Wednesday, January 9, 2019

8th Jan 2015 pravachan on prapatti

Sadguru shree Aniruddha bapu pravacgan by 8th jan 2015

हरि ॐ
प्रपत्ती...प्रपत्ती आटपायची गोष्ट नाही..स्त्रिया गोळा करणे ...यांत्रिकपणा नाही आला पाहिजे..त्यापेक्षा नं केलेलं बरं..छोटे ग्रुप करून करा..मला भाव महत्वाचा..
आपली संस्था मुळ 'अध्यात्म' आहे..नं शिस्त नको तर नाही..
भाव तोचि देव..ही प्रपत्ती ही त्यांच्या आयुष्यातली खुप महत्वाची गोष्ट आहे..
आधी जेंव्हा करायच्या तेंव्हा परकीय आक्रमण होत नव्हते..
स्त्री ही संरक्षकच असते..
100 अडचणी (डिफीकल्टी) मान्य  पण
प्रपत्ती करताना मन शांत आनंदी असू दे..
पुर्ण प्रेम, विश्वास अन पावित्र्य याना जपता आलं पाहिजे..
मुळ मुद्दा..
ॐ मंत्राय नम:
स्वार्थ..निर्भयता...हेल्थ...अवघाचि संसार सुखाचा करीन..   आज आपल्याला संसार सुखाचा करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे, 'संवाद'..
तुटे वाद संवाद तो हितकारी..
प्रत्यक्ष..कोण वाचतं..अग्रलेख..
प्रत्यक्ष न आपला काहीच संबंध नाही त्याला काही उपयोग नाही..
प्रत्यक्ष फक्त बापूंचा अग्रलेख वाचतो...बाकी घडी करून ठेवतो...असं करू नका..
प्रत्यक्ष म्हणजे काय, तर 'डायरेक्टली'...
पुन्हा मी कधीच सांगणार नाही, तुम्ही न तुमचं प्रारब्ध..ही धमकी आहे...
हा संवाद..जो आहे..सगळे ग्रंथ संवाद मधे आहेत..आमच्या घरात हा संवाद आहे का..?
संवाद म्हणजे..एकमेकाना समजुन घेणं..
हल्ली घरात एकमेकांशी बोलतच नाही..न बोलले तरी वेगळेच टॉपिक
आपण दुस-याचं बोलणं ऐकायला पाहिजे..
पतीने पत्नी काय बोलते हे ऐकुन घेतलं पाहिजे...
प्रत्येकाने एकमेकाना समजुन घेतलं पाहिजे..
आम्ही का एकमेकांशी, चांगलं बोलु शकत नाही..
दुस-यांची स्तुती, का करत नाही?..जेवण चांगलं झालं..ते नेहमी स्पेशल असलं पाहिजे..मीठ कमी झालं ते बोलतो...आपण एकमेकांना कधीच समजुन घ्यायचा प्रयास करत नाही...
कारण आपल्याला वाटतं, प्रत्येकाने आपल्या मनासारखं वागलं पाहिजे..
नो ह्युमन इज परफेक्ट.. (कोणी ही मनुष्य अचुक नाही)..

