Friday, January 18, 2019

Discourse 17/01/2019

*Bapuraya discourse* Thursday 17/01/2019

*हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध*

* 'हरि: ओम' हे gramatically correct
* आपल्या विकारांवर  control केल्यावरच  भगवंताकडे  जायचा विचार होऊ शकतो, असे सांगणाऱ्याकडे लक्ष देऊ नका
* *आद्यपिपांचा अभंग : 'षड्रिपू झाले बहू उपकारी अजातशत्रू मी झालो .. '*
* क्रोध आवश्यक आहे...अन्यायाशी लढाण्यासाठी.
* मोह नसेल तर काही मिळवण्यासाठी प्रयत्नच होणार नाहीत!
* या षडरिपुंचे मूळ रूप पवित्रच  आहेत
* ताप घालवन्यासाठी  माणसाला freezer मध्ये ठेवू शकतो का? त्याचप्रमाणे सर्व विकार घालवणे उचित नाही.  उचित प्रमाण हवे ... Not more not less
* त्याच प्रमाणे हे षड्रिपू  control मध्ये ठेवा zero करू नका.
* तुम्ही संत नाहीत, हे लक्षात ठेवा
* भक्ती भाव चैतन्यत सर्व control मध्ये राहते
* भगवंताने हे गुण उत्पन्न केले, त्यापासून आपण शिकावे म्हणून !
* सर्व मानवी मर्यादेत असले पाहिजे
* कोणाकडूनही चुका होऊ शकतात... अगदी मोठ्या पण
*वासना घालवायची असे सांगणारे मोक्षाची इच्छा धरतात,  मोक्ष प्राप्ती ही पण इच्छाच आहे
* *my daughters and sons,  सुधारायचय पण इतके पण मनाला कष्ट देऊ नका की मन मरूनच जाईल*  मन जिवंत राहिले पाहिजे
* माझ्यात दुर्गुण आहे, तो मला सुधारायचाय
* हा मंत्र गजर तुमच्या गुणांना मर्यादेत ठेवेल
* भक्त आहोत भक्त बनून राहायचंय
* आपल्या सगळे आपल्यापासूनच मिळणार आहेत, हा मंत्र गजर करून घेईल
* 'तो' तुमच्या आत बसलेला आहेच.  एकदा प्रेमाने नाम घेतले त्याच्या आत 'तो' आहेच
*हरि ओम*

*बापूराया talk after दर्शन*

*हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध*

* प्रपत्त्ती झाली आता. *प्रपत्त्तीचे  सांभार जिकडे कुठे बनेल, बनवताना 'तो' तिकडे येऊन 3दा हात फिरवतो.  म्हणून ते special tasty होत!*
* चखके भी देखता है वो
* प्रपत्त्तीचे  सांभार त्याने चाखून  बनवलेले असतें म्हणून ते त्याचा 'उष्टा प्रसाद' असते
* प्रपत्त्ती म्हणजे चण्डिकेला शरण जाऊन घेतलेली शरणागती...म्हणून ती पाठवते तिच्या पुत्राला, प्रपत्त्ती झालेल्या प्रत्येक घरात !
* *वर्षभरात एकदाच आपण नैवेद्य न अर्पण करता त्याचा प्रसाद आपल्याला मिळतो,  तो प्रपत्त्तीला !*
* पुढच्या वर्षीपासून सांभार बनवताना 'तो' तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा

हरि ओम

Thursday, January 17, 2019

Tulsipatra: Read online

A wonderful gift to all. Sadguru Shree Aniruddha's (Bapu) Agralekhs from Daily Pratyaksha now available online.

Website link - https://tulsipatra.in

The current series of Agralekhs is the Tulsipatra series wherein Bapu has been explaining each verse of the Sunderkaand. Bapu has been writing on the current verse 334 of Sunderkaand for over 5 or 6 yrs now. After covering serveral topics ranging from 'True history of Mankind', Kirat kaal, stories of Ganpati & Kartikeya and many more, the recent Agralekhs on Bhaktibhaav Chaitanya are just mesmerising, to say the least.

Being able to read these invaluable Agralekhs online is just another example of how everything is made simple for shraddhavans.

Saturday, January 12, 2019

स्वंभगवान त्रिविक्रमाचे भजन! (Swayam bhagwan Trivikram's bhajan)


11/01/2019
।। हरि ॐ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध् ।।

रामा रामा आत्मारामा
त्रिविक्रमा सद्गुरुसमर्था।।
सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा
आत्मारामा रामा रामा।।

स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्र गजरामध्ये श्रद्धावान समरस होत असताना सद्गुरु कृपेने भक्तिभाव चैतन्यात रमण्याचा आणखी एक मार्ग श्रीहरिगुरुग्रामला प्रकट झाला. तो मार्ग म्हणजे स्वंभगवान त्रिविक्रमाचे भजन!

