Saturday, January 5, 2019

Agralekh

एक अतिशय अदभुत घटना तुळशीपत्र १५५१ मध्ये वाचायला मिळाली ,ती म्हणजे प्रभू श्री रामनी ,रामराज्य १०,००० वर्ष राज्य केले.
अर्थात माता सीतेसहित, कुठलेही कलह न करता. ।.पण आपण जी ज्ञात, विपर्यास केलेला इतिहास वाचतो की रामचंद्रांनी रावण वध केल्यानंतर ,राज्याभिषेक होऊन ,लगेच सीतेला वनात सोडलं ,नंतर लव-कुश जंगलात जन्मले ,वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिल्याबद्दल खेद व्यक्त केला, लव-कुश हे रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान यांच्याशी लढले हे सगळं काही थोथंड यासाठी रचलं गेलं की आपली प्रभु रामचंद्राची आदर्श प्रतिमा धुळीस मिळावी .अर्थातच त्यासर्वं लोकांना व्याभिचार करण्यात ह्या महापुरुषाचा अडसर /व्यत्यय येत असावा. त्याबरोबर  काही देवयान पंथ विरोधकांना पुन्हा कधीच ह्या वसुंधरेवर रामराज्य येऊच नये असा पण कट असावा. म्हणूनच ह्या लोकांना अजूनही राम मंदिर कुठेही बांधलं तर चालेल पण राम जन्म भूमीवर पुनर्निर्माणा ला प्रखर विरोध आहे .रामसेतु हा आदमसेतु म्हणून विख्यात करून फक्त २००० वर्षा पूर्वीचा आहे असा कांगावा केला जातो. रामाने शंभूक नावाच्या शूद्राचा पवित्र मंत्र जपल्या मूळे वध केला इत्यादी.
.दुर्दैवाने ह्या दंभ रामायणाला आम्हीं सत्य वाल्मिकी रामायण मानू लागलो ।आज एकपत्नी आदर्श मर्यादा पुरुष प्रभू राम  याची प्रतिमा स्वपत्नीला टाकणारा ,व १२ वर्षीय युवा श्रीकृष्णा ला आपण रासलीला करणारा लंपट अशी प्रतिमा  अनेक शतके ,पिढ्यानपिढ्या आपण  इतिहास वाचतो पण या आधी कुणालाही हे खोटं आहे हे वाटलं नाही ,वाटलं तरी प्रखर विरोध करता आला नाही।म्हणूनच आज आपला देश भारत या दोन आदर्श पुरुषाच चरित्र धिक्कारल्यामुळेच ही दैन्या अवस्थेत पोचलेला आहे।
तरी ह्या देशाची "जीन्स"त्या त्रिविक्रमच्या हाती असल्यामुळे ,व प्रत्येक कल्पामध्ये "तो" "अनिरुद्ध त्रिविक्रम" होऊन सगुण साकार झालेल्या मुळे, आज कचऱ्याच्या भावाने आम्हीं नरकयातना न भोगता ,सर्व सुखोपभोग भोगून " त्याच्यासंगे" भर्ग लोकी पोहचू .ही खरीच कलियुगातील सर्वोच्च पवित्र घटना मायचंडिकेमुळे  घडलेली आहे व आम्हाला अखेरची संधी मिळाली आहे ।खरंच आम्हीं सर्व श्रद्धावान बाल बाल वाचलो आहोत। अनिरुद्ध त्रिविक्रमच्या कृपेनेच  पंचमुख हनुमत कवच ,अठरा वचने ,व रामा रामा हा गजर रूपाने रामराज्याचा पास मिळालेला आहे।
अंबज्ञ नाथसंविध

No comments:

Post a Comment