*आपण आपल्या जीवनातही चुकीच्या कल्पना, चुकीच्या अपेक्षा ठेवतो आणि छद्म आत्म्यास जन्म देतो. आपल्या चुकीच्या कल्पना चुकीच्या अपेक्षा म्हणजेच "छद्म आत्मा "*.
वजन काट्याचे उदाहरण ही एक मजा होती. तुम्हांला कळावे म्हणून. आपण स्वतः कडून देखील चुकीच्या अपेक्षा ठेवतो. आपला सभोवतालचा परिसर, माणसे, राष्ट्रे यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे *आपले मनच आपले शत्रू होते*. हे मनच माझ्या व माझ्या परमेश्वराच्या आड येते. त्यामुळेच आत्म्याला जगदंबा व स्वयंभगवानाकडून प्राप्त झालेल्या गोष्टी मला प्राप्त होऊ शकत नाहीत.
आपल्याला शरीर आहे हे अमान्य करता येत नाही. आपल्यात *जनुके* आहेत. त्यामुळेच पौगंडावस्थेत मुले व मुली एकमेकांकडे आकर्षित होतात. जनुकांमुळेच मला भूक लागते. भूक लागणे ही काही वाईट गोष्ट नाही. कोणाला दोनदा तर कोणाला पाच वेळा भूक लागते. यात विशेष असे काही नाही.
*माझे पूण॔ जीवन नक्कीच माझ्या शरीरावर अवलंबून असते. म्हणूनच मला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शरीराकडे दुल॔क्ष केल्यास मी आध्यात्मिक ध्यास घेऊ शकत नाही. म्हणूनच स्वतःच्या शरीराची उत्तम रितीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे*.
आपण आपल्या शरीराकडून आणि मनाकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो. खरं तर त्यांची व इतर गोष्टींची सरमिसळ करतो. *चुकीच्या अपेक्षा म्हणजेच छद्म आत्मा सर्व गोष्टींच्या आड येतो. छद्म आत्मा सर्वात मोठा अडथळा आहे*. हनुमन्त मुळात वधस्तंभावर आहे या छद्म आत्म्याला मारण्यासाठी. कसा? तर थोडा थोडा, हळूहळू आणि सतत. त्यामुळे आपल्याला दु:ख जाणवत नाही. दु:खदायक परिस्थितीतून बाहेर न येता जर आपल्याला छद्म आत्म्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर *मंत्रगजर हा एकमेव राजमार्ग आहे*.
हनुमान चलिसामुळे महाप्राणाकडून येणारी विश्वाची प्राणशक्ती आपल्याला प्राप्त होते. हिच प्राणशक्ती प्रत्येक ग्रहाला त्याच्या कक्षेत फिरण्याची शक्ती देते. *तोच महाप्राण तिच प्राणशक्ती आपल्यात सुद्धा आहे. आपल्या नाथसंविधानुसार महाप्राण व प्राणशक्ती आपल्या आयुष्यात काय॔रत राहतात*.
मंत्रगजर 1 माळ, 16, 32 किंवा 108 माळा तुम्हांला पाहिजे तेवढया करा. या माळा पहिल्यांदा आपल्याला तयार करतात. त्यामुळेच आपण जगदंबा व तिच्या पुत्राला आपले मन व शरीर तयार करण्याकरिता आमंत्रित करतो.
मंत्रगजर चार पातळयांवर काम करतो.
👉 प्रथम शरीर व मन तयार करणे.
👉 परमेश्वराकडून शक्ती व मदत ग्रहण करण्याची क्षमता वाढवितो.
👉 प्राप्त झालेली क्षमता कधी, कुठे व कशी वापरायची व त्यातून यश कसे प्राप्त करायचे हे शिकवते.
👉 चुकीच्या गोष्टी करण्यास परावृत्त करते. आपण सिंहावलोकन केल्यावर मी हे करायला नको होते. माझ्याकडून चूक घडली. ही अपराधीपणाची भावना येते. *नित्य म॓त्रगजर व वर्षातून एकदा एका दिवसात 108 वेळा म्हटलेली हनुमान चलिसा माझ्या मनातील सर्व अपराध दूर करतात*. हनुमाना चलिसा माझ्यातील महाप्राण जो निष्क्रीय झाला आहे त्याला सक्रीय करते. *म्हणजेच मन, प्राण, प्रज्ञा एकात्मतेने काय॔ करु लागतात*.
लहान मुलांना मी कमीत कमी तीन वेळा हनुमान चलिसा म्हणायला सांगतो. कारण त्यांचा लहान मेंदू विकसित होत असतो. छोट्या मुलांना बरेच प्रश्न पडलेले असतात. त्यांची उत्तरे कोणीच देत नाही. *ती नेहमी गोंधळलेली असली तरी नेहमी आनंदी असतात*. हिच योग्य वेळ आहे जेव्हा त्यांचे मन तयार होते. म्हणजे छद्म आत्मा तयार होणार नाही व परमेश्वराकडून बक्षीस रुपात प्राप्त होणा-या चांगल्या गोष्टी त्याच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आणतील. *म्हणूनच माझ्या बाळांनी हनुमान चलिसा रोज तीन वेळा म्हटलीच पाहिजे*. तुम्ही 70 वर्षाचे असा की 80 तुम्ही माझी बाळेच आहात.
गुरुचरणमासामध्ये 108 वेळा हनुमान चलिसा म्हणा. जसे जमेल तसे म्हणा पण म्हणा.
*माझ्या व माझ्या यशस्वी जीवनाच्या आड ज्या गोष्टी येतात त्या बाजूला होतील. हेच हनुमान चलिसाचे महत्त्व आहे*.
हनुमान चलिसात 108 मंत्र आहेत. किती? 108. 108 मंत्र 108 वेळा म्हटले जातात. अनेक मंत्र तुम्ही स्वत:च सहजपणे ओळखू शकता.
नासै रोग हरे सब पीरा ।
जपत निरंतर हनुमत बीरा ॥
होत न आज्ञा बिनु पैसारे ।
*पैसारे म्हणजे प्रयास. अवधी भाषेत पयसा म्हणजे प्रयास. "असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी" हे होणे नाही. प्रयास करा पण गधा मजूरी नको*.
प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू वाईट वागवतात तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागत होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले, विष दिले तरी देवाने त्याला मरु दिले नाही व खांबात स्वत: प्रगटून हिरण्यकश्यपूचा वध केला. *कारण तो सतत मंत्रगजर करत होता*.
No comments:
Post a Comment