जय त्रिविक्रम मंगलधाम।
श्रीत्रिविक्रम पाहि माम् ।।ध्रृ।।

शुद्ध ब्रह्म परात्मर राम।
श्रीमद् दशरथ नन्दन राम।
कौसल्यासुखवर्धन राम।
श्रीमद् अयोध्या पालक राम ।।१।।

त्र्यम्बककार्मुक भंजक राम।
दंडकवनजन पावन राम।
विनष्टसीतान्वेषक राम।
शबरीदत्तफलाशन राम।।२।।

हनुमत्सेवित निजपद राम।
वानरदूत प्रेषक राम।
हितकरलक्ष्मण संयुत राम।
दृष्टदशाननदुषित राम।।३।।

साकेतपुरीभूषण राम।
सकलस्वीय समानत राम।
समस्तलोकाधारक राम।
सर्वभवामयवारक राम।।४।।

भक्तिभाव चैतन्य भजन मालिकेतील हे पहिले भजन.

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीत श्री. पौरससिंहानी जमलेल्या सर्व श्रद्धावानांना वरील भजन करण्यास शिकविले आणि प्रत्येक श्रद्धावानाने परमात्म्यास समर्पित होऊन भजन केलं.

भजन करताना श्रद्धावानाच्या मनाचा प्रवाह नम:कडे सुरू झाला होता.

भजन करताना प्रत्येकाचा भाव स्वयंभगवान त्रिविक्रम असणाऱ्या श्रीरामाच्या आणि श्री अनिरुद्धाच्या चरणांशी अर्पण होत होता आणि त्या चरणांशी घट्ट बांधून घेण्याची प्रेरणा सहजपणे प्राप्त होत होती.

सर्वसमर्थ असणारा स्वयंभगवान त्रिविक्रम म्हणजे साक्षात श्रीअनिरुद्धाचे सामर्थ्य श्रद्धावानांच्या सहजपणे लक्षात येत होते. त्या सामर्थ्याचा प्रवाह प्रत्येक श्रद्धावानाच्या मनाकडे जाऊ लागला.

जीवनातील अंतिम सत्य, जीवनातील खराखुरा आनंद आणि जीवनाचे परमेश्वरी मुल्य; हे सर्व काही स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या भक्तिभाव चैतन्यातील भजनातून श्रद्धावानांना मिळत होते.

‘भजन’ शब्दाचा खरा अर्थ, ‘त्या’ परमात्म्याची सेवा. त्या सेवेचा पाठ पुन्हा एकदा कधीही न विसरण्यासाठी गिरविला गेला.

त्याच्या साक्षात दर्शनाची भूक क्षमविण्यासाठी हे भजन पुढील हजारो वर्षे चिरकाल श्रद्धावानांच्या जीवनात अधिराज्य करणार आहे.

भजनाचे शब्द त्यानेच प्रकट केले, भजनाचे शब्द त्यानेच उच्चारले, भजनाचे शब्द त्यानेच आमच्या कानात ओतले, भजनाचे शब्द त्यानेच आमच्या मनात-चित्तात स्थिर केले आणि त्याच भजनाचे शब्द आमच्या मूखातून-वाणीतून ऐकण्यासाठी ‘तो’च व्याकुळ झाला होेता.

आम्हाला काय मिळालं? सर्वांगसुंदर असणारं सर्व काही. पण स्वयंभगवानाचे भजन आमच्या वाणीतून ऐकताना ‘तो’ खूष झाला. आम्ही भक्तिभाव चैतन्याच्या सागरात आनंदाने बागडत असताना आमच्या वाणीतून निघालेल्या भजनाला ‘तो’ प्रतिसाद देत होता; नव्हे त्याने टाळ्या वाजवून आमचं कौतुक केलं.

गुरुवार दि. १० जानेवारी २०१९ ह्या दिवशी खऱ्या अर्थाने भक्तिभाव चैत्यन्याच्या भजनाचा शुभारंभ झाला असून पुढील अडिच हजार वर्षे हेच भजन आम्हाला तारणार आहे. आम्हाला स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या अनिरुद्ध रूपाशी-अनिरुद्धाच्या कार्याशी जोडणार आहे.

खऱ्याअर्थाने रामराज्याच्या प्रवासामधील हा आणखी एक टप्पा; पण आम्हाला वाटतं की, हा रामराज्याचा जल्लोष!

