Samarthya-pratik (Symbol of Strength), Aadhyatma-pratik (Symbol of Sprituality) of Aniruddha Upasana Trust as its Drushya-pratik (Visual Symbol) is Flag and Dhwani-pratik (Vocal Symbol) is "Hari Om".
Trivikram is the total culmination and the ultimate complete symbol of all the principles of the Sadguru.

For the one whose Sadguru is Sainath, then the Trivikram for that person is Sainath Himself and if someone else accepts Dattatreya as the Sadguru, then the Trivikram for that person is Dattatreya only.

The Sadguru’s core principles and his complete active form are truly symbolized by the Trivikram.




त्रिविक्रमा, तू आधार माझा, तुचि माझे छत्र रे 
      तुझ्या कुशीत सुख माझे, तू चण्डिकेच्या कुशीत रे

Saturday, January 22, 2022

notes

" ज्या अर्थी माझा श्वास सुरु आहे, मी जिवंत आहे याचाच अर्थ की त्या महाप्राण हनुमंत आणि त्रिविक्रमाची पूर्ण खात्री आहे की जीवनाच्या कुठल्याही क्षणी, वेळी आणि वयात बदलू शकतो आणि चांगला होऊ शकतो. मित्रांनो चुकलात तरी जिथे असाल, जेव्हा समजेल, तिथून परत प्रयास करायला सुरुवात करा. प्रत्येक वर्षी चांगला नविन संकल्प करीतच रहा. जेव्हा हा संकल्प कराल तेव्हा त्या आदिमाता जगदम्बेला सांगा की आई हा माझा संकल्प तू पूर्ण करुनच घे. आयुष्याचा प्रत्येक क्षण नविन वर्ष समजुन जगा आणि आयुष्यात होणारा बदल पहा. डिसेम्बरच्या अगदी १५ तारखेलाही म्हणा की अजुन 16दिवस आहेत आणि मी अजुनही बदलू शकतो, काहीही नवीन करू शकतोच! अपयशाची व्याख्या आजपासून बदला! Failure हा शब्द आजपासून तुमच्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढुनच टाका! मी ज़र बापुचा आहे तर काहीही न करता अगदी प्रत्येक गोष्टीत मला 50%यश हे मिळालेलच आहे. त्यामुळे मी अपयशी असूच शकत नाही.जे तुम्हाला मिळाले आहे ते हातात घट्ट धरून ठेवा.प्रयास करीत रहा आणि सर्व बापुवर सोडून द्या! प्रयास न करणं हेच सगळ्यात मोठं अपयश असतं! मी माझ्या बाळाना अतिशय प्रेमाने , कुठलेही प्रयास न करावे लागता आधीच हे 50% दिलेले आहेत. आता बाळान्नो पाळी तुमची आहे, प्रयास करीत रहा"
सदगुरु श्री अनिरुद्ध बापू 02/01/2014

Tulsipatra 1516

*तुम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात* कारण भगवान त्रिविक्रमाचे रुप प्रत्यक्ष पाहणे हे फक्त सत्ययुगातच शक्य असते.तुम्हाला ते त्रेतायुगात प्राप्त झाले आहे ह्यापुढील काळात 'श्रीराम 'रुपाने त्रिविक्रमाचे एक स्वरूपवसुंधरेवर चालेल, वावरू, कार्य करेल.
नंतर व्दापारयुगात अशाच प्रकारे स्वंयंभगवानाचे 'श्रीकृष्ण 'रुप वसुंधरेवर लीला करेल. 
परंतु *श्रीराम व श्रीकृष्ण* ह्यांचे *मूळरुप ओळखणारे लोक तेव्हाही अगदी थोडेच असतील*. 
मात्र कलियुगाच्या अंतिम चरणाच्या सुरुवातीला *श्रीराम व श्रीकृष्ण* ह्याचे एकत्रित स्वरुप, एकरुप व संयुक्त भाव घेऊन स्वयंभगवान त्रिविक्रम श्रद्धावानांसमोर उकलून दाखविला जाईल त्याचे नाम, रुप व कार्य सर्व श्रद्धावानांना पाहता येईल. 
का 
कारण *कलियुगाचा अंतिम चरण'मत्स्य युग' हे नाम* धारण करून सुरू झाल्यानंतर दोन पर्याय उरतील. 

