Saturday, January 29, 2022

important pravachan...( he cures..)

श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०७.२०१४)

MarathiHindi

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०७.२०१४)

॥ हरि ॐ ॥

खूप दिवसांनी भेटलोत, डेफिनेटली खूप छान वाटतं. तुम्ही लहान असताना, बाबा तुम्हाला उचलून घेतात, पण बाबांना ऑफिसला पण जायचं असतं. बाळासाठीच ते ऑफिसला जात असतात, बाळाचं भविष्य चांगलं होण्यासाठी आई-बाबांना ऑफिसला जावं लागतं. बाळांच्या भविष्याची तरतूद करायची असते. मी ही असाच माझ्या बाळांसाठी ऑफिसला गेलो होतो. पण माझं ऑफिस वेगळं आहे. बाळांसाठी जे जे आवश्यक आहे ते घडविण्यासाठी आई - बाबांना मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी आई-बापाला बाळाचा आणि बाळाला आई-बापाचा विरह सहन करावा लागतो. माझं जे काही चाललं होत तपश्चर्या, उपासना, व्रत हा बिझनेस होता, मी त्याला व्यापार म्हणणार नाही. बिझी- नेस होता हाच राईट वर्ड आहे. For one simple reason, माझ्या बाळांसाठी. 

बापू मागच्या वेळी तपश्चर्या केली, आता उपासना का करताय? एकच कारण! माझ्या बाळांसाठी. माझी बाळं साधी आहेत. ती एकमेकांशी भांडतात तरी ती भोळी आहेत. काही स्वत:ला स्मार्ट समजतात. त्यांना वाटतं मी फसवलं, मी असं उत्तर दिलं, ही बाकीची लोकं भोळी आहेत. पण खरं तर माझी ९९.९९% बाळं अतिशय साधी-भोळी आहेत. ते इतरांपेक्षा स्वत:ला स्मार्ट, उगीचच पापी समजतात व इतरांना भोळं समजतात. हा एवढा मोठा माझ्या लेकरांचा समाज खरंच खूप साधा आहे आणि बाहेरचं जग खूप वेगळं आहे, विचित्र आहे, वाईट आहे. बाहेरच जे जग आहे ते अतिशय कठोर, लबाड आहे. अतिशय गोड चेहरा ठेवून जगाला फसवताहेत. मला साधी-भोळी माणसं आवडतात. साधंसुधं असणं ही अतिशय क्रेडिटेबल गोष्ट आहे, ही good quality आहे.

आज मी माझं ध्येय पूर्ण करून आलोय. आजपासून Chandika Spiritual Currency सुरू होत आहे. चण्डिका करन्सी हा मापदंड, परीक्षा समजू नका. गाठी मारण्याचा हा प्रकार आहे. Chandika Spiritual Currency ही रामनाम बँकेसारखीच खूप सुंदर गोष्ट आहे. समीरदादा आणि त्यांच्या आय.टी. टीमने ह्यावर प्रचंड मेहनत घेतली आहे. Chandika Spiritual Currency प्रत्येकासाठी प्रगती करण्यासाठी नक्कीच आहे. पण मी जे व्रत केले त्याचा संबंध ह्याच्याशी नाही. माझ्या व्रताचा संबंध फक्त तुमच्या faith शी आहे. 

