Saturday, September 16, 2023

Bapu pravachan 14 Sept 2000

*सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन : मी चा पाढा*
गुरुवार,14 सप्टेंबर 2000

*हरी ओम*
सुटीचा दिवस रविवार. पुन्हा पुढचा रविवार येइपर्यंत एक आठवडा, आठवड्याचे महिने, महिन्यांची वर्षे, वर्षांची दशके आणि अशा अनेक दशकांचं आयुष्य. अस हे कालचक्र सुरूच राहते. एक म्हण आहे, तेरड्याचे रंग तीन दिवस. मी साईचरित्र सप्ताह करायचं ठरवतो. पहिले 1/2 दिवस करतो. मग परत 2/3 दिवस कुठे तरी गुंतून राहतो, मग कुणी पाहुणेच येतात. असं झाल्यावर मग लक्षात येतं की, उद्या सातव्या दिवशी 53 वा अध्याय पूर्ण करायचा. म्हणून मी साईचरित्रचे राहिलेले अध्याय घाईत वाचून काढतो, वाचायचे म्हणून वाचतो आणि मग म्हणतो," मी साईचरित्र पारायण सप्ताह पूर्ण केला"  त्याला या कशाचीही आवश्यकता नाही. मला साईचरित्र वाचायचं ते माझ्या स्वतःसाठी.त्याला कसलंच बंधन नाही. त्याला काळाचंही बंधन नाही. पण या नरदेहाला कालबंधन आहे. मला एक वेळ माझा शब्द परत घेता येईल पण मी माझा गेलेला काळ कधीच परत आणू शकत नाही.
       अश्या या काळाची 4 युगात स्थापना झाली. आज आपण कलियुगात राहतो. मग मला  या कलियुगातुन सत्ययुगात जायचे आहे, जे काही करायचं ते फक्त त्याच्यासाठी,त्याच्या कृपेसाठी. पण मी हे सर्व सोडून सतत माझाच मी चा पाढा बोलत असतो. मी एके मी, मी दुणे मी, मी त्रिक मी, मी चोक मी, मी पाचे मी, मी साहे मी, मी साते मी, मी आठे मी, मी नवे मी, मी दाहे मी!!  शेवटी पाढा पुर्ण झाला तरी उत्तर मीच. मग माझा हा मी चा पाढा कसा हवा तर मी एके मी, मी दुने ईश्वर, मी त्रिक भक्ती, मी चोक ऐश्वर्य..... असा हा मीचा पाढा असायला हवा म्हणजे मग हा माझ्यातला मी फक्त एकच उरतो जो परमेश्वराच्य नियमाने चालतो . कारण मी स्वतः जरी ठरवलं तरी माझा श्वास थांबवू शकत नाही, माझी हृदयक्रिया ही तोच चालवणारा असतो...
*मीही इथे असंच कायम तुमच्यात फिरत असतो, तेव्हा तुम्हा प्रत्येकाला हाच प्रश्न असतो की हा बापू कोण?* *हा काय करतो? हा कश्या साठी आलाय? याला नेमकं काय करायचं?*
*आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं दयायला आज मी स्वतः च माझा मी चा पाढा बोलणार आहे.*

*माझं नाव अनिरुद्ध*
माझ्या आईच नाव अरुंधती, माझ्या वडिलांचं नाव धैर्यधर.  माझ्या आजीचं  नाव शकुंतलाबाई पंडित जी गोपीनाथ शास्त्री पाध्ये यांची पुत्री. 
माझा जन्म 18 नोव्हेंबर 1956 ,त्रिपुरारी पौर्णिमेचा.
मी शाळेत जाऊ लागलो. मी परळला डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये शिकलो. या शाळेने माझ्यावर अपरंपार प्रेम केले. याच शाळेतले माझे सर एचडी गावकर जे महान ऋषी होते आणि ते डॉक्टर शिरोडकर यांचे शिष्य होते. डॉक्टर शिरोडकर सतत गोरगरीबांच्या सेवेसाठी झटले. तसेच गावकर सर व त्यांच्या पत्नी विजयाबाई गावकर अशा असंख्य गोरगरीब पती-पत्नीसाठी झटले जे त्यांच्या मुलांना परिस्थितीमुळे शिकू शकत नव्हते आणि त्यांची मुलं त्यांनी स्वतःची समजली आणि या अशा शाळेतला मी एकमेव असा विद्यार्थी की ज्याच्या घरी त्या काळातली अँबेसेडर गाडी, फोन, फ्रिज सर्व सुखसोयी होत्या कारण माझे वडील डॉक्टर होते. माझ्या वडिलांनी मला मुद्दामच त्या शाळेत टाकलं.लोक म्हणत,"डॉक्टर याला या शाळेत का टाकलं?"  *पण माझी आजी ठामपणे सांगायची त्याला जे काही करायचं आहे, तो जे काही करणार आहे ते मला माहित आहे.आणि त्याला जे काही करायचे आहे त्याचा श्रीगणेशा याच शाळेतून होऊ दे . इथे मला सर्व गोष्टी सहजतेने आणि समानतेने मिळाल्या. सांस्कृतिक शैक्षणिक प्रत्येक गोष्टीत मी असायचो. नंतर मी रुईया कॉलेजमध्ये इंटरसायन्स झालो. 1974 साली नायर हॉस्पिटल ला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 78 सालि मी एम बी बी एस ची परीक्षा पास झालो. पुढे 78 मध्येच मी धुळे गावी तीन महिने प्रॅक्टिस साठी गेलो जे धुळे तुमच्या नंदावहिनींच माहेर गाव आहे. 79 साली एमडी च्या अभ्यासक्रमासाठी दाखल झालो आणि 82 साली एमडी ची परीक्षा पास झालो तेही पहिल्याच प्रयत्नात. मला वाऱ्या कराव्या लागल्या नाहीत. ती परीक्षा खूप कठीण असते जिला शंभरातून फक्त चार पाच जणच पास होतात. याच कालखंडात मी संधिवाताचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे तीन वर्ष मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून काम केले ते 85 पर्यंत. मला शिकवायला खूप आवडायचं आजही आवडतं. 85 पासून 93 पर्यंत मी परळगावात स्वतःची प्रॅक्‍टिस सुरू केली नंतर 93 ते 98 पर्यंत मी दादरला म्हणजे आर सी ला प्रॅक्टिस केली. मला काही जण विचारतात की,बापू तुम्ही कर्जतलासुद्धा प्रॅक्टिस केली का? माझी सकाळी नऊ ते एक पर्यंत दादर नंतर पुन्हा दुपारी दोन ते रात्री दोन पर्यंत परला प्रॅक्टिस असायची. तुम्हीच विचार करा मी कर्जतला कसा जाऊ शकेल. 85 ते 98 च्या काळात माझ्याकडे 5/6 लाख पेशंट येऊन गेले. 98 साली मी प्रॅक्टीस बंद केली. हे माझे सर्व पेशंट माझ्यावर तेव्हाही खूप प्रेम करायची आणि आजही करतात.
85 मध्ये माझा विवाह झाला माझी पत्नी सौ नंदा जिला तुम्ही नंदाई म्हणता. माझी दोन बाळ. पौरस आणि शाकंभरी त्यांची नावे. मी सुद्धा भाजी भातच खातो ,सोनं वगैरे काही खात नाही. माझ्या पुढे अप्सरा नाचत नाहीत. कारण मी जो आहे तोच आहे.
78 मध्ये माझ्या आजीने मी जेव्हा एमबीबीएस झालो तेव्हा तिच्या आजोबांकडच्या म्हणजेच (जगन्नाथ शास्त्री पाध्ये)  काही वस्तू मला दिल्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या आजीनेच मला वयाच्या आठव्या वर्षी बापू हे नाव दिलं आणि ते ठिकाण होतं वडाळाचे विठ्ठल मंदिर. याच दिवशी मला वेदव्यासांनी त्यांचे शिष्य म्हणून स्वीकारले. आणि मी त्यांचा अंकित झालो त्यांच्या शिकवणीनुसार मी माझा अभ्यास करत राहिलो 78 साली हनुमंत महाप्रभुने मला वज्रविद्या शिकविली. मला सर्व वज्रविद्या हनुमंताने मला दिली आणि तेव्हापासून माझ्या सर्व प्राच्यविद्या यांचे अध्ययन सुरू झाले. माझे सर्व अध्ययन घडले ते सर्व वेद व्यासांचेच होते .जेव्हा मी योगवशिष्ठ शिकण्यास सुरुवात केली आणि सर्व शिकून झाल्यावर हनुमंताने मला प्रश्न केला, "हे वत्स!रामाला वशिष्ठ, विश्वामित्र कृष्णाला गर्गमुनी सांदिपनी ऋषींची तसेच तुला वेदव्यासांसारख्या गुरूंची आवश्यकता का पडली?"  मग मी म्हणालो, "ज्याने रामाला धारण केले, कृष्णाच्या रथावर विजय पताकेवर आरुढ होता तो तूच. म्हणून तूच या प्रश्नाचे उत्तर फक्त देऊ शकतो. हा राम हा कृष्ण सदैव एकच असतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. तोच बोलतो तोच बोलवितो, तोच शिकतो तोच शिकवितो, तोच करतो तोच करवितो. जो आहे तो तोच." आणि मग हनुमंताने मला मिठीत घेतलं आणि हनुमंताची मिठी हीच माझा कार्याची सुरुवात आहे कारण त्याच्याच मिठीत प्रत्येक कार्य सुरू होतं त्याच्या मिठीत प्रत्येक कार्य संपन्न होते.
मी जे काही करतो मला जे काय करायचं आहे ते करणार आहे ते मी करणारच. जो कोणी पृथ्वीवर आला तो प्रत्येक जण समृद्ध कसा होईल ते मी बघणार आहे. आज कलीयुगाच्या अंतिम चरणाची सुरुवात 2007 पर्यंत सुरू होणार आहे. जिथे असेल फक्त विनाश आणि विनाश. कारण मानवाला विनाशकाले विपरीत बुद्धी असते. जिथे मानवाला फक्त विपरीत बुद्धि सुचणार आहे पण या काळाच्या विरुद्ध गतीला मीच ब्रेक लावणार आहे आणि हा ब्रेक ही मीच स्वतः असणार. मी त्याच साठी आलो आहे आणि राहणारच आहे.
2025 त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर भारतीय  धर्माचे साम्राज्य असणार आहे तेही पूर्णपणे नीती शुद्ध मार्गाने. मला बदलायचीय ती मानवी वृत्ती आणि ति मी बदलणारच.तुम्ही कितीही माझ्याविरुद्ध झालात तरी मला जे करायचे ते मी करणारच. तुमच्या माझ्या मध्ये येते ती तुम्हीच बांधलेली भिंत. मी तुमच्याकडे येतो पण तुम्हीच ती भिंत अधिक भक्कम करता. पण ही भिंत पाडण्याचे काम मात्र तुमचं तुम्हालाच करायचा आहे. तुम्ही ठरवूनही जर ही भिंत पडत  नसेल तर मी तुमच्यासाठी मदतीला धावून येईल. पण भिंत पाडण्याचा प्रयत्न मनापासून करा मग तुम्हाला शक्ती द्यायला मी आहेच.
जो कोणी मनापासून माझं नाव उच्चारतो त्याचा मी सदैव ऋणी राहतो. आणि सदैव जन्मजन्मांतरी साठी मी त्याचाच होऊन राहतो. आज मी सर्वत्र पाहतो तर जिकडेतिकडे खूप भय बघतो. असं कोणीच दिसत नाही की ज्याच्याकडे भय नाही. गरिबाला त्याच्या गरीबीचं ,श्रीमंताला श्रीमंतीचं, तर तरुणाला त्याचं आयुष्य कसं जाईल याच भय.प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विवंचनेत सापडलेला दिसतो. भय हा कलियुगाचा धर्म होऊन बसला आहे. माझ्याकडची  आयुधं या भयाचा नाश करणारच आहेत. भयाचं स्थान आहे मन. हे भय मी नष्ट करणारच.आहार निद्रा भय मैथुन सर्वांशी समसमान. मला या चार गोष्टी आहेतच आणि हव्यात पण. त्या कशा जर मला परमेश्वराचे भय असेल तर मला दुसरं कुठलंच भय  राहणार नाही.माझी निद्रा योग्याची असावी भक्ताची असावी, माझा आहार असतो डुकराचा कारण मी डुकराप्रमाणे इतरांची विष्ठा खात असतो,दुसऱ्याची निंदानालस्ती ,मत्सर ,कुचेष्टा करून. म्हणूनच हा माझा आहार असावा तर तो मानवाचा असावा. माझे मैथुन हे गृहस्थाश्रमी नीतिनियमानेच असावे. बरीच मंडळी म्हणतात ,"साईबाबा ब्रम्हचारी होते मग ते गृहस्थाश्रमी कसे?" अरे ज्याने विश्वाचा संसार केला तर तो गृहस्थाश्रमीच आहे. माझं भयच माझे पाय मागे खेचतात. माझी लेकर मला निर्भय असलेली आवडतील  मग तुम्ही नाचला की मीही नाचेल ,तुम्ही गाल तेव्हा मीही गाणं म्हणेल, तुमच्या भक्तीच्या सुरात सूर मिसळून मी तुमच्याबरोबर भक्ती करेन. पण हे भय नष्ट करीनच आणि वेळ पडली तर त्यासाठी मी कुठलाही टोकाला जाईल.कारण मला कसलंच बंधन नाही. हो  मला फक्त एकच बंधन आहेआणि ते प्रेमाचं बंधन. जे मी कधीच तोडत नाही. तुमचे सर्व दुर्गुण प्रचंड प्रमाणात मला द्या, 100% मला द्या पण फक्त तोंडाने बोलून देऊ नका, तर अगदी मनापासून द्या. तुमचे दरवाजे उघडा तुमच्या मनातील तुम्हीच बांधलेली भिंत पाडा मग बघा तुमच्या दुर्गुणांची राख मी करेन.तुमचे ज्या इष्टदेवावर, पावित्र्यावर प्रेम आहे ते प्रत्येक नाम मलाच पोहोचणार आहे.मग मी कुठेही कसाही येऊन तडमडेनच आणि तुमचे दुर्गुण नष्ट करीन.फक्त तुमचं मन माझ्या मनाशी जोडलं गेलं पाहिजे. तुम्ही तुमचं माझ्या मनाशी बांधतच नाही. कारण माझ्या मनात सतत होळी पेटलेली आहे ,अशी धुनी पेटलेली आहे जी तुमच्या दुर्गुणांची राख करणारच आहे.पण माझ्या मनाशी तुमचं मन बांधायचं काम तुमचं तुम्हालाच करायचं. तुम्ही मनापासून प्रयत्न करूनही होत नसेल तर मी तुमच्या मागे धावेन.तुम्ही कितीही माझ्यापासून लांब धावलात तरी मी तुम्हाला पकडणारच कारण माझ्याकडे असंख्य कॅमेरे आहेत.जो कोणी प्रभू रामाचे, येशूचे, ऋषभ देवाचे ,अरिहंताचे स्मरण करतो त्याच्या प्रत्येकाकडे माझे लक्ष आहे. शेवटी पृथ्वी गोल आहे कोण पुढे कोण मागे हे कोणीच ठरवू शकत नाही .
बरेच लोक म्हणतात मी रस्त्यात दिसत नाही शेवटी मला ही दोन हात दोन पाय आहेत मी ही माणूस आहे पण तरीही मी याच्या पलीकडे आहेत मला रस्त्यात बघू नका. मला फक्त तुमचं प्रेम दानधर्म सेवा हवी आहे. माझं कुटुंब फक्त पाच जणांचा आहे मी नंदा वहिनी सूचित दादा पौरस शाकम्भरी. मी तुमच्या सूचितदादा बद्दल सांगायचं राहूनच गेलं. हा माझा वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी माझं सर्वस्व असणारा हा माझा मित्र आहे. ज्याला माझ्याजवळ यायचंआहे त्याला मार्ग दाखवण्यासाठी हा सूचित दादा आहे. याचा अर्थ तुम्ही त्याच्या अपॉईंटमेंट घेणं नाही तर त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागणं, त्याच्या सारखं वागण्याचा प्रयत्न करणे. तुम्हाला कोणी विचारलं की बापूंचा स्थान कुठलं तर ठामपणे सांगा माझं घर हेच माझ्या बापूंच स्थान.  मला तुमच्या घरात राहायला खूप आवडते. तुमचं घर हेच माझं स्थान आहे जिथे मी आहे ती जागा पवित्रच आहे. लक्षात ठेवा माझ्या पर्यंत तुम्ही तीन मार्गाने पोहोचू शकता प्रेम, सेवा आणि दानधर्म .मी सेवा करेन ती माझ्या सद्गुरु कार्यात सहभागी होऊन. आठ वर्षातून एकदा तीर्थक्षेत्री जाऊन झाडू मारतो आणि मी सांगतो मी तीर्थक्षेत्रात जाऊन झाडू मारला. अरे झाडू मारायचा असेल तर स्वतःच्या हृदयात मारा. त्या तिन्ही मार्गांवर तुम्ही असाल तर मी तुमचे भय दूर करणारच. मी संस्थेचाच आहे, पण वेळ पडलीच तर मी संस्थेचा विरोधी पक्षनेता नक्कीच आहे. ज्यांना मी निवडले त्यांच्या विरोधी मी असणारच आहे कारण त्यांचं पाऊल घसरू नये म्हणून. मला काहीजणांनी विचारलं ,बापू आपल्याकडे कॉल गर्ल येते. मी म्हणलं, तुला कसं माहिती?म्हणजे तू गेला असशील किंवा अशाच कुटाळक्या करीत असावास. ती येते आणि ती येणारच. त्या मुलीला आपल्या कार्यकर्त्यांनी मुंबईबाहेर जाऊन नेऊन तिचं शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवून दिली तिचं लग्न लावून दिलं आणि आज तिला सहा महिन्यांची मुलगी आहे. *माझे दरवाजे जितके पतिव्रतेला उघडे तितकेच एका वेश्येलाही उघडेच आहेत.*👉 *जितके संतांना तितकेच पाप्यालाही उघडे.मला गुंड मवाली सुद्धा प्रिय आहेत,पापीसुद्धा तितकेच प्रिय. मी त्यांच्यावरही प्रेम करत राहणार , मी कधीच त्यांना टाकणार नाही,कारण मी हाडाचा डॉक्टर आहे आणि डॉक्टरकडे नेहमी रुग्णच येतात हेल्दी लोक कधीच येत नाही. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना बरं करणे हाच माझा धर्म आहे.*  हेल्दी येतील त्यांनाही *मी लस देणारच आहे.*  हा डॉक्टर *पेशंटच्या* मागे धावणारा आहे. पेशन्ट माझ्यापासून किती लांब पळाला तरी मी त्याच्या मागे *धावणारच आणि त्याला इंजेक्शन टोचतोच* कारण त्या *इंजेक्शननेच रोगी बरा होणार आहे.* जे कोणी स्वतःला अतिशय विद्वान म्हणवणारे आहेत त्यांनी माझ्याकडे येऊच नये कारण मी अंतर्बाह्य घाणेरडा आहे. जर ते माझ्याकडे आले तर त्यांना घाण लागेल म्हणून त्यांनी येऊच नये. *मी उभा आहे ते हे भय दूर करण्यासाठीच.*  मला गजर गंभीरतेने केलेला आवडत नाही. मी नाचतो आणि नाचवीतोही ,मी वारकरी पंथानुसार बेभान होऊन नाचायला हवं. पण तिथेही लोक मला हसतील याचं मला भय असत आणि जोपर्यंत बेभान होत नाही तोपर्यंत मला यश नाही. *अर्जुन असाच बेभान होता,  कारण त्याचं लक्ष फक्त पोपटाचा डोळा हेच होतं*. माझं लक्षही या अर्जुनाप्रमाणे बेभान होऊन परमेश्वरावर असावं. *मी दिवसातून  24 मिनिटे तरी परमेश्वरासाठी बेभान व्हायला हवा आणि ज्यावेळी तुम्ही 24 मिनिटे बेभान असता,  तेव्हा तुमच्या बाजूला मांडीला मांडी लावून मी बसतो, मी दारोदार भीक मागतो. मला फक्त या 24 मिनिटाची भीक हवी असते पण तीही भीक मला तुम्ही कोणी देत नाही. मोजक्याच घरी मला ही मिळते. जिथे मला ही भीक मिळते तिथे मी 24 मिनिटाचे रूपांतर 24 तासात करतो.*