१)जगातील अनाचार अधिकाधिक वाढतच गेला व भक्ती क्षीण झाली, तर मग फक्त अडीच हजार वर्षेच उरतील व त्यानंतर प्रलय होईल आणि प्रलयानंतर परत सर्व अभक्त मानव पुन्हा प्राणियोनीत जन्म घेऊन ८४लक्ष योनीचा प्रवास करीत करीत अर्थात सतत दु:खे भोगत भोगत पुन्हा मानव बनतील. 
आणि तेसुद्धा आधील युगातील आपापली पापे बरोबर घेऊनच -अर्थात अशा अभक्तांना त्या नवीन कल्पात सत्ययुग, त्रेतायुग व व्दापारयुगात जन्मच मिळणार नाही - थेट काळ्या कलियुगात मानव म्हणून प्रवेश मिळेल. 

२)परंतु भगवान त्रिविक्रमाला असे व्हावयास नको आहे 
आपल्या भक्तांना तरी अधिक चांगली संधी मिळावी,असे त्याला मनोमन वाटते आणि म्हणून त्याने  जगदंबेची तपश्चर्या करून हा दुसरा पर्याय तयार केला आहे. 
हा दुसरा पर्याय म्हणजे जे जे कुणी हातून चुका घडत असताना सुद्धा,दु:खात व सुखातही स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर करत राहतील,त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतील, त्याच्या चरणांशी घट्ट बांधून घेतली आणि त्यांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा अधिकाधिक प्रयास करतील, त्यांना आणि फक्त केवळ त्यांना भगवान त्रिविक्रम त्या प्रलयातून  स्वतः वाचवेल - ह्यासाठी संनिहिताच नौका बनेल.
बाकीचे सर्व प्रलयात नष्ट होतील. परंतु निसर्ग नष्ट होणार नाही आणि त्रिविक्रमाचे भक्त थेट कलियुगाच्याच पुढील भागात प्रवेश करतील व तो भाग अडीच लाख वर्षे इतका असेल 
आणि त्या अडीच लाख वर्षामध्ये ह्या प्रलयातून वाचलेल्या त्रिविक्रमभक्तांना त्यांची गतजन्मातील सर्व पापे माफ केलेली असतील आणि त्यामुळे ते   सर्वजण पुढील प्रत्येक जन्मात अत्यंत सुखाने, आनंद करीत, एकही रोग न होता, एकही संकट न येता फक्त यश आणि यशच मिळवत राहतील आणि मग महाप्रलयानंतरस्वयंभगवानाच्या साकेतलोकामध्ये आणि अर्थात भर्गलोकामध्येही सुखाने कालक्रमण करतील -त्यांना त्यानंतरच्या युगामध्ये फक्त प्रारब्ध-हीन जन्म मिळेल अर्थातभगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या लीलेत निकटचे सहकारी बनण्यासाठी व इतरांनासन्मार्गावर आणण्यासाठी. 
आणि हा *दुसरा पर्यायच आपल्या भक्तांना मिळावा ह्यासाठीच त्रिविक्रम कलियुगाच्या मत्स्ययुगापर्यत स्वतःचे स्वरुप कलियुगात झाकून ठेवील आणि *मागील जन्मांमध्ये ज्याने त्रिविक्रमाची भक्ती केली आहे, त्यांनास्वतः कडे आकर्षित करुन घेईल आणि त्यांच्याकडून हा *मंत्रगजर करवून* घेईल. 

*लक्षात ठेवा*! त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही घडू शकत नाही -पापही आणि पुण्यही. (तुलसी पत्र १५१६)

