👆👆👆
*भगवती सन्निहिता*...
अग्रलेख १५१४ / १५१५ मधे बापुंनी जे विस्तृतपणे दिले आहे ते खालीलप्रमाणे....👇
*हा संवाद 'देवर्षि नारद व शुभदा' ह्यांच्यातील आहे*...
🌺 सन्निहिता म्हणजे प्रत्येक श्रध्दावानाच्या सर्वात निकट असणारी, त्याच्याबरोबर सदैव असणारी, 'भक्ताच्या जीवनात ती त्याच्यासाठी उपलब्ध नाही' असे कधीच नसणारी अशी,,,,,, स्वयंभगवान त्रिविक्रमानेच आपल्या भक्तांच्या *अभ्युदयासाठी* त्याच्या चहुबाजूंना ठेवलेली *स्वतःकडील प्रेमभक्ती*.
आणि
ही स्वयंभगवान त्रिविक्रमाची *त्रि-नाथांवरील भक्ती*
आणि
त्याचे त्याच्या *भक्तांवरील प्रेम*
ह्याचे *एकरूप* स्वरूप असणारी, अशी ही सन्निहिता म्हणजेच,,,,
*स्वयंभगवान त्रिविक्रमाची निजशक्ती,निजमाया,आत्ममाया,प्रेममाया,प्रसादमाया ( वात्सल्यमाया ) अर्थात त्याच्याशी अभेदाने राहणारी त्याची भक्तियोगमाया*.
🌺 ही स्वयंभगवानाची भक्तियोगमाया सन्निहिता हीच त्याची वामांगिनी.*हिला भौतिक स्वरूप नाही*
🌺 सामान्य मनुष्याला छळणा-या मायेला ही सन्निहिताच ख-या भक्ताच्या जीवनातून दूर पळवते.
🌺 ह्या सन्निहितेचे दुरुन दर्शन झाले तरी *सर्वांची त्रेधातिरपीट उडवणारी मोहमाया,जीव घेऊन पळत सुटते*.
🌺 *श्रेष्ठ भक्ताच्या नसेनसेतून,रक्ताच्या प्रत्येक थेंबातून,शरीरातील प्रत्येक पेशीतून,मनाच्या प्रत्येक अवस्थेतून आणि प्राणाच्या प्रत्येक स्पंदनातून....शुध्द भक्ती निरंतर वाहत ठेवणे....हेच सन्निहितेचे कार्य आहे*.
🌺🌺
*भगवती सन्निहितेची प्रत्येक ख-या भक्तासाठी ' ५ ' स्वरूपे आहेत*.
🔹 स्वयंभगवानाचे नामस्मरण सतत करीत राहणे -- *नामभक्ती*.
🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या रूपाकडे अत्यंत प्रेमाने पाहत पाहत ,त्याच्या चरणांवर दृष्टी खिळवून ठेवणे -- *दर्शनभक्ती*
🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंदिराची प्रत्येक सेवा आणि कुठलीही सेवा अत्यंत प्रेमाने,मनापासून,वारंवार करीत राहणे -- *सेवाभक्ती*
🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या गुणांचे,अनुभवांचे आणि कथांचे प्रेमपूर्वक श्रवण आणि कीर्तन करणे -- *आचरणभक्ती*
🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाचा 'मंत्रगजर' ...दिवसा-रात्री ,सुखात-दुःखात ,काम करत असताना-आराम करीत असताना ,प्रफुल्लित-उदास असताना ,त्रिविक्रमाची तसबीर समोर असताना-नसताना ,यश-अपयश ह्यांना सामोरे जाताना ,त्रिविक्रमावर खूष असताना - त्रिविक्रमावर रुसलेले असताना.........अशा कुठल्याही अवस्थेमध्ये आत्यंतिक भावाने करीत राहणे -- *आनंदभक्ती*
🌺🌺
🔹ही सन्निहिता *भावरूपिणी* आहे--अर्थात तिची मूर्ती नाही,आकृतीही नाही,चित्रही नाही आणि *नसावे*....
*कारण एकच*
👇
*ती त्रिविक्रमापासून अभिन्न आहे म्हणून....*
एकदा का मूर्ती तयार झाली किंवा चित्र रेखाटले गेले की सामान्य भक्ताच्या मनात 'भेद' उत्पन्न होतोच आणि मग तो त्रिविक्रमाची भक्ती पूर्णभावाने करू शकत नाही आणि 'हे नाथसंविध् नाही'...
🔹 किंबहुना स्वयंभगवान त्रिविक्रम कार्यासाठी स्वतःच 'सन्निहिता' बनतो...तोही पूर्ण आणि तीही पूर्ण...आणि कार्य संपन्न होताच परत आपले 'सन्निहिता' स्वरूप आपल्या मूळ रूपात खेचून घेतो.
🔹 स्वयंभगवान त्रिविक्रमाचे 'सन्निहिता' स्वरूप त्याच्यावर अवलंबून असूनसुध्दा सर्वदृष्ट्या स्वतंत्रही असते.कारण *ही भावरूपा असल्यामुळे ,हिच्यात कुठलाच अभाव असूच शकत नाही*.
🔹 *प्रत्येक सच्चा भक्त त्रिविक्रमाशी सन्निहित व्हावा म्हणूनच ''''' त्रिविक्रमाची मूर्ती हिच सन्निहितेची मूर्ती'''''*.
🔹 ज्ञानी व योगी भगवती सन्निहितेला *स्वामिनी* ह्या नावाने साद घालत असतात.
🌺🌺🌺🌺🌺
*भगवान त्रिविक्रम 'सन्निहिता' बनतो ,ते केवळ आपल्या भक्तांना भ्रममायेच्या जाळ्यातून सोडवण्यासाठीच*.....
ही भ्रममाया अर्थात मोहमायासुध्दा भगवंताचीच एक शक्ती आहे ---
१) अभक्तांना नियमांच्या प्रांतात अर्थात कर्मफळाच्या तुरुंगात बंदिस्त करण्यासाठी.
🌺
*जो सच्चा भक्त , 'कर्ता-करविता एकमेव स्वयंभगवान त्रिविक्रम आहे' असा दृढविश्वास धरून त्याच्यावर प्रेम करतो , त्याच्यासाठी त्रिविक्रम 'सन्निहिता' बनून ....*
🔹 त्या भक्ताच्या पापांना भस्म करुन टाकतो व केवळ *चुका* म्हणून समजतो.
🔹चुका सुधारण्याची संधी देतो....त्यांची भक्ती अधिक वाढवून.
🙏
श्रीराम.
अंबज्ञ.
नाथसंविध्.