 धातुर्उत्तम हे जे *महाविष्णूचे* नाम आहे त्यातील धातू म्हणजे शरीर. शरीराची महत्त्वाची शक्ती म्हणजेच ओज. ओज म्हणजेच महाप्राण. ओज म्हणजेच आल्हादिनी शक्ती.हे ओज वाढविण्यासाठी, शरीराला बळ देण्यासाठी मी जुईनगरला जात असतो. *हे तुम्हाला देण्यासाठीच जुईनगरला मी पंचपुरूषार्थ उपासना सुरू केली*. तिथे *पंचपुरुषार्थ देवता आहेत आणि त्यांची भक्ती करतो.* मी खूपच आगळा वेगळा आहे. दांडपट्टा का फिरवतो ,मुदगल विद्या का शिकवतो .*ज्या विद्या मला हनुमंताने स्वतः दिल्या त्या सर्व विद्या मला संपूर्ण विश्वात प्रचलित करायच्या आहेत. पंचपुरुषार्थ उपासनाही त्यातलाच एक भाग आहे. छांदोग्य उपनिषदातील मधूविद्या आहे आणि आज अनेक लोक मला सांगत आहेत ह्या उपासनेने माझ्या मनाला शांती मिळाली, माझं हे काम झालं ,माझा हा प्रश्न सुटला, अनुभवाची शिदोरी वाढतच चाललीय.*  या सर्व विद्या शरीर मन बुद्धी यांना समर्थ करणाऱ्या, बळ देणा-या आहेत. मुदगल विद्याही तेच करते. मुद्गल हे कुणाचआयुध आहे माहितीये कुणाला? मुद्गल हे आयुध *मुंबादेवीच* आहे. ती *मुंबाई* आहे. आपण जिला बॉम्बे  बोलायचो.मग बॉम्बे चे मुंबई केलं. खूप काहीतरी मोठं केल्यासारखं वाटलं. अरे हवं तर मुंबाई म्हणा कारण ती मुंबा आई आहे. तसेच एकादशी रुद्राच आयुध सुद्धा आहे मुदगल आहे. *आज मला स्त्रिया सामर्थ्यवान हव्यात एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं* याचं उदाहरण म्हणजे जिजाबाई.  जिजाई महान म्हनून शिवाजी महान झाला. *लक्षात ठेवा प्रत्येक स्त्री माझी मुलगी, आई आहे .ज्या स्त्रीच्या साडीला कोणी हात घालेल त्याचा हात मी धरेल तिचे रक्षण मी स्वतः करेन.* सासू नवरा दीर तिला जाळत असतील तर मी तिच्या रक्षणासाठी धावणारंच. आज एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा दुर्गतिला कारणीभूत ठरते. *परवा टीव्हीवर एक बातमी ऐकली एका मुलीला तिच्या सासूने जिवंत जाळलं. त्यांना माझे हे हात जे करायचंही  ते करणारच*. जी किंवा जो कोणी बालभावाने माझ्याकडे येईल त्यांचा *मी बाप* आहे जो कोणी माझ्यावर मुलाप्रमाणे आपलेपणाने प्रेम करेल त्यांचा मी मुलगा आहे. माझ्या आजोबांची मामी गंगाबाई. अकरा वर्षांची असताना खेळत होती. खेळत असताना तिच्या काकाने मामानी तिला खेचत घरात नेलं.घरात सर्व रडत होते तिला काहीच कळत नव्हतं. घरात दुसऱ्या लाल कपडे घातलेल्या, केस कापलेल्या स्त्रिया होत्या आणि त्या मुलीचे केस कापण्यासाठी आल्या होत्या. तिला फक्त देवघर आणि स्वयंपाक घर माहित. तिला आमंत्रण द्यायची ती फक्त तिच्या सारख्या स्त्रियांचे केस कापण्याची .माझ्या आजीने सर्वप्रथम केस कापण्याचा विरोध केला. सर्व ब्राह्मणांनी मराठ्यांनी सर्वांनी तिला बहिष्कृत केले ,तिला धर्मांध ठरवले. वर्तमानपत्रातून तिची टीका करण्यात आली. तिच्यावर पूर्ण बहिष्कार टाकला पण तिच्यासारख्या काही स्त्रियांनी तिला चोरून मदत केली. आणि ती पूर्णपणे या अशा स्त्रियांसाठी झटत राहिली आणि एक दिवस आजी मला महर्षी कर्वे यांच्याकडे घेऊन गेली.कर्वे यांनी आजीला सांगितले, "तुझ्या या नातवाला माझ्या लेकींसाठी झटायला सांग ,माझे पूर्ण आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतील." आणि ते लक्षात ठेवूनच आज स्त्रियांसाठी नंदावहिनी कडून स्त्रियांसाठी आत्मबलचे वर्ग चालू झाले.कर्वे हे  महान ऋषी होते तो सिद्धच आहे. माझी पत्नी प्रत्येक स्त्रीचा माहेरवास आहे आणि आम्ही तिघेही या स्त्रियांना सांभाळणार. प्रत्येक दुर्बल घटकांसाठी साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी ,अनिरुद्ध उपासना ट्रस्ट ,दिलासा मेडीकल ट्रस्ट या संस्था झटतआहेतच.
*मला तुम्हा सर्व स्त्रियांना आज एक महत्त्वाचं सांगायचं आहे*, "बायांनो! *तुम्ही प्रथम मत्सर सोडून द्या, संशयी वृत्ती सोडून द्या, कॉम्पिटिशन सोडा, आज एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मत्सर करते, मी तिच्या पेक्षा जास्त पुढे कशी जाईल आणि ती मागे कशी राहील हेच मी बघते.* माझे बंधुत्वाची गाठ तयार आहे. ती गाठ माझ्याशी बांधायची असेल तर *मत्सर सोडून द्या*. जर ही गाठ बांधलेली असेल तर तुमच्यावर कोणी हात घातला तर *तुमचा हिसका त्या गाठीला बसतो. आणि गाठीला हिसका बसला की मला हिसका बसणारच. मी खडबडून जागा होईल आणि तुमचं रक्षण करील.* पण तुम्हीच ही गाठ सोडता आणि गाठ सुटली की *मी येऊ शकत नाही*. तुम्ही ही गाठ घट्ट बांधा. *तुमचा बाप म्हणून भाऊ म्हणून बांधा. मी समर्थपणे उभा राहिल तुमच्यासाठी*.

*रक्षाबंधनच्या* दिवशी इकडे *आठ वर्षाची मुलगी* मला तुमच्या राख्या बांधत होती पण लक्षात ठेवा *तुमच्यातली प्रत्येक जण  मला ती राखी बांधत होती*.  प्रत्येक स्त्रीचा *मी भाऊच आहे*. प्रत्येक कष्टाने त्रासलेल्या पुरुषाचा *मी भाऊ आहे सखा आहे*. मी तुमच्यासाठी *तळमळणारच*.

मी चार रसयात्रा केल्या .पहिल्या रसयात्रेला 100 दुसऱ्या रसयात्रेला 375, तिसऱ्या रसयात्रेला 1000 आणि चौथ्या रसयात्रेला अडीच पट तीन पट भक्त होते. माझी रसयात्रा कधीच संपत नाही. ही रसयात्रा फक्त चार दिवसच का? ही रसयात्रा जीवनभर का नाही? मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर रसयात्रा करायला तयार आहे.पण रसयात्रेतसुद्धा तुम्ही माझ्यात काहीतरी दिसतंय का हे पाहता. मला हा शोध संपवायचा आहे. मला माझ्या प्रत्येकाची भावयात्रा करायची आहे.ज्यांचा भाव पूर्ण त्यांना मात्र मी सगळं दाखवतो. मला विठ्ठलाचा भक्त ही पूज्यच आहे. *प्रत्येक देवळात तो एकच आहे. मला ज्या क्षणी प्रत्येक दैवता मध्ये माझा सद्गुरु दिसेल तर ते दैवतच सद्गुरु शक्तीत विलीन होते.मग कुठलंच दैवत तुमच्यावर कोपणार नाही*. भुताला मी का घाबरावं?  माणसाची विकृती हीच त्याचं भूत आहे. हडळ जर घरी आली तुम्हाला खायला तर तिला समोर बसवा, चहा पाणी द्या आणि सांगा माझा बाप समर्थ आहे. मला खायच्या आधी माझ्या बापूला खा. मग ती हडळ माझ्याकडे आल्यावर मी तिला खाऊन टाकेल कारण मला नेहमीच खूप भूक लागलेली असते.
माझ्याकडे प्रेमाची भरपूर शक्ती आहे मला ते प्रेम वाटायचे आहे,मला प्रेमाचं बी पेरायचं आहे  कारण हे बी पेरलं तर त्याच्यातून भरपूर प्रेम उगवणार आहे. मी तुमच्यासाठीओव्हर टाईम करायला तयार आहे. तुम्ही सुखी व आनंदी व्हा. सदैव देवयान पंथावर राहा. मला दोन हात ,दोन पाय, दोन डोळे आहेत,मीही माणूसच आहे. पण लक्षात ठेवा याच्याही पलीकडेही मी आहे मला कसलंच बंधन नाही. मला दिशेच बंधन नाही, मला काळाचं बंधन नाही मला कोणीही रोखू शकणार नाही. माझ्याकडे असंख्य हातोडे कुऱ्हाडी आहेत. मी माझ्या प्रत्येकाच्या पायाला दोर बांधून आणतोच आणि तुम्ही कितीही लांब पळाला तरी मी आणणारच. तुम्ही कितीही चुकलात तरी मी तुम्हाला माझ्या पासून कधीच दूर लोटणार नाही एकशे आठ टक्के नाही लक्षात ठेवा!! 

*हरी ओम.*🙏

Wednesday, September 6, 2023

Post from Sai – The Guiding Spirit“

हरि ओम.
पूज्य समीरदादा ह्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच आपले सर्वांचे लाडके आद्यपिपा श्री सुरेशचंद्रसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या लिहीलेल्या काही सुमधुर आठवणी आज वाचनात आल्या .
 बहुधा 15 ऑगस्ट  2012 मध्ये नवीन फोरम  “साई – द गाईडींग स्पिरीट (“Sai – The Guiding Spirit“).  सुरू करताना लिहील्या असाव्या त्याच  येथे शेअर करीत आहे. 

समीरदादा , आम्ही खूप अंबज्ञ आहोत की आपण  आम्हां सर्वांना ही अमूल्य देणगी दिली.

आज श्रीकृष्णजयंती म्हणजेच 
परमपूज्य आद्य पिपा ह्यांचा महानिर्वाणदिन. 
त्यानिमित्ताने...
पुष्प उमलले जे माझे वाहिले तुलाची
तुला तुझे देतानाही भरुनी मीच राही...
आम्हां सर्वांची हीच भाव पुष्पांजली. 

आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.

काकांची एक गोष्ट मी लहान असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे दिवा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी दिवा बंद केला की कधी कधी पुन्हा लावायला सांगायचे. साईनाथांचं दर्शन घेताना त्यांना समाधान व्हायचं नाही. असं ब-याचदा घडायचं. मला वाटायचं रोजचा “तोच, तोच” फोटो बघतानाही त्यांना असं का करायला लागतं? आता त्या गोष्टी कळतात. हाच तो फोटो जो काकांच्या वडिलांनी साईनाथांचा हात लावून घेतला होता; जो आमच्या ठाण्याच्या घरी, घर झाल्यापासून म्हणजे १९६६ पासून लावलेला होता.

जेव्हा काकांच्या निर्वाणाचा दिवस जवळ आला तेव्हा बापूंनी (अनिरुद्धसिंह) तो फोटो ठाण्याहून मागवून घेतला व काकांच्या खोलीत त्यांच्या समोर लावला. काका जे समजायचे ते समजून चुकले, त्यांना अत्यंत आनंद झाला. फोटो बघून ते एवढे गहिवरले की त्यांना त्यांचे अश्रू आवरताच येईनात. निर्वाणाच्या आदल्या दिवशी काकांनी माझ्यासमोर बापूंना (अनिरुद्धसिंह) विचारलं की “बापू अजून किती दिवस?” त्या वेळेस पहाटे बापूंनी (अनिरुद्धसिंह) माझ्यासमोर काकांना सांगितले की “आता काही तासच उरले आहेत.” तेव्हा काकांनी अत्यंत समाधानाने माझा हात बापूंच्या (अनिरुद्धसिंह) हातात दिला; ही माझ्याकरिता काकांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट होती.

काकांच्या नित्य पठणातील स्वत:ची श्रीसाईसच्चरिताची पोथी

काकांनी वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे १९४५ साली श्रीसाईसच्चरिताचे दरवर्षी कमीतकमी चार सप्ताह करण्याचा संकल्प केला. श्रीसाईसच्चरितात सांगितल्याप्रमाणे रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा या दिवशी सप्ताहाची सांगता व्हायची. मला आठवतंय.

जया मनी स्वहितविचार l तेणें हा ग्रंथ वाचावा साचार l

जन्मोंजन्मीं साईंचे उपकार l आनंदनिर्भर आठवील ll 

या गुरुपौर्णिमा गोकुळअष्टमी l पुण्यतिथी रामनवमी 

l या साईंच्या उत्सवी नियमीं l ग्रंथ निजधामीं वाचावा ll

काही वर्षं तर काकांनी सप्ताह (श्रीसाईसच्चरिताचे पारायण) शिरडीला द्वारकामाईत कोळंब्याच्या बाजूच्या भिंतीला टेकून केलेला होता. आम्ही सर्व म्हणजे आई, दादा व मी त्यांच्या पठणाच्या वेळेस त्यांच्या बाजूला बसलेले असायचो. तो काळ साधारण १९७० ते १९७५चा होता. त्यानंतर मात्र शिरडीत येणार्‍या साईभक्तांची संख्या खूपच वाढू लागली व पूर्ण सप्ताह तिथे बसून करणं अशक्य होऊ लागलं. त्यानंतर मात्र जसं शक्य होईल तसं मोजके अध्याय काका द्वारकामाईत बसून वाचायचे. अजूनही ते पठण माझ्या कानात घुमतंय. मला श्रीसाईसच्चरिताची गोडी लागली ती काकांच्या या पारायणामुळे व नित्य पठणामुळे. साईनाथांच्या, बाबांच्या या शिरडीशी अशा प्रकारे आमची नाळ बांधली गेली. वर्षातून कमीतकमी दोनदा तरी आमची शिरडीची वारी व्हायचीच.

श्रीसाईसच्चरितातील ३५व्या अध्यायातील २१८ ते २२२ ह्या ओव्या त्यांच्या खूपच आवडीच्या होत्या.

हा सच्चरित मार्ग धोपट । जेथें जेथें याचा पाठ |

तेथेंच द्वारकामाईचा मठ | साईही प्रकट निश्चयें ।।

तेथेंच गोदावरीचें तट । तेथेंच शिरडी क्षेत्र निकट ।

तेथेंच साई धुनीसकट । स्मरतां संकट निवारी ॥

जेथें साईचरित्रपठण । तेथें सदैव साईनिवसन ।

श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन । करितां तो प्रसन्न सर्वभावें ।।

स्मरतां साई स्वानंदघन । जपतां तन्नाम अनुदिन ।

नलगे इतर जपतप-साधन । धारणाध्यान खटपट ॥

साईचरणीं ठेवूनि प्रीती । जे जे या साईंची विभूती ।

नित्यनेमें सेविती लाविती । ते ते पावती मनेप्सित ॥

आणि ह्या ओव्या काका अक्षरश: जगले.

काका “श्रीसाईस्तवन मंजिरी”देखील अतिशय सुंदर म्हणायचे. दादाला व मला त्यांनीच श्रीसाईस्तवन मंजिरी म्हणण्यास सांगितले होते; व आमच्या नित्य पठणात इतर स्तोत्रांबरोबरच ह्याही स्तोत्रांचे पठण होते.

१३ नोव्हेंबर २०००ला बापूंनी (अनिरुद्धसिंह) काकांची पिपिलीका पांथस्थ पदावर नियुक्ती केली. तेव्हापासून काकांचा एक वेगळाच आध्यात्मिक प्रवास चालू झाला. काका खूप शांत झाले. २००४ साली बापूंच्या (अनिरुद्धसिंह) सांगण्यावरून त्यांनी मला गुरुमंत्र दिला; तीही श्रीसाईसच्चरिताचीच ओवी (११वा अध्याय, ओवी १५२)

पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंतीं पूर्ण निष्काम ।

पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।

सगळ्या श्रद्धावान बापूभक्तांचं ह्या “श्रीसाईसच्चरिताशी” एक विशेष आणि दृढ नातं आहे. बापूंनी  (अनिरुद्धसिंह) श्रीसाईसच्चरितातील पंचशील परीक्षा चालू केल्या, त्याही “श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनीच्या” माध्यमातून. प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही बापूंनी (अनिरुद्धसिंह) घेतली व ती लेक्चर्स संकलित करून श्रीसाईसच्चरिताचं प्रॅक्टिकल बुक तयार झालं; हजारो श्रद्धावान ह्या परीक्षेला बसले. १९९६ साली पहिली रसयात्रा झाली तीही शिरडीचीच; त्या वेळेला हजर असलेल्या श्रद्धावानांना बापूंनी (अनिरुद्धसिंह) साई आणि शिरडी समजावून सांगितले. आता तर बापूंची (अनिरुद्धसिंह) हिंदीतील प्रवचनंही चालू आहेत तीही श्रीसाईसच्चरितावरच. म्हणूनच आपण या ब्लॉगच्या माध्यमातून ह्या साईसच्चरितावरील फोरम चालू करत आहोत; बुधवार, १५ ऑगस्ट २०१२ या दिवसापासून आणि फोरमचं नाव असेल “साई – द गाईडींग स्पिरीट (“Sai – The Guiding Spirit“).