pitruvachan: important points

आजचे पितृवचन 27/12/2018

हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध 

* आपल्या मनाला दुसऱ्याचे दोष लवकर दिसतात .....दुसऱ्याच्या चुका काढणे किंवा फक्त स्वतःला कोसत राहतो.... सर्व जीवन असेच निघून जाते... तुमचे नुकसान दुसरा कोणीही करू शकत नाही, तुम्हीच करता... *उद्धरेत आत्मना आत्मानं*
* लीला असतें कृष्णाची... रामाने फक्त एकच काम केले... Harmony बॅलन्स... भरताला सांगतो..." शपथ घेतलेयस तर आईशी बोलू नकोस पण सेवा कर...बॅलन्स  "
* सर्वांना कर्माची फळे देणारा, शबरीला मात्र शोधत स्वतः जातो 
* *जीवनात काहीही करा, पण भगवंताशी खोटे बोलू नका*... त्यामुळे आपण त्याच्या प्रेमाच्या प्रांतातून नियमाच्या प्रांतात जातो..फोटो समोर पण नाही... त्याला फसवू नका... मग त्या परमात्म्याच्या हातून सगळे निघून जाते.. मग जगदंबेच्या नियमानुसार फळ द्यावे लागते 
* याला समजत नाही असे काहीच नाही 
* लोक दाऊनां बोलतात माझ्या मुलाची बुद्धी बदलू दे ...प्रत्यक्ष हनुमंतासमोर रावण बदलला नाही ... कोणीही कोणाचीही बुद्धी बदलू शकत नाही... 
* वाल्या कोळ्याच्या पापाची ownership कोणीही घेत नाही... 
आपल्या पापांना आपणच जबाबदार
* रावण कंस महिषासुराने हेच केले 
* चुकीचे बोललो तर माफी मागा पण खोटे कधीच बोलू नका 
* अर्थाच्या पलीकडे भाव असतो... अर्थ जाणणे चांगले आहे पण भाव जाणणे imp आहे
* 'खाली हात आये है, खाली हात जायेंगे'.... हे खोटे आहे...दोन जन्मानचे पाप पुण्य घेऊन आलोय आपण... जेवढे पाप आहे ते याच जन्मात नष्ट करून पुढे चालत राहूया... पुन्हा फक्त त्याच्यासाठी त्याच्या ichchhenech येऊया 
* रावणाला भेटायलाही स्वतः हनुमान गेलेला मग आपल्यासाठी का नाही येणार? 
* बिभीषण ची कथा... दिवाळावर
'राम राम' लिहितो...लंकेत याला बंदी असतें. ..रावण रागावून येतो... बिभीषण  घाबरून बोलतो 'हे राम ' ... बिभीषणाचा एक सेवक बोलतो त्यांनी ' *रा* वण - *मं* दोदरी' असे लिहिलंय... रावण खुश होऊन सगळीकडे लिहायला सांगतो...बिभीषण सेवक शोधायला जातो तर सेवक  गायब... तो सेवक *रामच* असतो... 
* अग्रलेखात सांगितल्याप्रमाणे त्रिविक्रम गजराच्या 108*16 माला करायच्यात...जमतील तशा...अग्रलेख आला त्याच दिवशी 3792 लोकांनी केल्या...विशुद्ध चक्र शुद्ध होईल 
* नवीन वर्षासाठी काही विशेष बोलायचे नाही मला... सर्व वर्षांसाठी.... अगदी दररोज भक्ती भाव चैतन्य मिळतंच जाणार आहे...ते घ्या 
* तुमच्या भक्तीचा स्वीकार करणार कोण?...  जो हा गजर करणार तो स्वीकारनार कोण?  *मी मी आणि मीच* ऐकणार... No exception to this rule... 
माझा अभिमान जगात सर्वात मोठा आहे

हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध 


* समर्थ म्हणजे कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत जो आपल्या अनलिमिटेड ताकतीने control मध्ये आणतो तो *समर्थ*
* त्रिविक्रम माझ्या ताकतीला अनुसरून लहान होतो... Locket एवढा,  उदिच्या कणात  समावतो,  ही त्याची समर्थता 
* गटारातही तुमच्या आधी येतो... *जिस जिस पथ पर भक्त साईका वहा खडा है साई*
* *he is* या एका प्रकारे त्याला वर्णन करता येते 
* लॉकेट मध्ये त्याचा फोटो नाही, तोच आहे....त्याच्याशी बोला 
* तर मोठा इतका कि अनंत कोटी ब्रह्माण्ड त्याच्या अंगठाच्या नखाएवढी आहेत 
* किती लहान / किती मोठा आमच्यासाठी तसा !
* *he is the most ideal, perfect father*...बाळाला झेपेल असाच बॉल टाकतो 
* जो पर्यंत अमुक गोष्ट  मला येत नाही हे मान्य करत नाही तोपर्यंत आपण शिक्षणार कसे? 
* तो तुमच्या आजू बाजूला असेल, तुम्हाला समजणार पण नाही आणि तुम्हाला एनर्जी देऊन जाईल,  बोलून जाईल... 
* आज *समर्थ* चा अर्थ जाणला  तर तो हृदयाच्या खोलीपर्यंत ठेवा 
* ही खोली हीच प्रत्येकाची प्रेम करण्याची क्षमता... ही अनंत आहे....ही एकच गोष्ट माणसाकडे अनंत आहे...त्याच्यावरचे मापू नका 
* मोजू नका, प्रेम करत राहा 
* dad sings song... *जो वादा किया वो निभाना पडेगा! रोके जमाना  चाहे   रोके खुदाइ तुमको आना पडेगा*... ये उसका प्यार हे 
* love u my child... a  lot... Lot lot lot.....

