*तुलसीपत्र १५४४*
देवर्षि म्हणाले ,"हे शुभदे ! स्वयंभगवान त्रिविक्रमाने स्वतःच *'अर्चन-अवतार'* अगदी सत्ययुगापासून संपूर्ण चण्डिकाकुलासाठीच ब्रह्मर्षिसभेमध्येच मान्य केलेला आहे, स्वीकारलेला आहे."
शुभदेने विचारले , "म्हणजे नक्की काय ?"
देवर्षि नारद म्हणाले ," ह्याचा अर्थ एकच की स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाने सगुण साकार पूजा अर्थात स्थूल प्रतिमेचे पूजन अर्थात *पूजासेवा ,अर्चनसेवा* *१०८% स्वीकारलेली आहे.*
व स्वतःच्या सच्च्या भक्ताकडील स्वतःच्या तसबिरीला, पूजल्या जाणाऱ्या चित्राला आणि मूर्तीला त्याने स्वतःचा *'अवतार'* म्हणून मान्यता दिली आहे."
शुभदा आनंदाने नाचू गाऊ लागली, "अहाहा ! काय *अपरंपार कोमल हृदय आहे ह्या भगवंताचे ! स्वतःच्या मूर्तीलाही 'अर्चन अवतार' म्हणून सिद्ध केले आहे.*"
देवर्षि नारद म्हणाले, "खरे आहे ! आणि म्हणूनच *आपल्याकडील आपल्या इष्टदैवताची मूर्ती _हा स्वतः त्रिविक्रमानेच_ सिद्ध केलेला अवतार आहे*, हे जाणून त्रिविक्रमाच्या मूर्तीचे भरभरून पूजन करीत राहावे.
हे असे स्थूल उपचार करत असताना *भावना मात्र हीच असावी की _ही मूर्ती_ जिवंत आहे.*
आपल्या तसबिरीला व मूर्तीला 'अवतार' म्हणून सिद्ध करताना *त्रिविक्रमाने* मला स्पष्ट सांगितले होते की - *'जेव्हा माझा सच्चा भक्त माझ्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करतो तेव्हा त्या वेळेपुरता मी संपूर्णपणे त्या भक्तावर अवलंबून राहतो ,जसे एखादे बालक आपल्या पालकांवर अवलंबून असते तसे.*
अर्थात पूजनाच्या वेळीपुरता मी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतो आणि त्याच्याकडून स्वतःचे कौतुक करून घेतो. मात्र त्याची भक्ती ज्या प्रमाणात खरी, त्याच्या दसपट ,पूजनाच्या वेळेस मी माझे मूळ स्वरूप त्याच्या हृदयात खेळवत राहतो.
*मला माझ्या मंत्रगजराने केलेले प्रासादिक पूजन आणि विधिवत उपचार केलेले शास्त्रोक्त पूजन समानपणे प्रिय आहे.'*
शुभदे ! वरील वचने त्रिविक्रमाची आहेत, माझी नाहीत, ह्या नारदाची नाहीत ,हे लक्षात घे."
*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*
No comments:
Post a Comment