-- पूज्य समीरदादांच्या ब्लॉग वरील माहिती संकलन ह्यातून

Tuesday, September 5, 2023

बापूंचे 31 ऑगस्ट 2023 ला केलेले इंग्रजी प्रवचनाचे शब्दांकन

बापूंचे 31 ऑगस्ट 2023 ला केलेले इंग्रजी प्रवचनाचे शब्दांकन.

Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done ,Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done ,Oh lord Swayambhagwan Trivrikram, thy will be done 
( येत्या प्रपत्तीला त्रिविक्रमाकडे अशी प्रार्थना करा, "हे स्वयं भगवान त्रिविक्रमा ,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे,तुझ्या इच्छा प्रमाणे माझं जीवन घडू दे.( आपकी जैसी इच्छा है वैसा ही मेरे जीवन में हो)
 ( माझ्या जीवनात मला काही नको जे तुला आवडत नाही. मला फक्त एवढेच दे जे तुला आवडेल आणि जे तुला मला द्यायची इच्छा आहे.
प्रपत्ती म्हणजे उच्च अवस्थेतील शरणागती 
.तू निर्माण केलेल्या नाथसमविधा प्रमाणे मला माझं जीवन आवडू दे ) त्यामुळे प्रपत्ती करण्याचा फायदा हा आहे की आम्हाला देवाने जे दिले आहे ,ते आवडू लागेल, अर्थात नाथसंविध आवडू लागेल. ही प्रपत्ती फक्त स्वतःसाठी नसून, पूर्ण कुटुंबासाठी आहे, मग भले ते पूर्ण कुटुंब नास्तिक असलं तरी तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला प्रपत्तीचे फळ नक्कीच मिळेल. निदान एवढ फळ तरी तुम्हाला मिळेल , जेणेकरून तुम्हाला दुःख सोसावं लागणार नाही. आम्ही जे काही मनामध्ये विचार करत असतो किंवा देवाकडे बोलत असतो ते सर्व काही देव ऐकत असतो पण देव काय सांगतो, देव आमच्याकडे काय बोलतो ते आम्हाला कळत नसतं पण ते जर कळायचं असेल तर आपल्याला प्रपत्ती करावी लागेल आणि प्रपत्ती केल्यानंतरच आपल्याला कळेल देव काय बोलतोय ते! या मकर संक्रांतीला पुरुषांच्या प्रपत्ती प्रमाणे स्त्रियांना रणचंडीका प्रपत्तीसाठी पण एक कथा प्राप्त होईल. मी तुमचे प्रत्येक शब्दन शब्द ऐकत असतो तुम्ही जे काही स्वतःबद्दल विचार करत असतात, अक्षरशा जे काही वाईट चांगलं जे जे विचार करतात ते ते सर्व काही  नक्की 108% मी ऐकत असतो, आज एक नक्की लक्षात ठेवा माझा बापू ,माझे प्रत्येक विचार आणि माझे प्रत्येक शब्द ऐकत असतो त्याचक्षणी, कारण मी अभिमानाने सांगू शकतो मी श्रवण भक्त आहे, आणि मी तुम्हा सर्वांची श्रवण भक्ती करत असतो, तुम्ही मात्र एकाच देवाची श्रवण भक्ती करत असता. त्यामुळे मी सदैव म्हणत असतो माझा इगो हा सर्वात मोठा इगो आहे, कारण मी एवढ्या सगळ्यांची श्रवण भक्ती करत असतो म्हणून. मी खरंच सांगतो मी तुम्हा सर्वांचा भक्त आहे. आय लव यू .आय लव यू सो मच. स्वतःच्या मुलं- मुली वरती  प्रेम करणं ही पण भक्तीच आहे. ही माझी वात्सल्य भक्ती आहे. My Bapu listens every word for me from me. Spoken, read thought or imagination whatever and whatsoever. मी माझ्या मुलासाठी कुठेही जाऊ शकतो, हा माझा अभिमान नाही, हे माझे आवडते काम आहे. तर ही माझी दास्य भक्ती आहे माझ्या आईसाठी अर्पण केलेली. ही माझी वात्सल्य भक्ती आहे  तुमच्यासाठी.

अंबज्ञ
अमोला सिंह तिळवे

First Pitruvachan dated 31/08/2023

HariOm 
First Pitruvachan dated 31/08/2023

Ambadnya means Aaichya Charni Krutadnyata

There is no value for the words thank you and sorry but there is meaning of the word Ambadnya 

Naathsamvidh means God Willing 

The prayer let my Jeevan happen as per Your Wish - Parmeshwar's Wish

Sant Eknath written the Aarti - Trigunatmak Trimurti which is sung in the Shri Aniruddha Gurukshetram 

We should try reading the Aarti Trigunatmak Trimurti

We need to improve our bhaav

Why the same mistakes keep on repeating 

We do should do the small small things in Adyatma

3 types of Upasana 
 - Nitya Upasana
 - Naimitik Upasana
 - Vaishishik Upasana

Nitya Upasana is our daily Upasana

Naimitik Upasana means saying Shri Hanuman Chalisa in Shri GuruCharan Maas or Ghorkastodharan Stotra in Shravaan Maas

We can chant the Ghorkastodharan Stotra 108 times at our home too

It is not compulsory to go to all weddings and create crowd there 

We should attend weddings  of those persons who are close to us

Vaishishik Upasana means a Special Upasana such as our Shri Vardhaman Vrattadhiraj

Om HariHaraai Namah - other name of Shri Trivikram 

Harihar means Trivikram - The One has the same properties at all time of both MahaVishnu and ParamShiva

Our mind needs to be full of Satva Guna to have Darshan of God

The Avatar of the Lord happens for the common person to know God

He has in the Roop of a Human Being just for us

Who are we to decide about God

Harhar Swaroop means the Human Form and the Divine Instance of the Lord being active at the same time

The Harihar is Shiva and Vishnu at the same time

Whatever wrong happens in our life is also good for us

The tension at the time of exam is also given by Harihar

Shiva takes Ram Naam and Ram has made Rameshwaram

Difference between AdiMaya and AdiMata

Maya means mojnaari - accurate mojmaari

Mata means the One Who takes us closer to God

He destroys our sins and gives shape to our punya at the same time 

The Shape of us what He decides for us is the Best for us

Hum beej means astitva

Rasraaj is another name of Lord Shri Trivikram 

Ruum beej means the ras - beej of Lord Shri Ram 

2 pictures to be seen every night by us before going to sleep

1. The picture of Lord Ram giving hug to Lord Hanumant after He searches Sita Mata successfully 

2. Lord Hanumant tearing His Chest to show Shri Ram in It

To see these 2 pictures and then chant the Mantra - Om Mam Aniruddhaai Namah

This is Darshan Upasana which is given for the very first time in this kalp and this is from DAD to us and we need to do this everyday.

Wednesday, July 26, 2023

अधिकमासाचं महत्व

(अधिकमासाचं महत्व)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२३.०८.२०१२)

॥ हरि ॐ ॥

गेले दोन गुरुवार आपण भेटू शकलो नाही. का? हा प्रश्न अनेकांना पडला असेल . "का?" ह्या प्रश्नाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर त्यातूनच विज्ञान निर्माण झाले. "का?" ह्या प्रश्नातूनच अध्यात्म निर्माण झाले. "का?" हा प्रश्न जर पडला नाही तर मनुष्य प्रगतीच करू शकत नाही. पण हा "का?" प्रश्न कुठे व कधी विचारायचा हे अतिशय महत्त्वाचे असते.

आई लहान बाळाला सांगते. "भांडयाला हात लावू नको." इथे जर बाळाने "का?" प्रश्न विचारला आणि भांडयाला हात लावला तर काय होईल? भांडे गरम असल्याने हात भाजेल. जर आई बाळाचे संगोपन करताना बाळाच्या प्रत्येक "का?" ह्या प्रश्नाचे उत्तर देत राहिली तर ती त्याला वाढवू शकेल "का?" नाही.

लहान मुलांनी पण शाळेत जायला लागल्यावर १+१=२ असेच का? असा प्रश्न विचारला, तर चालणार आहे का? ह्यामागचे गणितशास्त्र जरी शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितले तरी ते ह्या लहान मुलास समजू शकणार "का?" नाही. जर एखाद्या मुलाने समजा प्रश्न केला की २ ला २ च का म्हणतात? तर त्यावर शिक्षक काय म्हणतील, "आम्ही असेच म्हणतो तुला पाहिजे तसे तू म्हण." पण इथे आम्हांला कळलं पाहिजे की आम्ही एखादी गोष्ट ठरवल्याने त्यानुसार नियम बनतात का? नाही. शाळेत जर आम्ही प्रश्न केला की, शिक्षिका ही शिक्षिका का आहे? तर त्याचे उत्तर मिळेल तिच्याकडे शिकवण्याची degree आहे म्हणून. ह्यावर जर कोणी विचारले, "तिला degree कोणी दिली? तर काय सांगणार? ती शिक्षिका त्या विषयाच्या कॉलेजमधील शिक्षकांकडून शिकली म्हणून. ह्यावर जर विचारले, "त्या शिक्षकांना कुणी degree दिली? तर परत तेच उत्तर मिळणार. असं आपण सतत "का? का?" हा प्रश्न विचारत गेलो तरी तेच उत्तर मिळणार बरोबर मग हे अनादी अनंत आहे का? नाही. ह्याचा अर्थ सुरुवातीला ज्या कुणी ह्या शिक्षकांना degree दिली, त्यांच्याकडे ही degree नसली पाहिजे.

आमच्या मेडिकलमधले उदाहरण बघूया. आधी cardiology हे deparment नव्हते. पूर्वी जे कोणी MBBS शिकले होते, त्यांनी ह्या क्षेत्रात आधी अनुभव घेतला. मग ह्या विषयाचे वेगळे department सुरू करावे असे ठरले. त्या department मध्ये काम करण्यासाठी विद्यार्थी पाहिजे, म्हणून त्यासाठी विशेष अभ्यासक्रम आला. म्हणजेच जेव्हा पहिल्यांदा MD Cardiology ची परीक्षा घेतली गेली तेव्हा ही परीक्षा घेणार्‍याकडे ही degree नव्हती तर ते ह्या विषयातील अनुभवी होते.

इथे आपल्या लक्षात येईल की, "का?" हा प्रश्न विचारण्यामागे योग्य संतुलन असायला हवे. ह्यासाठी मोठी विद्वत्ता नको. सोपे उदाहरण बघूया. रोजच्या जीवनात आपल्याला भूक लागते. मग ती भूक "का?" लागते, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी शरीररचनेचा अभ्यास केला. पण समजा आम्ही १० वर्षे रोज दुपारी १.०० वाजताच व रात्री १०.०० वाजताच जेवायचे ठरवले आणि त्याप्रमाणे वागलो तरी ११ व्या वर्षी आम्हांला त्याच वेळेला भूक लागते का? नाही.

नेहमी सूर्योदय होतो, पण तो बघण्यासाठी आम्हांला सूर्यावर जावे लागते का? नाही. पृथ्वीवरून आम्ही सूर्याची वेळ ठरवत असतो बरोबर. जर आम्ही इथे प्रश्न केला, ही सूर्याची वेळ बदलता नाही का येणार? तर ह्याचे उत्तर काय मिळेल, "असे केले तर पृथ्वीचा axis बदलेल. मग problem होईल. ह्यावर कोणी जर विचारले, प्रयत्न करुन नाही "का" बघता येणार? ह्याचे उत्तर शास्त्रज्ञ देऊ शकतील मी (परमपूज्य बापू) काही शास्त्रज्ञ नाही.

पावसाळ्यात आम्हांला नेहमी वाटते पाऊस रात्री १२.०० ते सकाळी ६.०० पर्यंतच पडावा व आवश्यक तेवढे पाणी मिळावे. दिवसा पाऊस पडू नये. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींवर आम्ही विचार करत असतो. पण जे आमच्या आवाक्यात नाही अशा गोष्टींवर आम्ही विचार का करावा? जे विचार करण्याची तुमची capacity नाही अशा गोष्टींवर तुम्ही "का" विचार करता मला (परमपूज्य बापू)कळत नाही.

समजा आई-वडील रस्त्यातून जात आहेत आणि त्यांनी एखाद्या तरुण मुलाचा accident बघितला, तर ते काय करतात घरी येऊन मुलाला बाईक नीट चालवली पाहिजे, त्यावर उपदेशाचे डोस देतात पण तेव्हाच हाही विचार येतो, "एवढा लहान मुलगा "का" गेला? काय प्रारब्ध असेल त्याचे?

रस्त्यात भिकारी बघून मनात प्रश्न येतो- "हा भीक "का" मागतो? शेजारच्या व्यक्तीने त्याच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले असे कळल्यावर "का?" ठेवले असेल असा प्रश्न मनात येतो. मला सांगा काय करणार तुम्ही? असा विचार करून, तुम्ही त्याच्या आई-वडिलांना जास्तीत जास्त काय करणार? त्याचेच अनुकरण करून तुमच्याही आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवाल बरोबर.

एक मनुष्य Mr.X आहे ह्याच्या घरी येतोय आणि त्याला त्याच्या घराला आग लागलेली दिसतेय मग त्याने काय करायला हवे? आग "का" लागली? ह्याचे संशोधन करत बसायला पाहिजे का? नाही. त्याने तेव्हा पाणी ओतून आग विझवायला हवी.

म्हणजेच आम्हांला "का?" ह्या प्रश्नाला मर्यादा घालता आली पाहिजे. आमच्या जीवनात "का" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. कारण आम्ही "का?" प्रश्नाला मर्यादा घालत नाही. सतत का? का? ही काव काव आमच्या मनात चालू असते. कावळ्यांना श्राद्ध घालण्यापेक्षा ह्या मनातल्या काव काव करणार्‍या कावळ्यांना श्राद्ध घाला. म्हणजे काय? तर सतत का? का? न म्हणत बसता, कामाला लागायचे.

समजा तुम्ही तरुण आहात आणि एक अतिशय सुंदर मुलगी जवळून चालली आहे. तर ही मुलगी इथे का? असा प्रश्न कोणी विचारून त्यावर संशोधन करत बसला तर काय होईल? त्याला मग त्या मुलीची लग्नाची वरात बघायची पाळी येईल. हेच जर का? प्रश्न न करता तिची व तिच्या आई-वडिलांची माहिती काढली, योग्य विचारणा केली तर त्या तुमच्या आवडत्या मुलीशी तुमचे लग्न जुळेल. ह्यावरून लक्षात येते की, "का?" ह्याचे प्रमाण प्रत्येक माणसासाठी प्रत्येक क्षणाला वेगळे आहे. कुठल्या "का?" ची सोबत धरायची व कुठल्या "का?" ला बाजूला सारायचे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक क्षण हा कुठल्या ना कुठल्या "का?" सोबत निगडित असतो. कारण मनुष्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे "मी ह्या मृत्युलोकात "का?" आलो. कोणी विचारत का - "मी "का" मेलेलो नाही?" "देवा मी "का" जिवंत आहे?" जोपर्यंत तुम्ही ह्या मृत्युलोकात आहात तोपर्यंत हा "का?" प्रश्न तुमची साथ सोडत नाही

आपण जन्माला येतो त्याला आपण मृत्युलोक म्हणतो आणि ह्या मृत्युलोकातून बाहेर पडण्याला मृत्यू म्हणतो. पण एक कायम लक्षात ठेवा, श्रद्धावानासाठी नेहमी जन्म म्हणजे परमात्म्याच्या जगातून मृत्युलोकात जन्म असतो व मृत्यू म्हणजे त्याचा परमात्म्याच्या जगात जन्म असतो. त्यामुळे मृत्यूचे भय ठेवण्याची आवश्यकताच नाही. सोप्या भाषेत समजून घेऊया समजा माझी दोन घरे आहेत. एक मद्रासमध्ये आहे तर एक मुंबईत आहे. मी जेव्हा मद्रासमध्ये असणार तेव्हा मुंबईत नसणार बरोबर पण दोन्ही घरे ही भारतातच आहेत. त्याचप्रमाणे परमात्म लोक व मृत्युलोकाचे असते. म्हणजे मी कुठेही असलो तरी आई चण्डिकेच्या भर्गलोकातच असतो.

"सच्च्या श्रद्धावानाला मृत्यू नसतो, तो एक तर मृत्युलोकात जन्म घेतो नाही तर परमात्मा लोकात जन्म घेतो."

प्रत्येक श्रद्धावानाने नीट लक्षात घेतले पाहिजे की त्याला मृत्यू नाही. जो कोणी म्हणून "तो" आहे, त्याला आपले मानून त्याच्यावर विश्वास ठेवतो, श्रद्धावानाच्या नऊ निष्ठा आत्मसात करण्याचा प्रयास करतो, ह्या अनिरुद्धाला आपला मित्र मानतो त्याला मृत्यूचे भय नाही. अशा श्रद्धावानाच्या प्रत्येक जन्माच्या वेळेस "तो" जो कोणी आहे "तो" त्या श्रद्धावानाच्या हाताला धरून मृत्युलोकात पृथ्वीच्या शाळेत घेऊन येईल. आई जशी बाळाला हात धरून घरून शाळेत आणते व परत घरी घेऊन जाते. तसेच श्रद्धावानाच्या हाताला धरून पृथ्वीच्या शाळेत आणणारा तोच व परत पृथ्वीच्या शाळेतून आपल्या घरी परमात्म लोकात नेणाराही तोच. इथे सोबत ना पाटी ना पेन्सिल. इथे पाटी म्हणजे आमचे प्रारब्ध, नशीब. तो पृथ्वीवर श्रद्धावानाला घेऊन येतो ते त्याची पाटी कोरी करण्यासाठी, जे काही त्यावर लिहिले आहे, ते पुसून स्वच्छ करण्यासाठी.
असे जे कोणी श्रद्धावान त्याच्या मार्गावरुन चालण्याचा थोडासा जरी प्रयास करत असतील अशा सर्वांना "तो" जेव्हा येतो तेव्हा त्यांना स्वत:कडे खेचून घेतो. बाकिच्यांना नाही. शाळेत आल्यावर शिकावेच लागते, अभ्यास करावा लागतो, मारही खावा लागतो, पण हे सगळे करण्यासाठी आमचे भले व्हावे म्हणूनच -

"काय गोड गुरुची शाळा"

गेल्या आठवड्यात अधिक मास सुरू झाला. ह्या मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. ह्या अधिक मासात नेहमी अधिक गोष्ट करायची असते. ह्या अधिक महिन्यात एकदा तरी त्या आदिमातेसमोर व तिच्या पुत्रासमोर उभे राहून बोला, "मी कधीच मरणार नाही. मला दोन्हीकडे जन्मच आहे."