`जय’ आणि `श्री’ ह्यातील फरक आम्हा श्रद्धावानांच्या लक्षात आला आणि ‘जय’ आणि ‘श्री’ असणाऱ्यांची कृपा आमच्या जीवनात सदैव आणण्याची ताकद भक्तिभाव चैतन्यातील ह्या भजनात आहे.

रामाची कृपा, रामाचे सामर्थ्य, रामाचे यश, रामाची भक्ती आमच्या जीवनात येण्यासाठी हे भजनच आम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे.

अध्यात्म्यातील उचित ते सर्वकाही आम्हाला देण्याची क्षमता ह्या भजनात आहे म्हणून हे भजन परमात्म्याचं आवडतं आहे. कारण ‘त्या’ला माहित आहे की हे ‘भजन’ आपल्या श्रद्धावान बाळांनी मन:पुर्वक स्वीकारलं की त्यांच्यासाठी नव्व्याण्णव पावलं चालणं सोप्पं जातं; त्यांच्यावर कृपा करणं सहज शक्य होतं.

काल स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या `राम’रूपातील भजनात तो स्वत: सहभागी झाला आणि आम्हालाही सहभागी करून घेतले. त्यामुळे काल आनंदाचा, भक्तीचा, प्रेमाचा जल्लोष होता म्हणूनच तो रामराज्याचा जल्लोष होता असं म्हणावसं वाटतं…

।। जय जगदंब जय दुर्गे ।।

।। हरि ॐ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध् ।।

Wednesday, January 9, 2019

8th Jan 2015 pravachan on prapatti

Sadguru shree Aniruddha bapu pravacgan by 8th jan 2015

हरि ॐ
प्रपत्ती...प्रपत्ती आटपायची गोष्ट नाही..स्त्रिया गोळा करणे ...यांत्रिकपणा नाही आला पाहिजे..त्यापेक्षा नं केलेलं बरं..छोटे ग्रुप करून करा..मला भाव महत्वाचा..
आपली संस्था मुळ 'अध्यात्म' आहे..नं शिस्त नको तर नाही..
भाव तोचि देव..ही प्रपत्ती ही त्यांच्या आयुष्यातली खुप महत्वाची गोष्ट आहे..
आधी जेंव्हा करायच्या तेंव्हा परकीय आक्रमण होत नव्हते..
स्त्री ही संरक्षकच असते..
100 अडचणी (डिफीकल्टी) मान्य  पण
प्रपत्ती करताना मन शांत आनंदी असू दे..
पुर्ण प्रेम, विश्वास अन पावित्र्य याना जपता आलं पाहिजे..
मुळ मुद्दा..
ॐ मंत्राय नम:
स्वार्थ..निर्भयता...हेल्थ...अवघाचि संसार सुखाचा करीन..   आज आपल्याला संसार सुखाचा करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे, 'संवाद'..
तुटे वाद संवाद तो हितकारी..
प्रत्यक्ष..कोण वाचतं..अग्रलेख..
प्रत्यक्ष न आपला काहीच संबंध नाही त्याला काही उपयोग नाही..
प्रत्यक्ष फक्त बापूंचा अग्रलेख वाचतो...बाकी घडी करून ठेवतो...असं करू नका..
प्रत्यक्ष म्हणजे काय, तर 'डायरेक्टली'...
पुन्हा मी कधीच सांगणार नाही, तुम्ही न तुमचं प्रारब्ध..ही धमकी आहे...
हा संवाद..जो आहे..सगळे ग्रंथ संवाद मधे आहेत..आमच्या घरात हा संवाद आहे का..?
संवाद म्हणजे..एकमेकाना समजुन घेणं..
हल्ली घरात एकमेकांशी बोलतच नाही..न बोलले तरी वेगळेच टॉपिक
आपण दुस-याचं बोलणं ऐकायला पाहिजे..
पतीने पत्नी काय बोलते हे ऐकुन घेतलं पाहिजे...
प्रत्येकाने एकमेकाना समजुन घेतलं पाहिजे..
आम्ही का एकमेकांशी, चांगलं बोलु शकत नाही..
दुस-यांची स्तुती, का करत नाही?..जेवण चांगलं झालं..ते नेहमी स्पेशल असलं पाहिजे..मीठ कमी झालं ते बोलतो...आपण एकमेकांना कधीच समजुन घ्यायचा प्रयास करत नाही...
कारण आपल्याला वाटतं, प्रत्येकाने आपल्या मनासारखं वागलं पाहिजे..
नो ह्युमन इज परफेक्ट.. (कोणी ही मनुष्य अचुक नाही)..

