Saturday, December 2, 2023

*कथामंजिरी..... २ ( २५ )*

🙏

*कथामंजिरी..... २ ( २५ )*

रणकेदाररुद्र...
"कल्पनांच्या आधारानेच उचित तर्क करत व कुतर्क टाळत पुढे पुढे जावे लागते".

🔹 *ब्रह्मवादिनी अहल्येचे शब्द*..

▪️कल्पना सत्याला धरुन असेल,वास्तवाशी निगडित असेल आणि ज्ञानाधिष्ठित अर्थात *स्वानुभवाला* धरून असेल,तरच हितकारक ठरते. 
▪️ *कल्पना हेच मायेचे मूळ स्वरूप आहे*.
▪️कल्पनाच माणसाला बहकवते,कल्पनाच भय उत्पन्न करते,कल्पनाच आशा लावते,कल्पनाच अतृप्ती देते,कल्पनाच तुलना करते व मत्सर निर्माण करते.
▪️ *जेव्हा ही कल्पना सत्य आणि पावित्र्याशी जोडलेली असते तेव्हा हीच कल्पना अर्थात हीच माया मनुष्याचा अभ्युदय करणारी ठरते*.
🔸 *कल्पनाशक्ती त्याज्य अजिबात नाही परंतु पावित्र्याला सोडून असणारी कल्पना मात्र त्याज्य आहे*.

☘️☘️☘️

▪️कल्पनेला अर्थात जडमायेला अर्थात विकार व अडचणी उत्पन्न करणाऱ्या मायेला आटोक्यात आणू शकतो,तो फक्त *स्वयंभगवानच*..
▪ *मानवाचे हे कामच नव्हे*.

☘️☘️☘️

▪️ही जडमाया मनुष्याला कठपुतलीप्रमाणे खेळवत राहते.
▪️हिची सहा चाके - काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर.
▪️ह्या प्रत्येक चाकावर ही माया,प्रत्येक मनुष्याच्या *मनाला* मातीच्या गोळ्याप्रमाणे ठेवते व ही चक्रे यंत्रवत चालू करते आणि मग त्या मातीच्या गोळ्यांना ( मनाला ) विविध आकार देत राहते...मातीच्या गोळ्यांच्या हातात काय असते? तो बिचारा चक्राधीन आहे.यंत्रारूढ आहे.
*परंतु ही जडमायासुध्दा स्वयंभगवानाचीच एक शक्ती आहे*.*तिच्या ह्या खेळाला स्वयंभगवानाची संमती असतेच*.

🌿🌿🌿

*स्वयंभगवानाचा मंत्रगजर जो नियमाने करत राहतो ,त्याला जडमाया बाधत नाही व अविद्यामाया त्याला विद्यामायेच्या हातात सोपवते*.

🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment