Monday, June 26, 2023

बापूंच्या घराण्यातील भक्ती

Message from whatsApp group
*होय परमात्मा प्रगटलाय!!*

*🌼🌸बापूंच्या घराण्यातील भक्ती🌸🌼* 
          (भाग -१)

*१)जगन्नाथ पाध्ये* : 

✨हे व्यवसायाने तहसीलदार होते. मुलकी कामानिमित्त एकदा मंगळवेढ्याला गेले असता त्यांची ओळख चिंतामणी टोळ या त्यांच्या मित्रामुळे स्वामी समर्थांशी झाली. जगन्नाथ पाध्ये यांना स्वामींचा बराच सहवास लाभला. स्वामींचे ते निष्ठावंत भक्त होते. 

✨१८७८ साली आपल्या निर्वाणाच्या एका आठवड्यापूर्वी स्वामींनी जगन्नाथ पाध्यांना मुंबईहून अक्कलकोटला बोलावून घेतले व सांगितले की आता आपण जाणार. त्यावेळेस *जगन्नाथ पाध्यांचा मुलगा गोपीनाथ पाध्ये* (जो जेमतेम १२-१३ वर्षाचा होता *गोपीनाथशास्त्री बापूंचे पणजोबा* ) हा त्यांच्या बरोबर होता. जगन्नाथ पाध्यांनी स्वामींकडे त्यांच्या बरोबर राहण्याची परवानगी मागितली तेव्हा ती न देता त्यांनी त्यांना मुंबईस परत जाण्यास सांगितले व चलनातली दोन नाणी (गोपीनाथ पाध्यांच्या हातात देऊन सांगितले की ही नाणी आपल्या नातवास दे. यावर जगन्नाथ पाध्यांनी स्वामींना विचारले की आपली भेट केव्हा व कुठे होणार? तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितले की *तू मला शिरडीत भेट* (मी तुला शिरडीत भेटेने). त्या काळात शिरडी हे गाव कोणालाही माहीत नव्हते व त्या वेळेस साईबाबा होते, पण प्रसिद्धीस आलेले नव्हते. 

✨या नंतर जगन्नाथ पाध्ये मुंबईस परत आले. त्यानंतर एका आठवड्याने स्वामींनी समाधी घेतली. नंतर प्रयत्न करूनही त्यांना शिरडीचा पत्ता मिळाला नाही. १९०१ साली स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला व त्यांना सांगितले की आता तुझी माझ्याकडे यायची वेळ झाली आहे व दोन नाण्यांची आठवण करून ती नाणी आपल्या नातवास दे म्हणून सांगितले.

*२) गंगाबाई पाध्ये :*

✨ या जगन्नाथ पाध्ये यांच्या  पत्नी. या *विठ्ठलाच्या व स्वामींच्या परमभक्त.* त्यांची स्वामींची भक्ती जास्त बळकट होती. 

✨त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते ८२ व्या वर्षापर्यंत दर  कार्तिकी एकादशीला पायवारी केली. पायवारी म्हणजे  मुंबई ते पंढरपूर हे अंतर मुखाने *'जय जय रामकृष्ण हरी'* हा जप म्हणत पायी चालत जाणे.

✨सर्वसाधारणपणे पुरूष हे अंतर ४५ दिवसात तर स्त्रिया ७५ दिवसात पूर्ण करायच्या. फक्त शेवटच्या वर्षी ही पायवारी त्यांनी सोलापूर ते पंढरपूर केली. 