ज्या व्यक्ती जेवढ्या जवळ असतात, त्यांचे दुर्गुण आपल्याला दिसतात, पण लांब असलेल्यांचे दिसत नाहीत..
ज्याला वाटतं आपल्यात दुर्गुण नाही..असं वाटलं म्हणजे त्याची घडी भरली..म्हणजे तो संत झाला...
ज्या अर्थी मला आशा अपेक्षा आहे म्हणजे...माझ्यात दुर्गुण आहेत..
जमवुन घेण्यात खुप ताकद आहे..प्रत्येक जण हेच म्हणत असतो..किती समजुन घ्यायचं...मीच का समजुन घ्यायचं..  आपले जे आहेत, त्यांना समजुन घ्यायला शिका..लहान सहान गोष्टींमधे..
नं कोणाला, आपल्या व्यक्तीला कसला त्रास असेल..त्याच्या बद्दल सहानुभूती दाखवा..हा पण एक संवाद आहे..  माझं चुकलं..मी मान्य केलं..असं जे बोलतात म्हणजे ते खोटं बोलतात...
चुकलं तर सॉरी बोलायला शिका...नाही जमलं तर चुक सुधरायला शिका..
कोणावर खोटा आरोप करू नका...त्याचं 10पट प्रारब्ध वाढवतो...त्याच्याकडची 10 पापं स्वत:च्या डोक्यावर घेतो..राजानो कोणावर खोटा आरोप करू नका..प्रत्येक व्यक्तीच्या वेव्हज् (लहरी) सगळीकडे पहिल्या (फर्स्ट) असतात..जे लोक ऐकत असतात..ईतर लोक ऐकतात..नं चार लोकाना जाऊन कळवतात..
विचारांचा प्रकार...
प्रत्येकाकडे खुर्ची आहे..वेगवेगळ्या प्रकारच्या असतात...खुर्ची...म्हणतो सगळे..पण वेगळ्या प्रकारच्या दिसल्या तरी आपण त्याना खुर्चीच बोलतो नं... म्हणजे यांच्यात काहीतरी साम्य असेल ना...खुर्ची...जी स्थुल वस्तु दिसते..
त्याच्या मागे...एक तत्व असतं...ही सगळी एकत्र होतात..त्यांचा संग्रह होतो.दुर्गुणांचे दुर्गण पण..
दुस-यावर आरोप केला...कि तो ते दुस-या लोकाना सांगतो...घरात तुम्ही कोणावर खोटा आरोप करता..
तेंव्हा मोठी आई हे 10 पट नाही.. 100 पट येऊन आदळतात...खोटे आरोप तुमच्या विषयी कोणी केले..तरी या सगळ्याच्या पलीकडे मोठी आई आहे.
खोटे आरोप मी कोणावरही करणार नाही...असं ठरवा...लहान मुलांवर करतो...हा नं असाच आहे...ही कार्टी अशीच आहे...हा माझा मुलगा वाया गेला आहे...बापच असं बोलला म्हणजे कसं चालेल...बाप बोलला पाहिजे, नाही मी प्रयत्न करेन...
जेंव्हा आपण दुस-यावर आरोप करतो, त्यावेळी आपण आपल्या स्वत:वर खुप आरोप करतो...
घरामधे राहून एकमेकांवर आरोप करायचे नाहीत...
नं भांडताना पण आपण आपल्या मनाशी भांडतो..
पण प्रेम पण तेवढच करा.
मुलांना विचारा..खांद्यावर हात ठेवुन विचारा...पुरूषांनी घरी आल्यावर...ही काय घरात लोळत असते..मीच काम करून आलोय...जरा 10 दिवस त्यांची जबाबदारी घेऊन बघा...
घर म्हणजे एकमेकांशी बांधिलकी असते.. घरातल्या माणसाना तुम्ही खात्री द्या..तुम्ही आमचे आहात...प्रेम वाढवा...
करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात...
मैत्री करा..बायकोची नव-याशी मैत्री होऊ दे..करून बघा...घरात आलो कि आपण माणसं राहतो..एकमेकांनाही बोला..
तेंव्हाच संसार सुखाचा होतो...काळजी घ्यायला शिका..संवाद करायला प्रत्येकाने सुरूवात करायला पाहिजे...घरात एकत्र बसा, गाणी ऐका...पिक्चर बघा...काही घरात ही नावं माहित नसतात...
साध्या सुध्या हलक्या गप्पा मारायला शिका....ह्या गप्पांना अर्थ नाही, असं समजू नका..हा संवाद आहे.
संवाद म्हणजे, 'स्वस्ति' म्हणजे 'आरोग्य'..'क्षेम' म्हणजे 'कल्याण'.
आनंद करायला शिका...लहान सहान गोष्टींचं appreciate (कौतुक) करता आलंच पाहिजे...
प्रत्येक नात्यासाठी संवाद व्हायलाच पाहिजे...
गप्पा मारता यायलाच पाहिजेत..भांडणं त्याच दिवशी संपलीच पाहिजेत...एक तासात संपलं, तर मला आवडेल... तुमच्या घराला प्रेमळ बांधिलकी साठी शब्दांची आवश्यकता आहे...रागवणं, पण कधी कधी चांगलं असतं..रूठकर पहले, जी भर सताऊंगी मै, जब मनायेंगे वो, मान जाऊंगी मै,
हिन्दी सिनेमा अनुपमा मधे गाणं आहे..धीरे धीरे मचल, ऐ दिले बेकरार...ह्या गाण्यातुन आपल्याला कळतं..संगीत हे माणसाच्या जिवनात खुप आवश्यक आहे..
आपला मुलगा रुसला तर मनवायला काय हरकत आहे! 
आजपासुन आपण सगळ्यांनी संवाद साधायलाच पाहिजे..वाद संपवायलाच पाहिजे..
प्रत्येक कामासाठी ताकद, ही प्रत्येकाची जबाबदारी असते..
अंबज्ञ