तुम्ही जिथे जिथे जाता, फिरता, खाता-पिता, तुमची भांडणं बघितलीत, तुमचा राग, तुमचं डिप्रेशन बघितलं. कोणीही एवढं पापी-वाईट नाही. मी बघत गेलो, प्रत्येकाला चांगलं करण्याची, चांगलं होण्याची इच्छा आहे. आपलं आणि इतरांच चांगलं व्हावं असंच वाटत होते. येणारा काळ बघा. आताचा काळ बघा. सायन्स प्रचंड speed ने प्रगती करत चाललं आहे. ही प्रगती चांगल्या प्रकारे उपयोगात आणली तर चांगलं आहे आणि वाईट प्रकारे उपयोगात आणली तर वाईट आहे. मुलांच्या शाळेच्या फी पाहून मी थक्क झालो. पगार वाढलेत पण proportion same नाहीए. संपूर्ण जीवन नोकरी करूनसुद्धा हाती काही उरत नाही. दुसर्‍या बाजूला पैशाची किंमत उरलेली नाही. आज कमावला उद्या गेला. अज्ञानामुळे मुलं चुकीच्या मार्गावर जाताहेत. बाहेर लांडगे, वाघ टपले आहेत. आईवडिलांना माहीत नाहीए मुलं काय करताहेत. मुलं चांगली आहेत पण तरीही चुकीचं वागताहेत. माझी बाळं चांगली आहेत पण त्यांच्या घरीही हे सगळं आहे. आधी नोकरी नव्हती म्हणून रडतो, आता नोकरी मिळाली म्हणून रडतोय का तर, नोकरीत एवढा त्रास आहे की काहीही करू शकत नाही. जायचा time fix आहे, पण येण्याचा नाही. नसेल झेपत तर सोडून द्या, कारण प्रचंड लोक available आहेत कामासाठी अशी परिस्थिती आहे. कोणाच्या मागण्या कोण ऐकणार? दहा बाय दहाचं घर घेतानाही फरफट होतेय. कुठेतरी पैसे भरतो. Provident Fund वरून कर्ज काढतो, कर्ज फेडायचं असतं म्हणून पहिली दहा वर्ष मूल होऊ देत नाही, नंतर मूल होत नाही. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाही अशी परिस्थिती आहे. वर्तमानपत्र उघडलं तर घात-पात आणि अपघातच असतात. ह्याचा अर्थ आम्ही घाबरूनच जगायचं का? नाही! मला हे अजिबात मान्य नाही. आयुष्यभर टेन्शन घेऊन जगायचं? का?  आज प्रत्येक पालक चिंतेत आहे. त्यासाठीच मी हे व्रत, उपासना केली होती. 

बापू, आम्ही (faith) विश्वास ठेवायचा म्हणजे काय? आम्ही साधी माणसं आहोत आमचा विश्वास डळमळतो. तुमचा विश्वास डळमळतोय, तुमच धैर्य खचतंय म्हणूनच हा विश्वास वाढवायला हवा. ‘आईला सांगा, ‘आमची श्रद्धा वाढव, विश्वास वाढव, सबूरी वाढव.’ तिच्याकडे  अधिक श्रद्धा मागा, अधिक विश्वास मागा, अधिक सबूरी मागा. जे कमी पडतंय ते ती वाढवायला बसलीय. जेवढं जमतं त्याप्रकारे करत रहा, पण काही तरी करा. खंड पडला तरी काहीही बिघडत नाही.

लाख वर्षापूर्वी पृथ्वीची रचना वेगळी होती. नंतर बेटं उत्पन्न झाली. ही सगळी गॅप तिनेच भरून काढली. जग बनवताना त्यावर लाकूड, संगमरवर काहीही नव्हतं तरी त्याने जग निर्माण केलं. त्याला आमच्या जीवनात काहीही करण्यासाठी कुठल्याही instrument ची गरज नाहीए.

माझ्या घरात खायला काही नाही, नोकरी नाही, धंदा पण बंद पडलाय. काहीही हरकत नाही. विश्वास ठेवा - तुम्ही विश्वास ठेवलात की तो सगळं करू शकतो. तो कुठल्या मार्गाने करेल ते तुम्हाला माहीत नाही.

तुम्ही वादळात सापडला- तुम्हाला पोहता येत नाही. विश्वास ठेवा - समुद्र कितीही मोठा असला तरी सगळे समुद्र आईच्या शंखात मावले होते. ती काहीही करू शकते ह्याचा विचार करा.

ह्या उपासनेतून मला दोन महत्त्वाची वाक्य सांगायची आहेत. भक्ती करताना आणि व्यवहार करताना थोडं वेगळं वागा. मी योद्धा आहे, संत नाही. मी योद्धयाच्या मार्गानेच जाणार.

भक्ती करताना, परमेश्वराचं स्मरण करा आणि प्रार्थना करा -“मी कोणीच नाहीय, तूच मला घडवणार आहेस, हे देवा सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे. तू करशील तसंच होणार, अगदी माझा व्यवहारसुद्धा.”

काम करताना, आईला सांगायचं - “आई मी आता कामाला लागतोय” आणि मग विचार करा हे काम पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे. आणि कामाला लागा.

आणि मग बघा, काम करताना लक्षात ठेवा सगळं माझ्यावर depend आहे. मग बघा, तुमच्या कामाने तुमची अक्कल, तुमची गती, तुमची क्षमता अधिक वाढेल.

व्यवहार आणि अध्यात्म एकत्र कसं आणायचं हे आपल्याला कळत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, तुमच्या घरी एक मुलगी लपण्यासाठी मदत मागतेय आणि तिच्या मागे गुंड लागले आहेत तिच्यावर बलात्कार करण्यासाठी. आणि तुम्ही जर त्या गुंडांना सत्य सांगायला गेलात की मुलगी इथेच आहे म्हणून तर ते वास्तव असेल पण सत्य असणार नाही. ज्यामधून अपवित्रता निर्माण होते ते वास्तव असू शकेल पण सत्य असू शकणार नाही.

