Saturday, January 5, 2019

Aniruddha Atharva stotta

*अनिरुद्ध अथर्व स्तोत्र.*

हरिओम,
अनिरुद्ध अथर्व स्तोत्रामध्ये आपल्या अनिरुद्ध त्रिविक्रमाचे सर्वशक्तिमानता  प्रत्येक शब्दागणिक आपल्याला समजून येतं. त्या सद्गुरू अनिरुद्ध त्रिविक्रमाचे अस्तित्व विश्वातील प्रत्येक घटकात आहे पण असूनही फक्त तो मात्र अन्यथाकर्ता राहतो असा हा सच्चिदानंद आत्माराम एकमेवाद्वितीय सद्गुरु अनिरुद्ध. आपल्या जीवनामध्ये भरभरून असणारं हे सदगुरुंचे व्यापकत्व आपल्याला हे अथर्व स्तोत्र शब्दनशब्द शब्द समजावून सांगतो.
, काय सुंदर अथर्वस्तोत्र योगेंद्रसिंह यांनी लिहिलेलं आहे  . फलश्रुती अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडलेली आहे त्यामुळे गुरु तेज प्राप्त होतं, चंचलता नाश पावते, महापाप महाभय दुष्टप्रारब्ध नष्ट होतं. ज्याला सद्गुरू कृपा पाहिजे त्याला कृपा प्राप्त होते .ज्याला ऐश्वर्य पाहिजे सुयश, विजय पाहिजे त्याला ते सर्व प्राप्त होते व अंती तो श्रद्धावान निष्काम पावतो या अथर्वस्तोत्रच्या पठना मुळे आपल्या जीवनात उचित तेच घडतं अनुचित आहे ते कधीच घडू शकत नाही. या स्तोत्राच्या भावपूर्ण पठणामुळे सर्वजण आपोआपच तरून जातात असं स्वयंसिद्ध हे अनिरुद्ध अथर्व स्तोत्र आहे .जो हे अथर्वस्तोत्र आपल्या मनामध्ये दृढ करतो त्याला मधू विद्या प्राप्त होते. तो सायुज्य मुक्ती ला अंती पोहोचतो .जर   सामुदायिक  पठन करत असतील तर तो समुदाय पूर्ण निर्भय ,समर्थ, ओजवान होतो. कुठल्याही महा द्वंद म्हणजे हे करू की ते करू अशी जी अनिर्णित अवस्था आहे त्यातन वर येऊन निश्चित मार्ग दिसू लागतो .शेवटी प्रत्येक श्रद्धावान यामुळे सर्वनाशापासून स्वतःला वाचू शकतो सर्वार्थाने हे स्वत हुन उद्धार करणारे म्हणजे समस्त अभ्युदय करणारे, सर्व बाजूने कृपा करणारे समर्थ, सर्वसमर्थ, योगक्षेम  म्हणजे संसाराला लागणारी सर्व साधनसंपन्नता पूर्ण करणारे असे एकमेव अथर्वस्तोत्र आहे .सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तिमार्ग मध्ये आपल्याला निष्काम होणे
म्हणजेच त्या त्रिविक्रमा वर अनन्यता येऊन भक्तिभाव चैतन्याचीच एकमेव इच्छा असणे.
पण हे निष्काम होणं हे काय मोठ्या साधना, तपश्चर्येने शक्य होऊ शकतं ते केवळ या तर स्तोत्राने आपण प्राप्त करू शकतो या स्तोत्राने सर्व मनोकामना धरूनही तोच श्रद्धावान शेवटी निष्काम होऊन  सायुज्य मुक्ती प्राप्त करू शकतो "त्याच्या" साकेत  भर्गलोकी - जाऊ शकतो . याच्या पेक्षा सुंदर ,सुरक्षित ,सुख ,शांती ,समाधान ,तृप्ती देणारे सर्व समर्थ हे स्तोत्र आहे आणखी कुठलंही असू शकत नाही यामध्ये वादच नाही

अंबज्ञ
नाथसंविध

No comments:

Post a Comment