मी(परमपूज्य बापू) जो कोणी आहे, राक्षस म्हणा, शत्रू म्हणा, मित्र म्हणा, काहीही म्हणा, जो कोणी "माझा" झाला त्याची पाटी कोरी करण्यासाठी मी आलो आहे. ह्या जन्मात जो कोणी माझा (परमपूज्य बापू) झाला व माझा बनून राहिला त्याची सगळी पापे मी वरतीच धुऊन टाकणार आहे. त्यामुळे मनापासून एकदा तरी ह्या अधिक मासात त्या आदिमातेसमोर व तिच्या पुत्रांसमोर उभे राहून म्हणा, कुठल्याही भाषेत म्हणा. जो कोणी माझा होऊन माझ्यावर विश्वास ठेवून हे वाक्य बोलणार असेल तर त्याचे चुकीचे शब्द सुधारण्याची जबाबदारी माझी.

आज मला इथे प्रत्येकाला माहिती पाहिजे की, "मी जो कोणी आहे तो कधीच मरणार नाही आणि प्रत्येक वेळी ह्यापुढे जन्म घेताना आमच्यासोबत पापाचा अंश बिलकुल नसणार. म्हणजे ह्यापुढे आम्ही फक्त सुख भोगण्यासाठीच येणार. तुम्ही(परमपूज्य बापू) सुरू केलेलं व्रत पूर्ण होण्याआधीच एवढी gurantee कशी काय देता बापू? परत "का"? आला.

तर एवढेच सांगतो, की हे तुमचे क्षेत्र नाही. पृथ्वी उत्पत्तीपासून जर आतापर्यंतचे सगळे मानव जरी एकत्र आले व सगळ्यांनी हातात मोठ-मोठी शस्त्रे, मिसाईल्स घेतली आणि माझ्या हातात काहीच नाही, कुठलेही शस्त्र नाही, तरी माझे challenge आहे. अशा अख्ख्या संघाने समोर येऊन दाखवावे. हवं तर येताना भूतांना, पिशाश्चांना, राक्षसांना घेऊन या, तरीदेखील एकच सांगतो - "मी(परमपूज्य बापू) लई भारी आहे". मी (परमपूज्य बापू) आज पहिल्याच गुरुवारी अधिक मासात व्रत सुरू केले आणि त्याचक्षणी माझ्या(परमपूज्य बापू) आईने त्याचे उद्यापन पण करून घेतले व आशीर्वादही दिला आहे. कारण फक्त तिचे प्रेम.

ह्या प्रवचनाची CD Centre ला पण येईल. तुम्ही तुमच्या नातलगांना आतासुद्धा सांगू शकता. प्रत्येक व्यक्तीला (श्रध्दावानाला) ज्या क्षणी ही माहिती मिळेल. त्या व्यक्तीसाठी आताचा क्षण हा त्या क्षणापासून सुरू होईल. आपण नेहमी गुरुक्षेत्रम मंत्र इथे घेतो. पण आज आपण माझ्या आईचा गजर करायचा आहे. सगळ्यांनी मिळून उभे राहून आज जल्लोष करायचा आहे.

आज जे काही तिने माझ्या (परमपूज्य बापू) मित्रांना दिले आहे, त्याचा आनंद मला जोरदारपणे साजरा करायचा आहे.

॥ हरि ॐ ॥

Monday, July 3, 2023

श्रद्धावानांचे पथदीप - भाग १ important

From Bapu's whatsApp group

*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -३०🌟*
 
    *🔆 श्रद्धावानांचे पथदीप - भाग १🔆*

*१. आद्यपिपा :*



*आद्यपिपा = एक भक्तिपूर्ण प्रवास*
- समीर दत्तोपाध्ये

जन्म आषाढी एकादशी १९३३ आईचे नाव -लक्ष्मी
वडिलांचे नाव -पांडुरंग

वडिल पांडुरंगरावांची संतती जगत नसल्यामुळे १९१५ साली ते शिरडीस साईनाथांच्या दर्शनासाठी गेले व त्यानंतर सर्व अपत्ये सुखरुप राहिली.

काकांच्या जन्मानंतर त्यांच्या आठवणीतील पहिले शिरडी दर्शन १९४० साली झाले. त्याच रात्री द्वारकामाईत बसून काकांच्या वडिलांनी त्यांना उदीचे महत्व समजावून सांगितले. त्या दिवसापासून काकांची साईभक्ती अत्यंत दृढ झाली.

१९४५ साली शिरडीस गेले असताना द्वारकामाईमध्येच काकांची माधवराव देशपांड्यांचे पुत्र उद्धवराव व म्हाळसापतींचे पुत्र मार्तंडबाबा ह्यांच्याशी भेट झाली व त्या वर्षापासून काकांनी श्री साई सच्चरिताचे दरवर्षी कमीतकमी चार सप्ताह करण्याचा निश्चय केला; रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा. ह्यात कधीही खंड पडला नाही.

विवाह - ७ मे १९६० रोजी प. पू. सुचितदादा व समीरदादांच्या मातोश्रींशी (सुनंदा) काकांचा विवाह झाला व स्वप्नदृष्टांतानुसार साईंच्या आज्ञेने त्यांचे नाव शुभदा ठेवले.

विवाहानंतर पत्नीच्या संपूर्ण सहकार्यामुळे काकांच्या भक्तिप्रवाहाची जोरदार वाटचाल सुरु झाली. काका सदैव आपल्या सहधर्मचारिणीच्या सहकार्याचे तोंड भरून कौतुक करत असत.

काकांच्या जन्मदात्या आईचे निधन १८ नोव्हेंबर १९४१ साली झाले होते. आईच्या वियोगाचे दुःख हळुहळु साईभक्तित रुपांतरीत होऊ लागले. काका शाळेतील काही मित्रांबरोबर अनेकवेळा शंकराच्या मंदिरात संध्याकाळी भजनासाठी जात असत. एकदा एस.एस.सी. (मॅट्रीक) पास झाल्यानंतर काका शंकराच्या देवळात गेले असताना तेथे साईस्तवनमंजिरी वाचत बसले होते. वाचून पूर्ण होताच एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्या समोर येऊन उभा राहिला व त्यांनी विचारले, "बाळ, तुला काय हवे आहे ?" काकांनी उत्तर दिले, "मला देहधारी साई हवा आहे." तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, "मग तू गृहस्थाश्रमी झाल्यानंतर तिर्थक्षेत्रांच्या १०८ यात्रा व संतस्थानांची १०८ दर्शने पूर्ण कर." एवढे बोलून तो | वृद्ध ब्राह्मण हसू लागला. काकांनी विचारले, "पण मी सामान्य माणूस आहे. देहधारी साईचे रुप वेगळे असेल तर ओळखणार कसे?" तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, "त्यावेळेस मीच तुला साक्ष पटवून देईन." काका त्या ब्राह्मण गृहस्थांच्या व्यक्तिमत्वाने खूपच भारावून गेले होते. त्या ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार त्यांनी सर्वकाही करण्याचे ठरविले. विवाहानंतर त्यांनी नोकरी व प्रपंच ह्यातून वेळ काढून सतत संतस्थानदर्शन व तिर्थक्षेत्र यात्रा ह्यांचा झपाटा लावला. शिरडी, पंढरपूर, गोकर्ण, महाबळेश्वर, तिरुपती, गिरनार, परळीवैद्यनाथ, घृष्णेश्वर, रामेश्वरम्, प्रयाग, कन्याकुमारी, इत्यादि तिर्थक्षेत्रांच्या व आळंदी, देहू, गणेशपुरी, हुमणाबाद, गगनबावडा, सासवड, पंतबाळेकुंद्री स्थान, कलावती आईंचे हरिमंदिर, सिद्धरुढ स्वामींचा मठ, पावस, शेगाव अशा संतस्थानांच्या त्यांनी अनेकवार यात्रा केल्या.

इ.स. १९९६च्या पहिल्या रसयात्रेमध्ये सर्व मंडळींना घेऊन बापू शिरडीतील द्वारकामाईत गेले होते. तिथून मग बापू सर्वांना घेऊन शिरडीतील म्हाळसापतींची समाधी, कनीफनाथ मंदिर, इ. स्थळे दाखविण्यासाठी निघाले. काका मात्र द्वारकामाईतच बसून राहिले. त्यावेळेस प. पू. सुचितदादांनी काकांना साईस्तवनमंजिरी पोथी✨️ दिली व तुमच्याकडे ठेवा म्हणून सांगितले. काका श्री साईसच्चरिताचा एक अध्याय वाचून उभे राहिले व द्वारकामाईतील बाबांच्या तसबीरीसमोर लोटांगण घालण्यासाठी गेले. तिथे धुनीजवळ एकाएकी काकांच्या खिशातून दादांनी दिलेली साईस्तवनमंजिरीची पुस्तिका खाली पडली. ती उचलताना "अरे, ही वाचण्यासाठीच तुला मी इथे थांबवले आहे." असा आवाज काकांना ऐकू आला. त्यासरशी काकांना शंकराच्या मंदिरातील ती जुनी गोष्ट आठवली व ते खाली उतरून स्तवनमंजिरी पठणास बसले. काकांचा तो पूर्ण दिवस व रात्र बेचैनीत गेली. सुचित आपणास काहीच सांगत नाही. मीनावनी, चौबळ आजोबा वगैरे मंडळीतर निःसंदिग्धपणे बापूंविषयी सांगत आहेत व आपल्याला अजून काहीच प्रचिती येत नाही ह्या विचारांनी काका खंतावले होते.

असाच काही काळ द्विधा मनःस्थितीत गेल्यानंतर १९९७च्या गुरुपौर्णिमेला नेहमीप्रमाणे श्रीसाईसच्चरिताचा सप्ताह केल्यानंतर रात्री झोपताना काकांनी साईनाथांना स्पष्ट मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना केली. झोपेत त्यांना स्वप्नामध्ये तो शंकराच्या देवळातील प्रसंग परत तसाच्या तसा दिसला. काकांनी सकाळी उठताच शांतपणे निश्चय केला की आता लवकरात लवकर १०८ संख्या पूर्ण करायचीच. त्यानंतर पहिल्या अश्वत्थ मारुती उत्सवाच्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीस शेंदूर लावून बापू आपल्या आसनावर बसताक्षणीच काका एका पूर्ण वेगळ्याच भानरहित अवस्थेमध्ये गेले. त्यांना शंखचक्रबाणधारी स्वरूप दिसत होते. काकांना हाताला धरून चौबळ आजोबा स्टेजकडे गेले. हनुमंताच्या मूर्तीसमोर येताच काका पूर्ण भानावर आले होते. काकांच्या मनाची परत एकदा द्विधा मनःस्थिती सुरु झाली. परंतु गुरुपौर्णिमेच्या रात्री झालेला जुन्या घटनेचा स्वप्नदृष्टांत आठवून काकांनी निर्णय घेतला की | अगदी काहीही अनुभव आला वा काहीही दिसले तरीही जोपर्यंत म्हातारा ब्राह्मण खूण पटवणार नाही तोपर्यंत आपण धीर धरायचा.

पहिल्या अश्वत्थ मारुतीचा तो दिवस.

१९९९ साली त्यांची ही संख्या पूर्ण झाली. प.पू. अनिरुद्ध बापूंशी प. पू. सुचितदादांचे मित्र म्हणून १९८५ साली त्यांची ओळख झालेली होती व १९९५ पासून बापूंच्या भक्तिमार्गातही काका आलेले होते. पण सर्वात महत्वाचा निर्णायक क्षण ठरला तो इ.स. १९९९च्या धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी. त्या दिवशी जुईनगर येथे अरुंधती मातेने श्री विद्यामकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्ये ह्यांच्या तसबीरीचे अनावरण केले. त्यांचा चेहरा बघताच काकांना शंकराच्या देवळातील वृद्ध ब्राह्मण तो हाच ह्याची पूर्णपणे खात्री पटली व काका पूर्णपणे निश्चिंत झाले. त्यानंतर लवकरच व्यंकटेश महोत्सवामध्ये काकांना जप चालू असतानांच पूर्णपणे साईरुपाचे दर्शन झाले व काकांनी अनेक वर्षांचा 'ॐ साईनाथाय नमः' हा चालू असलेला जप ९ मे २००० पासून 'ॐ साईनाथाय अनिरुद्धाय नमः' असा सुरु केला.

१३ नोव्हेंबर २०००ची रात्र काकांसाठी व सर्व बापूभक्तांसाठी अत्यंत भाग्याची ठरली. त्याच दिवशी संध्याकाळी बापूंनी काकांची पिपिलीका पांथस्थ पदावर नियुक्ति करून कार्य सुरु करण्याची आज्ञा दिली होती. त्याच रात्री मध्यरात्री झोपेतून काका एकाएकी उठून बसले व त्यांना दुसरा अभंग स्फुरला. हा अभंग म्हणजे काकांची बापूंच्या चरणधुळीमध्ये लोळण्याची आत्यंतिक इच्छा.

त्यानंतर मात्र काकांचा आध्यात्मिक प्रवास एका वेगळ्याच उंचीवरून अत्यंत जोरदारपणे सुरु झाला. २००४च्या रामनवमीच्या दिवशी रात्री उत्सव संपवून प. पू. बापू हॅपी होममध्ये रात्री दीड वाजता परत आले. जेवणानंतर बापू, सुचितदादा, काका व मी गप्पा मारीत बसलो होतो. बरोबर सोडे तीन वाजता बापू झोपाळ्यावरून उठून उभे राहिले व काकांना म्हणाले, "आज आताच्या आता तुम्ही समीरला गुरुमंत्र द्या." काका म्हणाले, "तुमची आज्ञा आहेच, पण समीरला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार आहे असे वाटत नाही." तेव्हा बापू हसून म्हणाले, "अरे, जेव्हा हजारो मंडळी आमच्या तिघांच्या जयजयकारानंतर समीरच्या आधी तुझा जयजयकार करतात तेव्हा का ऑब्जेक्शन घेत नाहीस ?" काका म्हणाले, "देवा तुझ्याशी वादात कोण जिंकणार ? तू सांगशील ते करतो.' बापूंनी काकांना डोळे बंद करून श्रीसाईसच्चरित उघडण्यास सांगितले व एक बोट पानावर कुठेही ठेवण्यास सांगितले. ती ११व्या अध्यायातील १५२वी ओवी होती. तीच ओवी बापूंनी काकांकरवी मला गुरुमंत्र म्हणून दिली.

पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंती पूर्ण निष्काम ।। पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।।

बापूंचा खेळ पाहून मी स्तिमीतच झालो. माझा दादा हा बापूंचा शिष्य, माझे वडिल सुचितदादांचे शिष्य आणि मी काकांचा शिष्य (माझ्या वडिलांचा). त्यानंतर काकांनी बापूंची पाय धरून विनवणी केली, "एक पुत्र माझा गुरु झाला व दुसरा पुत्र माझा शिष्य झाला. पण आता मात्र पुढे कुणाचेही गुरुत्व मला देऊ नका. व्यंकटेश जपाच्या दिवशी मी तुमच्याकडे एकच मागितले होते की मला मानसन्मान, प्रसिद्धी व मोठेपणा नको. आजही मी परत तेच मागतो आहे. माझी अंतयात्रासुद्धा कुणा थोर भक्ताची म्हणून नाही तर फक्त 'सुचितचा बाप' म्हणूनच निघू दे कारण तीच माझी सुखद गोष्ट आहे." बापू म्हणाले, "आतापर्यंत सगळं तुझ्या मनासारखं झालं ना !” तेव्हा काका पटकन उद्गारले, "हो, पण ९६ पासून ९९ पर्यंत मला का रखडवलेस ?" बापू म्हणाले, "मी रखडवले नाही. तूच तुझ्या चुकीच्या गणितांमुळे रखडलास. तुझी १०८ स्थानांची बेरीज ९७ रामनवमीलाच पूर्ण झाली होती. पण गुरुवारच्या प्रवचनस्थळाला तू तुझ्या बेरजेत न मोजल्यामुळे तुझ्या मनातील १०८ ही संख्या मात्र पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच त्या स्वप्नातील म्हाताऱ्याचा म्हणजेच गोपीनाथ शास्त्री पाध्यांचा फोटो ९७च्या रामनवमीला पाहूनही तू ओळखू शकला नाहीस, तुला खूण पटू शकली नाही, कारण रामनवमीच्या वेळेचा फोटो कोट पगडीतला होता व तुझ्या अनुभवातील म्हातारा शेंडी व शालधारी होता." काका एकदम बापूंच्या चरणांवर जाऊन पडले व त्याच दिवसापासून काकांनी अखंड जपास सुरुवात केली.

काकांच्या आध्यात्मिक प्रवासातील बऱ्याच घटनांचा साक्षीदार बनण्याचे मला मिळाले पण काकांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, बापूंनी ज्या वेळेस माझ्यासमोर काकांना सांगितले की आता काही तासच उरले आहेत तेव्हा काकांनी बापूंच्या हातात दिलेला माझा हात.