mantragajar importance

॥ हरि: ॐ॥

*मन्त्रगजर महत्त्व*
दैनिक प्रत्यक्ष अग्रलेख *तुलसीपत्र क्र. १५७७* मध्ये स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाच्या भक्तिभाव चैतन्याचे सविस्तर विवेचन *सद्गुरु श्री अनिरुद्धांनी* केले आहे. या अग्रलेखात बापू सांगतात-
*‘भक्तिभाव चैतन्यामध्ये स्वयंभगवानाचा मंत्रगजर हा सर्वोच्च मंत्र मानला जातो* कारण हा दत्तभगिनी शुभात्रेयीने केला आहे.
ह्या मंत्रगजरातून भक्तिभाव चैतन्याच्या लहरी उसळत राहतात आणि *ज्याला ज्याला म्हणून स्वतःचे जीवन चांगले घडवायचे आहे, त्याला सर्व काही पुरविले जाते*.
मला प्रत्यक्ष माता शुभात्रेयीने सांगितले आहे की जो श्रद्धावान ह्या मंत्रगजराच्या 16 माळा दररोज, ह्याप्रमाणे कमीतकमी 3 वर्षे करतो, त्या श्रद्धावानाच्या विशुद्ध चक्राच्या (कंठकूप चक्राच्या) सोळाच्या सोळा पाकळ्या शुद्ध होतात अर्थात त्याचे विशुद्ध चक्र हनुमत्-चक्र बनते. मग कुठल्याही जन्मात तो सुखाने येतो, आनंदात राहतो आणि आनंदातच विलीन होतो.
स्वयंभगवानाचा स्पर्श ज्याला झाला, ती वस्तू, पदार्थ, व्यक्ती आपोआप पवित्र होते व ह्याला अपवाद नाही.
हा *स्वयंभगवान प्रेमळ व कृपाळू आहे, हा ठाम विश्‍वास बाळगूनच जप करा, ह्याच्या प्रतिमेचे पूजन करा, ह्याच्या पादुकांचे अर्चन करा, ह्याच्या चरणांकडे पाहत रहा, ह्याच्या मुखाकडे पाहत ह्याचे सौंदर्य पीत रहा, ह्याच्या मूर्तीला अर्थात अर्चनविग्रहाला ‘जिवंत देव’ जाणून सर्व प्रकारे सेवा करा आणि केवळ ह्याला आवडते म्हणून खर्‍याखुर्‍या गरजू श्रद्धावानांना सहाय्य करा, हेही भक्तिभाव चैतन्यच*.’
त्याचप्रमाणे *तुलसीपत्र 1588* या अग्रलेखात बापू आम्हाला सांगतात - *‘स्वतःच्या जीवनशेतीचा मी फक्त शेतकरी आहे आणि हा स्वयंभगवानच मालक आहे’ हे मनावर नीट बिंबवून मंत्रगजराच्या माळा करीत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य*.  