Tuesday, January 8, 2019

Aniruddha sayings

" होय ! प्रत्येक श्रद्धावानाला
' सुग्रीव ' बनता येते; किंबहुना बनावेच लागते अर्थात मंत्रगजर
स्वीकारावाच लागतो~ नाहीतर जीवनात फक्त अनर्थ माजतो.
कारण ' वाली ' नावाचा मूळ अर्थ ' अनर्थ ' हाच आहे ~ अनिरुद्ध ~

Saturday, January 5, 2019

Jap- 18th of month

दर महिन्याच्या १८ तारखेला ५ वेळा म्हणायचा जप

संदर्भ : सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१८ जून २०१५)

...म्हणुन ती लोपामुद्रा म्हणते.. 
हे त्रिविक्रमा, तू त्या लक्ष्मीला माझ्या शेतात, माझ्या कुळात सर्व ठिकाणी येण्यासाठी आवाहन कर अन् घेऊन ये! आणि हा हट्ट फक्त ती बापाकडेच करते.. आपली आजी एवढी असताना, आपला बाप असताना आपल्याला काळजी कसली..आपल्याला काळजी नाही.. ह्या विश्वातील समग्र ज्ञान, म्हणजेच प्रत्येक शुभ गोष्टींचा प्रारंभ..वेद मंत्रानेच होतो..त्रिविक्रम म्हणजे जे जे काही शुभ मंगलमय ते सर्वच्या सर्व जो निर्माण करतो आणि अमंगल दुर करतो, तो त्रिविक्रम..अन् तो जातवेदा.. 

"ॐ श्री जातवेदाय नम:" 5 वेळा जप करा.. 
आमचे नातेवाईक आहेत, त्यांनी कधी म्हणायचं.. दर महिन्याच्या 18 तारखेला जो कोणी 5 वेळा हा जप म्हणेल, त्याला आजसारखंच connection (संपर्क) जोडला जाईल.. ज्या दिवशी लक्ष्मीपुजन करू..श्रीसुक्तम् म्हणता आलं तर चांगलंच.. पण हा मंत्र 5 वेळा म्हणुन सांगू शकता! आपल्या भाषेत सांगायचं..की "माझ्याकडे पुजनाला घेऊन ये..