॥ हरि ॐ ।।

( कृपासिंधू मॅगझिन - सप्टेंबर २००७)

*🔅महायात्रिक (२२ व्या अध्यायाची कथा) -🔅*

धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी झालेला हा अत्यंत सुंदर संवाद चौबळ आजोबा: अरे सुरेश (म्हणजे आद्यपिपा सुरेशचंद्र दत्तोपाध्ये- परमपूज्य श्री सुचितदादा आणि समीरदादांचे वडिल),हा श्रीविद्यामकरंदाचा (श्री गोपिनाथशास्त्री पाध्ये ) फोटो बघितल्यावर तुला काय वाटतं रे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं सांगू का? माझी नजर त्यांच्या डोळ्यांवरुन हलतच नाही. किती तेजस्वी,करारी, परंतु तरीहीकिती पवित्र आणि प्रेमळ भाव आहेत नाही?
चौबळ आजोबा: खरंआहे, पूर्णपणे खरं आहे. त्यांचे डोळे म्हणजेच संपूर्ण श्रीविद्यामकरंदत्व .आद्यपिपा (सुरेशचंद्र) :म्हणजे काय हो? मला काही जड शब्द कळत नाहीत व मला मोठया तत्वांची वगैरे खरं म्हणजेआवडच नाही.
चौबळ आजोबा: अगदी बरोबर बोललास , कसली आली आहेत मोठी तत्व आणि त्यांचे गूढार्थ? तो सदगुरुच एक खराव मोठा .तो समजायला मोठयामोठया बातांचा काही उपयोग होत नाही.
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :माझ्या मनातलं बोललांत बापूंच प्रवचन म्हणूनच मला खूप भावतं कारण सर्व उलगडून सांगतानासुद्धा बापू कधीच त्याच्यामध्ये क्लिष्टपणा आणत नाहीत व सहजपणे आपला मार्ग सापडतोच.
चौबळ आजोबा: तू काय बापूंना प्रवचनकार समजतोस ?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :मुळीच नाही.चौबळ आजोबा:मग ते कोण आहेत?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं म्हणजे वयाने, अनुभवाने ,भक्तीने व नात्याने तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात.त्यामुळे तुम्हीच"बापू कोण आहेत ? हे मला सांगायला हवं.चौबळ आजोबा: अरे,"दुसर्‍याने दिलेलं कितीसं पुरणार? ह्या अर्थाचं साईबाबांचं वचन हेमाडपंतानी लिहून ठेवलं आहे नाहीका? ते आठव व स्वत: त्यांचा मागोवा घेत राहा.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : मागोवा घ्यावासा वाटतो पण ती ३२व्या अध्यायातील शोध घेणार्‍या ४ जणांची व वणजार्‍याचीकथा आठवली की वाटतं आपण उगीच वेडयासारखं वागता कामा नये. माझा साई त्याअध्यायाप्रमाणेच मला नक्की येऊन भेटेल पण माझा १ हट्ट आहे .साईने एकदा तरी मलात्यांच विद्यमान रूप बाजूला सारुन त्या साईरुपातच ओळख पटवून दयावी.
चौबळ आजोबा: हा हट्ट कशासाठी? तुला अजून पटलं नाही काय ? तुला काय त्याची परीक्षा बघायची आहे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : नाही , नाही तसं मुळीच नाही. पण ’आपल्याला समजलं ते आपल्या प्रयत्नामुळे ’ असं झाल्यास नसतां अंहकार डोक्यात चढेल ह्याची सदैव भीती वाटते. लहानपणापासून अनेकवार शिरडीसगेलो, साईसच्चरिताची पारायणे केली ,पण का कोणास ठाऊक ,कायम आपल्याला अंहकार होईल, आपण साईंपासून दूर जाऊ अशी भीती मनांत घर करून राहते.
चौबळ आजोबा: मगं आजच्या आज ही भीती बापूंच्या हातांत सोपविली असं म्हण ,आत्ताच्या आत्ता म्हणं.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : त्यांना किती त्रास द्यायचा , जीभ वळत नाही.
(तेवढयात जिन्यावरून उतरणार्‍या बापूंना चौबळ आजोबांनी हाक मारली.)
चौबळ आजोबा: बापू , हा वेडा बघा. आता ह्याला जास्त वेळ तळमळत ठेवू नका .
बापू : काका, २२व्या अध्यायाचा अभ्यास करा.त्याचंच चिंतन करीत राहा. आतापर्यंत माणसाच्या वेगाने वाचत होतातआता मुंगीच्या वेगाने वाचत जा. हा पिपीलिका (मुंगी) मार्गच तुमचा आहे.
चौबळ आजोबा: अरे सुरेश, बघतोस काय? ताबडतोब पायावर डोकं ठेव. अरे, अनुग्रह झाला, आञा मिळाली .आता मुंगीहो आणि साखर खा.

- समीरदादा


*२. चौबळ आजोबा :*

🔅ज्यांना वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे सन् १९१७ साली सद्गुरु श्रीसाईनाथांच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभले ते श्रेष्ठ भक्त म्हणजे श्री. शंकर हरिभाऊ चौबळ अर्थात चौबळ आजोबा.

🔅 १९९६ साली त्यांना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या रूपात पुन्हा देहधारी सद्गुरुची प्राप्ती झाली आणि त्यांचे जीवन सुखाने व आनंदाने मोहरून गेले.

🔅श्री. चौबळ आजोबा रोज १६००० वेळा साईनामाचा जप करीत असत. त्यांच्या मृत्युसमयी सद्गुरु श्रीअनिरुद्ध त्यांच्या शेजारी बसून होते. मृत्युसमयी चौबळ आजोबांच्या मुखात अखंड साईनामाचे आवर्तन सुरू होते.

🔅सद्गुरु श्रीसाईनाथांना व सद्गुरु श्रीअनिरुद्धांना एकाच जन्मात प्रत्यक्ष बघणारे एकमेव साक्षिदार, चौबळ आजोबा म्हणजे सद्गुरु भक्तीतील एक श्रेष्ठ रत्न.

( माहिती संकलन :ओमसिंह नवलाखे )

*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
      *🙌नाथसंविध्🙌*

Monday, June 26, 2023

बापूंच्या घराण्यातील भक्ती

Message from whatsApp group
*होय परमात्मा प्रगटलाय!!*

*🌼🌸बापूंच्या घराण्यातील भक्ती🌸🌼* 
          (भाग -१)

*१)जगन्नाथ पाध्ये* : 

✨हे व्यवसायाने तहसीलदार होते. मुलकी कामानिमित्त एकदा मंगळवेढ्याला गेले असता त्यांची ओळख चिंतामणी टोळ या त्यांच्या मित्रामुळे स्वामी समर्थांशी झाली. जगन्नाथ पाध्ये यांना स्वामींचा बराच सहवास लाभला. स्वामींचे ते निष्ठावंत भक्त होते. 

✨१८७८ साली आपल्या निर्वाणाच्या एका आठवड्यापूर्वी स्वामींनी जगन्नाथ पाध्यांना मुंबईहून अक्कलकोटला बोलावून घेतले व सांगितले की आता आपण जाणार. त्यावेळेस *जगन्नाथ पाध्यांचा मुलगा गोपीनाथ पाध्ये* (जो जेमतेम १२-१३ वर्षाचा होता *गोपीनाथशास्त्री बापूंचे पणजोबा* ) हा त्यांच्या बरोबर होता. जगन्नाथ पाध्यांनी स्वामींकडे त्यांच्या बरोबर राहण्याची परवानगी मागितली तेव्हा ती न देता त्यांनी त्यांना मुंबईस परत जाण्यास सांगितले व चलनातली दोन नाणी (गोपीनाथ पाध्यांच्या हातात देऊन सांगितले की ही नाणी आपल्या नातवास दे. यावर जगन्नाथ पाध्यांनी स्वामींना विचारले की आपली भेट केव्हा व कुठे होणार? तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितले की *तू मला शिरडीत भेट* (मी तुला शिरडीत भेटेने). त्या काळात शिरडी हे गाव कोणालाही माहीत नव्हते व त्या वेळेस साईबाबा होते, पण प्रसिद्धीस आलेले नव्हते. 

✨या नंतर जगन्नाथ पाध्ये मुंबईस परत आले. त्यानंतर एका आठवड्याने स्वामींनी समाधी घेतली. नंतर प्रयत्न करूनही त्यांना शिरडीचा पत्ता मिळाला नाही. १९०१ साली स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला व त्यांना सांगितले की आता तुझी माझ्याकडे यायची वेळ झाली आहे व दोन नाण्यांची आठवण करून ती नाणी आपल्या नातवास दे म्हणून सांगितले.

*२) गंगाबाई पाध्ये :*

✨ या जगन्नाथ पाध्ये यांच्या  पत्नी. या *विठ्ठलाच्या व स्वामींच्या परमभक्त.* त्यांची स्वामींची भक्ती जास्त बळकट होती. 

✨त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते ८२ व्या वर्षापर्यंत दर  कार्तिकी एकादशीला पायवारी केली. पायवारी म्हणजे  मुंबई ते पंढरपूर हे अंतर मुखाने *'जय जय रामकृष्ण हरी'* हा जप म्हणत पायी चालत जाणे.

✨सर्वसाधारणपणे पुरूष हे अंतर ४५ दिवसात तर स्त्रिया ७५ दिवसात पूर्ण करायच्या. फक्त शेवटच्या वर्षी ही पायवारी त्यांनी सोलापूर ते पंढरपूर केली. 

✨गंगाबाईचा मृत्यू वयाच्या ८२ व्या वर्षी पंढरपुरच्या गोपाळपुऱ्यामध्ये, जी जनाबाईची जागा आहे तेथे अंदाजे १९२१ च्या आसपास झाला. यावेळेस त्यांच्या बरोबर काशिनाथशास्त्री रांजणे हे उपस्थित होते. गंगाबाईवरोबर त्यांनासुद्धा पांडुरंगाचे दर्शन झाले. *गंगाबाई पाध्ये म्हणजे गतजन्मीच्या सखुबाई.*

*३) गोपीनाथाशास्त्री पाध्ये:*

✨ यांचा जन्म १८६६ च्या सुमारास झाला. हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. सर्व वेद व शास्त्रात पारंगत व त्या काळचे विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. त्या काळी त्यांची गणना अत्यंत श्रीमंत लोकांत होत असे. ईस्ट इंडिया कंपनीस ते पैसे व्याजाने देत. यांच्या घरी गव्हर्नेस म्हणून गोरी बाई कामाला असायची. करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी त्यांच्याकडे बऱ्याचवेळेस अर्थ लावण्यास येत. जेव्हा दोन समुहात विवाद उत्पन्न होत तेव्हा गोपीनाथाशास्त्री पाध्यांना लवाद म्हणून नेमले जात असे. 

✨त्यांच्या पत्नीचे नाव *रमाबाई पाध्ये.* आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर स्वामींच्या *'मला शिरडीत भेट'* या बोलांनी त्यांना बेचैन केले व ते शिरडीचा शोध घेऊ लागले. याच सुमारात त्यांची भेट भगवानराव कुलकर्णी नावाच्या स्वामीभक्त सद्गृहस्थांशी झाली व त्यांनी गोपीनाथशास्त्रांना शिरडीचा पत्ता सांगितला आणि म्हणाले 'शिरडीस मुसलमानाच्या वेषातील असे एक अवलिया आहेत नाव आपण त्यांना मानतो.' बघू या तर खरे काय आहे? असे म्हणून गोपीनाथशास्त्री शिरडीस आले. 

✨तिथे येऊन त्यांना बाबा मशिदीत भिकाऱ्यांसमवेत बसलेले दिसले. तरीही स्वामींच्या वचनाची व  आज्ञेची आठवण ठेऊन ते पुढे आले व बाबांना त्यांनी नमस्कार केला नमस्कार करून उठताना नी बाबांनी आपल्या झोळीतून दोन नाणी काढून त्यांच्या आता हातात ठेवली व विचारले *"आता तरी खूण पटली दोन ना."* हे शब्द कानावर पडताच त्यांची खात्री झाली की स्वामीच बाबांच्या रूपाने परत आले आहेत व त्यांचे पहिले शब्द *'आता तरी खूण पटली ना' यालाच  गुरूमंत्र मानून रोज १००८ वेळा त्याचा जप करण्यास ची सुरूवात केली.* 

✨यानंतर त्यांचे नित्यनियमाने शिरडीत  जाणेयेणे सुरू झाले. १९१० साली विजयादशमीच्या दर दिवशी त्यांना *मालती नावाची मुलगी* झाली. मुलीच्या जन्मानंतर वर्षभरातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले व गोपीनाथ पाध्यांना पूर्ण विरक्ती येऊन आपल्या  मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. 

✨ज्या दिवशी ते संन्यास घेणार होते. त्याच्या आदल्या दिवशी रात्री स्वामींनी स्वप्रात येऊन त्यांना खूप ठोक दिला व सांगितले की, संन्यास घेणे हा तुझा प्रांत नाही तेव्हा ते तू करू नकोस. तू आजपासून एकनाथी भागवत व पंचदशी यावर व्याख्याने देत जा. असा आदेश त्यांना दिला. 

✨स्वामींच्या आदेशाप्रमाणे शेवटपर्यंत श्री गोपीनाथास्त्री पाध्ये एकनाथी भागवत व पंचदशी यावर व्याख्यान करीत राहिले. १९३८ साली त्यांना देवाज्ञा झाली.

*मालती पाध्ये / शकुंतला पंडीत :(बापूंच्या आज्जी)*

✨ या गोपीनाथ व रमाबाई पाध्ये यांच्या सुकन्या.

✨ १९३० साली यांचा विवाह अनंत वामन पंडीत यांचे सुपुत्र श्री. नरेंद्र अनंत पंडीत यांच्याशी झाला. हे पंडीत घराणे श्रीकृष्णाचे नितांत भक्त पण ते इतर कोणालाही - मानीत नसत. साईबाबा व स्वामींच्या ते विरूद्ध होते. 

✨श्री अनंत वामन पंडीत यांचे एक सद्गुरू पाठक गुरूजी म्हणून अवलीया होते. त्यांनी 'ॐ नमो नारायण' हा मंत्र त्यांना दिला होता व त्याचा जप सतत करीत ते नेहमी द्वारकेला जात. 

✨१९२५ साली अनंत वामन पंडितांना आषाढी प्रतिपदेच्या दिवशी *• श्रीकृष्णाने स्वतः दर्शन दिले व सांगितले की, तू आता माझ्या बरोबर रहा व पुढे सांगितले की तुझ्या नातीच्या पोटी एक दिव्य तेज जन्माला येणार आहे.* या आनंदातच त्यांना बालोन्माद अवस्था प्राप्त झाली - व शेवटपर्यंत ते याच दशेत राहिले.

✨मालती पाध्ये/शकुंतला पंडीत यांचे पती नरेंद्र अनंत पंडीत यांची कृष्णभक्ती श्रेष्ठ होती. लग्नानंतर वामन पंडीत यांनी त्यांना (शकुंतलाबाईंना) - रामरक्षेची संथा देऊन ती सतत म्हणण्यास सांगितले. त्यांना जे जे काही श्रीकृष्णाने सांगितले ते सर्व शकुंतलाबाईंना सांगून टाकले. शकुंतलाबाईंनी आपल्या सासऱ्यांनाच गुरू मानले. नरेंद्र अनंत पंडीत हे नित्य नियमाने श्रीकृष्णाचा त्रिस्थळी जप १००८ वेळा करीत

ॐ नमो भगवते वासुदेवाय । 
ॐ वासुदेवाय नमो भगवते । 
ॐ भगवते वासुदेवाय नमः l

प्रत्येक जप १००८ वेळा करणे म्हणजे त्रिस्थळी - जप. 

✨या दोघांचे एकच अपत्य. कन्यारत्न - *अरुंधती*.(प.पू.श्री बापूंच्या मातोश्री. ) 

✨१९३४ साली - नरेंद्र अनंत पंडीत यांना पंढरपूरला चंद्रभागेत स्नान करताना विठ्ठल रखुमाईचे दर्शन झाले व रखुमाईने त्यांना सांगितले की *आज संपूर्ण दिवस तू स्वामी समर्थाचे नामस्मरण जपत रहा.* 

त्याप्रमाणे स्वामीभक्ती नसतानाही त्यांनी स्वामींचे नामस्मरण केले. त्याच  रात्री स्वामींनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले, की *त्रिपुरारी पौर्णिमेला तुझ्या मुलीच्या पोटी दिव्य निळा प्रकाश जन्माला येणार आहे.*  

.....हे ऐकून भक्ताची देवाच्या सानिध्यात रहायची लालसा वाढून त्याने स्वामींना विनंती केली की, मला आता घेऊन जा व देवाचा जन्म बघण्यासाठी त्या काळात जन्माला घाला. 

✨स्वामींनी सांगितले की, तू गृहस्थाश्रमी असल्यामुळे मला तुझ्या पत्नीच्या परवानगीशिवाय असे काही करता येणार नाही. तरी तू आपल्या पत्नीची परवानगी घेऊन ये....

(पुढे चालू....)
-२१ एप्रिल २००२ 'निर्भिड लेख'
(शब्दांकन प्रयास: ओमसिंह नवलाखे)

🙏हरि ओम l  श्रीराम l अंबज्ञ🙏

Wednesday, June 14, 2023

kathamanjiri 2-55

कथा मंजिरी 2- 55.
शृंगादित्यने अत्यंत नम्रतेने विचारले, परंतु ते तर आमची परीक्षा घेणार आहेत".
ब्रह्म वादिनी अहल्या मनःपूर्वक हसली, वत्सहो ! स्वयंभगवान स्वतः व त्याच्या चरणाशी सदैव अनुरक्त असणारे ऋषी परीक्षा घेतात म्हणजेच शिकवतात.
स्वयं भगवान व असे त्याचे श्रेष्ठ भक्त तुम्हाला जीवनाची परीक्षा करायला शिकवतात.
*तो अत्यंत प्रेमळ स्वयं भगवान कधीच कुणाची परीक्षा बघत नाही. जो न विचारताही ज्ञान देणारा व प्रेम करणारा आहे, तो कधी परीक्षा घेईल काय*. म्हणूनच देव परीक्षा घेत आहे असे कधीही म्हणू नका. खरं तर आपणच त्या भगवंताची परीक्षा घेत असतो आणि त्याला अनुत्तीर्ण ठरवत असतो.

कथा मंजिरी २-५८
ब्रह्मर्शी गौतम यांनी उत्तर दिले," प्रत्येक घटना सुखाची व दुःखाची, सोपी वा कठीण, मोठी अथवा लहान, ही परीक्षाच असते-- त्या घटनेची संबंधित असणाऱ्या प्रत्येकाचीच.
कारण या विश्वातील कुठलीही घटना ही परीक्षा नसतेच. ती एक तर स्वयं भगवानाची लीला असते किंवा त्याच्या मातेने रचलेले नाथसमविध

Jagannath utsav mumbai

# ७ अनिरुध्द बापु 
पुरीचे देव गायब, जगन्नाथ मुंबई मध्ये

२००३ सालची ही घटना आहे. जगन्नाथ पुरी चे पुजारी मंदिरात पुजा करत होते. पुजाअर्चना करताना पाण्यात देवाचे प्रतिबिंब पाहायची प्रथा आहे. जर प्रतिबिंब पाण्यात दिसले नाही की समजतात देव मंदिरात नाही. देवाचे प्रतिबिंब पाण्यात दिसत नाही हे पाहून पुजारी घाबरले. त्यांनी लागलीच एक अनुष्ठान सुरू केले. त्यावेळी एकाला दृष्टांत झाला की देव जगन्नाथ मुंबईला आहेत. रातोरात विमान पकडून पंडे लोक मुंबईला आले. मुंबईला देव शोधत भटकत होते .

त्याचवेळी सदगुरू श्रीअनिरूद्धांनी श्री जगन्नाथ अष्टतीर्थ उत्सव सायन , मुंबई येथे आयोजित केला होता..