ज्या व्यक्ती जेवढ्या जवळ असतात, त्यांचे दुर्गुण आपल्याला दिसतात, पण लांब असलेल्यांचे दिसत नाहीत..
ज्याला वाटतं आपल्यात दुर्गुण नाही..असं वाटलं म्हणजे त्याची घडी भरली..म्हणजे तो संत झाला...
ज्या अर्थी मला आशा अपेक्षा आहे म्हणजे...माझ्यात दुर्गुण आहेत..
जमवुन घेण्यात खुप ताकद आहे..प्रत्येक जण हेच म्हणत असतो..किती समजुन घ्यायचं...मीच का समजुन घ्यायचं..  आपले जे आहेत, त्यांना समजुन घ्यायला शिका..लहान सहान गोष्टींमधे..
नं कोणाला, आपल्या व्यक्तीला कसला त्रास असेल..त्याच्या बद्दल सहानुभूती दाखवा..हा पण एक संवाद आहे..  माझं चुकलं..मी मान्य केलं..असं जे बोलतात म्हणजे ते खोटं बोलतात...
चुकलं तर सॉरी बोलायला शिका...नाही जमलं तर चुक सुधरायला शिका..
कोणावर खोटा आरोप करू नका...त्याचं 10पट प्रारब्ध वाढवतो...त्याच्याकडची 10 पापं स्वत:च्या डोक्यावर घेतो..राजानो कोणावर खोटा आरोप करू नका..प्रत्येक व्यक्तीच्या वेव्हज् (लहरी) सगळीकडे पहिल्या (फर्स्ट) असतात..जे लोक ऐकत असतात..ईतर लोक ऐकतात..नं चार लोकाना जाऊन कळवतात..
विचारांचा प्रकार...
प्रत्येकाकडे खुर्ची आहे..वेगवेगळ्या प्रकारच्या असतात...खुर्ची...म्हणतो सगळे..पण वेगळ्या प्रकारच्या दिसल्या तरी आपण त्याना खुर्चीच बोलतो नं... म्हणजे यांच्यात काहीतरी साम्य असेल ना...खुर्ची...जी स्थुल वस्तु दिसते..
त्याच्या मागे...एक तत्व असतं...ही सगळी एकत्र होतात..त्यांचा संग्रह होतो.दुर्गुणांचे दुर्गण पण..
दुस-यावर आरोप केला...कि तो ते दुस-या लोकाना सांगतो...घरात तुम्ही कोणावर खोटा आरोप करता..
तेंव्हा मोठी आई हे 10 पट नाही.. 100 पट येऊन आदळतात...खोटे आरोप तुमच्या विषयी कोणी केले..तरी या सगळ्याच्या पलीकडे मोठी आई आहे.
खोटे आरोप मी कोणावरही करणार नाही...असं ठरवा...लहान मुलांवर करतो...हा नं असाच आहे...ही कार्टी अशीच आहे...हा माझा मुलगा वाया गेला आहे...बापच असं बोलला म्हणजे कसं चालेल...बाप बोलला पाहिजे, नाही मी प्रयत्न करेन...
जेंव्हा आपण दुस-यावर आरोप करतो, त्यावेळी आपण आपल्या स्वत:वर खुप आरोप करतो...
घरामधे राहून एकमेकांवर आरोप करायचे नाहीत...
नं भांडताना पण आपण आपल्या मनाशी भांडतो..
पण प्रेम पण तेवढच करा.
मुलांना विचारा..खांद्यावर हात ठेवुन विचारा...पुरूषांनी घरी आल्यावर...ही काय घरात लोळत असते..मीच काम करून आलोय...जरा 10 दिवस त्यांची जबाबदारी घेऊन बघा...
घर म्हणजे एकमेकांशी बांधिलकी असते.. घरातल्या माणसाना तुम्ही खात्री द्या..तुम्ही आमचे आहात...प्रेम वाढवा...
करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात...
मैत्री करा..बायकोची नव-याशी मैत्री होऊ दे..करून बघा...घरात आलो कि आपण माणसं राहतो..एकमेकांनाही बोला..
तेंव्हाच संसार सुखाचा होतो...काळजी घ्यायला शिका..संवाद करायला प्रत्येकाने सुरूवात करायला पाहिजे...घरात एकत्र बसा, गाणी ऐका...पिक्चर बघा...काही घरात ही नावं माहित नसतात...
साध्या सुध्या हलक्या गप्पा मारायला शिका....ह्या गप्पांना अर्थ नाही, असं समजू नका..हा संवाद आहे.
संवाद म्हणजे, 'स्वस्ति' म्हणजे 'आरोग्य'..'क्षेम' म्हणजे 'कल्याण'.
आनंद करायला शिका...लहान सहान गोष्टींचं appreciate (कौतुक) करता आलंच पाहिजे...
प्रत्येक नात्यासाठी संवाद व्हायलाच पाहिजे...
गप्पा मारता यायलाच पाहिजेत..भांडणं त्याच दिवशी संपलीच पाहिजेत...एक तासात संपलं, तर मला आवडेल... तुमच्या घराला प्रेमळ बांधिलकी साठी शब्दांची आवश्यकता आहे...रागवणं, पण कधी कधी चांगलं असतं..रूठकर पहले, जी भर सताऊंगी मै, जब मनायेंगे वो, मान जाऊंगी मै,
हिन्दी सिनेमा अनुपमा मधे गाणं आहे..धीरे धीरे मचल, ऐ दिले बेकरार...ह्या गाण्यातुन आपल्याला कळतं..संगीत हे माणसाच्या जिवनात खुप आवश्यक आहे..
आपला मुलगा रुसला तर मनवायला काय हरकत आहे! 
आजपासुन आपण सगळ्यांनी संवाद साधायलाच पाहिजे..वाद संपवायलाच पाहिजे..
प्रत्येक कामासाठी ताकद, ही प्रत्येकाची जबाबदारी असते..
अंबज्ञ

No comments:

Post a Comment