Agralekh

एक अतिशय अदभुत घटना तुळशीपत्र १५५१ मध्ये वाचायला मिळाली ,ती म्हणजे प्रभू श्री रामनी ,रामराज्य १०,००० वर्ष राज्य केले.
अर्थात माता सीतेसहित, कुठलेही कलह न करता. ।.पण आपण जी ज्ञात, विपर्यास केलेला इतिहास वाचतो की रामचंद्रांनी रावण वध केल्यानंतर ,राज्याभिषेक होऊन ,लगेच सीतेला वनात सोडलं ,नंतर लव-कुश जंगलात जन्मले ,वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिल्याबद्दल खेद व्यक्त केला, लव-कुश हे रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान यांच्याशी लढले हे सगळं काही थोथंड यासाठी रचलं गेलं की आपली प्रभु रामचंद्राची आदर्श प्रतिमा धुळीस मिळावी .अर्थातच त्यासर्वं लोकांना व्याभिचार करण्यात ह्या महापुरुषाचा अडसर /व्यत्यय येत असावा. त्याबरोबर  काही देवयान पंथ विरोधकांना पुन्हा कधीच ह्या वसुंधरेवर रामराज्य येऊच नये असा पण कट असावा. म्हणूनच ह्या लोकांना अजूनही राम मंदिर कुठेही बांधलं तर चालेल पण राम जन्म भूमीवर पुनर्निर्माणा ला प्रखर विरोध आहे .रामसेतु हा आदमसेतु म्हणून विख्यात करून फक्त २००० वर्षा पूर्वीचा आहे असा कांगावा केला जातो. रामाने शंभूक नावाच्या शूद्राचा पवित्र मंत्र जपल्या मूळे वध केला इत्यादी.
.दुर्दैवाने ह्या दंभ रामायणाला आम्हीं सत्य वाल्मिकी रामायण मानू लागलो ।आज एकपत्नी आदर्श मर्यादा पुरुष प्रभू राम  याची प्रतिमा स्वपत्नीला टाकणारा ,व १२ वर्षीय युवा श्रीकृष्णा ला आपण रासलीला करणारा लंपट अशी प्रतिमा  अनेक शतके ,पिढ्यानपिढ्या आपण  इतिहास वाचतो पण या आधी कुणालाही हे खोटं आहे हे वाटलं नाही ,वाटलं तरी प्रखर विरोध करता आला नाही।म्हणूनच आज आपला देश भारत या दोन आदर्श पुरुषाच चरित्र धिक्कारल्यामुळेच ही दैन्या अवस्थेत पोचलेला आहे।
तरी ह्या देशाची "जीन्स"त्या त्रिविक्रमच्या हाती असल्यामुळे ,व प्रत्येक कल्पामध्ये "तो" "अनिरुद्ध त्रिविक्रम" होऊन सगुण साकार झालेल्या मुळे, आज कचऱ्याच्या भावाने आम्हीं नरकयातना न भोगता ,सर्व सुखोपभोग भोगून " त्याच्यासंगे" भर्ग लोकी पोहचू .ही खरीच कलियुगातील सर्वोच्च पवित्र घटना मायचंडिकेमुळे  घडलेली आहे व आम्हाला अखेरची संधी मिळाली आहे ।खरंच आम्हीं सर्व श्रद्धावान बाल बाल वाचलो आहोत। अनिरुद्ध त्रिविक्रमच्या कृपेनेच  पंचमुख हनुमत कवच ,अठरा वचने ,व रामा रामा हा गजर रूपाने रामराज्याचा पास मिळालेला आहे।
अंबज्ञ नाथसंविध

Vachan

"तुम्ही जर #श्रध्देने, पुर्ण #विश्वासाने प्रेम करून प्रत्येक पाऊल माझ्या दिशेने टाकत राहीलात तर ह्या पुढचा तुमचा #जिवनक्रम हा तुमच्या कर्माच्या सिध्दांतानुसार नसेल तर माझ्या (अनिरूध्दाच्या) ईच्छे नुसार असेल.पुढचा जन्म भोगण्यासाठी नसेल तर माझ्या इच्छेनुसार असेल.जो मनापासुन माझा झाला त्याला माझं #वचन आहे की, मी तुमचा हा #जन्म वाया जाऊ देणार नाही.आणि पुढचा जन्म तर नाहीच नाही व तो ही माझ्या इच्छेनुसार व माझ्यासाठीच."......
*प.पु. #सद्गुरू #श्री #अनिरूध्द #बापु*

