Saturday, January 22, 2022

Tulsipatra 1528

*तुलसीपत्र १५२८* 
 *५)साधुवादनिकषणः* - देवर्षि नारदांच्या चिपळ्या वाजताच शुभदेने प्रश्न केला, "हे देवर्षि नारद ! एका अत्यंत घोर चुका व महापापे केलेल्या व्यक्तीलाही पश्चाताप होऊन तिने त्रिविक्रमाची भक्ती सुरू केल्यास, त्रिविक्रम किती मार्गांनी त्या व्यक्तीला *अभय देतो*, हे तर मी स्वतःही अनुभवले आहे. "
                देवर्षि नारद अत्यंत प्रेमाने व कौतुकाने बोलू लागले , " प्रिय शुभदे!  *त्रि-नाथांनी त्रिविक्रमाला 'साधुवादनिकषणः' असाच घडविला - साधुवादनिकषण म्हणजे _चांगले की वाईट_,_पुण्य की पाप_,_बरोबर की चूक_, श्रेष्ठ की हीन_व _पवित्र की अपवित्र_ हे ठरविण्याचा _एकमेव_ निकष अर्थात मापदंड ( The Touchstone ).*
                तो *श्रद्धावानांवर प्रेम करतो*. परंतु त्या प्रेमात आंधळा होत नाही.
                तो *श्रद्धावानांना सर्वकाही पुरवितो* परंतु स्वतःला दाता मानत नाही .
                 *त्रिविक्रम श्रद्धावानांची पापे जाळीत राहतो*. परंतु स्वतःकडे त्याचे श्रेय घेत नाही.
                 *त्रिविक्रम त्याच्या भक्तांचे, त्याचा मंत्रगजर करणाऱ्यांचे कष्ट व दुःख कमी करीत राहतो*.परंतु स्वतःला भवदुःखमोचक मानत नाही.
               अशारितीने तो *'अकर्ता'* भावनेने कार्य करीत असल्यामुळे, *त्याचे प्रत्येक कार्य ,त्याचा प्रत्येक शब्द आणि त्याची प्रत्येक इच्छा हे सर्व त्रि-नाथांकडूनच प्रवाहित झालेले असते.*
                 स्वयंभगवान त्रिविक्रम करतो ,वागतो ,देतो व बोलतो तेच श्रेष्ठतम आणि ह्यांच्या तुलनेतच मानवांपासून देवांपर्यंतचे सर्वांचे गुण व कार्य आणि आचरण ह्यांचे मोजमाप केले जाते.
         *हा जगदंबेचा नियमच आहे*      
               मात्र हेही नीट लक्षात ठेव !  जो श्रद्धावान जास्तीतजास्त, *त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्यात* राहतो, त्याचीच पापे जाळली जातात.
                 जे केवळ कवायतीप्रमाणे त्रिविक्रमाचे नाम घेतात ,मोठ्या संख्येने जप करतात आणि त्रिविक्रमावर प्रेम मात्र कमी असते, त्यांची पापे अल्प प्रमाणात जाळली जातात.

                अत्यंत खूष झालेल्या शुभदेने नारदांना विनंती केली, " *त्रिविक्रम हा सर्व गोष्टींसाठी मापदंड आहे*.हे सूत्र कळले .परंतु ते व्यवहारात ,आचरणात व मुख्य म्हणजे मनात मुरवायचे कसे ,हे कळत नाही."
                देवर्षि नारद म्हणाले," हे भक्तोत्तमें शुभदे !  पुढील सामान्य प्रश्न व त्यांची उत्तरे ऐक.
*प्र.१) - जगात कुठले प्रेम श्रेष्ठ ?*
*उत्तर -* *'त्रिविक्रमाचे आपल्या भक्तांवरील प्रेम'* हाच मापदंड. त्याच्यासारखे नि:स्वार्थी ,निर्हेतुक व  *लाभेवीण प्रेम* जो कुणी *आप्त* करेल ,*तोच चांगला आप्त.* मात्र त्याची बरोबरी त्रिविक्रमाबरोबर करू नका.
*प्र.२) - जगात कोणते स्थान सर्वांत निर्भय ?*
*उत्तर* - *त्रिविक्रमाचे चरण अर्थात त्रिविक्रमाच्या चरणांचे ध्यान* -  *त्रिविक्रमाचा सहवास.* ज्याप्रमाणे त्रिविक्रमाच्या प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष दृश्य,अदृश्य अगदी काल्पनिक सहवासामुळेसुद्धा (अर्थात मनाने सहवासाची भावना केल्यास) भक्ताला *त्रिविक्रम निर्भय बनवितो.*
 *प्र.३) - जगात खरे सुख देणारे कोण व काय ?* 
*उत्तर - एकमेव आणि अद्वितीय - अर्थात _त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य_.*
हा एक त्रिविक्रमच असा आहे की जो तुम्हाला सुख देऊनही तुमच्यावर कुठलीही गोष्टी लादत नाही, तुमच्यावर हक्कही सांगत नाही, तुमचे कर्मस्वातंत्र्य अबाधित राखतो. 
 *प्र.४) - जगात सत्य कसे ओळखावे?*
*उत्तर - _त्रिविक्रमाच्या लीला हेच सत्य_.* ह्याच्या कथांमधून मानवांना आपोआपच सत्य व असत्य ,वास्तव आणि भ्रम ह्यांमधील फरक कळत राहतो. 
*प्र.५) - जगात चांगला माणूस कोण आणि वाईट माणूस कोण ?*
*उत्तर* - ह्या प्रश्नाचे उत्तर *त्रि-नाथांनीच देऊन ठेवले आहे*
                 *जो त्रिविक्रमाची भक्ती मनापासून* *अत्यंत प्रेमाने करतो,* *चण्डिकाकुलावर* *विश्वास राखतो आणि त्रिविक्रमाला* *पूर्णपणे शरण जाऊन* _*त्रिविक्रमाच्या अनुसंधानात*_ अर्थात _*त्रिविक्रम भक्तीभाव चैतन्यात जमेल तसे*_ *राहतो, तो मनुष्यच फक्त चांगला.* कारण त्याचे दुर्गुण आपोआप कमी होत जातात आणि जो त्रिविक्रमावर प्रेम करीत नाही त्याचे दुर्गुणही कमी होत नाहीत आणि त्याची पापेही नाश पावत नाहीत - अशीच माणसे वाईट व पापी ." 

*हरिॐ ! श्रीराम ! अंबद्न्य ! नाथसंविध् !*

No comments:

Post a Comment