Sunday, September 5, 2021

janmasthami


हरि ओम. आज जन्माष्टमी. आद्यपिपा महानिर्वाण दिन.
 त्यांच्या चरणी भाव पुष्पांजली.
हरि ओम .

महायात्रिक (२२ व्या अध्यायाची कथा) -

धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी झालेला हा अत्यंत सुंदर संवाद चौबळ आजोबा: अरे सुरेश (म्हणजे आद्यपिपा सुरेशचंद्र दत्तोपाध्ये- परमपूज्य श्री सुचितदादा आणि समीरदादांचे वडिल),हा श्रीविद्यामकरंदाचा (श्री गोपिनाथशास्त्री पाध्ये ) फोटो बघितल्यावर तुला काय वाटतं रे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं सांगू का? माझी नजर त्यांच्या डोळ्यांवरुन हलतच नाही. किती तेजस्वी,करारी, परंतु तरीहीकिती पवित्र आणि प्रेमळ भाव आहेत नाही?
चौबळ आजोबा: खरंआहे, पूर्णपणे खरं आहे. त्यांचे डोळे म्हणजेच संपूर्ण श्रीविद्यामकरंदत्व .आद्यपिपा (सुरेशचंद्र) :म्हणजे काय हो? मला काही जड शब्द कळत नाहीत व मला मोठया तत्वांची वगैरे खरं म्हणजेआवडच नाही.
चौबळ आजोबा: अगदी बरोबर बोललास , कसली आली आहेत मोठी तत्व आणि त्यांचे गूढार्थ? तो सदगुरुच एक खराव मोठा .तो समजायला मोठयामोठया बातांचा काही उपयोग होत नाही.
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :माझ्या मनातलं बोललांत बापूंच प्रवचन म्हणूनच मला खूप भावतं कारण सर्व उलगडून सांगतानासुद्धा बापू कधीच त्याच्यामध्ये क्लिष्टपणा आणत नाहीत व सहजपणे आपला मार्ग सापडतोच.
चौबळ आजोबा: तू काय बापूंना प्रवचनकार समजतोस ?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) :मुळीच नाही.चौबळ आजोबा:मग ते कोण आहेत?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : खरं म्हणजे वयाने, अनुभवाने ,भक्तीने व नात्याने तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात.त्यामुळे तुम्हीच"बापू कोण आहेत ? हे मला सांगायला हवं.चौबळ आजोबा: अरे,"दुसर्‍याने दिलेलं कितीसं पुरणार? ह्या अर्थाचं साईबाबांचं वचन हेमाडपंतानी लिहून ठेवलं आहे नाहीका? ते आठव व स्वत: त्यांचा मागोवा घेत राहा.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : मागोवा घ्यावासा वाटतो पण ती ३२व्या अध्यायातील शोध घेणार्‍या ४ जणांची व वणजार्‍याचीकथा आठवली की वाटतं आपण उगीच वेडयासारखं वागता कामा नये. माझा साई त्याअध्यायाप्रमाणेच मला नक्की येऊन भेटेल पण माझा १ हट्ट आहे .साईने एकदा तरी मलात्यांच विद्यमान रूप बाजूला सारुन त्या साईरुपातच ओळख पटवून दयावी.
चौबळ आजोबा: हा हट्ट कशासाठी? तुला अजून पटलं नाही काय ? तुला काय त्याची परीक्षा बघायची आहे?
आद्यपिपा (सुरेशचंद्र) : नाही , नाही तसं मुळीच नाही. पण ’आपल्याला समजलं ते आपल्या प्रयत्नामुळे ’ असं झाल्यास नसतां अंहकार डोक्यात चढेल ह्याची सदैव भीती वाटते. लहानपणापासून अनेकवार शिरडीसगेलो, साईसच्चरिताची पारायणे केली ,पण का कोणास ठाऊक ,कायम आपल्याला अंहकार होईल, आपण साईंपासून दूर जाऊ अशी भीती मनांत घर करून राहते.
चौबळ आजोबा: मगं आजच्या आज ही भीती बापूंच्या हातांत सोपविली असं म्हण ,आत्ताच्या आत्ता म्हणं.आद्यपिपा (सुरेशचंद्र) : त्यांना किती त्रास द्यायचा , जीभ वळत नाही.
(तेवढयात जिन्यावरून उतरणार्‍या बापूंना चौबळ आजोबांनी हाक मारली.)
चौबळ आजोबा: बापू , हा वेडा बघा. आता ह्याला जास्त वेळ तळमळत ठेवू नका .
बापू : काका, २२व्या अध्यायाचा अभ्यास करा.त्याचंच चिंतन करीत राहा. आतापर्यंत माणसाच्या वेगाने वाचत होतातआता मुंगीच्या वेगाने वाचत जा. हा पिपीलिका (मुंगी) मार्गच तुमचा आहे.
चौबळ आजोबा: अरे सुरेश, बघतोस काय? ताबडतोब पायावर डोकं ठेव. अरे, अनुग्रह झाला, आञा मिळाली .आता मुंगीहो आणि साखर खा.

No comments:

Post a Comment