‘त्या’चं काम तो चोख करतच असतो. प्रार्थना करताना हे सांगायचं की - ‘सर्व तुझ्यावर अवलंबून आहे, सगळं तूच बघणार आहेस आणि अशी प्रार्थना करून काम करताना म्हणायचे - ‘हे काम माझ्यावर अवलंबून आहे. माझं सगळं जग तुझ्यावरच अवलंबून आहे.’

 जग ‘ॐ’कारा मधून म्हणजेच शब्दामधून प्रगटलं. तशीच आमच्या जीवनसृष्टीची जी ताकद आहे ती त्या भगवंताच्या शब्दातून प्रगटते. भगवंत आत्म्याल्या सांगतो, त्या शब्दाची ताकद संपूर्ण शरीराला मिळते. पण आमच्यापर्यंत ती पोहचत नाही कारण आम्ही सतत विचार करत असतो, आमच्या मनात विचारांचा गोंगाट सुरू असतो म्हणून तो शब्द जीवात्म्यापर्यंत पोहचत नाही. उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत मनात सतत विचार चाललेले असतात. रस्त्यावरून चालताना आपण बघतो काही माणसं मोठमोठ्याने एकटेच बोलत जातात. तसेच तुम्ही मनातल्या मनात बोलता. विचार बंद करायचे म्हटले तर आणखी विचार वाढतात. विचारांमुळे मनात कल्लोळ, गोंगाट तयार होतो त्यात आईचा शब्द विरून जातो. आमच्यात सगळं आहे. आपण ग्रंथात बघतो परमात्मा, परमात्मत्रयी सगळं आमच्यात आहे. आमच्याच शरीरात आहेत.

दररोज रात्री-संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसं - ‘ध्यान’ करा. उपनिषदामध्ये सांगितलं आहे त्या त्रिविक्रमाने त्या परशुरामाने ‘ध्यान’ कसं करायचं ते. आईच्या चेहर्‍याकडे पाच मिनिटं बघायचं, डोळे बंद करायचेत, तिचं रूप आठवायचं. डोक्याला ताप न देता एवढं जरी केलं तरी जीवात्म्याला तिचा शब्द ऐकता येईल. त्या शब्दामुळे जीवात्म्याला ताकद मिळेल. ती ताकद तुमच्या मनात, शरीरात, प्राणात पसरते. उपासना करताना लक्ष लागत नसतं. पाच मिनिट फोटोकडे बघताना कुठलाही विचार मनात येऊ देऊ नका.  दिवसातून पाच मिनिटे तरी मी आणि माझा देव एवढाच विचार करा. प्रार्थनेनंतर सांगायचे, ‘हे सद्‌गुरुराया मला श्रद्धा, भक्ती दे, विश्वास दे. माझा विश्वास वाढू दे, माझी श्रद्धा वाढू दे, माझ धैर्य वाढू दे.’

‘मला श्रद्धा द्या, मला धैर्य द्या, मला विश्वास द्या, मला पैसा द्या’ असं म्हणायचं नाही. तुम्ही जर त्या परमात्म्याला मानत असाल तर तुमच्याकडे ते असणारच आहे. ह्या मागण्यात नकारात्मकता आहे. आईला आणि तिच्या पुत्राला भीक मागितलेली आवडत नाही. तिला म्हणायचं - ‘अधिक दे’. काय मागायचं - ‘हे मोठी आई मला अधिक सुख दे, अधिक धैर्य दे, अधिक आरोग्य दे’ उच्चार करायचा असा की, माझ्याकडे आहेच पण आणखी दे, अधिक दे. - ‘थोडा है.......... थोडे की जरूरत है!’

हे सगळं ती कशी वाढवणार ह्याचा विचार करू नका. तुम्हाला जे मोठं वाटतं ते त्यांच्यासाठी खूपच छोटं असतं. ही माऊली माझं कसं करणार? हा तुमचा problem नाहीये. जन्मलेल्या बाळाला आई दूध पाजते इतकं ते सोपं असतं.

पण माझ्या बाळांनी दीनवाणीपणे मागितलेलं मला चालणार नाही. मला माझी बाळं हताश, दीनवाणी झालेली आवडत नाहीत. संकटं येतात पण संकटातून बाहेर काढण्यासाठी आई व तिचे पुत्र आहेत. तिचा प्रथम पुत्र दत्तात्रेय-हनुमन्त, द्वितीय पुत्र किरातरुद्र, तिसरा परमात्मा - तो देवीसिंह तयार आहेत. सिंह आला की त्याच्या गुरगुरण्यानेच कशी तरसं पळून जातात. तुमच्या जीवनातल्या अडचणी पण तरसासारख्या आहेत. त्याची entry झाली की तरसांची पळापळ होते.

