Sunday, September 5, 2021

sunderkhand and gurucharitra 14 adhay

!!हरि ॐ!!

उद्या *श्री हनुमान पौर्णिमा*

आपल्या संस्थेच्या दृष्टिने २ महत्वाच्या घटना:-

(१)

२६ मार्च २०१० रोजी , *हनुमान पौर्णिमेच्या पवित्र दिनी* , श्रीगुरूक्षेत्रम मध्ये ,"गुरूक्षेत्रममंत्राच्या" गजरात ,
*श्रीत्रिविक्रमलिंगाची स्थापना* करण्यात आली.


(२) 

मागील वर्षी १९ एप्रिल २०१९ रोजी,
*हनुमान पौर्णिमेच्या पवित्र दिनी* ,
श्रीगोविद्यापिठम् येथे *श्रीदत्तमुर्तीची* स्थापना झाली.


 *प.पू. बापूंनी* , हनुमान पौर्णिमेचे महात्म्य सांगितले आहे की,

*#*
जानकी मातेने हनुमंतास आशिर्वाद दिला तो हाच पवित्र दिवस!!-

अजर अमर गुननिधि सुत होहू।
करहुॅं बहुत रघुनायक छोहू।
करहुॅं कृपा प्रभु अस सुनि काना।
निर्भर प्रेम मगन हनुमाना।।
---सुंदरकांड/९९.
*हे पुत्रा!तू अजर -अमर आणि गुणांचा खजिना होशील व रघुकुलनायक श्रीरामप्रभु तुझ्यावर प्रेमछत्र धरतील.* *प्रभु कृपा करतील हे कानाने ऐकून मारूतीराय पूर्ण प्रेमात निमग्न झाले व त्यांचे मन रामाच्या प्रेमाने भरभरून वाहू लागले.*

*#*

पुढे हनुमंताने लंका दहन ही याच दिवशी केले.

*हरि प्रेरित तेहि अवसर चले मरूत उनचास।*
*अट्टहास करि गर्जा कपि बढि लाख अकास।।*
---सुंदरकांड/१४८.
(अर्थ:त्यावेळेस प्रभुंच्या प्रेरणेने ४९ प्रकारचे वारे वाहू लागले.
मारूतीराय हसून गर्जले व वाढता वाढता आकाशाला जाऊं भिडले.)

*#*

या ओवीचा अर्थ समजावून सांगताना *प.पू.बापूंनी , श्रीगुरूचरित्रातील १४ अध्यायाचे महात्म्य तुलसीपत्र अग्रलेखांतून* विशद केले आहे .

*#* *तुलसीपत्र ३०७/३०८/३०९*

*सारांश*-

या ओवीतील घटनेमध्ये संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी म्हणतात की , *" हरिच्या प्रेरणेने ४९ प्रकारचे हे वारे वाहू लागले".*
ह्याचा अर्थ , संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी प्रत्येक श्रध्दावानास अगली ठसठशीतपणे दाखवून देत आहेत की हा हरि श्रध्दावानांचा कसा पक्षपाती आहे, सहाय्यकर्ता आहे व श्रध्दावानांच्या भक्तीने आणि मर्यादापालनाने संतुष्ट होऊन, त्या श्रध्दावानांना हानी करणा-यांच्या जीवनात ह्या मरूत् - गणांना कशा रितीने क्रोधित करतो व त्यांचे देहच काय ,घरच काय , नगरच काय, परंतु अख्खे सुदैवच जाळून टाकतो. 

हे ४९ मरूत्-गण श्रध्दावानांस ४९ मार्गांनी सहाय्य अर्थात,तर तेवढ्याच ४९ मार्गांनी श्रध्दावानांच्या शत्रूंची वासलात लावतात.
ह्याचा अर्थ:-
हे ४९ मरूत्-गण श्रध्दावानांच्या आकस्मिक आरिष्टांचे व घोर कष्टांचे निवारण करतात आणि श्रध्दावानांच्या शत्रूंवर घोर आरिष्ट आणतात.
.............आणि ह्या सर्वच्या सर्व ४९ मरूत्-गणांना घेऊन साक्षात श्रीहनुमंत येऊन बसला आहे,तो गुरूचरित्रातील १४व्या अध्यायात आणि म्हणूनच ह्या १४व्या अध्यायात ४९ ओव्या आहेत.
प्रत्येक ओवी म्हणजे एकेक मरूत्-गण व
*संपूर्ण अध्याय म्हणजेच "साक्षात श्रीहनुमंत"*
.......आणि म्हणूनच हर्ता अध्यायाचे वर्णन अगदी रचना काळापासून पुढील शब्दांत केलेले आपण ह्या अध्यायाच्या आरंभी वाचतो,

*" आकस्मिक अरिष्टाचे निरसन करणारा व भक्तिवात्स्ल्याने भरपूर रसरसलेला श्रीगुरूचरित्र अध्यायांतील मेरूमणी श्रीगुरूचरित्र अध्याय १४ वा"*

या अध्यायात ,सायंदेवास जिवंत जाळण्याची इच्छा असणा-या त्या यवनराजाचे ह्रदयच श्रीगुरू जाळतात व त्या अध्यायाच्या शेवटी त्या  श्रध्दावान सायंदेवास स्पष्टपणे ग्वाही देतात;
*न करा चिंता असाल सुखें।*  *सकळ अरिष्टें गेलीं दु:खें।* *म्हणोनि हसरत ठेविती मस्तकें।*
*भाक देती तये वेळीं।।४४।।*
*#* 
माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो, म्हणूनच  *मी कळकळून तुम्हाला सर्वांना सांगत असतो की दररोज न चुकता हा श्रीगुरूचरित्रातील १४ वा अध्याय आयुष्यभर वाचत रहा,* *जेवढ्या जास्तीत जास्त वेळा वाचता येईल ,तेवढ्या जास्तीत जास्त वेळा वाचता आणि दर गुरूवारी मी स्वत: ह्या अध्यायाच्या पठणाने सद्गुरू श्रीदत्तात्रेयांचे पूजन करतो,त्यात माझ्या खांद्याला खांदा लावून सहभागी व्हा.*
*कारण हा श्रीहनुमंतच श्रध्दावानशिरोमणि आहे.*

अंबज्ञ,नाथसंविध्.
जय जगदंब जय दुर्गे!!

source: whatsapp

*||ॐ श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम: ||*

No comments:

Post a Comment