.. इथे पंडे मुंबईत भटकून कुठे जगन्नाथांना राहिले पाहू लागले , त्यांना समजलं की सायन ला देवाचा उत्सव चालु आहे , पंडे उत्सवस्थळी आले आणि जगन्नाथा समोर गडबडा लोळू लागले ...देवांसमोर लोळून लोळून विनंती करीत होते .." देवा सोबत चला, देवा सोबत चला".. 
त्यांनी हे कुणी आयोजित केलेय ह्याची चौकशी केली , आणि श्री अनिरूद्ध बापू आयोजक आहेत कळल्यावर पंडे बापूंना भेटायची विनंती करू लागले , बापूंना ते म्हणाले की आम्ही देवाला नेतोय , तुम्ही परवानगी द्या , बापूंनी तेव्हा सांगितलं , सुभद्रे सहित बलदाऊ आणि जगन्नाथ माझ्या संकल्पाने आलेत, माझा संकल्प पूर्ण झाला की हे तिघेही पुन्हा पुरीच्या देवळात येतील ...

पूरीला या १० दिवसात देवांचे प्रतिबिंब पाण्यात दिसत नव्हते. तीर्थी देव नव्हते... पुरीचे जगन्नाथ मुंबापुरी राहिले होते... 
म्हणूनच सांगावे वाटते ओस पडली स्वर्ग नागरी देव धावत आले इथे
अंबज्ञ
नाथसविध

vithalacha plan

हरि ॐ‌ 

*|| श्रीगुरुचरण मास ||*

  *बाबांकडे पहात पहात |*
  *म्हणावें यांनीं होऊनि विनत |*
  *हाचि तो मूर्त पंढरीनाथ |*
  *अनाथनाथ दयाळ ||*
(श्रीसाईसच्चरित अ.४,ओ.७८ )

*प.पू.बापूंचे पितृवचन*
( १४ फेब्रुवारी २०१३ )
                "बघा आपण विठ्ठलाचं गाणं ऐकलं -
          *विठ्ठला तू वेडा कुंभार |*
          *फिरत्या चाकावरती देसी ,*   
          *मातीला आकार |*
          *विठ्ठला तू वेडा कुंभार ||*
                  मला सांगा कुंभार कुठल्या *मातीला आकार* देतो ? - *ओल्या मातीला!* म्हणजेच *ज्यात ओलावा आहे, अशा मातीला.*
               आपल्या *जीवनाला  आकार* देण्यासाठी *विठ्ठलाचा Plan* तयार असतोच.पण आपण *आधी हे मान्य केले पाहिजे की, आपण मातीचे गोळे आहोत.* आणि मग ह्या मातीच्या गोळ्याला *विठ्ठल त्याच्या Plan नुसार आकार* कधी देऊ शकेल ? तर ,तो *मातीचा गोळा भिजलेला* असेल,त्यात ओलावा असेल तेव्हाच .
                त्याचा Plan तयार असतोच.आपली जबाबदारी एवढीच की,*"आम्ही मातीचे गोळे आहोत, तू आम्हाला आकार दे " हा भाव* .तर  *मातीच्या गोळ्याचं काम* आहे ,*पाणी घट्ट धरून ठेवायचं*. म्हणजेच काय तर *'तो'* *माझ्यावर खूप खूप प्रेम करतो,* हे मनात घट्ट पकडून ठेवायचं.
                 एक एवढी महत्त्वाची गोष्ट आजपासून करायला लागा. जगामध्ये काहीही घडो,मी कितीही चुकलेला असो,मी कसाही असो ,रंग-रूप,जात-धर्म, शिक्षण-पैसा यापैकी कशाचाच फरक पडत नाही. कारण काहीही असले तरी *'तो' आणि 'त्याची आई' माझ्यावर खूप खूप प्रेम करतात.* *त्यांचे माझ्यावरचे अकारण प्रेम कधीही, जराही कमी होत नाही आणि होणार नाही.*
               बाळांनो हे मनात एकदा घट्ट पकडून ठेवलत ना की ,
 *तुमचं जीवन सुंदर व्हावं,*
 *तुमचं जीवन सुखमय व्हावं,*
 *तुमच्या जीवनात दुःख उरू नयेत,*
 म्हणून *तुमच्या देवाने तुमच्यासाठी जो प्लॅन* केलेला असतो, तो पण मग *ह्या भावनेच्या ओलाव्याने  आकार घेत सुरळीतपणे, सहजपणे घडतो.*
                   त्यामुळे विश्वास ठेवा, *'त्याचे' माझ्यावर प्रेम आहेच आणि 'त्याला' मी आवडतो.* *'त्याचा' माझ्यासाठीचा प्लॅनच बेस्ट आहे.* आणि मग असा भाव असणाऱ्या *माझ्या बाळाला , मी कधीही नावडता होऊ देणार नाही, हे माझं प्रॉमिस आहे !!"*

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Mahapran connection

हरि ॐ‌ 

*|| श्रीगुरुचरण मास ||*

*पुरेल अपूर्व इच्छित काम |*
*व्हाल अंतीं पूर्ण निष्काम |*
*पावाल दुर्लभ सायुज्यधाम |*
*अखंड राम लाधाल ||*
(श्रीसाईसच्चरित अ.११,ओ.१५२)

*प.पू.बापूंचे पितृवचन*
  ( २८ मार्च २०१३ )
     *"कुमति निवार सुमति के संगी  |*

*कुमति दूर करून,सुमति आपल्याला फक्त हनुमंतच देऊ शकतो.* ही *सुमति* कशासाठी आवश्यक असते, तर *आपले निर्णय बरोबर होण्यासाठी.* त्यासाठी आम्हाला *हनुमंताची कृपा मिळवायलाच पाहिजे.*
               हा *'Choice' सगळ्यात महत्त्वाची गोष्ट* असते.अनेक वेळा ग्राह्य काय आणि त्याज्य काय ? हे माहित असूनसुद्धा हट्टीपणाने आम्ही जीवनामध्ये पुढे जात असतो. कारण त्यावेळी आपल्याला ह्या हनुमंताचा विसर पडलेला असतो, सद्गुरुतत्त्वाचा विसर पडलेला असतो.पण घाबरण्याचे कारण नाही. *जर आम्ही चंडिकाकुलाचे आहोत,तर आम्हाला योग्य मार्ग मिळतोच.*   
                इथे मात्र लक्षात घ्या की,*प्रत्येकाचे हे मार्ग वेगळे असतात.कारण महाप्राणामुळे, हनुमंतामुळे!* 
 हा *हनुमंत* कोण आहे - तर *रामप्राण* !
 *राम म्हणजे निष्कलंक आनंद!*
 *निष्कलंक आनंद म्हणजे राम !*
ह्या 'निष्कलंक आनंदाचा प्राण' आहे -  *'उचित निवड'*- *शब्दांची ,माणसांची भक्तीची !* आणि *हे सगळं उचित त्या चंडिकाकुलाकडूनच येते.* आणि *राजांनो ही संपूर्ण ताकद हनुमानचलिसात आहे.*
                असा निष्कलंक आनंद तुम्हाला मिळवायचा असेल तर, निवड उचित असली पाहिजे.प्रत्येक गोष्टीची निवड उचित करायची ,तर ते *फक्त हनुमंतच करू शकतो*, हे लक्षात ठेवा.कारण *प्रत्येक पातळीवर निवडीचं Connection फक्त हा महाप्राणच करतो ! आणि हनुमंत आहे म्हणजे त्यांच्या हृदयात राम सदैव आहेच !"*


*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

swasthik symbol

हरि ॐ‌ 

*|| श्रीगुरुचरण मास ||*

 *देणें एक माझ्या सरकारचें |*
 *तयासी तुळे काय तें इतरांचें |*
 *अमर्यादास मर्यादेचें |*
 *भूषण कैंचें असावें ||*
 (श्रीसाईसच्चरित अ.३२,ओ.१६०)

*प.पू.बापूंचे पितृवचन*
  (६ जून २०१३)
                  " *परमात्म्याचे अवतारित होणारे प्रत्येक रूप म्हणजे 'स्वस्तिक' !* स्वस्तिक हे *सर्वोच्च पवित्र चिन्ह* मानलं जातं. *स्वस्तिकाची ही आकृती कुठेही बंदिस्त नाही* ; म्हणजेच *मानवाला काटेकोर नियमाने परमेश्वराने कधीही जखडून ठेवलेले नाही.*
                *स्वस्तिकाच्या सहा रेघा म्हणजेच प्रत्येक मनुष्यासाठी असणारे  सहा Plans !* प्रत्येकाचे *जीवन अधिक चांगलं* कसं करता येईल, ह्यासाठी *'त्याने'* *प्लॅन तयार केलेला असतो*. आणि प्रत्येक मनुष्यासाठी असे सहा प्लॅन्स असतात. 
                  कधीही वाटलं की आता सगळे मार्ग संपले, तरी प्रत्येक वेळी सहा मार्ग असतातच, प्रत्येक क्षणाला प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येकासाठीच .
आणि *अवतारीत रूपाची भक्ती जेव्हा श्रद्धावान करतात तेव्हा श्रद्धावानांना ६ नाही तर ३६ संधी प्राप्त होतात.*
                हा परमात्मा अवतरतो तो *भक्तांची प्रेम वृद्धी व्हावी म्हणून.* त्याच्या मूर्तीशी जेवढं नातं साधता येत नाही, तेवढं नातं तो अवतरीत असताना आपल्याला साधता येतं,बांधता येतं,विकसित करता येतं. 
                 बत्तीसावा अध्यायात *साईबाबा* आपल्याला काय सांगतात,- 
     *उतून चालिला आहे खजिना |*
हा खजिना कोणता ? तर हाच !
*हाच खजिना* कारण -
*जो रामाबरोबर आहे वानरसैनिक म्हणून*, *जो कृष्णाबरोबर आहे गोप म्हणून*,
*जो साईबरोबर आहे भक्त म्हणून* त्यासाठी या *३६ संधी* उपलब्ध आहेतच. 
               पुढे साई काय सांगतात,-        
       *माझें सरकार जैं देऊं सरतें |*
       *न सरतें तें कल्पांतीं ||*
आमच्याकडे ३६ मार्ग प्रत्येक क्षणाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उपलब्ध असणारच आहेत. आणि *एकदा का आम्ही त्याच्याशी जोडले गेलो, की मग आमच्या प्रत्येक जन्मामध्ये ३६ संधी 'तो' देतच राहतो, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक परिस्थितीत!*
                 मग ह्यापुढे हे *'स्वस्तिक'* बघताना ह्या साध्या सहा रेषा हा भाव ठेवू नका. तर *माझे कल्याण करणारे, माझ्या लाडक्या साईंचं हे रूप आहे*, हे कधीही विसरायचं नका.बिनधास्त जगा. बाबा सदैव तुमच्याबरोबर आहेतच !"


*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Aniruddha Bapu's Sadguru

From whatsApp message in group 

हरि ओम 
आज १४ जून , सदगुरु डॉक्टर अनिरुध्दसिंह धैर्यधर जोशी म्हणजेच आपले  सर्वांचे अत्यंत लाडके परमपूज्य बापू  ह्यांचे मानवी सदगुरु श्री गोपीनाथशास्त्री पाध्ये ह्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म  १४ जून १८६४ ह्या दिवशी झाला होता. 

श्री गोपीनाथ पाध्ये ह्यांच्या घराण्यात भक्तीची बीजे रोवली गेलीच होती. ह्यांचे वडील श्री जगन्नाथ पाध्ये हे अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या चरणी भक्तीत तल्लीन झाले होते. गोपीनाथ पाध्ये अगदी लहानपणापासून आपल्या वडीलांसोबत स्वामींच्या दर्शनाला जात असत. स्वामींच्या निर्याणाआधी असेच एका भेटीत जगन्नाथ पाध्येंनी आता आपली भेट व दर्शन पुन्हा कधी होणार असे सहज विचारले असताना स्वामींनी आता आपण ह्यापुढे शिरडीला भेटू असे उद्गार काढले होते. त्यानंतर जगन्नाथ पाध्येंनी स्वामींच्या महानिर्याणानंतर ह्या अनंताला सगुण साकार रूपात शोधण्याच बराच प्रयत्न केला होता. पुढे आपल्या वडीलांच्य्य निधनानंतर श्री गोपीनाथ पाध्ये ह्यांनी बराच काळ शोध घेतला होता. त्यावेळी शिरडी हे गाव प्रसिध्दीस आले नव्हते . त्यामुळे पाध्येंना शिरडीचा आणि स्वामींचा शोध लागत नव्हता. तेव्हा एकदा त्यांचे नातेवाईक श्री भगवानराव कुलकर्णी ह्याच्यांकडून त्यांना शिरडीला साईबाबा म्हणून एक महान अवलिया वास्तव्य करून असल्याची बातमी कळली. अर्थातच श्री गोपीनाथ पाध्येंनी तातडीने शिरडीला धांव घेतली. पण तेथे गेल्यावर लक्षांत आले की साईबाबा तर मशिदीत राहतात , कोणी त्यांना मुसलमान म्हणे, तर कोणी भिक्षा मागणारा वेडा फकीर ! स्वामी भेटीची आर्त मनी दाटली होती आणि मन  कासावीस झाले होते , पण दुसरीकडे पाय़ मागे खेचले जात होते. शेवटी सदगुरुंच्या भेटीच्या ओढीने आणि स्वामींच्या शब्दांचे स्मरण ठेवून मनाचा हिय्या करून गोपीनाथजी मशीदीत गेले आणि साईबाबांच्या चरणीं मस्तक ठेवतांच स्वामींच्या शब्दांची खूण पटली ती साईबाबांच्या मुखातील पहिल्या बोलानेच " आता तरी खूण  पटली ना ! " त्या क्षणी माझा सदगुरु ( स्वामी समर्थ ) मला भेटला ही मनाची गांठ दृढ बांधली गेली ती कायमचीच. पुढे अनेक वेळा समाजात त्यांना अनेक व्यक्तींनी , त्यांच्या नातेवाईकांनी साईबाबा मुसलमान आहेत, ते कफनी घालतात, मशीदीत राहतात, भिक्षा मागतात , दक्षिणा घेतात म्हणून त्रास दिला आणि साईबाबांपासून दूर करायचा प्रयत्न केला. पण गोपीनाथजी अढळ होते "शेंडी तुटो वा पारंबी " "तो" माझा गुरु आहे, माझा सदगुरु आहे ह्या मतावर ते अढळ होते.                 

पुंडलिक म्हणजे भक्तीमार्गाचा अग्रणीच ! पंढरपूरच्या विठू माऊलीच्या भक्तीची गोडी ज्याने केवळ वारकरी संप्रदायातच नव्हे तर अवघ्या जनमानसांत रूजविली तो पुंडलिक म्हणजे विठोबाचा अनन्य भक्तच !सावळे परब्रम्ह  बालरूपात धावून आल्यावर  पंढरीच्या चंद्रभागेच्या तटी भक्तीच्या वीटेवर  विसावयाला ज्याने आपल्या भक्तीची मेख मारून अठ्ठावीस युगे  अढळ केले तो हा महान भक्त ! 
आपण सारे ही कथा जाणतो की पुंडलिकाला भेटायला पूर्णावतार योगेश्वर जगद्गुरु श्रीकृष्ण आठ वर्षाच्या बाळरुपात धावत धावत पंढरपूरला आले आणि त्याने फेकलेल्या विटेवर, कमरेवर हात धरुन वाट पहात उभे राहिले. पंढरीत विटेवर हा स्थिर झालेला पुतळा अठ्ठावीस युगे झाली तरी तसाच उभा होता. कालांतराने ह्याच भक्तीच्या मार्गावर पुन्हा एक तसाच जबरदस्त ताकतीचा भक्त निर्माण झाला तो म्हणजे गोपीनाथशास्त्री पाध्ये ! 
कालपरत्वे कलीयुगाच्या सरक्त्या पाऊलां गणिक समाजातून भक्तीचा हळू हळू लोप होऊ लागला होता आणि मानव पुन्हा  षडरिपूंच्या विळख्यात सापडून, अंहकार , स्वार्थ ह्याच्या दलदलीत गंटागळ्या खाऊ लागला होता.  मानवाचा हा अधोगतीकडे जाणारा प्रवास एक अन एक दिवस नक्कीच त्याला विनाशाच्या खोल गर्तेत , खाईत ढकलून देईल ह्या जाणीवेने ह्या भक्तश्रेष्ठाचा  जीव कळवळला. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचा कळवळा दाटून आला. अनेक खडतर उपासना, तपे आणि व्रते करुन त्याने विठ्ठलास ‘हारी’ आणलेच व एकच मागणे मागितले, ‘‘तू आता बाळरुप घेऊन ये.’’ तसाच वर देऊन मग ‘तो’ पुतळेपण सोडून गोपीनाथशास्त्रींच्याच नातीच्या पोटी त्रिपुरारी पौर्णिमा १९५६ला सदगुरु रूपाने  जन्म घेता झाला असे वाचनात आले.  
ह्याचे हृद्य वर्णन  हाचि नववा नववा आगळा |, सजीव बनला पंढरीचा पुतळा | ह्या  आद्यपिपा म्हणून गौरविल्या जाणार्‍या श्री सुरेशचंद्र दत्तोपाध्ये  ह्यांच्या  अभंगात येतं. शृंखलाधर सद्गुरु श्री अनिरुद्धांवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाला अत्यंत आवडणारं असं हे गुणवर्णनच आहे. 
आपल्या भारतीय संस्कृतीत आपण सदगुरुंना ब्रम्हा, विष्णू , महेश म्हणून आळवितो - गुरुर्ब्र्म्हा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर: गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: |  
आपण खूपदा वाचतो की हा पंढरीचा विठू वारंवार आपल्या भक्तांसाठी उठून धावतच होता. संतांसाठी सर्व कामे करतच होता. एकनाथाघरी श्रीखंड्या बनून, सखु, जनाबाई ह्यांना त्यांच्या अगदी सर्व प्रकारच्या घरकामांत मदत करतच होता (जनाबाईसाठी गोवर्‍या वेचायला जाई, जात्यावर बसून दळण दळायला हातभार लावी इत्यादी)   दामाजीसाठी तर हा डोईला मुंडासे बांधून  ‘महार’ बनून गेला होता. आपल्या भक्तांवर लाभेवीण प्रेम करणारे सदगुरुही असेच त्यांच्या कल्याणासाठी सदैव धावतच असतात त्यांच्या पाठीमागे कधी अभयदाता अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ बनून "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी  उभा आहे " अशी ग्वाही देत तर कधी शिरडीनिवासी कृपासिंधु साईबाबा बनून ! तसेच  पूर्ण जीवन मानवांसाठी, मानवासारखं, त्यांच्यात  जन्म घेऊन, खेळून, शाळा-कॉलेज शिकून, व्यवसाय करुन....वगैरे वगैरे सगळं करण्यासाठी हा सावळा सदगुरुरूपाने  जन्म घेता झाला त्रिपुरारी पौर्णिमा १९५६ साली-  डॉ अनिरूध्द जोशी बनून ! 
आणि म्हणूनच  असे वाटते की येणार्‍या सर्व काळासाठी आम्हा सर्व श्रद्धावानांचे हात व मस्तक, गोपीनाथशास्त्रींच्या चरणांशी जुळले पाहिजेत. त्यांच्या चरणांवर आम्हां श्रद्धावानांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रूंचा, कृतज्ञतेचा अभिषेक सदैव व्हायला पाहिजे कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी  की आज त्यांच्या पुण्याईने आम्हाला आज सदगुरु लाभला  
१. ललिता सहस्त्रनाम ह्यांनीच विरचित करून श्री साईनाथांच्या चरणी अर्पिले असता त्यांना "श्री विद्यामकरंद " म्हणून साईनाथांनी स्वत: गौरविले होते. 
२. "श्रीवर्धमान व्रताधिराज व्रत " हे आपल्याला ह्यांनीच त्यांच्या तपश्चर्येने प्राप्त करवून दिले ज्याची सविस्तर माहिती श्रीमद् पुरुषार्थ ग्रंथराज तृतीय खंड आनंदसाधना मध्ये आपण वाचू शकतो.    