Tulsipatra 1528

*तुलसीपत्र १५२८* 
 *५)साधुवादनिकषणः* - देवर्षि नारदांच्या चिपळ्या वाजताच शुभदेने प्रश्न केला, "हे देवर्षि नारद ! एका अत्यंत घोर चुका व महापापे केलेल्या व्यक्तीलाही पश्चाताप होऊन तिने त्रिविक्रमाची भक्ती सुरू केल्यास, त्रिविक्रम किती मार्गांनी त्या व्यक्तीला *अभय देतो*, हे तर मी स्वतःही अनुभवले आहे. "
                देवर्षि नारद अत्यंत प्रेमाने व कौतुकाने बोलू लागले , " प्रिय शुभदे!  *त्रि-नाथांनी त्रिविक्रमाला 'साधुवादनिकषणः' असाच घडविला - साधुवादनिकषण म्हणजे _चांगले की वाईट_,_पुण्य की पाप_,_बरोबर की चूक_, श्रेष्ठ की हीन_व _पवित्र की अपवित्र_ हे ठरविण्याचा _एकमेव_ निकष अर्थात मापदंड ( The Touchstone ).*
                तो *श्रद्धावानांवर प्रेम करतो*. परंतु त्या प्रेमात आंधळा होत नाही.
                तो *श्रद्धावानांना सर्वकाही पुरवितो* परंतु स्वतःला दाता मानत नाही .
                 *त्रिविक्रम श्रद्धावानांची पापे जाळीत राहतो*. परंतु स्वतःकडे त्याचे श्रेय घेत नाही.
                 *त्रिविक्रम त्याच्या भक्तांचे, त्याचा मंत्रगजर करणाऱ्यांचे कष्ट व दुःख कमी करीत राहतो*.परंतु स्वतःला भवदुःखमोचक मानत नाही.
               अशारितीने तो *'अकर्ता'* भावनेने कार्य करीत असल्यामुळे, *त्याचे प्रत्येक कार्य ,त्याचा प्रत्येक शब्द आणि त्याची प्रत्येक इच्छा हे सर्व त्रि-नाथांकडूनच प्रवाहित झालेले असते.*
                 स्वयंभगवान त्रिविक्रम करतो ,वागतो ,देतो व बोलतो तेच श्रेष्ठतम आणि ह्यांच्या तुलनेतच मानवांपासून देवांपर्यंतचे सर्वांचे गुण व कार्य आणि आचरण ह्यांचे मोजमाप केले जाते.
         *हा जगदंबेचा नियमच आहे*      
               मात्र हेही नीट लक्षात ठेव !  जो श्रद्धावान जास्तीतजास्त, *त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्यात* राहतो, त्याचीच पापे जाळली जातात.
                 जे केवळ कवायतीप्रमाणे त्रिविक्रमाचे नाम घेतात ,मोठ्या संख्येने जप करतात आणि त्रिविक्रमावर प्रेम मात्र कमी असते, त्यांची पापे अल्प प्रमाणात जाळली जातात.

                अत्यंत खूष झालेल्या शुभदेने नारदांना विनंती केली, " *त्रिविक्रम हा सर्व गोष्टींसाठी मापदंड आहे*.हे सूत्र कळले .परंतु ते व्यवहारात ,आचरणात व मुख्य म्हणजे मनात मुरवायचे कसे ,हे कळत नाही."
                देवर्षि नारद म्हणाले," हे भक्तोत्तमें शुभदे !  पुढील सामान्य प्रश्न व त्यांची उत्तरे ऐक.
*प्र.१) - जगात कुठले प्रेम श्रेष्ठ ?*
*उत्तर -* *'त्रिविक्रमाचे आपल्या भक्तांवरील प्रेम'* हाच मापदंड. त्याच्यासारखे नि:स्वार्थी ,निर्हेतुक व  *लाभेवीण प्रेम* जो कुणी *आप्त* करेल ,*तोच चांगला आप्त.* मात्र त्याची बरोबरी त्रिविक्रमाबरोबर करू नका.
*प्र.२) - जगात कोणते स्थान सर्वांत निर्भय ?*
*उत्तर* - *त्रिविक्रमाचे चरण अर्थात त्रिविक्रमाच्या चरणांचे ध्यान* -  *त्रिविक्रमाचा सहवास.* ज्याप्रमाणे त्रिविक्रमाच्या प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष दृश्य,अदृश्य अगदी काल्पनिक सहवासामुळेसुद्धा (अर्थात मनाने सहवासाची भावना केल्यास) भक्ताला *त्रिविक्रम निर्भय बनवितो.*
 *प्र.३) - जगात खरे सुख देणारे कोण व काय ?* 
*उत्तर - एकमेव आणि अद्वितीय - अर्थात _त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य_.*
हा एक त्रिविक्रमच असा आहे की जो तुम्हाला सुख देऊनही तुमच्यावर कुठलीही गोष्टी लादत नाही, तुमच्यावर हक्कही सांगत नाही, तुमचे कर्मस्वातंत्र्य अबाधित राखतो. 
 *प्र.४) - जगात सत्य कसे ओळखावे?*
*उत्तर - _त्रिविक्रमाच्या लीला हेच सत्य_.* ह्याच्या कथांमधून मानवांना आपोआपच सत्य व असत्य ,वास्तव आणि भ्रम ह्यांमधील फरक कळत राहतो. 
*प्र.५) - जगात चांगला माणूस कोण आणि वाईट माणूस कोण ?*
*उत्तर* - ह्या प्रश्नाचे उत्तर *त्रि-नाथांनीच देऊन ठेवले आहे*
                 *जो त्रिविक्रमाची भक्ती मनापासून* *अत्यंत प्रेमाने करतो,* *चण्डिकाकुलावर* *विश्वास राखतो आणि त्रिविक्रमाला* *पूर्णपणे शरण जाऊन* _*त्रिविक्रमाच्या अनुसंधानात*_ अर्थात _*त्रिविक्रम भक्तीभाव चैतन्यात जमेल तसे*_ *राहतो, तो मनुष्यच फक्त चांगला.* कारण त्याचे दुर्गुण आपोआप कमी होत जातात आणि जो त्रिविक्रमावर प्रेम करीत नाही त्याचे दुर्गुणही कमी होत नाहीत आणि त्याची पापेही नाश पावत नाहीत - अशीच माणसे वाईट व पापी ." 