✨गंगाबाईचा मृत्यू वयाच्या ८२ व्या वर्षी पंढरपुरच्या गोपाळपुऱ्यामध्ये, जी जनाबाईची जागा आहे तेथे अंदाजे १९२१ च्या आसपास झाला. यावेळेस त्यांच्या बरोबर काशिनाथशास्त्री रांजणे हे उपस्थित होते. गंगाबाईवरोबर त्यांनासुद्धा पांडुरंगाचे दर्शन झाले. *गंगाबाई पाध्ये म्हणजे गतजन्मीच्या सखुबाई.*

*३) गोपीनाथाशास्त्री पाध्ये:*

✨ यांचा जन्म १८६६ च्या सुमारास झाला. हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. सर्व वेद व शास्त्रात पारंगत व त्या काळचे विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. त्या काळी त्यांची गणना अत्यंत श्रीमंत लोकांत होत असे. ईस्ट इंडिया कंपनीस ते पैसे व्याजाने देत. यांच्या घरी गव्हर्नेस म्हणून गोरी बाई कामाला असायची. करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी त्यांच्याकडे बऱ्याचवेळेस अर्थ लावण्यास येत. जेव्हा दोन समुहात विवाद उत्पन्न होत तेव्हा गोपीनाथाशास्त्री पाध्यांना लवाद म्हणून नेमले जात असे. 

✨त्यांच्या पत्नीचे नाव *रमाबाई पाध्ये.* आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर स्वामींच्या *'मला शिरडीत भेट'* या बोलांनी त्यांना बेचैन केले व ते शिरडीचा शोध घेऊ लागले. याच सुमारात त्यांची भेट भगवानराव कुलकर्णी नावाच्या स्वामीभक्त सद्गृहस्थांशी झाली व त्यांनी गोपीनाथशास्त्रांना शिरडीचा पत्ता सांगितला आणि म्हणाले 'शिरडीस मुसलमानाच्या वेषातील असे एक अवलिया आहेत नाव आपण त्यांना मानतो.' बघू या तर खरे काय आहे? असे म्हणून गोपीनाथशास्त्री शिरडीस आले. 

✨तिथे येऊन त्यांना बाबा मशिदीत भिकाऱ्यांसमवेत बसलेले दिसले. तरीही स्वामींच्या वचनाची व  आज्ञेची आठवण ठेऊन ते पुढे आले व बाबांना त्यांनी नमस्कार केला नमस्कार करून उठताना नी बाबांनी आपल्या झोळीतून दोन नाणी काढून त्यांच्या आता हातात ठेवली व विचारले *"आता तरी खूण पटली दोन ना."* हे शब्द कानावर पडताच त्यांची खात्री झाली की स्वामीच बाबांच्या रूपाने परत आले आहेत व त्यांचे पहिले शब्द *'आता तरी खूण पटली ना' यालाच  गुरूमंत्र मानून रोज १००८ वेळा त्याचा जप करण्यास ची सुरूवात केली.* 

✨यानंतर त्यांचे नित्यनियमाने शिरडीत  जाणेयेणे सुरू झाले. १९१० साली विजयादशमीच्या दर दिवशी त्यांना *मालती नावाची मुलगी* झाली. मुलीच्या जन्मानंतर वर्षभरातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले व गोपीनाथ पाध्यांना पूर्ण विरक्ती येऊन आपल्या  मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. 

✨ज्या दिवशी ते संन्यास घेणार होते. त्याच्या आदल्या दिवशी रात्री स्वामींनी स्वप्रात येऊन त्यांना खूप ठोक दिला व सांगितले की, संन्यास घेणे हा तुझा प्रांत नाही तेव्हा ते तू करू नकोस. तू आजपासून एकनाथी भागवत व पंचदशी यावर व्याख्याने देत जा. असा आदेश त्यांना दिला. 

✨स्वामींच्या आदेशाप्रमाणे शेवटपर्यंत श्री गोपीनाथास्त्री पाध्ये एकनाथी भागवत व पंचदशी यावर व्याख्यान करीत राहिले. १९३८ साली त्यांना देवाज्ञा झाली.

*मालती पाध्ये / शकुंतला पंडीत :(बापूंच्या आज्जी)*

✨ या गोपीनाथ व रमाबाई पाध्ये यांच्या सुकन्या.

