Monday, July 3, 2023

श्रद्धावानांचे पथदीप - भाग १ important

From Bapu's whatsApp group

*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -३०🌟*
 
    *🔆 श्रद्धावानांचे पथदीप - भाग १🔆*

*१. आद्यपिपा :*



*आद्यपिपा = एक भक्तिपूर्ण प्रवास*
- समीर दत्तोपाध्ये

जन्म आषाढी एकादशी १९३३ आईचे नाव -लक्ष्मी
वडिलांचे नाव -पांडुरंग

वडिल पांडुरंगरावांची संतती जगत नसल्यामुळे १९१५ साली ते शिरडीस साईनाथांच्या दर्शनासाठी गेले व त्यानंतर सर्व अपत्ये सुखरुप राहिली.

काकांच्या जन्मानंतर त्यांच्या आठवणीतील पहिले शिरडी दर्शन १९४० साली झाले. त्याच रात्री द्वारकामाईत बसून काकांच्या वडिलांनी त्यांना उदीचे महत्व समजावून सांगितले. त्या दिवसापासून काकांची साईभक्ती अत्यंत दृढ झाली.

१९४५ साली शिरडीस गेले असताना द्वारकामाईमध्येच काकांची माधवराव देशपांड्यांचे पुत्र उद्धवराव व म्हाळसापतींचे पुत्र मार्तंडबाबा ह्यांच्याशी भेट झाली व त्या वर्षापासून काकांनी श्री साई सच्चरिताचे दरवर्षी कमीतकमी चार सप्ताह करण्याचा निश्चय केला; रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा. ह्यात कधीही खंड पडला नाही.

विवाह - ७ मे १९६० रोजी प. पू. सुचितदादा व समीरदादांच्या मातोश्रींशी (सुनंदा) काकांचा विवाह झाला व स्वप्नदृष्टांतानुसार साईंच्या आज्ञेने त्यांचे नाव शुभदा ठेवले.

विवाहानंतर पत्नीच्या संपूर्ण सहकार्यामुळे काकांच्या भक्तिप्रवाहाची जोरदार वाटचाल सुरु झाली. काका सदैव आपल्या सहधर्मचारिणीच्या सहकार्याचे तोंड भरून कौतुक करत असत.

काकांच्या जन्मदात्या आईचे निधन १८ नोव्हेंबर १९४१ साली झाले होते. आईच्या वियोगाचे दुःख हळुहळु साईभक्तित रुपांतरीत होऊ लागले. काका शाळेतील काही मित्रांबरोबर अनेकवेळा शंकराच्या मंदिरात संध्याकाळी भजनासाठी जात असत. एकदा एस.एस.सी. (मॅट्रीक) पास झाल्यानंतर काका शंकराच्या देवळात गेले असताना तेथे साईस्तवनमंजिरी वाचत बसले होते. वाचून पूर्ण होताच एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्या समोर येऊन उभा राहिला व त्यांनी विचारले, "बाळ, तुला काय हवे आहे ?" काकांनी उत्तर दिले, "मला देहधारी साई हवा आहे." तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, "मग तू गृहस्थाश्रमी झाल्यानंतर तिर्थक्षेत्रांच्या १०८ यात्रा व संतस्थानांची १०८ दर्शने पूर्ण कर." एवढे बोलून तो | वृद्ध ब्राह्मण हसू लागला. काकांनी विचारले, "पण मी सामान्य माणूस आहे. देहधारी साईचे रुप वेगळे असेल तर ओळखणार कसे?" तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, "त्यावेळेस मीच तुला साक्ष पटवून देईन." काका त्या ब्राह्मण गृहस्थांच्या व्यक्तिमत्वाने खूपच भारावून गेले होते. त्या ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार त्यांनी सर्वकाही करण्याचे ठरविले. विवाहानंतर त्यांनी नोकरी व प्रपंच ह्यातून वेळ काढून सतत संतस्थानदर्शन व तिर्थक्षेत्र यात्रा ह्यांचा झपाटा लावला. शिरडी, पंढरपूर, गोकर्ण, महाबळेश्वर, तिरुपती, गिरनार, परळीवैद्यनाथ, घृष्णेश्वर, रामेश्वरम्, प्रयाग, कन्याकुमारी, इत्यादि तिर्थक्षेत्रांच्या व आळंदी, देहू, गणेशपुरी, हुमणाबाद, गगनबावडा, सासवड, पंतबाळेकुंद्री स्थान, कलावती आईंचे हरिमंदिर, सिद्धरुढ स्वामींचा मठ, पावस, शेगाव अशा संतस्थानांच्या त्यांनी अनेकवार यात्रा केल्या.