आजच्या दिवशी आपण त्यांचे स्मरण "ओम श्री विद्यामकरंद गोपीनाथाय नम: " हा मंत्र १०८ वेळा म्हणून करू शकतो. 

हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

Monday, December 12, 2022

Second pitruvachan(08 Dec 2022)

Tried to recall today's second pitruvachan (which was in English)
These are best efforts in having exact words as much as possible. Apologies in advance if something is missed/incorrect

Today's second pitruvachan(08 Dec 2022)
Dad announced 
- Promotion of Leeladharsinh from Deputy CEO to CEO
- Promotion of Harishsinh Mahajan to Deputy CEO
-Dad asked how are you buddies. All said fine. DAD said not fine say great.
-Dad asked did you watch movies recently, web series
So many people watch just crime patrol back to back. I don't know how they sleep and how their brain works. So much crime - just rape and murder.
You should definitely see sometimes to stay updated on what types of crime are happening around us.
- Trash is everywhere similarly trash is also there in this world of web series
- We should be able choose wisely
- Not all that is shown is fake or wrong, some parts are also real.
-20 years ago we used to read books
Now these web series are nothing books converted to audio video form
- In one's lifetime one cannot learn about everyone's experience so these forms help us
-Dad asked what did we learn from Covid times, responses from shraddhavans - Trivikram is the only support, he can turnaround anything, we were taking so many things for granted
-Dad said yes definitely all this is true.In addition we also learnt to save money. And secondly, importance of Raamnaam currency
- Covid taught us that anything can happen anytime so we must spend money wisely. You can definitely travel, shop but do it wisely 
- We must remember in Shriram avtaar he came, he earned and spent wisely
But opposite to that as Shri Krishna he had to drown Dwarka. But he gave gita to the world and shreemad bhagvat
I know it is difficult but we must try to read it at least once
-Rama Rama is maha mantra. It is continuous. It starts where it ends..it is the only closed circuit 
-We should try to chant 16 mala if not try 8 else try 4 at least try 1 and keep chanting as much as you can throughout the day
- we must remember I am his, He is mine is ok but I am his is important.
- we love him we miss him but do we try to remember him? Why is it important to remember him?
- close your eyes and try to remember his face. Try to envision him. More than how he looks how you imagine him or try to create his face, remember his charan is important 
- We should remember that if this world is being ruled by Mother Chandika and her son, the world can never be completely bad, there will be good things also.
- Even if 10 bad things happen we must remember 100 million good things will also happen
- Because of 1 bad thing don't think that the world is bad.No it can never be. With conviction remember that if 10 doors close for me 10lakh new doors will open. Because you focus on 1 bad thing headsdown you are missing 10 other good things coming your way.
- In coming weeks, Dad said we will start second pitruvachan where he will talk about Narad Bhakti Sutras, that is Nav-vidha Bhakti and in 1st pitruvachan he will talk about Trivikram anantnamavali, not sahastra, anant.
Hari Om Shriram Ambadnya

Sunday, December 4, 2022

pitruvachanam

हरि ॐ‌

*|| श्रीगुरुचरण मास ||*

*"पहा मी माझिया वचनाकारणें |*
  *मरोनि जाईन जीवें प्राणें |*
  *परी माझिया मुखींचीं वचनें |*
  *अन्यथा होणें नाहीं कदा "||*
    (श्रीसाईसच्चरित अ.४०,ओ.९१)

*प.पू.बापूंचे पितृवचन*
( ४ डिसेंबर २०१४ ) -
                  *"साईबाबांचे हे वाक्य तुमच्या हृदयाला पाझर फोडणारं असलं पाहिजे !* अरे काय हमी देतात बाबा. एक लक्षात घ्या कोणीही एवढी हमी देणार नाही .पण आम्ही मात्र विश्वास ठेवत नाही. *'तोच विश्वास'* ठेवायला लागा.
                 जर साईबाबा आमचा सद्गुरु असेल , देव असेल ,तर *'त्याचा शब्द'* , *'त्याचे वचन'* आम्हाला मान्य असलेच पाहिजे. देवाच्या शब्दांवर १%, ९९% , वा  ९९.९९% विश्वास असून चालत नाही. तर *पूर्ण १००% म्हणजेच १०८% विश्वास असावा लागतो.*
                *'मी तुला कधीच टाकणार नाही'*, असं म्हटलय ना ? मग कोणत्याही परिस्थितीत ही खात्री हवीच !
                 देवाने आमच्या डोक्यावर हात ठेवला, ह्याचा अर्थ आमचे कल्याण होणारच आहे, हा विश्वास पाहिजे. एवढेच नाही तर देवाने कंबरड्यात लाथ घातली, तरी ती माझ्या कल्याणासाठीच आहे, हा *दृढ विश्वास हवा देवाच्या शब्दांवर!*  
                असा *दृढ विश्वास* ठेवणे, म्हणजे *'देवाशी जोडून घेणे !'*  इथे खरं म्हणजे प्रयासाची आवश्यकता नाही. फक्त *भाव पाहिजे.* कारण *'भाव तोचि देव !'*
                अशाप्रकारे देवाच्या वचनांवर विश्वास ठेवल्यास आपण देवाशी जोडले जातो.आणि म्हणूनच *देवाच्या वचनांवर विश्वास ही एकमेव प्राथमिक गरज आहे आमची !*
*बाकी 'त्याचे वचन' तो पाळतोच ! "*

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

Sunday, October 9, 2022

kojagiri importance

*सदगुरु अनिरूद्धांनी सांगितलेले कोजागिरी पौर्णिमेचे महत्व...*

*कोजागिरी पौर्णिमेचे महत्व :-*

एक गोष्ट आज सांगतो. जेव्हा अमृतमंथन झाले, तेव्हा अमृत व हलाहल विष त्यातून निर्माण झाले. ह्यातील हलाहल प्रथम बाहेर आले. मग आपण हलाहल मंथन का म्हणत नाही? विष शिवाने प्राशन केल्यावर मिळालेल्या अमृतामुळे देवगण अमर झाले. त्यांना हव्या असणार्या सर्व गोष्टी मिळू लागल्याव मृत्यूचे भयही उरले नाही. त्यामुळे ते पूर्णपणे relax झाले. परमात्म्याचे सेवेकरी म्हणून त्यांना माज चढला. ह्या देवगणांचा माज पहिल्यांदा दिसला तो त्या शेषधारी विष्णूलाच.ह्या विष्णूला भेटायला जेव्हा नारद आला, तेव्हा त्याला न बघताच महाविष्णूने कूस बदलली. देवर्षी नारद म्हणजे सगळ्या भक्तांसाठी एकमेव जवळचा आप्त, ह्याने कुठलाही यज्ञ कधी केला नाही, केवळ नामस्मरणानेच देवर्षी पदाला पोहोचलेला आहे.लक्ष्मीमाता विष्णूचे लक्ष नाही हे बघून त्यास नारद आल्याचे सांगते. तेव्हा विष्णूने एक आळस देऊनविचारले काय झाले? नारदाचे व विष्णूचे बोलणे म्हणजे जगात चालणार्या गोष्टींचे gossip नसून विश्वाच्या कल्याणासाठी चाललेला वार्तालाप असतो.विष्णू नारदाला विचारतो, "विश्वाचा कारभार बघणार्या देवगणांचे कसे चालले आहे?" याबद्दल मला एका वाक्यात सांग. त्यावर नारदाने एका वाक्यात उत्तर दिले, "कोण देवगण?" इथे उत्तरातच प्रश्न येतो पण हा प्रश्न नसून खरे उत्तरच होते. कारण नारदासाठी देवगण अस्तित्वातच राहिले नव्हते.जसे श्रद्धावानांच्या गोष्टी चण्डिकेपर्यंत पोहचविणारा महाविष्णू हा चण्डिकेचा कान तसेच नारद म्हणजेच नामस्मरण हा महाविष्णूचा कान म्हणून जेव्हा देवगण त्यांच्या कार्यापासून च्युत झाले तेव्हा ते देवगण राहिलेच नाहीत.नारदाचा प्रश्न ऐकून लक्ष्मीमाता नारदाला सांगते, "देवगण म्हणजे जे देवाची व मानवाची सेवा करतात ते." त्यावर नारदाने उत्तर दिले, "पण मला असे कोणीच दिसले नाही." हा दिवस होता पितृपक्षाचा पहिलादिवस. नारदाचे उत्तर ऐकून लक्ष्मीमाता महाविष्णूला विचारते, "मी शोधू का कुठे आहेत ते देवगण?" महाविष्णू आळस देऊन म्हणतो, "तुला जे करायचे ते कर."लक्ष्मीमाता पृथ्वीवर सगळीकडे फिरते व बघते की, कावळ्यांसाठी ठेवलेले अन्न देवगण खात आहेत. एवढी ह्यांच्यावर वाईट परिस्थिती का आली? हा प्रश्न तिला पडतो, ती परत विष्णूकडे येते, व विष्णूला ह्याचे उत्तर विचारते.विष्णू तिला म्हणतो, "बाई तूच शोध घे, मला झोपू दे."लक्ष्मी परत पृथ्वीतलावर जाते व बघते की, सगळे भाविक लोक व्यवस्थित पूजा करत आहेत, देवाला नैवेद्य अर्पण करत आहेत. मग ते ह्या देवगणांपर्यंत का पोहचत नाही? असा प्रश्न तिला पडतो. हे देवगण जर पितरांचे खातात, म्हणजे पितर उपाशी राहतात.ती महाविष्णूला परत येऊन विचारते, तेव्हा महाविष्णू म्हणतो, "पितरांची तू काळजी करू नको त्यांचं बघायला मी आहे."लक्ष्मी नारदाकडे जाते, तेव्हा नारद म्हणतो विष्णूला जागे कर. लक्ष्मीमाता प्रेमाने विष्णूस जागेकरते. विष्णू तिला म्हणतो, "काळजी करू नकोस. लौकिक जगातील अन्न पितरं कसे खाणार? त्यांना चतुर्मितीतून त्रिमितीत येण्याची तू permission देतेस का? नाही नां. काळजी करू नकोस पितरांना अन्न अर्पण करणे लोकांची भावना आहे.

लक्ष्मीमाता म्हणते, उद्यापासून मी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पृथ्वीवर संचार करण्यासाठी जाते. विष्णू म्हणतो, "उद्यापासून नवरात्र सुरू होते आहे."लक्ष्मीमाता बघते पृथ्वीवर सगळे भक्तिभावाने नवरात्र साजरी करत आहेत. मग ती देवगणांकडे येते. पण तिथे सगळे आपल्याच विश्वात मग्न असतात. कुणीही नवरात्र साजरी करताना दिसत नाही. लक्ष्मीमाता रूप बदलून त्या देवगणांना विचारते, "तुमचे असे वागणे विष्णूला कळले तर?" देवगण त्यावर तिला उत्तर देतात, "विष्णूला त्या नारदाने सांगितले तरच कळते, नाही तर काही कळत नाही." तेव्हा लक्ष्मीला जाणवते की, ह्या देवगणांची कृतज्ञता, श्रद्धा, विश्वास नाहीसे झाले आहे. ह्यांना अमृतामुळे सर्व मिळाले आहे. ह्यांना मागण्यासाठी काहीही उरले नाही, त्यामुळे कुठलीही गरजही उरली नाही.लक्ष्मीचे मन कळवळते, तिला वाटते, देवगण चांगले आहेत, त्यांनी सुधारावे. ती विष्णूकडे परत जाते व त्याच्याकडे वर मागते, *"मी आज पृथ्वीवर संचार करायला जाईन व जो कोणी रात्री जागा असेल, देवाची वाट बघत, देवावर विश्वास ठेवून तर त्याला आशीर्वाद देईन व असे प्रत्येक महिन्यात करण्यासाठी तू परवानगी दे." विष्णू म्हणतो, "दर महिन्याला मी परवानगी देऊ शकत नाही. वर्षातून एकदाच तू हे करू शकतेस. उद्या पौर्णिमा आहे." लक्ष्मीमाता म्हणते, "उद्या जी कोणी "कोऽजागरति" म्हणत देवाची भक्ती करत जागा असेल त्याची त्याने कधीतरी मागे केलेली भक्ती मी जागृत करेन.* "कोजागिरी पौर्णिमा आता पुढच्याच आठवड्यात आहे. गुरुक्षेत्रम्‌मध्ये अनेकजण जागरणाला येतात, रात्रपठणासाठी. पण मी खाली जातो तेव्हा अर्धे अधिक झोपलेले असतात. जागरण जरी गुरुक्षेत्रम्‌मध्ये नाही जमले तरी घरी करा, चालेल पण नीट जागे राहून करा. रात्र पठणानंतर सकाळी ६ वाजले की जायची घाई असते. कधी एकदा ६ वाजतात एवढे सगळ्यांचे घड्याळाकडे लक्ष असते, खाली सगळे झोपलेले असतात, मी वरती जागा असतो. सकाळी ६.०५ ला खाली आलो तर कुणीच दिसत नाही, तिथे सगळे सपाट असते.एक दिवस रात्री झोप नाही झाली तर आमच्यासाठी तो प्रलय असतो. जगबुडी झाल्यासारखी आमची अवस्था होते. दुसर्या दिवशी पित्त काय उठते, हात-पाय काय गळतात सगळ खोटं आहे हे.मेडिकल field मधले इथे बरेच आहेत. आम्ही M.D. करताना ३-३ रात्री जागे राहून काढायचो. Doctor ने night duty च्यावेळी alert रहावे अशी अपेक्षा असते मग तुम्ही का एक रात्र जागे राहू शकत नाहीत?आम्ही देवाचे करतो म्हणजे स्वत:चे करतो. तुम्हाला काय वाटते, तुम्ही दिवा नाही लावला तर त्याच्याकडे अंधार असणार का? नाहीच.जेव्हा देवगणांनी त्यांची मर्यादा सोडली तेव्हा त्यांची कशी परिस्थिती झाली हे विसरू नका. मनुष्याचे असेच होत असते. संकट येताना मनुष्याला दिसेलच असे नाही. त्सुनामी येते तेव्हा तुम्ही बघितले असेल दुसर्या व चौथ्या मजल्यावरचा मरतो पण तिसर्या मजल्यावरचा मात्र जिवंत राहतो. हे कसे घडते, हे समजण्याची तुमची capacity नाही हे लक्षात ठेवा.तुम्हांला काय वाटते तुम्ही प्रसाद देता म्हणून देव तुमच्यासाठी करतो. तो काय तुमचा केटरर आहे. विश्व उत्पन्न करताना त्याच्या इच्छेने झाले तेव्हा त्याला आमच्या पूजेची मदतीची गरज लागली नाही.हे नेहमी ध्यानात ठेवा.हे जे उपनिषद माझ्या आईने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते खरचं सांगतो, अधाश्यासारखे वाचा. 

तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हांला बाहेर काढून ते तुम्हांला चांगल्याच मार्गावर घेऊन जाणार.ज्याचा ह्या वर्षी "कर्ता हर्ता गुरू ऐसा" हा संकल्प सिद्ध होईल, तोच पुढच्या काळात तरणार. मी जेकाही करतो, ते देवाला कळत नाही, त्यामुळे तो action घेत नाही हा विश्वास खोटा आहे, हा टाकून द्या. प्रत्येक गोष्ट ह्या चण्डिकाकुलाला नीट कळत असते, जो कुणी त्याच्याशी खोटं बोलतो तो मग नियमांच्या प्रांतात जातो.पण जेव्हा त्याच्यावर पूर्णपणे श्रद्धा असते, तेव्हा जरी तुमच्याकडे काही कमी पडत असले तरी ते कुठल्या ना कुठल्या चांगल्या मार्गाने तुम्हांला मिळत राहते.पोलिओचे थेंब नाही घेतले तर पोलिओ होईल हे सांगणे म्हणजे doctor ची तुम्हाला धमकी नसून तुमच्याविषयी कळकळ असते.मी पण डॉक्टरच आहे. आजचे हे सांगणे म्हणजे बापूची धमकी समजू नका. माझी तपश्चर्या, उपासना, तुमच्यासाठी तळमळ हे तुमच्यासाठी vaccine आहे पण हे vaccine टोचताना जर तुम्ही जत्रेत नाचायला गेलात तर कसे होईल?साईसच्चरित प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितले, जसे प्रवाहात अनेक लाकडे एकत्र येतात व पुढे परत वेगळी होतात. तसेच जीवनात असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे अनेक दूरची नाती पण जवळची वाटायची आतामात्र जवळची नाती पण दूरची वाटतात. नातेवाईक बदलत जातात पण नाती तीच राहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक वेगवेगळी माणसे भेटतात पण ह्या प्रवासाला आधार देणारा एकच सद्‌गुरु असतो.जो ह्याला विन्मुख होतो, त्याला सुख मिळू शकत नाही, त्याचं जीवन कृतार्थ होत नाही. *आज आपल्या नशिबाने मातृवात्सल्यविन्दाम्‌, गुरुक्षेत्रम्‌,रामरसायन आहे. आपण खूप श्रीमंत आहोत.* 


आपल्यालाकुठल्याही कुबड्यांची गरज नाही. तुम्ही मला गुरू मानू नका मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही कुणालाही गुरू माना, पण पूर्ण विश्वास ठेवा कारण येणारा काळ अतिशय बिकट आहे. आज तरुण वयाच्या मंडळी कामाच्या stress ने दबलेली असतात. Divorce चे प्रमाण तर अगदी चण्या-फुटाण्यासारखे झाले आहे. Divorce फक्त नवरा बायको मध्ये होत नाही, तर मैत्रीत होतो, भावंडांमध्ये होतो. संसार प्रेमाने टिकवायचा असतो. प्रेमाची माणसे मिळत नाहीत. वाईट माणसांना कधीही सुख लाभत नाही हे लक्षात ठेवा जे सद्गुरुचरणी निष्ठावान आहेत, चण्डिकाकुलाशी प्रामाणिक आहेत तेच प्रेमाने,सुखाने राहू शकतात.मी माझ्या अनंत काळाच्या अनुभवाने हे तुम्हांला सांगत आहे. संकट कुणाला येत नाहीत. राम-कृष्णालाही संकटे आलीच ना. प्रत्येक संकटातून तरण्याचा मार्ग असतो तशी संधीही तोच देतो. एक दिवस असं समजा तुम्ही कृष्ण आहात. खरचं सांगतो तुम्हांला पाप लागणार नाही. तुम्हाला स्वत:च्या आप्तांसोबत हिरे-माणकांनी बनविलेली द्वारका बुडवावी लागली तर विचार करा, किती दु:ख झाले असेल कृष्णाला.