✨ १९३० साली यांचा विवाह अनंत वामन पंडीत यांचे सुपुत्र श्री. नरेंद्र अनंत पंडीत यांच्याशी झाला. हे पंडीत घराणे श्रीकृष्णाचे नितांत भक्त पण ते इतर कोणालाही - मानीत नसत. साईबाबा व स्वामींच्या ते विरूद्ध होते. 

✨श्री अनंत वामन पंडीत यांचे एक सद्गुरू पाठक गुरूजी म्हणून अवलीया होते. त्यांनी 'ॐ नमो नारायण' हा मंत्र त्यांना दिला होता व त्याचा जप सतत करीत ते नेहमी द्वारकेला जात. 

✨१९२५ साली अनंत वामन पंडितांना आषाढी प्रतिपदेच्या दिवशी *• श्रीकृष्णाने स्वतः दर्शन दिले व सांगितले की, तू आता माझ्या बरोबर रहा व पुढे सांगितले की तुझ्या नातीच्या पोटी एक दिव्य तेज जन्माला येणार आहे.* या आनंदातच त्यांना बालोन्माद अवस्था प्राप्त झाली - व शेवटपर्यंत ते याच दशेत राहिले.

✨मालती पाध्ये/शकुंतला पंडीत यांचे पती नरेंद्र अनंत पंडीत यांची कृष्णभक्ती श्रेष्ठ होती. लग्नानंतर वामन पंडीत यांनी त्यांना (शकुंतलाबाईंना) - रामरक्षेची संथा देऊन ती सतत म्हणण्यास सांगितले. त्यांना जे जे काही श्रीकृष्णाने सांगितले ते सर्व शकुंतलाबाईंना सांगून टाकले. शकुंतलाबाईंनी आपल्या सासऱ्यांनाच गुरू मानले. नरेंद्र अनंत पंडीत हे नित्य नियमाने श्रीकृष्णाचा त्रिस्थळी जप १००८ वेळा करीत

ॐ नमो भगवते वासुदेवाय । 
ॐ वासुदेवाय नमो भगवते । 
ॐ भगवते वासुदेवाय नमः l

प्रत्येक जप १००८ वेळा करणे म्हणजे त्रिस्थळी - जप. 

✨या दोघांचे एकच अपत्य. कन्यारत्न - *अरुंधती*.(प.पू.श्री बापूंच्या मातोश्री. ) 

✨१९३४ साली - नरेंद्र अनंत पंडीत यांना पंढरपूरला चंद्रभागेत स्नान करताना विठ्ठल रखुमाईचे दर्शन झाले व रखुमाईने त्यांना सांगितले की *आज संपूर्ण दिवस तू स्वामी समर्थाचे नामस्मरण जपत रहा.* 

त्याप्रमाणे स्वामीभक्ती नसतानाही त्यांनी स्वामींचे नामस्मरण केले. त्याच  रात्री स्वामींनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले, की *त्रिपुरारी पौर्णिमेला तुझ्या मुलीच्या पोटी दिव्य निळा प्रकाश जन्माला येणार आहे.*  

.....हे ऐकून भक्ताची देवाच्या सानिध्यात रहायची लालसा वाढून त्याने स्वामींना विनंती केली की, मला आता घेऊन जा व देवाचा जन्म बघण्यासाठी त्या काळात जन्माला घाला. 

✨स्वामींनी सांगितले की, तू गृहस्थाश्रमी असल्यामुळे मला तुझ्या पत्नीच्या परवानगीशिवाय असे काही करता येणार नाही. तरी तू आपल्या पत्नीची परवानगी घेऊन ये....

(पुढे चालू....)
-२१ एप्रिल २००२ 'निर्भिड लेख'
(शब्दांकन प्रयास: ओमसिंह नवलाखे)

🙏हरि ओम l  श्रीराम l अंबज्ञ🙏

No comments:

Post a Comment