इ.स. १९९६च्या पहिल्या रसयात्रेमध्ये सर्व मंडळींना घेऊन बापू शिरडीतील द्वारकामाईत गेले होते. तिथून मग बापू सर्वांना घेऊन शिरडीतील म्हाळसापतींची समाधी, कनीफनाथ मंदिर, इ. स्थळे दाखविण्यासाठी निघाले. काका मात्र द्वारकामाईतच बसून राहिले. त्यावेळेस प. पू. सुचितदादांनी काकांना साईस्तवनमंजिरी पोथी✨️ दिली व तुमच्याकडे ठेवा म्हणून सांगितले. काका श्री साईसच्चरिताचा एक अध्याय वाचून उभे राहिले व द्वारकामाईतील बाबांच्या तसबीरीसमोर लोटांगण घालण्यासाठी गेले. तिथे धुनीजवळ एकाएकी काकांच्या खिशातून दादांनी दिलेली साईस्तवनमंजिरीची पुस्तिका खाली पडली. ती उचलताना "अरे, ही वाचण्यासाठीच तुला मी इथे थांबवले आहे." असा आवाज काकांना ऐकू आला. त्यासरशी काकांना शंकराच्या मंदिरातील ती जुनी गोष्ट आठवली व ते खाली उतरून स्तवनमंजिरी पठणास बसले. काकांचा तो पूर्ण दिवस व रात्र बेचैनीत गेली. सुचित आपणास काहीच सांगत नाही. मीनावनी, चौबळ आजोबा वगैरे मंडळीतर निःसंदिग्धपणे बापूंविषयी सांगत आहेत व आपल्याला अजून काहीच प्रचिती येत नाही ह्या विचारांनी काका खंतावले होते.

असाच काही काळ द्विधा मनःस्थितीत गेल्यानंतर १९९७च्या गुरुपौर्णिमेला नेहमीप्रमाणे श्रीसाईसच्चरिताचा सप्ताह केल्यानंतर रात्री झोपताना काकांनी साईनाथांना स्पष्ट मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना केली. झोपेत त्यांना स्वप्नामध्ये तो शंकराच्या देवळातील प्रसंग परत तसाच्या तसा दिसला. काकांनी सकाळी उठताच शांतपणे निश्चय केला की आता लवकरात लवकर १०८ संख्या पूर्ण करायचीच. त्यानंतर पहिल्या अश्वत्थ मारुती उत्सवाच्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीस शेंदूर लावून बापू आपल्या आसनावर बसताक्षणीच काका एका पूर्ण वेगळ्याच भानरहित अवस्थेमध्ये गेले. त्यांना शंखचक्रबाणधारी स्वरूप दिसत होते. काकांना हाताला धरून चौबळ आजोबा स्टेजकडे गेले. हनुमंताच्या मूर्तीसमोर येताच काका पूर्ण भानावर आले होते. काकांच्या मनाची परत एकदा द्विधा मनःस्थिती सुरु झाली. परंतु गुरुपौर्णिमेच्या रात्री झालेला जुन्या घटनेचा स्वप्नदृष्टांत आठवून काकांनी निर्णय घेतला की | अगदी काहीही अनुभव आला वा काहीही दिसले तरीही जोपर्यंत म्हातारा ब्राह्मण खूण पटवणार नाही तोपर्यंत आपण धीर धरायचा.

पहिल्या अश्वत्थ मारुतीचा तो दिवस.