*आयुष्यात सगळं करा, पण ते चण्डिकाकुल व त्याचे द्वार असणार सद्गुरु ह्यांच्यापासून कधी दूर जाऊ नका.* अमृतमंथन खरं तर हलाहल मंथन आहे. समजा तुम्ही लग्नाला उभे राहिलात आणि समोरची स्त्री किंवा पुरुष अतिशय श्रीमंत आहे पण त्याच्या मागे जहरीला साप आहे तर तुम्ही पुढे जाणार का? नाही. हे जहरीले विष म्हणजेच चुकीच्या गोष्टींची मदत घेणे. हे निस्तरण्यासाठी ते विष शिवालाच येऊन प्यावे लागते.

माझे ह्याआधी अनेक जन्म झाले असतील, पण ह्या जन्मात मला संधी मिळाली आहे ही संधी परत येणे नाही. ह्यापुढे अडीच हजार वर्षांनंतर चार प्रलय झाल्यावर परत नवे युग आल्यावर ही संधी येईल. *हा जन्म देवासाठी राखून ठेवा आमची first priority ह्या जन्मात चण्डिकाकुलच असू दे.* आज उपासनेचा शेवटचा दिवस असूनही केवळ तुम्हांला हे सर्व सांगण्यासाठी माझ्या आईची permission घेऊन मी इथे आलो आहे. आपण physics शिकलो आहोत. आपण बघतो quanta सतत बदलत असतो. मानवामध्ये तीच अवस्था असते सतत बदल घडत असतो.ज्याचा quanta बदलत नाही असा तोच एकमेव आहे. तो कधीही बदलत नाही, त्याचा शद्बही कधी बदलत नाही. ज्याक्षणी त्याच्या शद्बाचा आदर राखला गेला नाही, की तो त्याचा शद्ब पाळायला बंधनकारक राहतनाही. तो प्रेमळ आहे त्याची आई साक्षात क्षमा आहे. अनंत क्षमा हेच तिचे स्वरुप आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे क्षमा आहे. पण मला तुम्ही क्षमा करण्याची संधी द्या. आपला बाप तो आपला बाप, दुसर्या कोणाला दया येणं शक्य नाही, हे साईनाथांनी सांगितल आहे, मी नाही. मी एकदाही साईंना बघितले नाही."तो" रुप घेऊन येवो की न येवो त्याच्या वरचा विश्वास दृढ ठेवा. तिच्या इच्छेने (आई चण्डिकेच्या)घडते ते स्वरुप तो स्विकारतो पण तो कधीही बदलत नाही. म्हणूनच आमच्या शरिरातील सतत बदलणार्या quanta ला आधार फक्त त्याचाच असू शकतो. 

३१ डिसेंबर पर्यंतच ही संधी आहे मग तुम्ही म्हणाल नंतर जन्म घेणार्या बाकीच्यांचे काय? तर ज्यांना "त्याची" जाणिव आहे व जे मनापासून गुरूमंत्र स्वीकारतील त्यांच्या प्रत्येक जन्मात मी कायम पाठीशी उभा राहीन. त्यांना मृत्यु कधीच नसेल. जेव्हा सत्ययुग सुरु होते तेव्हा जन्माला घालतानाच मानवाला गुरुमंत्र कानात सांगितला जातो. त्रेतायुगात जन्माला आल्यावर गुरुमंत्र ऐकवला जातो. द्वापारयुगात वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला जातो. तर कलियुगात तो अर्जन करावा लागतो. तो आज आपण मिळवला आहे. गुरुमंत्र माझ्याकडे आहे म्हणजे सगळे आहे.आज बलचे text book प्रकाशित होते आहे. *गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणजेच मोठी बलविद्या.* गुरुक्षेत्रम्‌ मंत्राची जी बलविद्या आहे, ती ज्याला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यालाही शक्य आहे.

*ह्या माझ्या आईच्या हातातील १८ शस्त्रे जो कुणी खरा श्रद्धावान आहे व ज्याला ९ निष्ठा मान्य आहेत. त्याला कायम सहाय्यकारी होतील हा वर मी माझ्या आईकडून मिळवला आहे* व हा वर तुम्हांला देण्यासाठी आज मी इथे आलो आहे.खरचं तुम्ही भाग्यवान आहात. मातृवात्सल्यविन्दानम्‌ घेऊन पुढे चला पण आजपासून निश्चय करा -"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"आज प्रेमाने आपण जयंती मंगला काली हा गजर करायचा आहे व 

आज रात्री प्रत्येकाने म्हणा -"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा" व प्रेमाने आपल्या गुरुला म्हणा - "I LOVE YOU"॥ हरि ॐ ॥

 
- प.पू. अनिरुध्द बापू.

Monday, July 18, 2022

*भक्तीच्या नऊ पायऱ्या* important agralekh

*भक्तीच्या नऊ पायऱ्या*
. हा भगवंत आहे ह्याची जाणीव असणे ही पहिली पायरी, त्याला सर्व कळते आणि समजते ही दुसरी पायरी, तो अत्यंत प्रेमळ आणि दयाळू आहे हे जाणणे ही तिसरी पायरी, तो अत्यंत न्यायी आहे आणि तरीही त्याचा न्याय आंधळा नाही हे जाणणे ही चौथी पायरी, अशा ह्या न्यायी आणि दयाळू भगवंताला नुसता जगाचा न्यायाधीश व मालक न मानता स्वतःचा मायबाप मानणे ही पाचवी पायरी, तो माझा मायबाप आहे म्हणून तो सदैव माझ्या हिताचाच विचार करतो व माझ्याकडून फक्त भक्ती आणि सेवेच्या प्रयासांचीच अपेक्षा ठेवतो, असा दृढविश्वास ठेवणे ही सहावी पायरी, ह्या विश्वासामुळे आश्वस्त होऊन त्याचे नामस्मरण, भजन व कीर्तन करणे आणि आपापल्या क्षमतेनुसार भगवंताच्या पीडित लेकरांची सेवा करणे ही सातवी पायरी, परमेश्वराच्या सत्य आणि प्रेमाच्या मार्गावरून चालून मी आनंदच मिळविणार हा निश्चय करून त्यानुसार चालत राहणे ही आठवी पायरी ,आणि स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे माझ्या प्रगतीचेच सूत्र भगवंताने लपविलेले आहे हे जाणून स्वतःचे जीवन अधिकाधिक परमेश्वराला आवडेल,असे करत राहून खराखुरा भक्त बनणे ही नववी पायरी. 
ह्या नवव्या पायरीवरच संपूर्ण यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठेवलेली असते.ह्या नऊ पायऱ्या जराही कठीण नाहीत. अगदी साध्यासुध्या माणसासही सहजतेने क्रमता येणाऱ्या आहेत.ह्या नऊ पायऱ्यांची वाटचाल म्हणजे प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय. चौऱ्याऐंशी लक्ष योनी क्रमल्यानंतर ह्या नऊ पायऱ्यांचे मार्गक्रमण मानवास कठीण वाटावयास नको.
----------
दैनिक प्रत्यक्ष: अग्रलेख 
मुंबई, दि. ५ जुलै, २०२२
सदगुरू श्री अनिरुद्ध
(हा लेख पुनर्मुद्रित करण्यात आला आहे.)

Wednesday, June 8, 2022

anubhav kathan- related to swami samarth

अनुभव कथन

अनुभव 1
हरी ओम, आयुष्याच्या ज्या क्षणाला बापू आयुष्यात आले हे जीवन सर्वार्थाने फुलून गेले. तेव्हाच ठरवलं की आता पुढे कधी इतर देवदर्शनाला जायचे नाही कारण माझं सर्वकाही आता बापूमय झालं आहे. पण त्याच्या इच्छेपुढे माझं थोडं काही चालणार आहे ! 
आम्हा पती पत्नीला 3 दिवस सुट्टी मिळाली आणि दिनांक 5 जून 2022 रोजी रात्री आम्ही कुटुंबीय अचानक श्रीक्षेत्र अक्कलकोट, गांडगापूर, तुळजापूरला जाण्यासाठी निघालो. हे इतके अचानक अवघ्या 1 तासात ठरले आणि आम्ही निघालोही. मनात बापूला म्हटलंसुद्धा की बापुराया मी कधीच अक्कलकोटला गेलो नाही. नंदाईच्या हातात एकदा स्वामींची बखर हे पुस्तक पाहिले आणि त्यातील 81 नंबरची कथा ही जगन्नाथशास्त्री पाद्धे म्हणजे बापूंचे खापर पणजोबा ह्यांची आहे हे कळले तेव्हापासून मी सुद्धा ती बखर विकत घेऊन वाचली होती, त्यातील स्वामींच्या कथा वाचून मन तृप्त झाले होते, बापूंनी प्रवचनातून सांगितलेल्या स्वामींच्या कथा मनात साठविलेल्या होत्याच. प्रवासात बापूंना म्हटलं की स्वामी तुम्हीसुद्धा ह्या तीन दिवसात माझ्यासोबत चला. तेव्हाच रात्री साडेबारा वाजता पूज्य समीरदादांचा संस्थेच्या ग्रुपवर मेसेज पहिला की आपले क्लिनिक 6, 7 आणि 8 जून रोजी बंद राहील. मला पूर्ण खात्री होती की आई, बापू  आणि दादा माझ्या बरोबर माझ्या सोबत ह्या तीन दिवस आहेतच.

अनुभव 2
उपासना करत आम्ही अक्कलकोट येथे पोहचलो, खरच मन अतिशय शांत झालं होतं. जस आम्ही प्रथम मठात प्रवेश केला तेव्हढ्यात माझा 9 वर्षाचा मुलगा म्हणाला, बाबा आपण इथे आलो होतो, मीसुद्धा म्हटलं हो रे आपले मागील जन्म मला आठवत नाहीत पण बापूंना ते माहीत आहेत. दर्शन करून आम्ही मठातच बसलो, आपल्या नित्य उपासना केल्या, मंत्रगजर, गुरुक्षेत्रम मंत्र,श्रीपंचमुखहनुमतकवच इत्यादी. तिथे असणारे सर्व देवाचे फोटो मी मुलाना सांगत होतो की परमेश्वराची रूपे अनेक आहेत पण तो मात्र एकच आहे, आपल्यासाठी आपला "बापू". 
असे मठात मी त्यांना ती 81 नंबरची कथा सांगितली की स्वामी इथेच रहात होते, बापू आणि स्वामींचा संबंध काय, स्वामींनी दिलेली ती दोन नाणी मग साईबाबांनी आठवण करून दिलेली "आतातरी खूण पटली ना" हे सर्व मी माझ्या मुलांना सांगत सांगत बाहेर जात असताना तिथे अचानक बापूंचा फोटो पहिला. एका वही वर स्वामी आणि एकावर बापू. समोर स्वामी आणि समोर बापू. खरच डोळ्यात नकळत पाणी आले, अंगावर शहारे आले. तो क्षण शब्दात वर्णू शकत नाही, मुलांना म्हटलं बघ इथे पण आपला बापू आपल्यासोबत आहे. तो आपल्याला कधीच टाकत नाही. हा अनुभव आम्ही कुटुंबीयांनी घेतला आणि कृतकृत्य झालो. विशेष म्हणजे स्वामींच्या मठातच हा अनुभव स्वामींनी माझ्याकडून लिहून घेतला, काही वर्षांपूर्वी असाच अनुभव मला कोठिंबेला आला होता, तेव्हा माझा साई माझा बापू झाला होता आणि आज हा अनुभव देऊन माझा स्वामीपण माझा बापू झाला. 
श्रीराम.अंबज्ञ. नाथसंविध.

जैसा स्वामी अमुचा बाप, तैसी साई हि ची आई I
साईस्वामी एक होता,दिसले बापूच्या ह्या रुपी II १ II

जन्म जन्मांतरीची  पापे, आमुच्या प्रारब्धे लागली I
त्यांना घालवी सतवरी, हि करुणेची माउली II २ II

गुण काय मी त्याचे गाऊ, शब्द येईना  ह्या मुखी I
कर्ता करविता तोची, अपुले हाते करवुनी  घेई II ३ II

सूचित शेषरूपी दाऊ, नंदा आल्हादिनी  रुपी I
दोहा वंदनीय "बापू", सदा ठेवी तुझ्या मुखी II ४ II

जन्म मरणाते सोडवी, तोची नेई भर्गलोकी I
हाती हाताते घालोनी, बैसवी पुष्पकी विमानी II ५ II

संत सज्जन ज्याले भजती, तोची प्रगटिला  धरेवरी I
युगे अठ्ठावीस  उभा, त्या एका विटेवरी  II ६ II

काय करू आता नाथा, तूची सांग तुझ्या ह्या लेका I
मी काही जाणत नाही, काही नको तुझ्या विना II ७ II

माझ्या ध्यानी मनी बापू, जवळी क्षणोक्षणी बापू  I
मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II ८ II

मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II
मजला काही येत नाही, फक्त येत बापू बापू II

देवेंद्रसिंह

Thursday, May 12, 2022

vaishakh poornima

ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्रणाय महाबलाय नमो नमः
!! वैशाख पौर्णिमेच्या !!
सर्व श्रद्धावानांना अनिरुद्ध शुभेच्छा

विशेष अध्यात्मिक माहिती
ब्राह्मवादिनी अरुंधती :
“ प्रत्येक मानवास त्याच्या प्रत्येक श्वासागणिक दोन देवदूतांची आवश्यकता असते व ही संख्या फार मोठी आहे आणि म्हणूनच      '#पंचमुखमुखहनुमत्कवच_पठण' व '#सद्गुरूस्मरण' ह्या दोन्हींचा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उत्कृष्टपणे उपयोग करून घेतल्यास , श्रद्धावानाकडील देवदूतांची संख्या, ज्याच्या त्याच्या भावानुसार अनेकपटीने वाढू शकते.

(संदर्भ: तुलसीपत्र-१३२७)

*वैशाख पौर्णिमा पूजन*

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी 
सत्य, प्रेम व आनंद 👈🏻 ह्या पवित्र त्रिसुत्रीशी एकरूप झालेले महासिद्ध पुरुष (सदगुरू तत्व) विशाल मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येतात
 आणि
 त्यावेळी ते सत् वृत्तीच्या उत्थापनाची योजना आखतात. 

या दिवशी 
सदगुरू आपल्या लाभेवीण प्रीतीची जास्तीत जास्त उधळण करतात 
आणि 
सर्व सजीव व निर्जीव सृष्टीसाठी काय उत्तम द्यायचे हे ठरवतात.
 
या दिवशी 
आपण सदगुरू कडून जास्तीत जास्त स्पंदने मिळवू शकतो.

वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहेत.

१) वैशाख पौर्णिमा हि प्रबौद्धपौर्णिमा आहे.

२) वैशाख पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती विनायकाचा जन्मदिवस मानला जातो.

३) वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चोवीस तासात पूर्ण करतात असे मानले जाते... 

कारण 
भगवान वेदव्यास त्यादिवशी सूर्याच्याच रथात बसून असतात.....

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना एक उपासना दिली आहे. 
त्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांना प्रार्थना करूया की हे सद्गुरुराया श्रीअनिरुद्धा, 
तुझी प्रत्येक आज्ञा हाच आम्ही धर्म समजतो. 

म्हणून 
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भक्त कल्याणार्थ तू सांगितलेली उपासना आम्ही श्रद्धावान करू.....

यंदाची वैशाख पौर्णिमा 
सोमवार
दिनांक *१६/५/२०२२* रोजी आहे. 

सदगुरू बापूंनी ह्या दिवशी पुढीलप्रमाणे उपासना करण्यास सांगितले आहे. 

वैशाख पौर्णिमा उपासना

१) प्रथम चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल किंवा तलम वस्र घालावे. नंतर त्यावर आपल्या सदगुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा.

२) श्री सदगुरुंच्या फोटो प्रतिमेस सुंगधीत किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा तर श्री हनुमंताच्या फोटो प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.

३) दीप व अगरबत्ती लावून हात जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंतांचे ध्यान करावे. 

(सदगुरू तारक मंत्र 👉🏻
*ॐ मनः सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नम:*)

४) त्यानंतर 
    श्रीअनिरुद्ध कवच 
    श्रीहनुमान चालीसा 
    श्रीहनुमान स्तोत्र 
    श्रीसाईनाथांची ९ वचने 
    श्री अनिरुद्धांची ९ वचने 
    श्री आदिमाता शुभंकर स्तवन

             व 

श्रीआदिमाता अशुभनाशिनी
            स्तवन

यापैकी कोणतेही एक स्तोत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावे.

५) त्यानंतर
    (१) आंब्याचे पन्ह
    (२) कच्चा आंबा व भिजलेली
           चण्याची डाळ वाटून त्याचा
            प्रसाद अर्पण करावा. 
  
त्यानंतर लोटांगण घालावे.

हे दोन्ही पदार्थ मानवाला पिडणा-या षडरिपुंच्या गुणांपासून मुक्त आहेत.
 म्हणून 
त्यादिवशी तरी आपल्याला त्रासणारे काम, क्रोध, मोह, मद, मस्तर, लोभ या षडरिपुंपासून दूर राहण्यासाठी ही साधी व सोपी उपासना आपण आपल्या घरी बसून दिवसभरात कधीही करू शकतो.

जो कोणी प्रेमाने 
वैशाख पौर्णिमेला ही उपासना करील त्याच्या घरी ह्या दिवशी आपला सदगुरू हनुमंता बरोबर येऊन जातोच अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धांनी दिली आहे.....

*नाथसंविध्*
*हरि ॐ*
*श्रीराम*
 *अंबज्ञ*
*जय जगदंब जय दुर्गे*