Saturday, December 30, 2023

कथामंजिरी. २

कथामंजिरी. २
परमपूज्य अनिरुद्ध बापू
भाग ४६

पंचमहाभूते,मानवी संकल्प आणि ईश्वरी संकल्प याबाबत बापू सुंदर विश्लेषण करतात.
मागील भागात आपण पाहिले की महर्षी शतानंद आश्रमातील पायवाटेचे रुपांतर नदीमध्ये करतात.यामुळे शृंगादित्य त्यांना प्रश्न विचारतात.तर म.शतानंद हातातील कुंडलीतील पाण्याचे रुपांतर भल्यामोठ्या स्थिर अशा जलस्तंभात करतात.यामुळे सर्व आश्चर्यचकित होतात.
तेव्हा राजपितामही गोदावरीमाता म्हणतात की असा कुठलाही चमत्कार हा मायेत अडकलेल्या सामान्य माणसाला दिसू न शकणार्‍या भौतिक घटनांचा परिपाक असतो.
हे जल वाहत नसता एका जागीच स्थिर राहणे यामध्ये एक संकल्प आहे. आकाश,वायू,अग्नि,जल ,पृथ्वीतत्व ही पंचमहाभूते परस्परविरोधी गुणधर्माची दिसत असली तरीदेखिल कुठल्यातरी संकल्पानुसार एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात किंवा एक-दुसर्याला वाढविण्याचे कार्य करतात.हा संकल्पच ह्या सृष्टीला व्यापून उरलेला असतो.मानवी संकल्पाला आधार देणारा,वाढविणारा,संतुलित ठेवणारा,प्रत्यक्षात आणणारा 'एक महासंकल्प'आहे.
मानवाचा प्रत्येक संकल्प  हा त्या 'महासंकल्पाचा'एक अंश असतो.व तो  'महासंकल्प ' म्हणजेच अखिल ब्रह्मांडाचा एकमेव कर्ता असणारा स्वयंभगवान.
त्याला जाणल्याशिवाय काहीच जाणता येत नाही व कुठलाही मानवी संकल्प अपूर्णच राहतो.
जलाचे जलतत्वही तोच आणि अग्नीचे तेजही तोच.

हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध बापू

No comments:

Post a Comment