#हरि #ओम, #श्रीराम, #अंबज्ञ, #नाथसंविध्

#जय #जगदंब, #जय #दुर्गे

Aniruddha Atharva stotta

*अनिरुद्ध अथर्व स्तोत्र.*

हरिओम,
अनिरुद्ध अथर्व स्तोत्रामध्ये आपल्या अनिरुद्ध त्रिविक्रमाचे सर्वशक्तिमानता  प्रत्येक शब्दागणिक आपल्याला समजून येतं. त्या सद्गुरू अनिरुद्ध त्रिविक्रमाचे अस्तित्व विश्वातील प्रत्येक घटकात आहे पण असूनही फक्त तो मात्र अन्यथाकर्ता राहतो असा हा सच्चिदानंद आत्माराम एकमेवाद्वितीय सद्गुरु अनिरुद्ध. आपल्या जीवनामध्ये भरभरून असणारं हे सदगुरुंचे व्यापकत्व आपल्याला हे अथर्व स्तोत्र शब्दनशब्द शब्द समजावून सांगतो.
, काय सुंदर अथर्वस्तोत्र योगेंद्रसिंह यांनी लिहिलेलं आहे  . फलश्रुती अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडलेली आहे त्यामुळे गुरु तेज प्राप्त होतं, चंचलता नाश पावते, महापाप महाभय दुष्टप्रारब्ध नष्ट होतं. ज्याला सद्गुरू कृपा पाहिजे त्याला कृपा प्राप्त होते .ज्याला ऐश्वर्य पाहिजे सुयश, विजय पाहिजे त्याला ते सर्व प्राप्त होते व अंती तो श्रद्धावान निष्काम पावतो या अथर्वस्तोत्रच्या पठना मुळे आपल्या जीवनात उचित तेच घडतं अनुचित आहे ते कधीच घडू शकत नाही. या स्तोत्राच्या भावपूर्ण पठणामुळे सर्वजण आपोआपच तरून जातात असं स्वयंसिद्ध हे अनिरुद्ध अथर्व स्तोत्र आहे .जो हे अथर्वस्तोत्र आपल्या मनामध्ये दृढ करतो त्याला मधू विद्या प्राप्त होते. तो सायुज्य मुक्ती ला अंती पोहोचतो .जर   सामुदायिक  पठन करत असतील तर तो समुदाय पूर्ण निर्भय ,समर्थ, ओजवान होतो. कुठल्याही महा द्वंद म्हणजे हे करू की ते करू अशी जी अनिर्णित अवस्था आहे त्यातन वर येऊन निश्चित मार्ग दिसू लागतो .शेवटी प्रत्येक श्रद्धावान यामुळे सर्वनाशापासून स्वतःला वाचू शकतो सर्वार्थाने हे स्वत हुन उद्धार करणारे म्हणजे समस्त अभ्युदय करणारे, सर्व बाजूने कृपा करणारे समर्थ, सर्वसमर्थ, योगक्षेम  म्हणजे संसाराला लागणारी सर्व साधनसंपन्नता पूर्ण करणारे असे एकमेव अथर्वस्तोत्र आहे .सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तिमार्ग मध्ये आपल्याला निष्काम होणे
म्हणजेच त्या त्रिविक्रमा वर अनन्यता येऊन भक्तिभाव चैतन्याचीच एकमेव इच्छा असणे.
पण हे निष्काम होणं हे काय मोठ्या साधना, तपश्चर्येने शक्य होऊ शकतं ते केवळ या तर स्तोत्राने आपण प्राप्त करू शकतो या स्तोत्राने सर्व मनोकामना धरूनही तोच श्रद्धावान शेवटी निष्काम होऊन  सायुज्य मुक्ती प्राप्त करू शकतो "त्याच्या" साकेत  भर्गलोकी - जाऊ शकतो . याच्या पेक्षा सुंदर ,सुरक्षित ,सुख ,शांती ,समाधान ,तृप्ती देणारे सर्व समर्थ हे स्तोत्र आहे आणखी कुठलंही असू शकत नाही यामध्ये वादच नाही

अंबज्ञ
नाथसंविध

Agralekh

आजच्या दैनिक प्रत्यक्ष मधील अग्रलेखात प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रातील काही ठळक घडामोडी अश्रद्ध आणि श्रद्धाहीन दुर्जनांचे सर्व मनसुबे तोडून टाकणारा आहे. स्वयंभगवान प्रभू रामाच्या जीवनकार्यात कश्याप्रकारे खेळी करून आपले ब्रीद जपतो हे विलक्षण आहे.

रावणाने नक्की कुणाला पळवून नेले? त्या सीतामाईच्या 'छाया' स्वरूपासही रावण स्पर्श करू शकला नाही? आज प्रभू श्रीरामाच्या कार्यातील खूप मोठं रहस्य स्वयंभगवानाने विश्वासाठी उघड केलं आहे.

युद्ध माझा राम करणार। समर्थ दत्तगुरु मूळ आधार।
मी सैनिक वानर साचार। रावण मरणार निश्चितच।

