हरि ॐ, आज २० मार्च २०२३ म्हणजेच जागतिक चिमणी दिन, आज आपण जाणुन घेऊ चिंमणीबद्दल.
सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापुंनी सांगितले आहे की,चिमणी हा पक्षी मनाला शांती देणारा आहे, व स्वयंभगवान त्रिविक्रमाचा आवडता पक्षी आहे.चिमण्यांची संख्या कमी होत असतानाच स्वयंभगवान त्रिविक्रम पृथ्वीवर अवतरेल. चिमण्यांचे संवर्धन करणे ,त्याची संख्या वाढवणे हे देखील भक्तीभाव चैतन्य आहे. स्वयंभगवानचा मंत्रगजर करणारा भक्त कधीच मनुष्ययोनीतुन प्राणीयोनीत जात नाही अणि ह्या कार्यासाठी त्रिविक्रमाने चिमणी हा पक्षी प्रेमाने निवडला आहे, कारण चिमणी ह्या पक्ष्याचे निसर्गातील जीवशृंखलेतील कार्यच मुळी शुभ स्पंदने व आरोग्यस्पंदने वाढविण्याचेच आहे अणि ही जी चिमणी तुम्हाला मदतकर्ती झाली, ती स्वयंभगवान ने स्वत: तयार केलेली चिमणी योनीतील सत्ययुगातील पहिली चिमणी आहे - ही अजर आहे अणि अमर आहे अणि स्वयंभगवानची दुत आहे. चिमणी ही निव्वळ पक्षीयोनी नव्हे, चिमणी ही गंधर्व, यक्ष, विद्याधर ह्यांच्याप्रमाणेच एक वेगळीच, खास कार्यासाठी निर्माण झालेली दैवीयोनी आहे.
त्यामुळे जो जो श्रध्दावान वाट चुकुन काही भलत्याच चुका करुन बसतो, परंतु भानावर येताच मनमोकळे पणाने स्वयंभगवानकडे क्षमायाचना करतो अणि श्रद्धापूर्वक जीवन जगु लागतो, अशा श्रध्दावानाला हा स्वयंभगवान त्रिविक्रम पुढील जन्म चिमणी वंशात देतो.ह्यामुळे तो वाट चुकुन पापी बनलेला श्रध्दावान चिमणी रुपात इतर श्रध्दावानांसाठी शुभ कार्ये करीत करीत संपुर्ण पापमुक्त होतो. मात्र ही संधी, स्वतःची चुक पुर्णपणे मान्य असलेल्या खरेखुरे श्रध्दावानाला मिळते; म्हणुन चिमणी ह्या पक्ष्याचे घात करणे ,हे गोहत्येनंतरचे दुसरे पातक आहे. श्रध्दावानांनी प्रत्येक चिमणी ही श्रेष्ठ श्रध्दावानच आहे, हे जाणुन तिचा आदर करायचा असतो."
म्हणुन घराच्या परसात थोडेसे धान्य व पाणी नियमित ठेवा, चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे बनवा.
*॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥*
No comments:
Post a Comment