१९९९ साली त्यांची ही संख्या पूर्ण झाली. प.पू. अनिरुद्ध बापूंशी प. पू. सुचितदादांचे मित्र म्हणून १९८५ साली त्यांची ओळख झालेली होती व १९९५ पासून बापूंच्या भक्तिमार्गातही काका आलेले होते. पण सर्वात महत्वाचा निर्णायक क्षण ठरला तो इ.स. १९९९च्या धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी. त्या दिवशी जुईनगर येथे अरुंधती मातेने श्री विद्यामकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्ये ह्यांच्या तसबीरीचे अनावरण केले. त्यांचा चेहरा बघताच काकांना शंकराच्या देवळातील वृद्ध ब्राह्मण तो हाच ह्याची पूर्णपणे खात्री पटली व काका पूर्णपणे निश्चिंत झाले. त्यानंतर लवकरच व्यंकटेश महोत्सवामध्ये काकांना जप चालू असतानांच पूर्णपणे साईरुपाचे दर्शन झाले व काकांनी अनेक वर्षांचा 'ॐ साईनाथाय नमः' हा चालू असलेला जप ९ मे २००० पासून 'ॐ साईनाथाय अनिरुद्धाय नमः' असा सुरु केला.

१३ नोव्हेंबर २०००ची रात्र काकांसाठी व सर्व बापूभक्तांसाठी अत्यंत भाग्याची ठरली. त्याच दिवशी संध्याकाळी बापूंनी काकांची पिपिलीका पांथस्थ पदावर नियुक्ति करून कार्य सुरु करण्याची आज्ञा दिली होती. त्याच रात्री मध्यरात्री झोपेतून काका एकाएकी उठून बसले व त्यांना दुसरा अभंग स्फुरला. हा अभंग म्हणजे काकांची बापूंच्या चरणधुळीमध्ये लोळण्याची आत्यंतिक इच्छा.

त्यानंतर मात्र काकांचा आध्यात्मिक प्रवास एका वेगळ्याच उंचीवरून अत्यंत जोरदारपणे सुरु झाला. २००४च्या रामनवमीच्या दिवशी रात्री उत्सव संपवून प. पू. बापू हॅपी होममध्ये रात्री दीड वाजता परत आले. जेवणानंतर बापू, सुचितदादा, काका व मी गप्पा मारीत बसलो होतो. बरोबर सोडे तीन वाजता बापू झोपाळ्यावरून उठून उभे राहिले व काकांना म्हणाले, "आज आताच्या आता तुम्ही समीरला गुरुमंत्र द्या." काका म्हणाले, "तुमची आज्ञा आहेच, पण समीरला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार आहे असे वाटत नाही." तेव्हा बापू हसून म्हणाले, "अरे, जेव्हा हजारो मंडळी आमच्या तिघांच्या जयजयकारानंतर समीरच्या आधी तुझा जयजयकार करतात तेव्हा का ऑब्जेक्शन घेत नाहीस ?" काका म्हणाले, "देवा तुझ्याशी वादात कोण जिंकणार ? तू सांगशील ते करतो.' बापूंनी काकांना डोळे बंद करून श्रीसाईसच्चरित उघडण्यास सांगितले व एक बोट पानावर कुठेही ठेवण्यास सांगितले. ती ११व्या अध्यायातील १५२वी ओवी होती. तीच ओवी बापूंनी काकांकरवी मला गुरुमंत्र म्हणून दिली.

पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंती पूर्ण निष्काम ।। पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।।