पैसा अजिबात नसेल, घरात जेवायला काहीही नसेल तरीही मागा - 
‘आई , आतापर्यंत जेवढे पैसे होते त्यापेक्षा अधिक दे.’
‘आई, आतापर्यंत जेवढं अन्न घरात आलं त्यापेक्षा अधिक दे.’
जाड आहात तर मागा, ‘आई, मला अधिक बारीक कर, अधिक चपळ कर.’ 
ह्या सकारात्मक मागण्यामुळे ही जी सिस्टम आईने उभी केली आहे ती सहजतेने तुम्ही वापरू शकाल. ह्याची किल्ली कुणाकडेही दिलेली नाहीए. ती तुम्हालाच दिली गेलीय. या योजनेत ‘श्रीश्वासम्‌’ पूर्णत्त्वाला पोहचलेला आहे. ‘श्रीश्वासम्‌’ ही एक आगळीवेगळी गोष्ट आहे. ही प्रत्येक गोष्टीवर काम करणारी आहे. ही सगळ्याच्या पलीकडे नेणारी गोष्ट आहे.

समजा तुम्ही गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताहेत पण अभ्यास करत नाहीत. तो गुरुक्षेत्रम्‌ मंत्र तुम्हाला अभ्यास करायला भाग पाडेल. बाबांकडून तुम्हाला धपाटे घालून तुमच्याकडून अभ्यास करवून घेईल. 

जिथे तुमचा हात पोहचू शकत नाही. तिथे तो स्टूल आणि स्टूल पकडायचे घट्ट हात देईल. तरीही तुमचा हात तिथपर्यंत पोहचत नसला तर तो अगदी सावकाशपणे ती वस्तू काढून तुम्हाला देईल. अधिकाची अपेक्षा ठेवा ह्यात काहीही चूक नाही.

तुमच्या जीवनात दु:खच असेल, असू शकतं. मग ह्या सिस्टमकडे काय मागायचं? ‘मला अधिक दु:ख दे’ नाही. दु:खाने जीवन भरलेलं असेल. तुमच्या जीवनात दु:खाचा महापूर आलाय, तेव्हा काय मागायचं -‘आई मला माहितीय आहे. तू माझं दु:ख कमी करतेस, तू माझं दु:ख कमी करत राहणार आहेस आणि दु:ख शून्य करणार आहेत.’ ह्यासाठी विश्वास लागतो. विश्वास मागा तिच्याकडे.

तुमचं जीवन समुद्राच्या तळावरून एव्हरेस्ट शिखर होईल - ही भविष्यवाणी नाहीए. ही fact आहे. मी एम.डी. डॉक्टर आहे आणि माझ्या आईच्या कृपेने माझे diagnosis कधीही चुकत नाही. 

आजपासून एक विश्वास ठेवायचा माझ्या डोक्यावरचा हात हा माझ्या सख्ख्या बापाचा आहे. He is My Real Father. हा माझा सख्खा बाप आहे - हा भाव असला पाहिजे. माझ्याकडे अमूक गोष्ट नाही असं म्हणायचं नाही. ‘आई अधिक दे’ असं म्हणायचं. ‘आई माझं दु:ख कमी करतेय’ असं म्हणा. ‘दु:ख कमी करायला सुरुवात कर’ असं म्हणू नका कारण त्याने सुरुवात केलेली आहेच. विश्वासामुळेच ‘ॐ’चा ध्वनी शरीरात प्रवाहित करता येतो आणि मनाच्या, शरीराच्या रोगांवर उपचार करता येतो. डॉक्टर नेहमी म्हणतात - ‘I Treat, He Cures’ ‘आम्ही उपचार देतो, भगवंत ठीक करतो.’ उपचाराबरोबर प्रेमाचे शब्द, उदी, प्रार्थना औषधाचं काम करते. औषध मिळेपर्यंत उपचार करतात. 

आम्ही कायमचे श्रीमंत झालोत कारण आमचा बाप अब्जाधीश असताना मूलं भिकारी असणारच नाहीत. 
आणखी एक promise आधीच दिलेलं आहे - 
‘मी तुला कधीच टाकणार नाही.’

॥ हरि ॐ॥

No comments:

Post a Comment