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Tulsipatra 1527

*तुलसीपत्र १५२७* 
                देवर्षि नारद स्वयंभगवान त्रिविक्रमाचे स्वभावगुण सांगताना म्हणाले, 
 " *४)सानुक्रोशः*  - आर्ये शुभदे ! खरंच अगदी मनापासून सांगतो ,संपूर्ण दैवतविज्ञानामध्ये हा *भगवान त्रिविक्रम एकच एक खरा _'सानुक्रोश'_* आहे.
                शुभदे ह्याच्या भक्ताच्या डोळ्यातून प्रत्यक्ष वाहणारे अश्रू पाहून ह्याच्या एकट्याच्याच डोळ्याला पाणी येते.
                खरं सांगू ! श्रद्धावानांचा  आक्रोश ह्याच्याच्याने पहावत नाही. ह्याला भक्तांचे दुःख सहन होत नाही. आणि म्हणूनच हा सदैव *सानुक्रोश* अवस्थेतच असतो - श्रद्धावानांच्या जीवनात येणारी प्रारब्धनिर्मित संकटे हा आधीच जाणत असतो आणि आपल्या भक्तांना दुःखे येऊच नयेत, दुःख आलेच तर कमी करता यावे, दुःख न कमी होणे प्रारब्धानुसार अटळ असेल ,तर भक्ताला दुःख सहन करण्याची ताकद पुरविणे, श्रद्धावानाला आलेल्या प्रत्येक आपत्तीत त्याच्याबरोबर राहणे ह्यासाठी स्वयंभगवान त्रिविक्रम सदैव सजग आणि तत्पर असतो.
                *भक्त प्रल्हादाला* जेव्हा त्याच्या मुखातील हरिनाम बंद व्हावे म्हणून हिरण्यकश्यपूने चुलीवरील उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तेव्हा सतत *हरिनाम* घेणाऱ्या प्रल्हादाला जराही वेदना व क्लेश  होऊ नयेत ,म्हणून हा *त्रिविक्रम स्वतःच ती कढई* बनला ,त्या कढईतील तेलही बनला आणि अशा रितीने त्या धगधगत्या विस्तवाची *झळ ह्याने स्वतः सोसली*.परंतु *प्रल्हादाला जराही पीडा होऊ दिली नाही .*
                एवढेच नव्हे ,तर ज्या स्तंभाला हिरण्यकश्यपूने लाथ मारली, त्या *स्तंभाचे रुपही त्रिविक्रमानेच घेतले होते* आणि अशा ह्या दिव्य स्तंभातूनच *भगवान नृसिंह* प्रकटले.
               
*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Sunday, January 16, 2022

panchmukhi hanuman aniruddha bapu explanation video links

1st
https://youtu.be/d_AqNFXp5c0

2nd
https://youtu.be/WKcta-O8WoI

3rd
https://youtu.be/qJn7DxMRFtI

4th
https://youtu.be/pMFHEi8IN08

5th
https://youtu.be/3SvRTsp1Pds

6 th part
https://youtu.be/Oo6hlb6Y6b0

7th
https://youtu.be/pttaWOLbHoY

8th
https://youtu.be/M4ukT3L-QTw

9th
https://youtu.be/aBf_afCw2KM

10th
https://youtu.be/xN6j6IaVaMA

11th
https://youtu.be/lv7b2PikjRI

12th
https://youtu.be/HFKb2TCXCqA

13th
https://youtu.be/qpimDcbNQN8

14th
https://youtu.be/WJY9ZKUinBw

15th
https://youtu.be/hb4kBoq3J3Y

16th
https://youtu.be/kzKpimDuy1s

17th
https://youtu.be/xzWA7Sb1TO0

18th
https://youtu.be/pxScPfn_69g

19th
https://youtu.be/P0gI2oxndp8