बापूंचा खेळ पाहून मी स्तिमीतच झालो. माझा दादा हा बापूंचा शिष्य, माझे वडिल सुचितदादांचे शिष्य आणि मी काकांचा शिष्य (माझ्या वडिलांचा). त्यानंतर काकांनी बापूंची पाय धरून विनवणी केली, "एक पुत्र माझा गुरु झाला व दुसरा पुत्र माझा शिष्य झाला. पण आता मात्र पुढे कुणाचेही गुरुत्व मला देऊ नका. व्यंकटेश जपाच्या दिवशी मी तुमच्याकडे एकच मागितले होते की मला मानसन्मान, प्रसिद्धी व मोठेपणा नको. आजही मी परत तेच मागतो आहे. माझी अंतयात्रासुद्धा कुणा थोर भक्ताची म्हणून नाही तर फक्त 'सुचितचा बाप' म्हणूनच निघू दे कारण तीच माझी सुखद गोष्ट आहे." बापू म्हणाले, "आतापर्यंत सगळं तुझ्या मनासारखं झालं ना !” तेव्हा काका पटकन उद्गारले, "हो, पण ९६ पासून ९९ पर्यंत मला का रखडवलेस ?" बापू म्हणाले, "मी रखडवले नाही. तूच तुझ्या चुकीच्या गणितांमुळे रखडलास. तुझी १०८ स्थानांची बेरीज ९७ रामनवमीलाच पूर्ण झाली होती. पण गुरुवारच्या प्रवचनस्थळाला तू तुझ्या बेरजेत न मोजल्यामुळे तुझ्या मनातील १०८ ही संख्या मात्र पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच त्या स्वप्नातील म्हाताऱ्याचा म्हणजेच गोपीनाथ शास्त्री पाध्यांचा फोटो ९७च्या रामनवमीला पाहूनही तू ओळखू शकला नाहीस, तुला खूण पटू शकली नाही, कारण रामनवमीच्या वेळेचा फोटो कोट पगडीतला होता व तुझ्या अनुभवातील म्हातारा शेंडी व शालधारी होता." काका एकदम बापूंच्या चरणांवर जाऊन पडले व त्याच दिवसापासून काकांनी अखंड जपास सुरुवात केली.

काकांच्या आध्यात्मिक प्रवासातील बऱ्याच घटनांचा साक्षीदार बनण्याचे मला मिळाले पण काकांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, बापूंनी ज्या वेळेस माझ्यासमोर काकांना सांगितले की आता काही तासच उरले आहेत तेव्हा काकांनी बापूंच्या हातात दिलेला माझा हात.

॥ हरि ॐ ।।

( कृपासिंधू मॅगझिन - सप्टेंबर २००७)

