Saturday, January 5, 2019

Sadguru punyashetram 1

।। हरि ओम।।
        @ भाग १ @
  आज आपण सद्गुरु पुण्यक्षेत्रम विषयी थोडक्यात माहिती करुन घेऊ.
17 मार्च 2005 रोजी आपल्या बापूंनी प्रथम प्रवचनापूवी सांगितले प्रवचनातील काही मुद्दे खालील प्रमाणे
१) ही जागा जळगाव (जिल्ह्यातील) अमळनेर पासून २७ कि.मी.अतंरवर  ( नीम ) या गावी आहे. या ठिकाणी आपल्या संस्थेच्यावतीने(४४ एकर ) जागा घेतली आहे.
२) ह्या जागेचा महत्व म्हणजे तापी नदी व पांजरा नदी यांच्या संगमाच्या बरोबर मध्ये ही जागा बसलेली आहे.
३) ह्या जागेमध्ये सतत तीन वषे राहून (रामनवमी १९०६ ते रामनवमी १९०९ )ज्यांना मी माझे मानवी सदगुरू मानतो ते गोपीनाथ शास्त्री पाध्ये माझे पणजोबा यांनी तपश्चर्या केली आहे.
४) या ठिकाणी आपण पाहिल्यांदा  उभारण्यात येणार ते मंदिर त्या मंदीरमध्ये     दत्तगुरुची मूर्ती मध्ये उभी आहे  त्याचा उजव्या बाजूस श्रीपाद श्रीवल्लभ,साई बाबा  तर डाव्या बाजूला स्वामी नित्य सरस्वती  स्वामी समर्थ  या मूर्तीची स्थापना होणार आहे त्याच ठिकाणी माझे मानवी सद्गुरू गोपीनाथ शास्त्री पाध्येचा अस्थी कलश स्थापना करून समाधी बांधण्यात येणार आहे
५) या पंचगुरूंचा स्थापना  गोपीनाथ शास्त्रीची समाधी माझ्या भावनांशी अत्यंत निगडित, माझ्या आदराची, प्रेमाची,वात्सल्याची स्थान स्थापन करतोय पुण्यक्षेत्रम म्हणून ते सदगुरू क्षेत्र असेल की तिथे प्रवेश म्हणजे देव लोकात प्रवेश करण्यासारखी आहे  ते देव लोक नव्हे अत्यंत पवित्र स्थान निर्माण आहे
६) ज्याप्रमाणे गाणगापूर हे भीमा नदीच्या व अंम्बर नदीच्या  संगमावर बसलेले आहे त्याप्रमाणे निम गाव तापी व पांजरा नद्यांच्या संगमावर सदगुरू स्थान निर्माण होणार आहे
जसे हे पंचसद्गुरू व गोपीनाथ शास्त्री  माझे आहे  तेवढेच तुमची आहे हे आम्ही लक्षात घेतले पाहिजेल
७) असे हे पवित्र आगळ - वेगळं असे तिथक्षेत्र आजून घडले नाही ह्याच्या पुढे कधीही घडणार नाही  असे हे तिथेक्षत्र  आहे आणि आम्ही अत्यंत वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार होणार आहे.
संकलन स्टार वृत्त  ( सुहाससिंह तावडे )
        ।।  हरी ओम  ।।
  ।। श्रीराम ,अंबज्ञ, नाथंसाविथ ।।

No comments:

Post a Comment