Story: Gangapur

जो सद्गुरुवर विश्वास ठेवतो ...तो  उपभोगतोअष्टैश्वर्य
" गाणगापुरात एक ब्राह्मण होता. तो फार गरीब होता. गावात शंभर एक घरे होती. वैदिक ब्राह्मणाचा गाव अशी गाणगापुराची प्रसिद्धी होती. श्रीगुरु नृसिंहसरस्वती अमरजासंगमावर राहत असताना , दुपारी गाणगापुरात भिक्षा मागावयाला जात असत. त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी श्रीगुरूकृपेने एक दिवस एक चमत्कार घडला. त्या ब्राह्मणाची एक म्हैस होती. ती वांझ असली तरी वेसण घालून , माती वाहून नेण्याकरिता तिला भाड्याने तो ब्राह्मण देत असे. बरीच वर्षे त्या म्हशीने त्या दरिद्री ब्राह्मणाला दूध दिले नाही , पण श्रमाचा थोडाफार पैसा मिळवून दिला. आता मात्र ती म्हातारी झाली होती. तोंडात दातांचा पत्ता नव्हता. एक दिवस श्रीगुरुनाथयती त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ते पाहून बाजूचे सर्व शिष्ट ब्राह्मण आपापसात कुजबुजू लागले ,
" काय विचित्र आहे हा यती. आमच्या घरी भिक्षेला आला असता तर त्याला आम्ही पंचपक्कांन्ने वाढली असती , पण हा गेला या दारिद्र्याचे घरी. पाहू याची काय गंमत होते ती. "
त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना प्रभुची लीला काय माहीत ! विदुराच्या घरी प्रेमाने कण्या खाणारा भगवान दुर्योधनाच्या राजवाड्यांत कधी गेला नाही. ज्यांची सात्त्विक वृत्ती त्यांच्यावर श्रीगुरूंची प्रीती. श्रीगुरुंनी भिक्षा मागावयाला जायला व त्याच दिवशी त्या गरीब ब्राह्मणाची म्हैस कोणी भाड्याने न नेण्याला एकच गाठ पडली होती. वैशाख महिन्याचा कडक उन्हाळा. त्यातच भर दुपारची वेळ. तो ब्राह्मण भिक्षा मागायला गावात गेलेला. घरांत त्याची पत्नी चिंतामग्न बसलेली. एवढ्यात ' ॐ भवति भिक्षां देहि , " असा सूर तिच्या कानी आला. ती धावतच बाहेर गेली. तिने श्रीगुरुंना पाहताच त्या॑ना भक्तिपूर्वक नमस्कार केला व म्हणाली ,
" गुरुराया , माझे पती भिक्षा मागून आणायला गावात गेले आहेत. ते लवकरच परत येतील. त्या॑ना चांगले अन्न भिक्षेत मिळाले असेल. तोपर्यंत आपण या आसनावर बसावे. घरात आपणाला द्यावयाला दुसरे काही नाही. "
आसनावर बसून श्रीगुरू म्हणाले ,
" काय ग बाई , मला तू दूधाचीच भिक्षा का वाढीत नाहीस ? तुझ्या दारांत ही म्हैस तर बांधलेली आहे. मग दूध वाढता येण्यासारखे असताना काहीच द्यायला नाही असे खोटे का सांगितलेस ? "
" यतीमहाराज , आमची ही म्हैस वांझ आहे. रेडा म्हणून तिला आम्ही पोसतो. कधी कधी माती वाहून नेण्याकरिता गावातले लोक नेतात तिला. आमच्या योगक्षेमाला थोडाफार हातभार लावीत म्हातारी झाली बिचारी आतां. "
" बाई , ही म्हैस वांझ आहे असे खोटे का सांगता ? जा लवकर व दुध काढावयाला बसा. मला दुधाची भिक्षाही चालेल. "
" ठीक आहे यतिमहाराज. आपण सांगता आहात , तर जातेच मी दुध काढायला. "
ती ब्राह्मणाची विनम्र पत्नी श्रीगुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून , खरोखरच , म्हशीचे दूध काढावयाला बसली व म्हशीला पान्हा सुटून तिने दूध दिले. दुधाचे भांडे पूर्ण भरले. ते आश्चर्य पाहून , ते भिक्षा मागायला आलेले यतीराज साधेसुधे नसून ईश्वरी अवतार असावेत , याबद्दल त्या बाईची खात्री पटली. झटपट स्वयंपाकघरात जाऊन तिने दूध तापविले व यतीच्या सांगण्याप्रमाणे ती दुग्धभिक्षा त्यांना वाढायला घेऊन आली. श्रीगुरुंनी दुग्धप्राशन केले.
" तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल , पुत्रपौत्रांचे सुख तुम्ही अनुभवाल. मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. " असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू संगमाकडे निघून गेले. थोड्या वेळाने ब्राह्मण कोरान्न मागून घरी परतला. वांझ म्हशीने दूध दिल्याचे ऐकून तो आश्चर्यचकित झाला. आरती घेऊन पतिपत्नी संगमावर गेली व त्यांनी भक्तिपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली. अरे नामधारका , ज्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होते त्याला दैन्य बाधत नाही. तो अष्टैश्वर्य भोगतो.