*🔅महायात्रिक (२२ व्या अध्यायाची कथा) -🔅*

धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी झालेला हा अत्यंत सुंदर संवाद चौबळ आजोबा: अरे सुरेश (म्हणजे आद्यपिपा सुरेशचंद्र दत्तोपाध्ये- परमपूज्य श्री सुचितदादा आणि समीरदादांचे वडिल),हा श्रीविद्यामकरंदाचा (श्री गोपिनाथशास्त्री पाध्ये ) फोटो बघितल्यावर तुला काय वाटतं रे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं सांगू का? माझी नजर त्यांच्या डोळ्यांवरुन हलतच नाही. किती तेजस्वी,करारी, परंतु तरीहीकिती पवित्र आणि प्रेमळ भाव आहेत नाही?
चौबळ आजोबा: खरंआहे, पूर्णपणे खरं आहे. त्यांचे डोळे म्हणजेच संपूर्ण श्रीविद्यामकरंदत्व .आद्यपिपा (सुरेशचंद्र) :म्हणजे काय हो? मला काही जड शब्द कळत नाहीत व मला मोठया तत्वांची वगैरे खरं म्हणजेआवडच नाही.
चौबळ आजोबा: अगदी बरोबर बोललास , कसली आली आहेत मोठी तत्व आणि त्यांचे गूढार्थ? तो सदगुरुच एक खराव मोठा .तो समजायला मोठयामोठया बातांचा काही उपयोग होत नाही.
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :माझ्या मनातलं बोललांत बापूंच प्रवचन म्हणूनच मला खूप भावतं कारण सर्व उलगडून सांगतानासुद्धा बापू कधीच त्याच्यामध्ये क्लिष्टपणा आणत नाहीत व सहजपणे आपला मार्ग सापडतोच.
चौबळ आजोबा: तू काय बापूंना प्रवचनकार समजतोस ?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :मुळीच नाही.चौबळ आजोबा:मग ते कोण आहेत?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं म्हणजे वयाने, अनुभवाने ,भक्तीने व नात्याने तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात.त्यामुळे तुम्हीच"बापू कोण आहेत ? हे मला सांगायला हवं.चौबळ आजोबा: अरे,"दुसर्‍याने दिलेलं कितीसं पुरणार? ह्या अर्थाचं साईबाबांचं वचन हेमाडपंतानी लिहून ठेवलं आहे नाहीका? ते आठव व स्वत: त्यांचा मागोवा घेत राहा.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : मागोवा घ्यावासा वाटतो पण ती ३२व्या अध्यायातील शोध घेणार्‍या ४ जणांची व वणजार्‍याचीकथा आठवली की वाटतं आपण उगीच वेडयासारखं वागता कामा नये. माझा साई त्याअध्यायाप्रमाणेच मला नक्की येऊन भेटेल पण माझा १ हट्ट आहे .साईने एकदा तरी मलात्यांच विद्यमान रूप बाजूला सारुन त्या साईरुपातच ओळख पटवून दयावी.
चौबळ आजोबा: हा हट्ट कशासाठी? तुला अजून पटलं नाही काय ? तुला काय त्याची परीक्षा बघायची आहे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : नाही , नाही तसं मुळीच नाही. पण ’आपल्याला समजलं ते आपल्या प्रयत्नामुळे ’ असं झाल्यास नसतां अंहकार डोक्यात चढेल ह्याची सदैव भीती वाटते. लहानपणापासून अनेकवार शिरडीसगेलो, साईसच्चरिताची पारायणे केली ,पण का कोणास ठाऊक ,कायम आपल्याला अंहकार होईल, आपण साईंपासून दूर जाऊ अशी भीती मनांत घर करून राहते.
चौबळ आजोबा: मगं आजच्या आज ही भीती बापूंच्या हातांत सोपविली असं म्हण ,आत्ताच्या आत्ता म्हणं.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : त्यांना किती त्रास द्यायचा , जीभ वळत नाही.
(तेवढयात जिन्यावरून उतरणार्‍या बापूंना चौबळ आजोबांनी हाक मारली.)
चौबळ आजोबा: बापू , हा वेडा बघा. आता ह्याला जास्त वेळ तळमळत ठेवू नका .
बापू : काका, २२व्या अध्यायाचा अभ्यास करा.त्याचंच चिंतन करीत राहा. आतापर्यंत माणसाच्या वेगाने वाचत होतातआता मुंगीच्या वेगाने वाचत जा. हा पिपीलिका (मुंगी) मार्गच तुमचा आहे.
चौबळ आजोबा: अरे सुरेश, बघतोस काय? ताबडतोब पायावर डोकं ठेव. अरे, अनुग्रह झाला, आञा मिळाली .आता मुंगीहो आणि साखर खा.

- समीरदादा


*२. चौबळ आजोबा :*

🔅ज्यांना वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे सन् १९१७ साली सद्गुरु श्रीसाईनाथांच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभले ते श्रेष्ठ भक्त म्हणजे श्री. शंकर हरिभाऊ चौबळ अर्थात चौबळ आजोबा.

🔅 १९९६ साली त्यांना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या रूपात पुन्हा देहधारी सद्गुरुची प्राप्ती झाली आणि त्यांचे जीवन सुखाने व आनंदाने मोहरून गेले.

🔅श्री. चौबळ आजोबा रोज १६००० वेळा साईनामाचा जप करीत असत. त्यांच्या मृत्युसमयी सद्गुरु श्रीअनिरुद्ध त्यांच्या शेजारी बसून होते. मृत्युसमयी चौबळ आजोबांच्या मुखात अखंड साईनामाचे आवर्तन सुरू होते.

🔅सद्गुरु श्रीसाईनाथांना व सद्गुरु श्रीअनिरुद्धांना एकाच जन्मात प्रत्यक्ष बघणारे एकमेव साक्षिदार, चौबळ आजोबा म्हणजे सद्गुरु भक्तीतील एक श्रेष्ठ रत्न.

( माहिती संकलन :ओमसिंह नवलाखे )

*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
      *🙌नाथसंविध्🙌*

No comments:

Post a Comment